Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स

क
काळा पहाड
Sun, 09/21/2014 - 21:36
🗣 85 प्रतिसाद
या गोष्टीवर कदाचित भरपूर वेळा विनोदाच्या अंगानं लिहिलं गेलंय. प्रत्यक्षात डावीकडे सिग्नल देवून उजवीकडे वळणार्‍या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. पण नुकत्याच घडलेल्या दोन प्रसंगांनी मला याबाबत गंभीर विचार करायला प्रवृत्त केलंय. दुसरा प्रसंग अति-गंभीर असून सुद्धा अपरिचित रहाण्याच्या मर्यादेमुळे तो न सांगता मी एक छोटा प्रसंग सांगतो. स्थळः चतु:शृंगी चौक, विद्यापीठाजवळ, पुण्यनगरी. उजवीकडे वळणारा रोड. त्याला डावीकडे फुटलेला छोटा फाटा. मी डावीकडच्या लेन मध्ये. माझ्या कारपाठून लगटून डावीकडून येणारी एक फडकंधारी मुलगी. मी कारचा डावीकडचा सिग्नल अंदाजे १० सेकंद दिला आणि १० च्या स्पीडने वळलो. माझ्या डावीकडून येणारी मुलगी रोडच्या नॉर्मल फ्लो ला म्हणजे उजवीकडे वळली आणि माझ्या कारवर आपटली. लोक जमा झाले. मला कारमधून काय झालंय दिसत नव्हतं. बहुधा लोक तिला उठवायला मदत करत होते. तिला मुळीच लागलं नसावं. कारण ती अर्ध्या मिनिटातच निघून गेली. तत्पूर्वी एक अनाहूत मला 'सॉरी म्हणा आणि मिटवून टाका' म्हणून सल्ला देवून निघून गेला. मी नि:श्वास सोडला. माझ्या गाडीला त्या मुलीच्या स्कूटरमुळे पडलेला एक मोठा स्क्रॅच. जर त्या मुलीला काहीतरी झालं असतं तर मलाच लोकांनी वाईट ठरवलं असतं. अर्थात असे प्रसंग बरेच आणि रोजचे पण छोटे. मी बर्‍याचदा मोटरसायकल वापरत असल्यामुळे आपल्याला अचानक वळणार्‍या महिलेचा अंदाज येवून तो धोका टाळणं सोपं जातं जे कार मध्ये बहुधा शक्य नसावं. बर्‍याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत. सध्या तर पुढे एखादी महिला स्कूटरवरून जात असेल तर मी शक्य असेल तर मोटरसायकल चा वेग कमी करतो आणि मधलं अंतर वाढवतो किंवा मग तिला ओव्हर्टेक करून पुढे जातो. माझा कमीत कमी एक मित्र तरी असंच करतो हे त्यानंच मला सांगितलेलं आहे. पुढे एखादी महिला स्कूटर चालवत असेल तर माझे कानाचे आणि डोळ्याचे सेन्सेस कुठल्याही क्षणी ब्रेक दाबण्यासाठी ज्यादा तयार असतात (heightened senses). माझं असं निरिक्षण आहे, की अन-इंटेंशनली पुरूष सर्वसाधारणपणे सुरक्षित गाडी चालवतात आणि त्यांना आपण काय करतोय याचं भान असतं (जे अर्थात इंटेंशनली बेजबाबदारपणे चालवतात त्यांना वगळावंच लागेल) पण अन-इंटेंशनली महिला गाडी चालवताना गोंधळलेल्या असतात आणि त्यांच्यामुळे इतरांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे निरिक्षण कितपत बरोबर आहे?

प्रतिक्रिया द्या
15728 वाचन

💬 प्रतिसाद (85)
न
नानासाहेब नेफळे Sun, 09/21/2014 - 22:18 नवीन
शंभर टक्के बरोबर आहे .मनुष्याच्या उत्क्रांतीच्या काळात तो टोळीने राहयचा, शिकार करणे ,अन्न शोधणे, प्रतिस्पर्धी टोळीशी झगडा इत्यादी कामे बरेचदा पुरुष करायचे, साहजिक या कामांसाठी लागणारी नजर, चपळता, झटपट निर्णय घेण्याची क्षमता ,दणकट शरीर अंगे उत्क्रांतीत पुरुशांमध्ये विकसीत झाली वा एनहान्स झाली. या उलट स्त्रीयांची कामे बरीच पॅसिव्ह असायची ,मुल जन्माला घालणे, पालनपोषण ,अन्न शिजवणे वगैरे. त्यामुळे या क्षमता त्यांच्यात कमी विकसीत झाल्या आहेत, त्याच बरोबर पुरषांच्या तुलनेत त्यांची बुद्धीमत्ताही कमी असते. http://www.dailymail.co.uk/debate/article-1274952/Men-ARE-brainy-women-says-scientist-Professor-Richard-Lynn.html
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 04:59 नवीन
नाने आगे बढो...तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
स
सस्नेह Mon, 09/22/2014 - 18:04 नवीन
आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी Mon, 09/22/2014 - 18:21 नवीन
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय >> आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला >> आँ? तुम्हीच होय पाशवी शक्ती? मी कालच्यान शोधतोय.. कोण बरं ती? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 09/22/2014 - 18:41 नवीन
दगडं ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
स्रुजा Mon, 09/22/2014 - 19:35 नवीन
+ १००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 23:46 नवीन
घरात, बाहेर, कार्यालयात भरपूर जाणवणारा स्त्रियांचा मल्टीटास्क स्वभाव नेमका व्हील मागे बसल्यावर अचानक लुप्त होतो. घरात प्रत्येकाच्या गरजांकडे बारकाईने लक्ष्य देणारी स्त्री रस्त्यावरच्या मोठ्या गाड्यांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही हे एक कोडेच आहे. माझ्या मते "गाडी चालवणे हा पुरुषांचा प्रांत आहे, त्यासाठी खूप वेगळे कौशल्य लागते" अश्या पुळचट कल्पनांचा पगडा वर्षानुवर्षे बायकांच्या डोक्यावर बसवला जात आहे. गाडी जोरात चालवणे, ष्टयील मारणे, धोकादायक पद्धतीने चालवून उगाच इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे ह्यामुळे एकूणच गाडी चालवणे हे पुरुषी काम आहे असा महिलांना न्यूनगंड होत असावा. त्यामुळे आपले बाइपन जपताना पुरुषांच्या प्रांतात घुस्खोती करताना तिची एकूणच भंबेरी उडत असेल. माझ्या निरीक्षणानुसार गाडी चालवणे स्त्रियांना अजिबात आवडत नाही असे मला आढळून आले आहे, त्या फक्त गैरसोय टाळावी, वेळ वाचवा, मजबुरी म्हणून गाड्या चालवतात. पुरुषांसारखी मस्ती त्यात नसते. मुळात गाडी हाकणे, प्रवासाची दिशा ठरवणे, नवे प्रांत आणि खाण्यापिण्याच्या सोयी शोधणे हि सर्व कामे पुरुषांची होती, त्यात आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि. त्यामुळे खरेच एकतर स्त्रियांच्या मनातून न्यूनगंड काढून त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. आपसूकच सह्प्रवाश्यांबरोबर अनामिक आणि अघोषित सौम्य अशी जी स्पर्धा रस्त्यावर चालू असते त्याचा त्या एक भाग होऊन वाहतूक सुरळीत होईल
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 09/22/2014 - 08:08 नवीन
परफेक्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2014 - 00:05 नवीन
बर्‍याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत.
मिसळपाववरचे एक लोकप्रिय, पुरुष सदस्यही अशा प्रकारे मोटरसायकल चालवत असत याची चांगलीच आठवण आहे. कुठेतरी एकत्र जाताना ते आमच्या पुढे चालवून आम्हाला रस्ता दाखणार होते. आणि उजवी-डावीकडचे इंडिकेटर्स त्यांच्या वाहनालाच नसल्यामुळे त्यांच्या मागे स्कूटर चालवणं फार कठीण झालं होतं. नंतर त्यांना त्याबद्दल टोकलं असता आरसे, इंडिकेटर, हेल्मेट वापरणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत असं त्यांचं मत माझ्यापर्यंत पोहोचलं, अशी पुण्यातली एक मनोहारी आठवण मला अजूनही आहे. अर्थात एक दोन उदाहरणं पाहून सरसकटीकरणं करण्याची सवय मला नसल्यामुळे ते प्रकरण एक मजेशीर किस्सा एवढंच मर्यादित ठेवण्याची मर्यादा माझ्यावर येते.
आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि.
याबद्दल उत्क्रांतिजन्य मानसशास्त्रज्ञांनी विदा जमा करून अगदी हेच सिद्ध केलं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मुळात आक्रमक चालक नसतात, कदाचित थ्रीडी व्हिज्युअलायझेशनमध्ये स्त्रिया कमी पडत असल्यामुळे बारीक सारीक अपघात स्त्रियांकडून जास्त होत असावेत असा एक अंदाज आहे. सरसकटीकरण आणि चावूनचोथा झालेल्या पण मुळात दम नसलेल्या विषयात मला काही रस नाही. ज्यांना ही असली आगलावी सरसकटीकरणं मान्य नसतील त्यांनी वेळ असेल तेव्हा हे वाचा - Gender Based Insurance Premiums Analysis of accident rates by age, gender and time of day based on the 1990 nationwide personal transportation survey थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 09/22/2014 - 08:38 नवीन
थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.
कारण जीवघेणे अपघात होण्यासाठी/करण्यासाठी जिथे आणी जसे ड्रायव्हींग करावे लागते तसे करणार्‍या महिलांची टक्केवारी अगदी कमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ए
एस Mon, 09/22/2014 - 10:24 नवीन
सहमत. अशा धाग्यांचा कंटाऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ळा आलाय!!!!!!!!!! डोळे जडावलेला!... ऽ ऽ ऽ ऽ ऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सुहास.. Mon, 09/22/2014 - 11:06 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/22/2014 - 03:02 नवीन
२०० फिक्स!!! ;-)
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Mon, 09/22/2014 - 03:42 नवीन
काश्मिर होणार नक्की....
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2014 - 04:13 नवीन
काश्मीरला माझा भरीव पाठिंबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज
ह
होकाका Mon, 09/22/2014 - 19:22 नवीन
वेगळा विदर्भ आणि वेगळा बबन झालेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 05:00 नवीन
आता पॉपकॉर्न घेउन बसायचे की तेल्/तुप्/घासलेट्/पेट्रोल ;)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 09/22/2014 - 05:44 नवीन
नाही दरवेळी कश्मिरच कशाला? बेळगांव होणार असे म्हणा? तो ही ज्वलंत प्रश्न आहेच की.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 07:07 नवीन
हे बरोबरे !!! काश्मीर त्या बिलावलला खेळायला दिलंय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 09/22/2014 - 06:12 नवीन
ऐन नवरात्राच्या तोंडावर फटाके फुटणार. =)) १०० नक्की.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 09/22/2014 - 06:21 नवीन
जाग्या व्हा.९ रात्र लढण्यासाठी विषय मिळाला आहे.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 09/22/2014 - 06:58 नवीन
मग बघा,झाडू लाटणे,पळी,कालथा आणि किल्लीफळा,उंदीर घेऊन कशा सज्ज होऊन येतील सार्‍याजणी. लढण्यासाठी तयार रहा लेखक महाशय.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 09/22/2014 - 06:59 नवीन
गाडी चालवताना मोबाईल वर बोलणारे सर्वात जास्त पुरुष पाहीले आहेत. नुसते बोलत नाहेत तर बर्‍याचद ते डाव्या हातात फोन धरुन त्यात काही पहातही असतात . असे चालक पाहीले की मि लगेच सावध होतो. त्यांच्या पासुन नेहमीपेक्षा जास्त सुरक्षीत अंतर ठेवतो. एक निरि़क्षण असे ही आहे की, एका खाजगी कं चा बस ड्रायव्हर हा एका हाताने मोबाइल धरुन बोलत होता आणि एका हाताने स्टीअरिंग व्हील धरले होते , गीअर बदलताना तो स्टीअरिंग व्हील ही सोडुन देत असे. त्या बस मधील किति तरी लोकांच्या जिवाशी तो खेळत होता. जितके फेटल अपघात झालेले आहेत त्यात चालक कोण होते महीला कि पुरुष ?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 07:01 नवीन
पुण्यनगरीत (आम्ही पण थट्टा करू शकतो म्हंटलं!!) चुकीचं ड्र्याव्हिंग करणारे अनेक पुरूष, मग ते टूव्हीलरवाले असोत की फोर व्हीलरवाले की खास करून रिक्षावाले असोत, अनेक पाहिले आहेत!!! बाकी पुण्यात (सॉरी, सॉरी, पुण्यनगरीत!!) सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आणि त्यांच्यामागे बसणार्‍यांना हेल्मेट सक्तीचं करून त्यायोगे या फडकाधारी स्त्रियांचे फडके दूर करण्याचा कायदा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे! हाय अल्ला, क्या नजाकत! क्या खूबसूरती!!! :) :)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 09/22/2014 - 07:49 नवीन
माझ्या मते तरी स्त्रिया फार सावधपुर्वक गाडी चालवतात. त्यामानाने पुरुष थोडे बेदरकरारपणे चालवतात. त्यामुळे तसे बघता पुरुष चालका जास्त धोकादायक असतात असे म्हणायला हवे. पण होते असे की स्त्रियांचा सावधपणा हा थोडा आत्मविश्वासाच्या अभावापायी येतो. असे घाबरुन गाडी चालवणारे लोक खुप बिनभरवश्याचे असतात. त्यामुळेच बायका कधीही कुठुनही गाडी वळवणे, मध्येच गाडी थांबवतात कारण आत्मविश्वासाच्या अभावापायी त्यांचे सर्व लक्ष्य केवळ स्वतःच्या गाडीकडे असते. रस्त्यावरच्या रहदारीचीही काळजी करायला पाहिजे हे गाडी चालवताना त्यांच्या गावीही नसते. अनुभव माझाही असाच आहे की मुलींना नेहमीच सहानूभूती मिळते. त्यात परत त्यांनी गळा काढला की झालेच. अवांतरः १. माझे मत साधारणपणे आलेल्या अनुभवांती बनलेले आहे. काही स्त्रिया मायकेल शूमाकरपेक्षा उत्कृष्ट वाहनचालक असू शकतील. त्यांची उदाहरणे घेउन वस्सकन अंगावर येऊ नये. २. शतकानुशतकांच्या शोषणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे स्य्त्रियांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे आणी त्यामुळे काही बाबतीत स्त्रियांचा आत्मविश्वास कमी पडल्याने स्त्रियांचे ड्रायव्हिंग खराब असते आणि त्याला सर्वतः पुरुषच जबाबदार आहेत असा आपला युक्तिवाद असल्यास मी त्या वादात पडु इच्छित नाही हे कृपया लक्षात घ्यावे. ३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 08:07 नवीन
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.
हे लिहावे लागले यातच सगळे आले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मदनबाण Mon, 09/22/2014 - 08:01 नवीन
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्‍या असंख्य स्त्रिया पाहिल्या आहेत. दुचाकी मधे अगदी स्कुटी पासुन चेतक चालवणारी तर परवाच बुलेट चालवणारी स्त्री पाहिली आहे. ;) मध्यंतरी फ्लायओव्हर जवळपास ८० च्या स्पीड ने दुचाकी हाणणारी महिला देखील होती... ते दॄष्य अगदी गमतीशीर होत ! अर्धा रेनकोट हवेत उडत होता, साडी नेसुन हा प्रवास अगदी भन्नाट चालला होता ! ;) माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. :) अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे... असो... जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 08:08 नवीन
जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? Wink
हा हा हा...त्यासाठी वेगळा ३००+ काथ्या कुटावा लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 08:21 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. Smile अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे...
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. असो. सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 09/22/2014 - 09:31 नवीन
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. हॅहॅहॅ... स्त्रीया फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेली {म्हणजे तसे समजली जाणारी}आणि तितकची जवाबदारीची आणि किचकट कामे सुद्धा करु शकतात हे दर्शवण्यासाठीच हे टंकनकष्ट घेतेले आहेत. काका हे बिरुद विनाकारण चिकटवल्या बद्धल आपले फक्त श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला आहे, हे मोठ्या मनाने समजुन / मानुन घ्यावे. ;) सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. आम्ही योग्य व्यक्तींनाच त्यांच्या विषयाच्या आकलन क्षमते नुसार जागावाटपात प्राधान्य देतो. आगाऊ आणि विक्षिप्त, वाय-झेड आणि डोक्यावर पडलेल्या नमुन्यानांच्या "जागां बाबतचा निर्णय" पूर्णपणे पक्षश्रेठींवर सोडुन देतो. ;) चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का... ;) जाता जाता :- हल्ली खाणकाम बंद झाले आहे का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 09:45 नवीन
आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का...
यात काय विनोदलो मी? असो. टवळा आवडे विनोद ;) http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif जाता जाता खाण काम बंद केले आहे. पुन्हा जेंव्हा टेन्डरे फुटतील तेंव्हा सुरू करेन. सध्यातरी गौणखनीज उकरणे प्रलंबीत ठेवले आहे. जागा वाटपानंतर पाहु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मना सज्जना गुरुवार, 09/25/2014 - 08:02 नवीन
छान,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
संजय कथले Mon, 09/22/2014 - 08:17 नवीन
सुहास भाऊ लवकर या.................
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 09/22/2014 - 08:33 नवीन
बरं मग? :)
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Mon, 09/22/2014 - 08:58 नवीन
तर काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
व
विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 09:01 नवीन
हो ना.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 09:05 नवीन
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का? हेच जर व्हाईस व्हर्सा असतं तर टेम्प्लेट बदलली असती असा एक रोचक विचार क्षणभर मनात तरळून गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Mon, 09/22/2014 - 09:10 नवीन
बरं मग? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नानासाहेब नेफळे Mon, 09/22/2014 - 09:17 नवीन
त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
व
विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 09:42 नवीन
असंय होय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 10:09 नवीन
रेकॉर्ड अडकलीये. तरी योग्य ती उपाययोजना करणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
पैसा Mon, 09/22/2014 - 18:38 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 19:54 नवीन
तुम्हांलाही तोच सल्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 09/23/2014 - 04:00 नवीन
असं होय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 06:30 नवीन
काय हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विजुभाऊ Tue, 09/23/2014 - 08:00 नवीन
त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 08:02 नवीन
काय ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
काउबॉय Mon, 09/22/2014 - 08:43 नवीन
अप्रतिम असतो. ड्राइवज मी वाइल्ड.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Mon, 09/22/2014 - 08:45 नवीन
आडात नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार??? बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 09:45 नवीन
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे? ;)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा