Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पेशावरमधील शाळेवर हल्ला - पेरले तेच उगवले

श
श्रीगुरुजी
Tue, 12/16/2014 - 15:33
🗣 121 प्रतिसाद
आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे. 'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. १९४७ साली स्वतंत्र देश मिळाल्यावर देशाचा विकास करण्याऐवजी पाकिस्तानने गेली ६७ वर्षे फक्त काश्मीर या एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करून युद्ध, अतिरेकी हल्ले, धर्मांध प्रचार अशा भयंकर मार्गांनी येनकेनप्रकारेण काश्मीर परत मिळवायचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा विकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, उद्योगधंदे वाढावेत, देशाची आर्थिक स्थिती सुधारावी इ. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त लष्कर, शस्त्रास्त्रे, युद्ध, दहशतवाद इ. वरच पाकिस्तानने भर दिला. भारताबरोबर ४ वेळा युद्ध करून हात पोळून घेतले. १९८९ पासून सातत्याने भारतात दहशतवादी पाठवून भारताला 'हजार जखमा' करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. भारतात दहशतावादी कृत्ये करणार्‍या दाऊद, टायगर मेमन, भटकळ बंधू, हफीझ सईद, मसूद अझर इ. भयंकर दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थन केले. लहान कोवळ्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना मदरशात पाठवून सतत धर्म व जिहाद चे ब्रेनवॉशिंग करून अनेक तरूण पिढ्या बरबाद केल्या. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईद, मुंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊद व मेमन बंधू, भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करणारे भटकळ बंधू अशा दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देऊन पाकिस्तान भयंकर घोडचूक करीत आहे. आज पाकिस्तानला आपल्याच कृत्याची भयंकर किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानला आवरणारा या जगात कोणताच देश नाही का? खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे. पाकिस्तानला अजूनही सुधारण्याची संधी आहे. दहशतवाद्यांची मदत बंद करून व मदरशातून दिले जाणारे धार्मिक व जिहादी शिक्षण बंद केले तर अजूनही पाकिस्तान योग्य त्या मार्गावर जाऊ शकतो. अन्यथा असे हल्ले परत परत होत राहतील व कधी पाकिस्तानातील, कधी भारतातील तर कधी इतर कोणत्यातरी देशातील निरपराध नागरिकांना याची भयंकर किंमत मोजावी लागेल.

प्रतिक्रिया द्या
36127 वाचन

💬 प्रतिसाद (121)
क
काळा पहाड Wed, 12/17/2014 - 05:38 नवीन
हिंदू धर्मातल्या एखाद्या गोष्टी बद्दल हिंदू धर्मातल्या लोकांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. बाकीच्या धर्मातल्या लोकांनी मात्र लांब रहावं कारण ते मुळातच या धर्माच्या विरूद्ध्ह असणार. त्यामुळे हिंदू धर्मातल्या वाईट गोष्टी दाखवणार्‍या बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र दाभोळकरांना माझा पाठिंबा असणारच कारण ते आमचेच लोक आहेत. पण एम एफ हुसेनसारख्याला मात्र ठोकायलाच हवं असं मला वाटतं.
↩ प्रतिसाद: असंका
ट
टवाळ कार्टा Wed, 12/17/2014 - 05:47 नवीन
बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र दाभोळकर हे जे बोलायचे त्याला अभ्यास आणि मुद्देसूद बोलणे असायचे
↩ प्रतिसाद: काळा पहाड
य
योगी९०० Wed, 12/17/2014 - 06:00 नवीन
हुप्प्या यांच्या प्रतिसादाशी सहमत...!! तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे. +१०००० सहमत...!!
↩ प्रतिसाद: हुप्प्या
क
क्लिंटन Wed, 12/17/2014 - 10:53 नवीन
तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे.
हा असला आडाणी प्रकार बघितला की तळपायाची आग मस्तकात जाते.आणि असे करणारे लोक मोठे धर्मनिरपेक्ष म्हणून मिरविले जातात त्याचा आणखी संताप येतो. आजच निखिल वागळेंचा टिवटिवाट जसाच्या तसा पेस्ट करतो:"Peshawar incident tells us how religious fanatics behave. RSS Parivar is not Taliban today, but can become one if they get chance" . या असल्या शतमूर्खांना एक गोष्ट कशी कळत नाही हेच समजत नाही.रा.स्व.संघाचे लाखांनी सदस्य आहेत आणि काल-आजपासून नव्हे तर गेल्या ९० वर्षांपासून सुरवात होऊन.तालिबान्यांनी केलेल्या कृत्यांप्रमाणे किती कृत्ये रा.स्व.संघाच्या सदस्यांनी केली आहेत? मी रा.स्व.संघाचा समर्थक आहे अशातला भाग नाही पण असला पुरोगामी बिनडोकपणा बघितला तर भविष्यात रा.स्व.संघाचा कट्टर समर्थक व्हायची शक्यताही नाकारता येणार नाही :) मागेही टाईम्स ऑफ इंडियामध्ये काश्मीरविषयी "हॉक्स" कोण आणि शांतीची कबुतरे कोण याचे फोटो आले होते.त्यात हॉक्सच्या यादीत गिलानीपेक्षा अडवाणींचा फोटो पहिला होता.आता बोला.
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 11:06 नवीन
"Peshawar incident tells us how religious fanatics behave. RSS Parivar is not Taliban today, but can become one if they get chance"
डोक्याला शॉट ... अक्कल कुठे गहाण टाकुन आलेत हे पुरोगामी लोक ? *dash1*
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 11:08 नवीन
चान्स मिळाला तर काहीही होऊ शकतं ना. अगदी अल कायदासुद्धा शांतिसेना होऊ शकते, हाफिझ सईद संत बनू शकतो. तद्वतच डार्क साईडलाही माणूस जाऊ शकतो. त्यात इशेश ते काय. चान्स मिळाला की मोदीविरोधकांचे मोदीभक्तही होतात. त्यामुळे यात तत्त्वतः अशक्य काहीच नाही.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 11:40 नवीन
आता तुम्ही सुद्धा चर्चा भरकटवताय असे वाटत नाही का?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 11:44 नवीन
नाही
आम्ही म्हणतो तोच खरा इस्लाम अन बाकी सारे काफीर
असे म्हणाणार्‍यांची मनोवृत्ती अन
मी म्हणतो तोच हेवन बाकी सारा भास
अन
जगातल्या सगळ्या वाईट गोष्टीं पेक्षा जास्त वाईट गोष्टी मुळ हिंदु धर्मातच आहेत
असे प्रतिपादन करणारी मनोवृत्ती ह्या तिन्ही वृत्ती तात्विक दृष्ट्या समानच आहेत इतकेच दाखवुन द्यायचे होते :D
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
क्लिंटन Wed, 12/17/2014 - 15:18 नवीन
Peshawar incident tells us how religious fanatics behave. RSS Parivar is not Taliban today, but can become one if they get chance
निखिल वागळेंच्या या टिवटिवाटाला श्रीहर्ष पेरला नावाच्या एका ट्विटरेटीने दिलेले उत्तर वाचून हसून हसून खुर्चीवरून पडायची वेळ आली. त्याचे उत्तर "Tehelka incident tells us how left fanatics behave. @waglenikhil is not a rapist today, but can become one if they get chance"
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 15:37 नवीन
कुमार केतकरसुद्धा निखिल वागळेंसारखेच अडाणी आहेत. अशा संतापजनक व्यक्तींना मी 'निधर्मांध' म्हणतो. दूध व शॅम्पेन यांना एकसमान मानणे हा जितका मूर्खपणा आहे तितकाच मूर्खपणा तालिबानी व संघाला एकसमान मानताना होतो हे यांच्या गुडघ्यात कधी शिरतच नाही.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
इ
इडली डोसा Tue, 12/16/2014 - 17:21 नवीन
काही पाकिस्तनी व्यक्तिंशी बोलणं झालं होतं आणि त्यन्च्या कडुन हे कळालं कि बरीच कुटुंब स्थलांतरित होउन दुसर्या देशांमध्ये गेली आहेत. पण अजुनही बरीच अभगी लोकं तिथेच आहेत ज्यांना दुसरी कडे जाणं शक्य नाही. बाकी सर्वसामन्य पकिस्तानी नागरीकांची स्वप्नं , ईच्छा , आकांक्षा हि अपाल्यासरख्याच आहेत.
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/16/2014 - 19:01 नवीन
प्रॉब्लेम असा आहे.की असे शेकडो हल्ले इस्लामी जगता अंतर्गत (त्यांच्यावरच) झाले..तरी (त्यात मेलेल्यां..उरलेल्या सहीत) कुणालाही हे पटत नाही..कि हे सर्व आपल्या धर्मामुळे होतं आहे. आमच्या वैदिक(हिंन्दु) धर्मात जसं "खरा" ब्राम्हण-याच्या भरपूर संज्ञा/व्याख्या निघतात..कारण मुळात "खरा" ब्राम्हण ही कल्पनाच खोटी आणि लबाड आहे.(म्हणूनच मी म्हणत असतो,की मी ब्राम्हण-असणं, हे धर्म शास्त्रानीच अशक्य करून ठेवलेलं आहे.) तद्वतच "सच्चा मुसलमान" कुणीच(असू शकत..) नसल्यामुळे, सावरकर म्हणायचे तसं..ज्याची लाठी बलवान तोच(त्या वेळी..) खरा..,हा न्याय तिथे लागू पडतो. म्हणूनच या असल्या खर्‍या लोकांच्या हतात राज्य आणविण्यासाठी हे हल्ले आणि धर्मयुद्ध लढवली जातात..आणि याच "खर्‍या" लोकांनीच ही धर्मशास्त्रे देवाची नावे घेऊन लिहिली आहेत..फक्त ती सामान्य जनतेला भुलवणार्‍या भाषेत व तत्त्वात लिहिली आहेत..आश्या अर्थानी पाहिलं,तर ह्या सर्व सोई धर्मशास्त्रेच करून ठेवत असतात,हे सहज कळतं..परंतू, हे सामान्य(मरणार्‍या) जनतेला उमगत नाही..म्हणून (प्रत्येक धर्मातली..) तीच "बिचारी" सामान्य जनता कायम म्हणत रहाते,,,
धर्म "चांगला" आहे,फक्त(?) "ते" वाईट आहेत.

कुणी कुणाला मारली पाचर?,मागे पुढे पत्ता नाही सामान्यांचे खुळे मेंदू,धर्माशिवाय सत्ता नाही.

ख
खटपट्या Tue, 12/16/2014 - 19:06 नवीन
क्या बात है !!
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अर्धवटराव Tue, 12/16/2014 - 23:08 नवीन
आता विषयांतर झालेच आहे म्हणुन..
आमच्या वैदिक(हिंन्दु) धर्मात जसं "खरा" ब्राम्हण-याच्या भरपूर संज्ञा/व्याख्या निघतात..
अशा अनेक संज्ञा, शक्यता, कल्पना निघणं हे प्रगतीच्या स्कोपचं लक्षण आहे. मानवी प्रगतीचे मापदंड मूलतः सब्जेक्टीव्ह्च असायला हवेत.
कारण मुळात "खरा" ब्राम्हण ही कल्पनाच खोटी आणि लबाड आहे.
हा अत्यंत चुकीचा निश्कर्ष आहे. खरेपणा कितीही बदलत गेला तरी त्याच्या सच्चेपणाला बाध येत नाहि.
(म्हणूनच मी म्हणत असतो,की मी ब्राम्हण-असणं, हे धर्म शास्त्रानीच अशक्य करून ठेवलेलं आहे.)
तसं असण्यात काहिही गैर नाहि.
तद्वतच "सच्चा मुसलमान" कुणीच(असू शकत..) नसल्यामुळे
प्रॉब्लेम कोण सच्चा आणि कोण झुटा हा नाहिच मुळी. आपण जसं इतरांचं मुल्यमापन करतो तसं इतरांना आपलं मुल्यामापन करु द्यावं काय, आणि इतरांना स्खलनशील समजताना आपणही त्याच मातिचे बनलो आहोत हे स्विकारणं आपल्याला शक्य आहे काय, इतका साधा प्रश्न आहे.
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/17/2014 - 02:09 नवीन
नाही हो नाही .. काही तरी गैर समज होतोय. मी ज्याच्या बद्दल बोलतोय, त्या संद्न्या धर्माच्या पोथ्यंमधे लबाडनि केलेल्या स्वत:च्या सोई बद्दल... सर्व सामान्य माणसे धर्माचा जो "चांगला" अर्थ घेतात त्याबद्दल नाही. असो....अत्ता वेळ नाही. दुपारी आल्यावर सविस्तर लिहिन.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 07:46 नवीन
बुवा , काही अत्यंत विनम्र प्रश्न : तुमचा इस्लामचा अभ्यास किती ? इस्लामचा उदय कसा झाला ? इस्लामपुर्व अरब जगतात मक्का येथे काय होते ? हुबाल म्हणजे कोण ? वहाबी , शिया , सुन्नी,, अहमदीया , बोहरा , सुफी ह्यातील मुख्य फरक काय ? पवित्र कुराण आणि हदीथ च्या मते सच्चा मुसलमान कोणाला म्हणायचे ? दार-उल-हर्ब आणि दार अल इस्लाम म्हणजे काय ? आपला वैदिक धर्माचा 'अभ्यास' आहे असे गृहीत धरत आहे . पण इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय तौलनिक प्रतिक्रिया देवु नयेत ही अति नम्र विनंती ! संपादित
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 08:08 नवीन
बुवांचा इस्लामविषयक अभ्यास अतिशय चांगला आहे. शेषराव मोरे, हमीद दलवाई, कुरुंदकर आदी ते कोळून प्यायले आहेत. बाकी हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस रूढींनी भरलेला आहे असे नमूद करतो.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 08:13 नवीन
बरं
बाकी हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस रूढींनी भरलेला आहे असे नमूद करतो.
ओके . मग हिंदु अतिरेक्यांनी शाळेत घुसुन १५० पोरं मारली असली एखादी घटना सांगा .
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 08:16 नवीन
पेशावर मधे घडलेली ही नृशंस घटना आणि वैदिक धर्मातलया तथाकथित हिणकस रुढी ह्यांची तुलना उगाच कै च्या कै अस्थानी आहे इतकेच म्हणु इच्छितो !
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 08:17 नवीन
मी रूढींनी म्हटलंय मित्रा. पोरे मारण्याचा इथे काय संबंध? बाकी अगदीच ताणायचे म्हटले तर कंसाने देवकीचे आठ पुत्र मारले, गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाचा निर्वंश केला. =))
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 08:25 नवीन
हिणकस रुढी आणि निष्पाप मुलांचा जीव घेणे ह्या दोन गोष्टींची तुलनाच होवु शकत नाही .
कंसाने देवकीचे आठ पुत्र मारले,
>> हिंदु धर्मावर टीका करणारे कंस , कृष्ण मुळात झालेच नाहीत निव्वळ काल्पनिक आहेत असे मानतात म्हणुन हा पॉईंट बाद ठरतो .
गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाचा निर्वंश केला.
शत्रुचा निर्वंश करणे हे आमच्या वैदिक धर्मात तरी एकदम न्याय्य आहे . आर्य चाणक्यांनीही ह्याला विरोध केला नसता . इव्हन महाभारतातही अर्जुन कृष्णाने खांडववनात जिनोसाईड केलेच ना ...

मत्स्य न्याय

परफेक्टली लॉजिकल ! वैदिक धर्म प्रचंड लॉजिकल आहे ... तुमच्या हिंदु धर्माचे माहीत नाही :D
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 08:15 नवीन
हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस रूढींनी भरलेला आहे असे नमूद करतो आमच्या हिंदूंना हिंदू धर्माबद्धल लईच ज्ञान... परंतु उपद्रवमुल्य कोणाचे ? त्या बद्धल बोलण्याचे सोडुन इतर गोष्टीच चर्चेत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 08:19 नवीन
इस्लामचे उपद्रवमूल्य वादातीत आहेच यात काहीच शंका नाही. पण दुसर्‍यावर टिका करण्याआधी स्वतःच्या घरात काय जळते आहे ते कसे विझवता येईल ते बघावे आधी माणसाने.
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 08:50 नवीन
स्वतःच्या घरात काय जळते आहे ते कसे विझवता येईल ते बघावे आधी माणसाने. हॅहॅहॅ... चांगला विनोद आहे बरं का वल्ली शेठ ! सती प्रथा आज आहे का ? कोणत्याही कारणांनी का होइन, कितीही विरोध का होइना त्यात बदल झाला ना ? हिंदू त्यांची जीवन पद्धती काळा प्रमाणे सातत्याने बदलत आले आहेत. शरीयत कायद्या प्रमाणे गीता कायदा किंवा मनूस्मॄती इ.चा वापर करुनच जगा नाहीतर मरा ! असे हिंदू इतर धर्मियांना सांगत नाहीत्,आणि त्यांची हिंसा देखील करत नाहीत. बादवे आपण जरा "काफिर" या विषयावर देखील उजेड पाडावा अशी नम्र विनंती ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 09:00 नवीन
बदल झाला आहे, होत आहे आणि अजूनही खूप बदल होणे बाकी आहे जे होणे गरजेचे आहेत. येथे इस्लामचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. मी स्वतः इस्लामचा कडवा विरोधक आहे. बाकी काफिर म्हणजे श्रद्धाहीन. मग त्यात हिंदू, बौद्ध, जैन, क्रिस्टियन्स, बोहरा, अहमदिया आदी पंथांमधले लोक सुद्धा आले.
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 09:03 नवीन
येथे इस्लामचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. मी स्वतः इस्लामचा कडवा विरोधक आहे. हा धागा ब्राम्हण-अब्राम्हण जाती-रुढींवर नसुन धर्मांधतेने झालेल्या हिंसाचारावर आहे... आणि तो त्याच ट्रॅकवर रहावा. बस और कुछ नही...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 09:09 नवीन
हा धागा ब्राम्हण-अब्राम्हण जाती-रुढींवर नसुन धर्मांधतेने झालेल्या हिंसाचारावर आहे... आणि तो त्याच ट्रॅकवर रहावा. बस और कुछ नही
बाकडे वाजवुन अनुमोदन !! नोट : मदनबाण , काळापहाड हे माझे डुप्लिकेट आयडी नाहीयेत .
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 08:19 नवीन
त्या बद्धल बोलण्याचे सोडुन इतर गोष्टीच चर्चेत !
हिंदु धर्मीयांनी प्रोअ‍ॅक्टीव्हली केलेल्या हिंसेचे एक उदाहरण द्या हा माझा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे ! ( एक पुष्यमित्र शुंगाचे नाव घेता येते पण त्याने केलेले हिंसा हे अशोकाच्या आतातायीपणाला दिलेली रीईक्शन होती असे मानायला लईच वाव आहे )
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 08:28 नवीन
गुप्तांच्या वैभवशाली साम्राज्याच्या अस्तानंतर इस्लामचा उदय झाला आणि मध्यपूर्वेतून इस्लामची आक्रमणे वरचेवर सुरु होऊ लागली त्यामुळे संपूर्ण भारतभर कुणा एकालाही सार्वभौम साम्राज्य स्थापणे अशक्य झाले. त्यामुळे राष्ट्रकूट, चालुक्य, पाल, अहोम, परमार, यादव, होयसाळ, चोल, पांड्य अशी अनेक राजघराणी उदयास आली. मध्ययुगीन भारताचा हा इतिहास त्यांच्यातील परस्परसंघर्षांनी आणि रक्तरंजित लढायांनी भरलेला आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 08:30 नवीन
मत्स्य न्याय मत्स्य न्याय मत्स्य न्याय
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 09:54 नवीन
असहमत. गुप्तांनंतर काही काळ हूणांची आक्रमणे झाली. यशोवर्मन मौखरी नामक यूपीमधील राजाने ती परतवून लावली, नंतर मग हर्षवर्धनाचा उदय झाला. इ.स. ६४७ मध्ये तो मेला. त्याच्यानंतर कनौज या राजधानीच्या शहरावर कब्जा मिळवण्यासाठी दख्खनचे राष्ट्रकूट, गुजरात-राजस्थानचे गुर्जर-प्रतिहार आणि बंगालचे पाल यांच्यात ट्रिपल थ्रेट म्याच सुरू झाली ती दोनतीनशे वर्षे तरी सुरूच राहिली. यामुळे भारतातील बहुतांशी राज्ये दुबळी झाली होती- किमान नॉर्थमधली तरी. याच वेळेस अरबांची आक्रमणे सुरू होती, परंतु त्यांचा इम्पॅक्ट नगण्य होता. मुहम्मद बिन कासीमने दाहीरचा पराभव करून इ.स. ७१२ मध्ये सिंध घेतले खरे, पण ४०-५० वर्षांतच ते परत घेतल्या गेले. इ.स. ७५० च्या आसपास प्रतिहास राजा नागभट याने अरबांचा काही लढायांत जबर्‍या पराभव केल्याने ते परत गेले ते गेलेच. त्याच सुमारास अफगाणिस्तानातील हिंदू राज्यांशीही अरबांचा व अन्य इस्लामिक सत्तांचा संघर्ष सुरूच होता. काबूल व झाबूल या राज्यांना अरब सोर्सेस मध्ये "हिंदू शाही" असे नाव रूढ आहे. या हिंदू शाही राज्यांनी भारताची सरहद्द दोनेकशे वर्षे यशस्वीरीत्या रक्षिली. त्यामुळे अंतर्गत कलहाचे व एकछ्त्री साम्राज्य स्थापण्यात आलेल्या अपयशाचे कारण मुसलमानी आक्रमणे होती हे खरे नाही. एक साधे उदा. घ्या. हर्षवर्धनाने चालुक्य पुलिकेशी यावर आक्रमण केले. ती लढाई झाली नर्मदातीरी. त्यात हर्षवर्धन हरला. नंतर चालुक्यांनी तमिळनाडूच्या पल्लवांवर आक्रमण केले तेव्हा चालुक्यही हरले. त्यामुळे हा काळच रीजनलायझेशनचा होता असे म्हटल्यास चूक ठरू नये.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 10:01 नवीन
आय मीन, अरबांच्या आक्रमणांनंतर (इ.स. ७५०) डायरेक पहिले आक्रमण येते ते गझनीच्या महंमदाचे (इ.स. ९८०). मधली २०० वर्षे भारतात जे काही चालले होते त्याचे कारण मुसलमान आक्रमणे नव्हेत.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 10:04 नवीन
सहमत आहेच रे. भारतात इस्लामचा प्रभाव १० व्या शतकानंतरच खर्‍या अर्थाने सुरु झाला. माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच होता की गुप्तांनंतर हर्षवर्धनाचा ३०/४० वर्षाचा काळ वगळता त्यानंतर कुठल्याही एका राजवटीला भारतात सार्वभौम राजवट स्थापन करणे अशक्य झाले. आपापसातील लढायांमुळेच कमजोर होत जाऊन शेवटी ही राज्ये इस्लामच्या भक्ष्यस्थानी पडली.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 10:06 नवीन
हां ते आहेच. या वाक्यातून
मध्यपूर्वेतून इस्लामची आक्रमणे वरचेवर सुरु होऊ लागली त्यामुळे संपूर्ण भारतभर कुणा एकालाही सार्वभौम साम्राज्य स्थापणे अशक्य झाले. त्यामुळे राष्ट्रकूट, चालुक्य, पाल, अहोम, परमार, यादव, होयसाळ, चोल, पांड्य अशी अनेक राजघराणी उदयास आली.
जे कॉजेशन ध्वनित होते त्यालाच फक्त आक्षेप आहे. बाकी काही नाही.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 12/17/2014 - 10:11 नवीन
ओह्हो. लिहिण्याच्या ओघात झालेली चुकीची वाक्यरचना. :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 10:16 नवीन
तुम्ही दोघं सारखं असं लिंबोत जात जाऊ नका ... मुद्दा असा आहे की त्यांच्यातील हिंसा अन आपल्या धर्मातील "हिणकस" रुढी ह्यांची तुलना आतातायी अस्थानी आहे . इव्हन हिंदुनी केलेली हिंसा अन त्यांनी केलेली हिंसा ह्यातही जमीन अस्मानाचा फरक आहे . इथे तालिबान्यांचा नंगा नाच स्पष्ट दिसत असताना "दहशतवादाला धर्म नसतो " किंव्वा "सगळेच धर्मात धहशतवादी प्र्वृत्ती असतात " किंव्वा "हिंदुंमधील "हिणकस " रुढी ह्या १५० लहान पोरांना मारण्याइतक्याच क्रुर आहेत" वगैरे विधानांनी विषय भरकटवुन हिंदुत्ववाद्यांवर खापर फोडणे कोणत्याही तर्कनिष्ठ माणसाला पटण्या सारखे नाही. हिंदुंमधील तथाकथित हिणकस रुढींवर कैकवेळा वाद विवाद झालाय , हवा असल्यास परत करु ( आज तसेही हाफिसात काम नाहीये ;) ) पण इथे विषय भरकटवु नका . हां तर सांगा पाहु दहशतवादाचा रंग कोणता ?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 10:26 नवीन
आमची चर्चा वेगळ्या मुद्याबद्दल होती. तदुपरि इथे मुद्दा कोण भरकटवते आहे? शेकडो पोरे मेली तर त्याबद्दल निषेध व्यक्त करणे ही प्राथमिक गरज आहे. पाकड्यांना आता तरी नीट कळाले पाहिजे ही काय भानगड आहे ते. तदुपरि मेलेली पोरे मुसलमान असल्यानेच जर कुणाला उकळ्या फुटत असतील तर तो वेगळा विषय आहे. त्याबद्दल बोलण्याची माझी इच्छा नाही.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 10:31 नवीन
तदुपरि इथे मुद्दा कोण भरकटवते आहे?
अत्लूप्त आत्माबुवा .. ते मनाले की हिंदुच्यात हिनकस लुधी असतात अन खला बाम्मन हा खल्या मुसलमाना इतकाच खोता अन लबाद अशतो अन हा आगोब्बा लग्गेच त्याची बाजु घेवुन बोल्ला ... दुश्त ल्ल्ल्लूऊऊऊ *beee* ब्यॅतम्यान , तु ना त्यांचे घल उनात बांध अलेबियाच्या *diablo*
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 10:34 नवीन
हिंदू धर्मात हिणकस रूढी आहेतच मग. सवालच नाही. फक्त इथे त्यांचा उल्लेख अप्रस्तुत आहे. अर्थात निव्वळ मुसलमानांना झळ बसली हे वाचून उकळ्या फुटणार्‍यांना जरा धरबंद म्हणून त्यांचा उल्लेख असेल तर अंशतः तेही मान्यच आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 10:41 नवीन
फक्त इथे त्यांचा उल्लेख अप्रस्तुत आहे.
गूड . किमान इतके तरी मान्य केलेस :)
अर्थात निव्वळ मुसलमानांना झळ बसली हे वाचून उकळ्या फुटणार्‍यांना जरा धरबंद म्हणून त्यांचा उल्लेख असेल तर अंशतः तेही मान्यच आहे.
आता ह्या विषयी बोलायचे झालेच तर , एक माणुस मशाल घेवुन दुसर्‍याचे घर जाळायला निघाला होता त्या मशालीची आग घेवुन्त्याचीच लुंगी पेटली तर तुझी रीअ‍ॅक्शन काय असेल ? मला तरी उकळ्या फुटतात असे काही पाहुन ... आत्ता कश्शी जिरली ... आता तरी अक्कल येईल की नाइ ह्यांना .
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 10:46 नवीन
आता ह्या विषयी बोलायचे झालेच तर , एक माणुस मशाल घेवुन दुसर्‍याचे घर जाळायला निघाला होता त्या मशालीची आग घेवुन्त्याचीच लुंगी पेटली तर तुझी रीअ‍ॅक्शन काय असेल ? मला तरी उकळ्या फुटतात असे काही पाहुन ... आत्ता कश्शी जिरली ... आता तरी अक्कल येईल की नाइ ह्यांना .
अंशतः सहमत, अंशतः असहमत.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 10:52 नवीन
अंशतः असहमत.
बरं मग सांग तुझी रीअ‍ॅक्शन अशी असेल काय ? >> आमच्या मंदीरातही नंदादीप तेवत ठेवतात त्यानेही एखाद्याची लुंगी पेटु शकते , आमच्या मडीरातही समया , दिवे उदबत्त्या वगैरे ज्वलनशील वस्तु आहेत . आमच्या मंदीरातले पुजारीही त्या मशाल घेवुन घर पेटवायला निघालेल्या सैताना इतकेच दांभिक , खोटे आणि लबाड आहेत ! अशी असेल का तुझी प्रतिक्रिया ?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 11:04 नवीन
अशी बायनरीछाप प्रतिक्रिया या ठिकाणी मला देववत नाही, तस्मात तूर्तास पास.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 11:16 नवीन
अतृप्त बुवांची प्रतिक्रिया त्या टाईअपची होती ... आग लागली पेशावरात अन इस्लामच्या रुढी श्रध्दां विषयी बोलायचे की हिंदुंच्या ? ... अहो लाख असोत हिंदुंच्यात हिणकस प्रथा पण इथे त्याचा काय संबंध ? ह्या ना त्या निमित्ताने हिंदु धर्मावर टिका करायची म्हणजे झाले ... तो निखिल वागळेने पण तसाच काहीसा टिवटीवाट केलाय बघ .... हा म्हणजे हिंदुत्ववाद्यांना अन तालिबान्यांना एका तराजुत तोलण्याचा प्रकार झाला ... ISIS आणि RSS ची तुलना करण्या सारखे झाले ! ह्याला काय अर्थय राव ? हे असं करणं पुरोगामित्वाची पर्क्विसिट आहे की काय ? तसे असल्यान आम्ही सनातनीच बरे ! |एका केवलमर्थसाधनविधौ सेना शतेभ्योधिका नन्दोन्मूलन दॄष्टवीर्यमहिमा बुद्धिस्तु मा गान्मम | लेखनसीमा _________________________________________________________________________________
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
क्लिंटन Wed, 12/17/2014 - 11:20 नवीन
एक माणुस मशाल घेवुन दुसर्‍याचे घर जाळायला निघाला होता त्या मशालीची आग घेवुन्त्याचीच लुंगी पेटली तर तुझी रीअ‍ॅक्शन काय असेल ? मला तरी उकळ्या फुटतात असे काही पाहुन ...
मलाही. माझे घर जळले तरी चालेल पण ते जाळायची इच्छा आणि प्रयत्न करणार्‍याच्या केसालाही धक्का लागू नये असे म्हणणार्‍या बेगडी मानवतावादाला मी तरी फाट्यावर मारतो.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
स्पंदना Wed, 12/17/2014 - 13:09 नवीन
फक्त..हो फक्त अवयवांचा पहिल्या मजल्याप्र्यंत पोहोचू शकेल असा ढिग पाह्यला ९३च्या स्फोटात. त्यावेळी किती त्या देशातले लोक कळवळले असतील विचारते मी. लोकलने घरी निघालेले सरणावर पोहोचले तेंव्हा किती कळवळले असतील ते लोक हे ही विचारेन मी. अगदी परवा मृत्यु पावलेल्या जवांनाची मुंडकी कापून नेली तेंव्हा अगदी शाळेला जाणारी हीच पोर कशी फुरफुरली असतील हे विचारते मी. माझ्या पुजेत काही रोज सगळ्या जगात फक्त माझाच धर्म पसरव, तरच तू हिंदू अस म्हणत नाही मी. पण दिअवसातून पाचवेळा फकत एव्हढच म्हणुन मेंदू असा ठासुन भरला गेला आहे हे ही तितकेच खरे. काल सिडनेच्या व्हिक्टीम्सना आदरांजली वहायला हे लोक मुद्दमहुन त्यांचे कपडे घालुन आले होते. त्यातल्या एकाची बायको दाखवायला म्हणुन चेहरा गंभीर ठेवायचा प्रय्त्न करत होती, पण तिची नजर जिहादच्या त्या तथाकथीत वीराला मिळालेया जन्नतची खुषी दर्शवत होती.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 12:27 नवीन
मध्ययुगीन भारताचा हा इतिहास त्यांच्यातील परस्परसंघर्षांनी आणि रक्तरंजित लढायांनी भरलेला आहे. >>>>> त्या लढाया धर्म ह्या बेसिस वर नव्हत्या त्यामुळे हे उदाहरण गैरलागू आहे. काही कोटी लोक फक्त त्यांचा धर्म न मानणार्‍या लोकांना नामशेष करणे ह्या एकमेव ऑब्जेक्टीव्ह साठी एकत्र येतात, असे दुसर्‍या कुठल्याही धर्मात होत नाही.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 07:38 नवीन
मुळात "खरा" ब्राम्हण ही कल्पनाच खोटी आणि लबाड आहे.
संत एकनाथच खरर्‍या अर्थाने ब्राह्मण आहेत असं कोणतरी म्हणाले होते म्हणे ... तर आज संत एकनाथ सुध्दा लबाड ठरले गेले आहेत.... टाळ्या !!
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
निनाद मुक्काम … Wed, 12/17/2014 - 00:34 नवीन
ऑपरेशन दर्ब ए अर्ज म्हणजे मलाला च्या नावाने शिमगा करून उत्तर वझिरीस्तान मध्ये पाकिस्तानी तालिबान चा खातमा करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला राजी करण्यास वेस्टन वल्ड ला यश आले मलाला वर लिहिलेल्या लेखात मी दोन वर्षापूर्वी म्हटले होते ही कारवाई झाली तर पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल पण आजतागायत पाकिस्तानी तालिबान ने मोठ्या शहारात आत्मघाती हल्ले केले केले होते मग आज एवढे घातक पाऊल का उचलले गेले ह्याचे कारण कारण मी वरती उल्लेख केला त्या ऑपरेशन मध्ये पाकिस्तानी सैन्याने तालिबान व त्याच्न्या कुटुंबाला गेल्या काही महिन्यात जवळजवळ ६०० च्या आसपास मारले हयात महिला व लहान मुले आली , आता आपली मुले मेल्याचे दुख्ख काय असते हे पाकिस्तानी लष्कराला दाखविण्यासाठी हे पाऊल उचलले गेले बदला हा पठाणांच्या रक्तात आहे त्यांचे आयुष्य त्यांची जीवनशैली बदला ह्या शब्दाभोवती केंद्रित आहे , तेव्हा त्यांना जो नडेन तो आपल्या कर्माची फळे भोगेल दुनिया टीव्ही जो आय एस आय व दाउद ने सहकार्याने उभारला आहे त्याने ह्या घटनेचे खापर रॉ व मोदी सरकार वर फोडून आपला कार्यभाग संपन्न केला आहे. पाकिस्तानी तालिबान ला इंटेलिजन्स व तांत्रिक मदत रॉ देते असा त्यांचा नेहमीचा आरोप असून तेथे अश्या घटना घडल्या की भारतावर खापर फोडले जाते ,पण दुनिया वगळता इतर पाकिस्तानी वाहिन्या व भारत द्वेषी विचार जंत सुद्धा म्हणजे मुझाहीर लुकमान सारखे ह्या घटनेला पाकिस्तानी तालिबान जबाबदार असून त्या नुअसर भाष्य करत आहेत बाकी १६ डिसेंबर हा दिवस का निवडला केला हे एक गूढ आहे मला तर बुआ बाजी मधील डायलॉग जाम आवडला आहे आपल्याला जो नडेल तो नरकात सडेल
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 04:46 नवीन
सर्व प्रथम या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या निष्पाप मुलांचा बळी गेला आहे त्या पालकां बद्धल अत्यंत सहानभुती व्य्क्त करतो. आता मुख्य विषयाकडे वळतो... बाभळीच्या झाडाला प्राजक्ताची फुले कशी येतील ? जे पेरल तेच उगवले. ज्या देशाची निर्मीती ही हिंदू आणि हिंदूस्थान द्वेषातुन झाली आहे तो विनाषाकडे धावतो आहे याचे काय नवल ? सतत हिंदूस्थानचा द्वेष करुन विकासाच्या ऐवजी विध्वंसाचेच राजकारण केले गेले त्याचेच फळ पाकिस्तान भोगत आहे आणि यापुढे ही भोगेल ! या देशाचे नाव जरी पाकिस्तान असले तरी एक राष्ट्र म्हणुन ते नापाक आहे. हे राष्ट्र हे इस्लामी दहशदवादाचे केंद्र असुन येथील मदरश्यांच मधुन इस्लामच्या धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली ब्रेनवॉश केलेल्या पिढ्या घडवल्या गेल्या ! आता हेच शिक्षण त्यांच्याच मूळावर उलटलेले दिसत आहे.प्रचंड संख्येने अतिरेकी घडवण्याचे काम आणि कँप्स उभारण्याचे सत्र याच नापाक पाकिस्तान झाले आणि आज अतिरेक्यांनी याच राष्ट्रातल्या नागरिकांच्या कच्च्या-बच्च्यांना डोक्यात आणि छातीत गोळ्या घालुन हलाल केले.आज पाकिस्तानचे नागरिक अल्लाह के नाम पे, रसुल के नाम पे रहम करो असा आक्रोश करत आहेत, पण हेच नागरिक हिंदूस्थानच्या विरोधात चालणार्‍या दहशदवादा बद्धल मूग गिळुन बसले होते. पाकिस्तान सैन्याने Rah-e-Nijat आणि Zarb-e-Azb अशी ऑपरेशन्स राबवली यात मुख्यत्वे उत्तर वझरिस्ताना भागात राववली जो कबिलाई भाग आहे, कबिलाई अतिरेकी म्हणतात तुम्ही आमची माणसे,मुले मारलीत आता आम्ही तुमची माणसे, मुले मारु ! आणि याचेच प्रत्यंतर वारंवार घडुन आलेले आहे. २००७ कराची मधे १५० लोक ठार केले गेले. २००९ रावळपिंडी मधे ३० लोक ठार केले गेले. असे अनेक हल्ले आधी झाले आहेत आणि भविष्यात देखील होतील कारण दहशदवादाचा जिन्न जो यांनी पोसला आणि मोठा केला तोच ह्यांच्यावर उलटला आहे... भविष्यातला भयानक धोका :- ज्या पद्धतीने सातत्याने पाकिस्तान आर्मी, एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी हल्ले होत आहेत,त्यातुनच पुढे ह्या अतिरेक्यांच्या हाती आण्विक अस्त्रे लागण्याची शक्यता बळावत चालली आहे, ज्याचा धोका आपल्याला आणि खुद्द पाकिस्तानला सुद्धा आहे.याचे मुख्य कारण पाकिस्तानी सैन्य,आयएसआय आणि कट्टर पंथी हे एकाच माळेचे मणी आहेत. पाकिस्तानी सैन्यात वरच्या पदांवर असलेले अधिकारी हे कट्टरपंथी आणि आयएसआय ची प्यादीच आहेत. आपण घ्यायची दक्षता :- पाकिस्तान हे राष्ट्र म्हणुन प्रचंड अस्थिरतेकडे वेगाने प्रवास करत आहे,प्रचंड अणवस्त्र साठा असलेले आणि नव्याने त्यात भर घालण्याचे उध्योग हे कुठल्याही शांतता प्रेमी राष्ट्राचे ध्योतक नाही... त्यामुळे आपल्या देशात हल्ले , घातपात होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहेच.रेल्वे स्टेशन,बस डेपो, मंदिर-मस्जिद, मॉल, भाजी बाजार इं आणि अन्य ठिकाणी जिथे मोठ्या संख्येने लोकांची वर्दळ असते तिथे हे हल्ले प्रामुख्याने केले जाण्याची शक्यता असु शकते. इस्लाम आणि दहशदवाद :- आजच्या घडीला जगात सर्वात बदनाम झालेला धर्म म्हणजे इस्लाम ! अर्थातच त्याला कारण म्हणजे धर्माच्या नावावर केला जाणारा प्रचंड हिंसाचार ! आज प्रत्येक मुसलमान व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते त्याचे मूळ कारण हेच आहे.इस्लामला जर खरा "खतरा" असेल तर तो धर्मवेड्या मुल्ला-मौलवींचा आणि तथाकथित धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली चालणार्‍या ब्रेनवॉशचा. जो पर्यंत मुस्लिम युवक आणि समाज या गोष्टींपासुन दुर जाणार नाही,आणि त्यांच्या धर्माची खरी आयडियालॉजी तपासुन पाहणार नाही तसेच अशा घटनांचा विरोध करण्याचे कष्ट घेणार नाही तो पर्यंत जगाच्या / लोकांच्या त्यांच्या बद्धल /धर्मा बद्धल आणि त्यांच्या विषयीचा दॄष्टीकोन बदलणार नाही ! आजच्या घडीला इंटरनेटमुळे आयएसआयएस सारख्या अतिरेकी संघटने मधे जाणारे हिंदूस्थानी मुस्लिम युवक याच धर्मवेडापायी खरा "इस्लाम" बुडवु पाहत आहेत आणि अश्या युवकांना या विचार धारणेपासुन मुक्त आणि दुर करण्याचे काम हे यांच्याच समाजाचेच असायला हवे नाही का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा