गृह कर्ज
काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचायला मिळाले. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे.
त्यात अगदी पटवुन सांगितले होते कि दुसरे गृह कर्ज घेऊ नये. त्या परिस सरळ FD मध्ये पैसे टाकावे.
मला लिंक सापडता सापडत नाहीये नाहीतर इथे दिली असती. तरी मी शोधन्याचा प्रयन्त करतोय अजून, लिंक सापडली कि इथे देईल
पण इथे धागा टाकण्याचा मुद्दा असा कि जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा.
दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ?
💬 प्रतिसाद
(104)
आ
आयुर्हित
Sat, 09/20/2014 - 10:37
नवीन
टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचणे म्हणजे निव्वळ टाइम पास म्हणुनच ठिक आहे.
आपण ह्या विषयावरची टाईम्सने वेळोवेळी दिलेली माहिती वाचली तर अजुन घोंधळातच पडाल व मी का लिहिले ते ही लक्षात येईल.
अशा मोठ्या प्रश्नावर एकांगी विचार करणे चुक ठरते.
सर्व बाजू तपासून पाहून मगच सल्ला देणे संयुक्तिक ठरेल.
व्यनि कराल तर अधिक माहिति घेवुन नक्किच योग्य तो सल्ला देता येईल.
योग्य सल्लाच आपल्याला आपल्या पैशाचा पुरेपुर मोबदला देवु शकेल.
- Log in or register to post comments
प
पोटे
Sat, 09/20/2014 - 14:08
नवीन
पैसे पोस्टात ठेवावेत.
एकोळी प्रश्नाचे एकोळी उत्तर
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
Mon, 09/22/2014 - 08:56
नवीन
मध्ये पैसे अडकवले तर व्याज मिळेल जे करपात्र तर असेलच पण इंफ्लेश्नला मात करण्यासाठीसुद्धा उपयोगी नाही. मग एफ डी करूच नये का?
घर घेतले तर मिळणारा परतावा (भांडवलवृद्धी, भाडे + भाडेवृद्धी) सुद्धा करपात्र (अर्थात काही गणितानंतर) आहे.
मग घर किंवा दुकान किंवा जमीन घेऊच नये का?
शेअर्स तर फुल टू बदनाम, रिस्क ओरिएन्टेड आहे आणि म्युच्युअल फंड्स किचकट विषय आहे मग नकोच ते.
सोने वाढते कुठे? ते गेल्या काही वर्षात वाढले आहे आणि आता गडगडले आहे.
इतके नकारात्मक वातावरण "गुंतवणूक" ह्या विषयात बरेच वेळा आढळते.
(आणि जे हि मते मांडतात तेच भरपूर गुंतवणूक करतानाही आढळतात)
पण जर तुमच्याकडे एफ डी करण्या इतके पैसे आहेत आणि घर घेण्याबाबत दुविधा आहे तर मी म्हणेन एक चांगला बिल्डर (हा आणि कुठे सापडतो ?) बघा आणि बुकिंगला पैसे गुन्तवा.
जर तुम्ही त्या बिल्डरशी लॉंग टर्म नाते तयार करू शकलात तर त्याच्या अनेक प्रोजेक्टेस मध्ये तोच तुम्हाला चांगले पैसे कमावून देईल.
बुकिंगला पैसे लावताना तुम्ही जी रक्कम लावलीत ती (आणि जर तुम्हाला कर्ज मिळत असेल तर त्यावरचे व्याज) किंवा एकूण लागलेले भांडवल आणि मार्केट रेट ह्याचा सतत अपडेट ठेवा जेव्हा वार्षिक परतावा ३०% किंवा जास्त असेल तेव्हा विकून मोकळे व्हा. हा परतावा तुम्ही गुंतवणूक कोणत्या स्टेजला केली त्यावरही अवलंबून असतो असे निरीक्षण आहे (भूमिपूजनाला, पायाभरणीला, २०% ते ५०% बांधकाम झाल्यावर ई.)
हा मार्केट मधला बाराही महिने चालणारा एक प्रकार आहे पण ह्यात नफ्यावर लागू होणारा कर आणि मार्केट रेट ह्याचे गणित तसेच बिल्डरशी तुमचे निर्माण होणारे नाते महत्त्वाचे आहे.
तुम्ही गुंतवणूकदार म्हणून बिल्डरशी व्यवहार करणे आणि तुम्ही सदनिकाधारक होण्याच्या इराद्याने व्यवहार करणे ह्यात जमीन आस्मानचा फरक पडतो.
आता वर मी जे म्हंटले आहे तसे करणे म्हणजे बरेचजणांना नकोसेच होते कारण त्यात "बरीच" मेहनत आहे.
(बिल्डर फसवतोच हे गृहीतकही काम करते.)
आता तुम्ही ह्यात कुठे फिट होता ते पहा आणि निर्णय घ्या.
- Log in or register to post comments
प
पुतळाचैतन्याचा
Wed, 11/08/2017 - 10:13
नवीन
बँकिंग सेक्टर मध्ये थोडी ओळख वाढावा....आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक घरे एन पी ए म्हणून विकायला येतात ती अगदी 20% स्वस्त, क्लीयर टायटल मिळतात...थोडी माहिती काढली तर सहकारी बँक, सरकारी बँक यांच्या मॅनेजर बरोबर सेटिंग लावून अशी घरे मिळतात...निव्वळ गुंतवणुकीचे किडे करायचे असतील तर थोडे डोके घाला ह्यात.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3