Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

स
संदीप डांगे
गुरुवार, 09/18/2014 - 14:27
🗣 130 प्रतिसाद
मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत. नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच. आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही. प्रत्येकाची स्वताची अडचण आहेच आणि पैश्याचे सोंग नाही आणता येत. तो जिथे लागतो तिथे लागतो. पैसे येण्याचे सर्व पारंपारिक मार्ग बंद आहेत. जसे बँक लोन, मित्र, इ. मी अजून निराश नाही. दोन मुले आहेत एक चार वर्षाचा आणि एक ३ महिन्याचा. या नव्या बाळाच्या आगमनावेळी जो काही भयंकर वैद्यकीय खर्च झाला त्यामुळे सगळे बजेट कोलमडले. आता खरच काय करावे असा प्रश्न आहे. चोरी करावी, कुटुंबासकट आत्महत्या कि सरळ निर्लज्ज व्हावे? आत्महत्या केल्यावर सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील ते माहिती आहेत. पैश्यासाठी जीव का दिला वैगेरे वैगेरे. पण जीव गेल्याशिवाय संबंधिताना घटनेचे गांभीर्य कळत नाही. तोपर्यंत त्यांना वाटेल मी खोटे बोलत आहे. माझेकडे पैसे असून द्यायची इच्छा नाही. पण खरेच असे काहीही नाही. मिपावर बरेच बुजुर्ग आणि जाणते आहेत. काही प्रक्टीकॅल सल्ला द्य. तत्वज्ञान नको. उपाशी पोटाला तत्वज्ञान म्हणजे आंधळ्या माणसाला आरसा. कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा करू नये. -------------------
इशारा १. लेखकाच्या भावना पोचल्या. मात्र सदस्यांनी कृपया सल्ले देताना आपल्या जबाबदारीवर द्यावेत, तसेच लेखकाने स्वतःच्या जबाबदारीवर अंमलात आणावेत. २. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि मिपा अशा कोणत्याही सल्ल्याला उत्तेजन देत नाही किंवा जबाबदार नाही. ३. या लिखाणावर अवलंबून राहून कोणतेही आर्थिक व्यवहार झाल्यास मिपा संस्थळ/चालक/मालक त्याला कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
  • आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १

Book traversal links for चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

  • आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १ ›

प्रतिक्रिया द्या
70389 वाचन

💬 प्रतिसाद (130)
स
सुहास.. गुरुवार, 09/18/2014 - 14:30 नवीन
:( मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , पण आत्महत्येचा विचार ही करु नकोस , बाकी सल्ला देण्यास अपात्र आहे !!
व
विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 09:09 नवीन
माझ्या एका मित्राने त्याच्या सर्व देणेकर्‍याना बोलावून सांगितले की मी तुमच्या सर्वाम्कडून पैसे घेतले. तुमच्या मदतीबद्दल मी ऋणी आअहे मात्र तुमच्या त्रासामुळे आत्महत्या करायला चाललो आहे. तुमचे पैसे फेडण्यासाठी माझ्या कडे आत्ता एकही पैसा नाही. मी मेल्यावर मिळालेल्या इन्शुरन्सच्या पैशामधून तुमची काय ती देणी दिली जातील मात्र मी आत्महत्ये अगोदर जे पत्र लिहीन त्यात तुमच्या सर्वांची नावे लिहून यानी माझा मानसीक छाळ केला म्हणून मी आत्महत्या करीत आहे असे लिहीन. अन्यतः मला वेळ द्या एक सहा महिने मी तुमचे पैसे फेडेन हे नक्की. " हे सर्व घडलेले आहे....... तो मित्र त्याची सर्व देणी फेडून तोट्यात गेलेले सर्व उद्योग बंद करून सध्या भिक्षुकी करत बिनघोर जगतोय."
↩ प्रतिसाद: सुहास..
ग
गवि Fri, 09/19/2014 - 09:15 नवीन
थोडेसे अवांतर होतेय, पण अशा केसमधे इंशुरन्स कंपनी कोणतेही पैसे देईल असे वाटत नाही. जाणकार नसलो तरी तर्काने असे वाटते.
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ध
धर्मराजमुटके Fri, 09/19/2014 - 09:17 नवीन
बरोबर आहे तुमचे. आत्महत्येच्या प्रयत्नात विमा मिळत नाही पण सुसाईड चीटमधे आपले नाव आले तर नसता मनस्ताप होईल या कल्पनेने लोक पैशासाठी थांबायला तयार असतात.
↩ प्रतिसाद: गवि
ह
होकाका Fri, 09/19/2014 - 16:59 नवीन
बापरे, म्हणजे त्या मित्राने त्या सर्व देणेकर्‍यांना डबल धमकी दिली तरः मला विम्याचे पैसे मिळणार नाहीतच पण तुंम्हाला सुद्धा मनस्ताप होईल अशी तजवीज केली जाईल.
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
इ
इरसाल Sat, 09/20/2014 - 06:07 नवीन
विजुभौ चुपचुपके च्या शाहिद कपुरची इस्टोरी सांगत आहेत. तो नाय का उडी मारत समुद्रात नी मग परेश रावलला सापडतो. अवांतर- त्याच पिच्चरात गुज्जु फॅमिली रहाते पश्चिम बंगालात आणी घरात गाणी गातात पंजाबी (इसको जिला क्यु नही घोषीत कर देते वाला ) असो चोरी करु नका - आपल्याला पचत नाय आत्महत्या नको- आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय कधी शांत बसुन विचार करा (इमॅजिन करुन बघा). निर्लज्ज व्हा/नका होवु - पण ते पॉझिटिव्हली, वर लोकांनी लिहिल्या प्रमाणे देणेकर्‍यांना विश्वास द्या की तुम्ही काहीही झाले तरी त्यांचे पैसे बुडु देणार नाही आहात.
↩ प्रतिसाद: होकाका
क
कवितानागेश Fri, 09/19/2014 - 10:42 नवीन
हे असं उगाच नाही तिथे इमोशनल ब्लॅकमेलिन्ग करायची गरज नाही. ज्या विश्वासानी पैसे दिलेत, त्याच विश्वासानी लोकही थांबतील. थोडे थोडे जरे देत राहिले, तरी घेनेकर्‍याला धीर येतो. माझ्या एका मैत्रिणीनी एका ओळखीच्यांचे ५०००० रुपये, दर महिन्याला २-२ करत फेडले होते. आणि पोस्ट डेटेड २५ चेक्स देउन ठेवले. तिला नोकरी लागल्यानी हे सगळे येतिल, हे देणार्‍यालाही नक्की माहित होते.
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ह
होकाका Fri, 09/19/2014 - 17:01 नवीन
बरोबर आहे. एमोतिओनल ब्लच्क्मेलिन्ग ला काही अर्थ नाही.
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/18/2014 - 14:42 नवीन
काळजी करु नका..मी पण या परिस्थितुन गेलेलो आहे...आत्महत्या करु नका..वेळ खराब असते..अश्या वेळी शांत रहा..देणेक-याना तोंड देत रहा..तोंड चुकवु नका.. दिवस बसुन रहात नाहि..चुल पेटति रहाण्या साठी मार्ग शोधा..ते महत्वाचे..कारण चुल बंद कि अक्कल पण बंद होते.. ८०८७९५८९२२ हा माझा नंबर आहे....काहि नाहि तरी सल्ला देवु शकेल..मी पुण्यास रहातो.. धिर सोडु नका...
स
संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 15:01 नवीन
हिम्मत खूप धरून आहे दादा, म्हणून अजून ताळ्यावर आहे. चूल पेटती आहे. त्याचा तरी अजून प्रश्न नाही. काम करतो आहेच. अविश्रांत. पोटापुरता पैसा येतो पण आता दुसराच प्रश्न उभा राहिला आहे. रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय? गरिबी फार जवळून भोगली आहे. त्यामुळे त्याची लाज आणि भीती वाटत नाही. कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चालना जी असे म्हणून लढतो आहे. पण मर्यादा दिसत आहेत म्हणून गोंधळलो आहे. पाठीशी उभे आहात. बरे वाटते. मित्र-नातेवाईकांशी नाही बोलू शकत. म्हणून मिपा वापरत आहे. क्षमा असावी
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
स
सौंदाळा गुरुवार, 09/18/2014 - 14:48 नवीन
आत्महत्येचा विचारही करु नका. बायको आणि मुलांना शक्य असेल तर तात्पुरते माहेरी पाठवा. स्वतःचे घर, जमीन, दागिने असतील तर mortgage लोन मिळतय का बघा. शक्य तेवढे खर्च कमी करा. बायको नोकरी करु शकते का? (जर करत नसेल तर) जे पैसे येणार आहेत त्याचा पाठ्पुरावा करा. आणि राग येईल तरी सांगतो मारामारी / शिवीगाळी वगैरे ऐकायच्या तयारीनेच र्‍हावा.
स
संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 15:09 नवीन
>>आणि राग येईल तरी सांगतो मारामारी / शिवीगाळी वगैरे ऐकायच्या तयारीनेच र्‍हावा. पटले
↩ प्रतिसाद: सौंदाळा
व
विलासराव गुरुवार, 09/18/2014 - 14:54 नवीन
मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , पण आत्महत्येचा विचार ही करु नकोस बरोबर. मी २००३ ला ४ लाखाला डुबलो होतो. पगार होता ७००० हजार. घर भाड्याचे. घरात एकटा कमावता. तुमच्यासारखीच परीस्थीती. पण आत्महत्या कारावी असा विचारसुद्धा मनात आला नाही. निर्लज्जपणा स्विकारला. सगळ्यांना सांगीतले कर्जबाजारी झालोय. भिकारी नाही. पै न पै चुकती करेल पण आज वेळ देउ शकत नाही. बरेचजण तयार झाले. एक-दोन जण खळीला आहे. त्यांना सरळ सांगीतले आता तर पैसे आले तरी तुम्हाला सगळ्यात शेवटी देणार, आणी आता जास्त आवाज केला तर देणारच नाही. मग आणखी ५०००० उसने मिळवले १ वर्षे तब्बेतीत खाण्यापिण्यासाठी. शांतचित्ताने काम करत करत व्यवसाय वाढवला. ३ वर्षात सर्व देणे देउन ५००-१००० रोज खर्च करायचो बार मधे. आनी एका वर्शाने काम करायचे सोडुन भारतभर फिरलो, मग परदेशात फिरलो.सगळं झाल्यावर विपश्यना करुन ध्यानमार्गावर स्थिर झालो. आणी आता उपदेश करत फिरत असतो. काय जमेल तसा बोध घ्या यातुन. कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा समजु नये.
स
संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 15:04 नवीन
धन्यवाद दाद, हुरूप आला थोडा
↩ प्रतिसाद: विलासराव
ज
जेपी गुरुवार, 09/18/2014 - 16:55 नवीन
जास्ती लिहीत नाही. व्यनी टाकतोय.जमल्यास संपर्क करा.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विलासराव Fri, 09/19/2014 - 13:46 नवीन
डांगे साहेब हे माझे मित्र आहेत दादाभाउ कुटे: हे महाराष्ट्र क्रिक्रेट टीमचे कर्णधार होते: बुद्दीबळ खेळले आहेत राज्यापातळीवर. दोन मुले आहेत. पोटासाठी डोंबीवलीवरुन फोर्ट्ला येतात गेली २० वर्षे, तिथे त्यांचा टेलीफोन बुथ आहे. कायम आर्थिक अडचण असते कारण मोबाईलमुळे आजकाल फोन कमी वापर होतो. आजच त्यांचा फोन आला होता सामनात बातमी आली १५ तारखेला म्हनुन. http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=23644&boxid=12913375
↩ प्रतिसाद: विलासराव
स
सुहास पाटील गुरुवार, 09/18/2014 - 15:01 नवीन
आत्माहत्या अजिबात करू नका. वेळ निघून जांइल. घरच्यांचा विचार करा. वर सांगितल्या प्रमाणे घरच्यांची काही दिवस माहेरी सोय कर. आणि हो पडेल ते काम करा त्यातून पैसे मिळावा. तुम्ही मेहनत करताय असे चित्र निर्माण झाले कि देणेकरी तुमच्यावर विश्वास ठेवतील
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/18/2014 - 15:07 नवीन
देणेकर्‍यांना आज उद्या करु नका. एकदा धीर धरुन स्पष्ट सांगा की ४ वर्षे लागतील. नंगे से खुदा भी डरता है. त्यांना सांगा की मला मारुन किंवा त्रास देउन तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहित. पैसे परत हवे असतील तर याकाळात तुम्हाला त्यांचे पैसे परत करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी मोकळीक द्या. डोक्यात अक्कलेचा भाग असलेले लोक ऐकतील. एवढे सांगुनही जे मुर्ख महाभाग ऐकणार नाहित त्यांच्या तगाद्याखातर आत्महत्या करणे मुर्खपणा आहे. ही परिस्थिती आहे ती हाताळावीच लागेल. स्वतःशी प्रामाणिक रहा. तो प्रामाणिकपण तुमच्या बोलण्यातुन जाणवु द्या. तुमच्या गरजा कमी करा आणि थोडे थोडे करत सगळ्यांना परतफेड करत रहा. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटल्यास तगादा कमी होइल. एखाद्याचे १००० देणे असेल तर ते १० रुपयांनी जरी कमी करता आले तरी बघा. अगदीच पैसे मिळत नाहित म्हटल्यावर ओक वैतागतात, थोडे थोडे मिळताहेत म्हटल्यावर आशेने दम धरतात
स
संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 15:20 नवीन
तुमचे म्हणणे पटले. तुम्ही सांगितलेला मार्ग बरोबरच आहे. ज्यांचे कडून येणे आहेत त्यांच्या शब्दावर ज्यांना द्यायचे त्यांना शब्द दिला. आता पंचाईत झाली कि देणारे देत नाहीत आणि मी खोटा ठरलो. ज्यांचे ६ लाख द्यायचे त्यांना ३ लाख दिले, तरी उरलेल्या तीन लाखासाठी ते जीव घेऊन मागे लागले आहेत. ते नातेवाईक आहेत आणि त्यांची अडचण पण १००% खरी आहे. अशी मेख बसली आहे कि बस. एका मित्राचे दीड लाख द्यायचे त्याला १५ हजार दिले. आणि म्हटले बाबा जर कळ काढ जसे येतील तसे तुला देतो, तर त्याच्या वडिलांचे दिवसाला १० फोन.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पिंगू गुरुवार, 09/18/2014 - 15:07 नवीन
ही पण वेळ जाईल, पण केव्हा. जेव्हा तुम्ही हातपाय माराल तेव्हाच. तेव्हा हात पाय मारणे चालुच ठेवा, नक्कीच तुम्ही वाईट परिस्थितीतून वर याल.
स
संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 15:21 नवीन
रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय?
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू गुरुवार, 09/18/2014 - 17:07 नवीन
धंद्यामध्ये कधीसुद्धा वेळेवर पैसा येईलच याची खात्री नसते. त्यामुळे गाठीशी थोडाफार पैसा बांधून पुढे जावे लागते. केलेल्या कामाचे पैसे मिळतीलच, पण ते अमुक वेळेवर मिळतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आशा सोडून देऊ नका, एवढेच सांगू शकतो. कारण त्याच्यावरच आपण सारे जिवंत आहोत.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
र
रेवती गुरुवार, 09/18/2014 - 15:09 नवीन
आत्महत्या करू नका. इथे येऊन बोललात ते बरं केलत.
स
संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 15:21 नवीन
पाठीशी उभे आहात. बरे वाटते. मित्र-नातेवाईकांशी नाही बोलू शकत. म्हणून मिपा वापरत आहे. क्षमा असावी
↩ प्रतिसाद: रेवती
स
सूड गुरुवार, 09/18/2014 - 15:10 नवीन
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही..बाकी सल्ले देण्यास अपात्र आहे. लवकरात लवकर आपल्या प्रयत्नांना यश येऊन सर्व सुरळीत होवो.
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/18/2014 - 15:21 नवीन
निर्लज्ज व्हा हा तर सल्ला आहेच पण त्या आधी १. बायको मुलांना बायकोच्या माहेरी पाठवा. तिच्या माहेरच्यांना स्पष्ट कल्पना देवुन. २. जे काही दागिने असतील ते विचार न करता विका आणि जमेल तेव्हडे कर्ज फेडा. ३. अजुन ही काही विकण्यासारखे असेल ( जसे की ४ चाकी वगैरे ) ती वीका आणि कर्ज फेडा. ४. घर भाड्याचे असेल तर ते बदलुन कमी भाड्याच्या घरात जा. ५. घर स्वताचे असेल तर बरेच सोप्पे होइल. सरळ विकुन टाका, घरावर लोन असेल तर ते फेडा आणि छोट्या भाड्याच्या घरात रहायला जा. मुख्य म्हणजे तुमच्या जीवनशैलीतुन हे दाखवून द्या की तुम्ही मुद्दाम लोकांचे पैसे अडवून ठेवले नाहीयेत. ( मी माझ्या मित्राला पूर्वी ५०००० दिले होते, तो ते परत करत नव्हता पण गोव्याला बायको मुलांबरोबर गेला होता. त्याने पैसे परत न करण्यापेक्षा त्याच्या ह्या वागण्याने जास्त दुख झाले )
ट
टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 05:50 नवीन
५. घर स्वताचे असेल तर बरेच सोप्पे होइल. सरळ विकुन टाका, घरावर लोन असेल तर ते फेडा आणि छोट्या भाड्याच्या घरात रहायला जा.
हे मात्र करु नका...ते घर तुमच्या नावावर असले तरी अख्खे कुटुंब त्यात रहाते...आणि घर एकदा विकले की परत घेताना जास्त पैसे देउनच घ्यावे लागते
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 06:43 नवीन
७-८ लाखांचेच कर्ज असल्याकारणाने घर विकण्याची नक्कीच गरज नाही. बँकेकडे तारण ठेवून किंवा तारण न ठेवताही घर दुरुस्तीसाठी एव्हढे कर्ज बँकेकडून अथवा HDFC कडून मिळू शकेल. दुरुस्ती किंवा गृहसजावटीसाठी (फर्निचर) बँका, HDFC वाले कर्ज देतात. तुमच्याकडे ३ वर्षाचे ऑडीटेड रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स भरल्याच्या पावत्या असतील तर इतरही अनेक कारणासाठी कर्ज मिळू शकेल. असे मिळाल्यावर तातडीने व्यक्तीगत नात्यातून घेतलेली कर्जे फेडून बँक/ HDFC चे कर्ज सुलभ हप्त्यात फेडता येईल. नोकरीच्या पर्यायाचा विचार करावाच. एकदा दगडाखालचा हात पूर्णपणे निघाला की नव्या जोमाने स्वतःच्या व्यवसायाच्या मार्गाने जाता येईल. आमच्या शुभेच्छा आहेतच.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 15:24 नवीन
नक्की काय व्यवसाय आहे आणि काय शिक्षण आहे हे समजल्यास मार्ग सुचवणं बरं पडेल. विलासरावांनी सांगितल्याप्रमाणं सग ळ्यांना एकत्र बोलावून परिस्थिती समजावून सांगितल्यास काही मार्ग निघू शकेल. (मसाला चित्रपटासारखा) ह्यानंतर जमल्यास एखादी नोकरी स्विकारावी. ७-८ हजार जरी मिळाले तरी महिन्याचं पक्कं उत्पन्न असेल. घरखर्च किमान निभणं शक्य होईल. उरलेल्या वेळात व्यवसाय सांभाळता आल्यास उत्तम. बाकी 'हेही दिवस जातील' हे कायम नि पक्कं लक्षात ठेवणं हा अत्यंत चांगला मार्ग आहे. आत्महत्या हे तात्कालिक समस्यांचं तथाकथित कायमचं निराकरण आहे. देणेकरी आपल्या कुटुंबाला त्रास कशावरुन देणार नाहीत?
आ
आदूबाळ गुरुवार, 09/18/2014 - 15:50 नवीन
+१ संपूर्ण प्रतिसादालाच
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 17:58 नवीन
प्रतिसाद संपादित झालेला असला तरी माझं मत तेच राहील. आयुष्य अकारण अथवा सकारण सुद्धा संपवण्यासाठी नाही. जन्म आपल्या हातात नाही तसाच मृत्यू देखील नसावा.

संपादित

↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/18/2014 - 15:26 नवीन
आत्महत्या तर मूळीच करू नका. ती नक्किच पळवाट नाहि. आपल्या प्रयत्नांना लवकारात लवकर यश मिळो हिच सदिच्छा. तुमच्या कामाचं / व्यवसायाचं स्वरुप काय आहे ते ईथे सांगीतलत तर कदाचीत तुम्हाला जास्त काम मिळण्यास मिपाकर नक्किच हातभार लावतील.
व
विवेकपटाईत गुरुवार, 09/18/2014 - 15:32 नवीन
सल्ला देणे सौपे असते, परिस्थितीशी सामना करणे कठीण असते. तरी ही संसारात परिस्थितीला समोर जावेच लागते. त्या शिवाय गत्यंतर नाही. राजा हरिश्चंद्रला चांडाळराज चा सेवक बनण्याची पाळी आली होती. पण त्यांनी आत्महत्या नाही केली. परिस्थिती स्वीकार केली. रात्री नंतर दिवस हा येतोच याच आशेवर संघर्ष करीत राहा. बाकी चोरी करणे आणि आत्महत्या करणे दोन्ही गैर आहे.
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 15:49 नवीन
आत्महत्या हा पर्याय कदापी योग्य नाही... ती पळवाट होईल आणि कुटुंबावर अन्यायकारक होईल. कुटूंबातल्या कोणाचाही जीव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही... आणि तो गुन्हाही होईल. पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका. चोरी करणे हे नैतीकदृष्ट्या तर अयोग्य आहेच पण अगदी व्यावहारीकदृष्टीने विचार केला तरी अत्यंत धोकादायकही आहे... पकडला गेलात तर परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट होईल हे नक्की. इथेही हाच सल्ल की, पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका. तुमच्या परिस्थितीत सर्वात उत्तम मार्ग म्हणजे देणेकर्‍यांना विनयाने पण स्पष्ट्पणे सांगा की, "आता पैसे देणे शक्य नाही. पण ते बुडवण्याची इच्छाही नाही. तेव्हा आता काही दिवसांची मुदत हाच एक मार्ग बाकी आहे." तसे केल्यास त्यांचे पैसे मिळतील. पैसे कमावणाच्या मार्गात कोणतीही समस्या उभी करणार्‍या त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांचे पैसे परत होण्याला अजून उशीर होण्यात किंवा ते पूर्ण बुडण्यात होउ शकतो... हे तुम्हालाही नको आहे आणि त्यांनाही नको आहे, हे तुम्हाला त्यांना पटवून द्यावेच लागेल. याचे खालील परिणाम होऊ शकतातः अ) देणेकर्‍याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला नसेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा असला तर ('वाईट' आणि 'अती वाईट' असे दोनच पर्याय असताना 'वाईट' हा पर्याय निवडावा असा विचार करून) तुम्हाला परतफेडीची मुदत वाढवून देण्यास तयार होईल. आ) देणेकर्‍याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला असेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा नसला तरीही (अगोदरच चोखाळला असला तरी) सौजन्याने वरचाच प्रयत्न परत परत करावा (तुमच्या हाती अजून काहीच नाही असे तुमच्याच लेखतून कलते आहे)... कोण जाणे पुढच्या एखाद्या प्रयत्नात ते पूर्ण पैसे बुडीत खात्यात जाण्याच्या (अती वाईट) पर्यायाऐवजी अजून थोडा वेळ कळ काढण्याचा (वाईट पर्याय) देणेकरी स्विकारेल. आता राहीले तुमच्या मनःस्थितीबद्दल : ही परिस्थिती तुमच्या चुकीने झाली की योगायोगाने झाली हा प्रश्न आताच्या घडीला गौण आहे. वस्तूस्थिती खालिलप्रमाणे आहे : क) परिस्थिती वाईट आहे, यात वाद नाही. पण तिच्यामुळे अधिकाधीक निराश होण्याने किंवा नकारात्मक विचार करण्याने (उदा. आत्महत्या, चोरी, इ) ती सुधारणार नाही, किंबहुना ती अजूनच बिघडेल. तेव्हा ते सोडा. हे कठीण आहे पण अश्यक्य नाही. किंबहुना, समस्येतून बाहेर पडेपर्यंत तुमची सगळी ताकद आणि सगळे विचार समस्या सोडविण्याकरीता वापरणे हेच तुमचे एकमेव कर्तव्य आहे. याबाबत मनात शंका आल्यास कुटुंबाचा विचार मनात आणा. ख) कोणत्या चुकीने ही परिस्थिती उद्भवली ह्याचा नीट खडतर प्रामाणिकपणे (ब्रुटल ऑनेस्टी) विचार करा. खरी कारणे शोधा. दुसर्‍यावर दोष ढकलण्याअगोदर स्वतःच्या चूका शोधा आणि त्या चूका भविष्यात तुमच्या हातून परत होऊ नयेत यासाठी उपाय शोधा. यात होणारे बोध तुम्हाला भविष्यात योग्य निर्णय घ्यायला आणि जीवन सुरळीत करण्यच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्यायला उपयोगी पडतील. कारण, तुमच्या विचारांवर आणि कृतीवर तुम्ही १००% ताबा ठेवू शकता... इतरांच्या विचारां- किंवा कृतीं- बाबत असे असू शकत नाही. ग) पैसे कमावण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे ते तुमच्या शिक्षण, कौशल्य आणि कर्तबगारीवर अवलंबून आहे. तेव्हा तो निर्णय घ्यायला तुमच्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती अजून कोणी नाही. फारतर त्या क्षेत्रातल्या जाणकारांचा सल्ला व मदत जरूर घ्या. घ) तुम्ही समस्येत अडकलेली जगातली पहिली व्यक्ती नक्कीच नाही. यापूर्वी अनेकजण अनेक समस्यात गुंतलेले आहेत आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर आलेले आहेत... तेव्हा तुम्ही तेच केलेत तर फार मोठे दिव्य काम केले असे होणार नाही... हे नक्कीच लक्षात ठेवा. हे सर्व तुमच्या आणि इतरांच्या बाबतीत भविष्यातही खरे आहे हे नीट ध्यानात ठेवा. 'यशस्वी होणे' म्हणजे कधीच 'कधीच अयशस्वी न होणे' असे अजिबात नाही... तर अपयशांना समर्थपणे तोंड देऊन, अंग झटकून त्यांच्यावर मात करणे होय ! (बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) इए
स
संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 15:59 नवीन
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: मी एक B F A कमर्शिअल आर्टीस्ट असून १२ वर्षे कामाचा अनुभव आहे. क्रियेटीव डायरेक्टर म्हणून ग्राफिक आणि वेब मध्ये भरपूर काम केले आहे. २०११ पासून स्वत: फ़्रिलान्सर म्हणून काम सुरु केले. नंतर मुंबईहून नाशिक ला शिफ्ट झालो कारण आंतरजालीय संबंधामुळे तसा काही परिणाम होत नव्हता. माझे मुंबई, नाशिक, UK, दुबई ला बरेच ग्राहक आहेत. नाशिक ला ऑफिस सुरु करणे महागात पडले. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. ज्यांनी मदत करायची काबुल केली ते सपशेल फिरले. २-३ ग्राहकांची कामे केली त्यात बरेच नुकसान झाले. सद्य स्थिती मध्ये ऑफिस बंद आहे. घरून काम करत आहे. ग्राहकांना अजून माझ्यावर विश्वास आहे कारण माझ्या कामाच्या दर्जामध्ये मी तडजोड करत नाही. अचानक उलथापालथ झाल्याने जाम बावरलो आहे. फसवणारी माणसे आतापर्यंत भेटली नव्हती ती आताच भेटली सर्व अनावश्यक खर्च बंद केले आहेत.
क
काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 16:19 नवीन
रिकामटेकड स्मजल्यास हरकत नाही पण 4 पोरं 9 महीने काम करतील इतपत काम आणि पैसा हातात नसल्यास ऑफिस टाकू नयेच. बाकी प्रोफाइल बघता प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत टाका कदाचित बैंक कर्ज देइल ? ताबडतोप मुंबई त नोकरी धरा तुम्हास अवघड जाऊ नये आणि यामुळे देणेकर्यांची खात्रिही पटेल ? जमलेच तर नंतर महानगर सोडू नका 100 मार्ग पैसा मिळवायचे इथेच कायम उपलब्ध असतात.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बाबा पाटील गुरुवार, 09/18/2014 - 16:36 नवीन
मी तर बर्‍याच वेळा असा काळ आणलाय,(अंगात वाईट्ट किडे आहेत हो).पण त्यातुन बाहेर पडता येत.सगळ्यात पहिल अनावश्यक खर्चांना कात्री लावायची.बहुतेक सर्व कामे स्वतःच करायची, वर्क ऑर्डर पासुन ते फायनल बिल पेमेंट पर्यंत स्वतःच राबायच,दररोज कुठल्याही परिस्थीतीत डेली अकाउंट मध्ये ५००-१००० बाजुलाच ठेवायचे.बाहेरचा चहादेखिल स्वतःच्याच पैश्याने प्यायचा नाही.सगळ्या गोष्टी बंद्,व्यसनाच्या पासुन मैलभर तरी लांब रहायच, तुम्ही देत असलेल्या सर्विसचे दर कमी करायचे,ग्राहकांशी बायकोशी पहिल्या रात्री बोलला नसाल इतके गोड बोलायचे. डोक्यावर बर्फ आणी जिभेवर साखर अशा मार्गाने व्यवसाय करायचा. त्यात आपण नविन नविन काय देवु शकतो हे सतत विचार करुन सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचा,पडेल ती काम स्विकारायची.कष्ट करायचे आणी घरी आले की छोट्या बाळांशी मजेत खेळायच. सहा एक महिन्यात यातुन बाहेर पडाल. शहाणपणा सांगायच कारण मी स्वतः तीन वर्षापुर्वी दिड ते दोन लाखाची मासिक कमाई सोडुन राज्यसेवेच्या परिक्षेच्या मागे लागलो,खर्च चालुच होते व्याज काही थांबत नाहित्,शेवटची परिक्षा २ फेब.२०१४ ला दिली वैतागलो सगळे मिळुन कर्जाची रक्कम १५ लाखापर्यंत पोहचली, क्लिनिकचा दर महिन्याचा सरासरी खर्च ५० ते ६० हजार, वेड लागायची पाळी आली होती,१५ फेब नंतर दिड लाखाचे पर्सनल लोन घेतले,बायकोकडुन ५० हजार घेतले,परत सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ओपिडी चालु केली. दोन तीन जणांना तात्पुर्ते कामावरुन कमी केले, ३ ते ४ महिन्यात बर्‍यापैकी घडी व्यवस्तीत बसली.आता सहाच महिन्यात पुण्यातले पॅरालिसकरीताचे संयुक्त उपचार पद्धतीवरीत आधारित एकमेव रुग्नालय चालु करेल. होता है बॉस थोडा थंडे दिमागसे सोचो.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्पा गुरुवार, 09/18/2014 - 16:54 नवीन
मुंबईत नोकरी करायची ईच्छा असल्यास काम अणि रिझ्युमे मला पाठवा lazyprass@gmail.com
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 16:01 नवीन
स्वत: च्या पैसा कमवायच्या क्षमतेवर काही कारणाने दीर्घकाल रूपी भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेली च व्यक्तिच आत्महत्येचा मार्ग पत्करेल. तसेच चोरी मधे रिस्क फैक्टर्स हाय आहेत. त्यापेक्षा व्यावसायिक जोखिम पत्करणे योग्य.(उत्कृष्टच) पैसा कमवायची जिद्द (व व्यावसायिक अक्कल) नष्ट झाली नसल्यास तात्पुरते निर्लज्य बनुन वेळ मारून न्या. बाकी रोज प्राणायाम न चुकता कराच. उल्हासित वाटणार असेल तर आरत्या करा. निराश मन ध्यान करू शकत नाही तेंव्हा सर्व आलबेल होई पर्यन्त यात पडू नका. अर्थात शेवटी लिहलेले हे सर्व मनाच्या उभारीसाठी आहे पैसा मिळायला याचा प्रत्यक्ष संबंध नाही.
आ
आतिवास गुरुवार, 09/18/2014 - 16:02 नवीन
हेही दिवस जातील. निराश होऊ नका. कदाचित पुढच्या वळणावर यश तुमची वाट पाहात असेल. शुभेच्छा.
A
arunjoshi123 गुरुवार, 09/18/2014 - 16:18 नवीन
७-८ लाख बिना तारणाचे तुम्हाला देणारे लोक असतील, तर माझ्या मते ते अंततः ते तुमचे हितचिंतकच आहेत/होते. समस्या सुटल्यावर (बाळ एकदा जगात आले, सेक्यूअर झाले) कि लोकांना पैसे पटकन परत पाहिजे असतात. त्यात फार काही चूक वाटत नाही. त्यातले काही बँकेचे तारणाचे लोन असेल तर बँकेने तितक्याचा कब्जा आतापर्यंत घेतला असेल. जर बिनातारणाचे लोन असेल माझे मते ते बँकेचा हळूहळू एन पी ए होईल. मंजे बँक तुम्हाला त्रास देईल, पण सभ्यपणे आणि नंतर विसरून जाईल. बिझनेस बुडणे आणि त्याच वेळी घरात मोठा खर्च होणे हे बॅडलक आहे, पण नाईलाज आहे. आता: १. तुमचे सगळे पैसे मित्रांचे असले तर ते बँक लोन मधे बदला. मित्रांना एकगठ्ठा पैसे परत पाहिजे असतात. त्यामानाने इएमआय सोपी पडते. आणि फालतू बँकेकडे जा, त्यांचा व्याजदर जास्त असतो पण ते एस बी आय सारखे कागदांसाठी छळत नाहीत. २. जास्त मानसिक ताण असेल तर शेत वैगेरे असल्यास विकून टाका. एखादा असेट विका. बिझनेस विका. घराचे तारण करा. ओवरटाईम करा. जास्तीची नोकरी करा. कमी भांड्वलावर अजून काही चालू करता येतं का ते पहा. पत्नीदेखिल काय काय करू शकेल ते पहा. ३. काही काळ घरखर्च खूप कमी करा. त्यानं थोडं प्रयत्न केल्याचं समाधान वाढतं. ४. काउंसेलर वा मानसोपचार तज्ञाला एक भेट अवश्य द्या. -------------------------------------------------------------------------------- वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्‍या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्‍याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन. ------------------------------ पैसे असून परत न देण्याच्या इच्छेला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही त्यापुढे अजून काय काय विचार करत आहात ते किती चूक आहे हे जाऊच द्या, पण असं स्वतःला निष्कारण निर्लज्ज म्हणणंदेखिल चूक आहे. लोक कितीही वाइट असले तरी अंगावरचे कपडे आणि तोंडचा घास काढून नेत नाहीत. ------------------------------ तुम्ही जितक्या मनस्वीपणे समस्या मांडली आहे, तितक्याच मनस्वीपणे मी प्रतिसाद देत आहे. शिवाय अशी परिस्थिती हाताळण्याचा मला लंबाचौडा अनुभव राहिला आहे. माझ्या प्रतिसादातलं प्रत्येक विधान योग्य आणि उचित असेल असं नाही, पण स्वतःला टेलर मेड करून वाचा.
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 16:34 नवीन
वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्‍या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्‍याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन. +१००. सरळ सोपे पण पूर्णपणे वास्तववादी आर्थिक समिकरण फार आवडले.
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
शिद गुरुवार, 09/18/2014 - 16:43 नवीन
वरील सर्वांशी सहमत. उगाच काही अनाहूत सल्ला देत बसत नाही कारण ज्याची जळते त्यालाच कळते. तुमच्या खडतर परीस्थितीमधून लवकरच तुम्हाला बाहेर पडण्याची शक्ती व संधी मिळो आणि मनोजोगं यश पदरात पडो हि "श्री" चरणी प्रार्थना.
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 17:11 नवीन
उमेदीच्या काळात पहिले शैक्षणिक अडचणी व नंतर आर्थिक अडचणींचा बराच सामना मी केलेला आहे. संकटातून मिळालेला धडा माणूस कधीच विसरत नाही. बरीच वर्षे अवघड आर्थिक परिस्थिती अनुभवली असल्याने आजही अनुत्पादक छंदांवर रुपयाही खर्च करत नाही. या अनुभवांसाठी मी नशिबाचे आभारच मानतो. वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत. तुम्ही या अवघड परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढाल असा विश्वास वाटतो.
↩ प्रतिसाद: शिद
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 18:12 नवीन
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
कृपया हे वाक्य खालीलप्रमाणे वाचावे. वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठीच नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ज
जेपी गुरुवार, 09/18/2014 - 16:53 नवीन
जास्त काही बोलणार नाही.व्यनी टाका . प्रत्यक्ष बोलु.
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/18/2014 - 17:19 नवीन
सगळ्यात पहिल्यांदा उद्याच्या उद्या सायकॅट्रीस्टला भेटा . बाकीचे नंतर बघु !
ए
एस गुरुवार, 09/18/2014 - 17:50 नवीन
सर्वांनी योग्य सल्ले दिले आहेतच. पण नकारात्मक मनःस्थितीतून बाहेर येण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कुणालातरी अतिशय निरपेक्षपणे, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करा. भलेही ती मदत अतिशय क्षुल्लक का असेना. बघा, स्वतःबद्दल खूप छान वाटू लागेल आणि गमावलेला आत्मविश्वासही परत येईल. बर्‍याच केसेसमध्ये मी हा मार्ग यशस्वीपणे वापरला आहे. शुभेच्छा. कसलीही मदत हवी असेल तर जरूर संपर्क करा.
ब
बहुगुणी गुरुवार, 09/18/2014 - 17:54 नवीन
संपूर्ण धागाच 'वाचनखूण' ठेवण्याच्या लायकीचा आहे! मिपा संस्थळ हे केवळ टाईमपास कराण्याची जागा नसून सभासदांना अगदी वैयक्तिक अवघड समस्याही सोडवणारं 'सुहृद' वाटावं यातच सगळं आलं. संदीप: व्य नि केला आहे.
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 17:57 नवीन
धंद्यात आर्थिक नुकसान आणि देणेकर्‍यांचे तगादे, अपमानास्पद वागणूक आणि समोर पसरलेला अंधःकार हे मी सुद्धा इथे परदेशात अनुभवले आहे. इथे तर कोणी कोणाला आर्थिक मदत करीत नाहित. (४-५ मित्रांनी तरीही केली) बँक कर्ज मिळत नाही आणि धंद्याचे ओव्हरहेड्स मुळे कर्जाचा आकडा भरमसाठ वेगाने वाढत जातो. हां हां म्हणता डोक्यावरून पाणी जातं. तुमची इच्छा असेल तर परदेशात नोकरी शोधा. दुबईत तुमचे क्लायंट आहेत म्हणजे तुमच्या ओळखी आहेतच. पेपरातून जाहिराती शोधून गल्फात नोकरी शोधा पासपोर्ट नसेल तर तो आधी बनवा). महिन्याला ५०-६० हजारापर्यंत आमदनी होईल. त्यातील ८० टक्के तरी बचत करू शकाल. (तिन वर्षाच्या ठिकाणी वर्षभरात कर्जाची परतफेड होईल.) देणी लवकर फिटतील. जरा जमापुंजी नीट जमली की परत जाऊन पुन्हा व्यवसाय प्रयत्न करा, पण ह्या वेळी जास्त सावधतेने. फॅन्सी आयडियाजच्या मागे न धावता कठोर वस्तूस्थितीशी सामना करत धंद्यात जम बसवा. जमेल सर्व काही.
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा