गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?
गांधी.......
काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे.
मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंदुकीच्या गोळीला हे माहिती नसते रे समोरचा कोन आहे,अथवा तलवारीच्या धारेला वेदना नसते,ती असते जिवंत प्राण्याला.आभासी जगात बाता मारण्यापेक्षा किती जणांनी रस्त्याने अथवा कॉलेजमध्ये आया बहिणींच्या छेडछेडाची विरोध केलाय. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते.
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर.....
अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते.
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का?या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.