Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चारोळ्या

प — प्रमोद देर्देकर, Wed, 12/10/2014 - 11:25
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता. बाटली रिकामी ग्लास घरंगळलेला, टेबलावरचा थेंब केव्हाचाच सुकलेला. ढग विखुरलेले पाऊस थांबलेला, कुंदाळ हवेत मी गारठलेला. काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.

प्रतिक्रिया द्या
10599 वाचन

💬 प्रतिसाद (54)
प
प्रचेतस Wed, 12/10/2014 - 12:01 नवीन
चारोळ्या छान. पण ह्याला हायकू म्हणता येणार नाही. ते तीनच ओळींचं असतं म्हणे.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Wed, 12/10/2014 - 14:44 नवीन
काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं. असं चालेल का? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 12/10/2014 - 14:47 नवीन
चालायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
प
पिवळा डांबिस Wed, 12/10/2014 - 18:59 नवीन
टेक्निकली बरोबर आहे. पण शेवटची ओळ ही अगदी लहान आणि पंचलाईन असावी. उदा. "काडी काडी करून घरटं बांधलं, मेहनत तिची जाणून थांबला वाहता वारा." अस काहीसं, पटतं का बघा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ट
टवाळ कार्टा Wed, 12/10/2014 - 12:04 नवीन
एक एक करून त्याने जिल्ब्या पाडल्या आलेच नाही कोणी प्रतिसाद घेऊन जमलंय का? :)
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 12/10/2014 - 14:35 नवीन
एकेक करुन त्याने जिल्ब्या पाडल्या दणकून गेलेच नाही कोणी प्रतिसाद तिथे लिहून!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/10/2014 - 15:07 नवीन
प्रतिसादाच्या जिल्ब्या टाकल्याच पाहिजेत प्रत्येक धाग्यावर. म्हणुन मौन माझं. छ्या. जमलं नै वाटतं. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/10/2014 - 16:10 नवीन
आवडेश :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रमोद देर्देकर Wed, 12/10/2014 - 12:09 नवीन
होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे या चारोळ्याच जर जमलं तर या धाग्यातुन हायकु हा शब्दच काढुन टाका ना अगदी शिर्षकासकट आणि चारोळ्या ठेवा. @ ट. का. तु आलास की माझ्यासाठी प्रतिसादाला खीक :))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/10/2014 - 12:10 नवीन
ते मी अभिप्राय घ्यायला आलोय :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/10/2014 - 14:46 नवीन
धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 12/10/2014 - 15:45 नवीन
खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट!
yukk!! *bad*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Wed, 12/10/2014 - 15:59 नवीन
=)) बुवांच्याकडे किती तांबे (तांब्याचं अनेकवचन) आहेत? बाकी ते सुनिल शेट्टीचं गाणं हाय्हुकू हायहुक्कू हाय हाय चा नि हायकूचा काही संबंध आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खटपट्या Wed, 12/10/2014 - 18:29 नवीन
हान्गाशी !! याला म्हणतात दणकट चारोळी. यासाठीच आम्ही बुवांचा फॅन आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सतिश गावडे Wed, 12/10/2014 - 19:01 नवीन
आमचे एक दणकट मित्रसुद्धा बुवांच्या "अशा" चारोळ्यांचे फॅन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Wed, 12/10/2014 - 19:10 नवीन
अंदाज आला "दणकट मीत्राचा". चारोळी वाचली की हसुनहसून पोट "साफ" झालं पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस गुरुवार, 12/11/2014 - 04:33 नवीन
+१ ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही. येऊ द्यात बुवा अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 12/11/2014 - 04:58 नवीन
ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या.
मला तर त्यांच्या चारोळ्यांचा खूप गुण आलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 12/11/2014 - 05:30 नवीन
हो हो वल्लीशेट आताशा मला समजयल लागलंय तुम्हे जे वास्तववादी आणि प्रत्ययकारी वगैरे कायसं म्हणताय ते. काय तो निरागसपणा खाली वाकुन पहाण्यातला आणि काय तो वास्तववादीपणा/ प्रत्ययीपणा जिलबी नीट पडेल याचा आमचं गुर्जी लईच भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/10/2014 - 19:11 नवीन
धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट ! हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मुक्त विहारि Wed, 12/10/2014 - 19:25 नवीन
एक नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ख
खटपट्या Wed, 12/10/2014 - 19:48 नवीन
एकदम सुपडा साफ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सतिश गावडे Wed, 12/10/2014 - 20:03 नवीन
खतरनाक कन्व्हर्शन. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रचेतस गुरुवार, 12/11/2014 - 04:33 नवीन
अगागागागा =)) खल्लास की ओ एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्पंदना गुरुवार, 12/11/2014 - 01:42 नवीन
आरं कुट नेउन ठिवलाय ह्यो धागा? ऑ?
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/11/2014 - 02:44 नवीन
धागा परसदारी सापडेल अपर्णा ^_~ चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? =))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 12/11/2014 - 02:50 नवीन
किंवा साहित्यांगण ते परसदारही चालेल *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सस्नेह गुरुवार, 12/11/2014 - 02:54 नवीन
राॅकेल प्यालो डिझेल प्यालो तेव्हा नाही मेलो अर्धी बाटली दारू प्यालो चंद्रावर गेलो...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/11/2014 - 06:31 नवीन
खतरनाक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 12/11/2014 - 04:23 नवीन
अगागा अया अया धाग्याचं पार भरीत करुन टाकलंय की! हसुन हसुन वाट लागली. आणि काय वो गुर्जी काय हे असं शिष्याच्या धाग्याचं भरीत करतांव, मग बघा हं ते दक्षिणा म्हणुन.......हॅ.. हॅ.. .हॅ.. आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय! बरं आता ट.का ची चारोळी अशी होवु शकेल. "त्याने जिल्ब्या पाडल्या एकेक करुन कोणीच नाही आलं प्रतिसाद घेऊन"
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/11/2014 - 18:26 नवीन
@वल्ली ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही.>>> :-/ कळ्ळं..कळ्ळं..! :-/ दबा धरुन बसतो हत्ती दिसली तोफ की देतो बत्ती! अता मी या कविता लिवणार नै बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! Image removed. ================================ इस्पीकचा एक्का @हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? >> Image removed. ================================ अजया @चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? >> Image removed. ================================= @आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय!>>> Image removed. ह्या ह्या ह्या Image removed. ===================================== एक तांब्या वरती आला नि दर्दुकाकांचा धागा हाय ज्याक झाला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सतिश गावडे गुरुवार, 12/11/2014 - 18:45 नवीन
बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! बुवांच्या घरची उलटीच खुण बत्तीला तोफ ते नै देणार !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/11/2014 - 18:52 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस Fri, 12/12/2014 - 01:37 नवीन
असं नका करू ओ बुवा. आम्हा रसिकांवर हां घोर अन्याय आहे. मला तुमच्या ह्या कविता आणि चारोळ्य़ा खूप खूप आवडतात. तेव्हा न लिहिण्याचा निर्णय मागे घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/12/2014 - 02:50 नवीन
असोच्च असो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ख
खटपट्या Fri, 12/12/2014 - 04:06 नवीन
+१११ मी ही सॉरी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सतिश गावडे Fri, 12/12/2014 - 04:07 नवीन
हेच आणि असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
भ
भाते गुरुवार, 12/11/2014 - 15:38 नवीन
धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे. .…. अन लेख टंकाळलाया नवी लेखनिक पाहिजे आहे. अरे, बोलवा नवी… (जाऊदे, मिपाकर पुढचे समजुन घेतील!) :)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 12/12/2014 - 04:12 नवीन
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचं टमरेल रिकामंच दिसतंय तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल पोटात जेव्हा ह्ळूच आतल्या आत पीठ पडले बस्स इतकेच.. ---- परवा संडासाच्या भिंती चाचपडताना भिंतीवरच्या रेघोट्या हाताला जाणवल्या छन्न झालं एकदम पूर्वी कसे छान कुंथत होतो अता कुंथूनही न होईलसे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला भिंतीवरचे चित्र सापडले उघडेनागडे काढलेले लवकर करा नाहीतर चड्डीतच होईल असे त्याखाली लिहिलेले. बघता बघता कां कोण जाणे पोटच डचमळले पटकन बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने पोटात गुरगुर होते ग्यासेस वाढतात बस्स इतकेच.. मग मी हापिसच्या कमोडमध्ये जातो पण चाळीतल्या संडासाची सर आजही येत नाही बस्स इतकेच.. ---- हम्म.. पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. इतकेच...
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 12/12/2014 - 04:20 नवीन
कहर !!Image removed. गुरुपेक्षा शिष्य सवाई !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Fri, 12/12/2014 - 04:51 नवीन
प्रवास "ज्ञान" मिळेपर्यंत असाच चालू राहू दे. हा.मु.ओसाडवाडी खु: ता:मुरमाड जि:फलाणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/12/2014 - 05:51 नवीन
विडंबन आवडले, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Fri, 12/12/2014 - 05:54 नवीन
अय्यय्यो..... लैच हुच्च \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/12/2014 - 06:46 नवीन
अ चांगला नीट ज्ञात असताना... असे आपणच म्हणू शकता, हे आज उलगडले! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/12/2014 - 06:48 नवीन
नाव घ्यायला लाजू नका.. स. गा. :-D घ्या ना नाव!!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विटेकर Fri, 12/12/2014 - 06:53 नवीन
आचरट आणि शिवराळ प्रतिसादांची लांब माळ तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ... . . . . छ्या ... वाण नाही पण गुण लागलाच !
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 12/12/2014 - 07:28 नवीन
तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ...
हा अनुभव मी वर्ष घेतला आहे. मात्र तांब्याच्या ऐवजी टमरेल असायचं. पुढे कामानिमित्त गाव सोडले तरी विकांताला गावी जात असल्याने आठवडयातून दोन दिवस मोकळ्या माळरानावर मोकळे व्हायचा अनुभव घेत असे. पुढे दीड वर्ष हिरव्या नोटांच्या देशात काढून परत आल्यावर मात्र उघडयावर बसताना अवघडल्यासारखे वाटू लागले आणि लागलीच गावी शौचालय बांधले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मदनबाण Fri, 12/12/2014 - 09:56 नवीन
ख्या ख्या ख्या... :D

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
  • Log in or register to post comments
द
दिपक विठ्ठल ठुबे Fri, 12/19/2014 - 06:43 नवीन
चारोळी ची पार आरोळी करून टाकली...
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/19/2014 - 07:39 नवीन
अरे नसलेल्या देवा! पीत वाङ्मय ते हेच का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा