Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

प
पगला गजोधर
Fri, 09/19/2014 - 09:17
🗣 186 प्रतिसाद
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे." आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? * सर्व पक्ष अपने दमपे * (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) *(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) * किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

प्रतिक्रिया द्या
35254 वाचन

💬 प्रतिसाद (186)
क
काळा पहाड Fri, 09/19/2014 - 13:38 नवीन
१. मी मराठीतच लिहितोय नाही का? पण मी पर्फॉर्मन्स ला प्राधान्य देतो आणि तिथं मराठी लोक बरेच कमी पडतात. मी गुप्ता बरोबर काम करतोय की पटेल बरोबर की सुब्रमण्यम बरोबर यात मला फरक पडत नाही. पण मराठी लोक कंपूबाजी करून काम न करण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. अर्थात हा महाराष्ट्रातला अनुभव आहे. तामिळ्नाडू मधे कदाचित तामिळ लोक्स ही तसंच करू शकत असावेत पण त्याच्याशी माझा संबंध नाही. २. मला या गोष्टीत कसलाही प्रयत्न करावा अशी माझी इच्छा नाही कारण त्यात माझा वेळ फुकट जातो. मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
प
पिंपातला उंदीर Fri, 09/19/2014 - 13:41 नवीन
मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय नका हो एवढा त्रास घेऊ . महाराष्ट्र / मराठी माणस दबून जातील उपकाराच्या 'पहाड ' खाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Fri, 09/19/2014 - 14:01 नवीन
दबणे, उपकार, त्रास घेणे, मोडेन पण वाकणार नाही, अस्मिता, सहन करणार नाही, रक्त उसळणे, प्रेमात 'पडणे'.. मराठी माणसांची शब्दावली टिपीकल असते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Fri, 09/19/2014 - 14:07 नवीन
युती तुटलेली परवडली पण यांचे 'typical ' प्रतिसाद आवर असे म्हण्याची वेळ आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
फ
फुंटी Tue, 09/23/2014 - 12:25 नवीन
खिक :-);-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
स
सुहास.. Fri, 09/19/2014 - 13:34 नवीन
+१ टु विजुभाउ ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 07:11 नवीन
नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. सहमत. मराठी माणसाची निष्क्रियता, शेरेबाजी आणि आळस माझ्या सारख्या लहानातलहान व्यावसायिकालाही जाणवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 08:23 नवीन
पुण्याच्या आसपास च्या उद्योग वसाहतीत कॉ आणि रा़काँ च्या लोकांची खंडणीखोरी इतकी वाढली आहे की छोट्या उद्योजकाला धंदा करणे शक्यच नाही. मोठे उद्योजक थेट वरच पैसे पुरवतात आणि निभावुन नेतात, छोटे आणि मध्यम उद्योजक पार मेले आहेत ह्या गुंडगीरीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिंपातला उंदीर Fri, 09/19/2014 - 13:03 नवीन
@विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाशी सहमत . . वरचा मी दिलेला प्रतिसाद हा एक नवीन perception म्हणून फेबु वरून शेयर केला . पण त्या प्रतिसादातल्या bottomline शी मात्र मी सहमत आहे . मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे आमच परभणी शिवसेनेचा औरंगाबाद आणि मुंबई पेक्षा मोठा बालेकिल्ला . वर्षानु वर्ष सेनेचे आमदार आणि खासदार इथून सतत निवडून जात आहेत . पण शहराला ओरबाडून खाण्याशिवाय आणि लोकांना भडकावून दंगे करण्याशिवाय त्यांनी काहीही केल नाही . परभणी पुरत (आणि महाराष्टात अशी अनेक शहर आहेत ) बोलायचं झाल तर सेना निवडून नाही आली तर परभणी साठी चांगलाच होईल . Fingers crossed
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 09/19/2014 - 13:26 नवीन
पन मुंबईच्या श्रीमंतीचा मराठी माणसाला काय उपयोग झाला ? मराठी माणूस कष्टकरी तो कष्ट्करीच राहीला, पूर्वीही म्हणजे शिवसेनेच्या बहारीच्या काळात आणि त्यापूर्वी ही मुंबईवर अर्थिक वर्चस्व पारसी - गुजराती लोकांचेच होते आणि आहे. दक्षिण मुंबई परिसरात पूर्वी ही आणि आता किती मराठी माणसे आहेत ? दादर - गिरगावातील मराठी माणूस केव्हाच उपनगरात चालता झाला. गिरण्यांबरोबर मुंबईतला मराठी टक्का ही घसरला. मग आज ज्या स्वरुपात मुंबई आहे , ती नेमकी कुणाची आहे ? की मराठी राज्यकर्ते असले म्हणजे मुंबई मराठी होते ? आणि या मराठी राज्यकर्त्यांनी मुंबईचे मराठीपण ... मराठीपण जाऊ द्या , मुंबईपण टिकावे म्हणून काय केले? तुम्ही म्हणता तशी , मोदी - शहा अशी गुजराती जोड-गोळी काम करत असेल तर ती गुजरातच्या उत्कर्षासाठी करते आहे मुंबईच्या खच्चीकरणासाठी नाही . मुंबईचे शांघाय करण्यापासून मराठी राज्यकर्त्यांचे हात कोणी बांधले होते? दोन्हीकडे तर कॉन्ग्रेसचीच सत्ता होती. दुसर्‍याची पुसण्यापेक्षा , तुम्ही तुमची रेष मोठी ओढा ना ! आणि व्यक्तिश: मला आता गुजरात मध्ये मोदिना काही इन्ट्रेस्ट असेल असे वाटत नाही. तसे असते तर त्यांनी बडोड्याची जागा सोडून दिली नसती. ते आता वरच्या पातळीवर आहेत. चीन चे करार अहमदाबाद मध्ये झाले असतील तर त्यांचा गुजरात हा कंफर्ट झोन आहे इत्काच अर्थ आहे. मोदी काय आणि शहा काय , दोघे ही आता राष्ट्रिय पातळीवरचे नेते आहेत. युती बाबत - बाळासाहेब काय आणि प्रमोद महाजन काय ( विथ ड्यु रिस्पेक्ट टू बोथ ) , पक्के सत्तापिपासू होते आणि सत्तेसाठी वाट्टेल ते .. करायला तयार होते अश्यातून या कृत्रिम युतीचा जन्म झाला. या शिवसेनेच्या हट्टापायी नारायण राणे सारख्या नामचीन गुण्डाला मुख्यमंत्री मह्णून स्वीकारावे लागले ! दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत / होते. कितीदिवस मारुन - मुटकुन एकत्र राहणार ? अपयशाचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्यापलिकडे तसेही युतीत फार सख्य राहीले नव्हते. बाळासाहेब - उद्धव - आदित्य ही वारसदारी भाजपच्या लोकांनी पसंद पडणारी नव्हतीच. मोदी- शहांनी ७५ वर्षावरील आप्ल्याच नेत्यांना घरी बसविले , ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल ) शिवाय भाजपच्या मातृसंघटनेला शिवसेनेचे अजिबात प्रेम नव्हते / नाही. संघाची ताकद हवी असेल तर शिवसेनेला बाजूला सारायला हवे हा धोरणीपणा मोदी - शहा आणि तावडे - फडणवीस यांच्याकडे आहे. प्रमोद महाजन ष्टाईल, सेना-राष्ट्रवादी संस्कृतीने राजकारण करण्याकडे आता भाजपचा कल नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 09/19/2014 - 13:58 नवीन
ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल
प्रतिसादाशी सहमत. मुंबईची वाट लावण्याचे संपूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. निव्वळ राडासंस्कृती आणि भावनिक ब्लॅकमेलिंग या आधारावर इतकी वर्षे हा पक्ष टिकून आहे. पुढेही टिकेल. मात्र महाराष्ट्रापुरत्या भाजपामध्ये घराणेशाहीचा एखादा अपवाद नसून रक्षा खडसे, पूनम महाजन, पंकजा मुंडे, असे किमान तीन अपवाद माहिती आहेत. मागील निवडणुकीत हीना गावित हाही एक नवा अपवाद त्यांनी अंतर्भूत केला आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ह
हाडक्या Fri, 09/19/2014 - 15:13 नवीन
तो अख्खा पक्षच अपवाद आहे हो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 15:48 नवीन
हाडक्या काका एकदम बरोबर. तो पक्ष म्हणजे "पार्टी विथ डिफरन्स" आणि स्वयंसेवकांचा पक्ष आहे. ज्या सेनेचा घराणेशाहीला कडाडून विरोध होता त्या सेनेची सुरवातच घराणेशाहीतुन झाली आहे. प्रबोधनकार नसते तर सेनेला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. काँग्रेसला वरवर विरोध करताना मुम्बैतील कामगार चळवळ कोणी सम्पवली ते सगळेच जाणतात. उगाच नव्हे सेनेला त्यावेळेस "वसंतसेना" म्हणायचे. सेनेने इंदिरा गांधीना विरोध करतानाच आणिबाणीत काय वर्तन केले होते तो इतिहास काही पुसला गेलेला नाहिय्ये. राजीवगाम्धीना घराणेशाही मुळे नावे ठेवताना सेनेने अगोदर मुलगा आणि नंतर नातू असा प्रवास चालू ठेवलाय. वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते. सेनाप्रमुखाना त्यानी नम्तर स्पष्टीकरण दिले होते. त्या खासदारावर सेनेकडून कोणतीच कारवाई झाली नाही. एन्रॉन समुद्रात बुडवायची गर्जना रीबेका मार्कंच्या भेटीनंतर कुठे आणि कशी बुडाली हे जनतेच्या विस्मरणात गेले असेल. पण त्यातले व्यवहार सर्वसामान्यानाही ओळखता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
श
श्रीरंग_जोशी Fri, 09/19/2014 - 16:31 नवीन
वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते.
स्व. नरसिहरावांचे सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात असताना सेनेचे तत्कालीन खासदार मोहन रावले अनुपस्थित राहीले होते हे वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
द
दुश्यन्त Fri, 09/19/2014 - 19:48 नवीन
बरोबर माहिती देत येत नसेल तर किमान चुकीची माहिती पसरवू नका. मोहन रावले हे नरसिम्हा राव सरकारच्या अविश्वासमता वेळी गैरहजर होते. वाजपेयी सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच साथ दिली होती. वाजपेयी समता - ममता-जयललिता वगैरे मुले बेजार झाले होते तेव्हा आपल्या कोट्यातील मंत्रिपद कमी करून यांना द्या असे बाळासाहेबांनी वाजपेयींना सांगितले होते. १९९९ ला एक मताने सरकार पडले कारण ऐनवेळी जयललिता पलटल्या. शिवसेना आणि अकाली दल या दोघांनीच केंद्रात कायम भाजपला साथ दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पोटे Fri, 09/19/2014 - 13:35 नवीन
ती पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक बेडुक इतर बेडकाना संपवायला साप आणतो. शिवसेनेने साप आणला. आता साप त्यानाच खातोय
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 09/19/2014 - 13:40 नवीन
१ महिन्यापूर्वी वाचलेला हा लेख आठवला. http://www.loksatta.com/sampadkiya-news/transits-to-modi-shah-era-may-crush-nda-761587/?nopagi=1
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 14:02 नवीन
मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आणि राष्ट्रवादी जर एकत्र आले (छुप्या वा उघड) रीतीने, तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा भा ज प आणि मनसे जर उघड रीतीने एकत्र आले, (सोबत राष्ट्रवादी छुप्या रीतीने), तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा शिवसेना व कॉंग्रेस (छुप्या रीतीने) एकत्र आले, तर राजकीय समीकरण काय असेल ?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 09/19/2014 - 14:12 नवीन
भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र आले (म्हणजे राकॉला सत्तेत स्थान मिळाणार असेल तर) तर मी एकवेळ आयसिसला मत देइन पण या दोघांपैकी एकाला देणार नाही. असला भडभुंजेपणा भाजपा करणार असेल तर मी आजन्म काँग्रेस बरोबर जाइन. भाजपा आणि मनसेने युती केली तर भाजपा मनातुन उतरेल पण तरीही त्यालाच मत देइन. भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. शिवसेनेने काहिही केल्यास मला फरक पडत नाही पण त्यांनी राष्ट्रवादीशी युती केल्यास त्यांच्यासारखे मुर्ख तेच असतील. असो. १३० जागांवर समाधान मानुन भाजपा युती पुढे चालु ठेविल याबाबत सध्या तरी शंका नाही आहे. थोड्या वेळापुर्वी ही बातमी खरी वाटली होती. पण आत्ता त्यात दम नाही. भाजपाला सेनेबरोबरची युती तोडणे महागात पडेल कारण अजुन राज्यसभेत ते संख्याबळात कमी आहेत. सद्यपरिस्थितीत किमान जॉईंट सेशनमध्ये तरी त्यांना आघाडी आहे. सेना बाहेर पडल्यास ते ही अवघडच जाइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/19/2014 - 14:30 नवीन
तर मी एकवेळ आयसिसला मत देइन >>>> =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 14:31 नवीन
आयसिसचा दुसराही अजून एक लाँगफॉर्म आहे बरंका प्रगो ;) http://en.wikipedia.org/wiki/Institute_for_the_Secularisation_of_Islamic_Society
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/19/2014 - 15:37 नवीन
अगं बाब्बो .... हे आयसिस तर मुळ आयसीस पेक्ष्क्षा ब्येक्कार आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/19/2014 - 16:32 नवीन
भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. आवडलं... फक्त जराशी कंजूशी झालीय... "१०००००००१ वेळा" असं लिहायला पाहिजे होतं, जास्त भारी वाटलं असतं. या निवडणूकीपुरते तरी तुम्ही सुरक्षित आहात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अक्षरमित्र Fri, 09/19/2014 - 14:18 नवीन
काही झाले तरी पुढील सीएम शिवसेनेचा असेल.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 09/19/2014 - 15:53 नवीन
कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ दे, मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 16:06 नवीन
मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.
हो ना. केंद्रात पंतप्रधान ठरवायच्या अगोदर सुद्धा अश्शीच गोग्गोड चर्चा चालू होती. काय झाले हे सर्वाना ज्ञातच आहे. भिगवण चौकाच्या वार्डात कोणता उमेदवार उभा करायचे ठरवायचे कोणी याची देखील अश्शीच चर्चा होईल काही दिवसानी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/19/2014 - 16:12 नवीन
इतका काँन्फीडन्स बरा नव्हे ,पोट निवडुकात काय झाले ठाऊक आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 17:37 नवीन
>>> इतका काँन्फीडन्स बरा नव्हे ,पोट निवडुकात काय झाले ठाऊक आहे ना? पोटनिवडणुकांच्या निकालाविषयी देशात प्रथमच इतकी गंभीर चर्चा सुरू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. १९४७ नंतरच्या कोणत्याही पोटनिवडणुकीच्या निकालाची इतकी चर्चा झाली नसेल किंवा त्या निकालाच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठला नसेल. असो. जरा सविस्तर निकाल पाहू. मे २०१४ नंतर १०-१२ राज्यांमधील एकूण ४७-४८ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक झाली. ३ लोकसभा मतदारसंघामध्ये पण पोटनिवडणुक झाली. काही राज्यात फक्त १-२ मतदारसंघात पोटनिवडणुक झाली तर ३ राज्यात ९-११ जागांवर पोटनिवडणुक झाली. त्यात म.प्र.मध्ये भाजपने ३ पैकी २ व काँग्रेसने १ जागा जिंकली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने २ व भाजपने १ जिंकली. पंजाबमध्ये काँग्रेस १ आणि अकाली द्ल १, उत्तराखंडमध्ये काँग्रेस ३, प. बंगालमध्ये तृणमूल १, भाजप १ , आसाममध्ये काँग्रेस, भाजप व तिसरा पक्ष प्रत्येकी १, उ.प्र.मध्ये सप ८/भाजप ३, गुजरातमध्ये भाजप ६/काँग्रेस ३, बिहारमध्ये भाजप ४/राजद्+संजद्+काँग्रेस ६ अशी साधारण परिस्थिती होती. या निकालांवरून मोदी लाट ओसरली, मोदींविषयी जनतेचा भ्रमनिरास झाला, जनतेने मोदींना धडा शिकविला, काँग्रेस परत येत आहे, भाजप बॅकफूटवर, इ. मांडे खाणे सुरू झाले. लोकसभेच्या ३ जागांवर जैसे थे स्थिती राहिली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर मे २०१४ प्रमाणेच मतदान झाले हे दिसून आले. जर मोदी लाट ओसरली असती तर भाजपला बडोद्याची जागा का मिळाली असती? तसेच काँग्रेसला तेलंगणातील जागा का मिळाली नाही? गंमत म्हणजे काँग्रेसने दिल्लीसकट अनेक शहरांमध्ये पोटनिवडणुकीतील निकालांचा विजयोत्सव साजरा केला. पोटनिवडणुकीत मिळालेल्या २-४ जागांचा देशभर जल्लोष करावा इतकी वाईट वेळ कॉंग्रेसवर आली आहे. बिहार विधानसभेत मे २०१४ मध्ये एकमेकांविरूद्ध लढलेल्या राजद, संजद व काँग्रेसने एकत्र निवडणुक लढल्याने भाजपविरोधातील मतविभागणी टळल्याने त्यांना १० पैकी ६ जागा मिळाल्या हे उघड आहे. या परिस्थितीतसुद्धा भाजपला ४ जागा मिळाल्या. सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे व मतविभागणी टाळणे हा मोदींविरूद्ध कौल कसा होऊ शकतो? डिसेंबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हे संधीसाधू पक्ष एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण एकूण २४३ पैकी राजद व जदयु काँग्रेसबरोबर युती करून प्रत्येकी फक्त १०० च्या आसपास जागा लढविणे व काँग्रेसला ४३ जागा सोडणे अशक्य आहे. दोन्ही पक्ष किमान १५० जागांचा आग्रह धरतील. त्यामुळे ही संधीसाधू युती फक्त या पोटनिवडणुकीसाठी होती. या निकालांचा व मोदींच्या कारभाराचा काहीही संबंध नाही. उ.प्र.मध्ये सप ने ११ पैकी ८ जागा जिंकल्या. काँग्रेसला भोपळा मिळाला. पण काँग्रेसवालेच जास्त उड्या मारताहेत. प्रत्यक्षात बसप आणि सप यांच्या छुपा समझोता होऊन बसपने आपले उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे बसपला मिळणारी सर्व मुस्लिम मते व काही दलित मते सप कडे गेली व त्यातूनच सप ला ८ जागा मिळाल्या. मोदी कारभाराचा व या विजयाचा काहीही संबंध नाही. २०१७ मध्ये उ.प्र. च्या विधानसभा निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व जागा लढवेल व त्यामुळे या पोटनिवडणुकींच्या निकालाची पुनरावृत्ती होणार नाही. गुजरातमध्ये ९ पैकी ३ जागा गमाविल्या तरी ६ जिंकल्या आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली या विधानात तथ्य नाही. इतर राज्यात १-२ जागाच असल्याने निवडणुक फक्त स्थानिक प्रश्नावरच लढली गेली. तिथेही मोदी लाटेचा काहीही संबंध नाही. एकंदरीत काही राज्यातील २-४ पोटनिवडणुकीच्या निकालावरून मोदींच्या जेमतेम १०० दिवसांच्या राजवटीविषयी भाकीत करणे हा मूर्खपणाचा कळस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/19/2014 - 20:24 नवीन
गुजरातमध्ये ९ पैकी ३, राजस्थानात ४ पैकी ३ जागा काँग्रेसला मिळाल्यात, यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते.युपीत ७२ लोकसभा सीट जिंकणारे बीजेपी १०० दिवसात ११ विधानसभेपैकी फक्त २ जागा जिंकतात, यावरुन मोदी लाट संपुष्टात येत आहे हे स्पस्ट आहे. बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 09:37 नवीन
>>> यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते. हो का? उ.प्र. मधील विधानसभेच्या ११ जागांपैकी किती जागा काँग्रेसला मिळाल्या हो? आणि लोकसभेच्या ३ जागांवरील पोटनिवडणुकांमध्ये किती जागा काँग्रेसने पटकावल्या? काँग्रेस होतेय असा तुमचा भ्रम झालाय म्हणून विचारतोय. >>> बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे. मुळात तो व्होटर बेस मे २०१४ मध्ये भाजपाकडे नव्हताच. त्यामुळे तो भाजपा ऐवजी सपाकडे वळला हे विधान असत्य आहे. सपा ला स्वतःची व बसपची अशी दुप्पट मते मिळाल्याने पोटनिवडणुकीत ८ जागा मिळाल्या हे लक्षात घ्या. त्याचबरोबर हेही लक्षात घ्या २०१७ मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व ४०३ जागा लढवेल व त्यावेळी पुन्हा एकदा ही मते सप कडून बसप कडे येतील व भाजपविरोधी मतांचे पुन्हा एकदा विभाजन होईल. त्यामुळे मोदी लाट ओसरली, काँग्रेस रिव्हाईव्ह होतेय अशा गैरसमजूतीतून दूर व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Sat, 09/20/2014 - 10:23 नवीन
बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मे मध्ये ती मते भाजपकडे गेली नाहीत हा दावा आपण कोणत्या आकडेवारीतून करत आहात? जरी मान्य केले तरी १०० दिवसाच्या प्रचंड यशस्वी मोदीसरकारचा तिथल्या सपा बसपाच्या वोटरवर काहीच परिणाम झाला नाही का ? याचे दोनच अर्थ आहेत, पोटनिवडणुकित मत देणारे एक दोन कोटी मतदार मुर्ख आहेत किंवा मोदी लोकांना विकासाच्या नावाखाली फसवत आहेत व लोकांच्या लक्षात ही फसवणुक आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 17:31 नवीन
>>> बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मुळात बसपचे (आणि सप चे सुद्धा) मतदार विकास, सुशासन, योग्य प्रशासन या मुद्द्यांवर मतदान करतच नाहीत. जात आणि धर्म यांवरच ते मतदान करतात. त्यामुळे मोदी विकासपुरूष असले किंवा नसले, मोदींनी महागाई कमी केली का नाही या मुद्द्यांवर मतदान न करता ते आपल्या जात/धर्म विचारांवर आधारीत जो पक्ष योग्य वाटतो त्यालाच मतदान करतात. बसपच्या अनुपस्थितीत त्यांना सप आपलासा वाटला यात काहीच नवल नाही. मे २०१४ मध्ये त्यांची मते बसप आणि सप या दोघात विभागली गेली होती. बसपच्या अनुपस्थितीत ती सप कडे गेली आणि म्हणून सप ला जास्त जागा मिळाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Sun, 09/21/2014 - 05:42 नवीन
बसपाचे मतदार जात बघून मतदान करतात याची काही आकडेवारी द्याल का? बसपाची एकही लोकसभा सीट लागली नाही याचा अर्थ सपा बसपा यांचा वोटर मोदींकडे वळला होता, परंतु १०० दिवसाच्या गुजरातधार्जिण्या मोदींचा कारभार बघुन पुन्हा माहेरी परतला,हे पोटनिवडणुकीत स्पष्ट होते. राज्यातही काँ राकाँच्या पारंपारिक मतदाराने भाजपला वोट दिले, परंतु आता त्यांनाही मोदीच्या फक्त तोंडाच्या वाफा दवडण्याच्या सवयीचा साक्षात्कार झाल्याने राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नानासाहेब नेफळे Sat, 09/20/2014 - 10:30 नवीन
युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो .देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 17:45 नवीन
>>> युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो . या निवडणुका रा़ज्यात झाल्या. केंद्रात नव्हे. त्यामुळे मोदींचा इथे संबंधच नाही. मोदी तिकडे प्रचाराला फिरकले पण नव्हते. लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सर्व पक्षांनी आपापल्या जागा राखलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मे २०१४ मध्ये जो कल होता तोच आज कायम आहे. प. बंगालमध्ये २ पैकी १ जागा भाजपने मिळविली. तुमच्या विचित्र तर्कशास्त्रानुसार याचा अर्थ तिथे मोदींची लाट आली आहे असा घ्यावा लागेल. >>> देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. शिवसेना नेते काय बडबडतात यावर तुम्हीच विश्वास ठेवा. बर. खालीच बातमी वाचा आणि मोदी लाट परत आल्याचे कबूल करा. छत्तीसगड >>> ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही . कशावरून? सध्या मे २०१४ सारखीच जैसे थे परिस्थिती आहे. कोणाचेही रिव्हाईव्हल होत नाहीय्ये आणि कोणीही डीप्राईव्ह होत नाहीय्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड Fri, 09/19/2014 - 17:12 नवीन
अपमान करू नका हो. "शरदचंद्ररावसाहेबजी पवार".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
क
कानडाऊ योगेशु Sat, 09/20/2014 - 06:44 नवीन
आमचे प्रेरणास्थान आणि माननीय हे विसरलात हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
फ
फुंटी Tue, 09/23/2014 - 12:28 नवीन
खडसे म्हणाले काल...युती तुटण्यामागे पवारांचा डाव आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/19/2014 - 18:06 नवीन
रोचक चर्चा ! @ नानासाहेब नेफळे : धाग्याचा ट्यार्पी वाढवायचा सद्या काय रेट आहे ?! ;) (प्रामाणिकपणे केलेली विचारणा जमल्यास हघ्या :) )
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 09/19/2014 - 18:22 नवीन
एक्का साहेब.. तुमचे धागे असे पण पापुलर असतेत.. कशाला नानासाहेबांना सुपारी देताय.. तुमच्या धाग्यांवर आले म्हन्जे २००-३०० शिवाय थांबायचे नाहीत ते. बादवे, असे पण ते फक्त राजकारणाच्या धाग्यांचे स्पेशालिष्ट आहेत.. तुमी तसला धागा काडला म्हनजे त्यांना 'विसरु' नका म्हणजे झालं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आनन्दा Fri, 09/19/2014 - 21:26 नवीन
नानासाहेब की जय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ल
लोटीया_पठाण Sat, 09/20/2014 - 15:53 नवीन
मी तरी भाजपालाच मत देईन. हे काँग्रेसी दर दोन वाक्यांमागे पुरोगामी महाराष्ट्राची टेप लावण्या पलीकडे काहीही करत नाहीत. सेना नेतृत्व अन इतर रडत राऊत यांच्याकडून काहीही होप्स नाहीत, यांच्या हातात सत्तासूत्रे गेली तर महाराष्ट्राची मुंबई महानगर पालिका करून टाकतील. * नेव्हिल maxwell / ब्रूक्स हेंडरसन अहवालावरून भाजपा ने केलेलं घुमजाव मात्र पटलं नाही. कॉंग्रेसवर बरेच आरोप केले अन जेव्हा वेळ आली तेव्हा काँग्रेसी कारणेच पुढे केली.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2014 - 02:17 नवीन
खरंच युती मोडली का उगाच चर्चा सुरू आहेत? मटात ही बातमी दिसत्ये - जागांवरून बाणराव टेचात, कमळाबाई पेचात! आणि एक - मराठी मुस्लिमही असतात आणि ते मराठीच असतात. मराठी म्हणजे बाय डीफॉल्ट मुस्लिमेतर नव्हेत.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 09/21/2014 - 10:59 नवीन
बघा जमतंय का ते...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/23/2014 - 06:58 नवीन
मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही.
"महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते.चेन्नई,हैद्राबादचे ह्यांचे एक दिवंगत मित्रही 'मराठी माणसे गटबाजी करतात्' ह्या मताचे होते.काही प्रमाणात तामिळ लोकही हा प्रकार करतात पण राज्याबाहेर 'आपण व आपले काम' हेच धोरण असते.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 09/23/2014 - 07:03 नवीन
>> पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." ज्याअर्थी तुम्ही मिपावर आहात त्याअर्थी तुमचं हे सारं झालंय असं गृहीत धरायला हरकत नसावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Tue, 09/23/2014 - 09:20 नवीन
>>> "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते. याच धर्तीवर - "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भरमसाठ डू आय काढण्याच्या भानगडीत पडू नका." असे म्हणता येईल. हो की नाही हो नानासाहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 09:45 नवीन
मला काय विचारताय! ते माईसाहेबच सांगतील, कारण तो त्यांचा प्रतिसाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 09/23/2014 - 17:16 नवीन
तुम्ही आणि माईसाहेब काही वेगळे आहात का? तुम्ही 'दो बदन एक जान' असे २-इन-१ आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 17:28 नवीन
@संपादक मंडळ,माईसाहेब ह्या मिपाच्या एक सन्मानिय स्त्री सदस्या आहेत ,त्यांच्याशी माझे नाव वारंवार जोडून माझे व त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न अनेकदा श्रीगुरुजी या आयडीने केला आहे. कृपया आपण त्यांना योग्य ती समज द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा