Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गृहकर्जाबाबत बँकेचे नियम

स
स्वधर्म
Tue, 12/09/2014 - 07:21
🗣 66 प्रतिसाद
नमस्कार मित्रहो. मी नुकतेच स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. कर्जाची रक्कम रू. ३५ लाख. बँकेच्या पद्धतीनुसार आधी कर्जाच्या रकमेच्या चेकची छायाप्रत देण्यात आली. त्यावर मी १५ नोव्हें रोजी विकणार्या मालकांबरोबर सेलडीड केले. मग दोघांच्या सवडीने दि. २९ नोव्हें रोजी अ‍ॅपॉइंटमेंट घेऊन बँकेत गेलो व सेलडीड दिले. तेंव्हा प्रत्यक्ष चेक मालकांना देण्यात आला. तो त्यांनी दोन दिवसांनी भरला. मग तो त्यांच्या खात्यावर जमा झाला दि. ४ डिसें रोजी. मी जेंव्हा आता स्टेटमेंट पाहिले, तेंव्हा माझ्या खात्यावर दि. ११ नोव्हें पासून ३० नोव्हें पर्यंतचे व्याज, जे रू. १८,५०० आहे, ते डेबीट दाखवले आहे. खरे तर बँकेतून रक्कम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच केंव्हातरी विकणार्यांच्या खात्यावर गेली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, जेंव्हा चेक निघाला (११ नोव्हें), तेंव्हापासूनच व्याज सुरू झाले. समजा मी बँकेत चेक भरला, तर बँक त्याच दिवशी बुक बॅलन्स दाखवते, पण व्याज मात्र मला ते पैसे प्रत्यक्ष माझ्या खात्यात आल्यावरच (व्हॅल्यू डेट) मला व्याज द्यायला सुरू करते. कर्जाच्या बाबतीत मात्र प्रत्यक्ष रक्कम बँकेतून गेलेल्या दिवसापासून नव्हे, तर चेक तयार झाल्याच्या दिवसापासूनच व्याज लावते. व्याजाची रक्कम तशी किरकोळ नसल्याने, हे बरोबर आहे का, असा प्रश्न पडला आहे. आपल्याला काय वाटते? बँकेबरोबर त्यांचा नियम एकांगी आहे, म्हणून भांडण्याचा फायदा होईल काय? ते सर्वाधिक परिणामकारक कसे होईल? धन्यवाद. -स्वधर्म

प्रतिक्रिया द्या
29758 वाचन

💬 प्रतिसाद (66)
स
सुबोध खरे Tue, 12/09/2014 - 19:03 नवीन
मी वेगवेगळ्या कारणांसाठी सात वेळा कर्जे घेतली आहेत. (घरांसाठी तीन, दवाखान्यासाठी एक, सोनोग्राफी मशीनसाठी एक , मोटारीसाठी एक आणि मोटार सायकलसाठी एक)परंतु सिबिलचा रिपोर्ट कधीहि लागला नाही. सात पैकी ५ कर्जे फेडून झाली आहेत (एक राहत्या घराचे आणि सोनोग्राफी यंत्राचे कर्ज चालू आहे ). सर्व कर्जे हि खात्यातून सरळ वजा होतील हि सोय केलेली होती/आहे १७ वर्षात क्रेडीट कार्डावर एकही पैसा व्याज भरलेले नाही( वेळेत पैसे भरल्यामुळे). आजही सिबिलचा रिपोर्ट मिळवण्यासाठी ४५० रुपये का भरावे असा विचार आहे? दोन बँकांनी(SBI आणि CITI) मला न विचारता क्रेडीट कार्ड पाठवले आणि बिल सुद्धा. मी बिल न भरता त्यांची वरपर्यंत तक्रार केली आणि दोन्ही बँकांनी सहा आणि आठ महिन्यांनी पूर्ण बिले आणि कार्डे माफ/रद्द केली. फक्त एकदा बँकेच्या चुकीने ECS bounce झाले( एका खात्यात पैसे नसतील तर दुसर्या खात्यातून पैसे वळते असावेत असा उभा आदेश(standing instruction)असूनही ते परत पाठविले गेले. त्याचा भुर्दंड मी बँकेच्या कर्मचार्यांना भरायला लावला होता. आणि तो हप्ता मी रोख रक्कमेने दुसर्या दिवशी भरून टाकला. एक उत्सुकता -- या गोष्टींचा उल्लेख सिबिलमध्ये असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 12/09/2014 - 19:38 नवीन
सिबिलकडे सगळ्या कर्जांची नोंद होते. त्यात किती हप्ते ओव्हरड्यु आहेत (असलेच तर) हेही दिसते. मात्र ईसीएस बाउन्स झाल्याची नोंद होणार नाही. कारण ओव्हरड्यु दाखवण्यापूर्वीच तुम्ही तो हप्ता भरला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 12:42 नवीन
रघु, धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुपती.राज
स
सुहास पाटील Tue, 12/09/2014 - 15:57 नवीन
जर गृह कर्ज ग्यावे तर नेहमी स्टेट बॅंकेचेच घ्या. कारण दोन फायदे आहेत. एके तर स्टेट बँक नेहमी सगळे कागद पत्र पडताळून लोन देते. बिल्डर कडून फसगत होणायचे च्नाचेस ९९% नाहीत. दुसरा फायदा असा कि max gain लोन account असेल तर एकदम मस्त. लोन प्रीपेड करून टोटल व्याज कमी करता येते आणि हवे तेव्हा पैसे लागले तर काढून घेता येतात. जितके दिवस जास्तीचे पैसे राहिले तितक्या दिवसांचे व्याज कमी होते. इथे पूर्ण लोन कालावधीचा विचार केला तर खूप व्याज वाचवता येते
  • Log in or register to post comments
स
सुहास पाटील Tue, 12/09/2014 - 15:59 नवीन
माहित आहे सुरवातीला सत्ते बँक थोडा त्रास देते पण बिल्डर ला आपण सुधा थोडे ताटकळत ठेवायला शिकले पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास पाटील
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 16:17 नवीन
नाहीतर मी तिथून शैक्षणिक कर्ज घेतले होते. असा अनुभव आला होता, की पुन्हा यांच्या दारात जाऊच नये, असे वाटले होते. पण तो मॅनेजरच खडूस होता. त्याने मला हीरो पेन (२५ रूचे) कशाला हवे, साधे ८ रू चेच सँक्शन करता येईल, असे म्हणून कोटेशन आणायला लावले होते. आत्ता त्या नादाला लागलो ते मॅक्सगेनसाठीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास पाटील
प
प्यारे१ Tue, 12/09/2014 - 16:46 नवीन
तुम्हाला लोकांचं 'जेन्युईन' मत हवं आहे असं वाटत नाहीये. तुमच्या मताशी सहमत नसलेल्या मतांना तुम्ही एकतर अव्यावहारिक म्हणत आहात अथवा पटत नाही असं म्हणत आहात. (लॉजिक पटतंय पण बँकेच्या बाजूनं लावलंय किंवा घर भाड्याचे उदाहरण पटले नाही. वगैरे) तुम्हाला विनंती की तुम्ही सुद्धा दुसर्‍या बाजूने विचार करावा. बँक व्यवसाय करायला बसली आहे. इएमआय च्या ८०% च्या वर रक्कम आपण किमान ३-४ वर्षे व्याज म्हणून भरतो. त्यात आणखी वरच्या १५ दिवसांची भर घाला. १० वर्षांनी ही रक्कम फार काही वाटणार नाही. (घराच्या किंमतीच्या तुलनेत. व्यावहारिक आणि भावनिक किंमत) ;)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 19:32 नवीन
त्यातली काही: - बँक धंदा करायला बसली आहे. ते आपला फायदा व्हावा असेच नियम बनविणार. आपल्या हिताची जबाबदारी आपली आहे. - जरी कोणी कितीही ओळखीचे असले, सहकार्य करतायत असे वाटले, तरी सही करण्यापूर्वी कागद पूर्ण वाचून, समजून घेऊन सही करावी. भीड नको. घाई नको. जसे की क्लिंटन यांनी सांगितलेला क्लॉज असू शकतो, हे लक्षातच आले नव्हते. - सिबिल संबंधी नविन माहिती मिळाली व महत्त्व समजले. - व्याजापेक्षा चेक परत जाण्याची बाब गंभीर आहे हे सजमजले. आणि सर्वांच्या माहिती साठी आजच बँकेने माझे चेक रिटर्न चार्जेस परत खात्यावर जमा केल्याचे दिसून आले. म्हणजे ते न्याय्य व माझ्या चुकीमुळे झाले नव्हते, हे सिद्धाच झाले. तुमचा शेवटचा मुद्दा - व्याजाची रक्कम नगण्य आहे. १८५००, तुमच्यासाठी नगण्य असले तरी माझ्यासाठी नाहीत, हे नम्रपणाने नोंदवतो. देय व न्याय्य असलेले व्याज देण्यात मला काहीच हरकत नव्हती. पण निदान ते तसे आहेत का हे समजून घेत आहे. एक तर नक्की की इथे अनेक सदस्यांनी आपल्या बाबतीतही तसे झाल्याचे सांगितले. काहींनी 'सोडून' दिले, कारण पटकन लोन झाले होते, आठच दिवसांचे व्याज होते, असे म्हटले आहे. माझ्यासाठी लर्निंगः हे एवढे सरळ नाही, जरा हुशारीने हे किमान टाळता तरी आले असते, असे आहे. त्यासाठी अनेक सदस्यांनी अनेक मुद्दे उलगडून सांगितले, त्यांचे मनापासून आभार. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 12/10/2014 - 09:43 नवीन
रक्कम नगण्य आहे असं म्हटलेलं नाही, मनस्ताप कमी करण्यासाठी आवश्यक उपायांपैकी एक उपाय असं त्या सूचनेचं स्वरुप आहे. बाकी पैसे परत मिळण्यासाठी आपली बाजू १००% बरोबर असणं आवश्यक असतं. (बँकेला करारादिवशीचाच डीडी काढायला लावणं अथवा तशा सूचना देणं वगैरे.) >>> निदान ते तसे आहेत का हे समजून घेत आहे. आपल्याकडं बहुतेकदा करार होण्या आधी काही अनाकलनीय कारणानं गोपनीयता बाळगली जाते नंतर अरे मी फसवला गेलो वगैरे घोषे सुरु होतात. हाच धागा कराराआधी जास्त उपयुक्त ठरला असता. कधी कधी आपली बाजू योग्य असूनदेखील पैसे मिळत नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे. अशा वेळी मनस्ताप कमी करण्यासाठी वरील सूचनेचा वापर उपयोगी आणि व्यावहारीक ठरतो. >>> हे एवढे सरळ नाही, जरा हुशारीने हे किमान टाळता तरी आले असते, असे आहे. हे बरोबर आहे. तरी ही प्रयत्न करत असाल तर पैसे मिळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
म
मोदक Wed, 12/10/2014 - 09:53 नवीन
प्यारे काका... बहुदा त्यांना असा काही मुद्दा असेल असे माहिती नसल्याने व्याज गेल्याचा त्रास झाला असावा.. मला माहिती होते मी अमुक अमुक इतके पैसे ८ दिवसांच्या व्याजरूपात भरणार आहे त्यामुळे मी त्या व्याजाचा बेशर्त स्वीकार केला होता. तुमचा नक्की विरोध / आक्षेप कशाला आहे ते मला कळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 12/10/2014 - 10:01 नवीन
वास्तवाला सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता जाणवली नाही म्हणून सांगितलं. आक्षेप अथवा विरोध नाही. 'मला वाटतं' अथवा 'माझ्या मते' ह्याबरोबरच 'मला माहिती नव्हतं' ह्या गोष्टींना बाजारामध्ये काडीची किंमत नसते हे वास्तव आहे. इ.ए. अथवा पैसानं दिलेल्या उदाहरणांमधून ते बँकेच्या बाजूनं वाटतंय, हे पैसे काही चलनी नोटा नाहीत मग का व्याज लावतात वगैरे गोष्टी त्यांनी लिहील्या आहेत त्यावरुन मला तसं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 12/10/2014 - 10:07 नवीन
ओके. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
स्वधर्म Wed, 12/10/2014 - 13:19 नवीन
>> मला माहिती होते मी अमुक अमुक इतके पैसे ८ दिवसांच्या व्याजरूपात भरणार आहे त्यामुळे मी त्या व्याजाचा बेशर्त स्वीकार केला होता. मी ऑनलाइअन लोन अकाउंट व त्यावर बुक बॅलन्स ( क्लिअर डेबिट नव्हे) दिसू लागल्यावर बँकेत फोन करून व्याज कधी सुरू होणार विचारले होते. मला उत्तर मिळाले डिसबर्समेंट झाल्यावर. >> तुमचा नक्की विरोध / आक्षेप कशाला आहे ते मला कळाले नाही. मलाही नव्ह्ते कळले. खाली प्यारे काका यांनी वास्तवाचा स्विकार करण्याची मानसिकता दिसत नाही, असेही लिहिले आहे. त्यांना विनंती की माझा मूळ प्रतिसाद पहावा. व्याज लावले हे बरोबर आहे का, असा प्रश्न पडला आहे, व म्हणून धागा काढत आहे असे लिहिले आहे. त्यावर पैसाताई व अनेकांनी लॉजिक दिले. काही पटले, काही तितके नाही. यात मानसिकता वगैरेचा काय संबंध, हेही कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
H
hitesh Sat, 12/13/2014 - 07:58 नवीन
समजा ब्यान्केकडे वीस हजार रुपये आहेत. तुम्हई ब्यान्केकडे दहा हजाराचे कर्ज मागितले. ब्यान्केने तुम्हाला ड्राफ्ट किंवा चेक दिला. ज्या दिवशी तुम्हाला ड्राफ्ट / चेक दिला त्याच दिवशी तुम्हाला ती रक्कम अलोकेट झाली. आता दुसरा कस्टमर समजा वीस हजाराचे कर्ज मागायला आला. तरत्याला ब्यान्क दहाच हजार देणार . कारण ब्यान्केकडच्या पैशामधील दहा हजार तुम्हाला अलोकेट झाले आहेत. त्यामुळे तुम्ही चेक ड्राफ्ट किती का तारखेला वठवा , ब्यान्केच्या दृष्टीने ज्या दिवशी तुमचा चेक ड्राफ्ट तुम्हाला दिला तेंव्हाच ते पैसे तुम्हाला दिले कारण ब्यान्क आता ते पैसे दुसर्‍याला वापरु शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
म
मुक्त विहारि Tue, 12/09/2014 - 21:04 नवीन
तितकेच माहितीपुर्ण प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 12/11/2014 - 07:50 नवीन
हो ना ! तिसर्‍या म्हमईत जायला हे ज्ञान कदाचित उपेगी पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा