दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
💬 प्रतिसाद
(166)
ह
हर्षद खुस्पे
Sat, 12/06/2014 - 15:43
नवीन
कट्टा मस्त चालू आहे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 12/06/2014 - 16:55
नवीन
सगळ्यांना भेटून आनंद वाटला. संपला की अजूनही सुरुच आहे?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/06/2014 - 18:05
नवीन
मस्त मज्जा करा..
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 12/06/2014 - 18:08
नवीन
आताशी पोचलो घरी.
मथुरा मध्ये महाराष्ट्री थाळी नंतर परत डेक्कनवर गप्पाष्टक.
मजा आली.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/06/2014 - 18:13
नवीन
ते बिचारे बराच वेळ वाट बघत होते.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 12/06/2014 - 18:20
नवीन
हो.
भेटले ते.
प्रसाद भागवत, विटेकर काका, बबन तांबे, हर्षद खुस्पे आणि ओल्द मोन्क ह्यांना पहिल्यांदाच भेटलो.
- Log in or register to post comments
स
सूड
Sat, 12/06/2014 - 18:46
नवीन
कट्टा एकदम मस्त पार पडला आहे.
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
Sun, 12/07/2014 - 07:01
नवीन
फोटो नाहि, वर्णन नाहि....काय पुरावा कट्टा झालाच तो??? (हुश्श्य चला जरा जळजळ कमी झाली)
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Sun, 12/07/2014 - 08:23
नवीन
काल दिवसभर बाहेर होतो. त्यामुळे धागा आज वाचला. आमच्या पुण्यात कट्टा झाला आणि हजेरी लावता आली नाही याचे दु:ख आणि कट्टा झाल्याचा आनंद दोन्ही आहे.
- Log in or register to post comments
न
निलेश
Sun, 12/07/2014 - 11:01
नवीन
काल ओफिसमुळे यायला जमले नाही. निदान फोटोतरी टाका.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 12/07/2014 - 11:23
नवीन
ह्यअॅ !! काय कट्टाबिट्टा झाला नाहिये!
उग्गा थापा मारतोय झाल वल्ली आणि धन्या!!
काय खर नाही.

- Log in or register to post comments
य
यसवायजी
Sun, 12/07/2014 - 12:16
नवीन
फोटो????????????
- Log in or register to post comments
अ
अजया
Sun, 12/07/2014 - 13:50
नवीन
कट्टा झालाय हे पुराव्यासह शाबित करा नाहीतर कट्टा नाही झाला असे मानल्या जाईल.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/07/2014 - 14:22
नवीन
नका मानू कट्टा झाला असे. काय फरक पडतो. :P
- Log in or register to post comments
अ
अजया
Sun, 12/07/2014 - 15:52
नवीन
आम्हाला पडतो फरक.कशावरुन कट्टा झाला? :tongue:
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 12/07/2014 - 16:13
नवीन
फोटूssssssssssssss :-\ .. :-\ .. :-\
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 10:20
नवीन
अगदी असेच म्हणतो. =))
- Log in or register to post comments
ह
हर्षद खुस्पे
Sun, 12/07/2014 - 14:48
नवीन
होलसेल मघ्ये फोटो आहेत . ईस्पिकचा ऐक्कांकडे आहेत
इहे
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/07/2014 - 16:23
नवीन
बागेत हिरवळीवर बसून गप्पा मारताना मोबाईलच्या कॅमेर्याने काढलेले फोटो कमी प्रकाशामुळे बरेच खराब आले आहेत, तेव्हा क्षमस्व. पण, कट्टा झाला हे सिद्ध करण्याचा "इज्जतका सवाल" निर्माण झाल्याने ते फोटो "जसे आले तसे" टाकत आहे :) ;)
.
.
.
नंतर या जळजळ वाढवणार्या गावरान थाळी आणि उत्सवमूर्ती पेठकर साहेबांची पसंती असलेली मिसळपाव + ओल्या खोबर्याचा बटाटावड्याकडे मोर्चा वळवला गेला...
.
काही जणांनी थाळीत बाजरीच्या भाकरी ऐवजी चपाती निवडली होती...
आणि हे आम्ही खरंच खाल्लं असे सिद्ध करणारा फोटो (कोण रे तो म्हणतोय, कुठे आहे इनोची बाटली म्हणून ? :) )
तर मंडळी, आत्ता कट्टा खरोखरच झाला हे सिद्ध झालं आहे. बघा, पुणेकरांशी पंगा घेणे अंगाशी येते ते असे. +D
आता कोणीतरी एक किंवा अनेक सिद्धलेखक कट्टाकरी वृत्तांत टाकून उरलीसुरली कसर काढून कट्ट्याला न आलेल्यांची जळजळ वाढवेलच ! :) ;)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 12/07/2014 - 16:40
नवीन
पुढ्यातील गावरान थाळीकडे पाहतानाचे माझ्या आणि सूडच्या चेहर्यावरील भाव पाहून शेजारच्या टेबलावरचा लहान मुलगा विचारात पडला आहे. *lol*
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 12/07/2014 - 16:28
नवीन
बरं बरं.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sun, 12/07/2014 - 16:40
नवीन
कट्टा झाला. अगदी मस्तं झाला. मी सौंना (माझ्याच) घेउन येणार होतो पण शेवटपर्यंत स्त्री सदस्यांनी मुवींच्या धाग्याकडे निर्दयी पाठ फिरविल्याने मी बिगरसौ गेलो होतो. संभाजी पार्काच्या मुख्य प्रवेशद्वारातच श्री. समीर उभे होते. (अगदी वेळेवर पोहोचले होते) त्यांच्याशी नजरेनेच ओळख झाली आणि कट्ट्याला क्षीण सुरुवात झाली. १० मिनिटातच सर्वश्री वल्ली, सतिश गावडे आले आणि कट्ट्याला रंग भरू लागला. इस्पिकचा एक्का आले. पाठोपाठ यशोचे आगमन झाले. श्री देशपांडे आले. कोणीतरी शेजारच्या शेंगदाणेवाल्याची व्यवसायवृद्धी करण्याच्या सदहेतूने भरभक्कम २ पुड्या शेंगदाणे घेतले. त्याचा आस्वाद घेत 'कोण कोण येणार आहेत, कोण टांग देण्याची शक्यता आहे' ह्यावर एक परिसंवाद झाला. (शेंगदाणे संपल्यामुळे) गेटवरचा मुक्काम हलवून कट्ट्याच्या आरक्षित जागेवर, पार्कात हिरवळीवर आसनस्थ झालो. माझ्या तरूणपणी पाकिस्तान युद्धात भारताने विजय संपादीत रणगाडा ठेवला होता. त्याकाळी तो फार दिमाखदार दिसायचा. अभिमान वाटायचा. आज तो गंज आणि पालापाचोळ्याचा आश्रयदाता होऊन फारच केविलवाणा दिसत होता. माझ्या तरूणपणाचं विजयी प्रतिक आज माझ्यासारखच म्हातारं दिसत होतं.
ओल्द मोन्क, ५० फ़क्त, ब्याटम्यान, हर्षद खुस्पे हे सुद्धा आले. गप्पा टप्पा होताना आणि आजूबाजूच्या कोलाहलात मला ९-९, १०-१० मिस्ड कॉल्स आले पण ऐकूच आले नाही. मधेच एक कॉल ऐकू आला आणि श्री विटेकरांचे आगमन झाले. तिथे आता यशोच्या हिमालयीन ट्रेकींग आणि इतर ट्रेकिंग संदर्भात मला अनाकलनिय भाषेत चर्चा झाली. पुढचे ट्रेकिंगचे प्लान ठरले. ते माझं क्षेत्र नसल्याकारणाने दु:खी अंतःकरणाने त्यांची चर्चा ऐकून आणि समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो. नंतर लवकरच, कांही अर्जंट काम असल्याकारणाने यशोने सर्वांचा निरोप घेतला. इथे वल्ली विरुद्ध सूड आणि सतिश गावडे ह्यांनी प्रेमळ चेष्टामस्करी सुरु होती. बुवांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. वल्ली आणि श्री. विटेकर ह्यांच्यात 'प्राचिन भारत' विषयक अभ्यासक्रमावर चर्चा झाली. तो अभ्यासक्रम, तीव्र इच्छा असूनही, पूरा करता येत नसल्याने श्री. वल्ली ह्यांनी खंत व्यक्त केली. आता श्री. व सौ. बबन तांबे कट्ट्यावर दाखल झाले होते. मराठी भाषा आणि मिपाचे गाजलेले, गाजवलेले वादविवाद ह्यावरही उद्बोधक चर्चा झाली. श्री. प्रसाद भागवतांनी हजेरी लावली. मराठी भाषेचे सौंदर्य, इस्पिकच्या एक्का ह्यांचे ओमान देशाचे अनुभव ह्यावर चर्चा सुरु असताना श्री समीर ह्यांना त्यांच्या संगणकावर (ई-पॅड्वर) आलेली कांही चित्र उघडत नसल्याकारणाने ते भयंकर अस्वस्थ झाले होते. श्री इस्पिकच्या एक्का ह्यांनी आणि श्री वल्ली ह्यांनी त्यांची समस्या दूर करून 'ती' चित्र उघडून दिली. एव्हढी चर्चेत असलेली आणि श्री. समीर ह्यांच्या अस्वस्थतेची पातळी पाहता ती चित्रे पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता होती पण त्यांनी दाखविली नाहीत. श्री धन्या आणि सूड ह्यांच्यात कांही 'तरूणांच्या' भाषेत बोलणे आणि खिदळणे चालले होते त्याचा अंदाज येत नव्हता पण माझ्या शेजारीच बसलेल्या श्री वल्ली ह्यांना चर्चेचे संदर्भ माहित असल्याने ते गालातल्या गालात हसत होते. संभाजी पार्कातला अंधार आणि पोटातली भूक वाढू लागली. कोणीतरी बटाटेवडे आणले होते तर कोणी स्वादिष्ट मिठाई त्यामुळे भूकेचे निरसनही लगेच होत होते. श्री भागवत ह्यांनी जास्त करून श्रोत्याची भूमिका निभावली तर श्री. समीर उत्साहाने खदखदत होते. वल्ली हे धीरगंभीर मुद्रेने सर्व गोष्टींचा आस्वाद घेत होते. सूड आणि धन्या ह्यांच्यात मधून मधून जोरदार हास्याचे फवारे उडत होते त्यात त्यांच्या जवळच बसलेले श्री. इस्पिकचा एक्का ही सहभाग दर्शवत होते. एकमेकांना टाळ्या देत माना डोलावल्या जात होत्या. दर १०-१५ वाक्यांनंतर अतृप्त आत्मा (बुवा) ह्यांची आठवण निघत होती. आज ते (इतरांची) लग्ने लावण्यात मग्न असल्याकारणाने उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटले. मधे मधे फोटो काढले जात होते. पण अंधार दाटल्याने फोटो कितपत आले असतील ह्याची शंकाच आहे.
शेवटी 'संघ उत्तीष्ट' म्हणत मराठमोळी खाद्यसंस्कृती जपण्यासाठी 'मथुरा' ह्या उपहारगृहाकडे निघालो. कांही जणांनी कामामुळे, दूसरी कांही निमंत्रणं असल्याकारणाने आमची रजा घेतली आणि आम्ही ५-६ जणांनी मथुरा उपहारगृही गावरान थाळी, भाकरी मटकीची उसळ तर मिसळपाव तसेच ताक वगैरेंचा हसतखेळत आस्वाद घेतला. शेवटी उपहारगृहा बाहेर पडल्यावर मराठी भाषेतील चमत्कृती, सभ्य आणि असभ्य मराठी, मराठी वाक्यांचे इंग्रजीकरण इ.इ. मराठी भाषेला वाहिलेला परिसंवाद झाला आणि जड अंतःकरणाने कट्टा आवरता घेतला.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 12/07/2014 - 18:04
नवीन
"माझ्या तरूणपणी पाकिस्तान युद्धात भारताने विजय संपादीत रणगाडा ठेवला होता. त्याकाळी तो फार दिमाखदार दिसायचा. अभिमान वाटायचा. आज तो गंज आणि पालापाचोळ्याचा आश्रयदाता होऊन फारच केविलवाणा दिसत होता. माझ्या तरूणपणाचं विजयी प्रतिक आज माझ्यासारखच म्हातारं दिसत होतं."
तुम्हाला म्हातारे कोण म्हणेल? उलट तुम्हाला भेटल्यामुळे मन मस्त टवटवीत होते.शारीरीक वयाचा बाऊ न करता, मन ताजे कसे ठेवायचे? हे तुमच्यासारख्या बर्याच मिपाकरांकडून शिकण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sun, 12/07/2014 - 18:32
नवीन
धन्यवाद मुवि.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 12/08/2014 - 03:39
नवीन
तुम्ही पण त्यातलेच हो :)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 12/08/2014 - 05:06
नवीन
आम्ही शिकलो...
प्रभाकर दादा जन्मजात आहेत...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 12/08/2014 - 05:09
नवीन
बाबांचा सल्ल्याने का? :)
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 12/08/2014 - 02:22
नवीन
मस्त वृत्तांत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 12/08/2014 - 09:00
नवीन
मस्त वृत्तांत :) मला शेंगदाणे नाही मिळाले ते? बाकीची खादाडी तर चुकलीच!
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 12/08/2014 - 12:00
नवीन
>>>> बाकीची खादाडी तर चुकलीच!
वाटलं नं वाईट? तरी म्हंटलं होतं, नको जाऊस म्हणून.
शेंगदाण्यांचं विशेष कांही नाही. माझ्या खात्यावर लिहून ठेव, पुढच्या वेळी देऊ. तेव्हढा मी नक्कीच उदार आहे.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 12/08/2014 - 12:28
नवीन
काम होते हो काका. :) पुढील वेळेस नक्की.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 12/08/2014 - 13:27
नवीन
धन्यवाद. पुढचा कट्टा आमच्या इमारतीच्या गच्चीत करूया.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/08/2014 - 14:34
नवीन
एकमेकांना टाळ्या देत माना डोलावल्या जात होत्या. दर १०-१५ वाक्यांनंतर अतृप्त आत्मा (बुवा) ह्यांची आठवण निघत होती. आज ते (इतरांची) लग्ने लावण्यात मग्न असल्याकारणाने उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटले. >>> चला...म्हणजे मी आत्मरूपाने उपस्थित होतो!!! ;)
बाकि..आंम्ही लग्ने नेहमी इतरांचीच लावतो,असा खुलासा करु इच्छितो! 
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
Mon, 12/08/2014 - 14:39
नवीन
तुम्हिहि मनावर घेतलतं तर तुमचंहि लागेल कि वो!!! कुठे अडतयं गाडं???
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/08/2014 - 14:47
नवीन
इतकं सोप्पं असतं..तर काय पाहिजे होतं? :)
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
Mon, 12/08/2014 - 14:49
नवीन
"तॄप्त आत्मा" करा....बघा फटाफट योग जुळून येतील कि नाहि ते!!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/08/2014 - 15:04
नवीन
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 12/08/2014 - 15:49
नवीन
बुवांच्या ष्टाईलने 'त्रुप्त अत्मा' असा अयडी* असेल.
*वाक्यातील 'अ' हे बुवांच्या लेखनशैलीतील 'अवडले, अता, अंबट' या शब्दांच्या चालीवर वाचावेत. ;)
- Log in or register to post comments
न
नंदन
Tue, 12/09/2014 - 19:39
नवीन
वृत्तांत आवडला. जोरदार झालेला दिसतोय कट्टा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 12/07/2014 - 17:58
नवीन
आमचा कट्टा हुकला खरा.
पण हरकत नाही.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 12/07/2014 - 19:24
नवीन
व्रुत्तांत आणि फोटो छान.
च्या पानी झालंच नाही वाटतं.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 12/07/2014 - 20:09
नवीन
अरे बाबा... पुण्यामध्ये चक्क थाळी दिल्या गेली.अज्जून काय हवे?
आणि पुण्यात साध्या अर्ध्या घोट चहाला पण "अम्रुततुल्य" असे म्हणतात.
त्यामुळे बाहेर गावचे मिपाकर आले की अम्रुततुल्य आणि परदेशातले मिपाकर आले की, थाळी, असा नियमच आहे मुळी.
म्ह्णजे बघा, पैसा ताईंना चहा आणि प्रभाकर दादांना थाळी.
परग्रहवासीय आले की , थाळी आणि पर्वती, असा जंगी बेत आखतात, असे मागच्या वर्षीच्या "मंगळवारीत" समजले.
दुसर्या आकाशगंगेतून कुणी आलेच तर, पार हडपसर ते लोणावळा आणि कात्रज ते कोथरूड असे रिक्षाने फिरवतात.
(आजकाल आमच्या कळफलकातून "पुणे" असे वाचले की, आपोआप अक्षरे टाइप व्हायला लागतात.अर्थात पुणेकरांना आजकाल ह्या गोष्टीची सवय झाल्याने, ते मनावर घेणार नाहीत,ह्याची १००% खात्री आहे.आता खूद्द आमचाच मुलगा पुण्याला शिकायला असल्याने, तसे आम्ही पण पुणेकरच आहोत.)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 12/07/2014 - 21:25
नवीन
घोर पक्षपात..
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 12/07/2014 - 21:55
नवीन
तुम्ही आलात की एक दिवस आपण पुण्याला जावू आणि थाळी हादडू...
हाकानाका....
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 12/08/2014 - 10:08
नवीन
आणि त्यासाठी पण गोवा ते पुणे ३ फेर्या मारायला लागल्या हो!!
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 12/08/2014 - 02:44
नवीन
झकास व्रुतांत :):)
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Mon, 12/08/2014 - 04:48
नवीन
कट्टा छान जमला. वृत्तांतदेखील देखणा आणि फोटोदेखील देखणे. माझा हुकला पण काही महत्वाचे कारण असल्याने यायला जमले नाही. पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत आहे. जेवण फर्मासच दिसते आहे. मथुराचे जेवण खाऊन कित्येक वर्षे लोटली. असो.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Mon, 12/08/2014 - 05:04
नवीन
झकास व्रुतांत...!!
बाकी सर्वच कट्ट्यांना सुडराव उपस्थित असतात हे पाहून आश्चर्य वाटले.
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 12/08/2014 - 10:11
नवीन
तीव्र सहमती ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 12/08/2014 - 11:40
नवीन
ओके!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »