गृहकर्जाबद्दल माहिती आणि मदत
नमस्कार,
मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल.
कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही.
आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत.
१. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे.
२. एल. आय. सी. मधूनच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले.
३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील.
सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का?
धन्यवाद.
मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय?कर्ज मिळते. मात्र बांधकाम होत जाईल तसे कर्ज रिलीज होते. सुरूवातीला पहिला कर्जाचा हप्ता मिळतो, नंतर बांधकाम प्लिंथ लेव्हलला आले की पुढचा हप्ता.. असे टप्प्या टप्प्याने कर्ज मिळते व तशीच व्याज आकारणी होते. (ही व्याज आकारणीही कमीटमेंट इंटरेस्ट + अव्हेल्ड इंटरेस्ट अशी असते) ही अत्यंत वरवरची माहिती आहे. तुम्ही बँकेच्या शाखेतून सल्ला घेणे योग्य.