Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुकानदाराकडून अपमान..

य
योगी९००
Tue, 12/09/2014 - 08:12
🗣 313 प्रतिसाद
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले.. प्रसंग एक : हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले. खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही. प्रसंग दोन: वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला). वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय? तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल. यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया द्या
101930 वाचन

💬 प्रतिसाद (313)
व
विजुभाऊ Tue, 12/09/2014 - 13:48 नवीन
जी जुनी दुकाने आहेत्,गुजराती,मारवाड्यांची, त्यांच्या आधीच्या पिढीने बरेच कमवून ठेवलेय त्यामुळे त्यांची नविन पिढी ग्राहकांना जुमानत नाही. बरोबर आहे तुमचे माईसाहेब. मराठी लोकांची जी नवी ग्राहकांची पिढी आहे त्याना खरेदीची सवय राहिली नाही असे म्हणायला लागेल. ( हे वाक्य खवचटपणे म्हंटलेले आहे) माईसाहेब काका तुमच्या मते सर्व दुकानदार गुजराथी आणि मारवाडीच असतात. मराठी लोक दुकानदार नसतातच.दादरचे आठवले शहाडे / गिरगाव पंचे डेपो / पार्ल्याचे प्रभुकृपा /विजय सेल्स / पु ना गाडगीळ / पुणतांबेकर वगैरे बहुतेक गुजराथी मारवाडीच असावेत ( पूर्वजन्मीचे) उगाच्च एखाद्या समाजाला नावे ठेवताना आपण मराठी लोकांच्या नॉनइंटरप्रेन्यर शिप बदल कॉमेम्ट करत असतो हे लक्ष्यात घ्या. तुमच्या सारख्या उतार वयातील वयोवृद्ध बाई आणि माणसाला हे सांगावे लागावे हे मनाला पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बॅटमॅन Tue, 12/09/2014 - 14:47 नवीन
तुमच्या सारख्या उतार वयातील वयोवृद्ध बाई आणि माणसाला हे सांगावे लागावे हे मनाला पटत नाही.
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 12/10/2014 - 05:56 नवीन
माईसाहेब तुमच्या मते सर्व दुकानदार गुजराथी आणि मारवाडीच असतात
ऑ? असे कुठे म्हंटले? पण मुंबईत काय वा ईतर शहरांमध्ये काय, बहुतांशी दुकानदार गुजराती-मारवाडी आहेत, हे मान्य आहे की नाहि? जे मराठि दुकानदार म्हणतो आहेस ते पूर्विपासूनच तसे आहेत्.म्हणजे 'मराठी बाण्याचे'. पण हा मराठी बाणा (माल घ्यायचा तर घ्या नाहीतर चालू पडा) गेल्या काहीवर्षात गुजराती दुकानदारांमध्येही दिसू लागला आहे.आधी ते तसे नव्हते.हे मान्य नसेल तर प्रश्नच मिटला.समाजाला नाव ठेवत नाही आहे कोणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/09/2014 - 10:30 नवीन
च्यायला, काही हुकलेले लोक असे दुकानदार झालेले असतात म्हणजे यांच्या डोक्यातच काही तरी प्रॉब्लेम असतो. म्हणजे कटकटी वगैरे असं काही किंवा सकाळपासून ग्राहकच आले नाहीत, आले असतील तरी ते टाईमपास वाले आणि मग एखादा ग्राहक हातातून सुटतोय असं लक्षात आलं की अशा भडक माथ्याचे दुकानदार काहीही बोलू शकतात. पण, असं कोणी बोललं की त्याला ''तुझ्या दुकानात कपड्यावर काही सोनं फ्री मिळतं म्हणुन आलो नव्हतो'' किंवा ''इथे कपडे नीट मिळणार नव्हतेच असं मित्र म्हणत होतेच ते खरं आहे '' ''असा अनुभव येणारच'' असं काही तरी त्याच्या तोंडावर फेकूनच घरी जावं. फुकट दुकानदाराचं ओझं घरी घेऊन जाऊ नये. उलट त्याच्या समोरुन जेवढं हसत खिदळत जाता येईल तेवढं जावं. पन्नास पन्नास रुपयाचे दोन आईसक्रीम घेऊन खात खात त्याच्याकडे पाहात जावं. सालं त्याला त्याच्या बोलण्याचा त्रास झाला पाहिजे आणि आपण बदला घेतलाच पाहिजे याचा आपल्याला आनंद. बायको सोबत असल्यावर आपण जे नरमाईचं धोरण घेतो ते अजिबात घेऊ नये. होऊ दे आपला कितीही अपमान पण दुकानदाराचा अपमान केल्याशिवाय जायचंच नाही. (हानामारीवर यायचं नाही) बायको घरी येऊन बोलली पाहिजे, काय कमाल हो तुमची इतकं कशाला बोलायचं त्याला... ( इथे आपण जिंकलेलो असतो) द्याट्स ऑल युवर ऑनर. -दिलीप बिरुटे (हिशेब चुकते करायचा नाद असलेला)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/09/2014 - 14:59 नवीन
भारीच हां प्राडॉ! मी आता असंच करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
V
vikramaditya Tue, 12/09/2014 - 15:55 नवीन
पण ते ५० ५० रुपयाच्या आईसक्रीम चे काही कळले नाही. आपण खर्च पण करु शकतो हे दुकानदाराला दाखवायला का? कारण मुंबईत शे-दोनशे रुपयाचे आईसक्रीम कोणाच्या खिजगिणतीत पण नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/10/2014 - 15:30 नवीन
मुंबैत आईसक्रीम महाग असतं तर.... ;) आमच्याकडे नसतं बॉ. आईसक्रीम किती महाग स्वस्त हा प्रश्न नै, पण तुमच्या बोलण्याचा आमच्यावर काहीच परिणाम झालेला नाही, आम्ही निर्लज्जासारखे इथे उंडारत आहोत हे दाखविण्यासाठी आईसक्रीम असं म्हटलं आहे.. आईसक्रीम घ्यायचं नसल्यास नवरा बायकोंनी त्याच्या दुकानाच्या बाहेर गाण्याच्या भेंड्या खेळाव्यात...एकमेकांच्या हातावर मस्त टाळ्या द्याव्यात उगाच. असो. हेतु कल्ला की नाय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
V
vikramaditya Fri, 12/12/2014 - 05:20 नवीन
पण खरे तर त्या दुकानदाराच्या प्रतिस्पर्धी दुकानातुन मिळणारा माल विकत घेवुन प्रतिस्पर्धी दुकानाच्या ब्रँडेड पिशव्या घेवुन ह्याच्या दुकानासमोर फिरणे असेही करता येइल. शेजारच्या दुकानातुन घेतले म्हटल्यावर ह्याची मजबुत जळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सखी Fri, 12/12/2014 - 13:11 नवीन
ते दुकान पण एकाच मालकाच असलं तर? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
क
काळा पहाड Fri, 12/12/2014 - 13:32 नवीन
मग पोपट होईल. सरळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी
प
पिंपातला उंदीर Tue, 12/09/2014 - 10:57 नवीन
इथे दुकानदार (विशेषतः साड्या विक्रेते ) यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार कुणीतरी करावा . एक पुरुष च दुसऱ्या पुरूषाच दुख समजून घेणार नाही तर कोण ? निम्म्याहून अधिक दुकान खाली उतरवल्यावर ' तुमच्या दुकानांत काही variety च नाही ' अस म्हणून निघून जाणार गिऱ्हाईक बघितल्यावर मन शांती न ढलायला तो इसम संत महापुरुष असावा लागतो . त्यापेक्षा पुरुष गिऱ्हाईक बरे . १० मिनिटात समोर जे नग आहेत त्यातलं एक पसंद करून काहीही घासाघीस न करता बाहेर पडतात . हा जरा आपला 'devil 's advocate वाला मुद्दा बर का .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 12/09/2014 - 11:08 नवीन
दुकानदाराच्या समर्थकांनी दुकानदाराच्या बाजूने बोलावे, तर ग्राहकांनी ग्राहकांच्या बाजूने. कुणा एकाने सगळीकडून बोलायचा मक्ता का घ्यावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/09/2014 - 11:25 नवीन
काही हरकत नाही, आता आपल्याला कपडे आवड्ले नसती्ल. पुढच्या वेळी अजून नवीन आणतो तेव्हा नक्की पसंत पडेल असे म्हणनारे दुकानदार असतात. ग्राहकांना देव मानणारेही आहेतच ना. आता उगाच स्त्रीयांना कपडेच झटकन कधीच पसंत पडत नाहीत, त्यांना स्वत:ची एक आवडच नसते, इतरत्र खरेदी केलेल्या काठापदरांची, कुठेतरी पाहिलेल्या टॉपची आवड त्यांना खुणावत असते, स्त्रीयांच्या मनातला कपडा अजून या भुतलावर यायचा आहे, असे विषय काढून उगाच विषयांतर करु नका. मला स्त्रीयांच्या खरेदीवर कमेंट्स करायला अज्जिबात आवडत नाही. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
म
माहितगार Tue, 12/09/2014 - 11:41 नवीन
इथे दुकानदार (विशेषतः साड्या विक्रेते ) यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार कुणीतरी करावा
मी वर अधिक समावेशक प्रतिसाद देण्याचा प्रयास केला आहे. खाली बिरुटे सरांनी चांगली प्रतिक्रीया नोंदवली आहे. दुकानदारांच्या अडचणींचा सहानुभूती पुर्वक विचार करणे वेगळे आणि दुरवर्तनाचे समर्थन करणे वेगळे. ग्राहक चुकला ग्राहकाने हजार कॉमेंट पास केल्या तरी दुकानदाराने संत नव्हे दुकानदार म्हणून तोल ढळू द्यावयाचा नसतो त्याच्या तोल ढळण्याचे व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय समर्थन होऊ शकेल का या बाबत मी साशंक आहे. दुसरे जिथ पर्यंत स्त्रीयांच्या चोखंदळपणा, आवडी निवडी आणि भारतीय संस्कृतीशी परिचय असूनच बहुधा संबंधीत दुकानदार व्यवसायात येत असावेत आणि ग्राहकाच्या आवडी निवडींशी जुळवून घेण्याची पहिली आणि शेवटची जबाबदारी व्यावसायिकाचीच, व्यावसायिकाशी जुळवून घेण्याची जबाबदारी ग्राहकाची नव्हेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
म
माहितगार Tue, 12/09/2014 - 11:59 नवीन
एक पुरुष च दुसऱ्या पुरूषाच दुख समजून घेणार नाही तर कोण ?
* या वाक्यातून स्त्रीयांच्या पोषाखाच्या व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी सूचीत होते ) असो
...हा जरा आपला 'devil 's advocate वाला मुद्दा बर का
डेव्हील्स अ‍ॅड्वोकेट कसलं आल, दुकानदाराची ग्राहकानुवर्ती स्ट्रॅटेजीत कमतरता असण्याची समस्या दिसते. बरेच हुशार कापड व्यावसायिक गिर्‍हाईकाची द्विधामनस्थिती टाळून लवकर डिसीजन व्हावे म्हणून आजकाल पोस्टर नुसार कपडे उपलब्ध करताना दिसतात, दुसरा एक मार्ग एका वेळी एका पॅटर्नमध्ये दोनच रंग उपलब्ध असल्याचे सांगतात, त्यात अजून जे हुशार असतात ते दोन लेव्हलला प्रशिक्षीत माणसे ठेवतात गिर्‍हाईक आवडले नाही म्हणताच अजून काही पॅटर्न काढून दाखवणे हा प्रकार केला जातो. आणि तरी गिर्‍हाईक दुकाना बाहेर जाऊ लागल्यास गोडाऊन मधून मागवून देतो अशी लोणकढी मारून दुसर्‍या दुकानातून हवी ती वस्तु मागवून गिर्‍हाईकांना प्रसन्न ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे दुकानदारही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
य
योगी९०० गुरुवार, 12/18/2014 - 06:27 नवीन
बरेच हुशार कापड व्यावसायिक गिर्‍हाईकाची द्विधामनस्थिती टाळून लवकर डिसीजन व्हावे म्हणून आजकाल पोस्टर नुसार कपडे उपलब्ध करताना दिसतात, दुसरा एक मार्ग एका वेळी एका पॅटर्नमध्ये दोनच रंग उपलब्ध असल्याचे सांगतात, त्यात अजून जे हुशार असतात ते दोन लेव्हलला प्रशिक्षीत माणसे ठेवतात गिर्‍हाईक आवडले नाही म्हणताच अजून काही पॅटर्न काढून दाखवणे हा प्रकार केला जातो. आणि तरी गिर्‍हाईक दुकाना बाहेर जाऊ लागल्यास गोडाऊन मधून मागवून देतो अशी लोणकढी मारून दुसर्‍या दुकानातून हवी ती वस्तु मागवून गिर्‍हाईकांना प्रसन्न ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे दुकानदारही असतात. हे एकदम पटलं..नुकतेच एका दुकानात गेलो असता असाच अनुभव आला. दुकानातला माणूस एकदम प्रोफेशनल होता आणि त्याने हिला एखादा पॅटर्न जरा आवडत नाही असे दिसल्या दिसल्या नवीन पॅटर्न काढायचा. तसेच एखादा पॅटर्न थोडाफार जरी आवडला तर त्याच पॅटर्न मधले वेगवेगळ्या रंगाचे कपडे दाखवायचा. आम्ही येथून खरेदी करूनच बाहेर पडलो. (आता तुम्ही म्ह्णालं सारखे सारखे काय खरेदीला जाताय.. लग्नसराई आहे त्यामुळे कपडे खरेदी करावे लागले. आमच्यासाठी मात्र दोन वर्षापुर्वीचा झब्बा तयार होता. कारण तो झब्बा अजूनही तितकाच फ्रेश वाटत होता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/09/2014 - 12:17 नवीन
एक महत्वाचा सल्ला देतो योगी , पटला तर घ्या नाहीतर सोडुन द्या :
मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?".
आयुष्यात कधीही कधीही परक्यासमोर घरच्या माणसावर अन त्यातही विशेषतः पत्नीवर कधीही ओरडु नका . That's how the weak men behave , strong men always stand for their family . मी तर कित्येकदा आपल्याच माणसाची चुक आहे हे खणखणीत स्पष्ट दिसत असुनही फॅमीलीची बाजु घेवुन कचकचीत भांडलो आहे ... ऑल्वेज रिमेमंबर : फॅमिली फर्स्ट :)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 12/09/2014 - 12:24 नवीन
तुमचा सल्ला एकदम पटेश... कदाचित दुकानदारांना हेच हवे असावे की नवर्‍याला हुसकवावे की त्याने मग बायकोला काहीतरी खरेदी करण्यास भाग पाडावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ह
हाडक्या Tue, 12/09/2014 - 16:42 नवीन
नवर्‍याला हुसकवावे
एक दुरुस्ती, उकसवावे असे तुम्हास म्हणावयाचे असावे असे दिसते, नवर्‍यास हुसकावून बिले कोण भरणार मग ?? (हुसकावणे : हाकलणे, उकसवणे (हिंदी शब्द): डिवचणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
योगी९०० Wed, 12/10/2014 - 06:19 नवीन
उकसवावे हे बरोबर. मला हेच म्हणायचे होते. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
सुबोध खरे Tue, 12/09/2014 - 18:39 नवीन
प्रगो साहेब हजार हिस्श्यानि पटेल अशी गोष्ट दुकानदाराने कधीही आमच्या कुटुंबाला उलट बोलण्याची हिम्मत दाखवली असता त्यांचे दात सव्याज त्यांच्या घशात घातलेले आहे भांडण करून वर माल विकत न घेत बाहेर पडलो आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड वरील एका प्रथितयश तीन मजली दुकानात एक साडी विचारली असता एका दीड शहाण्या नोकराने उद्धट शब्दात तुमच्या बजेटच्या बाहेर आहे म्हणून सांगितले. मी त्याच्या म्यानेजरला बोलावून त्याची कडक शब्दात हजेरी घेतली वर अगोदर पसंत केलेल्या पाच साड्या सुद्धा तेथेच ठेवून बाहेर निघालो. माझ्या मेहुण्याचे लग्न असल्याने बरीच खरेदी करायची होती. हे पाहून त्या दुकानाचा मालक येउन विचारू लागला काय झाले म्हणून. मी हकीकत सांगितल्यावर तो मला समजावू लागला कि साहेब गावाकडचे लोक असे बोलल्यावर आमच्यकडे पण पैसे आहेत हे दाखवण्यासाठी दुप्पट खरेदी करतात. त्यावर मी त्याला कडक शब्दात ( खास लष्करी आवाज काढून) सुनावले कि ग्राहकाचा उपमर्द करण्याची तुमची पद्धत अत्यंत टाकाऊ आहे आणी माझे बजेट कितीही होते आणी मला पूर्ण लग्नाची खरेदी करायची होती. पण आता मी तुमच्याकडे एकही साडी घेणार नाही. आमची बायकोच काय पण सासू सासरे सुद्धा एक शब्द न बोलता दुकानाच्या पायर्या उतरले. मग आम्ही कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका दुकानात तशाच साड्या साधारण २५ टक्के स्वस्त घेतल्या. ( तेंव्हा कुमठेकर रस्ता आता सारखा "मोठा" झालेला नव्हता). हे पाहून सासू आणी सासरे यांचा माझ्या व्यवहार ज्ञानावर विश्वास निर्माण झाला. कोणत्याही दुकानात दुकानदाराने उद्धटपणाने वागलेले मला सहन होत नाही. पैसे आम्ही मोजायचे आणी शहाणपणा त्याने करायचा हे मला सहनच होत नाही. हेच धोरण मी दवाखान्यात ठेवतो. जो रुग्ण आपल्याला पैसे देतो त्याच्याशी उद्धटपणे मी कधीच वागत नाही किंवा माझे सहाय्यक तसे करणार नाहीत हे मी कटाक्षाने पाळतो. जी गोष्ट शक्य नाही ती नम्रपणे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अभिजित - १ Wed, 12/10/2014 - 17:46 नवीन
१/२ वर्षापूर्वी लेख वाचला होता. मोठ्या दुकानात सेल्समन चे फंडे. अमेरिकेतील .. अगदी हाच. ग्राहकाचा अपमान करून त्याला प्रवूत करणे खरेदीला. उंची सेंट, घड्याळे , पर्सेस च्या विक्रीत .. आणि हा जोरदार चालतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
काळा पहाड Wed, 12/10/2014 - 19:50 नवीन
नाव सांगा ना, आम्ही ही नाही जाणार नाही तिकडं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सस्नेह Tue, 12/09/2014 - 12:20 नवीन
योगीजी, तुम्ही पहिले आपले मोराल आणि करेज वाढवा. यासाठी एक किलो पुणेकर, अर्धा किलो कोल्हापूरकर आणि छटाक सातारकर यांचा काढा उकळवून दोन कपाचा एक कप करावा व रोज सकाळी घ्यावा . Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/09/2014 - 12:23 नवीन
छटाक सातारकर
=)) हो सातारकर छटाकभरच ... जास्त झाले साइड इफ्फेक्ट होवु शकतात ... :D अवांतर : आमच्या महाराजांचा विडीयो पाहिला की नाई ? " हतबल जरी असलो तरी आमच्या मुसक्या बांधायची हिंमत आज नाय उद्यानाय अन भविष्यातही कुणाची होणार नाय ..... कॅमेरा आहे म्हणुन सांगतोय ... परत 'सांगितलं नाही' म्हणायचं नाही "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्यारे१ Tue, 12/09/2014 - 12:27 नवीन
तेवढे पुरेसे असतात. +१११ - आम्हीपण सातारकर. काय विजुभौ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विजुभाऊ Tue, 12/09/2014 - 14:07 नवीन
बर्रोब्बर प्यारे. सातारकर चिमुटभर सुद्धा भारी पडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
आ
आनन्दिता Tue, 12/09/2014 - 21:17 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चिगो Mon, 12/15/2014 - 07:29 नवीन
लिंक द्या प्रगो, लिंक.. (सातारा सासुरवाडी असलेला) चिगो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा Mon, 12/15/2014 - 07:34 नवीन
मलापण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
प
प्रसाद गोडबोले Mon, 12/15/2014 - 12:05 नवीन
ऑफीसात यु ट्युब बॅन असल्याने लिन्क देता येत नाहीये . "Zee24Taas: Satara Udyenraje Bhosale Filmy Style - YouTube" गुगल करा लगेच सापडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
शिद Mon, 12/15/2014 - 12:12 नवीन
हा हा हा...भारीच स्टाईल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ख
खटपट्या Mon, 12/15/2014 - 19:19 नवीन
अजुन चित्रतटात का नाही गेले हे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/16/2014 - 04:58 नवीन
क्या स्टाईल है बावा...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ट
टवाळ कार्टा Tue, 12/16/2014 - 07:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ख
खटपट्या Tue, 12/16/2014 - 08:25 नवीन
घरी असून गणेशा झालाय,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/16/2014 - 11:04 नवीन
"The server at howudekharch.com can't be found, because the DNS lookup failed." असा मेसेज येतोय. दुसर्‍या संस्थळावरून (शक्य असल्यास गुगलफोटो) फोटो डकवायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Tue, 12/16/2014 - 12:12 नवीन
त्यापेक्षा प्रतिसाद उडवा ... तो फोटो "आली लहर...केला कहर" टाईपचा होता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Tue, 12/16/2014 - 07:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
य
योगी९०० Wed, 12/17/2014 - 05:17 नवीन
बापरे... एवढेच म्हणेन मी...!! सातारा म्ह्णजे युपी/बिहारपेक्षाही खतरनाक area असावा असे वाटायला लागलयं...!! गंमत(?) म्हणजे माझा एक मित्र, ज्याने लोकसभेच्या निवडणूकी दरम्यान भाजपाचे समर्थन केले आणि भाजपा जिंकला म्हणून आनंदाने नाचत होता, तो नाचता नाचता असेही म्हणाला की दिंडोरीचा "हरिश्चंद्र चव्हाण" आणि सातार्‍याचे "उदयनराजे भोसले" यांच्या विजयाने मी खूपच जास्त खुष आहे कारण ते दोघेही माझ्याच जातीचे आहेत. या दोघांच्या कामाविषयी मी विचारले असता त्याला एकही गोष्ट सांगता आली नाही. मला (नेहमीप्रमाणे) त्याच्या या वाक्यावर काय बोलावे ते कळले नाही. अर्थात अशी प्रजा असेल तर काय कोणीही राजे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
अ
अमित मुंबईचा Wed, 12/17/2014 - 06:28 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
स
सस्नेह Tue, 12/16/2014 - 07:41 नवीन
खल्लास व्हिडो ! *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ह
हाडक्या Tue, 12/16/2014 - 12:37 नवीन
काही दिवसांपूर्वी एक "raudransh_27" ह्या आयडीने या परमपूज्य अशा महाराजांबद्दल काही लोक अनादराने बोलले म्हणून हा खालील लेख टाकला होता. http://misalpav.com/node/27899 आता साहेब हा विडो पाहून काय विचार करत असतील असा विचार करत होतो. ;) (अवांतर : यांच्याशी संबधित बर्‍याच चेपु पानांवर हा व्हिडो फिरत होता आणि दुर्दैवाने सांगायचे तर बर्‍याच टाळक्यांना ह्यात महाराजांची "ऐट", "शान" आणि "राजे-पण" दिसत होते आणि खरोखर अभिमान वाटत होता.. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बॅटमॅन Tue, 12/16/2014 - 14:28 नवीन
जसे भक्त तसा देव हो. चालायचंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
इ
इरसाल Wed, 12/17/2014 - 05:43 नवीन
त्या मनुक्षात राजा असलेले एकही लक्षण दिसत नाही. म्हणजे जसे तेजपुंज चेहरा, एकप्रकारची आब, रुबाब........ह्यो तर तारवटलेला दिसतोय.८० च्या दशकात नायक खलनायक जसे हातवारे करायचे तसला परकार दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी Wed, 12/17/2014 - 05:50 नवीन
या सायबाचा आणखीन एक विडीयो आहे...मिशी काय भुवई उडवुन देईन टाईप. सापड्ल्यास देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ट
टवाळ कार्टा Wed, 12/17/2014 - 06:00 नवीन
राजांचं राजेपण किती ठेवावे याची अक्कल आपल्यालाच नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 07:42 नवीन
हे तुमच्यासाठी ओ. कैक लोकांना आहेत तीच राजलक्षणे वाटतात त्याला काय करणार, नैका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ह
हाडक्या गुरुवार, 12/18/2014 - 17:28 नवीन
तुमी विडिओ पाह्यलाय (बरेच विडिओ पण आहेत तसे), आमी याला सातार्‍यात प्रत्यक्ष अनेकदा असे चाळे करताना पाहिलाय. दुर्दैव हे की हा शिवाजी राजांचे नाव वापरतो आणि याच्या आजूबाजूला बरेच लोक असे आहेत की ते याच्या नावाखाली स्वत:चे उखळ पांढरे करीत बसतात आणि गाडा सुरु राहतो. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच म्हणायची की सातारच्या बहुतेक शिकल्या सवरल्या लोकांच्यात याच्यामुळे तेवढी व्यक्तीपूजा भिनली नसावी अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/19/2014 - 08:17 नवीन
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच म्हणायची की सातारच्या बहुतेक शिकल्या सवरल्या लोकांच्यात याच्यामुळे तेवढी व्यक्तीपूजा भिनली नसावी अशी आशा आहे.
हे आपलं लिहिण्यापुरतं. तसे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा