Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स

क
काळा पहाड
Sun, 09/21/2014 - 21:36
🗣 85 प्रतिसाद
या गोष्टीवर कदाचित भरपूर वेळा विनोदाच्या अंगानं लिहिलं गेलंय. प्रत्यक्षात डावीकडे सिग्नल देवून उजवीकडे वळणार्‍या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. पण नुकत्याच घडलेल्या दोन प्रसंगांनी मला याबाबत गंभीर विचार करायला प्रवृत्त केलंय. दुसरा प्रसंग अति-गंभीर असून सुद्धा अपरिचित रहाण्याच्या मर्यादेमुळे तो न सांगता मी एक छोटा प्रसंग सांगतो. स्थळः चतु:शृंगी चौक, विद्यापीठाजवळ, पुण्यनगरी. उजवीकडे वळणारा रोड. त्याला डावीकडे फुटलेला छोटा फाटा. मी डावीकडच्या लेन मध्ये. माझ्या कारपाठून लगटून डावीकडून येणारी एक फडकंधारी मुलगी. मी कारचा डावीकडचा सिग्नल अंदाजे १० सेकंद दिला आणि १० च्या स्पीडने वळलो. माझ्या डावीकडून येणारी मुलगी रोडच्या नॉर्मल फ्लो ला म्हणजे उजवीकडे वळली आणि माझ्या कारवर आपटली. लोक जमा झाले. मला कारमधून काय झालंय दिसत नव्हतं. बहुधा लोक तिला उठवायला मदत करत होते. तिला मुळीच लागलं नसावं. कारण ती अर्ध्या मिनिटातच निघून गेली. तत्पूर्वी एक अनाहूत मला 'सॉरी म्हणा आणि मिटवून टाका' म्हणून सल्ला देवून निघून गेला. मी नि:श्वास सोडला. माझ्या गाडीला त्या मुलीच्या स्कूटरमुळे पडलेला एक मोठा स्क्रॅच. जर त्या मुलीला काहीतरी झालं असतं तर मलाच लोकांनी वाईट ठरवलं असतं. अर्थात असे प्रसंग बरेच आणि रोजचे पण छोटे. मी बर्‍याचदा मोटरसायकल वापरत असल्यामुळे आपल्याला अचानक वळणार्‍या महिलेचा अंदाज येवून तो धोका टाळणं सोपं जातं जे कार मध्ये बहुधा शक्य नसावं. बर्‍याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत. सध्या तर पुढे एखादी महिला स्कूटरवरून जात असेल तर मी शक्य असेल तर मोटरसायकल चा वेग कमी करतो आणि मधलं अंतर वाढवतो किंवा मग तिला ओव्हर्टेक करून पुढे जातो. माझा कमीत कमी एक मित्र तरी असंच करतो हे त्यानंच मला सांगितलेलं आहे. पुढे एखादी महिला स्कूटर चालवत असेल तर माझे कानाचे आणि डोळ्याचे सेन्सेस कुठल्याही क्षणी ब्रेक दाबण्यासाठी ज्यादा तयार असतात (heightened senses). माझं असं निरिक्षण आहे, की अन-इंटेंशनली पुरूष सर्वसाधारणपणे सुरक्षित गाडी चालवतात आणि त्यांना आपण काय करतोय याचं भान असतं (जे अर्थात इंटेंशनली बेजबाबदारपणे चालवतात त्यांना वगळावंच लागेल) पण अन-इंटेंशनली महिला गाडी चालवताना गोंधळलेल्या असतात आणि त्यांच्यामुळे इतरांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे निरिक्षण कितपत बरोबर आहे?

प्रतिक्रिया द्या
15728 वाचन

💬 प्रतिसाद (85)
व
विलासराव Mon, 09/22/2014 - 10:07 नवीन
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे? आड असो ,नसो, आडबाजुला असो, आपण निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी. आता काय निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी, हे उत्तर ज्याने-त्याने आपल्यापुरते शोधावे किंवा शोधु नये किंवा कसेही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गवि Mon, 09/22/2014 - 10:40 नवीन
स्त्रि यां चा ड्रा य व्हिंग काय ??? :-)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 09/22/2014 - 18:30 नवीन
आचार्‍याच्या जानव्याला किल्ली काय?? आचार्‍याची बायको वेडी काय? या 'पट्टीत' नाही बसलं गवी. स्त्रि यां चा ड्रा य व्हिं ग सेंSS न्स काSS य?? असं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
द
दशानन Mon, 09/22/2014 - 18:31 नवीन
बायकांना वाहन चालवण्याची काडीमात्र अक्कल नसते आणि या मतावर मी ठाम आहे. ;)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 07:05 नवीन
एवढे धाडशी विधाण करून काडी टाकल्याबद्दल फार्फार आभारीहे. :) पॉपकोर्न आणलेत कालच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ध
धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 07:26 नवीन
सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगबद्दल गैरसमज आहेत, माझेही होते. पण बायकांना पुरेसी संधी मिळाली तर ते गैरसमज नक्कीच दुर होतील. एकूण (अभ्यासपूर्ण) प्रतिसादांचा अभ्यास केला तर मी ह्या निष्कर्षावर आलोय की रस्त्यावरील अपघात एकतर स्त्रियांच्या कमी आत्मविश्वासामुळे होतात किंवा पुरुषांच्या अती आत्मविश्वासामुळे (बेफीकीरीमुळे) होतात. एकूणातच अपघात होतात हे सत्य आहे. स्त्री आणि पुरुष (किंवा प्रत्येक वाहन चालवणार्‍या प्राण्यांनी) आपण नक्की कोठे चुकतो यावर विचार केला तर ही परिस्थीती टाळता येईल. साधारण ५ वर्षापुर्वी जागतीक महिला दिनाच्या दिवशी मी चेन्नई वरुन मुंबईला विमानाने येत होतो. जेव्हा ते विमान एक स्त्री पायलट चालविणार आहे अशी घोषणा झाली तेव्हा भीतीने माझ्या पोटात गोळा आला. या बायका रस्त्यावरुन चालताना नीट गाडी चालवत नाहीत तर विमान कशा चालवणार ? पण त्या पायलटने व्यवस्थित विमानाचे सारथ्य करुन सुखरुप मुंबईला पोहोचवून माझ्या शंका दुर केल्या. मी त्या पायलटला भेटून तिचे अभिनंदन केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ग
गवि Tue, 09/23/2014 - 07:31 नवीन
रहदारीत कार चालवण्यास अधिक कौशल्य लागते असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 07:32 नवीन
काय गवि ? सकाळपासून खेचायला मीच भेटलो वाटतं ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 09:00 नवीन
दूसर्‍या महायुद्धात हिटलरच्या फौजेने भरती केलेल्या कित्येक पायलटांना कार चालविता येत नव्हती असं कुठेसं वाचल्याचं स्मरतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
द
दशानन Wed, 09/24/2014 - 19:38 नवीन
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. असो, तुमची असहमती मान्य! पण माझे मत ठाम आहे, आणि हे उगाच टाईप करायचे म्हणून टाईप केले वाक्य नाही आहे.. बायकांना गाडी चालवण्याचा सेन्स नसतो. त्यांच्या हातून अपघात होतात. मोठे नसतील.. ज्यांची नोंद होईल पण लहान लहान शेकडो अपघात स्त्रियांच्या हातून वाहन चालवताना होतातच. >>समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. कारण अनेक अपघात, जे अपघात होऊ शकले नसते.. असे अपघात बायकांच्या हातून झालेले मी असंख्यवेळा पाहिले आहे म्हणून. तुम्ही डोळे झाकून चालत असाल तर तो तुमचा प्रश्न ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 09/24/2014 - 09:51 नवीन
काही पुरुषांनापण नसते ...पुण्यात एखादा बाईकस्वार पुरुष जर गाडी चालवताना उजवीकडे १० सेकंदापेक्षा जास्त मान वळवुन बघत असेल तर तो उजवीकडे वळणार असे गृहित धरावे (मागे बसलेला असेल तर थुंकणार असे गृहित धरावे).मग तो सिग्नल (गाडीचा किंवा हाताचा) देवो कि न देवो. एकुणच पुण्यात सिग्नल महत्वाचा नसुन चालवणार्‍याची बॉडी लँग्वेज ओळखता येणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही गाडी चालवु शकता. एव्हढे करुनही समोरुन येउन कोणी स्वतःहुन गाडी ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
र
रामपुरी Mon, 09/22/2014 - 21:29 नवीन
बायकांचे दिशाज्ञान, नकाशावाचन/आकलन आणि वाहन चालविण्याचे कौशल्य हे वादातीत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Tue, 09/23/2014 - 06:19 नवीन
दशानन, रामपुरी यांच्याशी त्रिवार सहमत!! पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ड्रायव्हींग सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूं स्त्रियांमधे रूढ होत आहेत. आता कोणी म्हणतील की राणी लक्ष्मीबाई ई. घोडा चालवायच्या. पण खर म्हणजे ही तुलनाच चुक आहे. कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. अहो, धुलाईयंत्रात (Washing Machine मध्ये) कपडे धुतल्यास तेही रज-तमात्मक होतात. मग एवढ्या मोठ्या गाडीत स्त्री बसल्यावर तीपण रज-तमात्मक होणार नाही का? स्त्र्यांकडून सतत होणार्‍या अपघातांमागे खरे म्हणजे हेच कारण आहे.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Tue, 09/23/2014 - 06:37 नवीन
एकूणच महाराष्ट्रातले रस्ते पहाता गाडी आणि धुलाईयंत्राची तुलना आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 06:45 नवीन
काळापहाडभाऊ,मुंबई आणि नाशिकातले रस्ते फारच गुळगुळीत आणि खड्डेविरहीत असल्याने वाहनांना ट्रॅक्शन मिळत नसल्याने अपघात घडतात असा तुमचा गैरसमज आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Tue, 09/23/2014 - 06:53 नवीन
नै ब्वा. का? ही दोन्ही शहरं पण महाराष्ट्रातच येतात असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
पैसा Tue, 09/23/2014 - 06:59 नवीन
स्वराबाई, आपल्या थोर संस्कृतीच्या रक्षणासाठी माझा तुम्हाला कंपूसह पाठिंबा आहे! घोडा चालवण्याबद्दलचा आक्षेप समजला. पण भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला रथाची सारथी करून संस्कृतीच्या र्‍हासाला सुरुवात केली, आणि त्याचमुळे घोर कलियुग सुरू झाले हो! प्राचीन काळात रथाचे सारथ्य करणार्‍या सत्यभामा, कैकेयी आदि नारींचाही यानिमित्ताने लकडी पुलावर सभा घेऊन निषेध करावा काय या विचारात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 07:30 नवीन
पुण्यनगरीत एकेठिकाणी honda activa चे प्रचंड धूड सांभाळत एक काष्ठांगातूर ललना वाहनांच्या गर्दीतून गाडी हाकत होती, माझी गाडी तिला समांतर जात होती, प्रत्येक वेळी ट्रॅफिक पूढे सरकल्यानंतर ललना वेगाने गाडी पूढे न्यायची व ट्रॅफिक पूढे जायचे थांबल्यास आपल्या काष्ठशिल्प शोभेल अशा एकाच बोटाने ब्रेक दाबत होती, बोटातला दम व गाडीचा दम याचे प्रमाण व्यस्त असल्याने पुढे थांबलेल्या अनेकांच्या गाड्यांच्या मडगार्डला चुंबनाचा (activaच्या) लाभ सहजरित्या होत होता, अनेकांना हा चुंबनवर्षाव लक्षातच आला नाही.ज्यांच्या लक्षात आला,त्यातले काही प्लॅटोनिक ड्रायवर होते ,त्यांनी मागे वळुण जळजळीत कटाक्ष टाकले, त्यांना काष्ठधारी ललने सॉरी हं! असे उत्तर प्रत्येकवेळी दिले. स्त्रीदाक्षिण्याचा खंदा पुरस्कर्ता असल्याने मी त्या ललनेस चारी बोटे वापरुन ब्रेक दाबा असा सल्ला दिला, त्यावर तुम्ही तुमचे बघा! असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुलीचा खेळ करत निघून गेली.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 09/23/2014 - 09:00 नवीन
कहर!! :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 09:31 नवीन
हाण तेजायला =)) नेफळे रॉक्स!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/23/2014 - 12:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
काउबॉय Tue, 09/23/2014 - 11:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
स
स्वप्नांची राणी Tue, 09/23/2014 - 12:12 नवीन
"...असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुली दाखवत निघून गेली..." घोSSSSर कलीयुग..!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
प्यारे१ Tue, 09/23/2014 - 15:29 नवीन
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय? उगाचच ग्रेग चॅपेल आणि विराट कोहली आपापल्या दुखर्‍या बोटांसकट आठवले. ;) आमच्याकडं खरंच एकाला 'ते' बोट वाकवता न आल्यानं बर्‍याचदा त्याचं नेमकं म्हणणं काय ते समजत नाही. (चेपु वर मित्र यादीमध्ये सुद्धा आहे. इच्छुकांनी व्यनि करावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
म
मदनबाण Tue, 09/23/2014 - 07:35 नवीन
कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. जोक ऑफ द डे ! ;) घोडा जर "चालवायला" लागत नसेल तर मग त्याला "लगाम" आणि "झापडं" लावायची काय गरज ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 09/23/2014 - 08:02 नवीन
घोडा आणि गाडी एकत्र आले तर ते चालवायला लागतात. घोड्याला जन्मतःच लगाम आणि झापडे नसतात. गाडीला जन्मतःच ब्रेक आणि मिरर असतात
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 09/23/2014 - 08:21 नवीन
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
म्हणजे "सशाचे शिंग " किन्वा " वंध्यापुत्र" (एवढे बोलून मी माझे टंकन कष्ट वाचवितो.) (आज सकाळी आठ वाजता चांद्णी चौकात एक बाला असंख्य चुंबने घेतलेल्या कारमध्ये ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली... अजून त्या धक्क्यातून सावरतोय.).
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 09/23/2014 - 08:46 नवीन
चुकुन " असंख्य चुंबने घेत कारमध्ये ड्रायविंग करताना " असे वाचले. म्हटले विटुकाका खपले बहुधा आज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 09/23/2014 - 12:20 नवीन
चुंबने , कार आणि बाला या तिन गोष्टी परस्परांपासून समान अंतरावर आहेत , हा त्रिकोण नीट समजून घ्यावा. गल्लत करु नये ! तशी गल्लत तिथेच ( म्हणजे चांदणी चौकात ) पाहायला मिळू शकते , पण ते रात्री आठ वाजता ! . . . . पन खोटं कशाला बोला , आपुन काय पाय्लं नाय बाबा ! ( लोकं लगेच विचारतील , तुम्ही तिथे काय करीत होतात ? .... देणं ना घेणं फुकटच कंदील लावणं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मराठी_माणूस Tue, 09/23/2014 - 08:55 नवीन
ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली
आम्ही हे दृष्य रोज बर्‍याच वेळा पहातो, फरक एकच , महीलेच्या जागी पुरुष असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ध
धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 08:59 नवीन
म्हणून तर त्यांना धक्का बसला ना ! जी गोष्ट रोज घडते त्याचा धक्का कसा बसेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ब
बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 09:31 नवीन
तो श्लोक आठवला. काकस्य कति वा दन्ता: मेषाण्डस्य कियत् पलम् | गर्दभे कति रोमाणि व्यर्थैषा तु विचारणा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सुहास.. Tue, 09/23/2014 - 11:11 नवीन
ही गाडी मात्र काश्मीर ला चालली आहे ..
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/23/2014 - 19:11 नवीन
भारी विषय आहे धाग्याच्या! अगदी सहमत!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 19:25 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा