Saint आधी की संत आधी?
नमस्कार मंडळी.. आजच इथं शिलाँगात एका सेंट पिटर्स नावाच्या शाळेत गेलो आणि डोक्यात सहज एक किडा वळवळला.. संत आणि Saint ह्यातील कुठला शब्द आधी आला? एक शब्द दुसर्यावरुन उचलला किंवा रचला आहे का? असल्यास कुठला?
मला नेहमीच दोन भिन्न भाषांतील समानार्थी शब्दसाधर्म्याचे कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळेच जेव्हा अहोमियात आई, भात, खेदणे इत्यादी शब्द मराठी शब्दांसारखेच अर्थ असलेले आहेत हे कळलं, तेव्हा त्या भाषेशी सख्य वाढले. "नमस्ते लंडन"मध्ये जेव्हा अक्षयकुमार कोण्या इंग्रजाला मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट्री हे शब्द कसे बनलेत हे ठासून सांगतो, तो प्रसंग मला आवडतो. (भुरभुरत्या केसांच्या, आंग्लाळलेली हिंदी बोलणार्या कट्रीनाचाही प्रसंग आवडण्यात लै मोठा वाटा आहे.. ;-) ) हे असले प्रसंग आमच्या उसवत्या देशप्रेमाला भाषाभिमानाची ठीगळं लावतात..
तर मुळ प्रश्न असा, की "सेंट" आणि "संत" ह्यातला कुठला शब्द आधी आला? माझ्यामते सेंट असावा, आणि त्यावरुन "संत" हा शब्द शिक्षणखात्याने उचलला असावा.. "संतपदाला पावते झाले" कींवा "संतपदाची प्राप्ती झाली" म्हणजे नेमके कुणी हे पद दिले? जनमानसाने का? हा प्रश्न विचारण्याचे कारण हे, "सेंट" ही पदवी/उपाधी कॅथलिक चर्च देते, त्याप्रमाणे "संत" पदवी देणारे कुठले धर्मगुरु किंवा राजे असल्याचा उल्लेख कुठे आहे का? म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का?
मिपावर अनेक संतसाहीत्य तसेच इतिहासाचे जाणकार आहेत, त्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती..
(अवांतर : "ह्या माहितीचे तुम्ही काय करणार" हा प्रश्न विचारणार्यांसाठी डिस्क्लेमर. हा प्रश्न "जिज्ञासाकंडूशमनार्थ" विचारला आहे.. ;-) )
💬 प्रतिसाद
(111)
अ
अजया
Sat, 11/22/2014 - 09:45
नवीन
दंतपासुन डेंटल शब्द आलाय हे मला डेंटिस्ट असून माहिती नव्हतं!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 11/26/2014 - 10:55
नवीन
मग गाडीला येणारा डेंट (dent) कुठुन आला असेल बरे ? ;)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 11/26/2014 - 11:44
नवीन
dent बद्दल चांगला प्रश्न विचारलात. एटीमॉनलाईनवर येथे तपासला खालील प्रमाणे व्याख्या दिली आहे. मुख्य म्हणजे लॅटीनच कनेक्श्न दिल नाहीए (लॅटीन मध्न लोप पावला ही शक्यता राहतेच तरीही) प्रोटो इंडो युरोपीयन म्हणजे संस्कृत +लॅटीनचा संयोग असल्याचा जो अविर्भाव दोन्ही भाषा समर्थकात असतो तो पुन्हा तपासण्यास अशा अधीक उदाहरणांची गरज आहे.
dent early 14c., "a strike or blow," dialectal variant of Middle English dint (q.v.); sense of "indentation" first recorded 1560s, apparently influenced by indent.
donate आणि दानत हे शब्द पहा 'नत' हा शब्द सध्याच्या प्रोटो युरोपीयन शब्द यादीत मला दिसला नाही (चुभूदे.घेणे) माझे मत तो एक प्रोटो इंडो युरोपीयन शब्दच आहे. प्रोटो इंडो युरोपीयन 'नत' म्हणजे मुलत शिकारीसाठी जाळे टाकून शरण आणणे असे काही असावे. (या 'नत/नेट' शब्दाने पुढे बर्यापैकी वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांती केली आहे त्या संबंधाने स्वतंत्र लेख सवडीने निहीण्याचा मनोदय आहे. माझे व्युत्पत्तींबद्दलचे लेखन काही माहिती माझा स्वतचा कॉपीराईट राखण्यासाठी हातची राखूनच करत आहे नत/नेट हिच उच्चारणे का आणि कशी आली ते माहिती देत नाहीए पण ती मला बर्या पैकी खात्रीशीर गवसली आहेत असे वाटते)
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sat, 11/22/2014 - 18:10
नवीन
संतांच्या वचनांचा / सुवास (सेंट) सर्वत्र दरवळला म्हणून संत प्रथम व सेंट नंतर.
आता हा saint वेगळा व तो scent वेगळा असे आम्हास समजवू नये.
काय समजलें :)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 11/23/2014 - 01:49
नवीन
(सेंट मारुन पंत आणी संत ची बेमालुम भुमिका करणारा )जेपी
- Log in or register to post comments
प
पामर
Sun, 11/23/2014 - 05:50
नवीन
माझ्या मताशी सहमत असे काही संदर्भ खाली देतोय, कदाचित तिकडुन काही अधिक माहिती मिळु शकेल-
1.Gandhi's Experiments with Truth: Essential Writings by and about Mahatma Gandhi edited by Richard L. Johnson, page 290
2.Performing the Sacred: Song, Genre, and Aesthetics in Bhakti By Jacqueline Jones, page 7(footnote)
3.The Sants: Studies in a Devotional Tradition of India edited by Karine Schomer, W. H. McLeod, page 3
4.Saints and Virtues,Hawley, John Stratton, University of California Press, ISBN 9780520061637, page 57
आपल्याला ह्या उलट मत असलेले जर काही संदर्भ सापडले तर कृपया शेअर करा मला नक्की आवडेल!
- Log in or register to post comments
प
पामर
Sun, 11/23/2014 - 06:03
नवीन
वरिल सर्व पुस्तक books.google.co.in/ वर बघायला उपलब्ध आहेत!
- Log in or register to post comments
ज
जे एस सर्वेश्वर
Mon, 11/24/2014 - 17:38
नवीन
एक स्त्रोत असे हि सांगतो कि जेव्हा सर्व जग मागासले होते तेवा आपल्याकडे नालंदा तक्षशिला सारखी विश्वविद्यालये होती जेथून सर्व ठिकाणचे(अरब, चीन, रशिया) सारख्या देशांमधली मुले येऊन शिकत असत. त्यावेळी प्रत्येक देशातील शिकलेल्या लीकांनी त्यांच्या प्रदेशातीला बोलीभाषेत अनेक संस्कृत शब्दांची भर घातली आणि व्यापारानिमित्त अरब युरोपीय देशात गेले आणि त्यांनी संस्कृतचा त्या देशात प्रसार केला. त्यातूनच लॅटिन, ग्रीक सारख्या तत्कालीन युरोपीय भाषांचा उगम आणि विकास झाला. आणि भारतातील सर्व भाषांचे उगम हि संस्कृत भाषाच असल्याचे तुम्हाला माहित असेलच. म्हणूनच संत हा मुळात संस्कृत त्यानंतर प्राकृत आणि पर्यायाने मराठीत आलेला शब्द हाच सेंट या शब्द पेक्षा पुरातन असावा.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 11/25/2014 - 09:35
नवीन
तुम्ही पु ना ओकांचे शिष्य का हो?
- Log in or register to post comments
प
पामर
Tue, 11/25/2014 - 11:30
नवीन
सर्वेश्वरकाका, तुमची प्रतिक्रिया वाचताना मला पु.ना.ओकांची पुन्हा पुन्हा आठवण येत होती! दरवेळी जगातल्या प्रत्येक गोष्टीं मागे ओधुन ताणुन महान प्रचीन भारतीय संस्कृती कशी असते हे फार लहानपणापासुन मला पडलेलं कोड आहे त्यावर काही अजुन प्रकाश टाकु शकाल काय?
- Log in or register to post comments
ग
गजानन५९
Tue, 11/25/2014 - 08:56
नवीन
साला परिस्थिमुळे खूप आवडणार्या इतिहास विषयापासून दूर गेलो त्याचा आज खर्या अर्थाने पश्चाताप होतोय ब्याटम्यानराव, वल्लीशेठ मले तुमचा शिष्य करून घेतव का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3