Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्रेडीट कार्ड आणि त्याविषयीचे कायदे कानू …

अ
अव्यक्त
Sat, 11/29/2014 - 12:19
🗣 79 प्रतिसाद
मी प्रथमच क्रेडीट कार्ड घेत आहे तरी नविन क्रेडिट कार्ड घेताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून पुढील मनस्ताप टाळता येईल… आपण सगळेच वर्तमान पत्रात क्रेडीट कार्ड विषयी घडामोडी वाचत असतोच…क़ाय काळजी घेता येईल…मि पा करांच्या ह्याविषयी काय अनुभव आहेत जे ह्या धाग्यात उधृत करता येतील … माझा प्रश्न आहे कि बँकेच्या अवास्तव भूल थापाना कसं रोखता येईल त्याविषयी काही R.B.I. चे कायदे कानू आहेत काय? ह्यासंदर्भात कोणी माहिती देवू शकेल काय … क्रेडीट कार्ड विषयी चांगले आणि वाईट अनुभव…जेनेकरुन समाज प्रबोधन होईल आणि अपप्रवृत्तिना आळा बसेल…. बँक ज्या ग्राहकांना सुविधा देऊ करतात (hidden offers) उदा. आजीवन सभासदत्वात सुट (LIFE TIME FREE) किंवा गेला बाजार चित्रपटांची तिकीटे सवलतीत मिळतील… ह्या स्वरूपातील आश्वासने (खरी/ खोटी? ) ही लेखी स्वरुपात किवा email स्वरुपात ग्राहकांना देणे कायदेशीर रित्या बँकांना बंधनकारक आहे कि कस्से… ग्राहकांचे हित जपणारे कोणते कायदे कानू कोणास अवगत असतील तर येथे त्याच्या विषयी चर्चा (विधायक ) अपेक्षित आहे … म्हणजे सामान्य क्रेडीट कार्ड धारकाला आपल्या हक्कांची ओळख होईल। आणि जागरूकता वाढेल ह्या विषयी हा पत्र प्रपंच… सूज्ञ मि.पा. कर त्यांचा ज्ञानाचा उपयोग इतरांस अवगत करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि जास्तीत जास्त माहिती पुरवावी हिच मि.पा. कराना नम्र विनंती…लोभ असावा … इति लेखनसीमा…

प्रतिक्रिया द्या
42089 वाचन

💬 प्रतिसाद (79)
त
तुषार काळभोर Sat, 11/29/2014 - 13:26 नवीन
नायतर व्याज (महिना ३-४% !!!) + दंड(५०० ते कितीपण) + सिबील रिपोर्टमध्ये नोंद (नंतर कर्ज मिळायला अडचणी) बाकी ऑनलाईन फसवणुक, हॅकींग, इ. साठी कॉमन सेन्स!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/29/2014 - 13:42 नवीन
मनस्ताप नको म्हणून SBI डेबीट /एटीम वर समाधानी आहे आणि त्या अकाउंटात थोडेच पैसे ठेवतो.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 11/29/2014 - 13:59 नवीन
बेस्ट उपाय. अगदी नाकाशी येईपर्यंत क्रेडीट कार्ड वापरुचं नये. वस्तु घ्यायच्या असतील तर प्लॅनिंग करुन घ्याव्या (रिकरींग, फिक्स्ड डिपॉसिट्स वगैरे त्या वस्तुसाठी करुन). वेळ आणि पेशन्स लागेलं ती वस्तु मिळायला पण नंतर त्रास होणार नाही. आणि वापरलचं तर पुढची सेटलमेंट मुदतीच्या आत नं विसरता करावी.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 11/29/2014 - 20:10 नवीन
सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मुक्त विहारि Sat, 11/29/2014 - 21:51 नवीन
कारण आमच्या बाबांनी तसे आम्हाला बरेच गुरुमंत्र दिले आहेत. "खिशात जितके रुपये असतील त्याच्या पेक्षा जास्त खर्च करायचा नाही." त्यामुळे क्रेडीट जरी असले तरी,(आमचा किराणा सामानवाला १५/२० दिवस थांबायला तयार असतो.) क्रेडीट कार्ड घेण्याची कधी गरज भासली नाही.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 11/30/2014 - 08:26 नवीन
त्यामुळे क्रेडीट जरी असले तरी,(आमचा किराणा सामानवाला १५/२० दिवस थांबायला तयार असतो.) क्रेडीट कार्ड घेण्याची कधी गरज भासली नाही.
तरीही क्रेडिट कार्ड असावे.याचे कारण भविष्यात कधी कर्ज काढावे लागले (होम लोन इत्यादी) तर बँका पहिल्यांदा सिबिलचा क्रेडिट स्कोअर बघतात.चांगला सिबिल स्कोअर नसेल तर बँका कर्ज देत नाहीत. इतकेच काय तर मागच्या वर्षी मी नोकरी बदलली त्यावेळी ऑफर लेटर देण्यापूर्वी माझा सिबिल स्कोअर नव्या कंपनीने चेक केला होता.सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी क्रेडिट कार्ड बाळगून वेळच्या वेळी बिले भरणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. (गेली १२ वर्षे क्रेडिट कार्ड बाळगणारा आणि सगळी बिले वेळच्या वेळी भरणारा) क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
र
रघुपती.राज Mon, 12/01/2014 - 11:35 नवीन
आपण चान्गला मुद्दा मान्ड्ला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नितिन थत्ते Sun, 11/30/2014 - 03:52 नवीन
१. अ‍ॅन्युअल फी माफ आहे असे बँक सांगेल. (खाली तीन पॉइंट टायपात- जर वर्षाला दोन लाख रुपये खर्च केला तर...... असं छापलेलं असेल). २. दोनाहून जास्त कार्डे घेऊ नका. काही गरज नसते. ३. दोन कार्डे असली तरी खर्च एकाच कार्डावरून करा. कार्डावर खर्च झाला की एसेमेस येईल अशी व्यवस्था करा. सर्वात महत्त्वाचे: मुक्तविहारी यांनी म्हटल्याप्रमाणे क्रेडिट कार्ड असले तरी आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेतच खर्च करा. क्रेडिट कार्डावर कॅश विथड्रॉअल कधीही करू नका. प्रत्येक कॅश ट्रान्झॅक्शनवर ३००-४०० रु ट्रान्झॅक्शन फी + ३००-४०० रु कॅश विथड्रॉअल फी लावली जाईल.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 11/30/2014 - 05:39 नवीन
क्रमांक १ शी सहमत. अ‍ॅन्युअल फी खरोखरच माफ असलेली कार्डे असतात, मात्र ते नीट तपासून पहायला हवे. क्रमांक २ आणि ३ शी किंचित असहमत. नेहेमी दोन कार्डे घ्या(च). दोहोंच्या बिलिंग सायकलमध्ये साधारणपणे १५ दिवसांचे अंतर राहील हे पहा. (बिलिंग सायकल बदलून मिळते). दोन्ही कार्डे त्यांच्या त्यांच्या बिलिंग सायकलच्या पहिले पंधरा दिवसच वापरा. आणि अधिक काळ क्रेडिट मिळवा. प्रत्येक व्यवहारांनतर SMS मिळेल अशी व्यवस्था तर कराच. खेरीज, दररोज एकदा नेटवरून कार्डाची खबरबात बघत चला. शेवटी क्रेडिट कार्ड हे एक उपयुक्त हत्यार आहे. नेटकेपणे वापरलेत तर, फायदा आहेच. वेंधळेपणा केलात तर खूप नुकसान. पण वापरायचेच नाही, हा निव्वळ करंटेपणा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मुक्त विहारि Sun, 11/30/2014 - 06:45 नवीन
असेल... तसेही असेल... पण गेल्या ३० वर्षांत कमवायला लागल्या पासून, कधीच गरज भासली नाही.पाकीटातल्या आजच्या पैशाचा अंदाज आणि पुढील महिन्याभराचा अंदाज घेवूनच खर्च केल्या जातो, तर तो करंटेपणा कसला? अर्थात तुम्ही जर काटकसरीपणाला करंटेपणा म्हणत असाल तर गोष्टच वेगळी. मुळात क्रेडीट-कार्ड लागतेच कशाला? त्याच्या वाचून अद्याप तरी माझे काही अडले नाही आणि पुढेही अडेल असे वाटत पण नाही. तशा माझ्या गरजाच कमी असल्याने मला वैयक्तिक खर्चच फार कमी.४ शर्ट आणि ४ पँट वर २/३ वर्षे सहज निघतात आणि तसेही कंपनीचा ड्रेस असतोच मग अज्जुन कशाला कपडे हवेत्?बरे माझा व्यवसाय पण असा नाही, की ड्रेसमुळे माझे व्यक्तिमत्व उठावदार होईल. १. रोजची खरेदी रोखीतच केल्या जाते.त्याला कार्ड लागत नाही.भारतातली ९०% जनता अद्याप क्रेडीट कार्ड वापरत नाही, असा अंदाज आहे.मग हे सगळेच करंटे का? २. अद्याप तरी माझ्या दारापाशी कुणीही धनको उभा राहिलेला नाही.मग तो बँकेच्या स्वरूपात असो किंवा किराणामाल दुकानदाराच्या स्वरूपात असो.आमचा किराणादुकानदार थांबतो, कारण आमच्या शब्दाची किंमत त्याला माहीत आहे आणि अशी वेळ पण ३/४ वर्षांतुन एकदाच येते.आता तर पुढील आयुष्यात ते पण होणार नाही. आमचे बाबा अज्जुन एक सांगतात. जो करी रोख व्यवहार, त्याचे मुल्य अपार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sun, 11/30/2014 - 07:21 नवीन
आमचे बाबा अज्जुन एक सांगतात. जो करी रोख व्यवहार, त्याचे मुल्य अपार.
असेलही. (आमचे बाबा काहीही म्हणोत) पण आम्ही म्हणतो - रोखीचा व्यवहार, लावी काळ्या पैशाला हातभार! (रोखीचे व्यवहार शक्यतो टाळणारा) सुनील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 11/30/2014 - 07:53 नवीन
कदाचित तुमचा, भाजीवाला, फळवाला, चहावाला आणि दूधवाला क्रेडीटने पैसे घेत पण असेल आणि पेपरवाला तर नक्कीच.शिवाय आजकाल वडापावच्या गाड्या तर सोडाच पण चपला शिवणारे पण क्रेडीट कार्डानेच व्यवहार करतात असे ऐकिवात आहे.परवाच कुठेतरी वाचले की, पानवाले आणि फेरीवाले पण क्रेडीट कार्डा द्वारेच पैसे स्वीकारणार असे.भिकार्‍यांसाठी पण असाच कायदा करतील नाही?(शिवाय टी.व्ही. दुरुस्त करणारा पण का? हे पण विचारणार होतो, पण लक्षांत आले, तुम्ही टी.व्ही. नादुरुस्त झाला तर लगेच क्रेडीट कार्डाने दुसरा टी.व्ही.पण आणत असाल.) बादवे, तुम्ही जी रद्दी विकता तो रद्दीवाला पण तुम्हाला क्रेडीट कार्डानेच पैसे देत असेल नाही?आणि तुमचा किराणी दुकानदार पण रोखीनेच व्यवहार करतो? की तुम्ही त्याला पण क्रेडीट कार्डा द्वारेच पैसे देता?जर तुम्ही अंडी-मटण आणि मासे खात असाल तर, त्यांना पण तुम्ही क्रेडीटकार्डानेच पैसे देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sun, 11/30/2014 - 08:34 नवीन
(रोखीचे व्यवहार शक्यतो टाळणारा) सुनील
माझ्या "शक्यतो टाळणार्‍या" ह्या शब्दांना, शक्यतो टाळलेले दिसते आहे! ;) असो. अद्याप काटेखोर हिशोब काढलेला नाही, तरीही माझा जवळपास ९०% खर्च हा प्लास्टिक मनीद्वारे होतो. (१००% खर्च प्लास्टिक मनीद्वारे होण्याचे 'अच्छे दिन' यायची वाट पाहणारा) सुनील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सस्नेह Sun, 11/30/2014 - 09:01 नवीन
जौ द्या हो मुवि, जमाना बदललाय आता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 11/30/2014 - 16:22 नवीन
जमाना बदलला आहे... पण म्हणून ज्यांना एखाद्या सुविधेचा फायदा घ्यायचा नसेल, किंवा त्या सुविधेवाचून त्यांचे काही अडत नसेल तर त्यांना करंटे म्हणू नये, इतके तरी मला नक्कीच समजते. माझ्या घरातील वडीलधारे अद्य्यप मोबाईल वापरत नाहीत.कारण त्यांच्यावाचून त्यांचे काहीच अडत नाही, म्हणून त्यांना 'करंटे" म्हणायचे का? @ सुनील.... तुम्हीच बघाना, किती ठिकाणी तुम्हाला रोख पैसे द्यायला लागतात? जर मी वर उल्लेख केलेल्या व्यक्तींना तुम्ही रोख पैसे देत असाल तर बाकी ठिकाणी आम्हाला बिल (हो, पक्के बिल) मिळतेच.नाही तरी वस्तू विकत घेणारच आहोत, मग रोख पैसे दिले तर काय बिघडले? माझ्या हिशोबाप्रमाणे माझ्या घरातील ७५ ते ८०% व्यवहार मला कितीही प्रयत्न केला तरी रोखच करावे लागतात.साधी मोटर-साय़कल मध्ये हवा भरायची किंवा पंक्चर काढायचे असेल तरी व्यवहार रोखीतच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सतिश गावडे Sun, 11/30/2014 - 16:36 नवीन
मुवि तुम्ही जिंकलात. आता आम्हाला पार्टी हवी. सुनील काकांनाही बोलावू पार्टीला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 11/30/2014 - 18:23 नवीन
सुनील बरोबर ह्या आधी पण कट्टा झाला आहे.माध्यम वेगळे होते.(आणि म्हणूनच त्यांच्या बरोबर मुद्द्यावरून वाद घालत आहे.ते आणि मी व्यक्तीगत कधीच घेत न्हवतो. आज पण नाही आणि उद्यापण नाही.) आता तुमच्याबरोबर कधी कट्टा करायचा ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ख
खटपट्या Sun, 11/30/2014 - 18:55 नवीन
भिकार्‍यांसाठी पण असाच कायदा करतील नाही?(
यावरून आठवले. क्रुपया खालील लिन्क १:१० पासुन पुढे पहा. (कॄ. ह. घे.) https://www.youtube.com/watch?v=QqheJvWOZC4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 11/30/2014 - 20:17 नवीन
भारी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/01/2014 - 15:49 नवीन
यकदम् फॅन्तॅखतॅख हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 12/01/2014 - 18:20 नवीन
५००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ग
गजानन५९ Mon, 12/01/2014 - 08:30 नवीन
डोका लावून वापरल तर क्रेडीट कार्डासारखी भारी सोय कुठली नसेल. असो ज्याचा त्याचा आणुभव बाकी कायबी नायी
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Mon, 12/01/2014 - 09:34 नवीन
क्रेडिट कार्डची खरोखर गरज असते का? माझ्याकडे कुठलेच क्रेडिट कार्ड नाही. २००५ मध्ये एक होते (एचएसबीसीचे). मी कधीच वापरले नाही. एकदा त्यांचे तीनशे की पाचशे रुपयांचे बिल आले. मी विचारले की हे बिल कसले. त्यांनी काहीतरी थातूर-मातूर चार्जेस सांगीतले. मी म्हटलं मी नाही भरणार आणि तुमचं कार्ड मी कधीच वापरलेलं नाही; तुम्हाला वाटत असेल तर रद्द करा; मला नकोय. त्यांनी त्यानंतर कार्ड सहा महिने ठेवलं. शेवटी कंटाळून त्यांनीच रद्द केलं. अजून तरी क्रेडिट कार्डाशिवाय माझं काहीही अडलेलं नाही. सगळीकडे माझं डेबीट कार्ड चालतं. क्रेडिट कार्डावर दिल्या जाणार्‍या इतके टक्के सूट, तिकिटे मोफत वगैरे ऑफर्स खरोखर फायद्याच्या असतात का? की काहीतरी मोफत आहे म्हणून तुम्ही तुमचं कार्ड स्वाईप करत सुटावं असा ट्रॅप असतो? एनीवे, मी कधी फुकट, सूट वगैरे भूलथापांना बळी पडत नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही. जेव्हा गरज असेल ते आणि फक्त तेच घ्यावं हे तत्व सोयीचं वाटतं. कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावं हे काही पटत नाही. मी आतापर्यंत जी कर्जे घेतली ती क्रेडिट कार्डाशिवायच घेतली. अर्थात याला दुसरी बाजू असू शकते. ती बहुतेक मला माहित नसावी. त्याबद्दल क्षमस्व! क्रेडिट कार्ड हे लोकांनी जास्तीत जास्त खर्च करावा म्हणून उदयाला आलेलं एक चक्रव्यूह आहे. चार-पाच क्रेडिट कार्डे बाळगून बिले भरण्यासाठी कसरत करणारी माणसे माझ्या पाहण्यात आहेत. क्रेडिट कार्ड घ्यायचं आणि त्यावर मग निरर्थक खरेदी करत सुटायचं. मग त्याची बिलं भरण्यासाठी दुसर्‍या क्रेडिट कार्डातून कॅश काढायची असं ते चक्रव्यूह आहे. अगदी सांभाळून खर्च करण्याची सवय असेल तर एक क्रेडिट कार्ड पुरेसं असावं असं वाटतं. खरं म्हणजे त्याचीदेखील गरज नाहीच. डेबीट कार्ड पुरेसं आहे. खिशात नसलेला पैसा खर्च करण्यात काय पॉईंट आहे? आणि तो ही मोबाईल, टीव्ही, एसी, वगैरे सारख्या चैनीच्या वस्तूंवर? माझा सल्ला: अगदीच गरज असेल तरच आणि तरच क्रेडिट कार्ड घ्या. काहीतरी फुकट मिळतेय (सिनेमाची तिकिटे, गोवा ट्रिप, वगैरे) म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ नका. तुम्हाला अशी सवय लावून तुमच्याकडून खर्च करवून घेण्याचं हे तंत्र आहे. आणि सगळे हिशेब नीट करून प्रत्येक ऑफरमधून नेमका आपला फायदा शोधून काढून आपल्याला भूर्दंड न पडता त्याचा लाभ घेता येण्याचे कसब असेल तरच क्रेडिट कार्ड घ्या. हे करण्यासाठी दिवसभराच्या या धबडग्यात वेळ आणि ऊर्जा खर्ची घालावी लागते. याची तयारी असेल आणि कार्डावर खर्चाच्या बाबतीत काटेकोर शिस्तपालन करू शकणार असाल तरच क्रेडिट कार्ड घ्या. अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतोच. आपल्याला काय योग्य वाटते यावर निर्णय घेणे चांगले. :-)
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 12/01/2014 - 13:19 नवीन
२००५ मध्ये एक होते (एचएसबीसीचे). मी कधीच वापरले नाही. एकदा त्यांचे तीनशे की पाचशे रुपयांचे बिल आले. मी विचारले की हे बिल कसले. त्यांनी काहीतरी थातूर-मातूर चार्जेस सांगीतले. मी म्हटलं मी नाही भरणार आणि तुमचं कार्ड मी कधीच वापरलेलं नाही; तुम्हाला वाटत असेल तर रद्द करा; मला नकोय. त्यांनी त्यानंतर कार्ड सहा महिने ठेवलं. शेवटी कंटाळून त्यांनीच रद्द केलं.
२००५ मध्ये सिबील स्कोअररेकॉर्ड कसा ठेवला जात होता याची कल्पना नाही. पण सध्याच्या काळात क्रेडिट कार्डावर आलेले असे कोणतेही चार्जेस भरले नाहीत तर संबंधित बँका सिबीलला त्याची माहिती देतात.अशातून "विलफुल डिफॉल्टर" हा शिक्का विनाकारण बसून आपला स्कोअर खराब व्हायची शक्यता असते. कदाचित २००५ मध्ये ही पध्दती तितक्या प्रमाणावर फुलप्रूफ नसावी. सध्याच्या काळात असल्या भानगडीत न पडलेले बरे. जर विनाकारण चुकीचे चार्जेस लावले गेले आहेत असे आपले म्हणणे असेल तर रिझर्व्ह बँकेच्या ओंबुड्समनकडे तक्रार करता येईलच.पण असे चार्जेस अजिबात न भरणे आपल्यासाठीच धोक्याचे होऊ शकते.
कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावं हे काही पटत नाही. मी आतापर्यंत जी कर्जे घेतली ती क्रेडिट कार्डाशिवायच घेतली.
हे आपल्याला पटून-न पटून काहीच फरक पडत नाही. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यापूर्वी बँका सिबील स्कोअर बघतातच.मी अलिकडेच या अनुभवातून गेलो आहे.मी कर्जासाठी किमान चार बँकांमध्ये चौकशी केली.सगळीकडे सिबील स्कोअर बघणारच असेच मला सांगितले गेले होते.कदाचित तुम्ही कर्ज काढले असेल त्यावेळी सिबील स्कोअरचे महत्व तितके नसेल पण आता नक्कीच आहे.तेव्हा आपला स्कोअर बिघडेल असे काहीही न केलेले श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
प
प्रसाद१९७१ Mon, 12/01/2014 - 13:47 नवीन
@क्लिंटन - तुमच्या प्रतिसादावरुन असे वाटते आहे की क्रेडीट कार्ड असले की कर्ज मिळायला मदत होते. सिबील चा स्कोर क्रेडीट कार्ड नसले तरी चांगलाच येतो. क्रेडीट कार्ड आहे आणि तुम्ही पेमेंट वेळेवर करत आहात ह्यानी तुमचा स्कोर क्रेडीट कार्ड नसणार्‍या पेक्षा ( पण बाकी सर्व समान असणार्‍या ) पेक्षा जास्त येत नाही. ज्याने क्रेडीट ( कर्ज ) घेतलेच नाही, तर त्याने ते फेडायचा प्रश्न च येत नाही. सिबिल स्कोर चे हल्ली महत्व आहे पण क्रेडीट कार्ड आहे म्ह्णुन स्कोर वाढत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 12/01/2014 - 14:10 नवीन
सिबील चा स्कोर क्रेडीट कार्ड नसले तरी चांगलाच येतो.
सिबीलचा स्कोअर कुठले तरी कर्ज वेळेत फेडायचा रेकॉर्ड चांगला असेल तर चांगला होतो. त्यासाठी क्रेडिट कार्डच असले पाहिजे असे नाही हे बरोबर आहे. पण क्रेडिट कार्ड असेल आणि बिले वेळेत भरून रेकॉर्ड चांगला ठेवला तर त्यामुळे सिबिल स्कोअर वाढतो हे नक्की.
ज्याने क्रेडीट ( कर्ज ) घेतलेच नाही, तर त्याने ते फेडायचा प्रश्न च येत नाही.
हो बरोबर. म्हणूनच ज्यांच्या नावावर कुठलेच कर्ज/क्रेडिट कार्ड नसेल त्यांचा क्रेडिट स्कोअर ऋण १ असतो. मी अगदी अलीकडेच कर्जाला अर्ज केला आहे म्हणून हे अधिकारवाणीने सांगू शकतो.कर्जासाठी मी आणि हिलरी जॉईंट अ‍ॅप्लिकन्ट्स होतो.हिलरीच्या नावावर यापूर्वी कुठलेच क्रेडिट कार्ड किंवा कर्ज नव्हते.त्यामुळे तिचा क्रेडिट स्कोअर ऋण १ आला होता.कर्जाची परतफेट करायचा अजिबात रेकॉर्ड नसेल तर बँका गृहकर्जासारखे मोठे कर्ज देत नाहीत. गृहकर्जासाठी किमान ७०० स्कोअर हवा असे माझ्याच रिलेशनशीप मॅनेजरने मला सांगितले.लहान रकमेचे कर्ज कदाचित बँका कमी स्कोअर असूनही किंवा अगदी ऋण १ स्कोअर असूनही देतही असाव्यात. माझा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यामुळे कर्ज मिळायला अडचण आली नाही.आता कर्जाचे हप्ते जसे भरले जात आहेत त्याप्रमाणे त्याचा माझ्या आणि हिलरीच्याही क्रेडिट स्कोअरवर होईल.आणि माझा क्रेडिट स्कोअर कसा चांगला आला? २००८ पासून भारतात माझ्या नावावर क्रेडिट कार्ड आहे आणि त्याची बिले वेळच्या वेळी भरली आहेत. तसेच २०११ पासून शिक्षणकर्जाची परतफेड केली आणि त्यामुळेही माझा रेकॉर्ड चांगला झाला. तेव्हा नुसते क्रेडिट कार्ड आहे म्हणून स्कोअर वाढत नाही हे बरोबर आहे.पण क्रेडिट कार्डाची बिले वेळेत भरल्यामुळे स्कोअर वाढतो हे स्वानुभवावरून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Wed, 12/03/2014 - 07:49 नवीन
म्हणूनच ज्यांच्या नावावर कुठलेच कर्ज/क्रेडिट कार्ड नसेल त्यांचा क्रेडिट स्कोअर ऋण १ असतो.
हे फार चुकीचे आहे. :-( कमीत कमी क्रेडीट कार्ड असणार्‍या इतका स्कोर तरी द्यायलाच हवा होता. @क्लिंटन - तुम्ही माहीतगार आहात म्हणुन अजुन एक प्रश्न. मी गृहकर्ज २००५ ला घेतले आणि २००८ ला सगळे फेडुन टाकले. तेंव्हा सिबील नव्हते, तर माझ्या ह्या कर्जफेडीच्या चांगल्या वर्तनाची सिबिल कडे नोंद असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
समीरसूर गुरुवार, 12/04/2014 - 07:29 नवीन
क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे हा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठीच्या अनेक पर्यांयांपैकी एक पर्याय आहे. तो एकमेव पर्याय नाही. कर्जाचे (गृह, वाहन, शैक्षणिक, वैयक्तिक, व्यावसायिक) हप्ते वेळेवर भरणे, वेळेआधी अटींचे पालन करून कर्ज फेडणे, विमा पॉलीसीचे हप्ते वेळेवर भरणे, इतर गुंतवणूकीमध्ये सगळ्या अटींचे पालन करणे, नियमितपणे भरलेला योग्य तो आयकर, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये केलेली गुंतवणूक, एफडींवर मिळणार्‍या व्याजावर इमानाने भरलेला कर, इत्यादी सगळ्या बाबींचा सिबिल स्कोअरवर सकारात्मक परिणाम होत असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
सुनील गुरुवार, 12/04/2014 - 07:39 नवीन
नाही. सिबिल फक्त क्रेडिट (कर्ज) इतिहास बघते. त्यामुळे विमा, पीपीएफ, एफडी, आयकर इत्यादी गोष्टी त्याच्या कक्षेत येत नाहीत. सिबिल स्कोअर हा बाजारातील तुमची पत (घेतलेली कर्जे फेडण्याची क्षमता/सवय) दर्शवतो. बाकी तज्ञ सांगतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
स
समीरसूर गुरुवार, 12/04/2014 - 09:42 नवीन
धन्यवाद, सुनील. फक्त कर्ज आणि क्रेडीटचा व्यवहार सिबिलसाठी ग्राह्य धरण्यात येतो ही माहिती बरोबर आहे. माझा थोडा गोंधळ झाला. ही माहिती सिबिलला प्रत्येक महिन्याला बँकांनी पाठवणे अपेक्षित असते असे सिबिलच्या संकेतस्थळावर लिहिले आहे. त्यामुळे एखादे कर्ज फेडले असेल तरी ती माहिती सिबिलने ग्राह्य धरली असेलच असे नाही. त्यासाठी ते संबंधित बँकेकडे डिस्प्युट दाखल करण्याचा सल्ला देतात. असेच क्रेडिट कार्डच्या व्यवहारांच्या बाबतीत देखील होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये सिबिल स्कोअर कितपत विश्वासार्ह आहे? सगळ्या संस्था (राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, वगैरे) सिबिलला कर्जविषयक आणि क्रेडिट कार्ड विषयक माहिती (ग्राहकांच्या व्यवहारांच्या संदर्भात) दर महिन्याला कळवते का? ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि शिस्तबद्ध रीतीने होत असते का? सहकारी बँका, खाजगी बँका, खाजगी गृहकर्ज संस्था (डीएचएफएल, एलआयसीएचएफएल), शेड्युल्ड बँका, या संस्था सिबिल स्कोअर बघतात का? या संस्था कर्जाविषयीची माहिती नियमितपणे सिबिलला कळवतात का? की या संस्थांकडून घेतलेले कर्ज सिबिलच्या अखत्यारीत येत नाही? किंवा हे कर्ज सिबिल स्कोअरसाठी ग्राह्य धरण्यात येत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
क्लिंटन गुरुवार, 12/04/2014 - 10:01 नवीन
मी गृहकर्ज २००५ ला घेतले आणि २००८ ला सगळे फेडुन टाकले. तेंव्हा सिबील नव्हते, तर माझ्या ह्या कर्जफेडीच्या चांगल्या वर्तनाची सिबिल कडे नोंद असेल का?
भारतात सिबील नक्की कधी आले हे माहित नाही पण २००८ मध्ये नक्कीच होते. कारण माझ्याच क्रेडिट रिपोर्टमध्ये २००८ मध्ये मी अर्ज केलेल्या क्रेडिट कार्डासाठीची एन्क्वायरी आहे :) तेव्हा २००८ मध्ये कर्ज परत केले असेल तर त्या चांगल्या वर्तनाची नोंद असायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 04:40 नवीन
२००५ मध्ये बहुधा सिबिल वगैरे काही नव्हते. मी अजून एक कर्ज २००९ मध्ये घेतले होते. त्यावेळेसची परिस्थिती माहित नाही. पण त्यावेळेसही मला सिबिल वगैरे काही विचारले नव्हते. सिबिल स्कोअर चांगला असल्याने नेमके काय होते? कर्ज लगेच मिळते की कर्जाची मर्यादा वाढते की कर्ज मिळणे सोपे होते? सिबिल स्कोअर चांगला असल्याने कर्जासंबंधी नेमका काय फायदा होतो? अर्थात त्यासंदर्भात खूप जबरदस्त फायदे असतील आणि कर्ज घेणे अतिआवश्यक असेल तर क्रेडिट कार्ड घेणे व नियमित वापरणे कदाचित सयुक्तिक असू शकेल. शेवटी निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. :-) वैयक्तिकरीत्या मला क्रेडिट कार्ड ही संकल्पना फारशी झेपत नाही म्हणून शक्य असेल तोपर्यंत मी क्रेडिट कार्ड घेणार नाही असे ठरवले आहे. :-) बघू संकल्प कधीपर्यंत टिकतोय ते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 12/02/2014 - 06:07 नवीन
मी अजून एक कर्ज २००९ मध्ये घेतले होते. त्यावेळेसची परिस्थिती माहित नाही. पण त्यावेळेसही मला सिबिल वगैरे काही विचारले नव्हते.
आपण बँकेत कर्ज काढायला जातो तेव्हा 'तुझा सिबील स्कोअर किती रे' असे बँकेतला माणूस आपल्याला विचारत नाही.तर डायरेक्ट सिबीलकडून आपला क्रेडिट रिपोर्ट मागवला जातो आणि आपला स्कोअर किती ते बघितले जाते.जर तो आकडा बँकेला पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तर बँक कर्ज देत नाही. मी पण २००९ मध्येच कर्ज काढले होते.त्यावेळी बँकेने माझा सिबील रिपोर्ट मागवला होता-- आणि मला ते कसे कळले? तर २०१२ मध्ये मी माझाच सिबील स्कोअर किती हे कुतुहल वाटल्यामुळे पैसे भरून तो रिपोर्ट मागविला होता.हा रिपोर्ट ४५०-५०० रूपये भरून ऑनलाईन मिळतो.त्यात आपल्या रिपोर्टसाठी किती एन्क्वायरीज आल्या आहेत त्याची यादी असते.त्यात २००९ मध्ये त्याच बँकेची तितक्याच रकमेच्या कर्जासाठीची एन्क्वायरी होती. हा अनुभव असल्यामुळे आणि मी मुळातला बँकरच असल्यामुळे (जरी रिटेल बँकिंगमध्ये नसलो तरी) साधारण पध्दत कशी असते याची थोडीफार कल्पना मला होती.म्हणून आताच्या कर्जाच्या वेळी मी रिलेशनशीप बँकरला सिबील स्कोअरविषयी मुद्दामून विचारले.ते मी विचारले नसते तर कदाचित त्याने मला ते स्वतःहून सांगितले असतेच असेही नाही. तुमच्या केसमध्ये मुळातल्या कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडल्याचा रेकॉर्ड असल्यामुळे सिबिल स्कोअर चांगला असेल त्यामुळे २००९ मध्ये अडचण आली नसेल. तेव्हा सिबील स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर कोणते तरी कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने क्रेडिट कार्ड असलेच पाहिजे असे नक्कीच नाही पण क्रेडिट कार्ड बाळगून वेळच्या वेळी बिले भरणे हा सर्वात सोपा उपाय आहे.
सिबिल स्कोअर चांगला असल्याने नेमके काय होते? कर्ज लगेच मिळते की कर्जाची मर्यादा वाढते की कर्ज मिळणे सोपे होते?
सिबील स्कोअर चांगला असणे याचा अर्थ कर्जासाठी अर्ज करणारा मनुष्य जबाबदारीने क्रेडिट वापरत आहे आणि तो कर्ज बुडवायची शक्यता कमी आहे असा होतो.आता त्या आकड्याचा वापर नक्की कसा करायचा हे प्रत्येक बँक ठरविते. अमेरिकेत तर चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर व्याजाचा दरही कमी असतो. भारतात क्रेडिट स्कोअर ही कल्पना अजून त्या मानाने नवीन आहे त्यामुळे असा उपयोग अशा प्रकारे झाल्याचे मला तरी माहित नाही.तसे झाले तर ते नक्कीच चांगले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मोदक Tue, 12/02/2014 - 07:38 नवीन
सिबिल स्कोअर चांगला असल्याने नेमके काय होते? कर्ज लगेच मिळते की कर्जाची मर्यादा वाढते की कर्ज मिळणे सोपे होते? आवश्यकता असेल तर वरील तिन्ही फायदे होतात. सिबील स्कोअर खूपच चांगला असेल तर कर्जाच्या पात्रतेमध्येही फरक पडतो. काही बँका पात्रतेपेक्षा जास्त कर्ज देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 09:30 नवीन
हे उत्तर अपेक्षित होते: १) कर्जाची मर्यादा वाढते - उत्पन्नाच्या प्रमाणात एखाद्याचे कर्ज रु. १०० असेल तर सिबिल स्कोअर चांगला असल्याने तितक्याच उत्पन्नाला रु. ११० कर्ज मिळू शकेल. असे असते का? साधारण एकूण मासिक उत्पन्नाच्या ४०% पेक्षा गृहकर्जाचा हप्ता असू नये अशा प्रमाणात गृहकर्ज मिळते. ही मर्यादा चांगल्या सिबिल स्कोअरने उत्पन्न तितकेच असले तरी वाढते का? २) व्याजदर कमी होतो - सिबिल स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी लागतो असे होते का? ३) कर्ज मिळण्याची प्रोसेस सोपी होते - कागदपत्रे कमी लागतात, वेळ कमी लागतो, झटपट मंजुरी येते, वगैरे होते काय? माझ्या कर्जाच्या वेळी माझे उत्पन्न, माझे चालू कर्ज, त्याचा मासिक हप्ता, विमा पॉलीसीचे हप्ते, इत्यादी पाहिल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 12/02/2014 - 10:27 नवीन
साधारण एकूण मासिक उत्पन्नाच्या ४०% पेक्षा गृहकर्जाचा हप्ता असू नये अशा प्रमाणात गृहकर्ज मिळते. ही मर्यादा चांगल्या सिबिल स्कोअरने उत्पन्न तितकेच असले तरी वाढते का? हो वाढते. मासिक उत्पन्नाच्या ६५% ते ७०% गृहकर्जाचा हप्ता होईल इतके कर्ज दिले गेलेले खात्रीशीर उदाहरण पाहण्यात आहे. २) व्याजदर कमी होतो - सिबिल स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी लागतो असे होते का? अमेरिकेत होते. भारतात अशी सोय असल्यास कल्पना नाही. कागदपत्रे कमी लागतात, वेळ कमी लागतो, झटपट मंजुरी येते, वगैरे होते काय? कागदपत्रे हवी ती लागतातच (आणि ती बँकेला द्यावीच असे माझे मत आहे. एखादा मुद्दा आपल्या नजरेतून सुटू शकतो पण बँकेच्या वकीलांच्या नजरेतून सहज सुटत नाही) सिबील स्कोअर चांगला असेल तर क्रेडीट मॅनेजर जास्त खळखळ करत नाही. झटपट मंजुरी येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 09:25 नवीन
सिबिल रिपोर्टबद्दल ही प्राथमिक माहिती होतीच. मला म्हणायचे होते की माझ्या २००९ च्या कर्जाच्या वेळेस हा मुद्दा निघाला नाही. तुमचा सिबिल स्कोअर कमी/जास्त आहे म्हणून कर्ज कमी/जास्त, कमी/जास्त मुदतीचे देऊ वगैरे असे काहीच विषय निघाले नाहीत. त्यांनी मला 'तुमचा सिबिल स्कोअर किती आहे?' असे विचारले नाही. :-) अगदी शब्दशः अर्थ घेता बुवा तुम्ही. :-) असो. माहितीची उजळणी करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 12/04/2014 - 10:03 नवीन
अगदी शब्दशः अर्थ घेता बुवा तुम्ही. Smile
अहो फार जुनी सवय आहे ती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
क
क्लिंटन Mon, 12/01/2014 - 13:29 नवीन
आणि सगळे हिशेब नीट करून प्रत्येक ऑफरमधून नेमका आपला फायदा शोधून काढून आपल्याला भूर्दंड न पडता त्याचा लाभ घेता येण्याचे कसब असेल तरच क्रेडिट कार्ड घ्या.
माझ्याकडे अमेरिकन एक्सप्रेसचे एक कार्ड होते.त्या कार्डावर दर महिन्याला २५० रूपयांपेक्षा जास्त रकमेचे चार व्यवहार केले तर दर महिन्याला १००० पॉईंट्स मिळणार अशी स्किम होती.वर्षाच्या शेवटी ४५०० रूपये रिन्युअल चार्जेस होते पण त्याच बरोबर ४५०० पॉईंट्सही मिळणार होते.मी दर महिन्याला १००० पॉईंट्स अगदी इमाने इतबारे गोळा केले होते.ते १२००० आणि रिन्युअलचे ४५०० असे १६५०० पॉईंट्स माझ्याकडे होते.विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण मला त्या पॉईंट्समधून १०,५०० रूपयांची गिफ्ट कार्डे मिळाली होती. अमेरिकन एक्सप्रेस जिथे जिथे चालते त्या सगळ्या ठिकाणी त्या कार्डांचा उपयोग करता येणार्‍यातला होता. त्यातून हिलरीसाठी नवा फोन झाला आणि माझे फोनचे बील बरेच अ‍ॅडव्हान्समध्ये भरून झाले. ६ महिन्यांनंतर पहिल्यांदा मला या महिन्यात फोनचे बिल भरावे लागणार आहे त्यापूर्वी माझा क्रेडिट बॅलन्स होता :) दर महिन्याला २५० पेक्षा जास्त असे चार व्यवहार व्हायचेच.माझे आणि हिलरीचे फोनचे बिल आणि वीजेचे बील हे ३ व्यवहार दर महिन्याला अगदी ठरलेले असायचे.तसेच महिन्यातून एखादा चित्रपट तरी बघितला जात असेच.त्याचे तिकिटही याच कार्डावरून काढून २५० पेक्षा जास्त रकमेचे चार व्यवहार पूर्ण करत असे. नंतर त्यांनी दर महिन्याला २५० ऐवजी १००० पेक्षा जास्त रकमेचे चार व्यवहार केले तरच १००० पॉईंट्स मिळतील असा बदल केला.तसेच रिन्युअलबरोबर पॉईंट देणेही बंद केले.त्याबरोबरच मी अमेरिकन एक्सप्रेसचे कार्डही रद्द केले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
व
वैभव जाधव Mon, 12/01/2014 - 15:23 नवीन
च्यामारी असल्या पाईंटाचा मोनिकासाठी ऊपयोग करायचा की. हिलरीला पण पत्त्या नाय लागणार. (क्लीण्टणराव हाल्के घ्या बर्का.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 04:43 नवीन
हे दणदणीत फायदे आहेत. पण हे अमेरिकेतले फायदे आहेत ना? भारतात कुणी इतके फायदे देत असल्याचे ऐकीवात नाही. जाणकार सांगू शकतील. भारतात मी फार तर दोन-चार सिनेमाची तिकिटे मोफत वगैरे क्षुल्लक फायदे जास्त ऐकले आहेत. किंवा काही टक्के सूट. सूट वगैरे फायदे तसे फारसे महत्वाचे नसतातच. पण भारतात इतके दणदणीत फायदे मिळतात का हे जाणून घेण्यास उत्सुक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 04:46 नवीन
क्लिंटनरावांना मिळालेले फायदे भारतातलेच आहेत असे दिसते आहे. बेस्ट आहे. :-) हे फायदे खरोखर चांगले आहेत. अस्मादिक एवढा पुढचा विचार करू शकत नाहीत. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मराठी_माणूस Mon, 12/01/2014 - 09:47 नवीन
मंथली पास काढायला टोल नाक्यावर क्रेडीट/डेबीट कार्ड का चालत नाही. टोल वरच्या प्रसार माध्यामांच्या चर्चेत सुध्दा हा मुद्दा कधीच चर्चेत आल्याचे पाहीले नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 12/01/2014 - 10:24 नवीन
समीरसूर तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी देखील अ‍ॅमेक्स कार्ड घेतले होते विचार केला की यदाकदाचित कुठे इमर्जन्सी आली तर क्रेडिट कार्ड बरे पडते. सुदैवाने पहिल्या वर्षात कधीच वापरावे लागले नाही. दुसर्‍या वर्षी रीन्यूएअशन चार्जेस ५०००/- आले. झक मारली अन क्रेडीटकार्डच्या भानगडीत पडलो असे वाटले. कार्ड कॅन्सल केले. लगेचच पैसे काढून द्यावे लागत नाही त्यामुळे होणारा आनंद किती क्षणभंगूर असतो हा अनुभव डेबीट कार्डवर गरज नसताना भरमसाठ खरेदी करून घेतला होताच. डेबीटकार्डासोबत निदान सावकारी पाश तरी नसतो
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 12/01/2014 - 11:48 नवीन
माझ्याकडे पण २००१ नंतर क्रेडीट कार्ड नाही. जे होते ते बंद करताना पण इतके फोन करायला लागले की वैताग आला. खरच काही गरज नसते क्रेडीट कार्डची. बँकेचे डेबिट कार्ड असते ते पुरेसे असते कधी चुकुन लागलेच तर. थोडी कॅश बरोबर ठेवावी. पेट्रोल पंपावर तर फार वैताग येतो पुढचा माणुस कार्ड्नी पैसे द्यायला लागला तर्, मागच्यांचा खोळंबा.
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Mon, 12/01/2014 - 15:14 नवीन
१क्रेडीट कार्ड घरीच ठेवा २ दोन क्रेडीट कार्ड चा पण फायदा असतो १ ल्या ने वार्षिक फी मागितली कि फोन करायचा २ रे कार्ड वाले तर फी घेत नाही माझे कार्ड बंद करा लगेच हेही फी माफ करतात मी २००० सालापासून कार्ड वापर toy
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Mon, 12/01/2014 - 17:30 नवीन
अच्छा..!! हेच का तुमचे सत्याचे प्रयोग ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
स
सत्याचे प्रयोग गुरुवार, 12/04/2014 - 13:22 नवीन
इतरही प्रयोग चालू आहेत दमादमाने लिहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Tue, 12/16/2014 - 12:56 नवीन
लिव्हा लिव्हा .. वाटच बघतोय.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
व
विअर्ड विक्स Mon, 12/01/2014 - 18:07 नवीन
क्रेडीट कार्डाचे फायदे १. विम्याचे हफ्ते ग्रेस काळाच्या शेवटच्या दिवशी ECS सुविधेने विनासायास भरले जातात. ( HDFC ने हि सुविधा उपलब्ध केलीये )( एक महिन्याचे व्याज अधिक मिळाले , हे शहाण्यास सांगणे न लगे ) २. अगर कार्यालयीन कामानिमित्त खर्च करायची वेळ आली तर खिश्यास त्रास होत नाही. ३. वीज , घरफळा , भ्रमणध्वनी सारी बिले क्रेडीट कार्डद्वारे भरून सुट मिळवता येते. ४. आणीबाणी प्रसंगी बँकेतील शिलकेपेक्षा अधिक रक्कम भरण्याची वेळ आली तर क्रेडीट कार्ड उपयोगास पडते ५. आजकाल तर घराचे हफ्ते सुद्धा क्रेडीट कार्ड येण्याचा विचार चालू आहे असे वाचनात आले होते. आपण क्रेडीट कार्ड बाळगतो याचा वृथा अभिमान नाही पण न बाळगणे म्हणजे काही जगावेगळे केले असेही मानू नये. क्रेडीट कार्ड हि चैनेची गोष्ट न समजता तिचा समजून उमजून वापर केला पाहिजे. ज्याप्रमाणे सट्टा बाजारात गुंतवणूक म्हणजे काही मोठे पाप आहे असे अनेक लोकांना वाटते तसाच सूर क्रेडीट कार्ड बाळगणाऱ्या बाबत क्रेडीट कार्ड न बाल्गानार्यांचा असतो. असो… शेवटी ज्याची त्याची इच्छा…
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा