भाजपला मत देण्याअगोदर
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..??
वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे.
१) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता ..
>> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ?
२) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ?
>> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर.
३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..?
>>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते.
४) नसेल तर मग युती का तोडली.. ?
>> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली.
५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत)
>>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही.
६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ?
>>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे.
>>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या.
>>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या.
>>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या.
>>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या.
७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत..
>>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या.
-- एक सामान्य नागरिक
💬 प्रतिसाद
(165)
च
चैदजा
Sun, 10/05/2014 - 14:49
नवीन
जर बीजेपी सत्तेवर आली तर, मुख्यमंत्री मोदीच्या तालावर नाचणार. ईतर कोणी पक्ष निवडुन आला तर केंद्र सरकार त्यांच्या धोरणांना मदत करणार नाही.
मह्णजे काय? कोणीही येवो महराष्ट्राची झोळी रिकामी होत रहाणार आणि गुजरातची झोळी भरत रहाणार.
मला तर मोदीं फक्त गुजरातचे पंतप्रधान वाटतात.
उ
उदयन
Sun, 10/05/2014 - 15:57
नवीन
नाशकात भुरभुर पाउस फक्त आहे तरी मुसळधार पाउस आहे बातमी फिरवुन सभा रद्द केली.
लोकच जमली नाहीत सभेला म्हणुन तर रद्द केली नाही ना ;)
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/06/2014 - 13:00
नवीन
टीव्ही बघत नाही वाटते? का केबल नाही? असो. जालावर फोटो मिळतात बघा कुठे.
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 17:46
नवीन
मोदींच्या सगळ्याच सभा फ्लॉप गेल्या. तासगावमधल्या सभेला तर आख्खे मैदान रिकामे होते. नाशकातही रिकामे राहणार हे ओळखून भाजपच्या लोकांनी मैदानात टँकरमधून पाणी आणून ओतले आणि चिखल करून ठेवला आणि नंतर पावसाचे कारण पुढे करून सभा रद्द केली.
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 10/07/2014 - 15:50
नवीन
अहो श्रीगुरूजी ज्यांना पुण्याच्या पेशव्यांनी प्रतिसाद दिला ते एक अत्यंत विद्वान महाशय आहेत-- साक्षात बृहस्पतींनी त्यांचे शिष्यत्व पत्करावे इतकी त्यांची योग्यता आहे हे तुम्हाला माहित नाही का? म्हणूनच त्यांना पंतप्रधानांनी केलेले विदेश दौरे आणि पिकनिक यात फरक जाणवत नाही. इतक्या ज्ञानी माणसाचा प्रतिवाद करायची आपल्यासारख्यांची लायकी आहे का?
व
विजुभाऊ
Mon, 10/06/2014 - 08:11
नवीन
भाजप इतका डोळे झाकून दूध पिणारा पक्ष दुसरा कोणता नसावा.
त्यांच्या राजकीय झैराती म्हणजे मोठ्ठा विनोद आहेत.
उदा :
१) इथले उद्योग परप्रान्तात गेले आहेत. कूठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा : इथले उद्योग गुजराथ मधे गेले आहेत. तेथे भाजपचेच राज्य आहेत.
२) टोल बाबतीतेल विधाने: हा तर अती मोठ्ठा विनोद आहे.: टोल सम्राट गडकरी हे भाजपचेच आहेत. पूर्ती कम्पनी ही गडकरींचीच आहे. टोल मुक्ती कशी देणार महाराष्ट्राला?
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 08:23
नवीन
एक नंबर विभा, महाराष्ट्र हा गुजराथचा एकमेव प्रतिस्पर्धी आहे .एकदा महाराष्ट्र कंगाल केला कि मग तो गुजरातच्या तुलनेत बराच मागे पडेल ,हे मोदीचे धुर्त षडयंत्र आहे .राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा.
ठिकाय काँग्रेसविरोधी असाल तर इतर पक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत ,त्यांना मत द्या हवेतर, पण या धुर्त भाजपाला नको.
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 12:06
नवीन
>>> राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा.
काही पुरावे? आकडेवारी? का नेहमीप्रमाणे नुसत्याच तोंडच्या गप्पा?
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 17:47
नवीन
प्रतिसादाची वाट बघतोय नाना.
ह
हाडक्या
Mon, 10/06/2014 - 17:52
नवीन
ते काही असो, पण विजुभाऊंचे नवीन नामकरण आवडल्या गेलेले आहे असे नमूद करतो.. *lol*
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 08:30
नवीन
आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत.
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 12:10
नवीन
>>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .
या संस्था गुजरातला गेल्यात हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का? का आपली नेहमीचीच फेकाफेकी?
>>> परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत.
बादवे, JNPT या महाराष्ट्रातील बंदराला नेहरूंचे नाव कोणी दिले हो? त्यासाठी महाराष्ट्रातील एकही महापुरूष सापडला नाही वाटतं? आणि २-३ वर्षांपूर्वी वरळी येथील सागरपुलाला राजीव गांधींचं नाव द्या अशी जाहीर सूचना कोणी केली होती ते आठवतं का? तेव्हासुद्धा एकही मराठी माणूस सापडला नाही?
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/06/2014 - 13:07
नवीन
अगदी खरे. पूर्वी मिशलिन कंपनी अर्थमूव्हर्सचे टायर बनवायचा प्लांट चाकणमधे करणार होते. प्रंप्रिय, प्रुगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४९% स्टेक त्यांच्या गरीब कार्यकर्त्याच्या नावाने मागितल्या मुळे शेवटी तो प्लांट चेन्नै ला गेला. एमाअयडीसीतली धर्मनिरपेक्ष गुंडगिरी अनुभवली असेल तर उद्योगधंदे गुजराथला का जातात ते कळेल.
जे एन पी टी च्या सुविधा सुमार असल्याने पुण्याच्या सँडविक कंपनी मधे येणारा माल देखील गुजरातेत अडाणीच्या बंदरात उतरतो आणि रस्त्याने पुण्यात येतो आणि जातो देखील. जे एन पी टी ची अवस्था का बरे दुर्दैवी झाली? मोदिंनी केली का?
श
श्रीगुरुजी
Tue, 10/07/2014 - 08:48
नवीन
>>> >>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .
पुराव्यांची आतुरतेने वाट बघतोय नानासाहेब. पुरावे नसतील तर ही सगळी फेकाफेकी होती हे तरी मोठ्या मनाने कबूल करा.
न
नानासाहेब नेफळे
Tue, 10/07/2014 - 09:16
नवीन
http://www.dnaindia.com/mumbai/report-safer-coasts-maharashtra-sets-marine-police-academy-ball-rolling-1853223
http://www.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarat-to-get-marine-police-academy/articleshow/40089431.cms
या दोन बातम्या वाचा. २०१३ आणि २०१४च्या .आता बोला यावर..... कुणी पळवले मरीन ट्रेनिंग सेंटर?
बाकीच्या दरोडेखोरीचे पुरावे देईनच, आधी याविषयी समाधानकारक उत्तर द्या.खोटे आरोप करुन पळुन जायला मी सोमय्या किंवा खडसे वाटलो की काय तुम्हाला?
श
श्रीगुरुजी
Tue, 10/07/2014 - 12:51
नवीन
नानासाहेब फेकडे,
तुम्ही स्वतःच दिलेल्या लिंक्स नीट वाचा हो आणि नंतर फेकाफेकी करा.
तुम्हीच दिलेल्या लिंकमधील ही खालील वाक्ये वाचा.
In the terrorist attack on Mumbai in November 2008, boats belonging to Porbandar fishermen were used by the Pakistan-trained terrorists. It was after this incident that the Gujarat government proposed such an academy in the state.
तत्कालीन गुजरात सरकारनेच या संस्थेच्या स्थापनेची मागणी केली होती.
The Centre is believed to have granted approval to a proposal of the state government for a first-of-its-kind National Marine Training Academy in Gujarat that was rejected by the previous UPA regime.
>
तुमच्या युपीए सरकारने ही मागणी धुडकावून लावली होती कारण अर्थातच ती मोदींनी केली होती. देशाच्या सुरक्षेपेक्षा मोदींना त्याचे क्रेडीट मिळू नये म्हणून केवढी ही धडपड.
आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच ही मागणी मान्य झाली आहे.
या संस्थेची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी केली होती. मोदींना अपशकुन करण्यासाठी युपीएने ती धुडकावली होती आणि आता त्या संस्थेचे महत्त्व ओळखून मोदींनी मान्यता दिली आहे. या सगळ्यात महाराष्ट्राचा काय संबंध?
पुन्हा एकदा माती खाल्लीत नाना!
न
नानासाहेब नेफळे
Tue, 10/07/2014 - 14:26
नवीन
गुरुजी ,मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं....
कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत?
हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय.
श
श्रीगुरुजी
Tue, 10/07/2014 - 18:58
नवीन
>>> मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं.
ही संस्था कधी महाराष्ट्राला मिळाली होती? किती तारखेला? म्हणजे युपीएच्या काळात की वाजपेयींच्या काळात की मोदींच्या काळात? समजा युपीए किंवा वाजपेयींच्या काळात असली तर ती संस्था आजतगायत का सुरू झाली नव्हती?
मोदींनी युपीएने केवळ मोदीद्वेषामुळे परवानगी नाकारलेली संस्था सुरू करायला परवानगी दिली. यात महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही.
>>> हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं....
कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत?
त्यांनी कधी केलं तुझं माझं? ज्या राज्याने परवानगी मागितली त्याच राज्याला परवानगी दिली. महाराष्ट्राने परवानगी मागितली असती तर तिथे परवानगी मिळाली असती. २६/११/२००८ ते १६/५/२०१४ या साडेपाच वर्षात केंद्रात व राज्यात युपीएचे सरकार होते. या काळात महाराष्ट्र सरकारने परवानगी मागितली होती का? आणि असल्यास साडेपाच वर्षात परवानगी कोणी व का दिली नव्हती?
>>> हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय.
तुमचा निव्वळ इतिहास-भूगोलच कच्चा नसून तुम्हाला इंग्लिशही कळत नाही असं दिसतंय. आपणच दिलेल्या लिंका जरा नीट वाचा आणि बाता मारणे बंद करा.
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/06/2014 - 19:19
नवीन
पुण्यातली वॉक्सवॅगन गुजरातला गेली? बाप रे....काय सांगता काय नेफळेबुवा? म्हैतीचं न्हवतं....आमच्या मित्राला भौतेक कंपनीनी नवा पत्ता दिला नसेल म्हणता का काय?
इ
इरसाल
Tue, 10/07/2014 - 08:50
नवीन
मागची कंपनी का सोडली.
कंपनी रिलोकेट झाली. कुठे ते मला कंपनीने नाय सांगितलं. ;)
म
मृत्युन्जय
Tue, 10/07/2014 - 11:02
नवीन
RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते
RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड?
श
श्रीगुरुजी
Tue, 10/07/2014 - 12:34
नवीन
>>> RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड?
नेफळे कशा पुड्या सोडतात आणि पुरावे मागितले कसे सोयिस्कर मौन पाळतात याची कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांचं नाव नानासाहेब नेफळे ऐवजी नानासाहेब फेकडे असायला हवं होतं.
म
मृत्युन्जय
Tue, 10/07/2014 - 12:51
नवीन
ते फेकत आहेत ते माहिती आहे हो मला. पण मग विचार केला की माझ्याकडे नसलेली एखादी माहिती नानासाहेबांकडे असेल तर बघावे म्हणुन प्रश्न विचारला आपला. बाकी ते आता बर्याच कोलांट्या उड्या मारणार हे तर माहिती आहेच. पण त्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली तर आपल्याला बरेच आहे की. आभारच मानेन मी त्यांचे मग.
न
नानासाहेब नेफळे
Tue, 10/07/2014 - 14:31
नवीन
RBIचे महत्वाचे तीन डीव्हीजन मुंबईतून दिल्लीत हलवणार आहेत.
http://www.ahmedabadmirror.com/news/business/RBI-to-shift-3-forex-divisions-to-Delhi-in-July/articleshow/38204660.cms
म
मृत्युन्जय
Tue, 10/07/2014 - 14:37
नवीन
एकुणात तुम्ही निखालस खोटी विधाने करत आहात हे मान्य करत आहात तर.
तुम्ही म्हणालात की आख्खे मुख्यालय गुजरात मध्ये हलवले. इथे तर दिसते आहे की ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली. तुमचा खोटारडेपणा इथेच सिद्ध होतो.
तरीही तुम्हाला अजुन खोटा पाडतो:
The divisions will continue to be part of Foreign Exchange Department, Central Office, Mumbai, RBI added
अजुन ऐका:
आरबीआयची एकुण २० -२५ डिपार्टेमेंट्स आहेत. फोरेन एक्स्चेंज हे त्यापैकी एक. फोरेन एक्स्चेंज डिपार्टमेंट मध्ये अनेको डिव्हिजन्स आहेत. त्यातील ३, केवळ ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली आणि तुम्ही म्हणत आहात की "मुख्यालय गुजरातमध्ये हलवले".
अजुन किती वेळा माती खाणार नेफळे?
न
नानासाहेब नेफळे
Tue, 10/07/2014 - 14:45
नवीन
चला वादासाठी मान्य करु ! पण मुंबईतच ठेवायला काय धाड भरलीय?, तीन डीविजन्स जड झाली आहेत का मुंबईत?
म
मृत्युन्जय
Tue, 10/07/2014 - 14:50
नवीन
वादासाठी मान्य करु? म्हणजे काय? इतरवेळेस अमान्य करण्यासारखे आहेच काय त्यात? आधी तुम्ही अपप्रचार करता आहात हे मान्य करा. चला तुमच्या सोयीसाठी असे मान्य करा की तुमची माहिती निखालस चुकीची होती. ढळढळीत पुरावे दिले आहेत. मग पुढचे बोलु.
न
नानासाहेब नेफळे
Tue, 10/07/2014 - 15:03
नवीन
निखालस चुकीची कशी काय बुवा? RBIचे विभाजन झाले आहे हे तरी मान्य करा!
म
मृत्युन्जय
Tue, 10/07/2014 - 15:19
नवीन
तुम्ही लिहिले होते "आरबीआय गुजरातला हलवले" हे १००% चुकीचे विधान आहे.
उ
उदयन
Tue, 10/07/2014 - 15:20
नवीन
आंधळे भक्तांना काही दिसत नाही
कुठे तुम्ही प्रकाश दाखवत आहेत.
मराठी मत मिळावे म्हणुन मोदी म्हणत आहे मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळी करणार नाही विदर्भ वेगळा होणार नाही. शिवसेनेच्या प्रचाराला "घाबरुन" शेवटी बोलावे लागले. नाहीतर आधी यांची भाषा वेगळी होती
रंगबदलु लोकांचा काय भरोसा ठेवतात
क
काळा पहाड
Tue, 10/07/2014 - 15:23
नवीन
फुकट्या लोकांच्या हाती मुंबई असल्यापेक्षा ती वेगळी केलेली काय वाईट? बाकी विदर्भाला वेगळं व्हायचं असेल तर रोखणारे आम्ही कोण? त्यांचं काय भलं केलंय आतापर्यंतच्या सरकारांनी?
उ
उदयन
Tue, 10/07/2014 - 15:27
नवीन
विदर्भात जे प्रकल्प आहेत ते काय गुजरात ने उभे केले का?
नागपुरातल्या काही लोकांनाच वेगळा विदर्भ हवा आहे कारण उभ्या महाराष्ट्रात डाळ शिजत नाही. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडत आहेत त्यांना म्हणुन्च हे खेळ
क
काळा पहाड
Tue, 10/07/2014 - 15:50
नवीन
इथं गुजरातचा काय संदर्भ? बाकी तुम्ही म्हणता तसा विदर्भ सुजलाम सुफलाम असता तर त्यांना वेगळं राज्य मागायची काही गरजच नव्हती. बाकी तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही नागपूर मधल्या लोकांना मुख्यमंत्री बनू देत नाही तर. मग त्यांची मागणी वाईट कशी? की कायम पस्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांनी मुख्यामंत्री व्हायचं?
उ
उदयन
Tue, 10/07/2014 - 16:04
नवीन
काय हास्यास्पद लिहिले आहे . जरा परत वाचुन बघा काय लिहिले ते.
महाराष्ट्रातुन पंतप्रधान मिळाला नाही तर काय तुम्ही महाराष्ट्र देशच वेगळा मागणार आहेत का? ;)
काहीही प्रतिवाद करायचा ?
द
दुश्यन्त
Tue, 10/07/2014 - 16:32
नवीन
मुख्यमंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राकडे कायम कधी होते? विदर्भाचे वसंतराव नाईक (११ वर्षे सलग) आणि मारोतराव कन्नमवार (१ वर्षे) मुख्यमंत्री राहिले आहेत.मराठवाड्याचे पण शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव, निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर असे मुख्यमंत्री झाले आहेत. उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळाले नाही.मात्र ते वेगळे राज्य मागत नाहीत.
प
प्रसाद१९७१
Tue, 10/07/2014 - 15:27
नवीन
मुंबई आणि विदर्भ वेगळी झालीच पाहीजे महाराष्ट्रातुन, म्हणजे पुण्याचे, सातार्याचे, कोल्हापूर चे महत्व वाढेल
स
सौंदाळा
Tue, 10/07/2014 - 14:45
नवीन
अरे मृत्युन्जया, श्रीगुरुजी गपा की रे जरा.
किती छळता माझ्या नानाला. तो एकटा एका बाजुला अजुन आठ महिन्याचाच आहे आणि तु रे मृत्युन्जया साडेसहा वर्षाचा आहेस ना सांभाळुन घेत जा त्याला जरा
आपला
आप्पासाहेब फुरसुंगीकर
ल
लोटीया_पठाण
Mon, 10/06/2014 - 08:42
नवीन
@ विजुभाऊ,
१) इथले उद्योग गुजराथला गेले हा काय गुजराथ सरकारचा दोष आहे काय ?? पळवले नाहीत त्यांनी. कर्नाटकात पण जात आहेत इथले उद्योग.
२) १५ वर्षे सत्तेत नसलेले गडकरी टोल सम्राट कसे काय??
नेफले भाऊ,
RBI स्वायत्त संस्था आहे. अन फोक्सवॅगन खासगी … मनसेचे रेमेडोके सांगणार अन तुम्ही ऐकणार
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 08:55
नवीन
@लोटीया पठाणजी, RBI स्वायत्तवगैरे सांगोवांगी असतं ,अर्थखात्याचाच अप्रत्यक्ष होल्ड असतो. आणि तुमचे लॉजिक लावले तर गॅस कंपन्या पेट्रोल डीझेल कंपण्यानाही बरीच स्वायत्तता आहेच की, मग दरवाढीविरोधात सरकारच्या नावे दहा वर्षे शिमगा का चालू होता?
महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री राज्यातल्या उद्योगांना गुजरातेत यायचे आमंत्रण देत आहेत, मोदी सरकारकडून अशा कंपन्यांना करसवलतीचे आमिष दाखवून महाराष्ट्राबाहेर पडायला उद्युक्त करत आहेत.
मुंबई पुणे बुलेट ट्रेन कॅन्सल करुन अहमदाबादकडे नेली, कशासाठी?
आजपर्यंत परदेशी पाहुणे दिल्लीत यायचे व नंतर मुंबईत, मोदीने दोन्हीला टांग देउन चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत कशाला नेले?
तुंबड्या भरुन घेणारा धुर्त माणुस आहे मोदी, महाराष्ट्र अशांच्या ताब्यात अजिबात नको देऊयात.गुजरात्यांनी अखेर लायकी दाखवली.
प
प्रसाद१९७१
Mon, 10/06/2014 - 09:09
नवीन
काही चांगल्या गोष्टी, कंपन्या, उद्योग गुजरात मधे गेले तर इथे लोक "पाकीस्तानात" गेल्या सारखे गळे काढत आहेत.
इथल्या पि.चि. MIDC मधे छोटे, मध्यम उद्योग चालवणे ह्या गुंडांनी आणि खंडणीखोरांना कसे अशक्य करुन ठेवले आहे हे माहीती दिसत नाही. असे वातावरण असेल तर जाणारच कंपन्या गुजरात मधे.
स्क्रॅप सुद्धा खंडणी दिल्या शिवाय विकता येत नाही पुणे परिसरात.
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 09:38
नवीन
पिंचिमध्ये NCPची सत्ता आहे ,काँग्रेसची नाही.
प
प्रसाद१९७१
Mon, 10/06/2014 - 10:32
नवीन
मी मांडलेला मुद्दा पक्षीय नव्हता. मला म्हणायचे होते, जे राज्य चांगले व्यवसायिक वातावरण देइल तिथे उद्योग आणि इतर संस्था जातील.
मोदी किंवा दुसरे कोणी असे जबरदस्तीने घेउन जाउ शकत नाही. जर नविन सरकारनी पिं.चि. मधली गुंडगीरी कमी केली नाही तर कोणाचेही सरकार असेल तरी उद्योग दुसरीकडे जातील.
व
विजुभाऊ
Mon, 10/06/2014 - 09:40
नवीन
@ प्रसाद : तुमचे म्हणणे मान्य आहे. कोंग्रेस असो की इतर कोणी स्थानीक पुढार्यानी इथल्या एम आय डी सी ची अक्षरशः वाट लावली आहे. सातारा वाई इथल्या एम आयडीसी पाहिल्या तर वाटते की उद्योजकानी केवळ मागील जन्माचे पाप फेडण्यासाठी उद्योग स्थापले आहेत. सातार्यात असलेले बरेच उद्योग तेथून स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आधारीत उद्योग हे डबघाईस आलेले आहेत. सातार्यात पथेजा फोर्जींग्स , परांजपे ऑटोकास्ट , डोबर्ग ब्रूअरीज हे उद्योग गायब झालेत. महाराष्ट्र स्कूटर्स चा कारखाना गेले वीस एक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. तेथे पर्यायी अनेक उत्पादने निर्मान होऊ शकतात. मात्र स्थानीक अडमुठे नेतृत्व आणि त्यांची जी हुजुरी करणारे यांचे प्राबल्य असणारे यांची चलती असल्यामुळे विकासाच्या नावाने ठणाणाच आहे.
अर्थात हा कोंग्रेस चा दोष आहे असे नाही. तेथले खासदार एकदा भाजपच्या नावावर निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावार निवडून येतात. आमदारानी नक्की काय केले हे त्याम्चे त्याना माहीत असेल तरीही खूप म्हणायचे.
अर्थात मुख्य दोष आहे तो सातार्याच्या नागरीकांचा.
प
प्रसाद१९७१
Mon, 10/06/2014 - 10:36
नवीन
@विजुभाऊ - तसे बघायला गेले तर देशाच्या सर्वच प्रॉब्लेम साठी सर्व नागरीकच जबाबदार आहेत. तेच तर प्रत्येकवेळेला सरकार निवडुन देतात.
माझ्या मते अति लोकशाही करण झाले आहे. काही चमत्कार झाला तरच ह्या देशाला भवितव्य आहे.
आत्ता तरी मोदी हाच एक आशेचा कीरण आहे.
उ
उदयन
Mon, 10/06/2014 - 10:38
नवीन
असे सरळ मान्य करा ना मग
ह
हाडक्या
Tue, 10/07/2014 - 11:17
नवीन
नाना, सातारच्या लोकांबद्दल सरसकटीकरण करण्याची ही तुमची दुसरी वेळ.. आता ह्या साताराबाहेरच्या व्यक्तीने लिहिलेल्या लेखावरची 'सातारच्या' लोकांच्या (म्हणजे आमच्यापण) प्रतिक्रिया वाचा. मग बोला.
कुठल्याही बाबतीत सरसकटीकरण वाईटच. आणि मुजरे/दंडवत/चपला उचलणे अशी लाळघोटी कामे (आपल्या देशात तरी) पक्षनिरपेक्ष व स्थल-काल निरपेक्ष चालू असतात.
सातारकरांना या बाबतीत 'निर्लज्ज' आणि 'बसा बोंबलत' म्हणायची गरज नाही आणि तुमची लायकीही नाही.
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/06/2014 - 19:30
नवीन
एम.आय.डी.सी. सारख्या ठिकाणी व्यवसाय करायला महाराष्ट्र सगळ्यात नालायक राज्य आहे. अरे उद्योजकाला किती नाडतात स्थानिक गुंड ते एकदा फिरुन बघा. साध्या भंगाराच्या कंत्राटावरुन पार खुन पडायच्या वेळा येतात.
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 19:39
नवीन
जर इतकी गुंडगिरी आहे तर या कंपन्या आल्याच कशा राज्यात ?एखाद्या ठिकाणी घडत असेलही प्रत्येक ठिकाणी नाही.
स
सौंदाळा
Tue, 10/07/2014 - 08:01
नवीन
कंपन्या आधीपासुनच होत्या हो. पण PCMC बद्दल बोलायचे झाले तर सलग ३०+ वर्षे शरद पवार / एनसीपीचे वर्चस्व आहे या भागावर. मागच्या १० वर्षात जनरल मोटर्स, वोक्सवॅगन, जेसीबी वगैरे कंपन्या आल्यामुळे त्यांना पुरवठा करणार्या लघु-उद्योगांची गरज वाढली. कित्येक नविन वर्कशॉप्स उभे राहीले, जुने वर्क्शॉप्स अजुन वाढले. आधीपासुन सत्तेत असलेल्या एनसीपीने (त्यांचे नगरसेवक, कार्यकर्ते) युनियन बनवल्या. उद्या वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे.
या दादागिरीतुन जुने, मोठे वर्कशॉप्स टिकले मात्र ज्यांनी ७/८ वर्षापुर्वी मोठ्या हिम्मतीने आधीची नोकरी सोडुन नविन वर्कशॉप टाकले त्यातले बहुतांश बंद पडले. माझ्या ओळखीत दोन उदाहरणे आहेत. १०-१२ वर्षाची नोकरी झाली होती त्याची बचत धंद्यात टाकली सुरुवातीला बरा चालला पण नंतर या दादागिरीमुळे पैसे सुटेनासे झाले तरी आज्-उद्या ठीकठाक होईल म्हणुन १.५-२ वर्षे काढली मात्र शेवटी धंदा बंद करावा लागला, नविन नोकरीची मारामार आता दुसर्या वर्कशॉपमधे सुपरवायजरची कामे करतायत.
न
नानासाहेब नेफळे
Tue, 10/07/2014 - 08:21
नवीन
हे कल्चर पवारने माजवले आहे, त्याचा काँग्रेसशी संबंध नाही. थोरली पाति काँग्रेसमध्ये असताना वरुन दट्ट्या आल्यानंतर सरळ व्हायची, आता पवार प्रा लि कंपनी असल्याने कोण बोलणार तिकडे?
मुंबईतही जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी 'वाले बंधुद्वयी प्रायवेट लीमीटेडच आहेत. यासाठीच राष्ट्रीय पक्षांना निवडून द्यायचे असते ,तिथे शिस्त असते.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »