गृह कर्ज
काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचायला मिळाले. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे.
त्यात अगदी पटवुन सांगितले होते कि दुसरे गृह कर्ज घेऊ नये. त्या परिस सरळ FD मध्ये पैसे टाकावे.
मला लिंक सापडता सापडत नाहीये नाहीतर इथे दिली असती. तरी मी शोधन्याचा प्रयन्त करतोय अजून, लिंक सापडली कि इथे देईल
पण इथे धागा टाकण्याचा मुद्दा असा कि जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा.
दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ?
💬 प्रतिसाद
(104)
स
सुहास..
Wed, 09/17/2014 - 16:01
नवीन
( बहुधा ) चार प्रकारच्या झोन असतात माऊ !
आर - रेसिडेन्शल
शेती झोन
कमर्शियल झोन ( जिथे मॉल्स, बिझीनेस ई. झोन्स )
मग एक सरकारी झोन असतो ( रिझर्व असतो , त्यात हजार प्रकार असतात, फॉरेस्ट, शेती-तळे, गाव-तळे, देवस्थाने, पुरातन अवषेश ई.ई. ... सध्या त्या लवासा वर , रिझर्व्ह वर रेसिडेन्सल केल्याचा आरोप आहे , अर्थात तो पहिला आरोप आहे )
शिवाय सेझ = स्पेशल ईकॉनॉमिक झोन ई. आहेतच
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 19:15
नवीन
रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 09/19/2014 - 04:49
नवीन
+१११
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 09/19/2014 - 12:52
नवीन
लवासा शहराचे आजरोजीचे नक्की स्टेटस कोणाला माहीत आहे का?
पूर्ण लीगल झालेय का? एकूण प्रोजेक्ट flop की यशस्वी ?
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 09/19/2014 - 19:05
नवीन
गवि ...उत्तराचे तीन टप्पे
१ ) बांधकाम पुर्ण आहे
२ ) रेसिडेन्सल झोन पर्यावरण विभागाची परवानगी आल्याशिवाय कसे केले गेले , या बद्दल कोर्टात केस चालु आहे
३ ) ज्यांची ओनरशीप आहे त्यांच्या नावे झाली आहेत घरे !!
जाता जाता : बाकी तिथपर्यंत पिरंगुट जाणार्या रस्त्यालगतच्या गावाचे महाभले झालेय , नुसता कोट ने रेट चालु आहे एकराला !!
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 09/19/2014 - 19:13
नवीन
धन्यु..
म्हणजे ओव्हरआल क्लीन नाही असंच दिसतंय. मधे टुरिस्ट म्हणून व्हिजिट घडली त्यात अर्धवट सोडल्यासारखे बरेच काही दिसत होते. एकूण लुक भग्न वाटला.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 09/20/2014 - 08:10
नवीन
मित्राबरोबर तिथल्या बेस्ट व्यू पाँइटला जेवायला गेलो होतो. वरुन सगळ्या परिसराचं विहंगावलोकन करतांना, त्यानं एका वाक्यात समालोचन केलं `आयला नाशिकच्या घाटासारखं दिसतंय सगळं!' इट इज अ टोटल वेस्ट.
त्या तुलनेत सहाराचा अँबी-वॅली प्रोजेक्ट कमालेयं. सहाराश्रींची वाट लागली पण साला माहौल काय केलायं, जस्ट बियाँड हेवन! नज़र हलत नाही एकेका स्पॉटवरुन. बेतहाशा कॉस्टलीये पण कल्पना काय भरारी घेऊ शकते याचं नितांत सौंदर्यशाली दर्शन. तिथे फोर सिजन्सला जेवलो, माय गॉड, वॉट अ डेलिकसी. क्लायंटला म्हटलं :
`There can be only one thing a person can wish after such an ecstasy'
`What is that?'
`Death!'
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 09/20/2014 - 09:02
नवीन
>>> एकूण प्रोजेक्ट flop की यशस्वी ?
कुठल्याही प्रोजेक्टचं एक गणित असतं. वेळेचं आणि पैशाचं. लवासाबाबत ते चुकलेलं आहे एवढंच सांगू शकेन.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 09/20/2014 - 09:21
नवीन
मी पर्यावरण आणि प्रोजेक्ट अॅस्थेटिक्सबद्दल लिहीलंय. लवासात इन्व्हेस्टमेंट करणं माझ्यामते वेडेपणा होईल. आणि अँबी-वॅलीचा तर विचार देखिल करता येणार नाही.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 09/20/2014 - 09:30
नवीन
>>> अॅस्थेटिक्स.
माझ्या मते नॉट बॅड.
तुम्ही 'एकांत' ला गेलेलात का?
जनतेच्या अपेक्षा जास्त नाहीत. फेज १ पूर्ण बूक झालेली होती. मला थोडी माहिती आहे प्रोजेक्ट बद्दल. ;)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 09/17/2014 - 19:20
नवीन
रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो. >>
+१
- Log in or register to post comments
प
पोटे
गुरुवार, 09/18/2014 - 06:06
नवीन
मुर्ख लोक घरे बांधतात.
शहाणे त्यात भाड्याने रहातात.
हे तत्व वपुंच्या कोणत्या पुस्तकात आहे ?
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 09/18/2014 - 06:18
नवीन
वपु ह्या क्षेत्रातील जाणकार होते?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 09/18/2014 - 06:55
नवीन
दुसरे घर घ्यावे ….
च्या बाजूने मत
http://www.deccanherald.com/content/138622/investing-second-home.html
च्या विरुद्ध मत
http://anandvijayakumar.blogspot.in/2013/04/is-buying-second-home-investment.html
- Log in or register to post comments
र
रुस्तम
गुरुवार, 09/18/2014 - 07:03
नवीन
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Only-builders-banks-gain-when-you-take-loan-to-invest-in-realty/articleshow/34712813.cms
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
गुरुवार, 09/18/2014 - 07:09
नवीन
मंडळ अभारी आहे.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2014 - 05:05
नवीन
कर्ज घेऊन दुसरे घर घेण्यापेक्षा दोन दुकानं घ्यावीत. ह्या मताचा मी आहे.
दुकानांना भाडं चांगलं मिळतं (घरापेक्षा) शिवाय स्वतःला कांही व्यवसाय (अगदी आहे ती नोकरी सांभाळून) करायचा असेल तरी करता येतो. फक्त, दुकान घेताना मोक्याच्या ठिकाणी घ्यावं.
दुकान भाड्याने दिल्यास वाढत्या महागाईच्या प्रमाणात भाडं वाढवून घेता येतं. सहसा, सुस्थितीतील धंदा, जागा बदलण्याची जोखिम घेत नाही. फ्लॅटचा भाडेकरू दुसर्या फ्लॅट मध्ये सहज जातो आणि आपल्याला पुन्हा नविन भाडेकरू शोधावा लागतो.
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 09/19/2014 - 07:06
नवीन
उत्तम उपाय !
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 09/19/2014 - 07:27
नवीन
दुकानासाठी बँक कर्ज देते का ?
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2014 - 07:32
नवीन
कल्पना नाही. पण देत॑ असावी.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/19/2014 - 07:45
नवीन
काका, कमर्शियल ला सगळे हिशोब बदलतात. एकतर सगळ्या banks कर्ज देत नाहीत. व्याजाचा दर जास्त असतो, मुदत कमी. अर्थात EMI भरपूर वाढतो. त्यातून मेंटेनन्स जास्त पडतो.
रेसीडेंशियल ला पटकन भाडेकरू मिलतो. जागा रिकामी रहात नाही. कमर्शियल चे तसे नाही. दुकानांचे माहित नाही, ऑफिस स्पेस मध्ये oversupply आहे.
भाड़े जास्त असते हे १००% मान्य. सध्या रेट पण बरेच पडले आहेत. तरीही एकूण रीअल एस्टेट म्हणजे कटकट जास्त हे खरे. भाड्याने देताना एक महिन्याचे भाड़े ब्रोकरेज मध्ये जाते. घेता विकताना जास्त खर्च होतो.
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 09/19/2014 - 07:59
नवीन
विमेंशी सहमत , एकूणात रियल इस्टेट मधली गुंतवणूक तितकीशी फायद्याची नाही. आपण मालक असल्याचा एक फिल येतो तेवढाच !
पण हाती एकरकमी पैसा असेल ( कर्ज न काढता) तर दुकान घेणे घर घेण्यापे़क्षा नकीच फायदेशीर आहे म्हणून पेठकर काकांशी सहमती दाखविली.
दुसरा मुद्दा - खरोखरच मोदिंच्या १०० स्मार्ट सिटी अस्तित्वात आल्या तर महानगरातील रेट पडतील , किमानपक्षी वाढणार नाहीत असा माझा अंदाज आहे आणि काही महानगरात आता घरांचे दर स्थिरावलेही आहेत ! माझ्या मित्राच्या बंगलोर मधल्या घराचे भाडे वाढते आहे , हप्ता निघतो आहे.( पण कर ही भरावा लागतो , ते पकडले तर जेवढ्यास तेवढेच ! ) पण गेली जवळ जवळ ४ वर्षे किंमत स्थिर आहे. एक ट्क्क्याने पण वाढली नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 09/19/2014 - 11:32
नवीन
:D :D
बाकी ५ वर्षांनी बोलू
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 09/19/2014 - 06:47
नवीन
पण मी हा मूर्खपणा केला आहे ! विटुकाकूला कोण समजावून सांगणार ? ( तो आद्य मूर्खपणा १७ वर्षापूर्वी केला आहे! )
जशी महागाई वाढत जाते तशी तशी घरभाडी वाढत जातात , आपले त्या घरभाड्यात निवृत्तीनंतर आपले भागेल असे तिचे अजब लॉजिक आहे. आणि त्या ह्प्त्यातून काही शिल्लक राहीलेच तर पी. एन जी चे देणे द्यावे लागते. सोने घेणे हा तर पराकोटीचा मूर्खपणा आहे ( हा माझा तिसरा ! )
म्युचल फंड हा सर्वात चांगला उपाय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत :
१. आपला पैसा विकासाच्या कामसाठी वापरला जातो, पैसा व्यवहारात रहातो, पडून रहात नाही.
२. शॉर्ट / लॉन्ग टर्म पेक्षा स्मार्ट गुंतवणूक करावी. १५ % पेक्षा जास्तीचा हाव धरली नाही तर कधीही तोटा होत नाही आणि इतकीच माफक अपेक्षा असेल तर सकाळ संध्याकाळ डोके घालून बसावे लागत नाही. अधिक हाव केल्यास त्याचे व्यसन लागते .
३. दर सप्ताहाला / १५ दिवसाला / महिन्याला आपल्या कुवतीप्रमाणे नियमित रक्कम दिर्घकाळाकरता फंडात गून्तवावी. यातला "नियमितपणा आणि "दिर्घकाळ" हा महत्वाच भाग आहे . किती रक्कम हे महत्वाचे नाही.
४. पोवर ऑफ कम्पाउन्डीन्ग" हे तत्व समजून घ्यावे.
५. एन्ट्री - एक्जिट लोड चे नियम कसोशीने पाळावेत. एन्ट्री लोड लागतो तेव्हा आपण अधिकाची हाव करतो आहे का हा प्रश्न विचारावा. एक्जिट लोड लागत असेल तर आपली गुंतवणूक चुकली का ? हा प्रश्न विचारावा.
६.अधिक माहीती हवी असल्यास व्य. नि करावा
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 09/19/2014 - 07:20
नवीन
याच्यात तर दोनच आहेत. घर (दुसरा) आणि सोने (तिसरा). पहिला वाला कुठला?
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 09/19/2014 - 07:40
नवीन
आद्य मूर्खपणा .. १७ वर्षापूर्वी केला,
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Fri, 09/19/2014 - 08:03
नवीन
:))
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 09/19/2014 - 08:35
नवीन
सोने सोडून बाकी सगळ्याशी सहमत. ... म्हणजे गुंतवणूकीबद्दल बरं का.
सोन्याचे दागिने किंवा वळं न घेता, ज्यात त्याची करणावळ विनाकारण जाते, सरळ जमेल तसे १,२,५,१० ग्रॅमचे कॉइन घ्यायचे.
मध्ये बॅन्केत मिळायची. पण हल्ली आरबीआयनी ते बन्द केलय. योग्य विक्रेत्याकडून पॅक्ड नानी घ्यायक्ष्ची. सोने नेहमी वाढतं आणि अडीअडचणीला त्यातून पटकन कॅश उभी करता येते.
- Log in or register to post comments
व
विलासराव
Fri, 09/19/2014 - 08:40
नवीन
सांभाळायची कटकट नाही का? पटकन चोरीही होउ शकते ना?
बरं ते जौद्या, तुम्ही कॉईन कुठं ठेवलेत? पतकन सांगीतलंत तर बरं होईल.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 09/19/2014 - 08:48
नवीन
बॅन्केच्या लॉकरमध्ये. नंबर सांगू का? :D
- Log in or register to post comments
व
विलासराव
Fri, 09/19/2014 - 08:52
नवीन
नंबर माहीती आहे. फक्त बेंक कोणती आहे ते सांगा. स्वीस बँक असेल तर तेही सांगू नका. फक्त कालजी घ्या,,,,,,कॉईनचीहो!!!!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 09/19/2014 - 08:47
नवीन
किंचित असहमत आहे. गेल्या ५-६ महिन्यात खाली आलेलं आहे. ३० हजाराहून २७ पर्यन्त. ज्यांने ३० ला वाढेल म्हणून घेतलं असेल त्यांना अजून किती वेळ थांबावं लागेल माहित नाही.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 09/19/2014 - 08:51
नवीन
ते long term investment म्हणून घ्यायचं असतं हो.
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 09/19/2014 - 09:10
नवीन
सोने कधीच योग्य प्रमाणात वाढत नाही , त्यात फक्त भावना वाढतात.
१९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि आज २७००० आहे
१९८० साली सेन्सेक्स १०० रुपये होता आणि आज २७००० आहे
१९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी.
आता तुम्हीच सांगा !
SENSEX & NIFTY @ ALL TIME HIGH !!!!
Film actor Rajesh Khanna bought a bungalow in iconic Carter Road in Mumbai for Rs.3.5 lakhs in 1970. His heirs sold it recently for Rs.85 crores. The property has multiplied by 2428 times or an annualized return of 19.38% over 44 years.
Samudhra Mahal in Mumbai is another expensive property. A flat purchased in 1970 at Rs.700 per sq.ft was sold at Rs.1,18,000 per sq.ft in 2013. Money multiplied by 168 times in 43 years. This works out to an annualized return of 12.66%
In 1963, Godrej paid Rs.1 lakh to buy his first house, a 2916 sq.feet apartment at Usha Kiran, Carmicheal road, in tony South Mumbai. In 2011 he sold it for Rs.25 crore. Money multiplied by 2500 times over 48 years or an annualized return of 17.70%
In Dalal Street, Mumbai a sq.feet was Rs.100 in 1980. After 34 years, it sells at Rs.27,000 per sq.ft. Money multiplied by 270 times in 33 years. This works out to an annualized return of 17.90%.
The first three properties can be bought and owned by cream or elite of the society who are worth at least tens of crores, mostly hundreds of crores.
The last property in Dalal street; our father could have bought with whatever money available at his disposal. We can buy it even now. Our son or daughter would be able to buy it even 20 years down the line.
The last property is Sensex. A sq.feet is a metaphor for one unit. If dividend yield is also included (assuming 2% CAGR), Sensex would have delivered 20% annualized returns over last 34 years, higher than the most expensive prime properties in the country.
Good mutual funds and many stocks have delivered returns far superior to Sensex itself.
Power of equity is least understood in our country.
If we can withstand notional loss (if we don’t book) in portfolio during bear markets, not worry about daily price movements, it is possible to make much better money than what can be made out of best of real estate.
Give at least the same importance to equity as we give to real estate.
We don’t mind holding real estate for 20 or 30 years. Please do the same for equity ignoring bull and bear markets, notional profits and losses.
Many of us have been investing for last couple of years. Stay the course for at least another 15 to 20 years completely ignoring market fluctuations. We would be amazed at the fortune created for our retirement or to pass on to our children.
Happy Investing !!!!!!!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 09/19/2014 - 09:13
नवीन
बास बास, एक नंबर प्रतिसाद!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 09/19/2014 - 11:24
नवीन
पन एका वेळेस थोडी थोडी इन्वेस्ट्मेन्ट करायची असेल तर?
१९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती .>
पण मला दर महिन्याला २००-२०० रुपये गुन्तवायचे असतील तर ४-४ महिन्यानी १-१ स्क्वे.फू. जागा कोण देणार?
जागा हा एकदम मोठा घास झाला. त्यासाठी आधीची पून्जी हवी.
आणि शेअर्सची सगळ्यांना माहिती नसते. रिस्क असते.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 09/19/2014 - 11:48
नवीन
सोने नॉन प्रॉडक्टिव अॅसेट आहे. त्याचाही वेल्थ टॅक्स पडतो. सोन्याच्या दरातील लॉँगटर्म वाढ महागाईदरापेक्षा जास्त नाही. शिवाय सांभाळायची जोखीम असतेच.
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Fri, 09/19/2014 - 12:06
नवीन
वेल्थ टॅक्स !!! नक्की काय भानगड आहे ? जरा विस्कटून सांगा
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 09/19/2014 - 12:23
नवीन
राहत नसलेले - थोडक्यात दुसरे - घर, गाडी, सोने, कॅश अशा सर्व नॉन प्रॉडक्टिव अॅसेटना पकडून ३० लाखापेक्षा जास्त नेट अॅसेट असतील तर त्यावर प्रत्येक वर्षी १ टक्का या दराने कर भरणे आवश्यक आहे. एफडी, स्टॉक्स, म्युच्युअल फंड यांना प्रॉडक्टिव अॅसेट असल्याने या कॅल्क्युलेशनमधून वगळता येते.
खालील दुव्यावर प्राथमिक स्वरुपाची थोडी माहिती आहे.
http://www.thehindubusinessline.com/features/know-all-about-wealth-tax/article5840450.ece
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Fri, 09/19/2014 - 12:51
नवीन
t if a property is used to conduct business or if it forms a part of stock-in-trade or has been rented out for at least 300 days in a year, wealth tax is not applicable on such property.
दुसरे घर रेंट वर दिले तर हा तक्ष पडत नाही असे दिसतंय
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Fri, 09/19/2014 - 12:54
नवीन
मुद्दा असा कि घर भाड्याने दिले तर हा TAX पडत नाही
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 09/19/2014 - 17:32
नवीन
भाड्यावर टॅक्स भरावा लागतो. म्हणजे भरणं अपेक्षित असतं.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/19/2014 - 17:46
नवीन
सुरुवातीला भाड्यापेक्षा व्याज जास्त असते. चिंता नसावी :-)
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Mon, 09/22/2014 - 11:07
नवीन
हो पण इथे मुद्दा वेल्थ TAX चा होता जो फक्त घर रिकामे राहिले तर भरावा लागतो. आणि एकदा का तुम्ही निवृत झालात तर बहुतेक तुम्ही ३०% TAX मध्ये बसलाच असे नाही
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/19/2014 - 12:11
नवीन
Index fund मध्ये SIP सुरु करावे :-)
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/19/2014 - 12:29
नवीन
Index fund मध्ये SIP सुरु करावे :-)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 09/19/2014 - 09:14
नवीन
ओ मालक तो स्वस्ताईचा जमाना गेला. अंधेरी/जोगेश्वरीत या भावाने मिळाला तरी खूप.
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 09/19/2014 - 11:05
नवीन
अन्युलाईज्ड रिट्न किती ते सांगा .
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 09/19/2014 - 12:45
नवीन
अशा ठिकाणी फ्लॅट्/बन्गला/रो हाऊस (आपापल्या ऐपतीप्रमाणे) घ्या की जिथे आता किमती कमी आहेत आणि भविष्यात तो एरिआ डेव्हलप होणार आहेत उदा. पुण्याच्या जवळ पण सद्ध्या हद्दी बाहेर. बरीच गावे पुणे महापालीका आणि पिंपरी चिंचवड महापालीकेमधे येणार आहेत.अजुनही १ बीएचके २० ते २२ लाखापर्यंत मिळतो. २ बीएचके ३५ ते ४० पर्यंत.सध्या बार्गेनींगलाही चांस आहे.
दुस-या घरावर लोन घेतले तरी त्यावर इन्कम टॅक्सचा फायदा मिळतो हे वर सांगितले आहेच. मिळणा-या भाड्यावर टॅक्स द्यावा लागतो. (३० टक्के स्टॅ. डिडक्शन + मिळकत कर वजा करून). पण तुमचे कर्जावरील व्याज मिळणा-या भाड्यापेक्षा जास्त असेल तर उलट तुम्हाला रीफंड मिळेल.
तुमच्याकडे कॅश असेल तर दुसरीकडे गुंतवा. त्याचे मिळणारे व्याज (टी डी. एस. जावून. पत्नीच्या, आईच्या, निव्रुत्त वडीलांच्या अथवा सज्ञान मुलांच्या नावावर गुंतवणूक केली तर टी डी. एस पण वाचेल.) अधिक इन्कम टॅक्स बेनिफीट आणि घराच्या लोनसाठी गेलेले व्याज यातला फरक बघा. तुम्हाला किरकोळ व्याजावर लोन मिळालेय असे लक्षात येइल.
सहा सात वर्षांनी घराची किंमत निश्चित वाढलेली असेल.
घर विकल्यानंतर कॅपिटल गेनवर टॅक्स निश्चितच भरावा लागेल.
पण तो वाचविण्यासाठीही मार्ग आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 09/19/2014 - 13:29
नवीन
ह्म्म . ह्याविषयावर अनेकवेळा वादविवाद झालेत आमच्या मित्रपरिवारात अन कुटुंबातही .
स्वकर्टुत्वावर एक घर घेवुन झाले आहे , पण ते आई बाबांसाठी , गावाकडे .घर घ्यायचंच असेल तर त्यापेक्षा वाडा बांधु असे एक माझे मत आहे , आणि स्वतः रहाणार नसु तर घर घेण्यात काय अर्थ आहे ? मला स्वतःला घराची आसक्ती नाही ,
ऐसी गृहांची स्थिती। मिथ्या आली आत्मप्रचिती। जन्म दो दिसांची वस्ती। कोठे तरी करावी।| - समर्थ .
( मी आपला मस्त २००० रुपायाचा क्वेच्चा चा टेन्ट घेतलाय , आता कोठेही आयुष्य काढु शकतो :) )
पण तरीही एकदा कॅल्क्युलेशन्स करु समजा ५०लाखाचे गृहकर्ज काढले (त्या साठी तुम्हाला आधी तुमच्या खिष्यातुन १७-२० लाख घालावे लागतील , बॅन्क फक्त ७५-८० टक्केच लोन देते )
तर साधारण २० वर्षांच्या हिशेबाने ढोबळमानाने महिन्याला सुमारे ५०००० हप्ता पडेल . आता समजा हेच घर घ्यायच्या ऐवजी तुम्ही भाड्याच्या घरात राहिलात तर महिन्याला अंदाजे १५००० भाडे पडेल उरलेले ३५००० दर महिन्याला दाम दुप्पटीत टाकत राहिलात तर१साधारण ७ वर्षाने दाम दुप्पट ह्या हिशेबाने ७+७+७=२१ वर्षे असे सोपे अॅझमशन करुयात अर्थात तुमचे साठलेले सर्व पैसे अॅट थे एन्ड ऑफ २० बर्ष साधारण आठपट होणार . म्हणजे
३५००० * १२ = रफली चार लाख एका वर्शाचे ह्या हिशोबाने
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »