Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र"

व
विटेकर
गुरुवार, 10/16/2014 - 11:23
🗣 114 प्रतिसाद
विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो. पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे ! - पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे. ( पुण्यातल्या पुण्यात देखील विविध दर्‍या आहेत, जसे की नदी पलिकडचे आणि अलिकडचे , पण त्याचा विचार नंतर करु) ही दरी आपण मिपावरही अनेक वेळा अनुभवली असेलच. - जे पूण्यात आहे ते इतरत्र नाही आणि जे पुण्यात नाही (पुणे तिथे खरे म्हणजे काय उणे ?) त्याची पुण्याला गरज नाही.जसे की मुंबईची लोकल पुण्याला नको आहे , नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको ) - पुण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. वास्तविक खर्‍या इतिहास हा पुण्याचाच ! बाकीचे सारे इतिहास विषयापुरते !आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - पुणे आज ही ऐतिहासिक शहर आहे ,इथल्या जाज्वल्य परंपरांचा इथल्या लोकांना प्रचंड अभिमाण आहे ! उदा. टांगेवाले गेले आणि रिक्षावाले आले .. पण मग्रुरी? तीच ....! घोडे गेले, सायकली गेल्या , स्वयंचलित आल्या पण रस्त्यावर आपलेच घोडे दामट्ण्याचे पुणेरी रक्त ? अजूनही तेच आहे ! आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - बारभाई गेले पण पुण्याच्या सोसायट्यांमधील कारस्थाने ? .. अजून सुरुच आहे. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - पुण्यातील बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधील खोल्याखोल्यात " विद्वान" जन्माला येतात, जिज्ञासूनी अधिक माहीती घ्यावी. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? यांसारखे अजून बरेच मुद्दे आहेत आणि प्रस्ताव पुढे जाईल तसे अधिकाधिक सुचत जातील. तुमचे काय मत आहे या प्रस्तावावर?

प्रतिक्रिया द्या
25368 वाचन

💬 प्रतिसाद (114)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 18:17 नवीन
" पुणे " नावाचे एक स्व तंत्र = "राष्ट्र" ================================= मामला खलास! =))
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 10/16/2014 - 18:38 नवीन
लुनावाल्या ब्रह्म्यांचं एवढं का कौतुक कळत नाही. ४००० रुपये असे मूर्खपणाने घालवून वर ते असं जाहीररित्या सांगणारा माणूस पुण्याच्या सरहद्दीत पाऊल तरी ठेवायच्या लायकीचा आहे का?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/16/2014 - 19:04 नवीन
मलाही ब्रह्मेंचं कौतुक आहेच. का ते मात्र ठाऊक नाही. कदाचित पुरूष वाचक कधी काळी स्वतःचे'महागात पडलेले स्त्रिदाक्षिण्य' ब्रह्मेंच्या अनुभवाबरोबर जोडत असतील अन अप आपला एवढाही 'ब्रह्मे' झाला नाही असे समजून समाधान पावत असतील :-) . ज्युनिअर ब्रह्मेंचा तर मी चाहता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Fri, 10/17/2014 - 09:18 नवीन
मी गमतीने म्हणाले होते. एपिक ब्रह्मेचं मलाही कौतुक आहे. आणि ज्यु. ब्रह्मे तर क्लास... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/16/2014 - 21:28 नवीन
-एक तर लुनावाल्या ब्रह्म्यांचा इन्शिडेंट झाला युनवरशिटी रोडावर. म्हणजे प्रॉपर पुण्यात नव्हेच. भांबुर्ड्याच्याही पलीकडे. -जर गुज्जू समाजात त्यागाचे महत्त्व सांगणारे गांधी होऊ शकतात अन त्यांचं कौतुकही होऊ शकतं तर पुण्यात ब्रह्मेंनी काय लूना मारलीये? -तुम्ही गोवेकर उगीच अस्मिता घेऊन बसता पुण्याची. (आता पळतो) आपला, पुणकदेशस्थ प्रौढमिरजकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Fri, 10/17/2014 - 09:17 नवीन
-म्हंजे पुणे राष्ट्रात उच्च शिक्षण घेणार्‍या लोकांनी काय विसा घेऊन जायचं का युनिवरशिटीत? शेजारी राष्ट्रातील मिरजकर हा कुटील डाव खेळत असतील, तर आम्ही ग्लोबल शांतता नांदवण्यासाठी या प्रश्नात हस्तक्षेप करू.. -गुज्जू वेगळे, पुणेकर वेगळे. -तुमची अस्मिता तुम्हालाच लखलाभ. पण पुण्याची टिळकीय, आगरकरीय आयडेंटिटी पुसून तिला ब्रह्मीय आयडेंटिटी देण्याचे कारस्थान चालू असेल, तर मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने आम्ही हस्तक्षेप करु.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 10:42 नवीन
-व्हिसा घ्यावयाचा किंवा नाही, याचा निर्णय यथावकाश घेतल्या जाईलच. परंतु तो किस्सा 'पुण्या' त घडला नव्हता, हे नमूद करणे अवश्य वाटले. -हो वेगळेच, परंतु उपमेपुरते समजून घ्यावे. मीनाक्षी म्हटल्यावर पर अन शेपूट कुठाय ते विचारू नये. -पुण्याची आयडेंटिटी एका अर्थाने नेहमी 'ब्रह्मीय'च राहिलेली आहे की ओ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पैसा Fri, 10/17/2014 - 10:47 नवीन
अबोल्या, मिरजकर हे पुण्यातील शत्रुराष्ट्राचे हेर आहेत असे सकृद्दर्शेनी वाटले हों! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 10:52 नवीन
पुणकराष्ट्राच्या दक्षिणेतील मित्रराष्ट्राचे हेर ओ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 10/17/2014 - 10:55 नवीन
पुणकराष्ट्राला मित्र पण असतात? मला वाटले सगळ्या शत्रुराष्ट्रांनी घेरलेल्या भारतमातेची अवस्था असावी बिचार्‍यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 10:59 नवीन
सर्वांची नसली तरी पुणकराष्ट्रातल्या काही राज्यांची तशी अवस्था असेलही. ;) विशेषतः सदाशिविस्तान प्रांताची तशी अवस्था आहे असे कळते. (नावातला श्लेष अभावितपणे चपखल जमून गेला खरा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 11:12 नवीन
सदा-शिवि-स्तान श्लेष... मस्तच हो ब्याटमन भौ ! ( "बॅ" लिहायला शिकायचे ! हे " बॅ " चोप्य -पेस्त केलयं , नाहीतरी आमचे स्वराष्ट्र बान्धव लगेच विचारतील... ह्या ह्या ह्या , हे कसे लिहलेन म्हणून ? ( उपशन्का- सानुअनासिक लिपीत असे लिहितात? ) तेव्हा हा अगाऊ - म्हण्जे आडवान्स खुलासा केला आहे ) (पानपतोत्तर काळात पुण्यकराष्ट्रातील काही घराणी दक्षिणेकडे ( "रमणा"नव्हे हो... दक्षिण दिशा ) सरकली... बहुधा मिरज प्रांतात .. तिथली पूर्वापार पुण्यकीय तैल बुद्धी अजून शाबूत आहे .. याचे समाधान वाटले )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 11:20 नवीन
हाहाहा, धन्यवाद विटेकरजी :) [ बॅ = bE ] बाकी पानपतोत्तर काळात पटवर्धनांनी मिरजेवर राज्य केले खरे...पण पुणकराष्ट्राबरोबरच दक्षिणेकडून कर्नाटराष्ट्रातूनही कैक घराणी तिकडे स्थायिक झाली. तेव्हा तैलबुद्धीसोबतच सांबारबुद्धीही तिथे आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
र
रमेश आठवले गुरुवार, 10/16/2014 - 19:24 नवीन
१७६० साली असलेल्या पुणे राष्ट्राची चतु:सीमा दाखविणारा नकाशा या लेखात सापडेल. http://en.wikipedia.org/wiki/Maratha_Empire
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 10/17/2014 - 00:06 नवीन
पाकिस्तान सुद्धा एक स्वतंत्र राष्ट्र आहे. असो!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/17/2014 - 08:22 नवीन
पुणे राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 08:25 नवीन
आता कोणी तरी "प्रतिज्ञा" लिहायला घ्या रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ह
हरकाम्या Sat, 10/18/2014 - 10:56 नवीन
या नवनिर्मीत राष्ट्राचे " बोधवाक्य " पण ठरवा राव ते अजुन न ठरल्याने पोटात लै कळ मारतीय बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 08:27 नवीन
सर्वांचे चितळे पोटभरी चितळे कुणाचे ही पोट भरत नाहीत .... स्वतः चे सोडून ! दमड्या टिचवल्या शिवाय बाकरवडीचा चुराच काय वास देखील घेऊ देत नाहीत ते !
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 10/17/2014 - 09:13 नवीन
तुम्ही प्रयत्न केलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 09:18 नवीन
प्रयत्न केलाय हे जरी कळले तरी ते पैसे मागायला येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुबोध खरे Fri, 10/17/2014 - 08:35 नवीन
लष्कर भाग पुण्यात येतो काय? म्हणजे आम्ही ११ वर्षे लष्करात काढली तेंव्हा किंचित पुणेकर म्हणवून घेता येईल काय असा विचार मनात आला.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 10/17/2014 - 09:12 नवीन
त्यासाठी तुम्हाला कुणाचा तरी किंचितसा तरी अपमान करण्याची कला साधली पाहिजे (रेफरन्सः पु.ल.) आणि अपमान म्हणजे भांडण नव्हे. शालजोडीतले देणे ही एक कला आहे. सध्याचं उदाहरण द्यायचं तर उधोकाका करतात तो अपमान नव्हे, तो थयथयाट. थोरले काका करतात तो अपमान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
इ
इरसाल Fri, 10/17/2014 - 10:43 नवीन
तुम्ही स्वतःला पुणेकरा- पुणे अकरा असे म्हणवुन घेवु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Fri, 10/17/2014 - 09:40 नवीन
पुणे या देशात आम्ही जन्माने परकीय असेलेल्यांना (म्हणजे बारामती, इंदापूर इ. भागातले) आम्ही अजिबात पंतप्रधान होऊन देणार नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/17/2014 - 10:07 नवीन
पुणे या देशात आम्ही जन्माने परकीय असेलेल्यांना (म्हणजे बारामती, इंदापूर इ. भागातले) आम्ही अजिबात पंतप्रधान होऊन देणार नाही.
ह्या ह्या ह्या. श्रीगुरुजी भलतेच विनोदी बॉ तुम्ही. तुम्ही इतके हुकुमी अन जबरदस्त कस्से काय हो विनोदता?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/17/2014 - 11:28 नवीन
@तुम्ही इतके हुकुमी अन जबरदस्त कस्से काय हो विनोदता?>> =)) अंतरीच्या कळा हो त्या....! =)) दुसरे कै नै! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मृत्युन्जय Fri, 10/17/2014 - 11:19 नवीन
म्हणजे??? पुणे हे स्वतंत्र राष्ट्र नाही?
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/17/2014 - 13:28 नवीन
ही अस्स्सल पुणेरी प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विजुभाऊ Fri, 10/17/2014 - 11:44 नवीन
शनिवॉर वाड्याला पुण्याचे राष्ट्रपतीभवन म्हणून घोषीत करावे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 11:49 नवीन
मग संसद भवन कुठे? लाल किल्ला म्हणायचा तर लाल महाल आहेच म्हणा. चांदणी चौकही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
काळा पहाड Fri, 10/17/2014 - 12:03 नवीन
ओ तो चांदणी चौक पुण्यात हे का? पुण्यात शगुन चौक किंवा कुंटे चौकाला तो मान मिळायला हवा. संसद भवन सध्याच्या मंडईच्या ठिकाणी भरवता येईल. नाही तरी तिथेही खासदारांची खरेदी विक्रीच चालते नं? बाकी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीला रहावं लागतं. शनवार्वाड्यात भूत असताना कुठला राष्ट्रपती तिथं राहील? तेव्हा दुसरी जागा शोधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/17/2014 - 12:05 नवीन
@लाल महाल आहेच म्हणा. चांदणी चौकही आहे.>>> छ्छे! ते पर्वतीवर हवं. आणि पायर्‍यांनी चढून येणार्‍यांनाच वेंट्री असेल..अश्या नि'यमासह! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 12:09 नवीन
हा हा हा, अगदी अगदी ;) अन राष्ट्रीय डिष- शिक्रण विथ मटार उसळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विजुभाऊ Fri, 10/17/2014 - 11:55 नवीन
अरे खरेच की "रेसकोर्स रोड" सुद्धा आहे
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 12:02 नवीन
आयला हो की. अन दिल्लीत औरंगजेब रोड, लोधी रोड, अकबर रोड आहे तसा इकडे शिवाजी रोड, बाजीराव रोड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 12:05 नवीन
रायसीना हिल सारखी पर्वती हिल, चतु:शृंगी हिल अशा कैक हिला आहेत. पराठे वाली गली सारखी खाऊगल्लीसुद्धा आहे. (नाव ते नस्ले म्हणून काय झाले) घंटेवाला हलवाईप्रमाणे चितळे व काका हलवाई आहे. कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ हवेचा मीनार आहे. काय नाही पुण्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/17/2014 - 12:08 नवीन
@ कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ हवेचा मीनार आहे. काय नाही पुण्यात?>>> मेल्या..क्यांपातलं लाल देऊळ विसरलास की! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 12:10 नवीन
हाहाहा, रैट्ट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Fri, 10/17/2014 - 12:09 नवीन
>>घंटेवाला हलवाई अशा नावाचा हलवाई आहे?? *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 12:10 नवीन
चांदणी चौकात आहे दिल्लीच्या. १७९० पासूनचा. सोहन हलवा नामक तत्रस्थ डिश लय फेमस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 12:11 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Ghantewala
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नानासाहेब नेफळे Fri, 10/17/2014 - 12:16 नवीन
भेकड पुण्याचे शेळपट सैन्य, माझे प्रतिसाद झेपानात... तर कसलं डोंबलं राष्ट्र तुमचं छ्या.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 10/17/2014 - 13:13 नवीन
नानासाहेबांचा विजय असो ! कॅप्टन ऑफ द कुरसुंगी रेजिमेंट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड Fri, 10/17/2014 - 13:19 नवीन
अं?Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
इ
इरसाल Fri, 10/17/2014 - 13:22 नवीन
आल्पिष्टन म्हणा की
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/17/2014 - 13:22 नवीन
स्वतन्त्र " भोपळे चौक " झालाच पाहिजे :- बबन
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 10/17/2014 - 13:26 नवीन
स्वतंत्र वडगाव फाटा झालाच पायजे -बबन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 10/17/2014 - 14:42 नवीन
माझ्या मिपावरील अखंड कारकिर्दीत आत्तापर्यन्तच्या कोणत्याच धाग्याला ९१ प्रतिसाद मिळाले नव्हते . मागचा उच्च्चांक ८९ होता !!! आणि ते सुद्धा दुष्ट संपादकीय कारवाई नंतर ! सर्व प्रतिसादकांचे मनः पूर्वक आभार ! . . . . . . माताय , गुणपूर्णता आणि लोकप्रियता यांचा काडिमात्र संबंध नाही !!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 10/17/2014 - 14:50 नवीन
विटेकरजी, विषयाचा धिक्कार किती जरी केला असला तरी त्याचे महत्त्व तुम्हांला आता चांगलेच समजले असेल. ;) विषयच असा ड्राम्याटिक हाये, चरचा तर होनारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा