चारोळ्या
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता.
बाटली रिकामी
ग्लास घरंगळलेला,
टेबलावरचा थेंब
केव्हाचाच सुकलेला.
ढग विखुरलेले
पाऊस थांबलेला,
कुंदाळ हवेत
मी गारठलेला.
काडी काडी करुन
तिनं घरटं बांधलं,
वाराही वहायचा थांबला
त्यानेही ते जाणलं.
💬 प्रतिसाद
(54)
ब
बॅटमॅन
Fri, 12/19/2014 - 07:51
नवीन
इतिहासात अगोदर अश्मयुग, मग ताम्रपाषाणयुग, मग लोहयुग इ.इ. टप्पे सांगतात. पण मिपावरील 'तांब्या'युग काही संपायला तयार नाही. =))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/19/2014 - 08:01
नवीन
मानवाची वाटचाल कृषिप्रधान ग्रामिण संस्कृतीकडून उद्योगप्रधान नागरीसंस्कृतीकडे झाली तेव्हाच 'तांब्या'युग संपून '(डालडा-)टमरेल'युग सुरू झाले. पण 'तांब्या'युगातल्या विशाल आकाशाखालच्या हिरव्या झाडीतील मोकळ्या वातावरणात बहरलेल्या जिल्बीसंस्कृतीमुळे त्याचे गुणगान अजूनही पोटतिडिकेने केले जाते ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/19/2014 - 08:05
नवीन
=))
- Log in or register to post comments
ग
गौरी लेले
Fri, 12/19/2014 - 09:12
नवीन
सुरेख कविता प्रमोद :)
पुलेशु
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2