मी पयला... ???
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते. मिपावर किंवा एखाद्या संकेतस्थळावर जे लोगिन करतात तेच वाचक असतात असे नाही.. अनेक सर्च इंजीनच्या माध्यमातून मिपासारखे संस्थळ वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचत असते. त्यात माझ्यासारखे प्रतिसादापासून वाचन सुरु करणारे किमान ५-१०% तरी असतील ना?
असो, यात काय आनंद मिळतो हे मला माहिती नाही, मिळत असेल ही कदाचित, त्या शिवाय का अशी होड लागेल? जर एखादे बक्षीस, एखादा पुरस्कार पहिल्या प्रतिसादाला मिळत असेल तर कृपया त्याबद्दल मिपाने जाहीर घोषणा करावी, कारण संपादक मंडळ देखील यात लक्ष देत नाही म्हणजे हे अधिकृत असेल असे मी समजतो आहे.
हा धागा मिपाला खटकत असेल तर काढला तरी चालेल पण जे खटकले ते लिहितो आहे. किंवा माझे गैरसमज दूर होतील असे दुवे मला द्यावेत.
धन्यवाद!
💬 प्रतिसाद
(63)
स
सवंगडी
Fri, 09/26/2014 - 08:00
नवीन
नै ना …. शाळेत पण शेवटून दुसरा यायचो ना….
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 09/25/2014 - 23:33
नवीन
अभ्यास करायचा नाही,
शाळेपासून महिनोन महिने दूर रहायचं...
यायचं तेंव्हाही सरळ पहिल्या नांवाने न येता निरनिराळी सोंगं घेऊन यायचं,
आणि मग येऊन असे प्रश्न विचारायचे!!!!
आधी बाकावर उभा रहा पायाचे अंगठे पकडून!!!!
:)
- Log in or register to post comments
स
सवंगडी
Fri, 09/26/2014 - 08:04
नवीन
पिडा सर सोडू का अंगठे ? फार वेळ झाला ओ …
अन हि काय पिंडा आहे ? अहो तो मी नव्हेच हो
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Sun, 09/28/2014 - 07:52
नवीन
तुम्हाला कोणी सांगितलंय?
ज्याला दशाननाला सांगितलंय त्याला ते कळलंय, मग तुम्ही कशाला उगीचच मध्ये?
उगीच बीचमे मेरा चांदभाई!!!!
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 09/28/2014 - 09:02
नवीन
त्यांना आनंद मिळाला म्हणून मी गप्प बसलो होतो की पिडा :D
- Log in or register to post comments
स
सवंगडी
Sun, 09/28/2014 - 16:02
नवीन
आम्हाला कुठायत १० डोकी ? त्यामुळे वाटले मलाच म्हणले तुम्ही !(इथून फुडे नाम लेके बोलो प्लीज्ज )
आता तरी सोडू का सांगा ना ??
ओ पिंडा मास्तर
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/26/2014 - 04:15
नवीन
मी पयला असं यापुढे प्रतिसादात दिसणार नाही असं वाटतं ! ;)
-दिलीप बिरुटे
(डबल ब्यारलवाला)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 09/26/2014 - 08:25
नवीन
या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ जास्तच जोमाने फोफावत आहे.
काल पासुन आलेले धागे बघुन हे निरीक्षण नोंदवत आहे.
- जेपी
(थ्री नॉट थ्री रायकलवाला)
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Sat, 09/27/2014 - 18:40
नवीन
म्हणे 'मी पैला'. कायपण करतात ना हे लोक? वय वाढलं तरी पोरखेळ जात नाही बघा.
-पोरकट- SYG ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 09/27/2014 - 20:31
नवीन
उलट आहे....
वय वाढले की माणूस जास्तीत जास्त लहान मुलासारखाच निर्मळ होत जातो.
आणि तसेही,
मिपाच्या अंगणांत दंगा-मस्ती होणारच.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Sat, 09/27/2014 - 21:12
नवीन
ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली न्हाई तुमी. दंगा मस्ती तो होनाईच मंगता हय.
-पोरकट- SYG ;)
@ दशानन- नमस्कारा. ननगे निम्मद बरदिद्द एल्ला तुंबा शेरतद. आदरे,
तुम्ही जरा जास्तच शिरेस झालाय.सॉरी बर्का, पण ऑफिसात्न वैतागून आलो की जरा मजा म्हणून कधी कधी असा पोरकटपणा करतो. पण काही धागे फक्त दंगा घालायलाच जन्माला आलेले असतात. फुल्ल वेंजॉय करयाचं.
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 09/28/2014 - 09:04
नवीन
दंगा करायला ना नाही आहे, करा की मनसोक्त! मी पण करत असतोच की ( हा धागा काय प्रवचन करायला काढला आहे का ;) ) पण तोच तोच प्रकार करण्यात मध्ये काही अर्थ नाही, आणि मज्जा पण नाही बॉ!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 09/28/2014 - 15:21
नवीन
इथे शेवटच्या प्रतिसादासाठी धडपडणारे लोक्स पण आहेत. ;) पण तिथे 'माझा शब्द शेवटचा' असं लिहायच्या आत धागाच वाचनमात्र होतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2