Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गृहकर्जाबद्दल माहिती आणि मदत

प
पीनी
गुरुवार, 12/11/2014 - 10:36
🗣 82 प्रतिसाद
नमस्कार, मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल. कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही. आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत. १. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे. २. एल. आय. सी. मधूनच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले. ३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील. सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का? धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
29213 वाचन

💬 प्रतिसाद (82)
आ
आयुर्हित गुरुवार, 12/11/2014 - 10:59 नवीन
व्यनी केला आहे.
  • Log in or register to post comments
प
पीनी गुरुवार, 12/11/2014 - 11:01 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/11/2014 - 11:57 नवीन
इथे लिहिता नाही येणार का?...मला आणि बाकीच्यांना सुध्धा उपगोय होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
य
यसवायजी गुरुवार, 12/11/2014 - 12:27 नवीन
मं कमिशान कोन देनार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आयुर्हित गुरुवार, 12/11/2014 - 12:59 नवीन
आपल्यासाठी: There is no free lunch in this world हे विसरू नका. आपण कमिशन चुकवले किंवा टाळले तरी तुम्हाला कोठल्यातरी स्वरुपात त्याची किंमत चुकवावी लागते कारण..... Newton's third law : Every action has got its own reaction आणि सल्लागारांसाठी : प्रत्येक कर्माचे फळ हे १००% निश्चित (१००% GURANTEED) मिळणार, त्याबद्दल काळजी करू नकोस, त्याने कर्म करण्यात व्यत्यय येईल व कर्म करणे राहून जाईल किंवा त्याची गुणवत्ता कमी होईल: भगवान श्रीकृष्ण कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। येथे वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी गुरुवार, 12/11/2014 - 13:09 नवीन
लैच लागलं की वो तुम्हाला. सॉरी हां. बाकी, There is no free lunch in this world विरुद्ध The Best Things in Life Are Free. असा धागा काढला तर प्रतिसाद मिळतील काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/11/2014 - 13:13 नवीन
खी: खी: खी: =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
आ
आयुर्हित गुरुवार, 12/11/2014 - 13:16 नवीन
लागायचं काय त्यात? आमचे basics अगदी पक्के आहे! पण काय आहे, बऱ्याच लोकांना हे हि माहित नसते त्यामुळे सांगावेच लागते! येवू द्या कि हा असा नाविन्यपूर्ण धागा! सर्वांना आरोग्यदृष्ट्या तर नक्की फायदाच होईल त्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी गुरुवार, 12/11/2014 - 13:36 नवीन
क्लिंटन यांचा योग्य प्रतिसाद वाचा. फ्री आहे. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ल
लंबूटांग गुरुवार, 12/11/2014 - 16:25 नवीन
आमचे basics अगदी पक्के आहे
आणि
Newton's third law : Every action has got its own reaction
?!?!?! तो लॉ असा आहे हो. To every action there is always opposed an equal reaction: or the mutual actions of two bodies upon each other are always equal, and directed to contrary parts. बाकी फायनान्स मधे आपल्याला फारसा विन्टरेस्ट नसल्याने चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
H
hitesh गुरुवार, 12/11/2014 - 13:17 नवीन
अगदी सहमत ! एजंटला पैसे घालुन मिळालेल्या नोकरीपेक्षा फुकट मिळालेल्या नोक्रीत जास्त सुख असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/11/2014 - 16:27 नवीन
काउने पण हेच केले. इकडे-तिकडे माहीती गोळा करत फिरण्यापेक्षा, आंतरजालावरच विचारायचे. आमच्या काउ कडून बरेच सल्ले मिळू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/11/2014 - 17:39 नवीन
पण मुदलात काउ ती आहे का तो? का जो अवतार आहे तोच ग्राह्य धरायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/11/2014 - 18:31 नवीन
हे नक्की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
H
hitesh Fri, 12/12/2014 - 09:54 नवीन
ज्ञान्स्श्वरानी उड उड रे काऊ असे म्हटले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 12/12/2014 - 23:07 नवीन
ज्ञानेश्र्वर पण लिहीता येत नाही.... असो, आमच्या काउला पण लिहीता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
य
यसवायजी Sat, 12/13/2014 - 02:53 नवीन
ज्ञानेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
H
hitesh Sat, 12/13/2014 - 04:58 नवीन
ज्ञानेश्वर. आता तुम्हीही शुद्ध लिहुन दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Sat, 12/13/2014 - 08:55 नवीन
काउचा गीतेवर विश्वास नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 12/14/2014 - 19:35 नवीन
नसतो एखाद्याचा, पण संतवचने मात्र तोंडपाठ. आणि अर्थाचा अनर्थ करायला ह्यांच्याकडूनच शिकायचे. काउ पण असेच काहीतरी बडबडत असते. असो, ह्या काउबद्दल एखादा लेख लिहायला हवा.कळपातली काउ म्हणून.आमची काउ डू.आय.डींच्या कुबड्यांशिवाय, एकटी जगूच शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
H
hitesh Fri, 12/12/2014 - 10:05 नवीन
इकडे आनि तिकडे या कार्यक्षेत्रात आंतर्जाल येत नै का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 12/11/2014 - 15:17 नवीन
ओह काका .. तुम्ही ही मधुमेहावर धागे काढता त्यावेळी तुम्हालाही अप्रत्यक्ष रीत्या फुकटच माहिती हवी असते नाही का ? उगाच डोक्याला शॉट लावतय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 12/11/2014 - 18:21 नवीन
अप्रत्यक्ष रीत्या फुकटच माहिती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 12/11/2014 - 18:50 नवीन
हे घ्या तुमच्याच धाग्यावर तुम्ही लिहिलेल आठवतय का ? आक्षेप फक्त फुकट शब्दावर आहे तिकडे तुम्ही सहज फुकट माहिती पूरवयला सान्गत होतात नाही का ?
ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी. याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 12/11/2014 - 12:32 नवीन
कोणताही सल्लागार पूर्ण माहिती हाती आल्याशिवाय सल्ला देवू शकत नाही! आणि वड्याचा मसाला वांग्याला चालत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 12:56 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
प
पैसा गुरुवार, 12/11/2014 - 13:15 नवीन
खाजगी वित्तसंस्था किंवा इतर संस्थांकडे जा असा सल्ला नाही ना दिलात? निदान काय सल्ला आहे त्याची झलक तरी सांगा, उद्या मिपावर मला असला सल्ला मिळाला म्हणून कोणी शिव्या देत यायला नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
स
सुहास पाटील गुरुवार, 12/11/2014 - 11:52 नवीन
गृह कर्ज किती फेडले आहे आणि किती बाकी आहे ह्यावर ठरवता येईल. तुम्ही आज पर्यंत किती इंटरेस्ट भरला आहे? बाकी स्टेट बँक + कसला इन्शुरन्स नीट कळेल का?
  • Log in or register to post comments
प
पीनी गुरुवार, 12/11/2014 - 12:13 नवीन
हा गृहाकर्जावरचा कंपल्सरी इन्शुरन्स असतो. कर्जाच्या रकमेप्रमाणे हा प्रपोर्शनल असतो. इंटरेस्ट रेट खूप जास्त असल्याने व डाउन पेमेंट करु न शकल्याने गृह कर्ज फार जास्त फेडले गेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास पाटील
स
सुहास पाटील गुरुवार, 12/11/2014 - 12:26 नवीन
तर मग स्टेट बँकेत टाकाच अर्ज. पुठे खूप फायदा अहे. लागुद्यात किती वेळ लागायचा ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीनी
स
सुहास पाटील गुरुवार, 12/11/2014 - 12:30 नवीन
तुम्हाला प्रॉपर्टि इंशुरंस म्हणायचं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीनी
प
पिलीयन रायडर गुरुवार, 12/11/2014 - 12:11 नवीन
हं.. उपयुक्त धागा.. जाणाकारांनी मदत करावी.. आम्हाला पण चार पैशे वाचवता येतील.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/11/2014 - 12:17 नवीन
एक्सेल शीट बनवावी. आतापर्यंत किती पैसे भरले, किती भरायचे आहेत वगैरे. त्यानंतर चालू स्थितीत भरावयाची रक्कम, क्रमांक १ नुसार बदल, क्रमांक २ नुसार बदल इ. प्रकार करावेत. शेवटला (म्हणजे हप्ते संपताना) कुठली रक्कम कमी वाटते ते पाहून निर्णय घ्यावा. (फक्त कमी रक्कम हाच मुद्दा असेल तर. अन्यथा नवीन बँकमध्ये काय पद्धतीनं काम होतं किती उशीर लागतो हे सुद्धा तपासून घ्यावं.)
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 12/11/2014 - 12:30 नवीन
असल्या गोष्टी अल्टर बिल्टर करु नयेत... पैसे भरत बसा आणि जे घर घेतले आहे त्यात सुखाने रहा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/11/2014 - 16:24 नवीन
काउ पण तिसर्‍या मुंबईत घर घेणार आहे म्हणे. आता ती काय करते ते बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Fri, 12/12/2014 - 09:57 नवीन
ती नै तो ... उड उड रे काऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
क्लिंटन गुरुवार, 12/11/2014 - 13:30 नवीन
मी एक एक्सेल शीट बनवून बघितली. त्यात कर्जाची रक्कम ५० लाख धरली आणि २५ वर्षांसाठीचे कर्ज असेल असे गृहित धरले. जर ११.२५% ने तुम्ही कर्ज घेतले असेल तर दर वर्षाला ई.एम.आय साठी सुमारे ६,०४,६०० रूपये भरावे लागतील. कर्ज जर १०.१०% ने मिळत असेल तर दर वर्षाला ई.एम.आय साठी सुमारे ५,५५,००० रूपये भरावे लागतील.म्हणजे ई.एम.आय साठी सुमारे ४९,६०० रूपये दर वर्षी वाचतील.म्हणजे दर महिन्याला ४ हजार पेक्षा जास्त रूपये वाचतील. तसेच १ लाख रूपये प्रोसेसिंग फी म्हणून भरावे लागतील.समजा हे एक लाख रूपये एकरकमी एफ.डी ला लावले तर ८% व्याज येईल असे समजू. या एफ.डी मधून २८ महिन्यांनंतर सुमारे १,२०,००० रूपये मिळतील. आज हे एक लाख रूपये एफ.डी मध्ये न टाकता प्रोसेसिंग फी म्हणून भरले आणि कर्ज स्टेट बँकेकडे शिफ्ट केले तर दर महिन्याला ४ हजार १२० रूपये वाचतील. अगदी शिस्तबध्द पध्दतीने वागले तर तांत्रिकदृष्ट्या या ४१२० रूपयांचे रिकरिंग करता येईल आणि त्यावर थोडे जास्त व्याज मिळेल.पण असे वाचलेले पैसे रिकरिंग मध्ये न जाता अधिक खर्चासाठी म्हणून बचत खात्यातच बहुतांश वेळा ठेवले जातात.त्यामुळे त्यावर ४% व्याज मिळेल असे धरले तर २८ महिन्यांनी १ लाख २० रूपये तुमच्याकडे साठतील. याचाच अर्थ तुम्ही दर महिन्याला जे ४१०० रूपये वाचविणार आहात (आणि त्यासाठी १ लाख रूपये प्रोसेसिंग चार्ज भरणार आहात) त्यासाठीचा ब्रेक इव्हन २८ महिने इतका असेल. एक्सेलमध्ये पी.एम.टी म्हणून एक फंक्शन असते त्यातून आपल्याला किती ई.एम.आय बसेल हे काढता येते. उदाहरणार्थ ५० लाखावर ११.२५% ने २५ वर्षांसाठीचे हप्ते काढायचे असतील तर =PMT(११.२५%, २५, ५००००००) असे एक्सेलमध्ये लिहिल्यास दर वर्षी ६,०४,५६७.२५ इतका हप्ता येईल हे समजेल. दर महिन्याचा ई.एम.आय काढायचा असेल तर व्याज ११.२५% भागिले १२ बरोबर दर महिन्याला ०.९३७५% तर मुदत २५ वर्षे म्हणजे ३०० महिने असे धरून =PMT(०.०९३७५%,३००,५००००००) असे एंटर केल्यास महिन्याचा हप्ता ४९,९११.९८ आहे हे कळेल. काही मुद्दे: १. महिन्याला ११.२५% व्याज त्या मानाने बरेच जास्त वाटत आहे. पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक १०.२५% ने कर्ज देतात.तसेच साधारणपणे फेब्रुवारीमध्ये व्याजाचे दर कमी झाले तर त्यापुढे २-३ वर्षे तरी दर त्यामानाने कमीच असतील अशी चिन्हे आहेत. गृहकर्जामध्ये पहिले २-३ वर्षे जास्त कठिण असतात.नंतर पगार वाढले की कर्जाच्या हप्त्यांचा बोजा तितका वाटत नाही.तेव्हा सध्याच्या परिस्थितीत पहिल्या २-३ वर्षांमध्ये फ्लोटिंग रेटवर कर्ज घेणे इष्ट असा विचार मी केला होता. २. बॅंका प्रोसेसिंग फी सांगताना अनेक गोष्टी सांगत नाहीत.म्हणजे प्रोसेसिंग फी २५,००० अशी सांगितली तरी CERSAI चार्जेस, घराचा विमा,लीगल सर्च, लीगल ऑडिट,दोन व्हॅल्युएशन रिपोर्टचे चार्जेस, इनकम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन चार्जेस इत्यादी अनेक गोष्टी असतात.या सगळ्या गोष्टींसाठी अजून १२-१४ हजार रूपये भरावे लागू शकतील. तसेच एकूण कर्जाच्या रकमेच्या ०.२% इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल ती वेगळीच.तसेच कर्ज मिळाल्यापासून ३० दिवसात मॉरगेज क्रिएशन करावे लागते.त्यासाठी अजून १०-१२ हजार खर्च येईल.तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे विमा+प्रोसेसिंग हा खर्च १ लाखापेक्षा जास्त होऊ शकेल. त्यात अजून काही छुपे चार्जेस आहेत का याची पण पडताळणी करून घ्या. एल.आय.सी कडून कर्ज घेताना तुम्ही जो खर्च केला असेल तो मात्र फुकट जाईलच.पण कर्ज शिफ्ट करायचे की नाही हा निर्णय घेताना एल.आय.सी कडे तुम्ही जे प्रोसेसिंग आणि इतर चार्जेस दिले असतील त्याचा अंतर्भाव करू नये कारण शेवटी ती एक "संक कॉस्ट" आहे. ३. एल.आय.सी च्या कर्जाची लवकर परतफेड केलीत तर त्यासाठी काही चार्जेस्/पेनल्टी नाही ना याची खात्री करून घ्या. ४. सध्या गृहकर्जावरील व्याजावरील कर सवलत दिड लाख रूपये आहे.नव्या दराने कर्ज शिफ्ट केल्यावरही तुम्ही व्याज दिड लाखापेक्षा जास्त भरणार असाल तर काही प्रश्न नाही. पण समजा नवीन ठिकाणी व्याज समजा १ लाख ४० हजारच भरणार असाल तर तुमचे करपात्र उत्पन्न १० हजारांनी वाढेल आणि त्यावर ३०% च्या ब्रॅकेट मध्ये असाल तर ३ हजार आयकर भरावा लागेल त्याचाही कॅल्क्युलेशनमध्ये अंतर्भाव करायला लागेल. तसेच तुम्ही बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला असेल तर त्याचे महापालिकेकडून कन्व्हेयन्स झाले आहे का हे पण बघून घ्या. नव्या मुंबईत अनेक ठिकाणी महापालिकेचे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे पण कन्व्हेयन्सची प्रक्रिया चालू आहे.जर कन्व्हेयन्स झालेले नसेल तर काही बँका गृहकर्ज देत नाहीत.तसेच कन्हेयन्सची प्रक्रिया चालू आहे पण कन्व्हेयन्स झालेले नाही अशा परिस्थितीत प्रॉपर्टीवर मॉरगेज क्रिएट करायच्या आधी बिल्डरची एन.ओ.सी लागेल का हे पण बघून घ्या.आणि अर्थातच बिल्डर अशी एन.ओ.सी फुकटात देत नसतो.आणि आपले हात दगडाखाली असतील तर तो सांगेल ती रक्कम आपल्याला देणे भाग असते.असे झाल्यास पहिल्या प्रोसेसिंग साठी आणखी खर्च येऊ शकेल. शेवटी सगळ्या गोष्टी आकड्यांवर आणि एकूणच या प्रकाराला किती वेळ जाईल आणि मधल्या काळात किती खेपा घालायला लागतील आणि किती त्रास होईल यावर अवलंबून असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे.तरीही तो निर्णय घेताना नक्की कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करावा यासाठीची एक दिशा दाखवायचा प्रयत्न या प्रतिसादातून केला आहे. जर आकडेमोड करताना, एक्सेलसाठी काही मदत लागली तर जरूर व्य.नि करा.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/11/2014 - 13:44 नवीन
__/\__ नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मोदक गुरुवार, 12/11/2014 - 13:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
र
रेवती गुरुवार, 12/11/2014 - 17:14 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्पा गुरुवार, 12/11/2014 - 13:55 नवीन
क्लिंटन मस्तच प्रतिसाद फक्त प्रोसेसिंग फी हल्ली इतकी नसते १७ लाखांवर बहुतांश ब्यान्कांनी मला जास्तीत जास्त ८००० पर्यंत फी सांगितली ( सगळे चार्जेस पकडून ) त्यावर मला एकही रुपया द्यावा लागला नाही , मी फायनल केलेली ब्यांक IDBI त्यामुळे ५० लाखांवर एक लाख प्रोसेसिंग फी, ये बात कूच जमि नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सुबोध खरे गुरुवार, 12/11/2014 - 15:45 नवीन
अरे वा स्पा नवीन घर घेतो आहे हे कळले. भूमिपूजनाचे आणि त्यानंतरच्या पोटपूजेचे आमंत्रण केंव्हा येणार? आम्हाला मध्यवर्ती केंद्रवर्ती किंवा चक्रवर्ती कोणतेही ठिकाण चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 12/11/2014 - 16:08 नवीन
नाय हो डाॅक. घर घेउन चार वर्ष झाली , m talking bout transferring the loan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
क्लिंटन गुरुवार, 12/11/2014 - 16:46 नवीन
फक्त प्रोसेसिंग फी हल्ली इतकी नसते १७ लाखांवर बहुतांश ब्यान्कांनी मला जास्तीत जास्त ८००० पर्यंत फी सांगितली ( सगळे चार्जेस पकडून )
प्रोसेसिंग फी ०.५% ते १% असते.कधीकधी काही ऑफर असली तर प्रोसेसिंग फी मध्ये सवलत मिळते. अशा ऑफरच्या जाहिराती गुढीपाडवा, दसरा यावेळेला बघितल्याचे आठवते. तसेच वरील प्रतिसादात जो १ लाख हा आकडा लिहिला आहे त्यात प्रोसेसिंग फीबरोबरच विम्याचाही समावेश आहे.हा विमा मी पण घेतला आहे. कर्ज आऊटस्टॅन्डिंग असताना जर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी जेवढे कर्ज ऑटस्टॅन्डिंग आहे तेवढ्या रकमेची भरपाई बँकेला करते म्हणजे कर्जदाराच्या कुटुंबियांना अडचण येत नाही. समजा कर्ज ५० लाखाचे आहे. कोणत्याही गृहकर्जात पहिली १० वर्षे ई.एम.आयचा बराचसा भाग व्याजासाठी जातो तर मुद्दल त्यामानाने बरेच कमी फेडले जाते.११.२५% व्याजावर पहिल्या ५ वर्षात केवळ ५% तर १० वर्षात सुमारे १३.५% इतकेच मुद्दल फेडले जाते.हा विमा 'रिड्युसिंग बॅलन्स' वर असतो. म्हणजे कोणत्याही क्षणी जितके कर्ज आऊटस्टॅन्डिंग आहे तितकेच हा विमा कव्हर करतो (सुरवातीला १००%, ५ वर्षांनंतर ९५%, १० वर्षांनंतर ८६.५% इत्यादी). २५ वर्षांसाठीच्या कर्जाला एकूण कर्जाच्या साधारण २% इतका एकरकमी प्रिमिअम पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 12/11/2014 - 17:01 नवीन
विमा मीही घेतलेला आहेच पण तरीही ती रक्कम इतकी जात नाही. काही लिंक्स मिळाल्या तर चेपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 12/11/2014 - 17:05 नवीन
तुझे वय कमी असल्यामुळे तुला प्रिमिअम कमी लागला असेल.मला २% लागला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सुबोध खरे गुरुवार, 12/11/2014 - 18:34 नवीन
असा विमा घेणे जबरदस्तीचे नाही.आपला आयुर्विमा असेल( टर्म विमा) आणि याची रक्कम जर आपल्या सर्व वित्तीय जबाबदार्यांपेक्षा जास्त असेल तर आपण या विम्याला नकार देऊ शकता.(आपल्याला आपल्या विम्याचे हप्ते भरल्याच्या पावत्या दाखवाव्या लागतात) मी आय सी आय सी आय बँकेला ठणकावून सांगितले मी घराचा विमा घेणार नाही पटत असेल तर कर्ज द्या नाहीतर खड्ड्यात जा. गपचूप कर्ज दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 12/11/2014 - 19:00 नवीन
हो बरोबर असा विमा घेणे सक्तीचे नाही.तसे बँकेने मला स्पष्टपणे सांगितले होते.तरीही २५ वर्षे हा बराच मोठा कालावधी असतो.२५ वर्षात काय होईल कोणी सांगितले आहे? आणि एकूण कर्जाच्या २% रक्कम म्हणजे तितकी मोठीही नाही विशेषतः ज्या वेगाने जागांच्या किंमती वाढत गेल्या आहेत ते पाहता.तेव्हा मी तरी तो विमा घेणेच पसंत केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 12/12/2014 - 05:48 नवीन
क्लिंटन साहेब मी आपल्याला काही सांगणे हे चुकीचेच ठरेल. परंतु २० लाखाचे गृह कर्जावर २ टक्के म्हणजे चाळीस हजार रुपये होतात.सुरुवातीला हि रक्कम फार जास्त होते कारण मध्यमवर्गीय माणूस एक बेडरूमचे घर परवडत असेल तर आपलि चादर ताणून दोन किंवा दीड बेडरूम चे घर घेतो. त्यामुळे सुरुवातीला त्याची फारच ओढाताण होत असते. या चाळीस हजारात पहिले दोन महिन्याचे हप्ते जातात. शिवाय या विम्यामध्ये शिल्लक रक्कमच परत करण्याचा करार आहे त्यामुळे १५ वर्षांनी आपण जर गेलात तर आपल्या कुटुंबाला शिल्लक असलेले ३-४ लाखच मिळतात. याऐवजी आपण आपला आयुर्विमा २० वर्षाचा (टर्म) घेतलात तर सात हजार एकशे रुपयात आपल्याला ५० लाख रुपयाचा विमा मिळेल ( म्हणजे ४०, ०००० रुपयात सहा वर्षाचा हप्ता आपोआप वळता होईल)( भारती axa चा ४० वर्षे वयाच्या पुरुष तंबाखू न वापरणाऱ्या व्यक्तीचा २० वर्षाचा विमा) https://buyonline.bharti-axalife.com/eProtect/Premium/PremiumCalculation)वय कमी असेल तर हा ह्प्ता अजूनच कमी येईल. सहा वर्षात जसा आपला पगार वाढेल तसे हे सात हजार रुपये वर्षाला म्हणजेच ६०० रुपये महिन्याला आपल्याला पॉकेट मनी सारखे वाटतील. शिवाय पुढची २० वर्षे आपल्याला एवढ्या मोठ्या रकमेच्या विम्याचे संरक्षणही मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 12/12/2014 - 06:30 नवीन
हो बरोबर आहे.शेवटी विमा घ्यायचा की नाही हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा.विमा घ्यायलाच पाहिजे अशी सक्ती करणे नक्कीच अयोग्य होईल.बँका या विमाच्याही ८०% रक्कम कर्जाऊ देतात.निदान अलाहाबाद बँकेने तरी तसे कर्ज मला दिले. ५० लाखाचे ११.२५% ने २५ वर्षांसाठीचे कर्ज असेल तर त्याचा ई.एम.आय असेल ४९,९१२ रूपये. विमा २% म्ह़णजे १ लाख रूपये असला तर त्याच्या ८०% म्हणजे ८०,००० रूपये कर्जात वाढ होईल आणि एकूण कर्ज असेल ५०,८०,०००. त्याचा ई.एम.आय पडेल ५०,७११ रूपये. म्हणजे दर महिन्याला ७९९ रूपये जास्त. सुरवातीला ७९९ रूपये जास्त ई.एम.आय भरणे जड जाईल पण ३-४ वर्षांनी ती रक्कम विशेष वाटायचीही नाही. तेव्हा आपले काही झाल्यास आपल्या घरच्यांना घराबाहेर पडावे लागेल ही धाकधूक आणि महिन्याला काही शे रूपये जास्त ई.एम.आय (मला जास्तीचा ई.एम.आय ७९९ पेक्षाही कमी भरावा लागतो) यात मी तरी निर्णय घेतला की दर महिन्याला काही शे रूपये जास्त भरलेले परवडले. तसेही महिन्याला ७९९ रूपये म्हणजे दिवसाला २६-२७ रूपयेच.घरून वेळेत निघून रिक्षाने न जाता बसने किंवा पायी स्टेशनवर गेल्यास दररोज तेवढे रूपये वाचतातच. दुसरी गोष्ट म्हणजे ५० लाखाचा टर्म प्लॅन घेतला असेल आणि १० वर्षांनंतर कर्ज ४३ लाख रूपये आऊटस्टॅन्डिंग असताना कर्जदाराचा मृत्यू झाला तर कुटुंबियांना ७ लाख रूपयेच मिळतील आणि बाकीचे ४३ लाख बँकेकडे जातील. महागाईचा दर १०% धरला तर १० वर्षांनंतरचे ७ लाख म्हणजे आजचे २,७०,००० रूपये.ही रक्कम फार मोठीही नाही आणि ज्या कारणासाठी टर्म प्लॅन घेतला आहे तेच यातून पूर्णपणे फुलफिल होत नाही.जर मृत्यू हृदयविकाराने एका फटक्यात झाला तर त्यात फार खर्च येणार नाही.पण हॉस्पिटलचे बील भरून महिन्या-दोन महिन्याने मृत्यू झाल्यास हे २ लाख ७० हजार रूपये कुठच्या कुठे कमी पडतील. त्यामुळे माझा स्वतःचा टर्म प्लॅन कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट संरक्षण देत असला तरी तो टर्म प्लॅन मी बँकेला पैसे द्यायला नाही तर माझ्या कुटुंबियांना पैसे मिळावेत म्हणून घेतला आहे.त्यामुळे तो प्लॅन मी स्वतंत्रच ठेवायचा निर्णय घेतला.आणि तसेच मेडिकल इन्श्युरन्सही घेतला. थोडे पैसे जास्त भरावे लागतात पण ते परवडले हा विचार मी केला. सांगायची गोष्ट ही की निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा.फक्त निर्णय घेताना सगळ्या इनपुटचा विचार करून आकडेमोड करून नक्की काय करणे योग्य ठरेल याचा आडाखा घेऊनच घ्यावा. जर कोणी तेवढी रिस्क घ्यायला तयार असेल तर विमा न घेणे कधीही चांगले.मी स्वतः तरी तितकी रिस्क घ्यायला तयार नव्हतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा