पंक्चरवाल्यांची चालुगिरी
मंडळी
आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल.
प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १०
ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते. त्याने अजुन एका पोराच्या मदतीने पटपट बोल्ट काढले आणि ट्युबमध्ये हवा भरुन चेक करायला घेतले.मी बाजुलाच उभा राहुन बघत होतो.पाहता पाहता बेट्याने ४ पंक्चर खडुने दाखवले.म्हणजे किमन १२० रुपयाला फटका.त्याच्या मदतनीसाने लगेच मशीन गरम करायला लावले आणि पंक्चर काढायची तयारी केली. तोवर पहील्याने काळजीपुर्वक टायर चेक करायला घेतला.गप्पा मारता मारता "गाडी कितना साल हुवा?" (प्रत्येक टायरवाला हा प्रश्न विचारतोच्..त्याचे कारण माहीत नाही.) वगैरे विचारतानाच त्याने २ ठीकाणी टायर कट झालेला दाखवला. वरती एक छोटा खिळा काढुन दाखवला. मग २ प्रकारचे रबरी पॅच दाखवले..त्यातला मोठा (आणि जास्त किंमतीचा) गळ्यात मारला. असे करुन ४२० रुपये उकळले (मला ४२० बनवले). रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचलो.
प्रसंग २-स्थळ-वाकडेवाडी वेळ-दुपारी १२
तपशील थोड्या फरकाने सेम. ६०० रुपयाला फटका.
एकदोनदा मी फक्त ट्युबचे पक्चर काढुन घेतले..पण टायरला पॅच मारला नाही...दोन दिवसात पुन्हा पंक्चर होउन डबल खर्च झाला.
काही प्रश्न---
पेट्रोल पंप वाले कसे बनवतात हे सर्वांना थोडेफार माहीत आहे. हे टायरवाले नक्की कसे चुना लावतात?
टायरला आतुन पॅच मारायची खरंच गरज असते का?की ती एक बिझनेस ट्रिक आहे?
टायरवाल्यांचे ट्युबचे भाव एरियानुसार का बदलतात? जी ट्युब गावात २०० रुपयाखाली मिळते तीच हिंजवडीला २५० चे का होते?
चांगल्या कंपनीची एक्स्ट्रा ट्युब घेउन ठेवल्यास किती दिवस टिकते?
रस्त्यात एव्हढे खिळे/चुका कुठुन येतात?
तुम्ही या प्रसंगात कसे वागता? या लोकांकडुन न फसण्यासाठी काही टिप्स मिळतील का?
- लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
- वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
- ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
- असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत
. उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }