पुण्याचे उणे
(श्रीरंग जोशी यांनी चेपुवरील एक ढकल संदेश खफवर टाकला आहे पुण्याची महती सांगणारा ! त्यावरुन थोडे चिन्तन घडले, त्यातून हे मुक्तक प्रसवले आहे.)
पुण्याची मुम्बई झाली आहे हो ! छाती फुटेस्तोर पळावे लागते आज काल पुण्यात देखील!
आय टी वाल्यांनी वाट लावली आहे पुण्याची ! हिन्जवडी आणि हडपसर या दोनी दिशांना २४ तासाचा जाम करुन ठेवला आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. इतके की, आता त्यांना देखील ते परवडेनासे झाले आहेत. मला व्यक्तिशः सकाळ संध्याकाळ दिड तास-दिड तास प्रवास करावा लागतो. आणि विकेण्डला देखील मुंबै च्या लोकांनी पुणे जाम करुन ठेवले आहे.
पुणे हे मुंबई नसल्याने हा असला भार पुण्याला पेलवत नाही. सार्वजनिक वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. लोकल ची सोय कधीच नव्हती आणि पी एम टी चालण्यापेक्षा त्या विषयावर वारेमाप बोलण्यासाठी अधिक प्रसिद्ध !
जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता भागातील सोसायटयातील अरुन्द रस्ते फक्त सायकली आणि स्कूटरी जाण्याच्या लायकिचे ! तिथे हल्ली मर्सिदेस आणि बीएमडब्ल्यु सारख्या अजस्त्र गाड्या पार्क करुन ठेवतात. पार्किगची पुण्यात महाबोंब आहे ! ती रस्त्यावर , सार्वजनिक ठिकाणी आणि सोसायट्यातदेखील आहे. पुढचे पानपत पुण्यातच पार्किन्ग वरुन होईल असा अन्दाज आहे.
पुणे अधिकाधिक बकाल होत चालले आहे. बकालपणा समावून घेण्याची मुंबईची सहनशीलता आणि सक्षमता पुण्यात नाही. दिवसेंदिवस पुणे अधिकाधिक व्याकुळ आणि केविलवाणे होत चालले आहे. शान गेली पुण्याची महाराजा !!
विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक ! तो काही नामांकित संस्थांमुळे होता आज त्यांची काय शान आहे ? सी ई ओ पी मध्ये पुण्याची किती अडमिशन्स होतात ? महाराष्ट्रातील? पुणे विद्यापिठीतील दर्जावर बोलायलाच नको! बोरी / दादोजी कोंडदेव पुतळा या प्रकरणांनी पुण्यातील शैक्षणिक वातावरण पुण्याच्याच कारभार्यांनी पार ढ्वळून काढले. हे वातावरण संशोधनाला पोषक वातावरण आहे काय? एस पी / फर्ग्युसन आपला दाब ठेवून आहेत पण एमआयटी , भारती , सिंबायसीस , सिंहगड, या खासगी संस्थानी पुण्याच्या शैक्षणिक विश्वावर आक्रमण केले आहे. त्या संस्था शिक्षणासाठी किती आणि अर्थकारणासाठी किती हा विषय इतका स्पष्ट आहे की त्याची चर्चा देखील होणार नाही. या अर्थकारणासाठी पुणे सोडाच अमराठी विद्यार्थ्यांचा भरणा पुण्यात वाढला. त्याबरोबर गुन्हेगारी आली. कसले विद्येचे माहेरघर ?
आणि सांस्कृतिक पुणे ?? किती नवीन लेखक / कवी / गायक पुण्यात गेल्या १५-२० वर्षात आले? सलील आणि संदिप खरे वगळता फारसे आशादायक काही नाही !! अपवाद असतील ही पण त्या अपवादाने नियमच सिद्ध होतो. सदाशिवात वसंतराव देशपांडे रहात होते, त्या माडीच्या खालून , रस्त्यावरुन जाताना देखील भारावल्यासारखे व्हायचे ! तीच गोष्ट नव्या पेठेतील भिमाण्णांच्या बंगल्याच्या आसपास ! आता काय शिल्लक आहे पुण्यात ?
पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल काय लिहू ? उत्सव कमी आणि धागडधिन्गा जास्त ! अनेक वेळा लिहून झाले आहे. गेली १० वर्षे पुण्यात आहे , एकदाही तिकडे फिरकायची हिम्मत झाली नाही.
पार वाट लागली आहे पुण्याची! पुणे , मुम्बईच्या वाटेवर आहे ! हे कमी की काय, पण हल्ली पुण्याचे हवामान ही बदलले आहे. पूर्वीचे आल्हाददायक पुणे, आता तितके आल्हाददायक राहीले नाही. पुण्यात देखील प्रचंड उकडते, मुम्बई सारखा आता रात्रभर पंखा लावावा लागतो.
हे सारे पाहून खर्या पुणेकराचा जीव कुळकुळतो. मनापासून वाईट वाट्ते . महाराजांच्या पुणे जहागीरीला पुन्हा एकदा सोन्याचा नांगर फिरवला जाण्याची आवश्यकता वाटते आहे.
अरे , कुठे नेऊन ठेवले आहे महाराष्ट्राचे पुणे !
💬 प्रतिसाद
(70)
च
चिनार
Tue, 11/04/2014 - 13:00
नवीन
दुचाकी वाल्यांनी पुरती वात लावुन टाकली आहे पुण्याची.
या वाक्याचा जाहीर निषेध !!
-- एक दुचाकीस्वार
- Log in or register to post comments
र
रवीराज
Tue, 11/04/2014 - 19:33
नवीन
दुचाकीस्वारांचा मोठा वाटा आहे पुण्याची वाट लावण्याला.
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Tue, 10/28/2014 - 13:23
नवीन
लयच भारी
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 10/28/2014 - 15:52
नवीन
पु ल देशपांड्यांच्या वेळचे पुणेकर पुण्याची टीका हा वैयक्तिक पराभव मानायचे म्हणे.....
अवांतर.... पिंप्री चिंचोड पण पु ण्यात धरतात की बाहेर?
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Tue, 10/28/2014 - 16:24
नवीन
नदीपलिकड्च काहीच पुण्यात धरत नाहीत.
- Log in or register to post comments
ख
खोंड
Tue, 10/28/2014 - 16:15
नवीन
घरांच्या किमती… एकदम खरं बोललात … माझ्या सारख्या सोफ्टवेअर इंजिनियर ला पण नाही परवडत …
खर तर बाहेरून पुण्यात नोकरीला येणारे लोक (I. T. मधले ) यांनीच पुण्याची अशी अवस्था केली आहे
हाकलून काढा साल्यांना
- Log in or register to post comments
फ
फोटोग्राफर243
Wed, 10/29/2014 - 04:29
नवीन
मला एक कळत नाही, लोक सारखे IT ला का दोश देतात, बाकी industry च्या लोकांनी जागेचे भाव नाही का वाढवले?? उठ सुठ आपला IT च्या नावाने बोम्ब...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/29/2014 - 04:59
नवीन
पुणे...आयटी...परप्रांतिय...अजून १०० नाय????
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Tue, 10/28/2014 - 16:26
नवीन
आजकालचे पुणेकर या अश्या धाग्यांवर पण पेटून उठत नाहीत :(
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 10/29/2014 - 05:07
नवीन
च् च् च्... पुर्वीचे पुणेकर राहिले नाहीत आता.
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 10/29/2014 - 05:11
नवीन
(नदीजोड प्रकल्प पूर्ण होऊन) मिठीचे पाणी मुळा-मुठेत सोडले गेले की क्काय? ;)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 10/29/2014 - 09:37
नवीन
भारतातील जी शहरे पूर्वीसारखीच राहिली आहेत त्यांची कीव येते!
बदल हाच शाश्वत असतो .. वगैरे वगैरे!
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 10/29/2014 - 13:13
नवीन
नाही ऋषीकेश , पेठा अजुन जशाच्या तशा आहेत , अगदी टिंबर मार्केट मधली लाकडी दुकाने सुध्दा ..काही वाडे बदललेत,काही जावुन फ्लॅट्स उभे राहिलेत ..कल्चर आहे तशेच आहे ..अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे ही समीकरण जसेच्या तसे आहे ...सदाशिवातली माणसं ही जशीच्ता तशी आहे....हे जे बोलताहेत , ती पुणे ग्रामीण की पुणे शहर या वादात २५ वर्षे, काही १५ वर्षे अडकलेली गावे आहेत ... आता झालीत शामील , १ जानेवारीपासुन , प्रोसेस कंप्लीट ( म्हणजे तेच ग्रामपंचायचीच क्षेत्रीय कार्यालय करणे , ई. ई. ) एक जुन पर्यंत सगळी महानगर पालिकेत जाणार होती , निवडणुकांमुळे उशीर झालाय बहुतेक..नीटस माहीत नाही उशीर व्हायचे कारण ..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/29/2014 - 13:22
नवीन
ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 10/29/2014 - 13:37
नवीन
छे छे - सिलिकॉन व्ह्यालीत.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 10/29/2014 - 13:28
नवीन
ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ. >>
ती वाढीस आलेली लोकसंख्या गेली ;) ( पोरं कोथरुडात, आई-वडील एका भावासह पेठात ) पण कोथरूडात गेली त्याबद्दल अॅप्रिशियेशन आहे, कचरा डेपो होता तिथे आहे , कोणालाही वाटल नव्हत तेव्हा असे काही घडेल ...मला पिंपरी चिंचवड ला होईल असे वाटले होते .....आणी हडपसर ,खराडी, चंदननगर, वाघोली, लोहगाव, फुरसुंगी या बाजुचा कोपरा धरून अशी आणखी एक महापालिका करण्याचा प्रस्ताव मांडला होता काँग्रेस ने !कलमाडी ने!! आता कलमाडी ही नाही काँग्रेस ही नाही .. आता तो पण होतो की नाही !!
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Wed, 10/29/2014 - 13:43
नवीन
पुन्यातल्या लोकानि आपल्या पोरा पोरिना वेळच्या वेळि शिस्त लावलि असति तर आज हि वेळ आलि नसति .
- Log in or register to post comments
श
शिद
Wed, 10/29/2014 - 13:51
नवीन
म्हणजे कशी?
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
गुरुवार, 10/30/2014 - 10:31
नवीन
उदाहरणासाठी - मुलगा /मुलगी दहावी पास झाली की सनी , स्कूटी - दुचाकी घेऊन देणे , संगीत कार्यक्रमांमध्ये बटाटेवडेच खात बसणे इत्यादी वगैरे वगैरे....
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 11/04/2014 - 13:17
नवीन
पुन्यात दिडवर्स काढलय.पुण्याची पीएमटी सोडुन सगळ आवडत. खास करुन स्वारगेट चा एमपी बार.माझा पुण्यातील आवडत ठिकाण
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2