राम गोपाल वर्माने लावलेली आग!
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे.
काही नमुने इथे आहेत.
http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ram-gopal-verma-sparks-another-controversy-tweets-ganesh
ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती. असो.)
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
हे घडताच काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तोही मुसलमान राम गोपालाबद्दल तक्रार करतो तेही विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हाही एक अजब योगायोग म्हणायचा! असो. कॉग्रेसचे हिंदू धर्मावरील प्रेम जगजाहीर असल्यामुळे असल्या फिल्मी प्रकाराला किती हिंदू भुलतील ह्याविषयी मला तरी शंका वाटते. हा योगायोग आहे का हे सगळे ठरवून केले आहे हेही सांगणे अवघड आहे. २६/११ नंतर लगेचच विलासराव देशमुखांनी वर्माला जिथे अतिरेकी हल्ले झाले तिथे नेऊन त्याच्या पुढच्या सिनेमाकरता मदत केली होती. त्यावरुन बरेच रान उठले होते. कदाचित ह्या उपकाराला जागून वर्मासाहेबांनी ही काडी सारली असेल.
आत्ताच गणपती बसला आहे त्यामुळे आल्या आल्या पाहुण्याला खजिल करता कामा नये. पण वर्माजींनी उल्लेखलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नाहीत. असो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरयासंपादित
रामू खरेच बोलला की !२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ?भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(