Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला माहीत असलेले रामायण

प
पोटे
Sat, 09/13/2014 - 19:12
🗣 163 प्रतिसाद
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.) ________________________________________________________ आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु. सीता ही भूमीकन्या होती. ________________ वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ? दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ? नवर्‍याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ? बलात्काराने स्त्री उपभोगणार्‍या वानराला मृत्युदंड दिला. तोच गुन्हा करणार्‍या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला. निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली. १. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला. २.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता. ______________________ रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. मग शूर्पी अनार्या कशी ? रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे. पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो? बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय. आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली. अशी कथा मी वाचलेली आहे.

प्रतिक्रिया द्या
52409 वाचन

💬 प्रतिसाद (163)
स
सुहास.. Mon, 09/15/2014 - 11:38 नवीन
"एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही." >>> मी ही सहमत .. बाकी बर त्या व्यासांनी दोनच महाकाव्ये रचली, आणिक रचली असती तर, पाय-पुसणीपेक्षा जास्त धागे आंजावर निघाले असते ;) थोडेसे विषयाविषयी : जर कुठल्याही मुळ पुस्तकातील , दृश्ये, संदर्भ मानावयची असल्याल इतर पुस्तकांतील ही मानावीत ...
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
श्रीनिवास टिळक Sun, 09/14/2014 - 03:33 नवीन
मला पाहिजे असलेले रामायण
अ
अनुप ढेरे Sun, 09/14/2014 - 05:46 नवीन
ब्राह्मण आणि आर्य संकल्पना या म्युचुअली एक्सलुझीव असतात का?
ब
बॅटमॅन Sun, 09/14/2014 - 05:47 नवीन
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
विटेकर Sun, 09/14/2014 - 05:48 नवीन
आर्यावर्यात राहणारे सगळेच आर्य ! आर्य हा जातिवाचक शब्द नसून गुण वाचक आहे !
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नानासाहेब नेफळे Sun, 09/14/2014 - 05:49 नवीन
आर्य हा स्थलदर्शक शब्द आहे, जे लोक युरेशियातून आले ते आर्य.
↩ प्रतिसाद: विटेकर
आ
आनन्दा Mon, 09/15/2014 - 07:02 नवीन
अच्छा अच्छा, म्हणजे आर्यांच्या वेळेस पण युरेशियाला युरेशियाच म्हणायचे वाटते. तुम्हाला कसे कळले हो? अभ्यास भलताच दांड्गा हो तुमचा!
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड Mon, 09/15/2014 - 07:24 नवीन
तुम्हाला आर्य आले त्या वाटेवर प्रगणकाच्या भूमिकेत एका झाडाच्या ढोलीत बसलेले इतिहासाचार्य ना.ने. दिसले नाहीत वाटतं? भूर्जपत्रांची थप्पी पण होती त्यांच्याजवळ लिहिण्यासाठी.
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/16/2014 - 20:28 नवीन
बाळ गंगाधर टिळक यांच्या 'आर्टीक्ट होम ईन वेदाज' या महाग्रंथाच्या वाचनातून वरील विधान मी केले आहे.टिळकांच्या मते वेदातील बरीच वर्णने आर्टीक्ट सर्कलशी मिळती जुळती आहेत.यावरुन वैदिक लोक थंड प्रदेशातुन भारतात आले, तोच युरेशिया.
↩ प्रतिसाद: आनन्दा
व
विलासराव Mon, 09/15/2014 - 07:48 नवीन
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात. ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Mon, 09/15/2014 - 07:52 नवीन
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत. त्याचा वर्णाशी कसलाही संबंध नाहिये.
↩ प्रतिसाद: विलासराव
व
विलासराव Mon, 09/15/2014 - 09:51 नवीन
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कवितानागेश Sun, 09/14/2014 - 05:57 नवीन
आपण शूर्पीलाच विचारुयात की. 'हेय, शूर्पी डीयर, हौ कम यु फॉल इन अनार्याज? युअर डॅड इज ब्रम्हिन. इज्ञ्ट इट?'
स
सुबोध खरे Sun, 09/14/2014 - 08:04 नवीन
पुराणातली वानगी राहू द्या पुराणात कि हो
ध
धन्या Sun, 09/14/2014 - 10:19 नवीन
तसं केलं तर काथ्या कसला कुटणार?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रचेतस Sun, 09/14/2014 - 10:26 नवीन
रामायण हे महाकाव्य असून पुराणात गणले जात नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Sun, 09/14/2014 - 11:14 नवीन
बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे पाहून हहपुवा झाली, तेवढेच वल्लीकडून वरिजिनल रामायणाचे दाखले मिळाल्याने माहितीतही भर पडली.
ध
धन्या Sun, 09/14/2014 - 12:00 नवीन
असेच म्हणतो. आमचा आवडता ब्लॉग खटटा मिठा इथेही आपल्या देव देवतांबद्दल आणि एकंदरीत ईतहासाबद्दल वाचायला असते. रामाबद्दल या लेखात उहापोह झालेल्या मतांवर एक लेख इथे आहे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Sun, 09/14/2014 - 14:16 नवीन
आपल्या मताशी सहमत आहेच. पण येथे मात्र रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणार्यांऐवजी राम कसा सम्पूर्णत: वाईटच्च होता, लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कान कापून कसा तिच्यावर घोर अन्याय केलाय, या वैफ़ल्यतेतूनच वेदोनारायण सज्जन रावणाने सीताहरण केले, भावाला विजनावासात हाकलून त्याच्या बायकोचा उपभोग घेणार्या वालीला रामाने कसे झाडामागे दडून निर्दयतेने मारले असे सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते. बाकी रामायण हे काल्पनिक आहे असे मी मानतो. इतकी आदर्श परिस्थिति अगदी आदर्श परिस्थितीतही उद्भवू शकणार नाही. :)
↩ प्रतिसाद: धन्या
अ
अनुप ढेरे Sun, 09/14/2014 - 14:44 नवीन
सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते.
हेच म्हणतो. ~२००० वर्षांपूर्वीची माणसं/पात्र घेऊन, त्यांंच्या कृत्यांना आजचे न्याय/अन्यायाचे नियम लाऊन उगाच लोकांच्या प्रेमाच्या/आदराच्या स्थानांवर घाव घातल्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न आहे हा. वल्लींना अभ्यासपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद!
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ध
धन्या Sun, 09/14/2014 - 15:03 नवीन
आणि लोकही २००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या (?) आपल्या प्रेमाच्या/आदराच्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रत्येक कृतीचे "अभ्युथानमधर्मस्य" असे हिरीरीने समर्थन करत आहेत. :)
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बॅटमॅन Mon, 09/15/2014 - 10:47 नवीन
ते म्हणजे नातवाने कुणाला उचलून फेकल्यावरती आजीची प्रतिक्रिया 'काय दणकट हात आहेत' अशी असल्यापैकीच की. =))
↩ प्रतिसाद: धन्या
ह
हरकाम्या Tue, 09/16/2014 - 21:28 नवीन
धन्यवाद मि.धन्या. तुमचे मत वाच्ल्यानन्तर मी तुमचा आवडता ब्लॉग अक्षर्शहा वेड्यासारखा पुर्णपणे वाचला. आता रात्रीचे १२.५५ झाले आहेत. तो ब्लॉग वाचल्यानन्तर डोके भणभणुन गेले आहे. डोक्याची पार मन्डई झाली आहे आज रात्री झोप येणार असे वाटत नाही
↩ प्रतिसाद: धन्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 09/14/2014 - 13:34 नवीन
रामायण आणि महाभारताला इतिहास न समजता धार्मिक ग्रंथ समजले जाते तेव्हा अशी गल्लत सुरू होते... आणि मग त्यांच्यापासून काही शिकण्याऐवजी त्यातल्या पात्रांना देवत्व बहाल करून त्यांना सद्गुणाचे पुत़ळे बनवले जाते. देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ? मग चुकाही कश्या योग्यच होत्या हे सिद्ध करायला अजून एखादी पुर्वायुष्यातली किंवा पूर्वजन्मातली कथा शोधून काढली जाते ! एक चूक झाकायला दुसरी, ती झाकायला तिसरी... अशी मालिका निर्माण होते. सर्वात वाईट असे की, यामुळे या दोन सकस ग्रंथांपासून जेवढा बोध घेतला जातो त्यापे़क्षा जास्त भ्रम निर्माण होतो / केला जातो.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विलासराव Mon, 09/15/2014 - 07:54 नवीन
देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?
मला तर हेच चुकीचे वाट्ते. देवही चुकत होते आजही चुकतात आनी पुढेही चुकतील. अवांतर विदा मागु नये. पटले तर घ्यावे न पटले तर सोडुन द्यावे. मूळात माझा विद्यावर भरोसाच नाय.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अस्वस्थामा Mon, 09/15/2014 - 11:40 नवीन
हा हा हा..!!
मूळात माझा विद्यावर भरोसाच नाय.
विद्या तशी बेभरवशाचीच हो..!
↩ प्रतिसाद: विलासराव
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/15/2014 - 11:43 नवीन
"देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?" हा माझा प्रश्न उपरोधिक होता ! जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवत्व दिले जाते तेव्हा त्याच्या पाठीराख्यांना त्या व्यक्तीचे कोणतेही उणे वचन/आचरण तसेच स्विकारायला फार कठीण जाते. आणि मग सत्य स्वीकारण्याऐवजी ते झाकण्यासाठी त्या वचना-/आचरणाचे समर्थन करणार्‍या कथा-कहाण्या रचल्या जातात... असा त्या वादाचा अर्थ आहे. देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील. याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे... देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्‍या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्‍या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे. जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्‍या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे. अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्‍या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त"). यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल ! महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत. देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल. एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ? आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्‍हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्‍यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात. असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो. (देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इए
↩ प्रतिसाद: विलासराव
व
विलासराव Mon, 09/15/2014 - 12:00 नवीन
देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल ह्याचसाठी देवाचा उपयोग केला पाहजे, आपल्यातले चांगले गुण विकसीत करण्यासाठी. त्यांच्यातले आदर्श गुण अंगी बाणवण्यासाठी. बाकी चालु द्या.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
काउबॉय Sun, 09/14/2014 - 11:28 नवीन
कोणी नास्तिक प्रकाश टाकेल काय ?
ज
जेपी Sun, 09/14/2014 - 13:40 नवीन
काथ्या नीट कुटला नायतर दोर नीट नाय होणार,मंडळी जरा व्यवस्थित कुटा.मंडळ आभारी राहिल नायतर काथ्या उचलला जाणार नाही .नुस्कान होईल.
स
संजय क्षीरसागर Sun, 09/14/2014 - 15:22 नवीन
या मानवी मनाला ऐनवेळी ब्लॉक करणार्‍या (किंवा वेळोवेळी पिडणार्‍या) अत्यंत बेसिक संकल्पनांची निर्वैयक्तिक शहानिशा होऊ शकेल. रामायणाकडे उच्च कोटीच्या नैतिकतेचा एक व्यापक लेखाजोखा इतक्या सिमीत दृष्टीनं पाहिल्यास चर्चा विधायक होईल. पब्लिकनं पात्रांना (ऑलरेडी बहाल झालेलं) देवत्व बाजूला ठेवून, (उगीच सेंटी होण्यापेक्षा); `स्थल-काल निरपेक्ष असे रोजच्या जगण्याला उपयोगी, नैतिक फंडाज मिळू शकतील काय?' अशी चर्चा केल्यास ती सर्वांना उपयोगी होईल. बाय द वे, माझ्या तिथल्या प्रतिसादात `रामायण घडण्याची पूर्वभूमिका' (रावणाचा स्टँड) नमूद केली होती. सं.मं.नं जर (अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी) नवीन पोस्ट काढलीच आहे तर, तो भाग इथे पुनर्प्रकाशित करावा अशी विनंती करतो. कारण रावणाची भूमिका समजल्याशिवाय चर्चा वन वे होईल. इट विल बी मिसिंग द बेसिक स्टार्ट पॉइंट.
स
संजय क्षीरसागर Sun, 09/14/2014 - 16:16 नवीन
मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा-नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात. अर्थात, इतकी उघड गोष्ट समजायला, साधी सारासार विचारसरणी पुरेशी आहे. जर हिटलर जिंकला असता तर तो वंदनीय ठरला असता आणि रावण जिंकला असता तर गदिमांनी `गीत रावण' लिहीलं असतं, देवघरात रावणाचे फोटो असते. त्यामुळे इतिहासावरुन `जेते म्हणजे प्रामाणिक आणि पराभूत म्हणजे अप्रामाणिक' असा निर्णय म्हणजे केवळ बाळबोध विचारसरणी ठरते. मी वेरिफाय करत नाही, पण या निमित्तानं, रामायणाचा दुसरा एक भाग सांगितला जातो, तो केवळ गंमत म्हणून उधृत करतो. अर्थात, उपरोल्लेखित मुद्याशी त्याचा संबंध आहेच, त्यामुळे (सुज्ञांना) तो अ‍ॅप्रिशियेट होईल. रावण अत्यंत प्रभावी आणि बलशाली राजा होता, स्वतः शिवभक्त असल्यानं शिवधनुष्याला प्रत्यंचा तर तो सहज लावू शकत होता. हि वॉज ऑलरेडी अ किंग, इतकंच काय स्वयंवरासाठी, स्वतःच्या फ्लाइटनं तो लंकेहून वेळेपूर्वीच हजर होता! जनकाच्या मनात मात्र सीतेनं रावणाला वरु नये असं होतं, पण ओपन फोरम असल्यामुळे त्याचा फुल नाईलाज झाला होता. जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला! इन द मीन टाईम, रावणाला वेळेवर हजर नसलेला स्पर्धक म्हणून डिबार करुन, रामानं सीता जिंकली! हा सरासर अन्याय झाला पण रावणाला बोलायला चान्सच राहिला नाही. तस्मात, त्यानं सीता हरणाचा घाट घातला...आणि पुढे रामायण घडलं! आता अशा परिस्थितीत रावण जिंकला असता तर पब्लिकनं रावणाला देव केला असता. थोडक्यात, इतिहासाची पानं उलटून निर्णय करणार्‍या निर्बुद्ध विचारसरणीला, `जो जिंकला तो सत्य' वाटणं स्वाभाविक आहे.
प
प्रचेतस Sun, 09/14/2014 - 16:41 नवीन
रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
द
दिनेश सायगल Sun, 09/14/2014 - 18:03 नवीन
केवळ एवढेच नव्हे तर श्री पोटे यांच्या मनोरंजक अशा रामकथेच्या धाग्यावर सन्माननीय सदस्य श्री क्षीरसागर यांना इतर चर्चा करायची आहे. त्यांनी नैतिकता, निर्बुद्धता वैग्रेबद्दल चर्चा करण्यासाठी दुसरा धागा काढावा, किंवा संपादक मंडळींनी त्यांना तसा स्वतंत्र धागा काढून द्यावा ही विनंती.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
संजय क्षीरसागर Sun, 09/14/2014 - 20:32 नवीन
रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने ...
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे. पण रामायण हा निव्वळ कल्पनाविलास असेल तर तो वाल्मिकींचा कॅथर्सिस आहे. ते दाऊदनं साने गुरुजींच्या रोलमधे जाऊन श्यामची आई लिहीण्यासारखं आहे. आणि त्यामुळे इतकी पराकोटीची नैतिकता जगण्याला दिशा देऊ शकत नाही. पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल पण साधं सरळ आयुष्य जगणार्‍या सामान्यानं त्याप्रती नतमस्तक होण्यात हशील नाही.
तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी. कोणत्याही गाजलेल्या स्टोरीमधे एक गोष्ट आवर्जून उल्लेखनीय असते ती म्हणजे प्रत्येक पात्राच्या कृत्याला त्याच्या दृष्टीनं समर्थन असतं. नाही तर ती पात्र योजनाच कुचकामी ठरते. रावणानं काहीही कारण नसतांना सीता हायजॅक केली म्हटल्यावर स्टोरीत दमच राहात नाही. मग रामानं फुल आणि कशीही बॅटींग केली (आणि यदाकदाचित त्याचा बोल्ड जरी गेला) तरी तो आऊटच होणार नाही. ____________________________ सं.मं नं माझा तिथला प्रतिसाद पुनर्प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 09/15/2014 - 05:26 नवीन
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे.
रामायण हे काल्पनिक आहे हे तुम्हाला मान्य आहे पण वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला हा शोध आपण कुठून लावलात? वाल्या कोळी हीच मूळात हरदासी दंतकथा आहे. रामायणाची सुरुवातच वाल्मिकी निषादाने मारलेल्या क्रौञ्च नराच्या मृत्युमुळे आलेल्या खिन्नतेपासून करतात. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः । यत् क्रौञ्चमिथुनादेकं अवधीः काममोहितम् || त्यामुळे आपल्या "पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल" ह्या म्हणण्यात काहीच हशील नाही
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी
आहे की. रावणाचा स्त्रीलंपटपणा हीच 'त्याची' समर्थनीय बाजू आहे. अर्थात ती समजून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वाल्मिकी रामायण मात्र वाचावे लागेल.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 09/15/2014 - 07:40 नवीन
थोडक्यात, रामाला देवत्व बहाल करण्यात अर्थ नाही, एक कोटी जप वगैरे केल्यावर राम दिसणार नाही, रामाचा धावा करणार्‍या सेवकाचं काहीही वक्र होऊ शकतं, बिजेपीचा राममंदिराचा अजेंडा जनतेची दिशाभूल करणारा ठरतो. ___________________ बाय द वे, धाग्याचा नक्की हेतू काय आहे?
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
काळा पहाड Mon, 09/15/2014 - 07:46 नवीन
म्हटला तर नाही. अर्थात ज्याचा त्याचा देव. पण मग असे प्रश्न बाकी धर्मियांना का विचारले जात नाहीत?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रचेतस Mon, 09/15/2014 - 07:49 नवीन
आपल्या मताशी सहमत आहे. धाग्याचा हेतू म्हणजे पोटेंसारख्या ट्रोलांच्या मुद्द्यांतील हवा काढून घेणं हा आहे. रच्याकने रामायण अवश्य वाचा एकदा. अतिशय रसाळ आहे आणि खूप छान.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चिगो Tue, 09/16/2014 - 14:17 नवीन
जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला!
ह्यावरुन काही शंका : १. रावणाची स्वतःची "माहिती संकलन आणि प्रसारण" यंत्रणा नव्हती का? म्हणजे त्याच्या राज्यात आग लागल्याची अफवा ऐकल्यावर तिचं "क्रॉस व्हेरीफिकेशन" त्याने का केलं नाही? रावण अफवांवर सहजासहजी विश्वास ठेवून घिसडघाई करत लंकेला परत जाण्याइतका हलक्या कानाचा होता का? २. लंकेत अग्नीशमन व्यवस्था नव्हती का? ३. आग लागल्याची बातमी ऐकून स्वतः रावणाला लंकेला परत यावं लागलं, ह्याचा अर्थ लंकेत "सेकंड लाईन ऑफ लिडरशिप" नव्हती का? प्रजाहितदक्ष वगैरे ठीक आहे, पण काही कारणास्तव जर मुख्य अधिकारी व्यक्तीला जर राज्यातून बाहेर जावे लागले, तर त्याच्या अनुपस्थितीत राज्याची काळजी घ्यायला कुणीच जबाबदार व्यक्ती नसणे, हा त्याच्याद्वारे स्थापित केलेल्या यंत्रणेचा दोष नाही का? ४. रावणाचा "डिलीगेशन ऑफ पॉवर" वर विश्वास नव्हता का?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 09/16/2014 - 15:20 नवीन
कोणत्याही कथेत पात्रांचा रोल आणि वागणूक जस्टीफाय करता आली म्हणजे झालं. डोंट टेक इट सिरियस, स्टोरीज आर आयदर एंजॉइड ऑर नॉट, दॅट्स ऑल! रावणाला खुन्नस येण्यासाठी असं काही तरी घडलं असेल तर त्याचा रोल आणि सीताहरणाचा मुख्य प्लॉट दोन्ही जस्टीफाय होतात. आणि द लॉजिक फिट्स. मी सुरुवातीलाच म्हटलंय, आय डोंट वेरिफाय. खरं तर एनीथिंग कॅन बी अ‍ॅडेड टू अ स्टोरी अँड अ स्टोरी कॅन बी इंप्रोवाइज्ड ऑल्सो.
↩ प्रतिसाद: चिगो
क
काउबॉय Sun, 09/14/2014 - 18:24 नवीन
मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा- नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात.
कौरव जिंकले असते तर शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच. म्हणून सर्व काही जेते ठरवतात ते प्रचलित होतेच असे नाही. याचे भान हवे. पण इश्वराची ओळखच त्याच्या विजय कथातुन केली जात असल्याने शिरोमणिञ्चि जेतेच बायबल लिहतात हे रडगाणे नेहमीचे आहे
स
संजय क्षीरसागर Sun, 09/14/2014 - 21:02 नवीन
पराभूतांची प्रेरणा कोण वाचणार?
↩ प्रतिसाद: काउबॉय
क
काळा पहाड Sun, 09/14/2014 - 22:03 नवीन
कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच असती. इकडून तिकडून ढापून आणि सांगितलं असतं की शकुनी हा देवाचा शेवटचा प्रेषित होता इत्यादी..
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 09/15/2014 - 03:43 नवीन
पण मी बॉयच्या या,
शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच.
(ओरिजिनल) शकुनीमामाच्या `कपॅसिटीबद्दल' प्रश्नाला उत्तर दिलंय
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
पोटे Mon, 09/15/2014 - 04:55 नवीन
रामायणात शकुनी घुसला
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रचेतस Mon, 09/15/2014 - 06:08 नवीन
पोटे मात्र जिकडे तिकडे उगाच्च घुसत असतात.
↩ प्रतिसाद: पोटे
स
संजय क्षीरसागर Mon, 09/15/2014 - 07:43 नवीन
मी फक्त उपस्थित झालेल्या मुद्याला उत्तर दिलंय.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
काउबॉय Mon, 09/15/2014 - 10:48 नवीन
एक तर पराभूतांची प्रेरणा कोण वाचणार? असे म्हणायचे नाहीतर जेत्यांनी सगळ अन एकतर्फी लिहलय म्हणत ओरड करायची.... ! मग कोणाचे म्हणने प्रमाण ठरवायचे असे आपले मत आहे ? फक्त तुमचे ?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 09/15/2014 - 12:58 नवीन
संदर्भासहित वाचत जा, एकदम एक्साइट होण्यात अर्थ नाही, मुद्दा हुकतो. शकुनी गीता सांगायला केपेबल नव्हता असा तुमचा मुद्दा होता. आणि मी लिहीलंय `जर कौरव जिंकले असते तर (सध्याच्या) गीतेला अर्थच राहिला नसता.' जेते इतिहास लिहीतात ही उघड गोष्ट आहे त्यामुळे कौरव निंद्य आहेत. ते जिंकले असते तर पांडव निंद्य ठरले असते. आणि कदाचित, शकुनीचे ते `डावपेच' आणि कृष्णाची ती `कारस्थानं' असा लेखाजोखा झाला असता.
↩ प्रतिसाद: काउबॉय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा