Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.

स
सतिश गावडे
Wed, 12/17/2014 - 20:51
🗣 63 प्रतिसाद
श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.
हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं? "आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे" हे मजेत जगण्यासाठी आहे हे केवळ तत्वज्ञान आहे. स्पष्ट बोलायचं तर सत्य काय आहे हे माहिती नसल्यामुळे दिलेली थुकपट्टी. नोबडी नोज व्हाय दी हेल वुई आर हीअर ऑन धिस अर्थ. वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन गुड वे ऑर बॅड वे टील डेथ नोक्स अवर डोअर (ऑर वुई नोक डेथ'स डोअर इन सम केसेस.) आजचे समृद्ध सजीव सृष्टी (ज्यात माणूसही आला) एकपेशीय सुक्ष्मजीवापासून उत्क्रांत झाली हे विज्ञान पुराव्यासह छातीठोकपणे सांगतो. मात्र हा पहिला एकपेशीय सुक्ष्मजीव कसा जन्माला आला याचे ठाम उत्तर विज्ञानाकडे आज तरी नाही. महास्फोटाचा सिद्धांत हा केवळ सिद्धांत आहे. वैज्ञानिक सत्य नाही. मात्र जे आपल्याला माहिती नाही त्याला "क्ष" मानायची ही माणसाची जुनी खोड आहे. उत्क्रांतीचे ज्ञान जेमतेम दिडशे पावणे दोनशे वर्ष जुने आहे. (डार्विनबाबाचे आभार त्यासाठी) मात्र त्याच्याआधी हजारो वर्षांपासून हा प्रश्न माणसाला पडला असणार (पृथ्वीचे आयुष्य अंदाजे ४५० कोटी वर्ष आहे. मानवजातीचे आयुष्य सांगणे तसे अवघड आहे. कपीवर्गातून मानव प्राण्यात उत्क्रांत होण्याच्या नेमक्या कुठल्या अवस्थेपासून हे आयुष्य मोजायचं हा प्रश्न आहे.) तर मुद्दा असा आहे की खुप पूर्वी मनुष्य प्राण्याला मी या भूतलावर का आहे हा प्रश्न पडला असणार. मी ही जी आजूबाजूची सृष्टी पाहतो ती कुणी बनवली या प्रश्नाने डोके भंजाळून गेले असणार त्याचे. उत्तर न मिळाल्याने त्याने सृष्टी निर्मात्याला "क्ष" मानले आणि त्याला नाव दिले "देव". या अवाढव्य पसार्‍याचा, क्षणात आग ओकणार्‍या ज्वालामुखीचा, क्षणात होत्याचे नव्हते करणार्‍या महापुराचा, जंगल जाळणार्‍या आगीचा, महाप्रलयाचा, वावटळीचा निर्माताही तितकाच ताकदवान असणार. मग माणसानेच ठरवले. देव सर्वव्यापी आहे. देव सर्वशक्तीमान आहे. देव सर्व जाणतो. देवाने हे आयुष्य मला आनंदाने जगण्यासाठी दिले आहे. जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही. सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही. मी तर देव मानत नाही. जे मानतात, त्यांचं काय मत आहे याबद्दल? आपल्या शेजारच्या देशात घडलेल्या निष्पाप बालकांचे शिरकाण ही जी कुणी विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे ती कसे पाहू शकते? की तिथेही आपला लाडका कर्मविपाकाचा सिद्धांत वापरायचा आणि स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे? ----------------------------------------------------------------------- टंकणे बरेचसे विस्कळीत आहे याची जाणिव आहे.

प्रतिक्रिया द्या
14009 वाचन

💬 प्रतिसाद (63)
आ
आयुर्हित Wed, 12/17/2014 - 21:09 नवीन
याचा अर्थ याच्या आधीही स्वतःला मूर्ख बनवलेले आहे असेच दिसते!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 04:31 नवीन
माणसाला कर्मविपाकाची कल्पना सुचून तिने समाजमनाची पकड घेतल्यापासून काल परवापर्यंत अगणित वेळा माणसाने स्वतःला मूर्ख बनवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 06:26 नवीन
तुम्हाला हवे असलेले उत्तर देतो: मी हवेत गोळीबार करतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ख
खटपट्या Wed, 12/17/2014 - 21:25 नवीन
वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन गुड वे ऑर बॅड वे टील डेथ नोक्स अवर डोअर (ऑर वुई नोक डेथ'स डोअर इन सम केसेस.)
आपण म्रुत्युला टाळू शकत नाही. आणि ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही त्याबद्दल दु:ख करत बसण्यात काय हशील? म्हणून
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.
बघा पटलं तर....
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 04:38 नवीन
आपण म्रुत्युला टाळू शकत नाही. आणि ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही त्याबद्दल दु:ख करत बसण्यात काय हशील?
हा मुद्दाच नाही. मी या वाक्याच्या आधीचे आणि हे दोन्ही वाक्य सलग लिहिली होती. तुम्ही या एकाच वाक्याचा स्वतंत्र अर्थ लावलामुळे तुमचा असा समज झाला असावा. या वाक्याचा आधीचे वाक्य होते "नोबडी नोज व्हाय दी हेल वुई आर हीअर ऑन धिस अर्थ." आपण जन्माला का येतो किंवा ही जीवसृष्टी का निर्माण झाली हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे "आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी आहे" हा तत्वज्ञानाचा मुलामा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 12/18/2014 - 05:09 नवीन
ओके !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी गुरुवार, 12/18/2014 - 02:18 नवीन
देव नाही हे लोकांना कळाल तर बरेच प्राब्लेम सुटतील.कारण नंतर लोक देवावर हवाला ठेवुन बसण्याऐवजी सगळी प्राब्लेम स्वत: सोडवायचा प्रयत्न करतील.मग रिकाम्या गोष्टी साठी वेळ मिळणार नाही. (जनरल)जेपी
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/18/2014 - 05:46 नवीन
पण त्यामुळे जे लोक देव आहे असे समजून जो काही थोडा प्रामाणिकपअ / पुण्य करतात ते सुध्धा मोकाट सुटतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 05:52 नवीन
"देवाला" भिऊन समाजास त्रासदायक होणार्‍या गोष्टी न करणारे खुप कमी आहेत रे. "देवाचा" वापर करुन आपले अजेंडे राबवणार्‍यांचे प्रमाण कितीतरी पटीने जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/18/2014 - 06:01 नवीन
माझा मुद्दा तोच आहे...देव नाही असे एकदा ठरले...की त्रास देणार्या लोकांचीच संख्या वाढणार जे काहीच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देव ही एक भोळी आशा तरी असते...आंइ आणि आशावाद असेल तरच माणुस बर्याचदा वाईट परिस्थितीतून सांभाळू शकतो त्यामुळे माझे तरी असेच मत आहे...भारतातल्या लोकांसाठीतरी देव हि संकल्पना असावी....तो देव खरोखर असेल तर ते सिध्ध कसे करायचे हे त्याचे तो बघेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 06:38 नवीन
मात्र तू म्हणतोस त्या लोकांची सहज प्रवृत्ती भित्रेपणाची असते. देव हा केवळ बागुलाबोवा असतो. देवाच्या जागी अजून कशाची भीती दाखवली तरी ते घाबरतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी गुरुवार, 12/18/2014 - 06:41 नवीन
एक्झाटि... टणाटण लो़कांना देवाची गरज नाही.. ते त्यांना हव तेच करणार.. नसलेल्या व्याख्या काढुन .. लोकाना भिती घालणे अवघड नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी गुरुवार, 12/18/2014 - 05:59 नवीन
सगा ला +1
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 12/18/2014 - 07:13 नवीन
गॄहपाठ : आत्मनो मोक्षार्थ जगाद हितायच ! या वाक्याचा अर्थ समजावून घ्या. कराच थोडी शोधाशोध ! कष्टेवीण फळ नाही. ज्ञान प्राप्त करणे हे कलफलक बडविण्याइतके सोपे असते तर किती बरे झाले असते
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 07:20 नवीन
आत्मा ही संकल्पना आहे. वास्तव नाही. जे अस्तित्वातच नाही त्याला मोक्ष कुठला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रचेतस गुरुवार, 12/18/2014 - 07:24 नवीन
आमचे एक मित्र आहेत आत्मा नावाचे जे वास्तवात अस्तित्वात आहेत. हा आता त्यांना मोक्षाप्रत जायचे नाहीये कारण ते अत्रुप्त आहेत इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/18/2014 - 07:46 नवीन
ते आजकाल फारच ग्लोबल झाले आहेत. तरी पण आता आंतर-सुर्यमाला विवाहात आंतरपाट धरायच्या प्रयत्नात आहेत, असे ऐकिवात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/18/2014 - 09:39 नवीन
आंतर-सुर्यमाला विवाहात आंतरपाट धरायच्या प्रयत्नात आहेत
हा काय प्रकार आहे बे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आयुर्हित गुरुवार, 12/18/2014 - 09:53 नवीन
he will hold intermediate cloth in hand for inter solar system marriage! (वऱ्हाड निघालय लंडनला फ्यान)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 09:58 नवीन
बुवांनी नुकतंच नेपाळी पोरगी आणि लंडनवाला पोरगा ह्यांचं लग्न लावलंय. आंतरराष्ट्रीय लग्नानंतर आंतर सुर्यमाला विवाह बुवा लावतील च असा विश्वास ह्याठिकानी आम्हाला वाटतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/18/2014 - 07:44 नवीन
जे अस्तित्वातच नाही त्याला मोक्ष कुठला. अरे बापरे... तुम्ही फारच सिरीयस झालेला दिसताय? अहो, प्रत्येकाचा आत्मा वेगळा आणि त्याला खूष ठेवण्याचा मार्ग पण वेगळा. मला विविध क्षेत्रातल्या आणि य्त्तम विचारसरणीच्या माणसांना भेटायला आवडते.ते भेटले की निदान त्या काळाकरता तरी मन समाधानी राहते. बायकोने आपणहोवून कोलंबीचा रस्सा केला की आपण त्या दिवशी खूष. मुलाने रात्री झोपण्यापुर्वी माझे पाय चेपले की आमचा आत्मा खूष. प्रसंग छोटेच असतात.आपण समाधानी रहायचा प्रयत्न करायचा. आणि एक सांगायचे म्हणजे... आपले मन हाच आपला आत्मा. असे माझे ठाम मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 08:03 नवीन
>>> आपले मन हाच आपला आत्मा. :) अम्मळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
व
विटेकर गुरुवार, 12/18/2014 - 09:59 नवीन
अम्मळ मौज वाटली. अफाट कल्पना असतात एकेक ! अभ्यास शून्य , वाद उकरायची हौस ! हिन्दू धर्मात इतके प्रचन्ड साहित्य उपलब्ध असूनदेखील भल्या- भल्यांची संकल्पना पुरेशी स्पष्ट नसते याचे आश्चर्य वाटते ! अहो सतिश साहेब , आत्मनो मोक्षार्थ... मधला आत्मा मन- बुद्धीवाला नाही ...आत्मनो म्हणजे स्वतः चा ! अभ्यास वाढवा ! गृहपाठ -२ मोक्ष म्हणजे काय ? हिन्ट : मोक्ष म्हणजे salvation नव्हे ! नाहीतर गुगलून बघाल आणि याल पुन्हा वाद घालायला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
व
विटेकर गुरुवार, 12/18/2014 - 10:00 नवीन
हलके घ्या हे वेगळे सांगणे न लगे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/18/2014 - 21:07 नवीन
स्वर्गाच्या आणि मोक्षपदाच्या कल्पना व्यक्तीगणिक बदलतात. मोक्षपद किंवा मोक्ष एकदाच कशाला? रोज का नको मिळायला? उत्तम खाणे, उत्तम विचारी (समविचारी असलेच पाहिजेत, असे नाही.) व्यक्तींबरोबर रंगलेला गप्पांचा फड, ह्यात सरलेला काळ पण निदान तेव्हढ्या काळापुरता तरी आम्हाला मोक्षा सारखाच वाटतो.आणि मला पण तो आवडतो. घटा घटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे मोक्ष वेगळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 20:06 नवीन
विटेकर काका, विरोधी मताची "अभ्यास शुन्य" अशी संभावना तुमच्याकडून अपेक्षित नव्हती. वयाची जवळपास बावीस तेवीस वर्ष मी ईश्वरवादी होतो. अगदी इथल्या बर्‍याच प्रतिसादकांप्रमाणेच फार सखोल अभ्यास नसला तरीही पुनर्जन्म, आत्मा वगैरे संकल्पनांवर विश्वास होता. एका योगायोगाने या विषयात मी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. जे वाचलं त्यावर चिंतन, मनन केलं. स्वतःशीच पडताळा घेण्याचा प्रयत्न केला. जे वाचलं त्याची प्रातिनिधिक उदाहरणे इथे देतो. कर्माचा सिद्धांतः हिराभाई ठक्कर या पुस्तकाबद्दल मी काही टंकण्याची आवश्यकता नाही. Karma and Reincarnation: Paramhansa Yogananda परमहंस योगानंदांनी लिहिलेल्याया पुस्तकावद्दलही काही वेगळं लिहायला नको. पुस्तकाचं नाव बोलकं आहे. Reincarnation and Karma: Edgar Cayce From Death To Birth: Understanding Karma And Reincarnation: Pandit Rajmani Tigunait Many Lives, Many Masters: Brian L. Weiss अमेरिकेतील एका मानसोपचार तज्ञाने संमोहनाच्या साहाय्याने एका पेशंटच्या "मागील" ८६ जन्मांचा उलगडा केला त्यावर आधारीत पुस्तक. Life Before Life: A Scientific Investigation of Children's Memories of Previous Lives: Jim Tucker अमेरिकितील युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया स्कुल ऑफ मेडीसीनच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ इयान स्टीव्हन्सन यांनी चाळीस वर्ष जगभरातील "पुनर्जन्माच्या" घटनांचा अभ्यास केला. त्या अभ्यासातील नोंदीवर आधारीत असे हे पुस्तक त्यांचे कनिष्ठ सहाध्यायी जिम टकर यांनी लिहिले. ही सारी पुस्तकं मी स्वतःच्या पैशाने विकत घेऊन वाचली आहेत. ही पुस्तके म्हणजे कथा कादंबर्‍यांप्रमाणे विरंगुळा किंवा करमणूक म्हणून वाचायची पुस्तके नक्कीच नाहीत. याउपर अजूनही कुणाचे मत असेल की मी हवेत गोळीबार करतोय, माझा अभ्यास शुन्य असून वाद उकरतोय किंवा माझे अज्ञान व्यक्त करतोय असे असेल तर त्याला ते मत असण्याचे स्वातंत्र्य आहे. :)
आत्मनो मोक्षार्थ... मधला आत्मा मन- बुद्धीवाला नाही ...आत्मनो म्हणजे स्वतः चा !
गेली अडीच वर्ष मी मन आणि बुद्धीचा अभ्यास करतोय. त्यामुळे आत्मा, मन आणि बुद्धी यांत गफलत करण्याईतका अडाणी मी नक्कीच नाही. असो. इति लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Fri, 12/19/2014 - 05:20 नवीन
आमची चूक झाली. एक्डाव मापी असावी. पुन्यांदा होनार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 12/19/2014 - 05:37 नवीन
माफी वगैरे नका बोलू हो काका. एकदा निवांत भेटू आपण सारे. छान गप्पा मारु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मुक्त विहारि Fri, 12/19/2014 - 06:01 नवीन
हम भी आयेंगा... तसेही विटेकर काकांना एकदा मनापासून भेटायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/18/2014 - 09:44 नवीन
मी तर देव मानत नाही. जे मानतात, त्यांचं काय मत आहे याबद्दल ?
>> धन्या तुला प्रवचनकार बुवां सारखे व्यामिश्र वादविवादांची समष्टी करायला माहीती पाहिजे की तुला खरेच परमेश्वरला जाणुन घ्यायचे आहे आणि सायुज्य व्हायचे आहे ? आपण दोन्ही बाबतीत मदत करु शकतो ... डीमांड कळवा तदनुसार सप्लाय करण्यात येईल :D
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 09:51 नवीन
प्रगो महाराज, दोन्ही येऊ द्या. -सध्या निव्वळ भोचक वाचक प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विटेकर गुरुवार, 12/18/2014 - 10:03 नवीन
काय हे ( भोचक) प्यारे ? तुम्ही आव्हान दिले आहेच आता चन्द्रकांत खोत स्टाईल ... सेक्सी गॉडेस वगैरे वाचायची तयारी ठेवा...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 10:05 नवीन
नाही हो! अथातो प्रगोव्याख्यान जिज्ञासा फक्त. आव्हान वगैरे देण्याची आमची ना कुवत ना पात्रता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/18/2014 - 10:34 नवीन
नमस्कार बुवा अ‍ॅन्ड बुवा __/\__ ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायचीच होती ... ( तुर्तास जास्त वेळ नाहीये म्हणुन फक्त काडी सारुन जातोय ;) ) http://www.misalpav.com/node/26064 मागील चर्चेच्या निमित्ताने मिपावर शोधाशोध केल्यावर वल्लीचा हा अप्रतिम धागा सापडला होता ... आता ह्यातील आणि अशाच दिसणार्‍या मुर्तीं/सुंदरींना मी सेक्सी म्हणतोय अन तुम्ही गॉडेस म्हणताय... ;) आपली काही हरकत नाही :D सेक्सी म्हणण्यालाही नाही अन गॉडेस म्हणण्यालाही नाही =)) *man_in_love* => *give_rose* => *angel* परत तुमच्या भावना बिवना दुखावल्या तर कळवा बरं का ! | चिदानंद रुपः शिवोहम शिवोहम |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 11:06 नवीन
भावना दुखावत वगैरे नाहीत. कल्जि क्रु न्ये. तरुण स्त्रीला 'आई' म्हणण्यासाठी एकतर लहान बाळ तरी व्हावं लागतं नाहीतर विवेकानंद/ बुद्ध/ तुकाराम तरी! असो. बाकी आपलं 'काम' झाल्यावर (असं आपलं आपल्याला वाटत असेल तरी) दुसर्‍यांच्या श्रद्धांच्या पुलांना सुरुंग लावून त्यांचा मार्ग बंद करायचा नसतो हे बेसिक आपल्याला समजत असेल असं वाटत होतं. पुन्हा असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 11:08 नवीन
अ‍ॅडीशनः मी दांभिक असल्यानं मी वरच्या कॅटॅगिरीमध्ये (लहान अथवा खूप मोठे) बसत नसलो तरी नेहमीच आदर्शांची उदाहरणं देणं अप्रस्तुत ठरु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/18/2014 - 12:51 नवीन
भावना दुखावत वगैरे नाहीत. कल्जि क्रु न्ये.
अशं का ... बलं बलं छाबाश हं !
तरुण स्त्रीला 'आई' म्हणण्यासाठी एकतर लहान बाळ तरी व्हावं लागतं नाहीतर विवेकानंद/ बुद्ध/ तुकाराम तरी!
तरुण स्त्रीला तु सुंदर आहेस म्ह्णायला सामान्य तर्कनिष्ठ माणुस होणे पुरेसे असतं ... आणि जे सामान्यांना जमेल तेच आम्ही प्रवचनांमध्ये प्रतिपादन करतो !
असो. बाकी आपलं 'काम' झाल्यावर (असं आपलं आपल्याला वाटत असेल तरी) दुसर्‍यांच्या श्रद्धांच्या पुलांना सुरुंग लावून त्यांचा मार्ग बंद करायचा नसतो हे बेसिक आपल्याला समजत असेल असं वाटत होतं. पुन्हा असो!
आम्ही आमचे काम झाल्यावर चुकीचे पुल तोडुन टाकतोय जेणे करुन अज्ञ जन भरकटु नयेत बाकी ... तुम्ही 'काम' हा क्वोट्स मधे टाकल्याने तुमच्या मनात जो अर्थ होता तो स्पष्ट होत आहे , अध्यात्माचा बुरखा पांघरुन कोण दांभिकपणा करते हे पुन्हा स्पष्ट झाले ...
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।। १।। तैसे चित्त शुद्ध नाही। तेथे बोध करील काई ।। ध्रु. ।।
हे मी तुम्हाला सांगुन सांगुन कंटाळलो ... तरीही परत एकदा प्रवच्न करतो नीट जीवाचा कान करुन ऐका ... उगाच मोठ्यामोठ्या साधुसंताची नावे घेवुन अतार्किक वाटणार्‍या गोष्टी कवटाळण्यापेक्षा माझे नाव घ्या अन जे तार्किक आहे ते स्विकारा . समोर पडलेली दोरी ही दोरी आहे हे समजुन घ्या साप साप म्हणुन तीला घाबरु नका अन सोन्याची चेन सोन्याची चेन म्हणुन कवटाळु नका ... जेव्हा ती दोरी आहे हे तुम्हाला पुर्ण पणे उमगेल तेव्हा सारे बेगडी ज्ञान अन त्यातुन उत्पन्न होणारी व्यामिश्र दांभिकता नष्ट होईल. जे जसे आहे ते तसे स्विकारले की माया काय अन ब्रह्म काय .... सत्य काय अन मिथ्या काय हे व्यवस्थित कळेल आणि मग तुम्ही तुमचेच प्रतिसाद वाचुन स्वतःवरच हसाल . तोवर मौन पाळा . कारण बोलण्याने ज्ञानप्राप्ती होत नसते ती श्रवणाने अर्थात ऐकण्याने मननाने आणि निधिध्यासनाने अर्थात एकांतात बसुन चिंतन करण्याने होत असते ... सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः " || काळजी करु नका मी तुमच्या पाठीशी आहे , अगदीच काही नाही जमलं तर मी तुम्हाला सोडवीन ह्या सगळ्यातुन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 13:05 नवीन
>>> तुम्ही 'काम' हा क्वोट्स मधे टाकल्याने काम कोट करण्याचं कारण तुम्हाला काहीही वाटलेलं असू दे . तो तुमचा प्रश्न आहे. मी काम झालं म्हणजे मोक्ष मिळाला, ब्रह्मानुभव आला, वस्तुसिद्धी झाली अशा अर्थे शब्द वापरला आहे. बाकी चालू दे. साधना विविध अंगांनी करता येते. त्यातल्या भक्तीमार्गाचा वापर करताना मूर्तीपूजा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्या संदर्भानं जर तुमचं 'काम झालं' असं वाटत असेल तरी बाकीच्यांनी मूर्तीपूजा करताना त्यांचा बुद्धीभेद करु नये अशा अर्थानं वरील 'पूल तोडू नये' अशा शब्द समूहाचा वापर मी केला होता. योग्य अर्थ आपल्यापर्यंत न पोचवल्याबद्दल क्षमस्व. बाकी आपल्या चरणी लीन आहोतच. ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/18/2014 - 13:23 नवीन
प्रगती आहे ... अभिनंदन :)
भक्तीमार्गाचा वापर करताना मूर्तीपूजा हा एक महत्त्वाचा पैलू आहे
मी कधीच मुर्तीपुजे विरुध्द बोललो नाहीये अन बोलणारही नाही मग लोकांचा बुध्दी भेद करण्याचा प्रश्नच येत नाही . मी जी मुर्ती जशी जिसते तशी स्विकारावी असेच बोललो आहे , हेच मागल्या चर्चेतही बोललो होतो . गडावरची अंग्लाई देवेची , कोल्हापुरला अंबाबाईची मुर्ती पाहुन मातृभाव जागृत होतो तिथे आईच आठवते , अन खजुराहोला मुर्तीपाहुन किंव्वा तश्शाच दिसणार्‍या इतर मुर्ती पाहुन गर्लफ्रेंडभाव जागृत होतो तिथे गर्लफ्रेन्डच आठवते ... आणि गर्लफ्रेंडच आठवली पाहिजे ;) तिथेही मातृभावच जागृत व्हावा अशी जी तुमची अपेक्षा आहे तोच दांभिकपणा... तीच माया जेकी बंधनाचे कारण आहे . मी म्हणतो तसे एकदा जे जसे आहे ते तसे स्विकारा ( बेशर्त स्विकारा हवे तर ;) ) म्हणजे सद्गुरुवचन अंजन ल्याला ।माया भयानक न दिसे त्याला । अभिन्नपणें आत्मयाला ।सर्वत्र देखे || ही काय अवस्था आहे हे तुमच्या लक्षात येईल :)
बाकी आपल्या चरणी लीन आहोतच. ___/\___
!! ॐ नमो नारायणाय् !! तुजप्रत कल्याण असो वत्सा !! नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे । नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४॥ नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मती । नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५॥ तात्काळ प्रचीती आली की नै प्यारेबुवा मग म्हणुन तर म्हणतोय माझ्यावर विस्वास ठेव मी सोडवीन रे तुजला !! साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली । सुगम पंथे ने‍ऊन घाली । जेथील तेथें ॥ २४॥ जय जय रघुवीर समर्थ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 13:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/18/2014 - 13:41 नवीन
आपण आनंदी चेजर्‍याची स्मायली टाकुन मौनात गेलात , आम्ही सांगितलेले ऐकलेलेत, हे पाहुन अत्यंत आनंद जाहला , लवकरच तुम्हास संपुर्ण प्रचिती येईल . तेव्हा शब्देविण संवादु होईल . तेव्हा एकदा बसु *drinks* तो पर्यंत शुभेच्छा I am really so happy for you *i-m_so_happy*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 13:44 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गौरी लेले Fri, 12/19/2014 - 09:15 नवीन
छान ! हे छान केलंत प्यारे१ . नुसता शब्दांचा कीस पाडणार्‍यांशी वाद घालण्यात अर्थ नाही . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अजया गुरुवार, 12/18/2014 - 13:39 नवीन
आवडला प्रतिसाद.उत्तर द्यावे तर असे! घ्या आमचाही_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 14:08 नवीन
:-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
व
विटेकर Fri, 12/19/2014 - 05:23 नवीन
"बेशर्त" हा शब्द वाचला आणि ड्वोळे पाणावले काही जुन्या आठवणीनी !!! . . . . . . साश्रु नयनांनी प्रतिसाद लिहित आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Fri, 12/19/2014 - 08:01 नवीन
चुकीची स्मायली पडली बहुधा. बेशर्त स्वीकृतीमध्ये होतं बहुधा असं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
न
नाखु गुरुवार, 12/18/2014 - 10:39 नवीन
ते नक्की माहीत नाही पण दानव आहे का ते मात्र माहीती झाले हैवानगिरीआणि तेच पुरेसे आहे अतिअवांतर : रामायण आणि महाभारतातील देवातला "माणूसपणा" दिसल्यापासून माणसातल्या "देवावर" जास्त लोभ आणि जीव जडला आहे
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 12/18/2014 - 10:58 नवीन
>>जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही. - गौतम बुध्दाने याच प्र्श्नाचा शोध आयुष्यभर घेतला. दु:ख आहे, दु:खाला कारण असते व ते दूर करता येते, हाच बुध्दाने लावलेला महान शोध. @ आत्मा व देव - बुध्दाला आत्मा व देव आहेत का, हा प्र्श्न अनेकदा विचारण्यात आला होता. त्याने त्या प्रश्नाला उत्तर दिलेले नाही. हे प्रश्न 'अव्याकृत' आहेत असे म्हटले आहे. टीपः मला 'अव्याकृत' शब्दाचा अर्थ नक्की सांगता येत नाही. पण त्याने प्रश्नकर्त्यास प्रतिप्रश्न केला की, या समुद्राच्या किनार्यावर किती वाळूचे कण आहेत? - अफाट, अगणित उत्तर आले. तरी पण नक्की किती? बुध्दाने विचारले. असा संवाद काही वेळ झाल्यावर, प्रश्नकर्ता रागावून म्हणाला त्याचा माझ्या प्रश्नाशी काय संबंध? त्यावर बुध्द म्हणाला, देव, आत्मा आहे, की नाही, याचा तुझ्या जीवनाशी काय संबंध? संदर्भः सर्वोत्तम भूमीपुत्र गोतम बुध्द - ले. आ. ह. साळुंखे तसेच बुध्दावर्च्या इतर अनेक पुस्तकाही या विषयी उहापोह आहे. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 12/18/2014 - 10:59 नवीन
रोचक प्रतिसाद. वाचतोय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा