Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

H
hitesh
Mon, 11/24/2014 - 23:26
🗣 90 प्रतिसाद
सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे. सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते. पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत.. सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल. सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल. बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग नवे अएर्पोर्ट सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल. फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

प्रतिक्रिया द्या
49549 वाचन

💬 प्रतिसाद (90)
म
मुक्त विहारि Tue, 11/25/2014 - 01:04 नवीन
जागेतले पैसे वाया जात नाहीत.आज नाही तर उद्या नाही तर परवा तर नक्कीच फायदा होतो.जागेचा परतावा बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो.कधी कधी निव्वळ अफवेमुळे जागेच्या बाबतीत तोटा पण होवू शकतो तसाच फायदा पण होवू शकतो.शिवाय भारतातली वाढती लोकसंख्या पाह्ता, जागेचे भाव वाढतील पण कमी नक्कीच होणार नाहीत. शेवटी पसंद अपनी-अपनी सोच अपनी अपनी. (एक विनोद म्हणून, तुम्हाला नाही झाला तरी बिल्डरला तरी नक्कीच होतो.)
  • Log in or register to post comments
H
hitesh Tue, 11/25/2014 - 01:58 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
व
वेल्लाभट Sun, 07/05/2015 - 12:57 नवीन
जागेतले पैसे वाया जात नाहीत.आज नाही तर उद्या नाही तर परवा तर नक्कीच फायदा होतो.
असतील तर टाका. आणि मुंबई भरतच जाणार आहे. उद्या चौथी, पाचवी, सहावी पण येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
H
hitesh Tue, 11/25/2014 - 02:01 नवीन
जे एन पी टी ची वाहतुक या मार्गावर रहाणार. तो एकच निगेटिव्ह मुद्दा आह. त्ञामुळे मोठ्या रस्त्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
H
hitesh Tue, 11/25/2014 - 02:04 नवीन
बिल्डर लोक सध्या ही क्लिप दाखवत आहेत. यू ट्युबावर आहे. http://m.youtube.com/watch?v=LzWtB1yxDcw
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 11/25/2014 - 02:18 नवीन
हितेस भाय, तुमचे एक घर असेल तर उगाच गुंतवणुक म्हणुन दुसरे घर घेऊ नका. (हे माझे वैयक्तीक मत आहे)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 11/25/2014 - 02:22 नवीन
"गुंतवणुक म्हणून दुसरे घर घेउ नये." हे जरा स्पष्ट करुन सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Tue, 11/25/2014 - 02:30 नवीन
कारण असे करुन आपण प्रापर्टी महाग करतो आणी दुसरे घर घेऊन एकाला घर घेण्यापासुन वंचीत ठेवतो. (हे पण वैयक्तीक मत आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
H
hitesh Tue, 11/25/2014 - 02:36 नवीन
सध्या माझ्या नावावर घर नाही.. घर रहाण्यासाठीच घ्यायचे आहे. गुंतवणुकीसाठी घर घ्यावे याबाबत अतिशय आग्रही आहे. कारण लोकानी अशी घरे घेऊनब्ठेवली की आपण तिथे भाड्याने राहुशकतो... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 11/25/2014 - 03:18 नवीन
जास्त असलेला ईएमाय भरुन मालमत्ता कायमची आपली कराल का थोडं असलेलं भाडं भरुन दुसर्‍याचं पाकिट भराल? हा एक विचार झाला. अर्थात कीतीतरी जणं असे पाहातो की कर्जाचे हफ्ते फेडायची ताकद असते पण डाऊन पेमेंट महागाई मुळे जमा होऊ शकत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ह
होकाका Fri, 11/28/2014 - 08:09 नवीन
१. रीयल इस्टेट ही इतर गुंतवणुकींसारखीच एक गुंतवणूक आहे. इतर गुंतवणुकींचेच नियम याही गुंतवणुकींला लागू होतात. गेल्या काही वर्षांत भारतात रीयल इस्टेटने खूप जणांचा खूप फायदा करून दिला म्हणजे त्यात नेहेमीच आणि सर्वच भागांत साधारणपणे समान बरकत होतच राहील असं नाही. उदा. वसई पूर्व भागातल्या किंमती १४ वर्षं स्थिर होत्या: साधारणपणे याच काळात (१९१२ - २००६) सोन्याच्या, स्टॉक्सच्या, इ. किंमतीत, भरपूर वाढ झाली. त्यामुळे ज्यांनी १९९२-९३ च्या काळात वसई पूर्व मध्ये गुंतवणूक म्हणून रुपये टाकले, त्यांचा तोटाच झाला. २. भाड्याच्या घरात राहण्याचेही काही फायदे आहेत: हे सामान्यपणे दिसून येते -- या सर्व गोष्टींना अपवाद असतीलच (मिपावर डिस्क्लेमर घातलेला बरा असतो नंतरचे वाद टळतात :) * ते स्वमालकीचे घर नसल्यामुळे आपण त्यात खूप जास्त खर्च करत नाही. * भाड्याच्या घरामुळे निवासस्थळाची अशी काही बंधनं निर्माण होत नाहीत. दुसर्‍या शहरातल्या नोकरी धंद्याच्या संधी सहजपणे स्विकारल्या जाऊ शकतात. * डाऊन पेमेंट + इ एम आय + इंश्यूरन्स हा पूर्ण आकडा भाड्यापेक्षा खूपच जास्त असतो. लाईफ एक्स्पेक्टंन्सीचा विचार केल्यास भाड्याच्या घरात राहणे किफायतशीरच राहते. * परिसर, शेजार, इ. पसंत न पडल्यास घर बदलणे सोपे जाते. इतरही फायदे आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
व
वेल्लाभट Sun, 07/05/2015 - 13:00 नवीन
पण इत्त्त्त्का सामाजिक विचार आजच्या जगात कामाचा नाही. अँड अ‍ॅज अ सी ए, आय ऑलवेज अ‍ॅड्वाईज इन अ‍ॅसेट क्रिएशन. आणि घर हे असं अ‍ॅसेट आहे जे तुम्हाला इनकम जनरेट करून देत रहातं. गाड्या घोड्यांची गोष्ट वेगळी की जी फक्त चैनीसाठी कामाला येतात. वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ख
खटपट्या Tue, 11/25/2014 - 02:20 नवीन
थोडे अवांतर - ठाण्याला भिवंडी रोड्ला जो कशेळी पुल आहे त्याच्या पलीकडे नवीन ठाणे वसणार आहे अशी एक वंदता आहे. मुंबैच्या आसपासची उपनगरे भरल्यामुळे नवीन नगरे वसवीण्याशीवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 11/25/2014 - 02:52 नवीन
या परिसराजवळ राहात असल्याने सांगु शकते.इथे सिडकोकडुन नवे नवे नोड्स डिक्लेअर होत आहेत.तिथे वेळीच गुंतवणुक फायदेशीर होऊ शकते,गुंतवणुक म्हणून घेतल्यास.मात्र फायदा दिसायला दहा वर्ष किमान जाऊ द्यावी लागतील.सध्या इथे अती संथ प्रमाणात विकास आणि एजंट लोकांची खाबुगिरी चालु आहे.निवासासाठी घर घेत असल्यास तिथल्या दळणवळणाच्या सोयी,शाळा,व्यवसाय इ साठी नवी मुंबईला लागुन असलेला परिसर बरा पडेल.अर्थात ते तुलनेने महाग आहेत.उदा.ओव्हरहाईप्ड उलवा भाग.तसेच या सर्वच भागांमध्ये कोणीही उठतं बिल्डिंग बांधतं अशी स्थिती अाहे.त्यामुळे बांधकामाचा दर्जा जरुर जाणकारांकडुन तपासुन घ्यावा.कागदपत्र देखिल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/25/2014 - 03:48 नवीन
तसेच या सर्वच भागांमध्ये कोणीही उठतं बिल्डिंग बांधतं अशी स्थिती अाहे.त्यामुळे बांधकामाचा दर्जा जरुर जाणकारांकडुन तपासुन घ्यावा.कागदपत्र देखिल. बाकी ठिकाणी गुंठा मंत्री तर इथे सगळेच "फूट-मंत्री". शिवाय राजकीय वरदहस्त आणि इतर सामाजीक मदत आहेच. त्यामुळे ताक फुंकूनच न्हवे तर, ताक फ्रीझमध्ये ठेवा आणि गोठले की मग आस्वाद घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रसाद१९७१ Tue, 11/25/2014 - 04:19 नवीन
@ हितेन - जर रहाणार असाल तरच नविन घर घ्या. गुंतवणुक म्हणुन नको. आणि कर्ज काढुन ही गुंतवणुक करणार असाल तर अजिबात नको. मधे टाइम्स मधे छान टेबल आले होते ज्यात दाखवले होते की कर्ज काढुन गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेणे कसे नुकसान करते जर F.D. शी तुलना केली तर.
  • Log in or register to post comments
H
hitesh Tue, 11/25/2014 - 04:48 नवीन
सहमत आहे.. माझेही हेच मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ख
खेडूत Tue, 11/25/2014 - 16:12 नवीन
खरंय ! पण वेळेपूर्वी- म्हणजे निम्म्या वगैरे वर्षांत संपवले तर खूप फायदा होतो हा स्वानुभव आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
अ
अमित खोजे Tue, 11/25/2014 - 17:22 नवीन
Image removed. या गणितामुळे माझाहि कर्ज काढून गुन्तवणुकिचे घर घेण्याचा विचार मी स्थगित केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
क्लिंटन Tue, 11/25/2014 - 18:29 नवीन
हे गणित कागदावर बरोबर आहे.पण त्यात अनेक गोष्टींचा विचार केलेला दिसत नाही. १. घर घ्यायचे हे उद्दिष्ट असेल तर त्याप्रमाणे किमान सहा महिने-वर्षापासून (कदाचित जास्तही) पहिल्या २०% डाऊन पेमेंटसाठी पैसे साठविले जातात.असे काही उद्दिष्ट नसेल तर तितके पैसे साठणे जवळपास दुरापास्त आहे.त्यामुळे असे काही उद्दिष्ट नसेल तर पैसे आहेत ना मग जा ट्रिपला, जेवा महागड्या हॉटेलांमध्ये असे व्हायची शक्यता जास्त. त्यामुळे घर न घेता १३ लाख रूपये बॅंकेत फिक्सला लाऊ असे म्हणणे कितपत प्रत्यक्षात उतरेल याविषयी साशंकता आहे कारण १३ लाख रूपये जमा होणेच वाटते तितके सोपे नाही. तसेच दर महिन्याला अमुक इतका ई.एम.आय द्यायचा म्हटल्यावर आपोआपच इतर खर्च नियंत्रणात ठेवले जातात.तसा दर महिन्याला कुठचाच खर्च होणार नसेल तर किती लोक ’जेवढे ई.एम.आय ला पैसे भरले असते तितके’ दर महिन्याला बॅंकेत टाकू शकतील? २. पाच वर्षात भाव दुप्पट होतील म्हणजे वर्षाला किंमती वाढायचा रेट वर्षाला १४% असेल असे गृहितक आहे. जेव्हा ’इंडिया शायनिंग’ चालू असते त्यावेळी हे रेट त्यापेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत (निदान मुंबईत तरी). २००३-०४ ते २००७-०८ मध्ये काय वेगाने किंमती वाढत होत्या हे आठवून बघा.गेल्या पाच वर्षात किंमती तितक्या प्रमाणात वाढत नव्हत्या.पण आता परत अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग वाढला तर कदाचित यापुढच्या पाच वर्षात घरांच्या किंमती वाढायचा वेग १४% पेक्षा जास्त असेल. ३. दर महिन्याचे भाडे ५% ने वाढेल असे म्हटले आहे. ५% हा वेग बराच कमी आहे हे मी स्वानुभवावरून सांगतो.मी स्वत: भाडे भरताना मागच्या वर्षीपेक्षा १०% जास्त भाडे देत होतो.आणि समजा एखादा भाडेकरू वर्षभर टिकला तर त्याला घरमालक १०% जास्त भाडे नक्कीच मागू शकेल (निदान मुंबईत तरी). कारण एकदा एखाद्या एरिआची सवय झाली तर ते सोडून दुसरीकडे जाऊन बस्तान बसविणे, सगळ्या सामानाची परत बांधाबांध करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही.मलाही थोडे कमी भाडे असलेली पण दुसरीकडील घरे मिळाली नसती असे नाही पण एकदा सवय झाली आहे ना मग कुठे परत दुसरीकडे जा हा विचार मीपण केलाच होता. ४. एफ.डी वरील व्याजाचा दर १०% मानला आहे. किती बॅंका पाच वर्षांसाठी आताही १०% व्याज देतात? आणि पुढील ३-४ महिन्यात व्याजाचे दर कमी झाले तर नव्याने केलेल्या एफ.डी वर आणखी व्याज कमी होईल. ५. पुढील पाच वर्षात इनकम टॅक्सच्या स्लॅब बदलू शकतात याचा विचार या चित्रात केलेला दिसत नाही. २००८-०९ मध्ये १.६० लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते ते आता २.५० लाख पर्यंत गेले आहे. ३०% ची स्लॅबही त्याप्रमाणे पुढील पाच वर्षात वर जाऊ शकेल. त्यामुळे मला तरी हे चित्र कागदावरच बरोबरच वाटते.ते प्रत्यक्षात उतरणे कठिणच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे
ख
खटपट्या Tue, 11/25/2014 - 20:58 नवीन
खूप छान विश्लेषण. सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
H
hitesh Wed, 11/26/2014 - 04:14 नवीन
अगदी सहमत.. व्याज परतावे खर्च यांचे आकडे वास्तववादी नाहीत. त्यामुळे हे टेबल खरी परिस्थिती सांगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
च
चंद्रनील मुल्हेरकर Tue, 11/25/2014 - 05:20 नवीन
मुंबै पुणे एक्स्प्रेस वेच्या आजुबाजुला दाट वस्ती झाल्यावर काय करायचे?
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Tue, 11/25/2014 - 06:38 नवीन
कुणी काय करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 11/25/2014 - 08:31 नवीन
सत्ताबदल झाल्यावर आता हे प्रॉपर्टीचे धागे यायला लागले आहेत.पृथ्वीराज मुख्यमंत्री असताना हा प्रकार नव्हता.
  • Log in or register to post comments
H
hitesh Tue, 11/25/2014 - 08:38 नवीन
लोक म्हणतात मी तुम्ही नाना एकच आहोत.. खरेच असे आहोत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
पैसा Tue, 11/25/2014 - 08:57 नवीन
आत्ता लक्षात आलं. नाना-माई ही 'जुयेरे' नावाच्या भयाण शिरेलीतली मेड फॉर ईच अदर सासू सासर्‍यांची जोडी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Tue, 11/25/2014 - 09:07 नवीन
ते सासु सास्रे. मग मी कोण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
काळा पहाड Tue, 11/25/2014 - 09:19 नवीन
महारथी कर्णाला हाच प्रश्न छळत होता म्हणे. अर्ज्युन्यानं संपवला तेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Wed, 11/26/2014 - 05:02 नवीन
कर्णाला कुंतीने संपवला. ( लबाड बै हतबुद्ध पुरुष हिंदु लक्षण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
H
hitesh Wed, 11/26/2014 - 05:11 नवीन
मी घराचे नाव आलमगीर औरंगजेब निवास असे ठेवणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ख
खटपट्या Wed, 11/26/2014 - 05:54 नवीन
कीती तो विषयांतर करण्याचा प्रयत्न !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
प
पैसा Wed, 11/26/2014 - 06:07 नवीन
हरदासाची कथा मूळपदावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/26/2014 - 06:13 नवीन
यावरून "मी धर्मबदल केला असता तर बरं झालं असतं" असं पूर्वी सतत म्हणणार्‍या एका आयडी/डुआयडीची आठ्वण होउन ड्वाले पानाव्ले :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ज
जेपी Tue, 11/25/2014 - 09:30 नवीन
हितेस भाय, मी कोण आहे?च्या शोधात बरेचजण भ्रमात जाऊन निराकार झाले आहेत. आमचा नाना ही स्वत:ला शोधता शोधता चुकीच्या जागी गेला आणी वापस आलाच नाही. तुमी काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
सूड Tue, 11/25/2014 - 10:05 नवीन
तुम्ही नानांचा पुनर्जन्म होता का? मग माई पण पुनर्जन्म घेतील तुमच्यासाठी!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
भ
भाते Tue, 11/25/2014 - 10:12 नवीन
नानाला जाऊन फार काही दिवस झाले नाहीत. मग इतक्यात पुनर्जन्म होऊन मिपावर लेख प्रतिसाद देण्याइतका हा मोठा कसा झाला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ट
टवाळ कार्टा Tue, 11/25/2014 - 10:31 नवीन
मिपावर १ जन्म असतानाच पुनर्जन्म होतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
H
hitesh Tue, 11/25/2014 - 11:26 नवीन
मी नानाच्या आधीही होतो. बरोबरही होतो. आताही आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी Tue, 11/25/2014 - 11:44 नवीन
हितेस भाय, आमचा नानापण असच बोलायच्या,यत्र तत्र सर्वत्र मीच आहे म्हणायच. यामुळे तो गेलातरी अमर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
V
vikramaditya गुरुवार, 11/27/2014 - 17:47 नवीन
Ae Babu Moshai, Zindagi aur maut uparwale ke haath hai. Usse na aap badal sakte hain na main” – “ Nana mara nahin. Nana marate nahin” (अर्थातच ह्र्षिदांची क्षमा मागुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सूड Tue, 11/25/2014 - 11:53 नवीन
>>मी नानाच्या आधीही होतो. बरोबरही होतो. आताही आहे
हो, बिल्ला नंबर बघून कळतंय ते!! मांजरीन् डोळे मिटून दूध प्यायलंन् म्हणून जगाला दिसत नाही असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
भ
भाते Tue, 11/25/2014 - 10:04 नवीन
गेल्या आठवडयात टाइम्स प्रॉपर्टीमध्ये एक लेख वाचला होता. कांदिवली परिसरात बांधकाम चालू असलेली आणि बांधकाम पुर्ण झालेली मिळुन किमान २५ हजार घरे खरेदीसाठी ग्राहक मिळत नसल्याने विक्री न होता पडून आहेत. तिथला जागेचा भाव १२ हजार स्क्वे. फू. वरून ९ हजार स्क्वे. फू. पर्यंत खाली आला आहे. ज्यांनी गुंतवणुक म्हणुन घर खरेदी केले होते ते आणखी नुकसान टाळण्यासाठी आत्ता मिळेल त्या भावात घर विकायला तयार आहेत. त्यामुळे खिशात जास्तीचा पैसा असेल तर गुंतवणुक म्हणुन घर घ्यायला काही हरकत नाही. पुढे चांगला परतावा मिळेल या आशेवर आत्ता इएमआय भरण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/27/2014 - 12:49 नवीन
Krupaya batmicha duwa dene.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
भ
भाते गुरुवार, 11/27/2014 - 13:37 नवीन
हा घ्या बातमीचा दुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
स्वामी संकेतानंद Tue, 11/25/2014 - 10:51 नवीन
रहायला म्हणून घ्या, त्या भागाचा 'विकास' होणार आहेच. गुंतवणूक म्हणून कर्ज काढून विकत घेण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
H
hitesh Wed, 11/26/2014 - 12:02 नवीन
बिल्डर. .. लँडस्केप . पुण्यात त्यांचे काम आहे
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 11/27/2014 - 13:02 नवीन
http://www.landscapeindia.org/index.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/27/2014 - 13:41 नवीन
आजकाल टिव्ही वर "BKC मध्ये १४ लाखापासून फ्लॅट आणि ३६ की ३९ लाखापासून व्हिला" अशी जाहिरात येत आहे... हे BKC म्हणजे काय ? बांद्रा-कुर्ला-काँप्लेक्स की अजून काय ?
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 11/27/2014 - 14:51 नवीन
हो तेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा