Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्रेडीट कार्ड आणि त्याविषयीचे कायदे कानू …

अ
अव्यक्त
Sat, 11/29/2014 - 12:19
🗣 79 प्रतिसाद
मी प्रथमच क्रेडीट कार्ड घेत आहे तरी नविन क्रेडिट कार्ड घेताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून पुढील मनस्ताप टाळता येईल… आपण सगळेच वर्तमान पत्रात क्रेडीट कार्ड विषयी घडामोडी वाचत असतोच…क़ाय काळजी घेता येईल…मि पा करांच्या ह्याविषयी काय अनुभव आहेत जे ह्या धाग्यात उधृत करता येतील … माझा प्रश्न आहे कि बँकेच्या अवास्तव भूल थापाना कसं रोखता येईल त्याविषयी काही R.B.I. चे कायदे कानू आहेत काय? ह्यासंदर्भात कोणी माहिती देवू शकेल काय … क्रेडीट कार्ड विषयी चांगले आणि वाईट अनुभव…जेनेकरुन समाज प्रबोधन होईल आणि अपप्रवृत्तिना आळा बसेल…. बँक ज्या ग्राहकांना सुविधा देऊ करतात (hidden offers) उदा. आजीवन सभासदत्वात सुट (LIFE TIME FREE) किंवा गेला बाजार चित्रपटांची तिकीटे सवलतीत मिळतील… ह्या स्वरूपातील आश्वासने (खरी/ खोटी? ) ही लेखी स्वरुपात किवा email स्वरुपात ग्राहकांना देणे कायदेशीर रित्या बँकांना बंधनकारक आहे कि कस्से… ग्राहकांचे हित जपणारे कोणते कायदे कानू कोणास अवगत असतील तर येथे त्याच्या विषयी चर्चा (विधायक ) अपेक्षित आहे … म्हणजे सामान्य क्रेडीट कार्ड धारकाला आपल्या हक्कांची ओळख होईल। आणि जागरूकता वाढेल ह्या विषयी हा पत्र प्रपंच… सूज्ञ मि.पा. कर त्यांचा ज्ञानाचा उपयोग इतरांस अवगत करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि जास्तीत जास्त माहिती पुरवावी हिच मि.पा. कराना नम्र विनंती…लोभ असावा … इति लेखनसीमा…

प्रतिक्रिया द्या
42089 वाचन

💬 प्रतिसाद (79)
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 05:03 नवीन
१. विम्याचे हफ्ते ग्रेस काळाच्या शेवटच्या दिवशी ECS सुविधेने विनासायास भरले जातात. ( HDFC ने हि सुविधा उपलब्ध केलीये )( एक महिन्याचे व्याज अधिक मिळाले , हे शहाण्यास सांगणे न लगे ) यास क्रेडिट कार्डच पाहिजे असे नव्हे. ते बँकेच्या खात्यातून तसेही जाऊ शकतात. मी एलआयसी विम्याचा हप्ता दोन-तीन आठवडे उशीरा भरला (नजरचुकीने). त्याचा मला कुठलाच भूर्दंड पडला नाही. हा हप्ता मी ऑनलाईन भरला. आणि एखाद्या महिन्याचे व्याज असे कितीसे असणार? अगदीच लाखा-दोन लाखात हप्ता असेल तर गोष्ट निराळी. २. अगर कार्यालयीन कामानिमित्त खर्च करायची वेळ आली तर खिश्यास त्रास होत नाही. डेबीट कार्डाने खर्च करून नंतर रिइंबर्समेंट मिळतेच. शेवटी क्रेडिट कार्डावरही आपलेच पैसे खर्च होत असतात; कंपनीचे नव्हे. ३. वीज , घरफळा , भ्रमणध्वनी सारी बिले क्रेडीट कार्डद्वारे भरून सुट मिळवता येते. ह्म्म्म, ही सूट फार जास्त नसते. आणि आजकाल डेबीट कार्डावरदेखील अशी सूट मिळते. आणि क्रेडिट कार्डावर अशी सूट घेऊन पुढे आणखी खर्च वाढण्याची शक्यतादेखील असते. ४. आणीबाणी प्रसंगी बँकेतील शिलकेपेक्षा अधिक रक्कम भरण्याची वेळ आली तर क्रेडीट कार्ड उपयोगास पडते अशी वेळ कितीदा येत असेल? आणि चुकून आलीच तर बाकीचे जास्त सोयीस्कर मार्ग अधिक सुलभतेने उपलब्ध असतात. त्यासाठी क्रेडिट कार्ड हाच एकमेव पर्याय नक्कीच नाही. ५. आजकाल तर घराचे हफ्ते सुद्धा क्रेडीट कार्ड येण्याचा विचार चालू आहे असे वाचनात आले होते. हे तितकेसे सरळ नाही. घराचे हप्ते असलेल्या पैशातूनच गेलेले बरे. नाहीतर चक्रव्युहात अडकण्याचीच शक्यता अधिक. आपण क्रेडीट कार्ड बाळगतो याचा वृथा अभिमान नाही पण न बाळगणे म्हणजे काही जगावेगळे केले असेही मानू नये. क्रेडिट कार्डचे फायदे असतीलही पण सारासार विचार करता ग्राहकांनी अधिकाअधिक खर्च करण्यासाठी उद्युक्त करणारी एक लोभसवाणी आणि क्रयशक्ती वाढल्याचा सोनेरी भास वाढवाणारी युक्ती असेच क्रेडिट कार्डचे वर्णन करावे लागेल. ज्यांना तिचा योग्य आणि फायदेशीर वापर करणे जमले, त्यांनी क्रेडिट कार्ड अवश्य (पण जपून) वापरावे असे एका प्रतिसादात मी म्हटलेच आहे. क्रेडिट कार्ड न वापरणे कसले जगावेगळे? :-) ते काय अन्न, पाणी आहे की त्याच्यावाचून राहणे अभिनंदनीय ठरावे. :-) ते वापरणे स्टेटस सिंबॉल मानले जाते हे मात्र खरे. हे मी बर्‍याचदा पाहिले आहे. आणि अधिकाधिक कार्डे पाकिटात असणे आणि ते पाकिट काढून समोरच्यांना चकित करणे हा अनेकांचा आवडता उद्योग असतो हे देखील पाहिले आहे. एका मित्राला त्याबद्दल झापले देखील आहे. त्याची ससेहोलपट पाहिलेली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड नसणे हे जगावेगळे वाटणे शक्यच नाही पण असण्याबद्दल जे गोड गैरसमज आहेत ते मिटवण्यासाठी सगळे मिपाकर इथे अनुभव सांगत आहेत, इतकेच! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 05:09 नवीन
क्रेडिट कार्ड नसणे म्हणजे मागासलेपणा हा देखील एक गैरसमजच! :-) पीअर प्रेशर भारताइतके खरंच कुठेच नसेल. व्हॉट्सअ‍ॅप नाही तुझ्याकडे? अरे कुठल्या जमान्यात आहेस? अरेच्चा, नाहीये माझ्याकडे व्हॉट्सअ‍ॅप, काय म्हणणं आहे? तुझ्याकडे आहे ना? मग त्यात काही तू पराक्रम केलेला आहेस असं म्हणणं आहे का तुझं? त्याबद्दल तुला भारतरत्न द्यायचं का? की डायरेक्ट नोबेलच द्यायचे? काहीतरी ओढून-ताणून फायदे आणून वकिली करायची आणि व्हॉट्अ‍ॅप फायद्याचे आहे असे सांगायचे, हे ऐकून तर पकलो मी आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मराठी_माणूस Tue, 12/02/2014 - 05:37 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
व
विअर्ड विक्स Tue, 12/02/2014 - 05:34 नवीन
१. ECS/ auto डेबिट सुविधा ग्रेस काळात बिल भरत नाही. मुद्दा लक्षात न घेत टिप्पणी टाळावी. २. कार्यालय पैसे परत फेड जरी करत असेल तरी ऐन वेळेस आपण आपल्या खिश्यातून पैसे भरतो. ३. सेवा बिल क्रेडीट कार्डाने भरली जातात म्हणून घरातील दिवे -पंखे , मोबाइल चा अतिरिक्त वापर करू हि शंकाच दुधखूळी वाटते. असो ४. नकाराची घंटा वाजवायचीच ठरवली तर ती कशीपण वाजवता येते. रात्री दोन वाजता परगावी -परदेशी आपण एकटे असाल नि आर्थिक अडचण आल्यावर क्रेडीट कार्ड शिवाय कोणताही सुलभ पर्याय नाही. ५. क्रेडीट कार्ड असणे हा status symbol असे क्रेडीट कार्ड वापरणारे मिपाकर नक्कीच नसतील. पण क्रेडीट कार्ड न बाळगता व त्याचा अनुभव नसता त्यास दुषणे देणारे मिपाकर पाहून आनंद वाटला. २० वर्षांपूर्वी दूरध्वनी, दूरदर्शन, भ्रमणध्वनी इ. या गोष्टीकडे सुद्धा चैनीच्या वस्तू व उधळपट्टी म्हणून पहिले जाते. परंतु आज त्या अत्यावश्यक व निकडीच्या वस्तू समजल्या जातात. क्रेडीट कार्ड म्हणजे दुष्ट चक्र न समजता , ५५- ३५ दिवस चक्राचा सुनियोजित पद्धतीने उपयोग केल्यास फायदाच होईल. महत्त्वाची गोष्ट क्रेडीट कार्ड हि एक सेवा आहे त्यामुळे तेथे सुद्धा बिल वेळेवर भरावे लागते. अन्यथा व्याज भरावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 06:39 नवीन
१. ECS/ auto डेबिट सुविधा ग्रेस काळात बिल भरत नाही. मुद्दा लक्षात न घेत टिप्पणी टाळावी. माझे म्हणणे आहे की ऑनलाईन हप्ता भरता येतो (नेटबँकिंग, डेबीट कार्ड वापरून). आणि या परिस्थितीतही आपल्याला व्याज मिळतेच. हप्ता लक्षात ठेवून भरावा लागतो हे मात्र खरे. ईसीएस मध्ये आपोआप जातो; लक्षात ठेवण्याची गरज नसते हा फायदा आहेच. ३. सेवा बिल क्रेडीट कार्डाने भरली जातात म्हणून घरातील दिवे -पंखे , मोबाइल चा अतिरिक्त वापर करू हि शंकाच दुधखूळी वाटते. असो शंका ही नाही; शंका ही आहे की लगेच पैसे द्यायला लागत नाही म्हणून जास्त खर्च करण्याकडे कल वाढतो. :-) आणि हे सगळ्याच बाबतीत होते. आत्ता पैसे नाहीयेत ना द्यायला लागत, मग घ्या कॅमेरा, घ्या जॅकेट्...असे. पंखे, दिवे यांचा अतिरिक्त वापर करू असं कसं म्हणेन मी? थोडा असलो तरी इतका काही मी बावळट नाहीये. ;-) ४. नकाराची घंटा वाजवायचीच ठरवली तर ती कशीपण वाजवता येते. रात्री दोन वाजता परगावी -परदेशी आपण एकटे असाल नि आर्थिक अडचण आल्यावर क्रेडीट कार्ड शिवाय कोणताही सुलभ पर्याय नाही. शक्य आहे. पण अशी परिस्थिती फक्त क्रेडिट कार्डानेच हाताळता येईल असे नक्कीच नाही. असो. ५. क्रेडीट कार्ड असणे हा status symbol असे क्रेडीट कार्ड वापरणारे मिपाकर नक्कीच नसतील. पण क्रेडीट कार्ड न बाळगता व त्याचा अनुभव नसता त्यास दुषणे देणारे मिपाकर पाहून आनंद वाटला. दूषणे नाहीत. आवश्यक असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे असे मी अनेकदा म्हटले आहे. अनुभव नाही हे खरे आहे. इतरांचा अनुभव पाहिला आहे; त्यावरून सांगतो आहे. शेवटी ज्याची-त्याची इच्छा असेही म्हटले आहे. स्वानुभव नसल्याने माझे विचार कदाचित निरर्थक ठरत असतील. नो प्रॉब्लेम! महत्त्वाची गोष्ट क्रेडीट कार्ड हि एक सेवा आहे त्यामुळे तेथे सुद्धा बिल वेळेवर भरावे लागते. अन्यथा व्याज भरावे लागेल. १००% मान्य! पण यात ग्राहकांनी अधिकाधिक खर्च करावा हा मुख्य उद्देश असतो. आणि ग्राहकांचा अवास्तव खर्च आणि पैसे भरण्याच्या शिस्तीचा अभाव यात क्रेडिट कार्डाच्या व्यवसायाचे गमक दडलेले आहे हे ही खरेच. असो. विचार वेगवेगळे असणारच. आपण उगीच त्याला भांडणाचे रूप कशाला द्यायचे? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
व
विअर्ड विक्स Tue, 12/02/2014 - 07:36 नवीन
नाही म्हटलं चित्रपटाचे समीक्षक नाहीका ? उगाच चांगल्या चित्रपटांनाही नकाराचा सूर लावतात , तसले झाले असले तर क्रेडीट कार्ड बद्दल म्हणून प्रतिसाद दिला. क्रेडीट कार्ड जरी वापरत असलो तरी फुकाच्या भांडणासाठी शब्दांची उधळपट्टी करणाऱ्यातील मी नव्हे… ( भरपूर झाले हाणून :) , हलके घ्यावे …) बाकी आपले लिखाण आवडते, चित्रपटाच्या समीक्षणाच्या प्रतीक्षेत एक मिपाकर क्रेडीट कार्डधारक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 09:12 नवीन
बरोबर!! :-) मी समीक्षक वगैरे काही नाही हो. आणि 'जय हो', 'हमशकल्स', वगैरे चित्रपट खरंच चांगले नव्हते म्हणूनच 'नकाराचा सूर' लावला होता. अन्यथा फुकाच्या लेखनासाठी नकारांची उधळपट्टी करणार्‍यातील मी नव्हे... ;-) खोटं वाटत असेल तर एकदा 'हमशकल्स' बघा आणि काय तो निर्णय घ्या... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
स
स्पार्टाकस Tue, 12/02/2014 - 00:04 नवीन
क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्ड किंवा कॅश, आपण कितपत जपून खर्च करतो अथवा उधळतो यावर अवलंबून. मी गेल्या १५ वर्षांपासून भारतात आणि परदेशात क्रेडीट कार्ड वापरतो आहे. अमेरीकेत बिझनेस ट्रीपवर असताना तर क्रेडीट कार्ड कंपल्सरी लागतं. हॉटेल आणि कार भाड्याने घेताना डेबीट कार्ड / कॅश घेत नाहीत. १. भारंभार क्रेडीट कार्डे जमा करु नका. तो स्टॅट्स सिंबॉल नाही. २. वेळेवर बिल भरा. त्याने व्याजाचा भुर्दंड लागत नाही. ३. कार्ड घेताना झिरो लायबलिटी कार्ड घ्या. तुमचे कार्ड चोरीला गेलं किंवा दुसर्‍या कोणी ऑनलाईन फ्रॉडसाठी वापरलं तर तुम्ही जबाबदार राहणार नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/02/2014 - 08:28 नवीन
क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि कॅश या तीनही दुधारी पण आवश्यक व्यवस्था आहेत... नीट उपयोग केला तर उपयोगी व्यवस्था नाहीतर पस्तावा ! मी साधारण अशी पद्धत वापरतो : १. स्थलपरत्वे जिथली तिथली कॅश ही सर्व जगात हमखास चालणारी व्यवस्था. त्यामुळे जिथली अर्थव्यवस्था नीट माहीत नाही तिथे फिरताना शक्य तेवढी कॅश बरोबर असणे हे सर्वात उत्तम. परंतू, फिरतीवर असताना खूप कॅश जवळ बाळगणे किती धोकादायक हे काही सांगायला नको, तेव्हा तो अतिरेकही नसावा. २. डेबिट कार्ड जेथे आणि ज्या गोष्टींसाठी उपयोगी ठरते तेथे ते वापरणे जास्त सुरक्षीत... कॅशची चोरी होणे आणि खिश्याला न परवडणारा खर्च होणे हे दोन्हीही आपोआप टाळले जाते. आपल्या राहत्या देशात हा उत्तम उपाय आहे. पाय नेहमीच अंथरूणात राहतात. ३. राहत्या देशातून केलेले परदेशातले बरेचसे व्यवहार क्रेडीट कार्ड शिवाय होत नाहीत. बर्‍याचदा डेबिट कार्डांचे चलनबदलाचे दर खूपच जास्त असतात. कित्येक आंतरराष्ट्रिय व्यावसाईक संस्था (प्रोफेशनल बॉडीज) आणि कंपन्या क्रेडीट कार्डशिवाय व्यवहार करत नाहीत. क्रेडीट कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेले असल्याने मुदतिच्या शेवटच्या दिवसाला पैसे आपोआप वळते होतात आणि कार्ड-बँकेवर अवलंबून कोणतेही व्याज / चार्ज न पडता ३० ते ९० दिवस पैसे वापरायला मिळतात... पण तरीही बर्‍याचदा मी मुदतीच्या थोडे अगोदरच पैसे 'बँक खाते --> कार्ड' असे वळते करून (प्रीपेमेंट) करून "शेवटच्या दिवसात पुरेसे पैसे खात्यात असतिल काय?" ही काळजीही काढून टाकतो. क्रेडीट कार्डाचा एक फार उपयोगी वापर मी अनेकदा परदेशप्रवासात केला आहे तो म्हणजे, प्रीपेमेंटने कार्डाच्या लिमीटपेक्षा जास्त रक्कम त्यात साठवणे. त्यामुळे 'कार्डाची लिमीट + प्रीपेमेंट' इतके पैसे आपण फिरताना बरोबर बाळगू शकतो. अर्थात या तीनही उपयोगी व्यवस्था ज्यानेत्याने आपापल्या (अ) गरजेप्रमाणे, (आ) मनोबलाप्रमाणे आणि (इ) तात्कालिक परिस्थितीप्रमाणे निर्णय घेऊन वापरणे योग्य होईल.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 09:36 नवीन
छान प्रतिसाद! नेमके उत्तर. नो हाणामारी. प्युअर अँड जेन्युईन इन्फो. प्रॅक्टीकली उपयुक्त माहिती. धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बाळ सप्रे Tue, 12/02/2014 - 09:20 नवीन
"कायदे कानू " विषयी अजुन कोणीच कसं बोललं नाही बरं
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 12/02/2014 - 09:44 नवीन
अवघा धागा सिबिलमय झाला...कायदे कानू राहिले बाजूला... ये मेरा सिबिल, कार्ड का दीवाना स्कोअर के दम पे इसका जीना-मरना स्कोअर ना हो तो काहे का जीना.... ये मेरा सिबिल, कार्ड का दीवाना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
म
मोदक Tue, 12/02/2014 - 10:39 नवीन
कायदे कानून बद्द्ल फारसे बोलण्यासारखे नसावे.. आपण कोणतेही कर्ज घेताना त्या फॉर्मवरील अटी आणि शर्ती संपूर्ण वाचल्या आणि समजून घेतल्या तर "शक्य होईल तितके कर्ज प्रकरण टाळण्याकडे कल असेल" अशी खात्री आहे. मात्र सगळे हप्ते वेळच्या वेळेत भरले तर या अटी आणि शर्तींचा त्रास होत नाही. क्रेडीट कार्डसंदर्भात कोणतेही वाद / चर्चा किंवा नवीन स्किम घेणे वगैरे प्रकार एखाद्या "डॉक्युमेंटेड कम्युनीकेशन" च्या आधारावरच पार पाडावेत. क्रेडीट कार्डचे बील व्यवस्थीत तपासून पहावे. (एक ऐकलेला किस्सा - एका प्रतिष्ठीत बँकेने नेहमीच्या क्रेडीट कार्ड बिलामध्ये अचानक ७५ रूपये असे इतर चार्जेस जोडले.. कस्टमर केअरला सूचना दिल्या की एखाद्या कस्टमर तक्रार घेवून आलाच तर विनाविलंब विनाअट ते पैसे परत करावेत. फक्त १० ते १५% कस्टमरांनी तक्रार केली व पैसे परत मिळवले - बाकीचे पैसे बँकेच्या खिशात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मनुराणी Tue, 12/02/2014 - 09:36 नवीन
आधी माझा पण समज होता की क्रेडीट कार्ड म्हणजे विनाकारण खर्च. पण नवऱ्याकडून फायदे समजले आणि अनुभवले पण. ३ वर्षांपूर्वी सिंगापुरात घर घेतले तेव्हा घराच्या किमतीच्या २०% रोख रक्कम हवी होती, आणि जी शिल्लक होती ती पुरेशी नव्हती त्यावेळी क्रेडीट कार्डवर पर्सनल लोन घेण्याची सुविधा असल्याने सोय झाली. ४-५ वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडीट कार्ड्स वर लोन घेतले होते. पण क्रेडीट कार्ड आहे म्हणून करा खर्च हा समज चुकीचा वाटतो. जी खरेदी होते त्याचे बिल लगेच किंवा नंतर आपल्यालाच भरायचे आहे याचे भान असले म्हणजे झाले. क्रेडीट कार्ड वर खरेदी केली म्हणून बँक बिल माफ करत नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/02/2014 - 10:41 नवीन
क्रेडीट कार्ड सोबत येणारे निरनिराळे विमे आणि विमानतळावरती मिळणार्‍या विशेष सवलती यांचा लाभ कोणी घेतला आहे का..?
  • Log in or register to post comments
ब
बोका Tue, 12/02/2014 - 12:29 नवीन
दोन वर्षांपूर्वी एचडीएफसी कार्ड वर मुंबई विमानतळावर लाऊंजमध्ये फुकट जात येत असे, तेव्हा गेलो होतो. त्यांनी कार्ड स्वाईप केले पण पैसे घेतेले नाहीत. नाश्ता आणी पेयही दिले. नंतर ती स्कीम बंद झाल्याने पुन्हा जायचा योग आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्पार्टाकस Wed, 12/03/2014 - 04:11 नवीन
माझ्याकडे सिटीबँकेचे अमेरीकन एअरलाईन्सचे क्रेडीट कार्ड आहे. त्यांच्या अ‍ॅडमिरल क्लबमध्ये जाऊ शकतो. अर्थात ही सुविधा फक्त वर्षातून दोन वेळा फ्री असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मदनबाण Tue, 12/02/2014 - 11:04 नवीन
मी कधीही क्रेडिट कार्ड घेउ नये या मताचा होतो आणि आता ते पक्के झाले आहे, या क्रेडिट कार्ड वाल्यांचे फोन आमच्या हापिसात सतत येत असतात, एका एक्स्टेंशन वरुन दुसर्‍या, मग तिसर्‍या जाम उच्छात माडंतात मेले ! तर क्रेडिट कार्ड ऑफरवाल्या कॉलला नको म्हणुन टाळणारा मी अचानक भुललो... ऑफर देणारी बाई { क्रेडिट कार्डची } म्हणाली तुमच्या कंपनीसाठी स्पेशल स्कीम आहे, तुम्ही कंपनीचे एम्लॉई असल्याने ही विशेष ऑफर आहे, पहिल्या वर्षी कोणताही चार्ज लागणार नाही, आणि नंतर अमुक एक रक्कम जर वर्षाला खर्च केली तर वार्षिक चार्ज लागणार नाही. ही तिने सांगितलेली वार्षिक रक्कम बरीच कमी असल्याने मी भुललो हे एक कारण दुसरे म्हणजे माझ्या एका जुन्या वरिष्ठ सहकार्‍यांनी मला काही पॉइंट गेनिंगचे सांगितले होते, ते देखील टाळक्यात होते... शेवटी त्या कॉलवर ते कार्ड घेतले, घरचा पत्त्यावर पाठवा असे सांगुन सुद्धा गाढवीच्यांनी ऑफिसच्या पत्त्यावर पाठवले ! कार्ड उघडुन नीट स्कीम वाचली तर ऑफर केलेल्या स्कीम पेक्षा ती स्कीम वेगळी होती... त्या बाईला फोन लावला { नशिब तीचा नंबर घेउन ठेवला होता ते ! } ती म्हणाली काळजी करु नका बील मधे काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा ! तरी माझे समाधान होइना,मग त्या बँकेच्या संकेतस्थळावर गेलो आणि त्या कार्डाच्या ऑफर संबधी माहिती वाचली,तेव्हा लक्षात आले की मला सांगण्यात आलेली स्कीम एकदम बोगस होती आणि ती बाई धदांत खोटे बोलत होती,तीचा फोन करुन पिच्छा पुरवला आधी काळजी करु नका ची टेप वाजवत होती शेवटी मी रुद्रावतार धारण करुन बोलणे चालु केल्यावर तिला तिच्या बॉसशी बोलायचे आहे असे सांगतले, तो जो कोणी तथा कथित बॉस होता तो लाईनवर आला आणि म्हणाला :- आय एम सॉरी ! थीस स्कीम डज नॉट व्हॅलिड नाऊ ! असे डोक्यात गेले होते. शेवटी बॅकेत कॉल करुन कार्ड कॅन्सल करुन घेतले. कामाचा व्याप असल्याने अजुन डोके त्यात घातले नाही,नाही तर त्या दोघांची आणि बँकेची चांगली वाजवली असती मी. असो... क्रेडिट कार्ड नको रे बाबा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 12/02/2014 - 11:06 नवीन
क्रेडीट कार्ड सोबत येणारे निरनिराळे विमे आणि विमानतळावरती मिळणार्‍या विशेष सवलती यांचा लाभ कोणी घेतला आहे का..?
माझ्याकडे असे एक क्रेडिट कार्ड अपग्रेड करून मिळाले. पण त्यावरील विम्याचा लाभ व्हावा असे खरोखरच वाटत नाही कारण तो विमा विमानप्रवासात अपघाती मृत्यू झाल्यास नॉमिनीला मिळतो :) विमानतळावरील लाऊंजमध्ये जायची नक्कीच इच्छा आहे.निदान बघायचे तरी आहे काय असते त्यात इतके ते.हे कार्ड आल्यापासून विमानप्रवास झालेला नाही त्यामुळे अजून वेळ आलेली नाही.पण जेव्हा कधी विमानप्रवास करेन तेव्हा लाऊंजमध्ये नक्कीच जाणार आहे. तसेच त्याच कार्डाबरोबर ताज एपिक्युरिअन म्हणून पण एक भानगड आली आहे.नक्की काय आहे काय माहित? अर्थात या गोष्टीचा वापर मी करायची शक्यता फारच थोडी (स्वगतः पडवळ आणि फरस बी मधला फरकही कळत नसेल तर एपिक्युरिअन ठिकाणी जाऊन काय कपाळाचा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणार? :) )
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/02/2014 - 17:22 नवीन
वर सर्वांनी उत्तम माहिती दिली आहेच. मी भारतात असताना व अमेरिकेत होईल तेवढा क्रेडिट कार्ड्स चा वापर केलेला / करत आहे. भारतात असताना अंदाजे दोन वर्षांच्या क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांचे पेट्रोल व्हाउचर मिळाले होते (साल २००८). अमेरिकेत तर दरवर्षी किमान ४०० ते ५०० डॉलर्सचा परतावा मी विविध क्रेडिट कार्ड्स वापरून मिळवतो. माझ्या कितीतरी वस्तु जसे पहिला पहिला डिजिटल कॅमेरा वगैरे शुन्य टक्के व्याजदरावर २४ हप्त्यांमध्ये घेतल्या आहेत. आजवर एकदाही क्रेडिट कार्डावर व्याज भरण्याची वेळ आली नाही. भारतात व अमेरिकेत गृहकर्ज मिळवताना चांगल्या क्रेडिट स्कोअरचा नक्कीच लाभ झाला. क्रेडिट कार्डच्या वापरावर सात वर्षांपूर्वी रेडिफवर प्रकाशित झालेला माझा हा लेख. अवांतर - रोख रकमेचा वापर कमीत कमी का करावा यासंबंधी माझे विचार येथे मांडले आहेत.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Wed, 12/03/2014 - 06:31 नवीन
छान प्रतिसाद! विचारपूर्वक वापरल्यास क्रेडिट कार्डचे फायदेशीर असू शकते. संयम इज द की हिअर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
सुनील गुरुवार, 12/04/2014 - 08:49 नवीन
अवांतर - रोख रकमेचा वापर कमीत कमी का करावा यासंबंधी माझे विचार येथे मांडले आहेत.
धन्यवाद. रोखीचा व्यवहार कमीतकमी आणि आवश्यकता असेल तर आणि तेथेच करावा, हे मत होतेच. त्याच्या पृष्यर्थ काही नवे मुद्देदेखिल मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
सुबोध खरे Wed, 12/03/2014 - 05:45 नवीन
मी गेली १७ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे. आजतागायत एक पैसाही व्याजापोटी भरलेला नाही.(एच डी एफ सी बँकेचे) दर महिन्याच्या २५ ते ३० तारखेमध्ये एकदा नेट बँकिंगने पैसे भरून टाकतो. आपल्या खिशात पैसा आहे म्हणून खर्च केला पाहिजे अशी वृत्ती असेल तर क्रेडीट कार्ड घेऊ नये. खिशात कितीही पैसे असतील तरी मॉल मध्ये फिरून एकही पैशाची खरेदी न करता मी कित्येक वर्षे परत येतो. त्यामुळे क्रेडीट कार्ड खिशात असून अनावश्यक खरेदी कधीच झाली नाही. तातडीच्या कामासाठी किंवा संकटात कामाला येणारी एक सुविधा/ सोय आहे. रोख रकमेपेक्षा सुटसुटीत अशी यापेक्षा अधिक मी त्याकडे पाहत नाही. बाकी एक्का साहेबांनी फार छान विश्लेषण केलेले आहेच. त्यांच्या सुंदर वस्त्राला मी आपले ठिगळ लावू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Wed, 12/03/2014 - 06:32 नवीन
पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद१९७१ Wed, 12/03/2014 - 07:55 नवीन
मी मागे ऑस्ट्रेलिया ला गेलो असताना, क्रेडीट कार्ड ( भारतीय किंवा कुठलेही ) नसल्यामुळे मोठा प्रॉब्लेम आला होता. सर्व हॉटेल किंवा ऑनलाइन बुकींग ला क्रेडीट कार्ड लागते, तेंव्हा ऑस्ट्रेलियात बँक अकाउंट नसल्यामुळे नेट बँकिंग पण शक्य नव्हते, त्यामुळे फार अडचण झाली. दुर्दैवाने, Axis Bank चे कॅश कार्ड असुन सुद्धा ते नेट वर चालत नव्हते.
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Wed, 12/03/2014 - 12:54 नवीन
मग तुम्ही प्रॉब्लेम कसा सोडवला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Wed, 12/03/2014 - 13:03 नवीन
मी कधी कधी कोणाला विनंती केली आणि त्यांचे क्रेडीट कार्ड वापरले आणि त्यांना कॅश दिली. कधी कॅश कार्ड वरुन कॅश काढुन ट्रॅव्हल एजंट कडे जावुन बुकींग करुन घेतले. त्याला पण आश्चर्य वाटायचे की हा बाबा माझ्याकडे का आला आहे स्वता नेट वरुन बुकींग न करता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
र
रुस्तम Wed, 12/03/2014 - 13:05 नवीन
ह्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
S
Sunny Eknath Kamble Sat, 08/26/2017 - 04:40 नवीन
सर् माझ्याकडुन चुक झाली. कार्ड पुर्ण वापरल 2-3 वर्ष झाली पण त्यचे पैसे पण भरलत आलो जवळ जवळ दीड पट भरले पण अजैनही बील बाकीच आहे पण आता कपॅसीटी संपले आहे मी आता पैसे भरु शकत नाही पण त्यांचा फोन् येतोय सारखा कोर्ट मॅटर करणार तैम्हाला त्रास होईल प्लीज मी काय करु सांगा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा