Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाजपला मत देण्याअगोदर

स
सागरलहरी
Sat, 10/04/2014 - 16:57
🗣 165 प्रतिसाद
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..?? वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे. १) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता .. >> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ? २) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ? >> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर. ३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..? >>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते. ४) नसेल तर मग युती का तोडली.. ? >> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली. ५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत) >>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही. ६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ? >>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे. >>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या. >>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या. >>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या. >>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या. ७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत.. >>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या. -- एक सामान्य नागरिक

प्रतिक्रिया द्या
30242 वाचन

💬 प्रतिसाद (165)
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/07/2014 - 09:09 नवीन
वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे. ह्यात नक्कीच तथ्य असावे. माझ्या मित्राने नविन मुंबईत त्याचे स्वतःचे घर दुरुस्तीला काढले तर लोकल गुंडांनी त्याला हव्या असलेल्या कंत्राटदारास काम देण्यास, त्याला हवे असलेल्या ठिकाणाहून दुरुस्तीला आवश्यक सामान आणण्यास बळजबरी करून विरोध केला. प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचलं. शेवटी मित्राला स्नायूबलापुढे नमतं घ्यावच लागलं. भरपूर पैसे गेले आणि निकृष्ट काम गळ्यात आलं. अजूनही अश्रू ढाळतोय बिचारा.
↩ प्रतिसाद: सौंदाळा
क
काळा पहाड Tue, 10/07/2014 - 15:18 नवीन
मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गुंडांवर एन्काऊंटर्ची कारवाई केलेली माहिती आहे. दुर्दैवाने ते आता नाहीत. या काँग्रेसच्या (रा.काँ. ही काँ. तर आहे!) किंवा शिवसेनेच्या गुंडांना संपवून टाकायची गरज निर्माण झाली आहे.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
न
नानासाहेब नेफळे Tue, 10/07/2014 - 15:24 नवीन
काय धडधडीतखोटं सांगत आहात, ९३च्या बॉम्बब्लास्टनंतर शरद पवारांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी पाठवले, शरद पवारांनी मुंबई पोलिस कमिशनर रिबेरो यांना सर्वाधिकार देऊन अंडरवर्ल्डचा कणा मोडला होता.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Tue, 10/07/2014 - 15:35 नवीन
नेफळेसाहेब, काही दुवे देतोय आंतर्जालावरचे. १) The BJP-Shiv Sena government saw its credibility slipping as the 40,000-strong Mumbai Police watched helplessly. The then home minister Gopinath Munde gave the police a virtual carte blanche to eliminate the gangsters. In 1999, the police department recruited officers for their newlyformed CIU. Hard-nosed policemen with an extensive network of informants and a track record showing they were unafraid to pull the trigger were picked up. The CIUs eliminated gangsters in cold, extra-judicial killings. Select policemen were armed with sweeping powers, allowed to tap phones, given secret service funds to pay informants and rewarded with cash bounties ranging from Rs.1-15 lakh. Gangsters were abducted, detained and then shot in cold blood. Weapons were planted on their bodies. http://indiatoday.intoday.in/story/mumbai-encounter-specialists-killers-in-khaki/1/176211.html २) When he assumed office, among the first priorities was to improve the law and order scenario – and the department cracked the underworld's backbone. “There were several encounters in which criminals of various gangs – Dawood Ibrahim, Chhota Rajan, Arun Gawli and their splinter groups were killed and several arrested,” said an officer, who served in the Mumbai Police during that period. “There were allegations of human rights violations, but he always stood by the teams,” the officer added. http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5509317610950310437&SectionId=5351696313519115080&SectionName=State&NewsDate=20140603&NewsTitle=Munde,%20%20initiator%20of%20drive%20to%20finish%20off%20underworld ३) As the then State Home Minister, Munde contributed in a big way in controlling organised crime in Mumbai. At a time when the metropolis came under the iron grip of the underworld, who thrived on handing extortion threats to moneyed people from different walks of life and killing those who failed to oblige them, Munde gave a free hand to “encounter-specialists” of the Mumbai police, who went virtually for the kill, eliminated scores of gangsters and broke the very back of the once-powerful underworld. http://www.dailypioneer.com/print.php?printFOR=storydetail&story_url_key=bjp-loses-its-maha-soldier&section_url_key=todays-newspaper
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
उ
उदयन Tue, 10/07/2014 - 19:05 नवीन
मोदींना हिशोब काय मागितला इतकी मिर्ची लागली की सगळी कडे तेच सांगत फिरत आहे मात्र हिशोब देत नाही काय जबरदस्त मिर्ची झोंबली
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 09:12 नवीन
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चक्र माराव्या लागायच्या. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 09:25 नवीन
भाजपाच्या गृहमंत्र्यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. पाकिस्तानाला दम देताना बोलले की

"पांढरे निशाण फडकवायला"

आधीचे सरकार नाही. आता पांढरे निशान म्हणजे शरणागती. भारताने कधी पाकिस्तानापुढे शरणागती पत्करली ??? अरे राजनाथासाहेब याच काँग्रेस ने पाकिस्तानाचे दोन तुकडे केले होते. हे विसरतात का ? तुमच्यासारखे अतिरेक्यांना सोडुन नाही आले होते. उपमा द्यायला पण येत नाही म्हणे हे गृहमंत्री
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/06/2014 - 09:41 नवीन
संपुर्ण कॅबिनेट मोदींच्या दहशतीखाली आहे, अगदी राजनाथसुद्धा. इतका स्वार्थी पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता.
↩ प्रतिसाद: उदयन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/06/2014 - 19:24 नवीन
अगदी अगदी खर्र्र्र बोल्लात....अगदी शु ला जायचं असलं तरी सोडत नाहीत म्हणे मोदीगुर्जी....कमीत कमी दरारा असणारा तरी पी.एम. आहे आमच्याकडे. कळसुत्री नाही.
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 10:27 नवीन
मै "हरियाणा" को नंबर १ बनाउंगा ...!! मै "महाराष्ट्र" को नंबर १ बनाउंगा ...!!
कधी दोन राज्य एकाच नंबरवर असु शकतात का ?
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/06/2014 - 10:44 नवीन
मोदी म्हणणार की नंबर एक पोझिशनवरुन हरीयाणा व महाराष्ट्रात भांडण नको, त्यापेक्षा मध्यममार्ग म्हणुन मी गुजरातचा विकास करतो.
↩ प्रतिसाद: उदयन
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 10:47 नवीन
अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत. आपल्याकडचा संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार हंगामी असून लवकरच नवीन संरक्षण मंत्री नेमला जाइल असे ते ४ महिन्यापूर्वी म्हणाले होते मात्र अजून कुणाची नेमणूक झाली नाही. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही अति महत्वाची खाती असतात. कॅबिनेट कोर कमिटीमध्ये या चार खात्याचे मंत्री असतात.आपल्या ऐकण्यातला संरक्षण मंत्रीपदाचा दावेदार मिळत नसल्याने मोदी पूर्ण वेळ संरक्षण मंत्री नेमत नाहीत असे दिसतेय. पण अशी परिस्थिती चांगली नक्कीच नाही. पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष पण आपल्या ऐकण्यातलाच हवा यासाठी अमित शहांची पार्श्वभूमी, सध्या प्रलंबित असलेले गुन्हे याकडे पण डोळे झाक केली आहे. सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा त्याच्याच गुजरातमधून तडीपार केलेला आहे.सगळ्या महत्वाच्या पदावर आपले पित्तू बसवण्याचा हा मोदींचा अट्टाहास चांगला नाही.'सबका साथ सबका विकास' वगैरे नुसत्या गप्पा आहेत.
व
विजुभाऊ Mon, 10/06/2014 - 10:54 नवीन
भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ व समता परिषदेच्या एकाचा समावेश आहे. गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तत्काळ उमेदवारी का दिली भाजपचे स्वतःचे असे काय उरले आहे आता. त्याना सगळ्या ठिकाणी उभे करायला स्वतःचे असे उमेदवार देखील मिळत नाहीत. भाजपच्या आयात उमेदवारांची यादी उमेदवार मतदारसंघ आधीचा पक्ष मनोहर बडने धुळे ग्रामीण काँग्रेस सुनील देशमुख अमरावती काँग्रेस समीर मेघे हिंगणा काँग्रेस माधवराव किन्हाळकर भोकर काँग्रेस आनंद भरोसे परभणी काँग्रेस शिवाजीराव नाईक शिराळा काँग्रेस अजित घोरपडे तासगाव काँग्रेस प्रशांत ठाकूर पनवेल काँग्रेस राजन तेली सावंतवाडी काँग्रेस संजय दुधगावकर उस्मानाबाद काँग्रेस शैलेश लाहोटी लातूर काँग्रेस माणिकराव कोकाटे सिन्नर काँग्रेस बाळासाहेब मुरकुटे नेवासा काँग्रेस भाऊसाहेब वाकचौरे श्रीरामपूर काँग्रेस विलासराव खरात घनसावंगी काँग्रेस अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण काँग्रेस अभय नगरकर नगर राष्ट्रवादी विजयकुमार गावित नंदुरबार राष्ट्रवादी संजय सावकारे भुसावळ राष्ट्रवादी योगेंद्र गोडे बुलढाणा राष्ट्रवादी किसन कथोरे मुरबाड राष्ट्रवादी मंदा म्हात्रे बेलापूर राष्ट्रवादी लक्ष्मण जगताप चिंचवड राष्ट्रवादी बबन पाचपुते श्रीगोंदा राष्ट्रवादी शरद बुट्टे पाटील खेड राष्ट्रवादी राहुल कुल दौंड राष्ट्रवादी प्रताप चिखलीकर कंधार राष्ट्रवादी स्नेहलता कोल्हे कोपरगाव राष्ट्रवादी भीमराव धोंडे आष्टी राष्ट्रवादी मोनिका राजळे पाथर्डी राष्ट्रवादी जगदीश वळवी चोपडा राष्ट्रवादी शिवाजी कर्डिले राहुरी राष्ट्रवादी राजेंद्र पिपाडा राहाता राष्ट्रवादी अद्वय हिरे नांदगाव राष्ट्रवादी अरविंद चव्हाण जालना राष्ट्रवादी रामदास सदाफुले देवळाली राष्ट्रवादी भगवान बोरस्ते निफाड शिवसेना किशनचंद तनवाणी औरंगाबाद मध्य शिवसेना बाबासाहेब तांबे पारनेर शिवसेना विनायक हिवाळे पैठण शिवसेना शरद ढमाले भोर शिवसेना नेताजी डोके जुन्नर शिवसेना जयसिंग एरंडे आंबेगाव शिवसेना चंद्रकांत खाडे इगतपुरी शिवसेना दिलीप कुंदकर्ते नांदेड दक्षिण शिवसेना संगीता राजे निंबाळकर पुरंदर मनसे राम कदम घाटकोपर पश्चिम मनसे संजय गव्हाणे कन्नड समता परिषद प्रशांत बंब गंगापूर अपक्ष अनिल गोटे धुळे शेतकरी संघटना शिवाजी मानकर येवला मागील वेळी अपक्ष उमेदवार
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 17:51 नवीन
>>> भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत जो पक्ष निवडून यायची सर्वात जास्त शक्यता तिकडेच आयात होणार ना? बादवे, इतर पक्षाने आयात केलेल्यांची सुद्धा नावे दिलीत तर बरे होईल. उदा. पुण्यात कसब्यातून राकाँचा उमेदवार दीपक मानकर आहे. तो कुठून आयात केला. पर्वतीत शिवसेनेने सचिन तावरेला कोठून आयात केले? कोकणात दीपक केसरकरला शिवसेनेने कोठून आयात केले?
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 17:56 नवीन
तुम्ही तुमच्या आवडत्या पक्षाबद्दल तर बोला मास्तुरे उगाच बगल देऊ नका जुनीच सवय आहे म्हणा तुमची काय अपेक्षा करावी
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नित्य नुतन Mon, 10/06/2014 - 12:35 नवीन
पंकजा मुंढे ला एका मुलाखतीत बघितले होते ... तोंडात च्विंगम चघळत एखाद्या भाईच्या आवेशात उत्तरं देत होती ... पोकळ अतिआत्मविश्वास ठासून दिसत होता .. असले नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ??? अर्रे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ???
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 12:39 नवीन
मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्ये बर्याच (चांगल्या) बाबतीत पुढे आहे.
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 17:49 नवीन
>>> मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. हे कधी सिद्ध झाले?
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 17:58 नवीन
हरियाणाचा 8 वा नंबर कोणी सांगितले? तुमच्याच प्रधानसेवकाने आकडे खोटे सांगितले हाच पुरावा आहे अजून काय पुरावा हवा ;)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भाते Mon, 10/06/2014 - 12:54 नवीन
इतर राजकीय पक्षांनी किमान त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तरी घोषित केले आहेत. भाजपावाल्यांचे काय? जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन आधीच घोषित केले होते तसे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीअगोदर घोषित करायला का घाबरत आहेत हे भाजपावाले? त्यांच्यातच एकमत नाही आहे. मुंडे यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकणारा कोणीही नेताच भाजपाकडे नाही आहे. म्हणुन तर विधानसभा निवडणुक प्रचारासाठी देशाच्या पंतप्रधानाला यायची गरज वाटते. दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात?
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 17:48 नवीन
शिवसेना, मनसे व राकाँचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे?
↩ प्रतिसाद: भाते
उ
उदयन Tue, 10/07/2014 - 10:23 नवीन
वृत्ती गेली नाही अजुन ? भाजपाचा विचारला तर आधी उत्तर द्या मग प्रश्न विचारा. उत्तर न देताच प्रश्न विचारुन पळुन काय जातात
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय Tue, 10/07/2014 - 10:28 नवीन
अर्रे. बाकीच्यांनी जाहीर केला पण भाजपाने नाही केला म्हणून गळा काढता आहात ना? मग द्या की उत्तर, कोणी कोणी जाहीर केला काँग्रेसशिवाय?
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Tue, 10/07/2014 - 10:34 नवीन
पार्टी विथ डिफ्रन्स ना.. मग इतरांचे काय विचारतात
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 10/07/2014 - 19:16 नवीन
अर्रे डिफरंट आहे म्हणुन केवळ त्यांनीच उमेद्वार जाहीर करायचा? पार्टी विथ डिफ्रन्स म्हणजे काय हेच तुम्हाला कळालेले नाही हाच मुख्य लोच्या आहे. असो. अभ्यास वाढवा.
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Tue, 10/07/2014 - 19:51 नवीन
नीरो च्या पार्टी बद्दल काय समजायचे आहे तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रदीप Wed, 10/08/2014 - 03:45 नवीन
http://www.hindustantimes.com/india-news/india-hits-back-with-vengeance-strikes-37-pak-posts-15-killed/article1-1272821.aspx हेही पहा: http://www.hindustantimes.com/india-news/ceasefire-violations-govt-toughens-stand-asks-forces-not-to-seek-meeting/article1-1272825.aspx
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Wed, 10/08/2014 - 04:11 नवीन
आधीच्या सरकारांमधे पण होत होते पण धडा शिकवायची भाषा करणारे स्वतः काय करत आहे वेगळे ते सांगा आर्मी स्वतः कामगिरी चोखच बजावत असते
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Wed, 10/08/2014 - 04:24 नवीन
तुम्ही प्रथम लिहीलेतः "तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे" आता ह्या दुव्यांवरून असे दिसते की भारतही चोख प्रतिसाद देत आहे. विशेषतः हे पहा: "The Narendra Modi government on Tuesday directed the Border Security Force (BSF) and the Indian Army not to seek a flag meeting with Pakistan on the international border that has witnessed heavy firing in the last two days." एका विशीष्ट पातळीपलिकडील निर्णय सरकार घेते, आर्मी नव्हे. ते इथे घेतले गेलेले दिसतात. अगोदरची सरकारे काय करत होती, हा प्रश्न नाही, तुमचा आरोप सध्याचे मोदी सरकार ह्या बाबतीत काहीही करत नाही, असा आहे. आता अर्थात, moving goalposts च्या न्यायाने, तुम्ही मोदींनी स्वतःच सीमेवर जावयास पाहिजे होते, असे म्हटलेत, तर pass!
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Wed, 10/08/2014 - 05:11 नवीन
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही यावरून दिसते कि लोकसभेत मारलेल्या फुशारक्या होत्या काँग्रेसच्या 10 वर्षात जितके उल्लंघन केले असेल तितके या 6 महिन्यांतच झाले म्हणे भारताचा डंका बाजवला ;) आताचा प्रधानसेवक फक्त बोलूच शकतो करू काहीच शकत नाही हे जगाला कळले
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Wed, 10/08/2014 - 05:43 नवीन
म्हणजे सरकारने प्रत्यक्ष कृती केली, ते पुरेसे नाही. आता, तुमची (सरकलेली) अपेक्षा ही की मोदींनी त्यांच्या महाराष्ट्र व हरीयाणा येथील विधानसभांच्या निवडणूकांच्या प्रचारधुमाळीच्या दरम्यान ह्या मुद्द्यावरून डरकाळ्या फोडल्या पाहिजेत! ते इथे कमी पडले हे खरे :) बाकी, त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन रणधुमाळीत भाग घेतला पाहिजे, असे (सध्यातरी) न म्हटल्याबद्दल (सध्यातरी) तुमचे कौतुकच केले पाहिजे!
↩ प्रतिसाद: उदयन
म
मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 07:38 नवीन
नाही सरकारने स्वतः जाउन त्यात मोदींनी स्वतः बंदूक हातात घेउन सीमेवर जाउन लढावे आणि लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि पेशावर मध्ये स्वतः जाउन गाढ्वाचा नांगर फिरवावा आणि भुट्टॉ आणि शरीफला बैलगाडीला जुंपुन दिल्लीला घेउन यावे अशी अपेक्षा आहे,
↩ प्रतिसाद: प्रदीप
श
श्रीगुरुजी Wed, 10/08/2014 - 10:38 नवीन
बंदूक? कुठल्या काळात वावरताय? मोदींनी वाघनखे घेऊन पाकड्यांचा कोथळा बाहेर काढावा, पाकड्यांना मातीत गाडावे, गेलाबाजार त्यांची बोटे तरी तोडावी, निदान त्यांच्या मस्तवाल जिभा तरी छाटाव्यात ... मोदींनी पाकड्यांवर अशा तर्‍हेची २१ व्या शतकातील कारवाई करावी. बंदूक वापरणे म्हणजे १७ व्या शतकात वावरण्यासारखे आहे. जरा २१ व्या शतकात या हो.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नानासाहेब नेफळे Wed, 10/08/2014 - 10:54 नवीन
खरंय !बंदुकीच्या कॅलिबरऐवजी व फायरींग रेट ऐवजी पहाडी छाती ,५६ इंच अशा गप्पा देखिल माराव्यात.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 10/08/2014 - 10:57 नवीन
बरोबर. पण कोणी अशा गप्पा माराव्यात. त्यांच्या छातीच्या घेराची इतरांनाच जास्त काळजी लागलेली दिसतेय.
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Wed, 10/08/2014 - 10:49 नवीन
प्रतिकारवाई सुरू झालेली दिसतेय. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistan-targets-bsf-posts-villages-india-hits-back-with-heavy-fire/articleshow/44687154.cms पंतप्रधान मोदींची मैत्री झिडकारुन वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय नागरिक आणि सैनिकांना लक्ष्य गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या बंदुका आणि तोफांचा आवाज बंद करण्याचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हल्ल्याला कोणत्या भागात किती प्रमाणात प्रत्युत्तर द्यायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळताच भारतीय सैन्याने पाकचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकने रविवारपासून गोळीबाराचे प्रमाण एकदम वाढवले आहे. मागील बारा वर्षात झाला नाही एवढा गोळीबार आणि मॉर्टरचा मारा पाकने सुरू केला आहे. पाकच्या या हल्ल्याला मंगळवारी रात्री भारताने तीव्र प्रत्युत्तर दिले. भारताने पाकच्या ३७ चौक्या आणि आसपासच्या भागात गोळीबार केला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये सियालकोट भागात १५ जण ठार आणि ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याआधी पाकिस्तानच्या रेंजरनी सीमा सुरक्षा दलाच्या ६३ चौक्या आणि २५ गावांना थेट लक्ष्य करुन गोळीबार केला तसेच मॉर्टरचा मारा सुरू केला. पाकच्या हल्ल्यात सतरा नागरिक आणि सीमा सुरक्षा दलाचे तीन सैनिक जखमी झाले तसेच ५५ वर्षाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्कराचे महासंचालक) पातळीवर तब्बल आठ मिनिटे चर्चा झाली पण तोडगा निघाला. या चर्चेत दोन्ही डीजीएमओंनी परस्परांवर गंभीर आरोप केले. अखेर पाकच्या कारवाया बंद होईपर्यंत गोळीबार करा, असा स्पष्ट आदेश केंद्राकडून सैन्य दलांना आला आणि त्याचे लगेच पालन करण्यात आले.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नानासाहेब नेफळे Wed, 10/08/2014 - 11:14 नवीन
हेच मोदी तीन महीन्यापुर्वी नवाज शरीफच्या आईला साडी पाठवत होते, कालपर्यंत पाकिस्तानला मिठाई पाठवत होते. यांच्या हे लक्षातही आले नाही कि आपला शेजारी किती घातक मनसुबे रचतोय! हे म्हणे कणखर देश बनवणार आहेत, इतका बाळबोध पंतप्रधान देशाने आजपर्यँत पाहिला नव्हता. मनमोहन सिंग यांनी या पाकड्यांशी लाळघोटेपणा कधीच केला नव्हता, अतिरेकी कारवाया थांबवा चर्चा करतो असे ठणकावले होते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 11:32 नवीन
खिक्क. आणि २०, ५०, १०० ची यादी आणि निषेध खलिते पाठव्ले होते. आणि ते ही काम इतके धेडगुजरीपणाने केले होते की त्यातले काही लोक नंतर बर्‍याच काळापासुन भारतीय तुरुंगातच सापडले. मनमोहन सिंगांनी कोणाला ठणकावले तरी ते मजा करताहेत असे वाटत असेल. त्यांना काय डोंबलाचे ठणकावले? बादवे हिंदी पाकी भाई भाई असे नारे तर नाही ना दिले मोदींनी. नवाझ शरीफांना एनडीएत नेउन स्वतःची तयारी किती तोकडी आहे हे तरी नाही ना सांगितले?
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Wed, 10/08/2014 - 12:09 नवीन
खरंय! बहुधा ५६ इंच छातीवाले पाकड्यांना मिठाया पाठवुन त्यांना डायबेटीक करणार, मग ते पाकडे डायबेटीसने मरणार!!! काय जबरी प्लान आहे! ५६ इंच छातीच्यावरती यांना डोकेही आहे तर! इतका कुटनितीने वागणारा पीएम देशाने कधीच पाहिला नव्हता. :lol:
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 12:43 नवीन
मिठाई वाटणे ही लष्कराची परंपरा आहे. त्यासाठी ते सरकारची परवानगी घेत नाहित. बाकी छाती च्या वरच्या भागावर डोके असणारा पंतप्रधाना आहे हे बरे आहे. गुडघ्यात असणारा नाही हे उत्तम.
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 13:13 नवीन
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही उदयना दादा लोकसभे आणि विधासभा यातला फरक कळतो का तुम्हाला? तो केंद्राच्या निवडणुकांचा प्रचार होता. तिथे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. हा महाराष्ट्राचा प्रचार आहे. इथे स्थानिक पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुण्याचे विषय चर्चिले जातील. तिथे काश्मीरच्या रस्त्यांची दुरावस्था या विषयावर व्याख्यान झोडुन काय उपयोग. असो. आजचा तुमचा गृहपाठ: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास करणे आणि दहा वेळ पाटीवर लिहुन काढणे. अवांतरः नानासाहेबांची मदत घेउ नका. ते खोटे बोलतात. ते तुम्हाला कदाचित सांगतील की मोदींनी सग्ळ्या शाळा गुजरातेत नेल्या.
↩ प्रतिसाद: उदयन
म
मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 13:08 नवीन
मग त्यांनी बंदुका घेउन सीमेवर जावे की काय? चोख प्रत्त्युत्तर द्यायला सांगितले आहे सेनेला आणि लागणारा सगळा सपोर्ट देत आहेत. नुसतेच निषेध खलिते नाही पाठवलेले.
↩ प्रतिसाद: उदयन
म
मोग्याम्बो Mon, 10/06/2014 - 12:57 नवीन
महारष्ट्रात आघाडी ची १५ वर्षे सत्ता होती आणि गुजरात मध्ये बीजेपी ची होती, जर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योग्धन्द्यांना आमंत्रण दिल्यावर ते जर तिकडे जात असतील तर ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारचा दोष आहे. उद्योगपती काय गुजरातला फिरायला चालले आहेत का ? मुख्यामात्र्यांचे आमंत्रण आले आहे. जाऊन येतो गुजरातला. असे थोडीच चालले आहे. गुजरात मध्ये उद्योग सुरु करण्याची processs सोपी आहे. आणि त्याना करांमध्ये खूप सवलत दिली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये आघाडीची १५ वर्षे सत्ता असून त्यांनी ह्या गोष्टींमध्ये खूप बदल नाहीत केले. त्यामुळे इथून उद्योगधंदे गुजरात मध्ये चालले आहेत ह्यात आपल्या राजकारण्याचा दोष आहे
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 13:05 नवीन
पण इथे येणार्या उद्द्योगधंध्यांना विरोध कोण करते ? प्रकल्पांना जमिनी देताना गावकर्यांना चुकिची माहीती सांगुन विरोधात कोण उभे करते. ? जेव्हा महाराष्ट्राला वीजेची आवश्यकता होती तेव्हा एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात कोणी बुडवलेला ? नंतर तीच वीज महाग दराने कोणी घेतली ? जैतापुर प्रकल्पाला विरोध कोण करत आहे ? सरकार उद्योगधंद्यांना राज्यात आणते परंतु विरोधी पक्षात असणार्यांना राज्याची प्रगती झालेली पाहवली जात नाही म्हणुन प्रत्येक प्रकल्पांना विरोध करायचे चुकिचा प्रचार करायचे आनि प्रकल्पांना त्रास द्यायचा आनि दुसर्या बाजुने गुजरात मधुन त्याच प्रकल्पांना मदतीचा हात द्यायचा मग तो उद्योग जातो गुजरात मधे. हेच चालु आहे गेले १० वर्ष. राज्यातील प्रकल्प उद्योगधंदे कसे बाहेर जातील हेच विरोधी पक्षाचे काम होते.
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो
म
मृत्युन्जय Tue, 10/07/2014 - 10:57 नवीन
हेच चालु आहे गेले १० वर्ष. गेली १० वर्षे (गेली सहा महिने सोडुन) राज्यात आणि केंद्रात सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. प्रकल्पांना मंजुरी देणे आणि धडाडीने ते सुरु करणे / करवणे याची जबाबदारी सरकारची असते. विरोधक विरोध करत असतील तरीही जे योग्य असेल त्यावर निर्णय घेउन कारवाई करण्यापासुन सरकारला कोणीही थांबवु शकत नाही. खासकरुन सरकार अल्पमतात नसताना तर नक्कीच नाही. जर सरकार योग्य ती पावले उचलत नसतील तर प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाणारच. प्रकल्प फक्त महाराष्ट्रातुनच दुसर्‍या राज्यात जातात तिकडून इकडे येत नाहित तुमच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता असुनही हे तुमच्या आळशीपणाचे आणि अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. गुजरातमधले कित्येक पॉवर प्लांट्स केंद्रीय पर्यावरण खात्याच्या लालफितीत अडकल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही हे प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेले नाहित कारण मोदी सरकारने वेळोवेळी त्यांना योग्य ते सहकार्य दिले. हे गुजरातमधल्या मोदी सरकारचे यश. महाराष्ट्रातले प्रकल्प फक्त गुजरातमध्ये जातात हा अजुन एक अपप्रचार. ते कर्नाटक, तामिळनाडु आणी आंध्रातही जातात / गेले आहेत. गुजरातमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच प्रकल्प येतात हा अजुन एक अपप्रचार. सगळ्या अकार्यक्षम राज्यांतुन मोदींनी प्रकल्प ओढुन आणले. टाटांनी तर मोदींच्या कार्यक्षमतेचे जाहीर कौतुक केले आणि प. बंगाल सरकारवर जाहीर टीका. मागच्या वर्षी गुजरातमधल्या एका बड्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगार कपात झाली. त्यावर एका आठवड्यात मोदींनी स्वतः कंपनीच्या प्रवर्तकाला फोन करुन त्याचा जाब विचारला आणि राज्यात इतर रोजगार सुरु करण्याची विनंती केली. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा एवढा कर्तव्यदक्ष असतो तेव्हा उद्योजकांच्या मनात देखील विश्वास निर्माण होतो. उद्योजक नफा कमाविण्यासाठी धंदा करत असतो. त्याला जर जेएनपीटीत माल उतरवुन घेणे आधिक फायदेशीर असेल तर तो तसेच करेल आणी गुजरातमध्ये फायदेशीर ठरत असेल तर तिथेच उतरवुन घेइल. कोणीही स्वतःच्या पदराला खार लावुन जे एन पीटी डुबवण्यासाठी मोदींना साथ देणार नाही. जर गुजरात सरकार काही इंसेंटिव्हस देत असेल तर महाराष्ट्र सरकारचेही हात कोणी धरुन ठेवलेले नाहित. पण इथला धंदा बसल्यावरच तुम्ही जागे होणार असाल तर त्यासाठी मोदींना कशाला दोष देता? तुमचे सरकार तरावे म्हणुन गुजरात सरकारने त्यांच्या राज्याचा विकास करु नये की काय? तुमची अकार्यक्षमता विरोधी पक्षांनी झाकावी ही भलतीच अपेक्षा झाली महाराजा. बाकी एन्रॉणसारख्या भ्रष्ट कंपनीला भारतात आवताण दिलेच कशाला ते कळत नाही.
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Tue, 10/07/2014 - 15:40 नवीन
इतके कळले असते तर आज महाराष्ट्रात लोडशेडींग झाली असती का ? आधी विरोध मग सत्तेवर आल्यावर स्वतः काहीच काहीच करायचे नाही हेच तर चालु आहे युतीचे तु गोंधळ घाल मी प्रकल्प पळवतो
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 13:06 नवीन
दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात? +१ मोदी स्वतः मान्य करतात कि मुंडे असते तर मला प्रचाराला यायची गरज नव्हती.उद्या सत्ता आलीच आणि फडणवीस/खडसे/तावडे/ मूनगुन्तीवर यापैकी कुणाला मुख्यमंत्री केलेच तर तो मोदी-शहांचा पित्तू म्हणूनच काम करेल.
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 10/07/2014 - 09:09 नवीन
थोड्या वेळापूर्वीच निखिल्च्या आय.बी.एन. लोकमतवर राज ठाकरेंची मुलाखत पाहिली. हा मनुष्य नक्की कोणासाठी काम करतोय काही कळत नाही.उद्योगधंदे गुजरातमध्ये चालले आहेत म्हणून सारखे रडगाणे चालू होते,मोदींवर टिका करत होता पण गेल्या १५ वर्षातल्या राज्यातल्या परिस्थितीबद्दल,भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्दही नाही.
द
दुश्यन्त Tue, 10/07/2014 - 09:12 नवीन
निखिल वागले आयबीनएन वर परतले कि काय? ते तर मी मराठी' मध्ये आहेत ना.
उ
उदयन Tue, 10/07/2014 - 10:25 नवीन
स्वतंत्र विदर्भ करणार आहेत की नाही.. तिथे मोदी मी दिल्लीत असेल पर्यंत अखंड महाराष्ट्र राहिल म्हणुन वचने देत फिरत आहे आणि फडणवीस हे स्वतंत्र विदर्भ होणारच म्हणुन ओरडत फिरत आहे ( उगाच आरडाओरडा करणे ही त्यांची फॅशन आहे ) पक्षातच विरोधाभास आहे तर राज्य देश काय चालवणार हे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा