Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

प
पगला गजोधर
Fri, 09/19/2014 - 09:17
🗣 186 प्रतिसाद
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे." आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? * सर्व पक्ष अपने दमपे * (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) *(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) * किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

प्रतिक्रिया द्या
35254 वाचन

💬 प्रतिसाद (186)
न
नानासाहेब नेफळे Sat, 09/20/2014 - 07:33 नवीन
ज्यांचे गाल लाल असतात तेच फक्त टोमॅटो खातात.भाजपच्या नेत्याचा शोध. http://www.esakal.com/esakal/20140730/5125861762891578810.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
क
काळा पहाड Sat, 09/20/2014 - 10:15 नवीन
हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची समजून अशी की ही कामे सरकारची आहेत. सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. त्यामुळे हे दर वाढले, ते दर वाढले असं बोलणे म्हणजे राष्ट्रवादीपद्धतीप्रमाणे (म्हणजे अडाणी, उद्धटपणे, गुढघ्यात मेंदू टाईप) विचार करणे होय. याला रिझर्वेशन द्या, त्याला रिझर्वेशन द्या, पैसे आणि दारू वाटा, नको असताना कांदा एक्स्पोर्ट करा, नको असताना साखर इंपोर्ट करा या गोष्टी पवार व तत्सम लोकांनी (ज्यांना मेंदू असण्याबाबतच शंका आहेत) करायच्या गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 09/20/2014 - 15:23 नवीन
सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. +१०० सबसिडी, राखीव हे, राखीव ते, अर्ध्या दरात वीज, कर्ज माफ अशी भीक देऊन जनतेला इतके लाचार बनवले जाते आहे की त्यामुळे अगदी शिकलेसवरलेले लोक अभिमान विसरून कोण काय फुकट देतोय इकडेच लक्ष ठेवताना दिसतात. सरकार हे पैसे छापून फुकट खिरापत वाटणारी संस्था नाही. तर लोकांना सक्षम होण्यासाठी पोषक वातावरण आणि समान संधीचे वातावरण तयार करणारी संस्था आहे. लोकांचेच पैसे (कराचे किंवा राष्ट्रिय कर्ज काढून) लोकांनाच सबसिडी म्हणून द्यायचे आणि वर ते आम्ही दिले असे सांगून शेंडी लावणे याला चलाखीला सुशिक्षित लोकही फसतात ही मोठी शोकांतिका आहे. भीक देऊन / किंमती बळजबरीने खाली ठेऊन परिस्थिती सुधारत नाही तर नागरिकांची आर्थिक क्षमता वाढवून सुधारते. किंमती बळजबरीने खाली ठेवण्याने एकतर उत्पादकाचे नुकसान होते किंवा नागरिकांच्या कराचा सबसिडीच्या स्वरूपात अक्षम्य व्यय होतो. दोन्हीत नेत्यांना मोठेपना मिरवता आला तरी एकूण नागरिकांचेच नुकसान होते. म्हणूनच सबसिडी नाईलाजाने थोड्या कालाकरिता केलेला उपाय म्हणून ठीक आहे, मुख्य तंत्र म्हणून नाही. सरकारकडून आम्हाला सबसिडीचा मिंधेपणा नको आहे; तर सरकारने शिक्षण, पाणी-सांडपाणी, रस्ते-रेल्वे, इ ची व्यवस्था करावी आणि समान संधीची व्यवस्था निर्माण करावी, मग आम्ही आमचे उत्पन्न वाढवून सबल होऊन चढाओढीत भाग घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करू; असे म्हणणार्‍या नागरिकांचा देशच पुढे जाऊ शकतो. नाहीतर १००० ची नोट घेऊन मतदान करणार्‍या आणि तोच नेता निवडून आल्यावर त्याला ५०,००० रुपये देऊन माझ्या मुलाला नोकरी दे असे सांगणारे काय कमी नाहीत... त्यांना हेच कळत नाही की त्यांना मताचे १००० मिळाले नाहीत तर ४९००० चा तोटाच झाला आहे. कारण नोकर्‍या निर्माण होतील असे वातावरण निर्माण करणे शासनाचे काम असते... नोकर्‍या विकणे नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
पोटे Sat, 09/20/2014 - 15:52 नवीन
ग्यास कोणत्या दराने घेता? स्वस्त की सबसिडीविरहीत ? मोदी येण्यापुर्वी फेसबुकावर अशा ढीगभर पोस्ट फिरत होत्या. स्वस्ताईम्नसली तरी चालेल. सबसिडी मिंधेपणा नको. त्याला लाखो लाइक मिळाले होते. मोदीनी घोषणा केली. ज्याना परवडते त्यानी महाग दराने ग्यास घ्या. त्यासाठी फक्त तीन हजार लोकांनीच नोंदणी केली आहे म्हणे. ते लाखो लाइक देणारे कुठे गायबले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 09/20/2014 - 16:50 नवीन
फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३००० लोकांनी केलेली सुरुवात फार वाईट नाही... इतका काळ असलेली सवय सोडायला कठीण जाणारच आहे म्हणा ! शिवाय आम्ही हे फुकट देऊ / ते फुकट देऊ (आणि मनातल्या मनात "तुम्हाला आमचे मिंधे बनऊ") असे म्हणणार्‍या हितसंबंधींची फौज तयार आहेच ना ? तेव्हा ते सर्वसामान्य माणसाला जरा कठीण जाणं सहाजीकच आहे. पण आता केवळ तुम्ही विचारलंत म्ह्णून सांगतो की, पहिल्यापासूनच कोणतीही फुकट मदत घेताना खूप अवघड वाटत असल्याने वैध मार्गांनी स्वत:ची कमाई वाढवण्यावर भर आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर नव्हती तेव्हापासून "अंथरूण पाहून पाय पसरा" हा वडीलधार्‍यांनी दिलेला मंत्र पाळतो आहे. मात्र त्यात स्वतःची एक भर जरूर टाकलेली आहे :"अंथरूणाचा आकार वाढविण्यासाठी वैध मार्गांनी घडपड करण्यात काहीही वाईट अथवा कमीपणा नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 09/20/2014 - 17:06 नवीन
आणि हो, मी जनतेसाठी आणि देशासाठी काय भले आहे ते व्यवस्थापनाच्या भाषेत सांगितले होते... राजकारणाच्या भाषेत नाही. कोणत्याही नावाच्या पक्षाने प्रामाणिकपणे चांगली कृती केली तर देशाचं भलेच होईल ! "क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी" हा खेळ खेळण्यात आम्हाला रस नाही. पण मिपावर इतरांनी तो खेळायला अजिबात ना नाही :) (आम्ही कोण लागून गेलोय नको म्हणणारे ?! :) ) चलने दो... केव्हापासून पॉपकॉर्न घेऊन पुढच्या सीटमध्ये बसलो आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 17:53 नवीन
>>> हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची ........ संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. मोदी याच भूमिकेतून पुढे जात आहेत. तात्कालिक लालूच दाखविण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांवर त्यांचा भर दिसतोय. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची मर्यादा वार्षिक रू. १ लाख ऐवजी रू. १,५०,००० करणे, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविणे, पेट्रोलचे दर गेल्या ४ महिन्यात रू. ६ प्रति लिटर कमी करणे इ. निर्णयातून जनतेच्या खिशात जास्त उत्पन्न जाण्याचे मार्ग सुरू झाले आहेत. त्याच बरोबरीने काश्मिर मधील भयंकर पूरस्थितीत तिथे जाऊन नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबविले गेले. गेल्या वर्षी उत्तराखंड मध्ये देखील आपल्या प्रशासकीय कार्यक्षमतेची अशीच चुणूक दाखविली होती. परराष्ट्र धोरणात चीन व पाकिस्तान विरूद्ध बर्‍याच काळानंतर एक खंबीर भूमिका भारताने घेतली. एकंदरीत मोदी योग्य दिशेने जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
पोटे Sat, 09/20/2014 - 23:15 नवीन
पेट्रोल कमी केले की वैयक्तिक गाडीवाल्याला फायदा होतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट / वस्तु वाहतुक डिझेलवर जास्त कrun चालते ना ? आणि डिझेल महागच झाले आह ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पोटे Sat, 09/20/2014 - 23:26 नवीन
गेल्या तीन महिन्यात डिझेलच्या किमती तीनदा वाढल्या ना? पेट्रोलच्या किमती कमी करुन व डिझेलच्य वाढवुन स्वस्ताई येते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
ह
हाडक्या Fri, 09/19/2014 - 11:17 नवीन
चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत..? हे मी काय पाहतोय ? आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
स
सौंदाळा Fri, 09/19/2014 - 11:18 नवीन
खि खि खि हाडक्याशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/19/2014 - 11:21 नवीन
गुरुजींनी योग्य विश्लेषण केले, त्याला योग्य म्हण्टले तर कुठे बिघडले? विरोधासाठी विरोध करायला आम्ही भाजपेयी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Fri, 09/19/2014 - 11:41 नवीन
तुम्ही कोण आहात ते आम्ही कोण सांगणार..! गुरुजीच ते 'व्यवस्थित' सांगु शकतील हो.. ;) बाकी तुम्ही फार म्हणजे फारच शांत झाला आहात आणि खूपच मुद्देसूद बोलत आहात असे निरिक्षण नमूद करतो.. (ह्ये वागनं बरं नव्हं..!) (अवांतरः माई दिसल्या नाहीत त्या बरेच दिवस ? काय आचार संहिता लागु व्हायची वाट बघतायत का त्या ? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मृत्युन्जय Fri, 09/19/2014 - 11:18 नवीन
माझे मत तर बाबा भाजपालाच असेल (सेना बरोबर असेल तर सेना भाजपा युतीला). मोदी उत्तम काम करताहेत. देशाची प्रतिमा निर्माण करणे, परराष्ट्र संबंध इत्यादींबाबत १०० दिवसात योग्य पावले उचलली आहेत. अगदीच पाट्या टाकताहेत असे म्हणले तरीही काहिच न करणार्‍यांपेक्षा किंवा धरणात मुतु इच्छिणार्‍यांपेक्षा सुसंस्कृत भाजप नक्कीच चांगला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ह
होकाका Fri, 09/19/2014 - 13:52 नवीन
नेफळेसाहेब, आपण कोणाला मत द्यावंत हा फक्त आपलाच प्रश्ण आहे. फक्त एवढीच एक विनंती आहे की असे महाराष्ट्र विरुद्ध गुजराथ हे स्वरुप ह्या चर्चेला देऊ नका. अगदी एक नजीकच्या वर्तमानातलं उदाहरण द्यायचं तर केंद्रसरकारने भारतात आठ ठिकाणी electronics manufacturing hubs करण्याचं ठरवलं आहे, त्यात निवडलेली चार स्थळं महाराष्ट्रातली आहेत आणि तीन गुजराथमधील. महाराष्ट्रातली शहरं आहेतः ठाणे, औरंगाबाद, नागपूर, आणि नाशिक. देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला सर्व बाबींचा विचार करावा लागतो, त्यात फक्त एकाच प्रांताचा विचार करणं हे ते करूच शकणार नाहीत. मोदींनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की त्यांचा भर त्या त्या राज्यांच्या शक्तीस्थळांना अजूनच मजबूत करण्यावर राहील. मला सांगा, जर त्यांना फक्त गुजराथचेच हीत बघायचे असते, तर त्यांच्या सरकारने इराकमध्ये अडकलेल्या केरळी परिचारीकांना सुखरूपपणे परत आणण्याचे प्रयत्न केले असते का? तसंच, श्रीलंकेत आणि पाकिस्तानात अटक होऊन पडलेल्या मच्छिमार बांधवांना सोडवून आणण्याची तसदी घेतली असती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड Sat, 09/20/2014 - 10:19 नवीन
अहो तसं त्यांनी केलं नाही तर त्यांच्या पक्षाची युएसपी (http://en.wikipedia.org/wiki/Unique_selling_proposition) काय? एकतर त्यांना काम करावं लागेल नाहीतर भुकं मरावं लागेल. लोक दगडं मारतील ते वेगळंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होकाका
फ
फुंटी Fri, 09/19/2014 - 10:38 नवीन
राजकारणात आपल कोण याबाबत अनेक वर्तुळ असतात.राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्त्व हे आपल असू शकत .भाजपची हिंदुत्त्ववादी भूमिका महाराष्ट्रात झिरपण कठीण आहे.हे लक्षात घेऊन मराठी माणसाच्या आणि खासकरून मुंबईच्या हितासाठी शिवसेना स्थापन झाली.मोदींचा कार्पोरेट चेहरा युवकांना भावला आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लाट देशभर उसळली .परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे .त्यामुळेच शरद पवार ते वसंतराव नाईक सगळ्यांनीच मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहील याला प्राधान्य दिले.जरी नेतृत्व विचारी नसलं तरी मुंबईतला सुशिक्षित मराठी समाज नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे .शिवसेनेचा आवाका आणि गरज ही मुंबईपुरता आहे हे ठाकरे पवार दोघही जाणून होते...त्यामुळे युती तुटली तरीही आश्चर्यकारक राजकीय समीकरणे महाराष्ट्रात अस्तित्वात येऊ शकतात...आगामी काळात सेना राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांची भाजप कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षातील लढत होताना दिसेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चौकटराजा Sun, 09/21/2014 - 15:09 नवीन
.परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत. 'शिववडा'चा टर्नओव्हर इतका वाढला काय ? शिवसेना काय पक्ष आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुंटी
फ
फुंटी Tue, 09/23/2014 - 12:19 नवीन
खायचे वडे वेगळे असतात हो...दाखवायचे वेगळे....आता शिवसेना हा पक्ष नाहीये ? अमित शहा चावला कि काय तुम्हाला पुण्यात???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
L
lakhu risbud Sat, 09/20/2014 - 08:59 नवीन
हे वाचा http://jagatapahara.blogspot.in/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 09/19/2014 - 10:09 नवीन
मुर्खपणा. ह्या दुफळीचा फायदा घेऊन परत आघाडी सत्तेत यायला नको म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 09/19/2014 - 10:13 नवीन
अगदी हेच मनात आलं होतं बातमी वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पोटे Fri, 09/19/2014 - 10:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/19/2014 - 10:38 नवीन
युती तुटली हे एका अर्थाने चांगलेच झाले . आता शिवसेना भाजप दोघांनाही आपापली औकात कळेल निवडणुक हरल्यावर दोघेही होश मधे येतील ! शिवाय निवडणुक जिंकल्यावर आपल्या त्या निमित्तने का होईना पण राहुल बाबा चे दर्शन होईल , बरेच दिवस काही ओरीजीनल कॉमेडी ऐकली नाही राव ! बाकी आता पवार साहेब अन राजसाहेब ह्या दुफळीचा फायदा कसा उठराजसाहेब्पाहणे औत्सुक्याचे ठरेल :)
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 09/19/2014 - 10:50 नवीन
आता राष्ट्र्वादीचे आमदार निवडणुकीनंतर लाली, लिपस्टीक लावुन उभे राहणार आणि जो जास्त पैसे देइल त्याच्याबरोबर जाणार काँग्रेस असो, भाजपा असो नाहीतर सेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पोटे Fri, 09/19/2014 - 13:26 नवीन
शिवसेना आणि इंदिरा काँग्रेस युती होती १९७९ साली ! तेंव्हा सेनावाले ओठाला काय लावुन बसले होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा Fri, 09/19/2014 - 14:35 नवीन
ते काय मला ठाऊक नाही विचारुन सांगा काही कळलं तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
म
मृत्युन्जय Fri, 09/19/2014 - 11:19 नवीन
युती तुटली हे वाईटच झाले. आता परत नाकर्ते आणि माजोरडे लोक सत्तेवर येत्तील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 10:51 नवीन
मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 10:51 नवीन
मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 09/19/2014 - 11:28 नवीन
मिपावर आम्ही नेहमीच एक पालूपद लावत असतो. आपली लोकशाही ही एक भंपक प्रक्रिया आहे. आतापर्यंत १२० कोटी लोकांपकी एकानेही आम्हाला " पक्ष" या शब्दाची व्याख्या नेमकी कोणत्या कायद्यात वा कोणत्या घटनेत सांगितलेली आहे हे इसकटून सांगितलेले नाही. लोकांचे मत हे आपल्या निवडणूक प्रक्रियेत फार फसवे आहे. त्याचे नीट प्रतिबिंब ना कायदा बनविताना होते ना सरकार बनविताना. कोण्त्याही विषयावर सार्वमत घेण्याची तर भारतात पद्धतच नाही. ते घेतले तर अल्पसंख्याकांचे राजकारण कसे खेळता येणार अशी अडचण असू शकेल. म्हणून कार्यकर्ता व राजकारणी यांची एक लुटारू जमात आपण १९५० साली जन्माला घातली आहे. पाच वर्षातून फक्त एकदा मत द्यायचे ते ही प्रमाणशीर महत्व नसलेले. यापलिकडे भारतीय जनतेच्या हातात आहे काय ? सत्तेच्या व्यापाराचा हा नंगा नाच वी द पीपल ऑफ इंडियाने सुरू केला आहे आणि त्याचे परिणाम आपणच भोगणार आहोत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 11:28 नवीन
बरे झाले. दोघानाही स्वतःच्या मर्यादांची/ बलस्थानांची जाणीव होइल.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 09/19/2014 - 11:29 नवीन
युती तुटेल असे वाटत नाही..... तुटलीच तर सेनेला जास्त फायदा होऊ शकतो. भाजपाकडे महाराष्ट्रासाठी कोणताही चेहरा नाही. गोपीनाथ मुंडेंची कमतरता तर भासणार...
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 09/19/2014 - 11:44 नवीन
युती तुटली ? ती होणार ....निवडणुकांच्या आधी असो वा नंतर ....महाराष्ट्र कुणा ही एका पक्षाला मिळणार नाही हे धाग्यातला प्रतिसादातुनच दिसतय ...प्रश्न आहे की किंगमेकर कोण होणार :)
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 09/19/2014 - 11:44 नवीन
अजुनही प्रश्नचिन्ह आहे!! पक्की बातमी नाही. पण मोदीलाटेच्या जोरावर मिळालेल्या यशाबद्दल सेनेने कृतज्ञता दाखवायला हवी. कमी जागा आल्या तरी मीच मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा पवित्रा योग्य नाही.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 09/19/2014 - 11:47 नवीन
मान्य पण पण भाजपाकडे तरी कुठे आहे मुख्यमंत्र्यासाठी योग्य उमेदवार ?? तावडे अभ्यासु आहेत ..आणि फडविसांना विदर्भाच्या पलीकडे जग आहे की नाही ते माहीत नाही ..बाकी तर पोर टोरंच आहे ...
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Fri, 09/19/2014 - 11:50 नवीन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/19/2014 - 12:10 नवीन
होऊन जाऊदे एकदा तीनतेरा स्वबळाची ऐशी तैशी (तिकडे दिल्ली आणि इकडे मुंबई )
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/19/2014 - 12:31 नवीन
तोफा डागायला एकेक बुरुज वाढला प्रत्येक पक्षाकडे पण सामान्य माणसाकडे कांदे बटाटे तुरडाळ ठेवायला साधे कपाट नाही तिजोरी कुठून आणणार?
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 09/19/2014 - 12:38 नवीन
मुंबईची ताकद काय ? इंग्रज काळापासून मुंबई बेट आणि आताची मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिला हे रूप द्यायला हजारो उद्यमशील लोकांचा हातभार आहे. हि मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी म्हणून संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनात अनेक लोक हुतात्मा झालेत हि मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहावी ह्यासाठी आणि आपल दिल्लीदरबारी राजकारण अबाधित राहावं म्हणून वसंतराव नाईक , वसंतदादा पाटील ते शरद पवार सर्वांनी हस्ते परहस्ते मदत केलेली आहे हा सगळा इतिहास झाला आता मुंबईच भविष्य काय आहे ? लोकांना वाटतंय कि मुंबईवर भाजपला सत्ता हवीय , पण कोणत्या भाजपला ? फडणवीस ,तावडे, खडसेंच्या भाजपला कि मोदी शहांच्या भाजपला ? मोदींना शहाना मुंबई मुळात नकोच आहे , त्यांना शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत. मित्र पक्ष असला तरी त्याच खच्चीकरण करून आपली ताकत वाढवण हे प्रत्येकच धोरण असतच आणि त्यालाच राजकारण म्हणतात . कालपरवाची मोदींची पावलं त्याच दिशेने पडतात आहेत. चीनचे प्रधानमंत्री दिल्ली मुंबई सोडून आधी अहमदाबादमध्ये येतात , सामंजस्य करार करतात तोही गुजरात सरकारबरोबर ? चीन बरोबर गुजरातच्या प्रधानमंत्र्यांनी जे करार केलेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या योजना गुजरातमध्ये नेल्या जात आहेत ते पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. मुंबईत असणारे गुजराती फक्त पैशाशी बांधील आहेत त्यांना बाकी काही घेण देण नाही मराठी अस्मिता आणि मुंबईशी असणारी भावनिक बांधिलकी ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसाच्या आहेत गुज्जुना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. उद्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही मुंबई शेअर बाजारचा आत्मा पैसा आहे , जर तिकड तितक्याच ताकदीचा शेअर बाजार उभा राहिला तर मग तो हि प्रश्न सुटेल व्यापारी लोकांना काय कुठेही धंदा करायचा आहेच आणि जागतिकीकरणाच्या जमान्यात कुठेही बसून तुम्ही जगात व्यवहार करू शकता आणि एकदा मुंबईच आर्थिक महत्व कमी झाल कि शिवसेनेचं कंबरडे मोडलच म्हणून समजा कारण शिवसेनेच्या राजकारणच आर्थिक स्त्रोत मुंबई आहे हे उघड आहे मग खुशाल शिवसेना मुंबई आमची म्हणून बोंब मारू देत , आर्थिकदृष्ट्या महत्व कमी झालेलं आणि पायाभूत सुविधांवर पडणारा जास्तीचा ताण सहन करताना मरायला टेकलेल हे शहर शिवसेनेच्या ताब्यात असण म्हणजे ओसाड गावची पाटीलकी दिल्यासारखं आहे. एकदा आर्थिक नाड्या आवळल्या कि शिवसेना खच्ची करण अजून सोप होईल तेव्हा मुंबई गुजरातमध्ये जाणार म्हणून आवई उठवण्यात काही अर्थ नाही आणि शहा मोदींना त्यात रसही नाही मराठी माणसाचा विरोध पत्करून हा उद्योग करण्यापेक्षा गुजरातमध्ये प्रतीमुंबई उभी करून आर्थिक राजधानी म्हणून अहमदाबाद किंवा एखाद नाव शहर पुढे आणायला त्यांना जास्त सोप जाईल मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे . श्रेय- आनन्द शितोळे (फेबु वरुन साभार) एक वेगळा मुद्दा. आप आपलि मत ताडुन बघा
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/19/2014 - 12:43 नवीन
छान प्रतिसाद अमोल. मी वरती त्याच आशयाचा प्रतिसाद दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ट
टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 12:49 नवीन
पटतय...कदाचीत वेळ लागेल...पण असे होणे शक्य आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/19/2014 - 16:22 नवीन
प्रतिसादातिल सगळं काही वादासाठी खरं मानलं तरी... मुंबईची अशीच किंबहुना यापेक्षा जास्त प्रगती (कारण मुंबई शतकभर अगोदरपासून व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे) करायला कोणी आपले हात धरले होते/आहेत काय? "मुंबईची ताकद" म्हणून सुरुवात करायची आणि त्याच श्वासात "कोणी मुंबईचा गळा घोटतोय" असे म्हणायचे म्हणजे जरा जास्तच होतेय, नाही का ?! बलवानाने "दुसर्‍या कोणी मला अजून बलवान व्हायला मदत करायला पाहिजे" असे म्हणुन दुसर्‍याचे मिंधे राहण्यापेक्षा आपल्या प्रगतीचे प्रयत्न स्वतः करावे. म्हणजे असे दुसर्‍याच्या नावाने गळे काढायची गरज राहत नाही. निदान गेले काही दशके भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून शेखी मिरवणणार्‍या राज्यातिल नागरिकाच्या तोंडी वरचा सर्वच प्रतिसाद दवणिय (हा शब्द मिपाच्या सौजन्याने :) ) आणि अगतिक वाटतो आहे. एक अभिमानी मराठी माणूस म्हणून मला हे वाचून खरंच अत्यंत शरमेचे वाटले ! महाराष्ट्र आणि मराठी माणूस काही इतका रस्त्यावर पडलेला नाही. जरा बरे सुजाण आणि सत्शिल नेते फार मोठा फरक घडवून आणू शकतील. मात्र ते सुजाणपणे निवडणे मराठी माणसाच्याच हातात आहे. सरळ सरळ इतका कांगावा करण्याने बहुतेक हसेच होते... कारण इतरांना डोळे, कान व बुद्धी असते (हे कांगावा करण्याच्या भरात बहुतेक विसरले जाते :) ) ज्या देशांत "देशांतर्गत चढाओढ" आहे तेच देश इतर देशांशी चढाओढ करून जगात पुढे आलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 09/21/2014 - 05:11 नवीन
बरय की मग. तेवढेच ते यु.पी. बिहारी भैय्ये तिकडे जातील. महराष्ट्रावरचा ताण कमी होईल. आणि एक पुणेकर असुनही मुंबईचं कौतुक करतोय आता. कुणीही कितीही काहीही केलं तरी मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. प्रती मुंबई गुजरातमधे उभी राहु शकेल पण तरीही मुंबई ती मुंबईच. एक म्हणजे मुंबईच्या अर्थकारणाचा आवाका लक्षात घेतला तर मुंबईमधला सेट व्यवसाय सोडुन गुजरातमधे नव्यानी व्यवसाय सुरु करण्याएवढे लोकं मुर्ख नाहीत. फार तर तिकडे शाखा सुरु करतील, तिकडुन कारभार चालवतील. पण आहे ती गुंतवणुक राहाणारच. हा अपप्रचार फक्त आणि फक्त द्वेशापोटी चालु आहे. (न.मो. फॅण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
व
विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 12:53 नवीन
द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही
हे इकडे करायला कोणी थांबवलंय? मुम्बै सोडा साधा सातार्‍यातही एखादा उद्योग उभा करायचा झाला तर तेथले नेते उद्योजकांकडे बर्‍याच मागण्या करतात. इथे असलेले उद्योग दुसर्‍या प्रान्तात जातात त्याबद्दल कोणी जराही वाटून घेत नाही. प्रत्येक गावात एमआयडीसी ओसाड पडलेली दिसते. बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू करायला महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधलेले होते? अहमद नगरची कायनेटीक इंजीनियरिंग , सातार्‍याची महाराष्ट्र स्कूटर्स , हे कारखाने कित्येक वर्षे बंदच आहेत. क्षमता असूनही कोणतेच उत्पादन होत नाही. ही उदाहरणे बोलकी आहेत. कॉम्ग्रेस असो की इतर कोणी. नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. दिल्लीत भाजप मधे महाराष्ट्राचे खासदार आहेत की ते असे प्रयत्न का करीत नाहीत महाराष्ट्रात केवळ शिवसेनाच उद्योग आणते असा भ्रम जोपासला आहे. सेनेने इथे असे कोणते नवे उद्योग आणले यांची कोणी यादी देईल का?
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 09/19/2014 - 13:01 नवीन
+१ विजुभाऊ..! आमच्या सातार्‍यात ओसाड एम.आय.डी.सी. पाहून खरच हळहळ वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/19/2014 - 16:37 नवीन
मुजरे घाला आणखीन म्हंणजे विकास होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Fri, 09/19/2014 - 17:09 नवीन
आम्ही त्यांना फाट्यावर मारतो.. तरीही मुजरे घालणारे भरपूर आहेत आणि आमच्या नशीबी जी शिवाजी महाराजांच्या नावे (त्यांच्या नावाला न शोभणारी) राजेशाही आलेली आहे त्याला काहीही उपाय नाही म्हणून जास्तच हळहळ, बाकी काही नाही. तुम्ही परत तुमच्या वळणावर आलेले पाहून आनंद वाटला.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड Fri, 09/19/2014 - 13:13 नवीन
मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही. हे लोक मजूर म्हणून सुद्धा काम करू शकत नाहीत. जिथे तिथे जातीयवादी आणि कंपूबाज गोष्टी करत असत्तात. जास्तीत जास्त हे लोक चहाची टपरी, वडापावची गाडी, लोकांना अडवणारे रिक्षावाले असली कामं करत फिरतात. आणि मग हा कसा बाहेरचा आहे, तो कसा भटजी-शेटजी पैकी आहे, तो कसा महाराष्ट्राला विकायला चाललाय आणि माझा जातिय्वादीपणा कसा चांगला आहे असल्या चर्चा करत बसतात. एक गंमत सांगतो. ईंटरव्ह्यू घेताना मुसलमान सुद्धा मराठी लोकांपेक्षा चांगली चमक दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ह
हाडक्या Fri, 09/19/2014 - 13:23 नवीन
धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा प्रयत्न आणि मराठी लोकांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचं जनरलायजेशन पाहून अंमळ गम्मत वाटली.. नक्की तुम्ही मराठी आहात का ? असल्यास आणि नसल्यास या तुम्हीच दर्शवलेल्या स्थितीपेक्षा वेगळे काही घडावे यासाठी आपला छोटासा का होईना पण प्रयत्न जाणून घ्यायची इच्छा आहे. अन्यथा मराठी माणूस नुसता तोंडाची हवा दवडण्यात कुठेही कमी पडत नाही असेही म्हणू शकाल मग तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा