Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे

स
स न वि वि
Wed, 11/19/2014 - 08:38
🗣 126 प्रतिसाद
आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे…. १. अचानक बंद होतो २. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा ३. अचानक mute मोड मधेय जातो ४. फोन घेताना hang होतो. ५. wallpaper वेगवेगळा दिस्तो. (म्हणजे जर मी home आणि lock स्क्रीन साठी चे option select करून एखादा wallpaper ठेवला तरी home आणि lock स्क्रीनला वेगवेगळा च दिसतो . तुम्ही कोणते फोन वापरता आणि त्यात काय काय गुण-दोष आहेत आणि त्या वर काय उपाय केले आहेत हे माहित करून घ्यायचे आहे.

प्रतिक्रिया द्या
34232 वाचन

💬 प्रतिसाद (126)
स
सुबोध खरे Fri, 11/21/2014 - 14:53 नवीन
पैसा ताई अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागत नाही. जेंव्हा पाहिजे तेंव्हा डेटा प्लान ऑन करा आणि नको असेल तर ऑफ करा. माझ्या कडे कार्बन चा टायट्यानीयम एस ५ + गेल्या ८ महिन्यापासून आहे. व्यवस्थित चालू आहे. दिवसात(रात्री) एकदा चार्ज करावा लागतो. अगोदर बायकोसाठी घेतला होता पण तो बिघडला बरीच आटा आटी करून बदलून घेतला त्यानंतर आता तो माझ्याकडे आहे आणि तिने samsung galaxy grand २ घेतला आहे. आमच्या घरीसार्वांचे android फोनच आहेत. ( माझा सर्वात स्वस्तातील आहे) फोन बद्दल एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे दुसर्याला स्थळ सुचवण्यासारखे आहे. ते त्याला लाभेल कि नाही हे सांगता येत नाही तसेच तुम्ही सुचवलेला फोन खराब निघाला तर फुकटच्या शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे मी कुणालाही स्थळ किंवा फोन सुचवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 11/22/2014 - 07:55 नवीन
लॉग्ड इन नसाल तर बर्‍याच सुविधा वापरता येणार नाहीत. जीमेल आणि चॅट बंद करून फक्त मॅप्स आणि क्रोम चालू ठेवता येते का? मला वाटत नाही. चालू ठेवता असेल तर कोणीतरी उपाय सांगा. डाटा बंद केला तर स्मार्टफोन आणि साधा ६०० रुपयाचा फोन यात काय फारसा फरक राहिला नाही ना! मी म्हणतेय ते डेटा बंद करण्याबद्दल नाहीये. नवा फोन ऑन केला की तो ताबडतोब गूगल लॉग इन स्क्रीनला जातो. नंतर गूगलचीच बरीचशी अ‍ॅप्स वापरत रहावं लागतं आणि ती बॅकग्राउंडला रन होत रहातात आणि रोज सकाळी उठून चहा प्यायच्या आधी फोन चार्जिंगला लावावा लागतो त्याचा वैताग आहे. ही जीमेल, गूगल चॅट, गुगल म्युझिक वगैरे सिस्टिम अ‍ॅप्स नको असतील तर फोन रूट करावा लागतो आणि मग वॉरंटी जाते. विंडोज फोनवर वॉट्स अ‍ॅप चालते. माझ्याकडे चालते आहे. कधी कधी मेसेजेस एकदम बरेच येतात. पण अ‍ॅप चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ल
लंबूटांग Mon, 11/24/2014 - 14:21 नवीन
सेटिंग्स मधे जा आणि अकाउंट्स नावाचा सेक्शन शोधा. त्यातून गूगल अकाऊंट काढून टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/24/2014 - 15:49 नवीन
अकाउंट काढून टाकल्यावर गूगल मॅप्स चालू रहातील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ल
लंबूटांग Mon, 11/24/2014 - 17:57 नवीन
गूगल मॅप्सची डायरेक्शन्स फ्रॉम होम वगैरे फीचर्स चालणार नाहीत (भारतात ही फीचर्स जी मुख्यतः गूगल नाउचा भाग आहेत ती गूगलने सुरू केली आहेत का मला कल्पना नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/24/2014 - 18:18 नवीन
माहितीसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
व
वेल्लाभट गुरुवार, 11/20/2014 - 12:15 नवीन
कशाला चायनाच्या नादी लागता? त्यापेक्शा भारी फोन त्याच किमतीला उपलब्ध आहेत. मोटो ई चा वरच उल्लेख झाला. बर, कार्यालयात एकाने घेतला आहे हा झिओमी का काय ते. गरम होतो सॉलिड. डोकेदुखी सुरू झालीय त्याला म्हणाला. खरी खुरी हं, 'त्रास' या अर्थी नाही. तेंव्हा हे सगळं ऐकत असता नकाच घेऊ असा सल्ला देईन. मायक्रोसॉफ्ट कॅनव्हास युनाईट २ मस्त आहे असं वाचून ऐकून आहे. किंवा इन्टेक्स अ‍ॅक्वा कर्व्ह चांगला आहे. मी वापरून बघितलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:20 नवीन
मोटो ई माझ्या मुलीचा आहे. फोन चांगला आहे. पण त्याच्यावर कॉलेज बॅगेतल्या वह्या पडल्या आणि डिस्प्ले फुटला. त्याची किंमत ४००० सांगत होते. मी भांडून १८०० मधे मिळवला. मायक्रोमॅक्स युनाईट२ माझ्या मुलाकडे आहे. मायक्रोमॅक्स फोन चांगल्या क्वालिटीचे नसतात असे हुच्च लोक म्हणतात. मात्र हा फोन चांगलाच दणकट आणि रफ-टफ निघाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 11/20/2014 - 12:22 नवीन
आजच घेऊन या ! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/20/2014 - 12:21 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मदनबाण गुरुवार, 11/20/2014 - 12:25 नवीन
Micromax to launch Cyanogen smartphones under 'Yu' brand

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
V
vikramaditya गुरुवार, 11/20/2014 - 18:36 नवीन
पण बघा... ७-८ हजारात चांगली मॉडेल्स आहेत. कॅमेरा मात्र खास नाही बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्यारे१ गुरुवार, 11/20/2014 - 13:19 नवीन
आक्ख्या जगात बर्‍यापैकी माहिती 'नाही' असं काहीतरी आहे ब्वा! आज मी किमान साखर तरी खावी म्हणतो.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/20/2014 - 14:15 नवीन
त्याच्यापुढे इतर गोष्टी यथावकाश माहिती होतात! त्याचं विषेश काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 11/20/2014 - 14:20 नवीन
तब्बेत बरी नाही का काय हो? वे वॉन्ट आवर संक्षी सर बॅक ! कल्जी घने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
त
तुषार काळभोर गुरुवार, 11/20/2014 - 17:54 नवीन
झेनफोन ४ (४५०) ४.५" १़ जीबी/८जीबी, ८मेपि, बॅटरी ओके, स्क्रीन ब्राईटनेस ३०-४०% केला तर ऑफिसात आणि घरात काहीच प्रॉब्लेम न येता बॅटरी आणखी जास्त चालते. सध्या दिवसभर ३जी डाटा चालू ठेवूनही १२-१४ तास आरामात जातो. (माझे फोन कॉल दिवसभर चालू असतात. दिवसभरात ६०-९० मिनिटे कॉल) @७००० (+कॉर्निंग गोरिला ग्लास३ झक्कास आहे. आज ३ महिन्यानंतर नुसती स्क्रीन पुसली, तरी नव्यासारखा दिसतो)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 11/20/2014 - 18:48 नवीन
मायक्रोम्याक्स किंवा झोलो चे विंडोज फोन वापरलेत काय कोणी ? कसे आहेत ? विंडोज आणी करवंद यापैकी कोणता मोबाईल घ्यावा यावर खुप डोके खाजवले पण अजून विचार पक्का होत नाही. दोन सिमवाले विंडोज फोन्सचे (लुमिया) फिचर चांगले आहेत पण स्क्रीन साईज छोटी आहे. (४.५ ते ४.७" पर्यंत). करवंदाचा झेड ३ चांगला वाटतो आहे आहे पण एकच सिम वापरता येते. काय करावे काही कळत नाही.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 11/20/2014 - 19:54 नवीन
हो, मायक्रो म्याक्सचा फोन पैसाताईच्या मुलाने वापरलाय्/वापरतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ह
होकाका Fri, 11/21/2014 - 13:18 नवीन
बरेच दिवस नोटीफिकेशन येत असूनही अँड्रॉइडचा अपडेट घेतला नाही -- कारण केवळ आळशीपणा. पण आता बर्‍याच लोकांना झालेला त्रास बघून जाणवतं की आळशीपणामुळे फायदाच झाला - बराच त्रास वाचला.
  • Log in or register to post comments
स
सँम (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/21/2014 - 19:23 नवीन
karbonn a18+ वापरत आहे, १ वर्ष झाले . ४-५ वेळेस आपटला आहे आत्तापर्यंत . प्रत्येक वेळेस आपटल्यावर बंद पडला, नेहमी पडल्यावर भीती वाटायची की आता हा कधीच चालू होणार नाही . पण हा मात्र switch on केल्यावर पुन्हा पहिल्यासारखा सुरळीत चालू झाला . अजून काही प्राॅब्लेम नाही .
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 11/22/2014 - 09:20 नवीन
सोनीचा एक्स्पेरिया टी टु अल्ट्रा आहे. अजुनपर्यंत काही अडचण नाही. ;)
  • Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर Sun, 11/23/2014 - 05:40 नवीन
आजकाल स्मार्टफोन विश्वात तीन महिन्यात फोन, त्याचे स्पेक्स ,त्याची OS जुने वाटू लागतात. त्यासाठी सात आठ हजारात फ्लॅगशीप फोनची स्पेक्स देणारे चिक्कार फोन बाजारात आहेत, असे फोन डाऊनमार्केट नसतात ,यात लेटेस्ट OS ,पाच इंची डीस्पले ,1GB रॅम येते. असे फोन घ्यावेत, दोन वर्षांनी बदलावे. जास्त पैसे गेल्याचे दुखः नाही. चायना कंपनी खराब असतात असे काही नाही. लेनोवो, झायोमी स्टँण्डर्ड आहेत. सगळ्या कंपन्या चीन तैवानातुन फोन बनवुन घेतात व फक्त ब्रँण्डनेमखाली विकतात. अगदी apple iphone ही तैवानची एक कंपनी बनवते.
  • Log in or register to post comments
प
पेरु Mon, 11/24/2014 - 05:13 नवीन
मागच्याच विकमधे आयफोन ६ प्लस घेतला. लाइटवेट आणि फास्ट आहे. बरेचसे नविन अ‍ॅप्स आलेत फोन बरोबर. लुक पण भारी आहे. फक्त हा फोन ठेवता येइल असा खिसा असलेली पॅन्ट शोधायची आहे :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/24/2014 - 16:22 नवीन
नोकिआ फोन(माझा साधाच आहे)ची एक मजा म्हणजे ५मेगापिक्सेलचे फोटो २एमबी एवढे कंप्रेस होऊन मेमरीत जातात. हेच अपलोड करताना नोकिआ ब्राउजर त्याला आणखी ५०ते७०केबी एवढा लहान करतो. तरीही मोठ्या स्क्रीनवर चांगले दिसतात. परवाच्या कटट्याचे लुमिआतून ब्लूटूथने घेतलेले २एमबीचे(6.7MB) अपलोड करतांना २०केबी झाले !इतके भन्नाट सॉफ्टवेर आहे.
  • Log in or register to post comments
च
चेतन677 Wed, 11/26/2014 - 04:18 नवीन
मझ्या बर्‍याच मित्रांकडे सॅमसंग फोन आहे.माझ्यामते सॅमसंग फोनला हा प्रॉब्लेमच आहे तरी तुम्ही फोनचा ब्रॅन्ड बद्लुन पाहा.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 12/03/2014 - 07:06 नवीन
सेल फोन घेण्यासाठी सर्वांनी केलेल्या मनःपूर्वक मदतीबद्दल आभार. Image removed. सगळ्या उहापोहानंतर अनेक उलट-सुलट मतप्रवाहातून मार्ग काढत शेवटी Redmi 1S घेतला (म्हणजे FilpKart वर नेमकं पावणे दोन वाजता लॉग-इन होऊन (नशिबानं) मिळाला!). फोन कार्टमधे आल्यावर पत्नीनं (झंजावाती) वेटो वापरला, पण संध्याकाळी सहाच्या आत पेमंट करायचं होतं, त्यामुळे `तू दोन-तीन दिवस वापरुन पाहा, नाही पटला तर मी कुणाला तरी गिफ्ट देईन' या बोलीवर ती तयार झाली. दरम्यानच्या काळात, OS, Battery, Apps, Android Vs Windows, Ram, Internal Memory, Camera, Mega Pixel, Swipe Key Board, Processors, Settings, Devanagari Script, Whats App असल्या अगम्य गोष्टींची भारंभार माहिती (स्वतःला नको असतांना) झाली. आता मात्र तो फोन तिचा जिवलग झालायं. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की (स्वतः जरी सेल फोन वापरणार नसलो तरी); तो फोन तुम्ही कंप्युटरसारखा वापरणार नसलात तर, दिलेल्या किंमतीला (Rs 5,999) एकदम बेस्ट आहे. कॅमेरा अती उत्तम आहे, बॅटरी ड्रेन होणं किंवा तापणं वगैरे काहीही होत नाही, सर्व अप्लिकेशन्स फक्त दोन स्क्रीन्सवर आणि आयकॉन बेस्ड असल्यानं वापरायला अत्यंत सहज आहे, इंटरफेस एकदम सुरेख आहे. थोडक्यात ज्यांना गेम्स किंवा इतर काही भारी अ‍ॅप्लिकेशन्ससाठी न वापरता, एक फोन विथ ऑलमोस्ट ऑल कन्विनीयन्सेस (मराठी टायपींग धरुन) असा डिवाइस वापरायचा आहे त्यांना इटज अ लव्हली बाय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा