Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.

स
सतिश गावडे
Wed, 12/17/2014 - 20:51
🗣 63 प्रतिसाद
श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.
हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं? "आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे" हे मजेत जगण्यासाठी आहे हे केवळ तत्वज्ञान आहे. स्पष्ट बोलायचं तर सत्य काय आहे हे माहिती नसल्यामुळे दिलेली थुकपट्टी. नोबडी नोज व्हाय दी हेल वुई आर हीअर ऑन धिस अर्थ. वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन गुड वे ऑर बॅड वे टील डेथ नोक्स अवर डोअर (ऑर वुई नोक डेथ'स डोअर इन सम केसेस.) आजचे समृद्ध सजीव सृष्टी (ज्यात माणूसही आला) एकपेशीय सुक्ष्मजीवापासून उत्क्रांत झाली हे विज्ञान पुराव्यासह छातीठोकपणे सांगतो. मात्र हा पहिला एकपेशीय सुक्ष्मजीव कसा जन्माला आला याचे ठाम उत्तर विज्ञानाकडे आज तरी नाही. महास्फोटाचा सिद्धांत हा केवळ सिद्धांत आहे. वैज्ञानिक सत्य नाही. मात्र जे आपल्याला माहिती नाही त्याला "क्ष" मानायची ही माणसाची जुनी खोड आहे. उत्क्रांतीचे ज्ञान जेमतेम दिडशे पावणे दोनशे वर्ष जुने आहे. (डार्विनबाबाचे आभार त्यासाठी) मात्र त्याच्याआधी हजारो वर्षांपासून हा प्रश्न माणसाला पडला असणार (पृथ्वीचे आयुष्य अंदाजे ४५० कोटी वर्ष आहे. मानवजातीचे आयुष्य सांगणे तसे अवघड आहे. कपीवर्गातून मानव प्राण्यात उत्क्रांत होण्याच्या नेमक्या कुठल्या अवस्थेपासून हे आयुष्य मोजायचं हा प्रश्न आहे.) तर मुद्दा असा आहे की खुप पूर्वी मनुष्य प्राण्याला मी या भूतलावर का आहे हा प्रश्न पडला असणार. मी ही जी आजूबाजूची सृष्टी पाहतो ती कुणी बनवली या प्रश्नाने डोके भंजाळून गेले असणार त्याचे. उत्तर न मिळाल्याने त्याने सृष्टी निर्मात्याला "क्ष" मानले आणि त्याला नाव दिले "देव". या अवाढव्य पसार्‍याचा, क्षणात आग ओकणार्‍या ज्वालामुखीचा, क्षणात होत्याचे नव्हते करणार्‍या महापुराचा, जंगल जाळणार्‍या आगीचा, महाप्रलयाचा, वावटळीचा निर्माताही तितकाच ताकदवान असणार. मग माणसानेच ठरवले. देव सर्वव्यापी आहे. देव सर्वशक्तीमान आहे. देव सर्व जाणतो. देवाने हे आयुष्य मला आनंदाने जगण्यासाठी दिले आहे. जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही. सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही. मी तर देव मानत नाही. जे मानतात, त्यांचं काय मत आहे याबद्दल? आपल्या शेजारच्या देशात घडलेल्या निष्पाप बालकांचे शिरकाण ही जी कुणी विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे ती कसे पाहू शकते? की तिथेही आपला लाडका कर्मविपाकाचा सिद्धांत वापरायचा आणि स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे? ----------------------------------------------------------------------- टंकणे बरेचसे विस्कळीत आहे याची जाणिव आहे.

प्रतिक्रिया द्या
14009 वाचन

💬 प्रतिसाद (63)
व
विटेकर गुरुवार, 12/18/2014 - 11:55 नवीन
संदर्भः सर्वोत्तम भूमीपुत्र गोतम बुध्द - ले. आ. ह. साळुंखे आता बोलणेच खुंटले. चालू द्या ! अव्या़कृत : ज्याची "विकृती" होत नाही असे . प्रकृती , पुरुष आणि ज्ञ अशा तीन संकल्पना मूळात सांख्यानी मांडळ्या. सार्‍या अद्वैत संकल्पनेचे ते मूळ आहे. आचार्यानी आपल्या प्रखर बुद्धीमत्तेने सांख्य तर खोडून काढलेच पण बुद्धाचा शून्यवाद आणि जैनांना स्याद्वाद दोन्हीही नि:शेष खोडून काढले आहेत. त्यामुळे दु:खाची निवृत्ती की दु:खापासून सुटका हे मूळातून तपासायला हवे !
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 12/18/2014 - 12:53 नवीन
आणि तेच तर बुध्दाच्या सांगण्याचे वैशिष्ट्य आहे. सांळुंखे यांच्या नावामुळे तसे झाले असेल, तर ते नांव सोडून द्या. बुध्दाच्या विचारांवरची इतर पुस्तकेही आहेत आणि त्यात हा प्रश्न आलेला आहे, असे मी म्हटलेच आहे. धर्मानंद कोसंबीचे एक पुस्तक मला सर्वात आवडले होते. माझी वाटचाल. ते अरविंद गुप्ता यांच्या संस्थळावर मोफत उतरवून घेण्यासाठी उपलब्ध होते. >> बुद्धाचा शून्यवाद बुध्दाने जे सांगितले त्याला हे नांव त्याने दिल्याचे मला कुठे वाचल्याचे आठवत नाही. आपण म्हणता तसले वाद, शब्द (दु:खाची निवृत्ती की दु:खापासून सुटका) संकल्पना इ. मध्ये बुध्दाने जे सांगितले ते वाचताना अडकायला होत नाही, हा मात्र स्वानुभव आहे. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
क्लिंटन गुरुवार, 12/18/2014 - 12:43 नवीन
उत्तर न मिळाल्याने त्याने सृष्टी निर्मात्याला "क्ष" मानले आणि त्याला नाव दिले "देव".
म्हणजे ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली हे तुम्ही पण मानता असा अर्थ तुमच्या या वाक्यातून निघत नाही का?
मात्र हा पहिला एकपेशीय सुक्ष्मजीव कसा जन्माला आला याचे ठाम उत्तर विज्ञानाकडे आज तरी नाही. महास्फोटाचा सिद्धांत हा केवळ सिद्धांत आहे. वैज्ञानिक सत्य नाही.
हीच तर गंमत असते.महास्फोट हा एक सिध्दांत आहे पण ते वैज्ञानिक सत्य नाही--म्हणजे अजून ते निर्विवादपणे सिध्द झालेले नाही तरीही महास्फोट, बिग बँग थिअरी वगैरे बोलणारे मोठे विज्ञाननिष्ठ ठरतात तर देव या निर्विवादपणे सिध्द न झालेल्या गोष्टीविषयी कोणी बोलायला लागले तर ते अंधश्रध्द ठरतात.
जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही.सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही.
असले फालतूचे प्रश्न पडत नसले तरी आपण काहीतरी चुकीचे केल्यास त्याचे परिणाम कधीनाकधी आपल्यावरच होणार आहेत या विचाराने का होईना अशा गोष्टी टाळण्याकडे नक्कीच कटाक्ष असतो.माझ्यासाठी तरी इतके ठिक आहे.आणि एखाद्या गोष्टीचे उत्तर मला सापडले नाही किंवा कारण समजले नाही तर इतरांवर (इतर लोकांवर किंवा सिध्दांतावर किंवा अन्य कशावर) खापर फोडायला मला आवडत नाही.त्यामुळे असले प्रश्न सुचण्याशिवाय करण्यासारख्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी असल्यामुळे मी माझे मन त्यातच रमवतो :)
आपल्या शेजारच्या देशात घडलेल्या निष्पाप बालकांचे शिरकाण ही जी कुणी विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे ती कसे पाहू शकते?
एक गोष्ट सांगा ही शक्ती (समजा तुम्ही मानत असाल किंवा नसाल तरीही) काहीही करत नाही किंवा काहीही करणार नाही हे तुम्हाला नक्की कोणी सांगितले?त्या शक्तीचे तुम्ही थोडीच बॉस लागून गेलात की "मी अमुक एक कारवाई करणार आहे" असे त्या शक्तीने तुम्हाला (किंवा अन्य कोणालाही) सांगावे.अनेक वेळा अनेक गोष्टींचा कार्यकारणभाव वरकरणी समजत नाही पण अशा गोष्टी नक्की का झाल्या त्याचा उलगडा नंतर होतो. म्हणजे सुरवातीला नुसते डॉट्स दिसतात पण ते नक्की कसे कनेक्ट होतात ते आपल्याला नंतर कळते (किंवा अनेक वेळा कळतही नाही) म्हणजे याचा अर्थ जी काही शक्ती आहे ती नाहीच किंवा असलीच तर हातावर हात ठेऊन स्वस्थ बसली आहे अशा स्वरूपाचे अर्थ काढायला तुमच्यासारखे लोक स्वतंत्र आहेतच. एखादी गोष्ट नक्की का होते हे कळले नाही तर आपल्या आकलनात किंवा विश्लेषणात काही कमी पडत आहे हा अर्थ काही लोक काढतात आणि इतर काही आपण स्वतःला सोडून सगळ्या जगावर खापर फोडतात.तुम्ही जो प्रकार करत आहात तो नक्की कुठच्या कॅटेगिरीमध्ये आहे ते तुम्हीच बघून घ्या.
की तिथेही आपला लाडका कर्मविपाकाचा सिद्धांत वापरायचा आणि स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे?
परत एकदा. कर्मविपाकाच्या सिध्दांतात काही चूक आहे की तुमचे इंटरप्रिटेशन चुकत आहे याचा विचार जमल्यास करा. जे काही होणार आहे ते सगळे माझे कर्म आहे त्यामुळे मी त्यात काहीच करू शकत नाही असा चुकीचा अर्थ आपण लावायचा (असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी) आणि स्वतः मूर्ख बनायचे.आणि त्याउपर दोष इतरांवर (कर्मविपाकाच्या सिध्दांतावर) ढकलायचा--- मजाच आहे की नाही?
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 12/18/2014 - 13:03 नवीन
समाजाच्या सांगण्यावरुन बायकोला वनवासाला पाठवणारा राम श्रेष्ठ की नरकासुराच्या तावडीत पिचत पडलेल्या 16000 बायकांचा तारणकर्ता किस्ना श्रेष्ठ? (माझ मत राम कल्पना आहे.किस्ना मानवी धुर्त राजकारणी)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 12/18/2014 - 13:10 नवीन
>>माझ मत राम कल्पना आहे.किस्ना मानवी धुर्त राजकारणी
माझ्या एका मित्राचं मत अर्थात जे मलाही पटतं, रामायण जे काही सांगतं त्यात सगळ्या आदर्श गोष्टी येतात. त्यात एखादी गोष्ट एकतर काळी असते किंवा पांढरी. महाभारत त्यामानाने वास्तवात येतं आणि काळ्यापांढर्‍याच्या निरनिराळ्या छटा दिसतात. म्हणून किसना (मिपावरचा नव्हे) धूर्त राजकारणी असला तरी त्याला आदर्श ठेवावं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी गुरुवार, 12/18/2014 - 13:21 नवीन
किस्ना मानवी पातळीवर असल्यामुळे त्याच्या लिला आवडतात *biggrin* बाकी कुणाला श्रेष्ठ मानायच हा प्रश्न टणाटण लोकांसाठी आहे. (मोबल्यावर क्रुष्ण टायपता येत नसल्यामुळे किस्ना म्हणणारा) जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्यारे१ गुरुवार, 12/18/2014 - 13:12 नवीन
अभ्यासकांच्या (पक्षी: वल्ली मृत्युंजय इ.) म्हणण्यानुसार बायकोला वनवासात पाठवण्याचा प्रसंग मूळ रामायणात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सौंदाळा गुरुवार, 12/18/2014 - 13:14 नवीन
प्रत्येकाच्या या बाबतीत काहीतरी कल्पना असतात त्यावर चर्चा - वाद्विवाद करुन रोजच्या जीवनात नक्की काय फायदा होतो? सिरियली विचारतो आहे देव संकल्पना समजली, पटली, नाही पटली माझी या विषयातली आधीची मते बदलली किंवा नाही बदलली तर माझ्या किंवा चर्चेत भाग घेणार्‍या इतरांच्या आयुष्यात काही विधायक किंवा विघातक बदल घडु शकतो का? कोणाचा असा वैयक्तिक अनुभव आहे का? अवांतर : मोठ्ठा मासा जाळ्यात सापडला की येतो परत धाग्यावर गावेलच १-२ दिवसात ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/18/2014 - 20:11 नवीन
दु:खं खूप आहेत. पण इतकी कामं पडलीत की दु:ख करायला वेळच मिळत नाही. खरंच :)
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 12/19/2014 - 05:53 नवीन
+१ आणि चांगलं काम केल्यानं जो आनंद मिळतो, त्याने इतर सगळ्या दु:खांवर फु़ंकर घातली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विटेकर Fri, 12/19/2014 - 05:26 नवीन
चर्चा नेह्मीच्या सरळ धोपट मार्गाने जात आहे ! जियो मिपाकर्स ! चला इथून चालते होण्याची वेळ झाली ... वास्तविक क्लिण्ट्न यांना अधिक वाचायला आवडले असते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/19/2014 - 06:09 नवीन
या एवढ्या मोठ्या विश्वाचा आदि अंत कुणाला माहित नाही. या पसार्‍यात आपण अगदी क्षुद्र जंतूएवढे सुद्धा नाही. एकूण सगळ्या विस्तारात अमीबाइतकीच आपली किंमत असेल नसेल. मग त्यामागची योजना, किंवा ते कसे चालते हे आपल्याला एका जन्मात कसे कळणार? कळणार नसेलच तर मग डोके आणि वेळ तरी कशाला खर्च करायचा? लिव ह्याप्पीली यामागे फक्त प्रॅक्टिकल विचार असावा. की आधीच आपल्या मागे भरपूर व्याप ताप असतात. मग त्यात कालचे दु:ख आणि उद्याची चिंता यांची भर घालून आहे ते दु:ख शतगुणित कशाला करा? आनंद, दु:ख जे काही असेल ते आजचे आज संपवा. आपला आनंद किंवा दुसर्‍याचे दु:ख शेअर करून दुसर्‍या दु:खी जीवाला जर थोडा रिलीफ देता येत असेल तर का न द्यावा? कारण आपले दु:ख दुसर्‍याला सांगितले की त्याची तीव्रता कमी होते आणि आनंदात दुसर्‍याला सहभागी करून घेतले की त्याचाही मूड जरा सुधारतो हा बहुसंख्यांचा अनुभव आहे.
जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही.
या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू नाहीत का? एकाचे दु:ख हा दुसर्‍याचा आनंद असू शकतो ना? एकीकडे भरती आली की दुसरीकडे ओहोटी आलेली असते ना? अनुभवणार्‍या व्यक्तीप्रमाणे अनुभव बदलेल.
सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही.
सर्वव्यापी सर्वशक्तीमान देव ही कल्पना माणसानेच निर्माण केलेली नव्हे काय? माणूस नव्हता तेव्हाही हे विश्व चालू होते आणि माणूस संपल्यावरही ते चालू असेल. माणूस नसता तर हा माणसाने कल्पना केलेल्या स्वरूपातला देवही नसता. मात्र हे विश्व असतेच असते. इतका विचार करणे आपल्याला रोज शक्य नसते. लहान असताना आपल्याला आईवडील रक्षणकर्ते असतात. मोठा झाल्यावर ते त्या रूपात उपलब्ध नसतात. म्हणून त्यावेळी माणूस लहान मुलासारखा कोणावर तरी भार टाकत असतो. नाहीतर बहुसंख्यांना जगणे कठीण होईल रे! कारण या दु:खातून, संकटातून आपण कसे बाहेर पडू याचे उत्तर माहित नसते ना! मग प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचे आहेत तसेच माहीत नसलेले उत्तर आपल्या आवाक्याबाहेर आहे पण आहे नक्की, अशी स्वतःची समजूत घातली की जगायला एक खरा/खोटा आधार तरी मिळतो.
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Fri, 12/19/2014 - 09:05 नवीन
सुंदर लेखन सतिश ! तुमचे लेखन नेहमीच विचार प्रवर्तक असते , शिवाय वरील एका प्रतिसादात तुम्ही जे रेफरन्सेस दिले आहेत ते पाहुन आपण नेहमीच अभ्यासपुर्ण बोलता हे जाणवले . आपले असे अधिक लेखन वाचायला आवडेल :) संपादित
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा