Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गृहकर्जाबाबत बँकेचे नियम

स
स्वधर्म
Tue, 12/09/2014 - 07:21
🗣 66 प्रतिसाद
नमस्कार मित्रहो. मी नुकतेच स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. कर्जाची रक्कम रू. ३५ लाख. बँकेच्या पद्धतीनुसार आधी कर्जाच्या रकमेच्या चेकची छायाप्रत देण्यात आली. त्यावर मी १५ नोव्हें रोजी विकणार्या मालकांबरोबर सेलडीड केले. मग दोघांच्या सवडीने दि. २९ नोव्हें रोजी अ‍ॅपॉइंटमेंट घेऊन बँकेत गेलो व सेलडीड दिले. तेंव्हा प्रत्यक्ष चेक मालकांना देण्यात आला. तो त्यांनी दोन दिवसांनी भरला. मग तो त्यांच्या खात्यावर जमा झाला दि. ४ डिसें रोजी. मी जेंव्हा आता स्टेटमेंट पाहिले, तेंव्हा माझ्या खात्यावर दि. ११ नोव्हें पासून ३० नोव्हें पर्यंतचे व्याज, जे रू. १८,५०० आहे, ते डेबीट दाखवले आहे. खरे तर बँकेतून रक्कम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच केंव्हातरी विकणार्यांच्या खात्यावर गेली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, जेंव्हा चेक निघाला (११ नोव्हें), तेंव्हापासूनच व्याज सुरू झाले. समजा मी बँकेत चेक भरला, तर बँक त्याच दिवशी बुक बॅलन्स दाखवते, पण व्याज मात्र मला ते पैसे प्रत्यक्ष माझ्या खात्यात आल्यावरच (व्हॅल्यू डेट) मला व्याज द्यायला सुरू करते. कर्जाच्या बाबतीत मात्र प्रत्यक्ष रक्कम बँकेतून गेलेल्या दिवसापासून नव्हे, तर चेक तयार झाल्याच्या दिवसापासूनच व्याज लावते. व्याजाची रक्कम तशी किरकोळ नसल्याने, हे बरोबर आहे का, असा प्रश्न पडला आहे. आपल्याला काय वाटते? बँकेबरोबर त्यांचा नियम एकांगी आहे, म्हणून भांडण्याचा फायदा होईल काय? ते सर्वाधिक परिणामकारक कसे होईल? धन्यवाद. -स्वधर्म

प्रतिक्रिया द्या
29758 वाचन

💬 प्रतिसाद (66)
ट
टवाळ कार्टा Tue, 12/09/2014 - 07:25 नवीन
जाणकारांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 12/09/2014 - 07:31 नवीन
माझ्याबरोबरही असेच झाले. बँकेने ड्राफ्ट तयार केला होता १९ जुलैला आणि आमचे सेल डिड झाले १ ऑगस्टला.तरीही व्याज सुरू झाले १९ जुलैपासून.अलाहाबाद बँकेकडून कर्ज घेतले होते.इतर बँकांमध्ये कर्ज काढताना जितका त्रास होतो त्याच्या १०% त्रासही मला या बँकेत झाला नाही. तसेच कर्जही पहिले अ‍ॅग्रीमेन्ट केल्यानंतर १५ दिवसात मंजूर होऊन ड्राफ्ट तयारही झाला.एकूणच बँकेची सेवा आवडली.त्यामुळे १२ दिवसांचे व्याज भरावे लागले तरी त्याकडे दुर्लक्ष केले :)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 07:59 नवीन
बँके ने बराच वेळही लावला आणि घोळही केले. माझे चेक्स खात्यात बॅलन्स असतानाही सेलरला दिलेले चेक्स बाउन्स झाले. त्याचा दंड लावला. आता, तो रिव्हर्स करू असे सांगतायत. भांडत बसायला वेळ नसतो, काम झालं की झालं असं माझं धोरण आहे, पण हे जरा अतिच होतय, म्हणून इथे विचारतोय. -स्वधर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मोदक Tue, 12/09/2014 - 08:13 नवीन
भांडत बसायला वेळ नसतो कस्टमर केअरला मेल पाठवा. एक कम्प्लेंट नंबर मिळेल त्यावर इमेलनेच तक्रारीचा पाठपुरावा करा. "कस्टमर केअरकडे कशाला गेलात? आपण इथे सॉर्ट करूया" असले काही मॅनेजर म्हणाला तर सरळ फाट्यावर मारा. ते शक्य नसेल तर तो जे काही आश्वासन देईल त्याची त्वरीत अंमलबजावणी करून घ्या. उदा. "तो रिव्हर्स करू असे सांगतायत." तर आज आत्ता लगेच रिव्हर्स करा असा आग्रह करा आणि चेक बाऊन्सचा रिपोर्ट सिबीलला गेला असेल तर तुम्हाला NOC घ्यावी लागेल का याचीही माहिती मिळवा. (तसेच हा मॅनेजर बदलून गेला तर पुढच्या मॅनेजरला बँकेच्या कोणत्याही मदतीशिवाय तुमची केस तुम्ही समजावू शकाल इतकी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
क
कपिलमुनी Tue, 12/09/2014 - 09:02 नवीन
बाऊन्सचा रिपोर्ट सिबीलला गेला असेल तर तुम्हाला NOC घ्यावी लागेल का याचीही माहिती मिळवा
पूर्वी माझा एक कर्जाचा चेक बाउन्स झाला होता . नंतर मी तो लगेच भरला हलगेच, या साठी पण मला सिबिल साठीNOC घ्यावा लागेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 12:24 नवीन
ही सिबिलची भानगड माझ्या लक्षात नव्हती आली. चेक बाऊन्स झाल्याबद्दल बँकेकडून दिलगिरीचे पत्र घेऊन सिबिलला पाठवायला लागते काय? एन. ओ. सी.घेतले तर सिबिलला कसे कळ्णार? बँकेत विचारतोच. पुन्हा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
क्लिंटन Tue, 12/09/2014 - 08:40 नवीन
भांडत बसायला वेळ नसतो, काम झालं की झालं असं माझं धोरण आहे, पण हे जरा अतिच होतय, म्हणून इथे विचारतोय.
हो बरोबर. मला वाटते की १२-१५ दिवस जास्त व्याज लावले या बाबतीत फार काही करता येईल असे नाही.जर का लोन अ‍ॅग्रीमेन्टमध्ये व्याज पहिल्या दिवसापासून सुरू होईल असा क्लॉज असेल तर मात्र काहीच करता येणार नाही. पण खात्यात पैसे असूनही चुकीने चेक बाऊन्स करणे हा प्रकार बराच जास्त महत्वाचा आहे. त्याविषयी तक्रार करून काय करता येईल ते मात्र बघाच. अवांतरः स्टेट बँकेने माझ्या मित्राला होम लोन द्यायला जवळपास साडेतीन महिने लावले.इतका वेळ सगळ्यांच्या बाबतीत लागत नसला तरीही दोन-अडिच महिन्यांपर्यंत वेळ स्टेट बँक लावते हे अनेकांकडून ऐकले आहे. अनेकदा स्टेट बँक कमी व्याजात कर्ज देते म्हणून तिथे अर्ज केला जातो.पण स्टेट बँक कर्ज द्यायला इतका जास्त वेळ घेत असेल तर त्या बँकेकडे अर्ज करण्यात अर्थ नाही. मला १०.२५% ने व्याज भरावे लागत आहे तर स्टेट बँक १०.१०% ने कर्ज देत आहे. अगदी १०% ने स्टेट बँकेचे कर्ज मिळेल असे गृहित धरले तरी त्याचा माझ्या ई.एम.आय मध्ये सुमारे ८०० रूपयांचा फरक पडणार होता.म्हणजे वर्षाला १० हजारपेक्षा कमीच. जर बँकेने दोन महिने उशीर केला असता तर दोन महिन्यांचे भाडे मला जास्त भरावे लागले असते.एकिकडे दर वर्षाला वाचलेले १० हजार आणि दुसरीकडे दोन महिन्यांचे जास्त भरावे लागणारे भाडे यातून ब्रेक-इव्हन किती वर्षांनी होणार, दरम्यानच्या काळात किती मनस्ताप होणार, किती खेपा बँकेत माराव्या लागणार या सगळ्याचा हिशेब करून स्टेट बँकेकडे जायचे नाही असेच ठरविले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
संजय क्षीरसागर Tue, 12/09/2014 - 08:09 नवीन
रक्कम खात्याला डेबीट पडल्यावरच व्याज सुरु व्ह्यायला पाहिजे. कमीटमंट चार्जेस म्हणून एक प्रकार असतो (म्हणजे बँकेनं तुम्हाला ३५ लाख कमीट केल्याचा चार्ज), तसा काही क्लॉज लोन अग्रीमंटमधे आहे का ते पाहा. तो नसेल तर व्याज अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 08:16 नवीन
नोंद (एंट्री) ०१ डिसेंबरची असून नॅरेशन 'डेबिट ईंटरेस्ट' असे आहे. बँकेच्या आधिकार्यांचे म्हणणे काय आहे (आमचा नियम असा आहे) ते मी सांगितलेच आहे. - स्वचर्म
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/09/2014 - 08:23 नवीन
माझ्या अनुभवानुसार कर्जाच्या रकमेचा DD दिला जातो त्यामुळे पैसे बँकेच्या खात्यातून डेबीट झालेले असतात आणि आपल्यालाच व्याज भरावे लागते. चेक / DD ची झेरॉक्स प्रत तुमच्याकडे असेल तर पुन्हा एकदा तपासून पहा. मी अशाच केसमध्ये ८ दिवसांचे व्याज भरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
य
योगी९०० Tue, 12/09/2014 - 08:18 नवीन
मी आमच्याच कंपनीचा finance subsidiary कंपनी मधून कर्ज घेतले आणि असाच अनुभव आला. कर्ज काढताना कोठलाही म्हणजे कोठलाही त्रास झाला नाही. पण कंपनीने त्यांचा month-end quota पुर्ण करायचा असल्याने थोडा माझ्यावर दबाव टाकून ३० ऑगस्ट ला चेक काढला. (मला तो चेक ७ सप्टेंबर ला हवा होता). पण त्यानंतर त्यांनी ७ दिवसांचे व्याज लावले. (चांगले १२००० रुपये). खूप भांडलो पण काहीच उपयोग झाला नाही. (शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ...).
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/09/2014 - 17:48 नवीन
पण कंपनीने त्यांचा month-end quota पुर्ण करायचा असल्याने थोडा माझ्यावर दबाव टाकून ३० ऑगस्ट ला चेक काढला
थोडा माझ्यावर दबाव टाकून
मला आत्ता चेक नकोय असे ठणकावून सांगायचे राव.. आणि जर चेक ३० ला निघू शकत होता म्हणजे तुमची केस क्लीयर होती. अशा वेळी भुर्दंड का सहन करायचा..?? अर्थात कर्जाची आपल्याला गरज असतेच मात्र म्हणून हा प्रकार सहन करणे चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ग
गणेशा Tue, 12/09/2014 - 08:22 नवीन
बँकेच्या म्हणण्यानुसार, जेंव्हा चेक निघाला (११ नोव्हें), तेंव्हापासूनच व्याज सुरू झाले.
बँकेने चेक दिल्यावर व्याज सुरु होते, कारण त्यांच्या म्हणण्याने तुम्ही लगेच ती अमाउंट तुम्ही वापरु शकता. तुमच्या सवडीने तुम्ही कधीही व्यवहार केला तरी बँकेने ते पैसे तुमच्या साठी रिझर्व ठेवलेले असतात, आणि मला वाटते ते योग्य आहे. कारण त्यांनी त्यांची अमाउंट तुम्हाला दिली आहे असेच त्या चेक चा अर्थ असतो. भले ते डेबीट नंतर झाले असतील. आणि दुसरा मुद्दा समजा तुमचे एकुन १८० हप्ते आहेत, ते ११ नोव्हेंबर ला चालु झाले तर अ८० वा हप्ता ११ नोव्हेंबरलाच संपेन. आणि ३० ला सुरु झाला तर ३० ला च संपेन. आणि ११ ते ३० नोव्हेंबर मध्ये तो मालक जर तुमच्याकडुन व्याज घेत नाही तर तुम्हाला जस्त काळजीची कारण नाही. कारण बॅक १८० च हप्ते घेईन. (ती रक्कम एक्स्ट्रा घेतली असे आपण म्हणु शकत नाही असे मला वाटते, एव्हडेच की तुमचा हप्ता लवकर सुरु झाला) व्याज देणार आणि घेणारे हे बँक असते, जेंव्हा तुम्ही चेक भरता, जो पर्यंत ते त्यांच्या खात्याला येत नाही तो पर्यंत ते व्याज सुरु करत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 08:32 नवीन
माझा हप्ता १ डिसेंबरलाच चालू झालाय. ११ नोव्हें ते ३० नोव्हें चे व्याज लागले आहे. तो हप्ता नव्हे. >> कारण त्यांनी त्यांची अमाउंट तुम्हाला दिली आहे असेच त्या चेक चा अर्थ असतो. भले ते डेबीट नंतर झाले असतील. मग याच न्यायाने, त्यांनीही मी चेक भरलेल्या तारखेपासून व्याज द्यावे. त्या माणसाने पैसे तयार ठेवलेच होते की! >> व्याज देणार आणि घेणारे हे बँक असते, शेवटी हेच खरं. >>जेंव्हा तुम्ही चेक भरता, जो पर्यंत ते त्यांच्या खात्याला येत नाही तो पर्यंत ते व्याज सुरु करत नाहीत हेच ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 12/09/2014 - 09:55 नवीन
ओके. बरोबर. माझ्या बँकेने पहिला हप्ता घेतला होता बहुतेक निटसे आठवत नाही. म्हणुन मी लिहिले. तुम्हाला चेक मिळाला होता का नक्की ? डीडी मिळत असतो शक्यतो. डीडी असल्यास ते तुरंत त्या बंकेकडुन डेबिट असतात पैसे. बाकी नियम बँकेना आण इसामान्य माणसाला सेम असले पाहिजेत. पण सामान्य माणुस चेक बाउंस करु शकतो.. बॅंक करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 08:24 नवीन
असा अनुभव आपल्या देशात नेहमीच येतो. बँकेला नियम असू शकतात, माझ्या कंपनीला असू शकतात, माणसाने ते पाळायचे आसतात. भले ते माणसाच्या बाजूने न्याय्य नसले तरी. नाहीतर जा कोर्‍टात. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/09/2014 - 08:34 नवीन
असहमत... दरवेळी कोर्टात जावे लागत नाही. नियम पाळणे दोघांना बंधनकारक असते. बँकेने नियम न पाळल्याने त्यांना (किंवा त्या मॅनेजरला) कोंडीत पकडल्याचे आणि नियमाची जाणीव करून दिल्याचे अनेक स्वानुभव सांगू शकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/09/2014 - 08:42 नवीन
नियम पाळणे दोघांना बंधनकारक असते. बँकेने नियम न पाळल्याने त्यांना (किंवा त्या मॅनेजरला) कोंडीत पकडल्याचे आणि नियमाची जाणीव करून दिल्याचे अनेक स्वानुभव सांगू शकतो... याकरिता, कराराचे कागदपत्र नीट वाचून, अटी आणि नियम न समजल्यास / अन्याय्य वाटल्यास चर्चा करून मगच प्रत्येक कागदावर सही करणे आवश्यक असते. पण, हेच अपवादात्मक आहे ! बर्‍याचदा, कर्ज देते म्हणजे बँक आपल्यावर उपकार करते आहे किंवा केवळ आळसामुळे बँकेतिल अधिकारी म्हणतिल तेव्हा आणि म्हणतिल तेथे (फुल्यांच्या जागेवर) सह्या केल्या जातात आणि मग मात्र तक्रार केली जाते... अनेकदा तर असे अनेक छुपे आकार (चार्जेस) ग्राहकाला नकळत कापले जातात त्यामुळे तक्रारही होत नाही... अज्ञानातले सुख ! बँकांपेक्षा नॉन-बँकिंग फिनान्शियल कंपन्यामध्ये तर हे सर्रास आढलते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 08:47 नवीन
पण भांडत बसण्याचा अनुभव येतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/09/2014 - 08:30 नवीन
हे लॉजिक साधारणपणे असे आहे... १. एकदा रक्कम कमीट केली की ती तुमची होते, म्हणून व्याज सुरू. २. रक्कम तुम्हाला नाही तर बिल्डरला द्यायला कमीट केलेली आहे म्हणून ती बँकेकडे तुमची अमानत म्हणून ठेवलेली असते, म्हणून तुमच्या खात्यात जमा होत नाही (कारण तुमच्या खात्यातली रक्कम तुम्ही इतर कारणांसाठीही वापरू शकता.). एका अर्थाने "कर्जाची रक्कम तुमच्या नावावर करून तेवढ्याच किंमतीचा डीडी / बँकर्स चेक त्वरीत बिल्डरच्या नावाने काढल्या सारखे." त्यामुळे कर्ज मंजूरी (सँक्शन) घेताना त्याच्या वापराबाबत ज्या दिवशी चेक मिळेल तेव्हापासूनच कर्ज वापरले (अव्हेल केले) जाईल अशी पूर्वतयारी ठेवावी. हे माहित नसले तर सँक्शनच्या दिवसापासून कर्ज दिले असे दाखवून बँक व्याज आकारायला सुरूवात करते आणि ताब्यात न दिलेल्या पैश्यावर व्याज आकारायला सुरुवात करते. शिवाय नंतर तक्रार केली तरी भांडत राहून कर्ज अव्हेल करणे (बिल्डरला चेक देणे) लांबवणे ग्राहकाच्याच तोट्याचे असते... हे वागणे ग्राहकाला अंधारात ठेऊन घेतलेल्या अनेक सह्यांमुळे (ज्या करताना ग्राहक ते पन्नास कागद वाचत नाही) अनितीचे असले तरी कायदेशीर आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 08:58 नवीन
पण बँकेच्या बाजूने लावल्यासारखं वाटतंय. जोपर्यंत पैसे घेलले नाहहो, तोपर्यंत व्याज लावणे बरोबर नाही हेही लॉजिकच. पण बारीक टाईपातले मुद्दे वाचले नाहीत हेही खरंच. बघतो तुंम्ही म्हणता तसं आहे का. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/09/2014 - 15:07 नवीन
जोपर्यंत पैसे घेलले नाहहो जेव्हा बँक तुम्हाला कर्ज मंजूर करते तेव्हा बँकेच्या खात्यातून तुमच्या नावावर (तुमच्या सेविंग खात्यात नाही तर कर्ज-खात्यात) पैसे टाकते... म्हणजे ते तुम्ही वापरा न वापरा, तुमचे कर्ज (आणि म्हणूनच व्याज) सुरू होते. वरच्या प्रतिसादात मी कर्ज घेताना घातलेल्या अटींबद्दल म्हटले आहे त्याप्रमाणे जर कर्जमंजूरीच्या करारातल्या अटींमध्ये कर्जाचा चेक घेतल्यावरच कर्ज सुरू अट मान्य करून घेता आली तर उत्तम. नाहीतर निदान बिल्डरबरोबरचे काम इतके पुढे आणावे की कर्जमंजूरी नंतर लगेच (फारतर एक दोन दिवसांत) चेक बिल्डरकडे पोचावा. कोणतीही बँक कर्ज मंजू केल्यावर लगेच (किंवा काही थोड्या मुदतीतच) ते पैसे बँकेला इतर कामासाठी वापण्यास उपलब्ध नसल्याने कमिट्मेंट चार्जेस (एक प्रकारचे व्याजच) लावणारच... ये धंदेका सवाल हे भाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
आ
आनन्दा Tue, 12/09/2014 - 08:42 नवीन
मी आयसीआयसीआय मधून कर्ज घेतले होते, पण मी सकाळी चेकची झेरोक्स घेऊन दुपारी सेलडीड केले, आणि सन्ध्याकाळी ते डीड बँकेत देऊन दुसर्‍या दिवशी तो चेक डिपोसिट पण झाला, त्यामुळे याचा काही अनुभव नाही.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 12/09/2014 - 09:11 नवीन
आयसीआयसीआय मधून घर कर्ज ??
या बद्दल बरेच वाईट अनुभव ऐकले आहेत ? तुम्हाला किती दिवस झाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
पैसा Tue, 12/09/2014 - 09:34 नवीन
बँकेत लोनसाठी बॅकेबरोबर अ‍ॅग्रीमेंट केल्यानंतर त्याच दिवशी लोन रिलीज करून घेतले असेल तर त्या दिवशीपासून व्याज लागणार हे कायदेशीरच आहे. जर तुम्ही कर्जाची रक्कम अमूक एक तारखेला रिलीज करून हवी आहे असे सांगितले असते तर ते बँक ऐकते. म्हणजेच लांब मुदतीच्या कर्जाच्या बाबतीत अ‍ॅग्रीमेंट केल्यानंतर एक महिन्याच्या आत कर्जाच्या रकमेची पहिली उचल केली पाहिजे असा सर्वसाधारण नियम असतो. अशी उचल झाल्या दिवसापासून व्याज सुरू होतेच. कारण बँक तुम्हाला जे कर्ज देते ते त्यानी लोकांकडून आलेल्या ठेवींपैकी काही पैशातून तुम्हाला दिलेले असतात. आणि ठेवीदारांना बँकेला व्याज द्यायचे असते. चेकची फोटोकॉपी बिल्डरला दाखवावी लागते हे मला नवीन आहे. मी दोन फ्लॅट्स घेतलेत पण एकाही बिल्डरने अशी कॉपी मागितली नव्हती. चेक खात्यात भरल्यादिवसापासून व्याज का मिळत नाही याचे उत्तर असे आहे की, चेक क्लिअरिंगला जो वेळ लागतो, त्या दिवसापर्यंत चेक पास झाला असे मानता येत नाही. क्लिअरिंगचा कालावधी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. गोव्यात तो तीन दिवस आहे. म्हणजे आज बँकेत भरलेला चेक दुसर्‍या दिवशी पेमेंट करणार्‍या बँकेकडे जातो आणि तिसर्‍या दिवशी तो पास झाला की बाउन्स झाला हे कळते. काही ठिकाणी लोकल क्लिअरिंग असेल तर एका दिवसात कळते. मुंबईत हा कालावधी बहुधा ५ दिवस आहे. (नक्की माहित नाही.) मधल्या काळात चेक रिटर्न आला (पास झाला नाही तर) तुम्हाला त्याचे पैसे किंवा व्याज कसे मिळेल? खात्यात पैसे असताना चेक रिटर्न करणे मात्र गंभीर आहे आणि त्याबद्दल तुम्ही फार त्रास न होता सहज तक्रार नोंदवू शकता. मात्र चेक परत जाण्याचे कारण काय दाखवले होते हेही महत्त्वाचे आहे. जर चेकवर सही नसणे, सहीत फरक असणे, तारीख चुकीची असणे, रकमेत लिहिताना शब्दात आणि आकड्यात फरक असणे यापैकी काही कारण असेल तर ती तुमची चूक असेल.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/09/2014 - 09:47 नवीन
चेकची फोटोकॉपी बिल्डरला दाखवावी लागते हे मला नवीन आहे. मी दोन फ्लॅट्स घेतलेत पण एकाही बिल्डरने अशी कॉपी मागितली नव्हती. कारण तुम्हाला तेथे रहायला जायची गडबड नसेल.. मी नवीन घरात रहायला जावून आठ दिवसांनी बिल्डरला DD दिला कारण माझा एक कागद बिल्डरकडून मिळाला नव्हता पण त्या दरम्यान बँकेने लोन पास करून DD काढून ठेवला व मला त्याची झेरॉक्स दिली. मी ती झेरॉक्स बिल्डरला दिली व रहायला गेलो. बिल्डरकडून कागद मिळाल्यावर बँकेने DD दिला. या दरम्यानचे आठ दिवसांचे व्याज मला भरावे लागले. DD असल्याने व्याज भरणे क्रमप्राप्त होते. चेक असता तर कदाचित असा विचार केला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 13:35 नवीन
- इनसफिशिएण्ट बॅलन्स माझे पगाराचे खाते आहे. ठराविक रकमेच्या वर शिल्लक गेली की आपोआप त्याची ठेव तयार व्हायची. अशा अनेक छोट्या ठेवी तयार झाल्या होत्या. माझ्ञा ऑनलाईन अकाऊंट्ला त्या दिसायच्या. पण मी एक मोठी ठेवही बँकेत जाऊन पावती करून ठेवली होती. झाले असे की, त्या स्वीप ठेवी चेक पास व्हायला आल्यावर आपोआप मोडल्या गेल्या पण ती मोठी ठेव मात्र मोडली गेली नाही. मग मी ती काळजी का घेतली नाही? कारण मला ती ठेवही अगदी इतर ठेवींसारखीच खात्यावर दिसत होती. ती आपोआप मोडली जाणार नाही, असा कोणताच अंदाज ऑनलाईन अकाऊंट पाहून आला नाही. मी चेक देऊन देशाबाहेर गेलो होतो. मला सेलरचा चेक बाउंस झाल्याचा मेसेज आला. मग बायकोने ती ठेव स्वतः जाऊन मोडली व बॅलन्स अप केला. तरीपण दुसर्या दिवशी रिप्रे झेंट चेक परत सेलरच्या बँकेत परत गेले. मग मी माझ्या बँकेला त्या बँकेकडून चेक आणायला सांगितले व स्वतः बँकेच्या क्लिअरिंग हाऊसला फोन लाऊन ते पास होत आहेत याचा पाठपुरावा करत राहिलो. माझ्या अकाऊंटला पुन्हा बाऊन्स दिसताच कामा नये स्टँड घेतला. तेंव्हा एकदाचे ते गेले. अशा प्रकारे ते दोनदा बाऊन्स झाले. मी बिल्डरकडून प्लॅट घेतला नाही. एका व्यक्तीचा रिसेलचा प्लॅट आहे तो. त्याला मी चेकची छाया प्रत दाखवल्याशिवाय सेल डीडवर सही का करेल तो? म्हणून ती कॉपी बँकेने त्यंच्या पच्दतीनुसारच दिली होती. पण मला एक सांगा पैसाताई, प्रत्यक्ष उच्चल झाल्याशिवाय बँकेने व्याज लावणं तुंम्हाला फेअर ऑन कस्टमर वाटतं काय? हे पैसे बाजूला काढून ठेवले वगैरे काय आहे? आपण एक इंडीव्हिज्युअल म्हणून बाजूला काढलेल्या पैशावर कोणाला व्याज आकारू शकतो काय? मी नोकरी बदलल्यावर नव्या कंपनीकडे रूजू तारखेपासून पगार मागू की, पहिल्या कंपनीतून राजीनामा दिलेल्या, रिलीज झालेल्या दिवसापासून ? यालाच मी एकांगी नियम किंवा व्यक्ती पेक्षा संस्थेला झुकतं माप म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मोदक Tue, 12/09/2014 - 13:48 नवीन
चेकची छाया प्रत दाखवल्याशिवाय सेल डीडवर सही का करेल तो? तुम्ही प्रत्यक्ष चेक दिला आणि त्याने सही केली असेल तरी हा व्यवहार एक आश्चर्य समजण्यास हरकत नाही. लोनच्या प्रकरणात (त्यातही रिसेलच्या) जर चेकचा व्यवहार होणार असेल तर चेक वटल्याशिवाय मी तरी कोणत्याही कागदावर सही करणार नाही. थोडा विचार करा.. चेक बाऊन्स झाला आणि त्यादरम्यान सेलडीडवर स्वाक्षर्‍या झाल्या तर हे सगळे प्रकरण कोठे वळण घेईल..? बहुदा वरती एकदा विचारले आहे.. आणखी एकदा - बँकेने नक्की चेक दिला होता की DD..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 13:56 नवीन
माझे पूर्ण पैसे देऊन झाले होते. अन बँक सेल डीड दिल्याशिवाय प्रत्यक्ष चेक देतच नाही. म्हणूय्=त्यांनी केली सही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 12/09/2014 - 13:58 नवीन
ह्म्म... बँकर्स चेक काय भानगड असते कोणी सांगेल का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 14:12 नवीन
इज अ‍ॅज गुड अ‍ॅज अ डीडी. त्यावर बँकेच्या सक्षम आधिकार्याची सही असते. इतकेच माहिती आहे. वरील प्रतीसादात दुरूस्ती. माझे पूर्ण पैसे देऊन झाले नव्हते, तर सेल डीडच्या वे़ळी त्यातले काही काँट्रीब्ञ्ब्यूशन देऊन माझे पैसे पूर्ण दिले व उरलेल्या रकमेचा बँकर्स चेकची कोपी दिल्यावर सेलरने सेल डीडवर सही केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आनन्दा Tue, 12/09/2014 - 14:40 नवीन
थोडा विचार करा.. चेक बाऊन्स झाला आणि त्यादरम्यान सेलडीडवर स्वाक्षर्‍या झाल्या तर हे सगळे प्रकरण कोठे वळण घेईल..?
तसे होत नाही. सेलडीड मध्ये तश्या क्लोझेस असतात. आणि घर म्हणजे वस्तू नव्हे, त्यामुळे जर चेक वटला नाही तर ते डीड कॅन्सल होईल अशी क्लॉझ डीड मध्ये टाकू शकता. आणि तसेही तो चेक तुमचा नसतो, तर बँकेचा असतो, आणि बँकेचा चेक बाउन्स होत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 14:48 नवीन
डीडवर सही सब्जेक्ट टू रियलायझेशन असा डिसक्लेमरखाली केलेली असते. न वटणारा चेक देणे हा दखल पात्र गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
पैसा Tue, 12/09/2014 - 14:51 नवीन
ठेव आपोआप मोडणे हे त्याच्या अर्जात लिहिलेल्याप्रमाणे घडते. कुठेही सही करताना आपण कशावर सही करतोय हे वाचूनच सही करायला पाहिजे.
पण मला एक सांगा पैसाताई, प्रत्यक्ष उच्चल झाल्याशिवाय बँकेने व्याज लावणं तुंम्हाला फेअर ऑन कस्टमर वाटतं काय? हे पैसे बाजूला काढून ठेवले वगैरे काय आहे?
तुमच्या दृष्टीने तुम्ही पैसे उचलले नाहीत, पण ज्या दिवशी बँकेने बँकर्स चेक्/डीडी काढला त्या दिवशी बँकेच्या दृष्टीने पैसे तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्ही विकणार्‍याला कधी देता याला बँकेच्या दृष्टीने अर्थ नाही. कर्ज खाते ज्या दिवशी चेक/डीडी काढला त्या दिवशीच सुरू झाल. कर्जाच्या सर्व अटी त्या दिवसापासून लागू होतात. याला उपाय म्हणजे बँकेचे सँक्शन लेटर त्या विक्रेत्याला दाखवून तुम्हाला फ्लॅटचा व्यवहार करता आला असता आणि ज्या दिवशी व्यवहार पुरा करायचा त्या दिवशी बँकेत कर्ज खाते उघडून चेक घेता आला असता. एक उदाहरण देते. तुम्ही समजा एक घर भाड्याने घेतले. करार १ तारखेला केला तर भाडे १ तारखेपासूनच भरावे लागेल. "मी १० तारखेला रहायला आलो म्हणून भाडे १० तारखेपासून देईन" असे म्हटलेले चालत नाही. घर कर्जाच्या बाबतीत तुम्ही बँकेचे पैसे भाड्याने घेतले आहेत इतकाच फरक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
क
क्लिंटन Tue, 12/09/2014 - 15:54 नवीन
तुमच्या दृष्टीने तुम्ही पैसे उचलले नाहीत, पण ज्या दिवशी बँकेने बँकर्स चेक्/डीडी काढला त्या दिवशी बँकेच्या दृष्टीने पैसे तुम्हाला दिलेले आहेत.
या बाबतीत बँका चालूपणा करतात.माझ्या कर्जाचा डी.डी तयार झाला १९ जुलैला.तो दिवस शनीवारचा होता आणि मी जवळपास संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बँकेत होतो.तसेच कर्जाचे प्रत्यक्ष डिसबर्समेन्ट व्हायच्या आधी एक एन.ओ.सी आणणे गरजेचे होते (म्हणजे ती एन.ओ.सी ही सॅन्क्शनसाठीची गरज नव्हती तर केवळ डिसबर्समेन्टसाठीची गरज होती).ती एन.ओ.सी मिळेपर्यंत उशीर झाला आणि आमचे सेल डिड झाले १ ऑगस्टला.बँकेने डी.डी तयार करून ठेवला होता आणि सगळे प्रॉपर्टीचे पेपर बँकेत दिल्यानंतरच तो डी.डी घराच्या मूळ मालकाच्या ताब्यात दिला आणि त्या सगळ्या पेपरमध्ये ती एन.ओ.सी पण होती.असे असेल तर ती एन.ओ.सी मिळाल्यानंतरच बँकेला डी.डी बनवता आला असता.पण तरीही बँकेने १९ जुलैलाच डी.डी तयार केला.पण वर म्हटल्याप्रमाणे बँकेत मला खरोखरच काहीही त्रास झाला नाही.बँकेत केवळ तीन खेपांमध्येच सगळे काम १५ दिवसात झाले.इतरांचे अनुभव ऐकता मला काहीच त्रास झाला नाही आणि मनस्तापही झाला नाही.एका नॉन बँकिंग हाऊसिंग लोन कंपनीमध्ये माझ्या एका मित्राकडे एकूण कर्जाच्या रकमेच्या १% अंडर द टेबल पैसेही मागितले होते.तसला काहीही प्रकार माझ्या बाबतीत झाला नाही.तेव्हा काही दिवसांच्या व्याजाचा मी पण फार बाऊ केला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 16:32 नवीन
>> ठेव आपोआप मोडणे हे त्याच्या अर्जात लिहिलेल्याप्रमाणे घडते. कुठेही सही करताना आपण कशावर सही करतोय हे वाचूनच सही करायला पाहिजे. ऑटोमॅटीक ठेवी होताना ना सही करावी लागते, ना अर्ज. तसेच सही करताना बँकेत अ‍ॅपॉइंटमेट देतात. ४५ मिनीटापेक्षा जास्त वेळ देत नाहीत, कारण त्यांना पुढचा कस्टमर थांबलेला असतो. तेवढ्या वेळात बरेच फॉर्म्स इ. भरून घेतात. अशा वेळी सगळे कागद द्या. वाचून उद्या येतो व मग सही करतो, असे म्हटलेले चालेल काय? आणि माझ्या आक्षेपासाठी बँक कुठला क्लॉज बदलेल काय? प्रयत्न केला नाही, पण शंका वाटते. बाकी घर भाड्याचे उदाहरण पटले नाही. पैसा हे चलन आहे. आणि त्यातही तो प्रत्यक्ष नोटा नाहीत. तो कसाही हलवता, फिरवता, वापरता येतो, जोपर्यंत घेतला नाही तोपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 12/09/2014 - 17:00 नवीन
तुम्हाला पटले नाही तरी बँकेच्या दृष्टीने पैसा ही भाड्याने द्यायची-घ्यायची वस्तूच आहे. ते धंदा करायला बसलेले आहेत. त्यात साईड इफेक्ट म्हणून कोणाचे भले झाले तर वा वा! नाही झाले आणि काही प्रॉब्लेम झाला तरी बँक आपले पैसे वसूल करणारच. एखाद्या ठेवीदाराने पैसे परत मागितले तर ते त्याला असे सांगू शकत नाहीत की "अरे त्या अमक्याचे पैसे आले नाहीत म्हणून आम्ही तुमचे पैसे परत देऊ शकत नाही". बँकेचा धंदा हा सहानुभूती आणि भावनांवर चालत नाही. तो कोरडा व्यवहार असतो. बँक फॉर्म्स वाचूनच सह्या केल्या पाहिजेत. त्यात बरेच क्लॉज, सबक्लॉज, फाईन प्रिंट्स असतात. ४५ मिनिटेच काय, बँकेचे फॉर्म्स घरी नेऊन वाचून दुसर्‍या दिवशी जाऊन सह्या केल्यात तरी कोणी काही बोलणार नाही. आपला फायदा आपणच पाहिला पाहिजे. तिथे कोणत्याही सबबी चालणार नाहीत. लहान ठेवी ऑटोमेटिक तयार होत होत्या त्याच अर्जाखाली ही मोठी ठेव केली होती का त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरला होता हे तुम्ही स्पष्ट केले नाही. प्रत्येक कागद वाचून सही करणे ही कोणत्याही माणसाची जबाबदारी आहे. उद्या समजा कोणी कोर्‍या कागदावर सही कर म्हटले तर तुम्ही कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 06:53 नवीन
सुरेख विश्लेषण! शब्दाशब्दाशी सहमत!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रघुपती.राज Tue, 12/09/2014 - 10:39 नवीन
चेक बाउन्स झल्यास सिबिलला काही फरक पडत नाही. जर कर्ज फेड करण्यासाठी दीलेल्या चेक पैकी एखादा वटला नाही तरी सिबिल स्कोअर ला फरक पडत नाही. पण वारन्वार कर्ज फेडिचे चेक वटले नाहीत तर मात्र सिबिल स्कोअर निश्चित घसरतो. एखाद्या चेकचे मनावर घेउ नका. पण तशी सवय होउ देउ नका.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/09/2014 - 11:03 नवीन
तुम्ही चेक तुमच्या बँक अकाउंटमधून देता. सिबिलकडे तुमच्या बँक अकाऊंटची माहिती नसते. त्यामुळे चेक बाउन्स झाला किंवा काय याने सिबिलला शष्प फरक पडत नाही. फरक पडतो तो बाउन्स झालेल्या चेकच्या परिणामामुळे. त्या न वटलेल्या चेकमुळे तुमच्या कर्जाचा EMI चुकलाय काय? किंवा तुमच्या क्रेडिट कार्डाचे पेमेंट हुकलेय काय? जर याचे उत्तर होय असे असेल तर, सिबिल स्कोअरवर परिणाम नक्कीच होणार. जर तसे नसेल, तर त्या न वटलेल्या चेकमुळे तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होणार नाही. कारण ती माहिती सिबिलपर्यंत पोचणारच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुपती.राज
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 12:41 नवीन
गेल्या दहा वर्षात कर्ज, क्रेडीट कार्ड इ. नसल्याने, सिबिलचा विचारच आला नाही. पण तरीही एनओसी किंवा दिलगिरीचे पत्र नक्की घेईन. बँकेने कागदपत्रे घेताना पहिल्यांदाच सिबिलचा विषय आला होता. माझे काहीच रेकॉर्ड नसल्याने बहुधा तो -२ येईल असे सांगितले होते, पण नंतर तो विषय आलाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
क्लिंटन Tue, 12/09/2014 - 13:28 नवीन
सिबील स्कोअरशिवाय बँक गृहकर्ज देते हे मला माहित नव्हते.त्या नव्या माहितीबद्दल धन्यवाद. मी ज्या चार ठिकाणी चौकशी केली होती त्यात किमान ७५० स्कोअर हवा (एका बँकेत ७००) असे मला बँकेतल्या लोकांनी सांगितले होते. प्रत्येक बँकेची पध्दत वेगळी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
म
मोदक Tue, 12/09/2014 - 13:32 नवीन
बहुदा काहीच कर्ज / क्रेडीट कार्ड नसल्याने सिबील स्कोअरला काही नुकसान नसावे. त्यामुळे सिबीलचा विषय लोन प्रकरणात फारसा चर्चिला गेला नसावा. एक शक्यता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 13:38 नवीन
कदाचित माझा स्कोअर परस्पर चेक केला असावा, पण मला काहीच माहीती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 12/09/2014 - 13:43 नवीन
आत्ताच विचारलो. जर का काही क्रेडीट हिस्ट्रीच नसेल तर काय म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसतो. ब्यांकेच्या स्टाफला लॉग इन करून सिबील स्कोर बघता येतो. तो असायलाच पाहीजे असं कंपल्शन नाही, पण घेतलेली कर्ज वेळेवर दिली नाहीत तर ते दिसतं आणि मग त्यानुसार ब्यांक निर्णय घेते. आमची बरीच मित्रमंडळी वेगवेगळ्या ब्यांकात आहेत. काय शंका असेल तर विचारता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पैसा Tue, 12/09/2014 - 14:44 नवीन
कन्झ्युमर लोन क्याटेगरीतल्या लोन्सना सहसा सिबिलचे रेकॉर्ड बघायची गरज नसते. तसेच ५० लाखपर्यंतच्या घर कर्जाला सिबिल कम्पल्सरी नव्हते. (२ वर्षांपूर्वी) लेटेस्ट माहित नाही. कारण ५० लाखाच्या वरचे घर कर्ज तेव्हा रिअल एस्टेट लोन गणले जात असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 12/09/2014 - 17:49 नवीन
कन्झ्युमर लोन क्याटेगरीतल्या लोन्सना सहसा सिबिलचे रेकॉर्ड बघायची गरज नसते. तसेच ५० लाखपर्यंतच्या घर कर्जाला सिबिल कम्पल्सरी नव्हते.
हे नियम बहुदा बँकांपरत्वे बदलतात असे दिसते. मी २००९ मध्ये स्टेट बँकेकडे शैक्षणिक कर्जाला अर्ज केला होता.ती रक्कम अर्थातच कन्झ्युमर लोक होती आणि रक्कमही अर्थातच ५० लाख पेक्षा कमी होती.तरीही माझ्या सिबील रिपोर्टवर २००९ मधील स्टेट बँकेची स्टुडन्ट लोनसाठीची इन्क्वायरी आहे.तसेच मी ज्या क्रेडिट कार्डांना अ‍ॅप्लाय केले त्याची एन्क्वायरीही माझ्या रिपोर्टवर आहे.आणि त्या क्रेडिट कार्डांची लिमिट ५० लाखपेक्षा कितीतरी कमी होती :) आताही होम लोन ५० लाखापेक्षा कमीच आहे.होम लोनशी संबंधित मी जे काही बँकेला दिले होते त्याची एक जाडी फाईल बँकेकडे होती.त्यात माझा सिबील रिपोर्टही होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 12/09/2014 - 18:47 नवीन
बँकेच्या भाषेत आपण ज्याला abundant caution म्हणतो त्यासाठी आणि क्रेडिट रेटिंग चार्ट तयार करताना सावधगिरी म्हणून सिबिल रिपोर्ट बघितले आतात आणि एकदा तुमचे नाव आणि जन्मतारीख सर्चमधे आली की दर वेळी ती इन्क्वायरीमधे रिपोर्ट होते. जेव्हा सिबिल नव्याने आले तेव्हा आम्हीही प्रत्येक अर्जदाराची चौकशी घेत होतो याची आठवण आली. ही इन्क्वायरी त्यांच्या सिबिल रिपोर्टमधे नोंदली गेली असणारच! काही बँका असा सर्च कशासाठी केला होता हे अनडिस्क्लोज्ड ठेवतात तर काही बँका सगळे डिटेल्स तिथे ठेवतात. सिबिल रिपोर्टमधे समजा थोडेफार इकडे तिकडे असेल तरी इतर काही प्रकारचे मार्क्स वाढवून म्यानेजर लोक कर्ज मंजूर करतात. काही लोकांचे क्रेडिट कार्ड्स क्रॉनिक ओव्हरड्यु असतानाही त्यांना कर्जे मंजूर केलेली मी पाहिली आहेत. ती कशी हे मात्र विचारू नका! मात्र अगदीच वाईट रिपोर्ट असेल तर कर्ज मिळणे सर्वसाधारणपणे अवघड जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ख
खटपट्या Tue, 12/09/2014 - 19:00 नवीन
बरोबरे !! माझ्या दुसर्‍या होमलोनच्या वेळेस मला बँकेतील माणसाने फोन करुन एका कँसल झालेल्या विमा पॉलीसीबद्द्ल विचारणा केली होती. त्याला ही माहीती सीबील कडूनच मिळाली असणार. अजून एक मुद्दा, त्याने मला हेही विचारले की "घरासाठी जी १५% रक्कम स्वत: भरणार आहात ती कुठून भरणार?" बँक असा प्रश्न विचारू शकते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 12/09/2014 - 19:45 नवीन
बँक असा प्रश्न विचारू शकते आणि विचारतेही. कारण राहिलेले १५% तुमच्याकडे खरेच आहेत का, नसले तर ते उभे करायची काय योजना आहे, नातेवाईकांकडून उधार, पर्सनल लोन वगैरे याची खात्री करावी लागते. नाहीतर ते पैसे भरले गेले नाहीत तर उद्या बिल्डर फ्लॅटचा ताबा देणार नाही. म्हणजेच बॅंकेच्या कर्जातून जी अ‍ॅसेट निर्माण व्हायला हवी ती न झाल्यामुळे बँकेचे कर्ज विनातारण बनेल. यासाठी मार्जिनचे १५% आधी भरावे लागतात आणि बँकेची कर्जाची रक्कम नंतर वितरित होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा