मी पयला... ???
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते. मिपावर किंवा एखाद्या संकेतस्थळावर जे लोगिन करतात तेच वाचक असतात असे नाही.. अनेक सर्च इंजीनच्या माध्यमातून मिपासारखे संस्थळ वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचत असते. त्यात माझ्यासारखे प्रतिसादापासून वाचन सुरु करणारे किमान ५-१०% तरी असतील ना?
असो, यात काय आनंद मिळतो हे मला माहिती नाही, मिळत असेल ही कदाचित, त्या शिवाय का अशी होड लागेल? जर एखादे बक्षीस, एखादा पुरस्कार पहिल्या प्रतिसादाला मिळत असेल तर कृपया त्याबद्दल मिपाने जाहीर घोषणा करावी, कारण संपादक मंडळ देखील यात लक्ष देत नाही म्हणजे हे अधिकृत असेल असे मी समजतो आहे.
हा धागा मिपाला खटकत असेल तर काढला तरी चालेल पण जे खटकले ते लिहितो आहे. किंवा माझे गैरसमज दूर होतील असे दुवे मला द्यावेत.
धन्यवाद!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमायामिपाचे मनोगत करण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा.कोण मनोगत ? धन्यवाद.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !मिपा विश्लेषक आदुबाळ सांगु शकेल."मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे"मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))