Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंक्चरवाल्यांची चालुगिरी

र
राजेंद्र मेहेंदळे
Wed, 10/08/2014 - 10:14
🗣 132 प्रतिसाद
मंडळी आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल. प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १० ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते. त्याने अजुन एका पोराच्या मदतीने पटपट बोल्ट काढले आणि ट्युबमध्ये हवा भरुन चेक करायला घेतले.मी बाजुलाच उभा राहुन बघत होतो.पाहता पाहता बेट्याने ४ पंक्चर खडुने दाखवले.म्हणजे किमन १२० रुपयाला फटका.त्याच्या मदतनीसाने लगेच मशीन गरम करायला लावले आणि पंक्चर काढायची तयारी केली. तोवर पहील्याने काळजीपुर्वक टायर चेक करायला घेतला.गप्पा मारता मारता "गाडी कितना साल हुवा?" (प्रत्येक टायरवाला हा प्रश्न विचारतोच्..त्याचे कारण माहीत नाही.) वगैरे विचारतानाच त्याने २ ठीकाणी टायर कट झालेला दाखवला. वरती एक छोटा खिळा काढुन दाखवला. मग २ प्रकारचे रबरी पॅच दाखवले..त्यातला मोठा (आणि जास्त किंमतीचा) गळ्यात मारला. असे करुन ४२० रुपये उकळले (मला ४२० बनवले). रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचलो. प्रसंग २-स्थळ-वाकडेवाडी वेळ-दुपारी १२ तपशील थोड्या फरकाने सेम. ६०० रुपयाला फटका. एकदोनदा मी फक्त ट्युबचे पक्चर काढुन घेतले..पण टायरला पॅच मारला नाही...दोन दिवसात पुन्हा पंक्चर होउन डबल खर्च झाला. काही प्रश्न--- पेट्रोल पंप वाले कसे बनवतात हे सर्वांना थोडेफार माहीत आहे. हे टायरवाले नक्की कसे चुना लावतात? टायरला आतुन पॅच मारायची खरंच गरज असते का?की ती एक बिझनेस ट्रिक आहे? टायरवाल्यांचे ट्युबचे भाव एरियानुसार का बदलतात? जी ट्युब गावात २०० रुपयाखाली मिळते तीच हिंजवडीला २५० चे का होते? चांगल्या कंपनीची एक्स्ट्रा ट्युब घेउन ठेवल्यास किती दिवस टिकते? रस्त्यात एव्हढे खिळे/चुका कुठुन येतात? तुम्ही या प्रसंगात कसे वागता? या लोकांकडुन न फसण्यासाठी काही टिप्स मिळतील का?

प्रतिक्रिया द्या
25830 वाचन

💬 प्रतिसाद (132)
आ
आनन्दा Wed, 10/08/2014 - 20:24 नवीन
टयुबलेस टायरला मी फक्त हवा भर म्हणून सांगतो. पंच वगैरे काय ते मी नंतर बघेन.
  • Log in or register to post comments
र
रवीराज Wed, 10/08/2014 - 20:53 नवीन
औंधवरुन वाकडला जाताना जगताप डेअरीच्या पुढे ३-४ उत्तर भारतीय पंक्चर वाल्यांची दुकाने ओळीने थोड्या-थोड्या अंतरावर आहेत त्यातल्याच एकाकडे हवा चेक करायला थांबलो, हवा भरताना मीही त्या हिंदी भाषकाबरोबर गाडीला फेरी मारुन लक्ष ठेवुन होतो, शेवटच्या चाकाला त्याने पंक्चर जाहिर केले पण मी पाहिले होते तो हवा भरायच्या ऐवजी हवा सोडत होता.नीट हवा भरायला सांगीतले तरी त्याचे म्हणणे होते एकबार चेक कर के देखे,त्याला दरडावुन तशीच हवा भरायला सांगीतले, सकाळी-सकाळी किरकिर नको म्हणुण काही न बोलता गाडी काढली आणि डायरेक्ट बेंगलोर बायपास वरुन वारजे गाठले हायवेवर पुन्हा हवा चेक केली आणि १८० किमी पर्यंत रनींग होऊनही चाकातली हवा जैसे थे. असाच प्रकार परत एकदा आंबेगाव दरीपुलाच्या पुढे बोगद्याच्या अलीकडे एका पंक्चर वाल्याने केला.पुर्वानुभवाने मी त्याला "हवा भर पुढे बघु" सांगितले आणि पुढेपण कुठेच हवा चेक नाही केली, कसलीही अडचण न येता ट्रिप पुर्ण झाली.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 10/09/2014 - 02:29 नवीन
इथं बरेच समदु:खी सापडले. गविंची आयडिया व निरिक्ष्ण लक्षांत घ्या ! मला ही असाच संशय आहे. बाकी केरळी पम्चरवाले प्रामाणिक असतात हे खरेच ! नुकतेच मी एकाच वेळी सात पंकचर काढलेत. आता कानाला खडा. जिथे फकस्त हवा भरून मिळ्ते तिथेच हवा भरायची !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 04:06 नवीन
या धाग्यामुळे बर्‍याच उपयुक्त क्लृप्त्या कळल्या. पुण्यात राहणार्‍या माझ्या भावालाही बाणेर - पाषाण भागांत या प्रकारचे वाईट अनुभव आले. आता हवा कमी असल्यास रस्त्यात हवा भरून तो तडक पौड रोडवरच्या कुलकर्णी टायर्सला गाडी घेऊन जातो. विश्वासार्ह व वाजवी दरात सेवा असल्याने निश्चिंत राहता येते.
  • Log in or register to post comments
M
Maharani गुरुवार, 10/09/2014 - 06:08 नवीन
कोथरुड ला गीताई मॉल च्या सिग्नल ला ८/९ वर्षंपुर्वी ३ वेळा गाड़ी पंक्चर झाली होती..नंतर बऱ्याच जणांकडून असाच अनुभव ऐकला...तिथेच बाजुला तेंव्हा पंक्चर च दुकान होतं..तो रस्त्यात काही टोकदार टाकत असावा असा सौंशय.. तिथेच पलिकडच्या बाजूला दुर्गा cafe च्या जवळ पण तेंव्हा एक पंक्चर वाला होता.एकदा गाडीत हवा कमी वाटली म्हणून गेले होते टा तर पंक्चर म्हणून सांगितले.संशय आल्याने मी त्याला फ़क्त हवा भर सांगीतलं..... मग नेहमीच्या माणसाकडे चेक केलं तर तो म्हणे काही पंक्चर वगैरे नाहीये..
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 10/09/2014 - 07:45 नवीन
हे आता कॉमन झालंय. मध्ये पोलीसांनी खडकी दापोडी रोड ला बसणार्‍या पंक्चर वाल्यांना या बद्दल टोले हाणले असं वाचलं. मग प्रकार बंद झाले म्हणे. बाकी दुसर्‍याला अडचणीत पाडून तो सोडवण्याचा बिझनेस करणार्‍यांना (उदा: राजकारणी, रस्ते खोदून टेंडर मिळवणारे, सॉफ्टवेयर व्हायरस सोडून त्यावर सोल्युशन बनवणारे ई.) मृत्युदंड द्यावा असे माझे मत आहे. लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Maharani
म
मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 07:51 नवीन
भ्रष्ट्र राजकारण्यांवर देशद्रोह करतात त्यामुळे त्यांना मृत्युदंड द्यावा या मताशी मी १००% सहमत ! माजलेले सांड-वळु झाले आहेत हरामखोर ! *diablo* लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून. चांगल्या सर्जरीची गरज आहे देशाला ! पाकड्यांवर सुद्धा चांगल्या सर्जरीची गरज आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सार्थबोध Fri, 10/10/2014 - 07:02 नवीन
विषय खरा आहे, पंक्चर वाले फसव्तातच, चार चाकी गाडी असेल तर हायवे वर कधीच हवा भरू नका, आपण घरातून निघताना विचार अक्रतो, कि गर्दीतून लवकर बाहेर पडू हायवे वर निवांत पेट्रोल हवा भरू , तसे करू नका, माझा अनुभव हायवे ला गाडी लावली कि यांचे लोक पुढे मागे उभे असतात, काही तरी अनुकाचीदार वस्तूने ते तयार च्या बाजूला ( जिथे रस्त्याचा स्पर्श होत नाही तिथे) भोक पडतात, सलग २/३ , आणि म्हणतात क्या साब किदर गाडी डाला, जिथे तयार रस्त्याला स्पर्श करतो त्यात मोल्डिंग मध्ये तारा वापरलेल्या असतात त्यामुळे त्यांना तिथे भोक पडता येत नाही, लक्षात घ्या जिथे रस्ता स्पर्श होत नाही तिथे पंक्चर व्हायला आपण काही रजनीकांत नाही गाडी चालवायला, पुन्हा तयार काढताना हे लोक, वाल्व अक्षरशः पातीचा कांदा खुद्ल्यासारखा खुडतात.त्यामुळे हायवेवर पंक्चर हवा करणे नाही, फार तर स्टेफनी टाकून घ्या, नंतर नेहमीच्या माणसाकडे पंक्चर काढा, हवा भरताना ४ चाकांवर लक्ष ठेवा ( थोडे अवघड असते, पण पुढचा मनस्ताप आणि खर्च टाळण्यासाठी) . पेट्रोल भरताना पण भरणारा माणूस मुद्दाम झिरो रीडिंग स्क्रीन च्या समोर अडवा उभा राहतो, आपण तोवर पेट्रोल चे कुलूप उघडायचे नाही, तेवढ्यात दुसरा येतो म्हणतो अरे साहेब ते पेट्रोल चे लोकक बघा खराब झाले काय हो?, किंवा हे लिक्विड टाकू का, आपल्यासमोर ते पुडके नाचवतो , किंवा चार चाकी ला काच पुसू का?, पोलिश फुकट कराय्त्चे का? विचारतात, उद्देश एकाच कि झिरो स्क्रीन वरून लक्ष हटवायचे आणि आधी जे काही ५०/१००/१५०/२०० रीडिंग पेट्रोल टाकले आहे त्याचा तसाच कट पळवायचा, प्रत्याक्ष्जात पेट्रोल टाकायचे नाही किंवा १५० असेल तर फक्त २०० करायचे कमी टाकायचे. दुसरी गोष्ट आपण २०० म्हणलो तरी आधी समजा १०० आकडा असेल तर असे स्क्रीन च्या आड येउन नुसते पेट्रोल टाकल्यासारखे करतात , १०० टाकले म्हणतात आपल्याला आधीचेच रीडिंग दाखवतात, वर १०० टाकतात आणि २०० रुपये घेतात.त्यामुळे बोटाने खुण करून आणि जरा मोठ्या आवाजात स्पष्ट सांगायचे किती रुपायचे ते खबरदारी घ्या. मिपाकरांनो
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Fri, 10/10/2014 - 22:56 नवीन
सुलभ शौचालय वाल्यांची चालूगिरी असा विडंबनात्मक प्रयत्न करायचा विचार डोक्यात आला पण खुपच आचरट्पणा होईल म्हणुन सोडुन दिला :-) बाकी ह्या चलाखीला मीही भारतात असताना खुप वेळेस फसलो आहे... बर्‍याच जणांनी ईथे फार चांगले उपाय सुचवले आहेत. त्या निमित्ताने सर्वांनी जर जागरुकपणा दाखवला तर या प्रकाराला थोडा तरी आळा बसेल अशी आशा!!
  • Log in or register to post comments
ब
बिहाग Tue, 10/14/2014 - 09:19 नवीन
ट्युब लेस वापरा. हवा गेलि तरि बरेच दिवस चालते. नंतर सवड असेल तेव्हा पंक्चर काढ
  • Log in or register to post comments
ब
बिहाग Tue, 10/14/2014 - 09:25 नवीन
( Modes pl move this to appropriate place ) ( It took 20 mins to type above line in marathi though I am using computer keyboard for more than 20 years ) . Which browesr should be used? On firefox gamabhana.js hangs , so I am using opera. But really is there any better way to type using gamabhana? Though I am member didn't dare to post any comment in past 2 years as it take soo long to type even a single line. Thanks for the help.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Tue, 10/14/2014 - 10:24 नवीन
आय अ‍ॅग्री. इट टेक्स लॉट ऑफ टाईम टू टाईप. दॅट ईज द रिझन आय कॅन नॉट राईट मोअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिहाग
प
पाषाणभेद Tue, 10/21/2014 - 12:01 नवीन
(ंओदेस प्ल मोवे थिस तो अप्प्रोप्रिअते प्लचे) (ईत तूक २० मिन्स तो त्य्पे अबोवे लिने इन मरथि थोउघ ई अम उसिन्ग चोम्पुतेर केय्बोअर्द फोर मोरे थन २० येअर्स). व्हिच ब्रोव्सेर शोउल्द बे उसेद? ऑन फिरेफोक्ष गमभन.ज्स हन्ग्स , दो ई अम उसिन्ग ओपेर. बुत रेअल्ल्य इस....... लय कटाळा आला राव. आवं पावनं विंग्रजी मधी टायप करन लय आवघड हाय आपल्या गमभन पेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ट
टवाळ कार्टा Tue, 10/21/2014 - 12:48 नवीन
इथे मराठीची "ग..म..भ..न" झालीये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
अ
अभिजित - १ Mon, 10/20/2014 - 17:58 नवीन
३३ ऐवजी ४० भरतात हवा . मी आता फक्त पेट्रोल पंप वर हवा भरतो.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 07:45 नवीन
मी २-४ महिने रोज बाईक चालवत ऑफिसला जाणारे.. दुसरा काही पर्याय नाहीये. त्यात मला हे पंक्चरची भानगड नीटशी कळत नाही. मी साधं हवा भरायला गेले तरी लोक पंक्चर आहे असं सांगतात. आणि मग किमान ५००-७०० चा फटका. नवरा हे सगळं बघायचा. आता मला एकटीला गाडी न्यायची आहे. मला रस्त्यात गाडी पंक्चर होऊन (येताना झाली तर अंधारात...) ढकलत वगैरे नेण्याची इच्छा नाहीये.. मी ट्युबलेस टायर लावुन घेऊ का? काही तरी उपाय सांगा राव.. आज सकाळीच गाडी पंक्चर आहे म्हणुन हवा भरुन घरी लावुन ठेवली आणि बसने धक्के खात आलेय. पण पंक्चर काढलं नाही.. त्यापेक्षा टयरच बदलुन घेते ना.. १५ दिवसा पुर्वीच ७०० रुपये घालुन नवी ट्युब, २ पॅच चा सोहळा करुन घेतलाय भर उन्हात.. परत नाहि करु शकत मी हे...
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 08:08 नवीन
पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज घ्या ना बसवुन. ५००-७०० ला कशाला फटका लागेल? कुठली बायको आहे तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रन्गि पाउस Fri, 03/27/2015 - 08:13 नवीन
अमृत मासिकात येणारे उसंदू वगैरे आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 08:21 नवीन
उसंदु काय प्रकार आहे विअर्ड रेन साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस Fri, 03/27/2015 - 08:26 नवीन
उप संपादकाच्या डुलक्या आता त्याला आपण typos ...म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 08:16 नवीन
मीच एक बायको आहे.. माझ्या नवर्‍याची.. माझ्याकडे आणखीन कुठे बायको असायला.. तेवढी मी भाग्यवान नाही हो..! असो.. बाईक म्हणजे अ‍ॅक्सेस आहे.. आणि "पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज" म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 08:20 नवीन
अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. :'( ट्विन लेयर ट्युब्ज असतात. दोन लेयर्स च्या मधे अँटी पंक्चर जेल भरलेलं असतं. ट्युब ला छोटं पंक्चर असेल तर तिथुन ते सोल्युशन बाहेर येउन घट्ट बसतं आणि गाडी पंक्चर होत नाही. थोड्या महाग असतात त्या ट्युब्ज पण वेळप्रसंगी खुप कामाला येतात. अ‍ॅक्सेस ला बहुतेक मागच्या चाकाला बाय डिफॉल्ट ती ट्युब असावी असा अंदाज आहे. शोरुमला चौकशी करा. नसेल तर बसवुन घ्या. अंदाजे दोन्ही चाकाला मिळुन १७०० ते २००० रुपये खर्च असेल. कमीही असु शकेल पण जास्तं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 08:22 नवीन
नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. पण बसवुन घेते मग.. कारण पंक्चरवर अजुन खर्च.. वेळ आणि मनस्ताप.. काही करुन घेउ शकत नाही मी आता.. माहितीसाठी धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 08:28 नवीन
ट्युबलेस ची पण चौकशी करा. किंमतीचा अंदाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
टवाळ कार्टा Fri, 03/27/2015 - 08:30 नवीन
अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. Cray 2
असे नको लिहूस...ब्यॅट्यॅच्या आणि माझ्या पंगतीला येउन बसशील मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 08:31 नवीन
मी तुझ्या आणि खाटुकच्या पंगतीमधे नाहीये असं म्हणायचय का तुला? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 03/27/2015 - 08:57 नवीन
खाटूक आणि माझ्यावर बरेच शिक्के बसलेत...त्यातला १ अजूनतरी तुझ्यावर नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 09:09 नवीन
व्यनि कर किंवा व्हॉट्स अ‍ॅप वर सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 03/27/2015 - 09:15 नवीन
कुठला ओ कुठला तो शिक्का म्हणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 03/27/2015 - 09:33 नवीन
तोच तो...मिपावरच्या काही विशिष्ठ शक्तींच्या विरोधात लिहिण्याचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 03/27/2015 - 09:38 नवीन
अब मिपा की कोई भी ताकत हमें उनके खिलाफ लिखनेसे नै रोक सकती- सिवाय संमं के ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 09:59 नवीन
काम झालेलं दिसतय :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हाडक्या Mon, 03/30/2015 - 11:41 नवीन
काठी न घोंगडं घेऊ द्या की रं, अन मला बी जत्रंला येऊ द्या की रं.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मोदक Fri, 03/27/2015 - 09:57 नवीन
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही. त्याचा कोणाला काही अनुभव आहे का..? या सोल्यूशनमुळे रीम खराब होते असे ऐकले आहे. हे कितपत खरे आहे..? हे सोल्यूशन सायकल आणि दुचाकीमध्ये वापरावयाचे आहे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 10:00 नवीन
कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो तशी ट्युब बसवुन घ्यायची. हल्ली बुलेटसाठीही मिळतात. एकदा युनिकॉर्न पंक्चर झालेली तेव्हा ढकलताना पणजी आज्जीच्या खापरपणजीआज्जीची आठवण आलेली ३-४ किमी ढकलताना. बुलेट बसली तर झालं मग काम तमाम,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 03/27/2015 - 12:16 नवीन
बुलेट बसली की उठत नाही राव … ट्यूब सोडाच, टायरपण खाउन टाकते … अन ढेकर पण देत नाही. शिवाय अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात! मग अजून वणवण *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/27/2015 - 12:23 नवीन
=)) हायला मिपावर एक अनिरुद्ध कट्टा करायचा का? तुम्ही चौथे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 03/31/2015 - 11:46 नवीन
एकुलता एकच असायचो मी :D शाळा, कॉलेजमध्ये अनिरुद्ध नावाचे फार कमी लोक्स :) जरूर करूयात कट्टा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 11:50 नवीन
अन्या दातार वाचु र्‍हायला का बे!!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
मोदक Fri, 03/27/2015 - 12:37 नवीन
अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात ही पण भानगड आहे का..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 03/31/2015 - 11:52 नवीन
मला ४ ५ जण नाही म्हणालेत. चाक काढायला स्पेशल पाने लागतात म्हणे. एक हिरोतर चाक दुसरीकडून काढून इकडे घेऊन या असा सल्ला देऊन मोकळा झाला. माझ नशीब चांगल की पंक्चर बारीक होत त्यामुळे हवा भरून दुसरीकडे जाता येत होत. नाहीतर थंडरबर्डच २०० किलोच धूड ढकलत हायवेवर फिरायची पाळी येणार होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 03/30/2015 - 05:25 नवीन
मी चांदणी चौक (अपाचे) ते डांगे चौक (पदमजी पेपरमिल) इतके अंतर सीबीझी ढकलत नेली होती!!! अपाचे मधे जितकी बियर ढोसली होती त्याच्या पाचपट घाम निघाला होता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
ब़जरबट्टू Mon, 03/30/2015 - 07:15 नवीन
इत्ता दुर तक ढकले ?? सही मे ज्यादा पी थी लगती मिंया तुमने... सन्नी देओल बन गये यारों... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ट
टवाळ कार्टा Fri, 03/27/2015 - 10:02 नवीन
माहिती मिळाली तर मल पण कळवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गवि Fri, 03/27/2015 - 12:42 नवीन
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.
@मोदकराव, या उत्पादनाची होमशॉप१८छाप जाहिरात मी अनेकदा बघितली आहे. प्रीमियम किंवा मेनस्ट्रीम मार्केटमधे मात्र हे पाहिलेलं नाही. याविषयी मला तीव्र शंका अशी आहे की इतका सहज सोपा प्रकार असता तर टायर कंपन्यांनी ट्यूब्ज मुळातच अशा मटेरियलच्या बनवून "पंक्चरलेस ट्यूब्ज" म्हणून जास्त किंमतीला विकल्या असत्या. समजा तशा ट्यूब नाही बनवल्या तरी गेलाबाजार निदान एमारेफ, सिएट वगैरेंनी हे सोल्युशन स्वतःच्या ब्रँडनेमने नक्की काढून विकले असते. इतके मोठे बिझनेस पोटेन्शियल छोट्या छोट्या केमिकल कंपन्यांकडे अथवा पेट्रोलपंपावरच्या फिरत्या विक्रेत्यांकडे जाऊ देऊन त्यांना कसे परवडेल. (सीएनजी किट गल्लीतल्या गॅरेजमधे बरेचजण बसवून देत असतील, पण कंपनी फिट सीएनजी किट किंवा सीएनजी व्हेरियंट कसे असतात तसं) याचा अर्थ ते सोल्युशन ट्यूबेत भरल्यावर काहीतरी समस्या (मायलेजवर परिणाम, टायरचा ड्रॅग वाढून जास्त घासणे किंवा काहीतरी होत असणार अशी मला शंका आहे. एरवी हे उत्पादन सर्वज्ञात आणि सर्वमान्य व्हायला हवं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Fri, 03/27/2015 - 15:24 नवीन
गवि साहेब माझ्या होंडा युनिकोर्नला हि टफ अप ट्यूब आहे आणी ती खरोखरच काम करते. आत्तापर्यंतच्या ३५००० किमी मध्ये फक्त तीन वेळा पंक्चर झाली आहे आणी इतक्या लोकांनि लिहिले आहे तसे मी कधीच कुणाला पैसे दिले नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे पंक्चर लक्षात आले कि उतरायचे मधील खिळा काढून टाकायचा आणी शिस्तीत त्यावर बसून पहिल्या गियर मध्ये टायरवाल्यापर्यंत जायचे. त्याने नखरे चालू केले तर पुढे जातो म्हणायचे. मुळात तुम्ही त्यावर बसून चालवत आलात म्हणजे तुम्ही गरजू नाही हे त्याला कळते. एक दोन लोकानी मला ट्यूब खराब झाली बदलून देतो म्हणाले त्यावर मी त्यांना स्पष्ट पणे नाही म्हणालो. पंक्चर काढायचे तर काढ नाही तर परत बसवून दे. गपचूप काम करून देतात. http://www.cityhondaonline.in/products-honda-unicorn-features.html http://www.honda2wheelersindia.com/unicorn/tuffup.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मोदक Mon, 03/30/2015 - 08:46 नवीन
धन्यवाद गवि..!! चाकांमध्ये नायट्रोजन वापराचा काही अनुभव आहे का..? त्यामुळे टायर तापत नाही असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
टवाळ कार्टा Mon, 03/30/2015 - 08:54 नवीन
साध्या हवेत पण ७४% नायट्रोजन असतोच की...मला पण समजत नाही की त्या बाकी २६% ने असा काय फरक पडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/30/2015 - 11:33 नवीन
लॅांग ड्राईव्ह ला फरक पडतो. टायर जास्त थंड राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/30/2015 - 11:41 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा