Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बळीराजाची बोगस बोंब!

ह
हुप्प्या
Tue, 12/16/2014 - 17:09
🗣 121 प्रतिसाद
लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्‍यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे. http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-should-stop-financial-package-or-subsidy-of-farmers-suffer-loss-by-natural-calamity-1051676/ काही मुद्दे असे की शेतकर्‍यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत. पण ह्या एकतर्फी वार्तांकनाचे मूल्यमापन केले पाहिजे असे मत ह्या लेखाने मांडले आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी, मदत हे दिसायला चांगले वाटले तरी जर त्यात लबाडी होत असेल तर हा कराच्या पैशाच्या गैरवापर आहे. त्यामुळे एखादी शाळा बांधली जात नसेल, एखादा पूल बांधायला विलंब होत असेल, एखादी नवी एस टी बस सुरु होऊ शकत नसेल. त्यामुळे प्रत्येक अकाली पावसाने सगळे शेतकरी आयुष्यातून उठतात आणि त्यांना सावरण्याची जबाबदारी उरलेल्या लोकांची आहे हा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

प्रतिक्रिया द्या
48603 वाचन

💬 प्रतिसाद (121)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 12/17/2014 - 08:38 नवीन
भाजीपाल्याचा भाव्,फळांचा भाव शेतकरी ठरवतो असे अनेकांचा गैरसमज आहे.त्यामुळे संपादकीय वाचून अनेकजण माना डोलवत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
आ
आनन्दा Wed, 12/17/2014 - 11:17 नवीन
तुमचा गैरसमज होतोय. शेतकर्‍यांना डायरेक्ट पॅके़ज देण्यापेक्षा इतर गोष्टींवर उपाय करणे आवश्यक आहे. आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही विसरलातच.
शेतकरी म्हटला की जो काही सामुदायिक कळवळा व्यक्त होतो तो वास्तविक अल्पभूधारक वा शेतमजुरांच्या परिस्थितीविषयी असतो वा असायला हवा. परंतु त्यांच्या हलाखीचे चित्रण आपल्यासमोर येत नसल्याने ते ज्याचे समोर येते त्याच शेतकऱ्यास आपण गरीब बापुडा समजून सहानुभूती व्यक्त करीत असतो
हे ही वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 12/17/2014 - 11:39 नवीन
ज्यांना मदत लागणार आहे त्यांना करावी असे म्हणते. सरकारी पांढरे हत्ती- कितीतरी पब्लिक सेक्टर कंपन्या चालू होत्याच ना वर्‍शानुवर्षे तोटा सहन करत्?दारूबाज मल्ल्यांच्या विमान कंपनीला किती हजार कोटींचे कर्ज सरकारी बँकांनी दिले?आताच स्पाइस जेट 'जमीनीवर' आलेय असे चॅनेलवर सांगत होते.बंद करा मग तेल कंपन्यांचे पैसे देत नाही तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 12:18 नवीन
@माई - हे ही बघा स्पाईस जेट/कींगफिशर मधले कीती पैसे स्वस्त प्रवास केल्यामुळे अप्रत्यक्षरीत्य प्रवाशांना मिळाले? शेकडो नोकर्‍या काही वर्ष उपलब्ध झाल्या त्याचे काय? किंगफिशर बुडाल्यामुळे ज्यांच्या नोकर्‍या गेल्या त्यांच्या बद्दल शेतकर्‍यांनी काय केले, त्यांना फुकट धान्य किंवा काजू ( हे फक्त पैसाताईंसाठी ) दिले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
पैसा Wed, 12/17/2014 - 12:53 नवीन
काजू ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. आणि एकूणच फुकट सबसिड्या वाटणे मला अज्जिबात पसंत नाही. प्रत्येकाने चोख काम करा. ऱोख दाम घ्या. शेतकर्‍यांना इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या स्लॅबप्रमाणे टॅक्स लावलाच पाहिजे. आणि विमान कंपन्यांनाही आर्थिक मदत्/पॅकेजेस बंद झाली पाहिजेत. या विमान कंपन्या फक्त भारतातच बुडतात का सगळीकडेच? मल्ल्याची विमान कंपनी बुडाली त्याचवेळी आयपीएल च्या गटारात तो ढिगांनी पैसे ओतत होता. त्याच्या कंपनीला कशाला पाहिजे आर्थिक मदत आणि पॅकेज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 15:56 नवीन
अरे माई, भाजीपाल्याचा भाव्,फळांचा भाव कोण व कसा ठरवितात आणि शेतकर्‍याला व अंतिम ग्राहकाला मिळणार्‍या भावात किती व का फरक असतो हे तू जरा समजावून सांगतोस का? अवांतर - नाना पण शेती करायचे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ख
खटपट्या Wed, 12/17/2014 - 18:48 नवीन
अरे माई,
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 09:42 नवीन
ह्या प्रश्नाचा संबंध काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
स
सुबोध खरे Wed, 12/17/2014 - 16:03 नवीन
@ बाबा साहेब जर मी शेती करत नसेन किंवा केली नसेल तर मला त्या प्रश्नातील काहीच समजत नाही/समजणार नाही हे म्हणणे बरोबर नाही. या न्यायाने आज भारतीय लष्कराच्या विचारवृंदात ( THINK TANK) मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचाच भरणा असायला पाहिजे. तसे बरोबर नाही ज्याने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे तो माणूस या विचारवृन्दात समाविष्ट केला जाऊ शकतो.असे अनेक अत्यंत हुशार आणी चतुरस्त्र सिव्हिलीयन्स( ज्यांनी युद्ध भूमी पाहिलेलीसुद्धा नाही). यात आहेत आणी त्यांची मोलाची भर/मदत लष्कराच्या डावपेच आणी नीती साठी होते आहे. राहली गोष्ट लष्कराबद्दल बोलण्याची-- मग विक्रांत हि मोडीत काढावी कि नाही या सारख्या विषयाबद्दल( असा धागा कुणीतरी काढला होता) फक्त माझ्य्सारखा एखादाच( कदाचित मिपावर मी एकटाच असेन) बोलू लिहू शकेल ज्याने विक्रांत वर कधीतरी काम केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/17/2014 - 19:34 नवीन
कितीजण शेती करतात ? व्यवसाय फायदेशीर करणे हा हेतू असेल तर हा प्रश्न योग्य नाही. एखादा व्यवसाय दुष्टचक्रात सापडून सतत बुडीत जाऊ लागला तर त्यामागे बहुदा त्या व्यवसायात वंशपरंपरागत होत असलेल्या चुकांना आणि बदलाला रोखणार्‍या लोकांचे काहीतरी चुकत असणार हे सत्य असते. अश्या परिस्थितीत त्या व्यवसायाकडे त्रयस्थपणे पाहून विश्लेषण करण्याची गरज असते... असा "आउट ऑफ बॉक्स" विचार बॉक्समध्ये असणार्‍यापेक्षा त्या व्यवसायात नसलेल्या त्रयस्थ व्यक्ती जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात... कारण जर मूळ व्यावसायिकाला ते जर शक्य असते तर तो व्यवसाय बुडीत गेलाच नसता, नाही काय ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ज
जेपी Wed, 12/17/2014 - 08:43 नवीन
@माई, माझ्या धाग्यावर एक पण प्रतिसाद नाय दिला.ईकडे दोन दिलेस. तुझे 'हे' काय म्हणतील?
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 12/17/2014 - 10:23 नवीन
मुळाता एखादा माणूस शेती करतो म्हणजे देशावर आणि पर्यायाने शेती न करणार्‍या सगळ्यांवर उपकार करतो ही भावना का असावी असा प्रश्न आहे. शेती हा एक धंदा आहे. प्रत्येक व्यवसायाचे फायदे आणि तोटे असतात. ज्याला जमत नसेल त्याने करू नये. उगाच आमच्यावर उपकार केल्याची भावना दाखवू नये. आमच्याच कराच्या पैशांवर ह्यांनी दशकानुदशकं फुकटेगिरी करायची आणि वर आम्हालाच उपदेशाचे डोस पाजायचे हा कॄतघ्नपणा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 10:28 नवीन
अन असे बोलले की 'तुम्ही कधी शेतावर राबलात का', 'तुमची काय लायकी आहे', इ.इ. प्रश्नही येतात. सत्य पचत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Wed, 12/17/2014 - 10:45 नवीन
तुम्ही कधी तीन तीन दिवस ऑफिस मधेच राहिलात का? घरच्यांशिवाय दसरा दिवाळी घालवलेत का? आपल्या एका चुकीच्या क्लिकमुळे क्लायंटचे शेकडो कोटी बुडू शकतात ह्यांचं टेंशन घेतलंत का? सणांपासून घरच्या कार्यक्रमांपर्यंत अनेक प्रोग्राम ऐनवेळी कँसल केल्यावर पडलेले मुलांचे/बायकोचे/आई-वडिलांचे चेहेरे पाहिलेत का? अचानक नोकरी गेल्यावर बँकेने बजावलेले घर जप्तीची नोटिस वाचलीत का? अतीताणामुळे ३४-३५ व्या वर्षी हॄदयविकाराने नवरा गमावलेल्या बायकोचे सांत्वन केलेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/17/2014 - 10:51 नवीन
अगदी अगदी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ग
गजानन५९ Wed, 12/17/2014 - 11:05 नवीन
@ आदिजोशी अगदी सहमत आहे. जमत नसेल तर शेती धंदा बंद करा आपल्या इथे व्यावसायिक पद्धतीने किती जन शेती करतात हो बाबा पाटील ? (२/४% चा अपवाद सोडून ) आणि आम्ही शेती करत नाही कारण आमच्या बाप जाद्य्यांनी आमच्या साठी नाय ठेवल्या जमिनी पण म्हणजे याचा अर्थ असा नाय कि तुमी शेतकरी लोक आमच्यावर उपकार करता. साला उठसुठ हे शेतकऱ्यांचे कैवारी शहरी पब्लिकचे तोंड बंद करते कारण काय तर म्हणे तुमी कधी शेती केली काय ? असला बालीशपणा जगात नसेल कुठे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ट
टवाळ कार्टा Wed, 12/17/2014 - 11:51 नवीन
आईग्ग....एकदम दिल को छू लिया ये लिखके :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
न
नाखु गुरुवार, 12/18/2014 - 05:12 नवीन
एक किस्सा : दुकानदार : अहो मगापासून सांगतोय हे कोंबडीचे अंडे आहे तुमचा विश्वास कसा बसत नाही?? ग्राहकः अहो मल कोंबडीची अंडी माहीती आहेत, ही नक्की ती नाहीत. दुकानदार : तुम्ही कधी अंडी दिलीयत का? उगाच शंका काढताय!! ग्राहकः मीच काय तुम्ही सुद्धा कधीही अंडी दिली नाहीत पण मी अंड्याचे आम्लेट वैगेरे करून खाल्ले आहे तेव्हा हे तत्वज्ञान आणि अंडी तुमच्या पाशीच ठेवा. *YAHOO* *YAHOO!*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/18/2014 - 08:02 नवीन
नायतर काय तेच्यायला. प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे असे म्हटल्यापैकीच आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुबोध खरे गुरुवार, 12/18/2014 - 08:34 नवीन
मग पुरुष गायनॅकॉलॉजिस्टने काय करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/18/2014 - 09:39 नवीन
तेच तर म्हणतोय. उद्या समजा पुरुष गायनॅकला "तुम्ही कधी प्रेग्नंट झालात का? नै ना? मग तुम्हांला काय कळणार स्त्रियांच्या आरोग्याबद्दल?" असं कुणी म्हटलं तर त्या म्हणणाराची जशी संभावना होईल तसेच इथेही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मदनबाण Tue, 12/23/2014 - 12:10 नवीन
@ आदि +१०० तुम्ही कधी तीन तीन दिवस ऑफिस मधेच राहिलात का? घरच्यांशिवाय दसरा दिवाळी घालवलेत का? आपल्या एका चुकीच्या क्लिकमुळे क्लायंटचे शेकडो कोटी बुडू शकतात ह्यांचं टेंशन घेतलंत का? सणांपासून घरच्या कार्यक्रमांपर्यंत अनेक प्रोग्राम ऐनवेळी कँसल केल्यावर पडलेले मुलांचे/बायकोचे/आई-वडिलांचे चेहेरे पाहिलेत का? अगदी ! हे सगळं खरं आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
म
मराठी_माणूस Wed, 12/24/2014 - 07:06 नवीन
हे सगळे अनुभव घेतलेले , अतिशय सोशीक, कसलेही टेंन्शन फेस करु शकणारे लोक घरच्या शेती पासुन मात्र दुर रहातात. ते का बरे स्वत: शेती करुन अशा संकट समयी न डगमगता कसे तोंड द्यायचे ह्याचे उदाहरण घालुन देत. ह्याचे कारण , उपरोक्त गोष्टी अपवादात्मक असतात आणि त्याची झळ फारशी मोठी नसते. चुक झाली तरी कंपनी ते सांभाळयला समर्थ असते , चुक करणार्‍याचा पगार, पीएफ, भत्ते अबाधीत असतात. शेतकर्‍याची वर्षभराची मेहनत एका झटक्यात मातीमोल होते त्याची दसरा/दीवाळी साजरी न करता आल्याशी कशी काय तुलना होउ शकते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
प
प्रदीप Wed, 12/24/2014 - 16:01 नवीन
चुक झाली तरी कंपनी ते सांभाळयला समर्थ असते , चुक करणार्‍याचा पगार, पीएफ, भत्ते अबाधीत असतात. आपण कुठल्या शतकांत वावरत आहात, साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Fri, 12/26/2014 - 07:25 नवीन
हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
S
sanju Wed, 12/17/2014 - 10:36 नवीन
huppya ani ayurhit yanni agadi yogya mat mandalele aahe.mi swata aka vittiya sansthet karjavitaran ani karja vasuli che kam kartoy. tehi vidarbhatalya gramin bhagat. ithale shetakari ata BALIRAJA vagaire rahilele nahit.arthat kahi sanmanniy apavad (uttam shetakari) shillak ahet.mi gelya kahi varshat kelele nirikshn det aahe. 1)kahi shetkari (purush) shetavar kamala na jata gavatlya pantaparichya savalit basun dilli te galli vayfal charcha karat bastat.ashaveli tyachi bayako shetavar kamat asate. 2)daru,jugar,matka yanche vyasan vadhalele aahe. 3)kamache tasech arthik niyojan yanchi univ janavte. 4)jastit jast sarkari yojana padarat padun ghenyasathi satat tahasil karyalay,panchayat samiti yethe chakara marun paisa ani kamacha vel vaya ghalavtat. 5)shetkariputra je thodefar shikale (B.A.sarkhe) ahet tyana shetkamachi laj vatate.te gavat undarat asatat pan bapacha vichar karat nahi.tyamule majuravar kharch karava lagato. 6)ghetalele karjachi paratfed karnyachi mansikta nahi.sarkari karj mafi yeil mhanun muddam karj thakbaki karun thevatat. saddhy avadhech lihito. mazi mipavar lihinyachi pahilich vel ahe.pudhaya veli devnagarit lihin .he nirikshan sarsakat sarva shetkaryana lagu nahi.mi swata shetkari aahe.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 05/11/2017 - 08:34 नवीन
6)ghetalele karjachi paratfed karnyachi mansikta nahi.sarkari karj mafi yeil mhanun muddam karj thakbaki karun thevatat.
हा प्रकार मी नुकताच कोकणात पाहिला. एकाने पीक कर्ज घेतले. सुरुवातीचे काही हप्ते भरले. नंतर शेतकरी कर्ज माफीचे वारे वाहू लागले. झालं, साहेबांनी हप्ते भरणे बंद केले. ब्यांकेची लोकं फेऱ्या मारतात आणि हे भाऊसाहेब आज ना उद्या कर्जमाफी होणार या आशेने ब्यांकवाल्याना थातूर मातूर कारणे देऊन परत पाठवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanju
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 12:20 नवीन
kahi shetkari (purush) shetavar kamala na jata gavatlya pantaparichya savalit basun dilli te galli vayfal charcha karat bastat.ashaveli tyachi bayako shetavar kamat asate.>>>>>> काही नाही हो, हे प्रमाण खुप आहे. शेतकर्‍याच्या घरची बाईच शेती चालवते.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 12/17/2014 - 13:01 नवीन
फिफ्टी झाल्या बद्दल श्री.हुप्या आणी विंग्रजी प्रतिसाद देणारे श्री.sanju यांचा सत्कार पॅकेज देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी समस्त कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/17/2014 - 13:04 नवीन
"होउ दे खर्च" वाला फ्लेक्ष नाय का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Wed, 12/17/2014 - 13:21 नवीन
फ्लेक्ष साठी कोन पॅकेज देईल याची वाट पाहात आहे.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी Wed, 12/17/2014 - 13:34 नवीन
धागा आणी प्रतिसाद वाचुन munna bhai mbbs आठवला. "कोई अपने बिवी से परेशान हे,तो कोई अपने बॉस से,बोल कर दुं तुझे इस पब्लीक के हवाले" *biggrin*
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 12/17/2014 - 13:57 नवीन
या प्रश्नांवर शेतीचे खाजगीकरण सारखा काही उपाय करता आला तर ? उदाहरणार्थ शेतकरयांनी जर त्यांची शेती हि शेतकी क्षेत्रातील मोठ्या उद्योगांना शेती कामासाठीच भाडे तत्वावर चालवायला दिली तर या क्षेत्रालाही काही शिस्त येइल . व शेतकरयांवरचा भारही थोडा कमी होइल . मोठे उद्योग / एग्रो इंडस्टीज जसे - बायोकॉन , ग्रीन हाउस , शेतकी क्षेत्रातील विद्यापीठे , शेतकी क्षेत्रातील संशोधन संस्था , शेतकी क्षेत्रातील बँका .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 12/17/2014 - 14:22 नवीन
शेती सतत नफा मिळवून देणारी असती तर अंबानी,अडानी,पटेल्,शहा शेती करताना दिसले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 15:52 नवीन
टाटा करतात की शेती आणि भरपूर नफा मिळवितात. टाटा टी माहिती असेलच ना. टाटा टी नानांचा आवडता ब्रँड होता ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 12/18/2014 - 05:35 नवीन
पूजनीय्/वंदनीय/प्रातःस्मरणीय गुरूजी, टाटा ट्रकपासून सॉफ्टवेयर सगळेच काही बनवतात कारण ते टाटा आहेत,त्यांच्याकडे भांडवल खूप आहे. त्यामुळे दोन वर्षे पाउस कमी झाला तर त्यांना दुकान बंद करावे लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/18/2014 - 05:40 नवीन
पण टाटांची शेती तोट्यात गेली अशी बातमी कधी वाचली नाहिये अजून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
आ
आयुर्हित गुरुवार, 12/18/2014 - 07:33 नवीन
माई सायबांनी खूप मौलिक सल्ला दिला आहे. फक्त शेतीवर अवलंबून असले तर नक्कीच गोची होणार हे जागतिक सत्य आहे. त्यासाठी पशु (शेळी/मेंढी, म्हैस गाय),इमू/कोंबडीपालन व (राजकारण सोडून व राजकारण्यांच्या मागे मागे फिरणे सोडून) इतर जोडधंदे (खाद्य प्रक्रिया, ग्रामोद्योग) करावेत कमीत कमी पुढच्या पिढीला चांगले शिक्षण/प्रशिक्षण द्यावे! माई सायबांनी खूप मौलिक सल्ला दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/18/2014 - 07:43 नवीन
सरकार कंपन्यांना शेती करायला परवानगी देत नाही ना, नाहीतर नक्कीच अंबानी/अडानी अ‍ॅग्री अशी कंपनी दिसली असती. कंपन्यांना शेती करायची परवानगी दीली तर मग ह्या शेतकरी नेत्यांच्या पोटापाण्याचे काय होणार आणि दुष्काळ आणि पूरात राजकारण्यांना पैसे खायला कसे मिळणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/18/2014 - 07:48 नवीन
+११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
आ
आशु जोग Wed, 12/17/2014 - 14:22 नवीन
हुप्प्यरावन्ना काहीतरी मिळाल याचा आनंद वाटतो पेशावरवर गुरुजींनी उत्तम लेख लिहीला... त्यामुळे **नंदमधे काय छापायचं प्रश्नच होता
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 12/19/2014 - 06:28 नवीन
आजच्या लोकसत्ता मधील खालील बातमी आणि लोकांच्या प्रतिक्रिया वाचा १) http://www.loksatta.com/maharashtra-news/all-parties-slams-loksattas-editirial-on-relief-fund-to-farmers-suffering-from-hailstorm-1052892/ २) http://www.loksatta.com/sampadkiya-news/relief-package-for-hailstorm-hit-farmers-equitable-1052324/ ३)http://www.loksatta.com/sampadkiya-news/negative-subsidies-to-farmers-1052704/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/19/2014 - 09:30 नवीन
लोकसत्ताचा अग्रलेख मला तरी आवडला आहे. काल महाराष्ट्र सरकार अग्रलेख वाचून चर्चा करीत होते म्हणजे निषेध करत होते हे पाहुन बरं वाटलं. वरीजनल शेतक-यांना फायदा मिळतो का ? इथपासून शासनाच्या सर्व योजना मिळवून गब्बर झालेल्या शेतकर्‍यांवर जरा शासनाने गंभीर चर्चा केलीच पाहिजे. बाकी, लोकसत्ताने दैनिक म्हणुन नेहमीच एक अस्तित्व दाखवलं आहे, एक वेगळं संपादकीय नजरेत भरणारं असंच आहे. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 12/19/2014 - 12:43 नवीन
+१
बाकी, लोकसत्ताने दैनिक म्हणुन नेहमीच एक अस्तित्व दाखवलं आहे, एक वेगळं संपादकीय नजरेत भरणारं असंच आहे.
असाच आवडलेला गिरीश कुबेरांचा लोकसत्ता दिवाळी अंकातला लेख, http://www.loksatta.com/diwali-magazine/media-1049437/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मार्मिक गोडसे Fri, 12/19/2014 - 12:36 नवीन
ह्या धाडसी अग्रलेखाला सलाम ! हात जोडून मदतीची भिक मागणार्‍या बळीराजाला सलाम. बांधावरून भाऊबंधांचे बळी घेणार्‍या बळीराजाला सलाम. वहिवाटिवरून वाटमारी करणार्‍या बळीराजाला सलाम. व्यापार्‍यांना फळबाग विकणार्‍या बळीराजाला सलाम. **वरचा घाव (व्यापार्‍याकडून फसवणूक) लपवणार्‍या बळीराजाला सलाम. देशासाठी(?) तोट्याची शेती करणार्‍या बळीराजाला सलाम. ऋण काढून लेकीचे धूमधडक्यात लगीन लावणार्‍या बळीराजाला सलाम. शेतीचे निमित्त करून आत्महत्या करणार्‍या बळीराजाला सलाम. ह्या बळीराजाला सहानुभूती दाखविणार्‍या बावळट नागरिकांना सलाम.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 12/19/2014 - 14:00 नवीन
सरसकट पणे बळीराजाची थट्टा उडवू नये ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 12/19/2014 - 15:06 नवीन
जो स्वाभिमानाने आपल्या मर्यादेत जगतो त्याच्यावर अशी नामुश्की येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/19/2014 - 13:56 नवीन
धाडसी अग्रलेख ! कोणत्याही व्यवसायाला 'खरेच' फायदेशीर बनवायचा असेल तर सर्वप्रथम 'तो स्वतःच्या पायावर उभा राहून' 'त्यांत निरोगी स्पर्धा कशी होईल' हे करण्यासाठी त्याचे डोळसपणे (प्रामाणिक) विश्लेषण करणे आणि योग्य बदल करणे जरूरीचे आहे. पण, सत्य कटू असते आणि आता ते झाकण्यासाठी हितसंबंधी कोणत्याही थराला जातीलच (नेहमीप्रमाणे).
  • Log in or register to post comments
म
मराठे Fri, 12/19/2014 - 15:28 नवीन
शेती'व्यवसायामधे' सरकारने कुठलीही लुडबूड करू नये. त्यांना सबसिड्या देऊ नका तसेच त्यांच्यावर निर्बंधही (भाव नियंत्रीत ठेवणे इ.) लादू नका. अर्थात यासाठी शेतकरी लॉबीनेच पुढाकार घेतला पाहिजे... जे होताना दिसत नाही कारण तळागाळातील शेतकर्‍यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतच नाही. आणि बडे 'शेतकरी' आपल्याला हवं तसं प्याकेज पदरात पाडून घेतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/19/2014 - 16:05 नवीन
शेतमालाचे भाव कसे ठरतात आणि शेतकर्‍याला मिळणारा भाव व अंतिम ग्राहक देत असलेली किंमत यात किती व का फरक असतो हे कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा