Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला माहीत असलेले रामायण

प
पोटे
Sat, 09/13/2014 - 19:12
🗣 163 प्रतिसाद
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.) ________________________________________________________ आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु. सीता ही भूमीकन्या होती. ________________ वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ? दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ? नवर्‍याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ? बलात्काराने स्त्री उपभोगणार्‍या वानराला मृत्युदंड दिला. तोच गुन्हा करणार्‍या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला. निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली. १. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला. २.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता. ______________________ रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. मग शूर्पी अनार्या कशी ? रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे. पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो? बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय. आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली. अशी कथा मी वाचलेली आहे.

प्रतिक्रिया द्या
52409 वाचन

💬 प्रतिसाद (163)
व
विजुभाऊ Sat, 09/13/2014 - 20:40 नवीन
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. तेंव्हा रामयणात सत्य आणि असत्याचे सोयीस्कर अर्थ लावण्यात काहीच अर्थ नाही
प
प्यारे१ Sat, 09/13/2014 - 20:42 नवीन
>>> रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. विजुभौ नो ऑफेन्स हा. रामायणाच्या अभ्यासकांना वरील प्रतिसादाच्या सत्यासत्यतेविषयी मूळ संदर्भ देण्याची विनंती याठिकाणी आम्ही करत आहोत. वल्ली, बॅटमॅन, मृत्युंजय, विकास कृपया इकडे लक्ष द्या. ;)
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रचेतस Sat, 09/13/2014 - 20:44 नवीन
इमाम् विरूपाम् असतीम् करालाम् निर्णतोदरीम् | वृद्धाम् भार्याम् अवष्टभ्य न माम् त्वम् बहु मन्यसे|| अद्य इमाम् भक्षयिष्यामि पश्यतः तव मानुषीम् | त्वया सह चरिष्यामि निःसपत्ना यथा सुखम् || इति उक्त्वा मृगशावाक्षीम् अलात सदृश ईक्षणा | अभ्यधावत् सुसंक्रुद्धा महा उल्का रोहिणीम् इव || रामा, तु ह्या विरुप, पोट खपाटीस गेलेल्या वृद्धेसाठी तू मला मान्यता देत नाहीस म्ह्णून तू आज पाहत असतानाच मी ह्या मानुषीला खाऊन टाकेन आणि पत्नीविहिन अशा तुझ्यासोबत सुखाने विचरण करेन. इतके बोलून ही शूर्पणखा जणू एखादी प्रचंड उल्का रोहिणीवर कोसळत आहे तशा प्रकारे हरिणीच्या पिल्लाप्रमाणे डोळे असलेल्या सीतेकडे झेपावली.
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 09/13/2014 - 20:45 नवीन
धन्स वल्ली. पण त्यापुढचं काय? लक्ष्मणानं काय केलं नेमकं?
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 09/13/2014 - 20:46 नवीन
इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला, तरी पुढचे देतो ताम् मृत्यु पाश प्रतिमाम् आपतंतीम् महाबलः | विगृह्य रामः कुपितः ततो लक्ष्मणम् अब्रवीत् || क्रूरैः अनार्यैः सौमित्रे परिहासः कथंचन | न कार्यः पश्य वैदेहीम् कथंचित् सौम्य जीवतीम् || इमाम् विरूपाम् असतीम् अतिमत्ताम् महोदरीम् | राक्षसीम् पुरुषव्याघ्र विरूपयितुम् अर्हसि || इति उक्तो लक्ष्मणः तस्याः क्रुद्धो रामस्य पश्यतः | उद्धृत्य खड्गम् चिच्छ्हेद कर्ण नासम् महाबलः || मृत्युपाशाप्रमाणे येणार्‍या राक्षसीला श्रीरामाने हुंकारानेच रोखून लक्ष्मणाला म्हटले, ह्या क्रूर अनार्यांचा कुठल्याही प्रकारे परिहास करता कामा नये, ह्या समयी सीतेचे प्राण कसेबसेच वाचले आहेत तस्मात तू ह्या कुरुप, कुलटा अशा महाउदरीला विद्रुप करणे आवश्यक आहे. कृद्ध रामाचे हे म्हणणे ऐकून लक्ष्मणाने खड्ग उपसून राक्षसीचे कान-नाक कापून टाकले.
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 09/13/2014 - 20:48 नवीन
लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;) तर विजुभौ, वल्लीच्या पहिल्याच प्रतिसादामध्ये शूर्पणखेनं नेमकं काय केलं म्हणून लक्ष्मणानं तिला शिक्षा दिली असं आलेलं आहे. त्यामुळं >>> केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. हे विजुभौंचे म्हणणे चुकीचे ठरते. असो!
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अनुप ढेरे Sat, 09/13/2014 - 20:51 नवीन
यावर विजुभांऊंच मत जाणून घ्यायला आवडेल.
↩ प्रतिसाद: प्यारे१
व
विजुभाऊ Sat, 09/13/2014 - 20:52 नवीन
अनूप. वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत. क्षणासाठी असे मानूया की शूर्पणखा ही राक्षस होती. तरीही तिने सर्वप्रथम प्रपोज केले आणि त्यात अडथळा येतोय या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली. कोणत्याही भावाला याचा राग येणे नैसर्गीक आहे. लक्ष्मणाने अगोदर काही वाटाघाटी केल्या असत्या किंवा त्याने रावणाला " बघ तुझी बहीण काय म्हणतेय " असे काही बोलणे केले असते तर ते योग्य ठरले असते. एकदम नाक कापणे म्हणजे शुद्ध रानटीपणाचा कळस झाला. हे रावणाच्या कृतीचे समर्थन नाही. पण लक्ष्मणाची चूक दाखवून द्यायची आहे. शीळा झालेल्या अहिल्येचा तथाकथीत उद्धार करणार्‍या रामाने देखील लक्ष्मणाला यावेळेस कोणताच सल्ला दिला नाही. वालीच्या वधाबद्दल रामाला कधीच कोणी दोषी ठरवले नाही पण रामाने वालीला त्याची वैयक्तीक कोणतीच वैरभावना नसतानाही ठार केले तेही झाडा आड दडून भेकडपणे. ही गोष्ट नाकारता येत नाही. राम हा सुद्धा न्यायी वगैरे नसावा. अन्यथा त्याने शंबूकाला कानात शिसे ओतून ठार केले नसते.तळागाळातल्या वर्गाला शिक्षणाचा हक्क नाही हेच रामाने आपल्या कृतीने दाखवून दिले. एका अर्थाने रामायणात सत्याचा जय झाला. शेवटी रामाला स्वतःच्या मुलांना ओळख द्यावी लागली. मात्र त्यासाठी बिचार्‍या निष्पाप सीतेला स्वतःचा अंत करुन घ्यावा लागला. अर्थात शेवटी दुष्ट आणी अन्यायी रामाला स्वतःचा जीवनाचा शेवट हा अत्महत्येने करुन घ्यावा लागला.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्यारे१ Sat, 09/13/2014 - 20:54 नवीन
मतं पक्की झालीयेत तुमची. आधी बाण मारुन नंतर वर्तुळं काढताय विजुभाऊ. रामायणाचा एवढा करुण शेवट मधुर भांडारकर ला सुद्धा अपेक्षित नसेल. ;) चालू द्या!
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
कवितानागेश Sat, 09/13/2014 - 20:55 नवीन
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.>> विजुभाउ, तुम्ही होतात का हो वनवासात?? =)) माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे रहातय. शूर्पणखा आली. तिनी लक्ष्मणाची छेड काढली. लक्ष्मण लई चिडला आणि त्यानी काटक्या गोळा करायचे काम सोडून एकदम तिचे नाकच कापलं... विजुभाउ जंगलात फिरत फिरत गेले होते. त्यांनी बाजूच्याच एका झाडाआडून हे सगळं दुष्कृत्य पाहिलं... आणि परत येउन मिपावर झण्झणीत प्रतिक्रिया दिली! (ह. घ्या)
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अनुप ढेरे Sat, 09/13/2014 - 20:56 नवीन
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.
हे जनरल विधान आहे का याला काही संदर्भ आहे? रामाने त्या काळच्या न्यायाने जे काही करायचं ते केलं. वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे. त्यामुळे वाली जंटलमन होता हे पटत नाही.
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Sat, 09/13/2014 - 20:58 नवीन
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे.
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना. रामाने सुग्रीवाकडून वालीची सुपारी का घ्यायची. बरं घेतली तर घेतली पण मग समोरासमोर लढाई करायला काय हरकत होती. झाडाआडून कशाला बाण मारायचा? तेही सुग्रीव आणि वाली ची कुस्ती चालू असताना? आय मीन वाली नि:शस्त्र असताना? यात रामाचा जंटलमनपणा कुठे दिसतो? यात कोणत्या सत्याचा जय झालेला दिसतो? अवांतरः एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्यारे१ Sat, 09/13/2014 - 20:59 नवीन
>>> एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे. रामानं काय उत्तर दिलं रे वल्ली? प्लिज प्लि एक्दाच डिट्टेलवारी सांग.
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रचेतस Sat, 09/13/2014 - 21:00 नवीन
रामाने वालीला बरीच गुळमुळीत उत्तरे दिली हे मात्र खरेच. नैतिकदृष्ट्या वालीला मारण्याचे कुठल्याच अंगाने समर्थन होऊ शकत नाही. रामान दिलेली काही कारणे १. तू सुग्रीवाच्या हयातीतच त्याच्या पत्नीचा उपभोग घेत आहेच म्हणून तू दंड देण्यास योग्य आहेस. (वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष) २. सुग्रीव माझा मित्र आहे आणि तो मला लक्ष्मणासमान आहे शिवाय तो माझी पत्नी परत मिळवून देण्यासाठी मला साहाय्य करणार आहे आणि मी ही त्याला त्याची पत्नी व राज्य परत मिळवून देईन अशी प्रतिज्ञा केली आहे. प्रतिज्ञेपासून विचलीत होणे हा क्षत्रियांचा धर्म नव्हे. ३. हे वानरा, तू मनुष्य नव्हेस, पशू (वानर) आहेस . मृगया करणे हे आम्हा क्षत्रियांना सर्वथैव उचित आहे. तू शाखामृग असल्याने तू युद्ध करत असताही अथवा नसताही तुझा वध करणे हे आम्हा क्षत्रियांना योग्यच आहे. इतरही बरीच कारणे रामाने सांगितली आहेत. अर्थात मित्राला राज्य परत मिळवून देऊन त्याचे साहाय्य मिळवणे हेच प्रमुख उद्दिष्ट होते शिवाय वालीसुद्धा काही परमधार्मिक वैग्रे असा काही नव्हताच.
↩ प्रतिसाद: प्यारे१
आ
आनन्दा Mon, 09/15/2014 - 06:00 नवीन
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष)
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 09/15/2014 - 06:07 नवीन
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.
आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? मायावी राक्षसाचा पाठलाग करताना गुहेत गेलेल्या वालीच्या पाठीमागून रक्ताचा लोंढा वाहात आला तेव्हा वाली मेला असे समजून सुग्रीवाने गुहेचे द्वार धोंडा लावून बंद केले. फक्त तेव्हाच सुग्रीवाला वाली मेलाय असे वाटले होते. त्यानंतर काही काळात वाली द्वार फोडून गुहेबाहेर आल्यावर सत्ताप्राप्तीसाठी सुग्रीवाने दार लावून घेतले असे समजून सुग्रीवाला स्थानभ्रष्ट केले व त्याची पत्नी बळकावली.
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 09/15/2014 - 06:58 नवीन
तेव्हाच म्हणतोय. वालीच्या पत्नीशी विवाह केला तेव्हा सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते. नपेक्षा असे धाडस तो करूच शकला नसता.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विटेकर Sat, 09/13/2014 - 21:03 नवीन
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना. रामाने सुग्रीवाकडून वालीची सुपारी का घ्यायची.
अभ्युत्थान धर्मस्य...
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ध
धन्या Sat, 09/13/2014 - 21:04 नवीन
धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या मागे लपून नि:शस्त्र द्वंद्वात गुंतलेल्या व्यक्तीवर बाण सोडुन होते?
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्यारे१ Sat, 09/13/2014 - 21:05 नवीन
>>> धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या मागे लपून नि:शस्त्र द्वंद्वात गुंतलेल्या व्यक्तीवर बाण सोडुन होते? होतं की! त्याला काय? शिवाजीमहाराजांनी अफजलखानाशी 'पंजा लढायला' हवा होता वगैरे मताचा आहेस का काय? =)) वाली अत्यंत सामर्थ्यशाली होता. रावणाला बर्‍याचदा हरवलं देखील होतं.त्यानं रावणाला दक्षिणेत दाबून ठेवला होता. तहानुसार रावणानं वर यायचं नाही आणि वालीनं दक्षिणेत जायचं नाही असा काहीसा प्रकार होता. युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो. अयोध्येला लांब ठेवून, वालीला शासन देऊन, त्याच्याच भावाला गादीवर बसवून, त्याच्याच सैन्याला घेऊन रावणावर चालून जाण्याचा अत्यंत धूर्त कार्यक्रम हुशारीनं रामानं राबवला. (कोलॅटरल डेमेजेस बद्दल सगळे जण सायलेण्ट असतात.) पुढं अंगदाला दूत म्हणून पाठवला. ज्या वालीनं तुला चेपटवला होता त्या वालीला मी मारलाय आणि तरी त्याच्या पोराला अभय देऊन तुझ्याकडं पाठवतोय असा संदेश द्यायचा होता. हनुमानानं बळंच शेपटी जाळून टाईमपास नाही केला. त्यानं अर्धी लंका मानसिकदृष्ट्या खच्ची केली. आमच्याच घरात येऊन एक सेवक आमच्या संपत्तीची एवढी हानी करतो तर त्याचा मालक किती बलवान असेल हे सांगायचं होतं. बाकी रावणाला आधी शाप होता की बळजबरी कुठल्या बाईला हात लावशील तर तुझं डोकं तुकडे होऊन पडेल. सीतामैय्याला हात न लावण्याचं ते कारण होतं बरं. ;)
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Sat, 09/13/2014 - 21:07 नवीन
प्रत्येक गोष्टीचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावायचा असं ठरवल्यावर बोलणंच संपतं :)
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 09/14/2014 - 08:50 नवीन
असेच म्हणतो.
↩ प्रतिसाद: धन्या
अ
अवतार Sun, 09/14/2014 - 06:20 नवीन
मग सीतामाईला पुष्पक विमानातून पळवून आणताना रावणाने एअरहोस्टेस ठेवली होती की काय? :)
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पोटे Sun, 09/14/2014 - 07:32 नवीन
ती स्त्री म्हणजे वेदवती.. तिने रावणाला आणखी एक शाप दिलेला होता.. तुला एक मुलगी होईल. ती तुझा नाश करेल. कालांतराने रावणाचे लग्न झाले. रावण अ मंदोदरीला मुलगी झाली. रावणाला शापाचे स्मरण झाले. त्यान्र ती मुलगी पेटीत घातली आणि दूर एका शेतात नेऊन टाकली... तात्पर्य : मंदोदरी ही रामाची सासू होती !
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पोटे Sun, 09/14/2014 - 07:37 नवीन
http://en.m.wikipedia.org/wiki/Sita
↩ प्रतिसाद: पोटे
प
प्रचेतस Sun, 09/14/2014 - 07:51 नवीन
विकिपेडिया वाचलं की असंच होतं.
↩ प्रतिसाद: पोटे
ट
टवाळ कार्टा Sun, 09/14/2014 - 08:24 नवीन
=))
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विजुभाऊ Mon, 09/15/2014 - 09:58 नवीन
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो.
हे मग रावणाच्या सीता हरणा बद्द्लही असेच म्हणता येइल
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Mon, 09/15/2014 - 10:08 नवीन
म्हणा की मग! त्यानंतर रामानं निषेधाचे खलिते पाठवले नाहीत अथवा प्रश्न युनो मध्ये पण नेला नाही ना? ;)
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
काळा पहाड Mon, 09/15/2014 - 10:23 नवीन
सीतेला पळवून नेण्याचा प्रकार म्हणजे युध्दनीतीचा प्रकार होता असं तुम्हाला म्हणायचंय का? युद्धनीतीची ही व्याख्या कुणाची? आयसिस ची का?
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मेघवेडा Mon, 09/15/2014 - 09:36 नवीन
अहो पण 'अभ्युत्थानम् अधर्मस्य' बाकी चलनेदो!
↩ प्रतिसाद: धन्या
क
कवितानागेश Mon, 09/15/2014 - 12:56 नवीन
हेच सांगायचं होतं कधीपासून, पण म्हट्लं, ते धर्म-अधर्म, वाली-सुग्रीव, राम-रावण आपले आपण बघून घेतील! ;)
↩ प्रतिसाद: मेघवेडा
अ
अनुप ढेरे Sat, 09/13/2014 - 21:08 नवीन
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना.
सुग्रीवाला जर एकट्याला वालीशी लढणं आणि जिंकणं शक्य नव्हतं तर दुसर्‍याची मदत घेण्यात काय चूक आहे?
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चिगो Tue, 09/16/2014 - 13:53 नवीन
या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली.
ह्याच्याशी थोडासा असहमत.. शुर्पणखेने सीतेला मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे "अटेंप्ट टू मर्डर" जो "दखलपात्र गुन्हा" आहे. असा गुन्हा जर एखाद्या स्त्रीच्या संदर्भात घडत असेल जी स्वरक्षणास अक्षम आहे, तर त्या परीस्थितीत तिथे उपस्थित दुसरी सक्षम व्यक्ती (पक्षी : राम / लक्ष्मण) शुर्पणखेला अटकाव करु शकतो.. आता लक्ष्मणाने अटकाव करतांना मुद्दामहून तिचे नाक कापले की ते झटापटीत कापल्या गेले, आणि ते कृत्य ग्राह्य मानल्या जाईल का, ह्याकरीता परीस्थितीजन्य पुराव्यांचा पडताळा घेऊन निर्णय घेण्यात येईल.. सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/16/2014 - 14:04 नवीन
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..
=)) आणि जरी तिथे सिध्द झालेच की लक्ष्मण गुहेगार होता तरी त्याला शिक्षा देता येणार नाही कारण इतिहासातल्या चुका वर्तमानात दुरुस्त करता येत नाहीत .... अहो आमच्या देशात ४०० वर्षांपुर्वी एक मंदीर पाडण्यात आले , आमच्या आर्किओलॉजिस्टस ने तिथे मंदीर होतेच ह्याचे खणखणीत पुरावे देवुनही आम्ही तिथे मंदीर बांधु शक्त नाहीये , हे झाले ४०० वर्षांपुर्वीच्या अण्यावाचा बाबतीतला किस्सा , ४००० वर्षांपुर्वीचे तर विसरुनच जावा =))
↩ प्रतिसाद: चिगो
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/16/2014 - 14:10 नवीन
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.
. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख.....तारीख पर तारीख मिलती रही हैं लेकिन इंसाफ नहीं मिला. =)) Image removed.
↩ प्रतिसाद: चिगो
प
पैसा Tue, 09/16/2014 - 14:15 नवीन
मला एक गंमत कळत नाही, लक्ष्मणाने काय शूर्पणखा सीतेला मारीपर्यंत वाट बघायची होती, का तिची मनधरणी करायची होती?
↩ प्रतिसाद: चिगो
प
प्रचेतस Tue, 09/16/2014 - 14:19 नवीन
ते एक पोटे आणि विजुभौंनाच ठाउक.
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खटपट्या Tue, 09/16/2014 - 18:44 नवीन
हो पण नाक कापणे म्हणजे जरा जास्तच झालं बै !! तोंडाला काळं फास्लनित अस्त तरी चाललं अस्त. बिना लग्नाची पोर कसं होणार तिचं ?? कोण घेणार तिला पदरात ?? आं ?
↩ प्रतिसाद: पैसा
प
पोटे Tue, 09/16/2014 - 19:05 नवीन
शुर्पणखा विधवा होती. तिचा नवरा विद्द्युतजिव्हा हा रावणाकडुन चुकुन मरण पावला होता. लक्ष्मण शूर्पणखा विवाह झाला असता तर विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळाले असते
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 09/16/2014 - 22:16 नवीन
ओके !!
↩ प्रतिसाद: पोटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 06:40 नवीन
>>>> लक्ष्मण शूर्पणखा विवाह झाला असता तर विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळाले असते व्वा...! क्या सोच है. लाईक. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: पोटे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/16/2014 - 16:19 नवीन
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.. यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :) गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते. माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे. आप्ला क्रूपाभिलाशी आड्वाकोट स दा आगलावे
↩ प्रतिसाद: चिगो
ट
टवाळ कार्टा Tue, 09/16/2014 - 18:52 नवीन
आड्वाकोट स दा आगलावे
=))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Sat, 09/13/2014 - 20:42 नवीन
लेखनविषय "विनोद, मौजमजा" ??? आणि मी पयला :)
प
प्रचेतस Sat, 09/13/2014 - 21:11 नवीन
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
यजुर्वेदीच होते हा शोध कसा लावलात? आणि पुलत्सी नाही तर पुलत्स्य, आणि पुलत्स्य हे आजोबा होते. पुलत्स्यपुत्र विश्रवापासून सुमाली नामक राक्षसकन्या केकसी हिला रावण, शूर्पणखा वैग्रे संतती झाली. आणि आपल्यापेक्षा खालची जातीतील पत्नी असेल तर त्यांचे संतान खालच्या जातीतलेच असेल हा तेव्हा सर्वमान्य दंडक होता. जसे क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री अथवा दासी पासून झालेली संतान म्हणजे सूत. किंवा भीमाचेच उदाहरण घ्या. हिडिंबेपासून झालेला पुत्र घटोत्कच हा क्षत्रिय न समजला जाता राक्षसच समजला जात असे. पौराणिक गोष्टींचे संदर्भ आजच्या काळात लावण्यात काहीच हशील नाही पण तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.
प
प्रसाद१९७१ Sat, 09/13/2014 - 21:12 नवीन
तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.
सहमत. लबाडपणा करु नयेच, रामानी काय आणि दुसर्‍यानी काय
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विलासराव Mon, 09/15/2014 - 07:40 नवीन
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत. लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
काळा पहाड Sat, 09/13/2014 - 21:28 नवीन
एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही. त्या युगातल्या कृत्यांवर सध्याची समाजमान्यता मोजता येणार नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपड्याचा "चौरंग" केला. सध्या तुम्ही कुणालाही ठार मारणं हा मर्डर ठरतो. तोच न्याय शिवाजी महाराजांना लावता येणार नाही. त्यांचं युग वेगळं होतं आणि त्याचे नियम वेगळे होते. तुम्ही जर दुसर्‍या युगातल्या प्रभृतींची कृत्यांचं समर्थन किंवा त्यावर टीका केली तर त्याला फारसा अर्थ नाही. तस्मात, रामायणाची नैतिक किंवा कायदेशीर दृष्टीनं चिरफाड ही आपण करू शकतो पण सध्याच्या युगाच्या कल्पना या त्या युगाला लागू पडत नाहीत. म्हणूनच वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का हा किंवा असे प्रश्न (सभ्य भाषेत सांगायचं तर) अप्रस्तुत ठरतात.
म
मुक्त विहारि Sat, 09/13/2014 - 21:48 नवीन
"एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही." प्रचंड सहमत...
↩ प्रतिसाद: काळा पहाड
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा