Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल -2014

ज
जेपी
Sat, 10/18/2014 - 16:56
🗣 65 प्रतिसाद
उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.त्याच्या निकालाची चर्चा करण्यासाठी आणी निकालाचे अपडेट देण्यासाठी हा धागा. माझा अंदाज. भाजप-141 शिवसेना-60 काँग्रेस-33 राकाँ-30 मनसे -12 ईतर-12

प्रतिक्रिया द्या
20706 वाचन

💬 प्रतिसाद (65)
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 11:45 नवीन
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी. केंद्रात आणी राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे यासाठी राकाँचा भाजपला बाहेरुन पाठिंबा-प्रफुल्ल पटेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/19/2014 - 12:00 नवीन
राकाँ आणि भाजपची पूर्वीपासून या विषयावर मिलीभगत असावी इतकं संशयास्पद विधानं नेत्याची वाटत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
पिंपातला उंदीर Sun, 10/19/2014 - 12:32 नवीन
आपले मेटे आणि गावित यांच्यासारखे अनेक समर्थक पुढे भाजप मध्ये पाठवले हा सत्ता नाट्याचा पहिला अंक . यांच्यातल्या अनेकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप . मोदी आणि शहा कंपनी ने या सगळ्याना पावन करून घेतलं आणि त्यांच्यासाठी अनेक सभा पण घेतल्या . अंक दुसरा . आणि राष्ट्रवादी ने भाजप ला पाठींबा देऊन तिसरया अंका वरचा पडदा उठवला . राष्ट्रवादी आणि भाजप हिअभद्र युती होणार अशी आशंका अनेक लोकांनी व्यक्त केली होती . कॉंग्रेस आणि शिवसेना पण फार वेगळे नसले तरी राष्ट्रवादी आणि भाजप हि युती झाली तर ती मतदारांच्या गालावर दिलेली सणसणीत थप्पड असेल . या दोघांचाही स्वतंत्र विदर्भाला पाठींबा असल्याने महाराष्ट्राचा अजून एक तुकडा पडणार हे निश्चित . सिंचन घोटाळा मधल्या अजित पवार यांच्यासारख्या 'बिभीषण ' पण रावणाचा (शिवसेना ??) पराभव करण्यासाठी पावन करून घेतल्या जातील का ? का आमच्या मनात असणार्या बिभीषण आणि रावण कोण याच कल्पना बौद्धिक देऊन बदल्या जातील ? देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होण्यास सर्वार्थाने लायक आहेत आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी खूप इच्छा आहे पण राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन खचितच नको . बाकी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केल्यास श्रीगुरुजी आणि नाना नेफ़ळे त्या सरकारच्या समर्थनार्थ खांद्या ला खांदा लावून मिपा वर लढतील या नुसत्या कल्पनेनेच ड्वाले पाणावले . ह. घ्या
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/19/2014 - 13:17 नवीन
भिकेचे डोहाळे.
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Sun, 10/19/2014 - 13:38 नवीन
बाहेरून बिनशर्त पाठींबा वगैरे काही नसतं. त्यात आतून काय काय सेटिंगच असतात ते लोकांना ठावूक असते (जुनी प्रकरण, केसेस बाहेर काढू नये, हव्या त्या फाईली पुढे सरकाव्यात वगैरे वगैरे). तेव्हा भाजप राष्ट्रवादीची आतून अशी सेटिंग झाली असेलच तर दोघांचे पितळ उघडे पडेल. शिवसेनेने सरळ विरोधी बाकावर बसून मजा पहावी. विरोधी पक्षनेतेपद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेकडेच राहील. मात्र पवारांची हि एक खेळी आहे. सेना भाजप एक होतीलच. शिवसेनेने आता मुख्यमंत्रीपदच द्या असला बालिश हट्ट करू नये. जी काही महत्वाची खाती/ महामंडले येतील ती घेवून सरकारमध्ये यावे. एकंदर सेनेला सरकारमध्ये सहभागी होणे किंवा विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही पर्याय आहेत.भाजपकडचे धुरीण आणि संघ एनसीपीचा पाठींबा घ्यायला विरोधच करतील.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 10/19/2014 - 13:38 नवीन
रा.कॉ.च्या पाठिंब्यावर सरकार बनवले भाजपाने तर मात्र अनेक मिपाकरांची पंचाईत होणार आहे.असो ह्यांना गाणे आठवले ते झूठा कहीं का मधले- शरद पवार व नितिन गडकरी एक्त्र गात आहेत -राष्ट्रवादीच्या घड्याळात पाहून बारा बजे की सुईयों जैसे हम दोनो मिल जाये | देख के हमको सेना-कॉन्ग्रेसवाले जलते है जल जाये| नव्न पिढीसाठी ते गाणे ऐकता येइल - http://www.dailymotion.com/video/xomuoh_baarah-baje-kee-suiyon-jaise-ham-donon-jhootha-kahin-ka-1979-asha-kishore_music
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 10/19/2014 - 14:10 नवीन
र.काँ. पैसे घेउन गावभर कोणाबरोबरही झोपणार्या रं* पेक्क्षा खालच्या पातळीची आहे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/19/2014 - 14:36 नवीन
उध्दवनी निवडणूक लढवायला हवी होती. पन्नास जागा वाढल्या असत्या. लोकशाहीत घाबरटपणा केला की लोकांचा विश्वास उडतो. त्यांना वाटले ९० ते १०० जागा आल्या की कोणाला तरी माघार घ्यायला लावून तिकडून ते पुन्हा लढणार. असं थोडीच चालतं? लढाईत वार तर होणारच.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 15:28 नवीन
BJP-123 SHIVSENA-63 CONGRESS-42 NCP-41 MNS-1 OTHER-18 मनसे चा रोल संपला. भाजप शिवसेना एकत्र यावी किंवा तटस्थ राहावी.उधोदी आजुनही स्वत:चा इगो सांभाळत आहेत.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/19/2014 - 15:30 नवीन
भाजप नी कुठल्याही खांग्रेसशी युती केली तर पुढच्या निवडणुकीमधे मी त्यांना हेट लिस्ट मधे टाकीन. शिवसेना आणि भाजपनी सगळे वाद विसरुन एकत्र यावं. आख्खी निवडणुक ज्यांना शिव्या दिल्या त्या मोदींच्या पक्षाबरोबर काका आघाडी कशी करणार म्हणे? त्यांच्याएवढा हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी परत होणे नाही. ह्या निमित्तानी सत्ता तिथे पवार किंवा पॉवर तिथे पवार हा मुद्दा परत अधोरेखीत झालाय हेचं म्हणतो.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 10/19/2014 - 16:09 नवीन
च्यायला १४४ -१४४ वर लढले असते तर शिवसेनेला निश्चित १०० जागा तरी मिळाल्या असत्या, किंबहुना मुख्यमंत्री पद ही मिळाले असते. आता पुढचे इलेक्शन कांग्रेस आणि एन सी पी मिळून लढतील (१४४ + १४४) जागांवर लढतील पण शिवसेनेला ११७ जागांवर समाधान मानावे लागेल अन्यथा पुढे ६३ जागा ही मिळणार नाही. आता द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, पहिले दक्षिण भारतीयांविरुद्ध, मग उत्तर भारतीयांविरुद्ध आणि या वेळी गुजराती विरुद्ध. हे सोडावे लागेल, अन्यथा मुंबई ही हातातून जाईल.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 10/19/2014 - 17:33 नवीन
यह अजीबसी बात आज कैसे हो गई है वह दुश्मनी भुला, गजब यह बात हो गई है अब क्यू शोर हर गल्ली नुक्कड पे हो रहा है किसकी वतन बेवफाई, गला फाड गई है हम तो वही अपनी राजनिती कर रहे है आवाम बस, आईना देख घबरा गई है - Raj Nivedita Jain-Patil
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 10/20/2014 - 02:21 नवीन
विवेकपटाईत +१ द्वेषाचे राजकारण केले की पक्षाचा मतदार आवाकाच कमी होत जातो. पुन्हा त्यातले काही टक्केच लोक मत त्यांच्याबाजूने देणार. सार्क अथवा दिल्ली{रा० पातळीवर} सोडा बऱ्याच नेत्यांचे विचार त्यांच्या चौथ्या गल्लीत कोणी ऐकत नाही. आता व्यापक विचार मांडणाऱ्या पक्षांची गरज आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 10/20/2014 - 05:07 नवीन
मी का घाग्यात जे चित्र रंगविले होते बरोबर तसेच चित्र निकालात दिसते आहे. भाजपावर संघाचे जसे काही संस्कार असतात तसे संस्कार असणारी कोणतीही समांतर संघटना इतर कोणत्याही पक्षाला नाही. संघात अगदी रोज ध्वज लावणारा व उतरवणाराही माणूस वेगळा असू शकतो.सबब वेगवेगळ्या जणाना पक्षाध्यक्ष पदाची संधी भाजपात मिळू शकते. संघातील संस्काराने उद्धटपणा व माज कमी होतो . मोदी जरी हुकुमशहा मनोवृतीचे वाटले तरी ते चटकन निर्णय घेण्यास काही वेळेस योग्यच असते.लोकशाही पद्धत ही काहीशी लकवा भरलेली पद्धत असू शकते.तरीही लोकांच्या मनातील प्रधानमंत्री मोदी व मनातील पक्ष भाजपा नव्हे. भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 10/20/2014 - 16:41 नवीन
"भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही." अगदी बरोब्बर. त्या बदल्यात ते वेगळे काही वसूल करतील असा माझा अंदाज.सुरुवातीचे काही दिवस 'कारवाई करत आहोत' असा आभास निर्माण करतील.एका चॅनेलवर देवेण्द्रला "गडकरी-पवारांचे संबंध आहेत त्याचे काय?" असे विचारल्यावर देवेंद्र गालातल्या गालात हसला,लाजला व म्हणाला- "तरी कारवाई होईलच."
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा