Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र"

व
विटेकर
गुरुवार, 10/16/2014 - 11:23
🗣 114 प्रतिसाद
विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो. पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे ! - पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे. ( पुण्यातल्या पुण्यात देखील विविध दर्‍या आहेत, जसे की नदी पलिकडचे आणि अलिकडचे , पण त्याचा विचार नंतर करु) ही दरी आपण मिपावरही अनेक वेळा अनुभवली असेलच. - जे पूण्यात आहे ते इतरत्र नाही आणि जे पुण्यात नाही (पुणे तिथे खरे म्हणजे काय उणे ?) त्याची पुण्याला गरज नाही.जसे की मुंबईची लोकल पुण्याला नको आहे , नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको ) - पुण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. वास्तविक खर्‍या इतिहास हा पुण्याचाच ! बाकीचे सारे इतिहास विषयापुरते !आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - पुणे आज ही ऐतिहासिक शहर आहे ,इथल्या जाज्वल्य परंपरांचा इथल्या लोकांना प्रचंड अभिमाण आहे ! उदा. टांगेवाले गेले आणि रिक्षावाले आले .. पण मग्रुरी? तीच ....! घोडे गेले, सायकली गेल्या , स्वयंचलित आल्या पण रस्त्यावर आपलेच घोडे दामट्ण्याचे पुणेरी रक्त ? अजूनही तेच आहे ! आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - बारभाई गेले पण पुण्याच्या सोसायट्यांमधील कारस्थाने ? .. अजून सुरुच आहे. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - पुण्यातील बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधील खोल्याखोल्यात " विद्वान" जन्माला येतात, जिज्ञासूनी अधिक माहीती घ्यावी. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? यांसारखे अजून बरेच मुद्दे आहेत आणि प्रस्ताव पुढे जाईल तसे अधिकाधिक सुचत जातील. तुमचे काय मत आहे या प्रस्तावावर?

प्रतिक्रिया द्या
25368 वाचन

💬 प्रतिसाद (114)
ए
एस गुरुवार, 10/16/2014 - 11:47 नवीन
पुणे ह्या विषयावर बोलण्याचा आपला वकूब नसताना काही मंडळी उगाचच तसे करून स्वतःचे हसे करून घेत असतात. मिपावरही भरपूर आहेत. चालू द्यात. चालू द्यात!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/16/2014 - 15:35 नवीन
लुना वाले ब्रह्मे आणि पा.पो. मॅडमच जास्त सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/18/2014 - 05:06 नवीन
=)) पा.पो. नै कै....पो.पा. लुनावाले ब्रम्हे, पोतदार-पावसकर मॅडम, सप्तर्षीबैंच मांजर हे सगळे पुण्याचे अलंकार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ह
हरकाम्या Sat, 10/18/2014 - 10:51 नवीन
हे " लुनावाले ब्रम्हे " कोण आणि त्यांची लुना अजुन जिवन्त आहे का ? का ती गेली केळकर संग्रहालयाची शोभा वाढवायला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ल
लव उ Sat, 10/18/2014 - 13:27 नवीन
http://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/19/2014 - 05:06 नवीन
नुसता लेख वाचु नका खालच्या प्रतिक्रिया पण वाचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लव उ
इ
इरसाल Mon, 10/20/2014 - 13:06 नवीन
मी तर तो लेख माझ्या क्रोम मधे बुकमार्क करुन ठेवलाय. जेव्हा पाहिजे तेव्हा वाचता यावा.आणी अजुन एक आहे मांजराचा पण. करमणुक मांजराची असा आहे. ही लिंक http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4612028515630603865
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/20/2014 - 18:59 नवीन
तेच हो. सप्तर्षीबैंच मांजर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
व
विलासराव गुरुवार, 10/16/2014 - 11:47 नवीन
विटूकाका अध्यात्माची नवीन शाखा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 12:53 नवीन
@अध्यात्माची नवीन शाखा>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 10/16/2014 - 11:56 नवीन
सदशिव पेठ नावच स्वतन्त्र "राष्ट्र" अस असत तर अजुन अचुक झाल असत
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 12:21 नवीन
अगदी, याहूनही अचूक बोललो असतो पण नसतीं राळ उडायचीं!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
क
काळा पहाड गुरुवार, 10/16/2014 - 12:04 नवीन
वेगळं कोथरूड झालंच पाहीजे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 10/16/2014 - 15:03 नवीन
कोथरूड ला कोण राज्य करतात याच्याशी आम्हाला काही देण घेण नाही पण माझ्या भुसारी कॉलनीत जर कोथरूड वाल्यानो लक्ष घालाल तर गाठ या राज भुसारी शी आहे. कोथ्रूडच्या खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी डाव्या भुसारीच्या उधोदादाला धाडतोच मग ! मायला काय व्हील ते जाईल ! पुण्ययनगरीनियमदीपिका गेली खड्ड्यात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड गुरुवार, 10/16/2014 - 18:41 नवीन
- प्रति, राज भुसारी साहेब, डावी भुसारी आमचे उजव्या भुसारी राज्याशी सैनीकी संबंध आहेत हे लक्षात घ्या. तुमच्या पाण्याच्या साठ्यांवर धाड घालायला उजव्या भुसारीचे पंतप्रधान श्री. जानकर तयारच आहेत हे लक्षात ठेवावे. बाणेर देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी (श्री. आठवलेंनी) तिकडची सीमा बंद करायचं मान्य केलं आहे. वारजे राष्ट्राच्या सीमेवर आमच्या फौजा गस्त घालतच आहेत. आणि बावधन देशाशी तुमचं शत्रुत्व आहेच. तेव्हा तुमच्या चतु:सीमा आम्ही बंद केल्या आहेत. आता तुमच्या जनतेला कसा प्रवास करायचा आणि भाजी आणि धान्य कुठून आणायचं ते नीट समजावून सांगा. शिवाय कोथरूड ची सर्व कीलोग्रेड अण्वस्त्रे आम्ही डाव्या भुसारी च्या सीमेवर तैनात केलेली आहेत. नारायणपेठ देशाचे सरसेनापती श्री. राणे यांनी उधोदादांशी दोन हात करायला उत्सुकता दर्शवली आहे आणि गेले काही दिवस ते जोरबैठका काढण्यात मग्न आहेत. उधोदादांना पाठवून द्याच. - आपला, अफजलखान, प्रधानसेवक, कोथरूड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Fri, 10/17/2014 - 03:31 नवीन
ह ह पु वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 07:24 नवीन
चोक्कस ! येत्या शनिवारी शिवतिर्थनगरचा अनुशेष भरुन काढ्ण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल. लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
पैसा Fri, 10/17/2014 - 07:34 नवीन
नंतरची सभा कुठे? लकडी पुलावर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 07:38 नवीन
नाही !! तुम्हारा चुक्याच ! नंतरची सभा म्हातोबाच्या डोंगरावर ...... त्या सीमा एकदा निश्चित केल्याच पाहीजेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 10/17/2014 - 07:50 नवीन
ते तुम्ही कोथरुडकर आणि हिंगणेकरांनी बघून घ्या हो! आम्ही आपले काही झाले तरी टाळ्या वाजवणार! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
किसन शिंदे गुरुवार, 10/16/2014 - 12:42 नवीन
नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको )
नक्की कुठून ते कुठपर्यंत असणारं पुणे तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अपेक्षित आहे?
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 10/16/2014 - 13:00 नवीन
शिळ्या कढीला उत !!
  • Log in or register to post comments
र
रवीराज गुरुवार, 10/16/2014 - 13:26 नवीन
जेथवर नजर जाईल तेथवर..... फक्त उभे कुठे रहायचे, शनिवार वाडा की पर्वती हाच प्रश्न शिल्लक आहे.
  • Log in or register to post comments
र
रवीराज गुरुवार, 10/16/2014 - 13:26 नवीन
जेथवर नजर जाईल तेथवर..... फक्त उभे कुठे रहायचे, शनिवार वाडा की पर्वती हाच प्रश्न शिल्लक आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 10/16/2014 - 13:32 नवीन
आमाला वेगळ वडगाव बुद्रुक दिलाच पायजे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 10/16/2014 - 16:31 नवीन
चुकून वे(ड)गळ वडगाव बुद्रुक वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
र
रेवती गुरुवार, 10/16/2014 - 14:07 नवीन
अरे काय हसवताय! लेख वाचला नाही पण प्रतिक्रिया मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 10/16/2014 - 14:31 नवीन
स्वातंत्र्य कशाला पाहिजे, प्रत्येक पुणेकर हे एक स्वतंत्र राष्ट्र असते.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 14:33 नवीन
तीव्र (हल्लीच्या फ्याशननुसार) सहमती!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 14:44 नवीन
साडेचार वर्ष मिपा-वयाला (हल्ली :p ) वयोवृद्ध म्हणतात काय हो??? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 14:48 नवीन
साडेतीन वर्षाचं मिपावय जर ल्ल्ल्ल्लू करणारं बाळवय असेल तर साडेचार वर्ष वयोवृद्ध असायला काय्येक हरकत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 14:53 नवीन
@असायला काय्येक हरकत नाही. >>> अच्च होय! :D त्यात फक्त दिडच वर्ष पुरलं! :p चालायचच!!! असो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 14:54 नवीन
साडेचार वजा साडेतीन= एक वर्ष !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 18:08 नवीन
ठिक हो.. पण आपल्या वयाचं काय? मी आपलं माप-काढलवतं..(दिड वर्ष वजावटीचं! :p ) ते सोइस्करपणे कसं टाळलंतं? =)) भारीच द्वाड हो सुडुकशेट! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 18:43 नवीन
>>मी आपलं माप-काढलवतं..(दिड वर्ष वजावटीचं! ) ते सोइस्करपणे कसं टाळलंतं? छे टाळलं कुठे? मान्य आहे की !! >>भारीच द्वाड हो सुडुकशेट! मिपावर नवीन कुठेय हा द्वाडपणा !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 18:51 नवीन
अचानक.. ते नविनच असतं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 19:54 नवीन
>>अचानक.. ते नविनच असतं! माझ्या (तुम्ही म्हटल्यानुसार) दीड वर्षाच्या बाळबुद्धीला याचा अर्थ कळलेला नाही. पण 'शेवटचा प्रतिसाद माझाच' हा हट्ट असेल तर चालू देत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 05:55 नवीन
अतितीव्र सहमती ... नदिच्या अलिकडल्या लोकांनी "तीव्रतर सहमती" म्हणावे हवे तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/16/2014 - 14:43 नवीन
ते एक असो, पण मूळ लेखाचा विषय पुणे असूनही त्यातील १/३ शब्द 'पुणे' असे नसल्याबद्दल लेखाला फाऊल धरल्या गेले पाहिजे असा एक प्रस्ताव मांडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 10/16/2014 - 14:49 नवीन
अरे विटुकाका वरिजिनल पुणेकर नसतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 05:53 नवीन
तेच ते ! सकाळी इटं आन दुपारी उफराटं .... वालं विटा.... ( संदर्भ - माणदेशी माणसे - व्यंकटेश माडगूळ्कर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रवीराज गुरुवार, 10/16/2014 - 20:18 नवीन
त्यामुळेच तर दोन पुणेकर हमरी-तुमरी वर आल्याचे दृश्य वरचेवर पहायला मिळते आणि बऱ्याच वेळा शेजारी-शेजारी रहाणाऱ्यामधे भारत पाकिस्तान सारखे संबंध असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विटेकर गुरुवार, 10/16/2014 - 14:50 नवीन
संपादित ??? मिपावरील कायदा आणि सुव्यवस्था पार ढासळली आहे. लगेच राष्ट्रपती राजवट सुरु होते !
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/16/2014 - 14:55 नवीन
काय्ये ना काका, आपल्या लोकांना कुठं थांबायचं कळत नाही. आपली ती मस्करी अन दुसर्‍याची ती कुस्करी असं वाटतं. तेव्हा वेळीच खबरदारी घेतलेली बरी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 14:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/16/2014 - 15:32 नवीन
लूना वाले ब्रह्मे पण पुण्याचेच आणि पा.पो. मॅडम पण पुण्याच्याच... म्हणूनच मी शक्यतो पुण्याला यायचे टाळतो...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/16/2014 - 16:35 नवीन
आणखी येवू द्यात प्रतिसाद-सिंहगड रस्ता,पिंपरी,स्वारगेट्,विमाननगर्,कर्वे रस्ता, पर्वती... मिपाकर आहेत तिकडे..
  • Log in or register to post comments
व
विवेक्पूजा Fri, 10/17/2014 - 07:19 नवीन
माई काञज का विसरलात हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
काळा पहाड Fri, 10/17/2014 - 07:50 नवीन
कात्रज, धायरी, भोसरी आणि तत्सम विभाग पुण्यात येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक्पूजा
व
विजुभाऊ गुरुवार, 10/16/2014 - 17:05 नवीन
लूनावाल्या ब्रम्ह्याना " स्वतन्त्र्योत्तर पुण्यभूषण " मिळावा
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा