Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

PK च्या प्रतीक्षेत...

म
मंदार कात्रे
गुरुवार, 12/18/2014 - 20:29
🗣 142 प्रतिसाद
गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली . उद्या १९ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून हिरानीच्या पूर्वीच्या "थ्री इडियट्स" प्रमाणेच हा सिनेमा हिन्दी चित्रसॄष्टीतील "माइलस्टोन " ठरेल असा कयास आहे याचे कारण आमिर म्हणजे मुख्य नायक हा "एलियन" असल्याची वदन्ता असून "पीके"ची स्टोरी सर्वार्थाने निराळी आणि "युनिक" आहे ,असे समजते. http://www.ibtimes.co.in/pk-movie-review-by-viewers-live-update-617664 pk

प्रतिक्रिया द्या
39575 वाचन

💬 प्रतिसाद (142)
क
क्लिंटन Fri, 12/26/2014 - 12:30 नवीन
कालच चित्रपट बघितला. हिंदी (किंवा कुठल्याही भाषेतील) चित्रपट बघणे हे माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष माणसाच्या आवडीचे काम नाही. तरीही हिलरी घेऊन जाते तेव्हा चित्रपट बघणे हे माझे काम. असो. चित्रपटावरील फेसबुकवर आणि इतर सर्व ठिकाणी केली जाणारी टिका अनाठायी आहे असे माझे मत चित्रपट बघून झाले आहे. देवाला 'फोन' लावताना 'राँग नंबर' म्हणजे थोडक्यात भक्त आणि देव यात कोणी मध्यस्थ नकोत हे आपल्याच समाजातील अनेक धुरीणांनी सांगितले आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक त्या धुरीणांच्या पंगतीत जाऊन बसणारा आहे असल्या वेडगळ कल्पना मी तरी बाळगत नाही तरी त्यात अशा काही गोष्टी दाखविल्या असतील तर इतके हिरवेपिवळे व्हायची गरज आहे असे वाटत नाही. जर हिंदू धर्म (किंवा जीवनपध्दती) गझनीच्या महंमदासारख्यांच्या आक्रमणानंतरही टिकून असेल तर असल्या लहानसहान चित्रपटांमुळे त्यावर किंचितही ओरखडा उठायची सुतराम शक्यता नाही. दुसरे म्हणजे केवळ दुबळे लोक देवळात जातात हे मत अनेक लोकांचे असते.केवळ दुबळे लोकच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) देवळात जातात असे मला तरी वाटत नाही.तरीही माझ्या मतांविरूध्द असलेले एक मत म्हणून त्या मताविषयी परमतसहिष्णूता नक्कीच आहे. असे काही चित्रपटात म्हटले आहे म्हणजे हिंदू धर्माचा अपमान झाला वगैरे लोक कसे म्हणू शकतात हेच कळत नाही. तिसरे म्हणजे जर हिंदू संस्कृती इतकी सहिष्णू आहे की चार्वाकासारख्यालाही देवळात बसूनच आपले विचार मांडायची संधी दिली आणि त्या विचारांना हिंदू धर्मातील दर्शनांपैकी एक इतके महत्वाचे स्थान दिले गेले आहे वगैरे एकीकडे म्हणणार्‍या लोकांनी देवाच्या मूर्तीमध्ये ट्रान्स्मिटर कुठे आहे आणि आपण जे काही या मूर्तीकडे मागतो ते देवापर्यंत कसे पोहोचेल असे प्रश्न विचारणार्‍यांना तसे प्रश्न विचारायचा अधिकार आहे हे मान्य करण्याइतका सहिष्णूपणा नक्कीच दाखवावा अशी अपेक्षा केल्यास त्यात फार काही चुकीचे आहे असे वाटत नाही. चौथे म्हणजे चित्रपटात कुठेही तुम्ही हिंदू धर्म सोडा अशा स्वरूपाचा उल्लेख नाही की तसा संदेशही नाही.किंबहुना हिंदूंचे ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर करतात त्याविरूध्दच उल्लेख आहे. आणि पीके दारूच्या बाटल्या घेऊन मशीदीत जात असताना त्याच्यावर हल्ला करायला मागे लागलेले मुसलमानही दाखविले आहेतच. इतकेच काय तर धर्माच्या नावावर आणि आपल्या 'कौम' साठी स्टेशनवर बॉम्बस्फोट झालेलाही दाखविला आहे.मग टिकाकारांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? उगीचच आपल्या कल्पनेतून नसलेले प्रश्न निर्माण करायचे आणि तोच त्या चित्रपटाचा उद्देश आहे असे छातीठोकपणे सांगत विनाकारण राळ उठवायची असले प्रकार मला तरी नक्कीच पटत नाहीत. पाचवे म्हणजे या चित्रपटातून मुळात हिंदू धर्मावर टिका केली आहे असे मला मुळीसुध्दा वाटले नाही.क्षणभर समजून चालू की अशी टिका खरोखरच केली आहे. तरी आपल्याच तुकाराम महाराजांनी 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हटले आहेच की. एक समाज म्हणून अशा टिकेकडे आपण अधिक प्रगल्भपणे बघू शकत नाही का? गेले काही दिवस फेसबुकवर या चित्रपटाविरूध्द इतके काही बघितले आहे की विचारूच नका.त्यात सुब्रमण्यम स्वामी सामील झाले यात विशेष आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही पण त्यात फ्रॅन्कॉईस गॉटियरसारखाही सामील झाला याचे आश्चर्य नक्कीच वाटले. असो. जर का हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे वगैरे वाटत असेल तर ते मनातून काढून टाका ही विनंती आणि खुल्या मनाने हा चित्रपट बघा आणि खरोखरच त्यात हिंदू धर्मविरोधी काही वाटले तर ती तुमची मर्जी.पण इतरांनी सांगितलेल्या, फेसबुकवर कुठेतरी वाचलेल्या मतावर गतानुगतिक होऊन चित्रपट बघायचा निर्णय बदलू नका इतके नक्कीच लिहितो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 12:41 नवीन
\m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
काळा पहाड Fri, 12/26/2014 - 18:08 नवीन
जर का हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे वगैरे वाटत असेल तर
हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे याचे सरळ पुरावे देता येणार नाहीत हे तर उघडच आहे. तीच तर हुशारी आहे. काही गोष्टी या अशा प्रकारे दाखवण्यात आल्यात की त्यावर बोट पण ठेवता येणार नाही आणि त्या मागची जळजळ तर व्यक्त होईल. उदाहरणार्थ, शंकराला लोकांच्या पायातून वाट काढताना दाखवलंय. आम्ही हिंदू लोक देवाचं दर्शन घेताना चप्पल काढून दर्शन घेतो. त्याच देवाच्या वेषातल्या व्यक्तीला कशा प्रकारे दाखवलंय ते तुम्ही मी आधी पोस्ट केलेल्या चित्रात पण पाहू शकता. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या चित्रपटात असणार्‍या बर्‍याच गोष्टी या बहुधा खर्‍याच आहेत. फक्त हे कोणी सांगावं या बद्दल प्रॉब्लेम आहे. या चित्रपटाचा कर्ता धर्ता आमीरच आहे (वि.वि.चोप्रा आणि हिरानीनं कितिही सांगितलं तरी आत्तापर्यंतच्या सगळ्या चित्रपटात लुडबूड करण्याची आणि पटकथा आणि डिटेल्स बदलण्याची त्याला सवय आहे आणि मि. परफेक्शनिस्ट या टॅगखाली तो त्याचं समर्थन ही करतो. मागच्या काही चित्रपटांबाबतीत तर त्याचे निर्माते व दिग्दर्शक या बाबतीत त्याचा अतिरेक सांगतायत आणि या चित्रपटाबद्दल सुद्धा वेगळं काही झालेलं असेल असं नाही). असं असताना मी हा चित्रपट हज यात्रेला जावून आलेला एक खान सांगतोय असं पाहिलं तर नवल काय? बाकीही बर्‍याच गोष्टी आहेत. लव्ह जिहाद हा इश्श्यू तर आहेच. पण पाकिस्तानी हीरो दाखवायचं काय कारण होतं? की आम्ही भारतीय पाकिस्तानी लोकांवर फार प्रेम करतोय असं आमीर ला वाटतंय? प्रत्येक पाकिस्तानीला ठार करावं असंच बहुतांश भारतीयांचं मत असेल. तेव्हा आमीरला हा चित्रपट पाकिस्तानात रिलिज करायचाय हे उघड आहे. भारतीय येडे लोक कसाही चित्रपट बनवा, पाहणारच. तेव्हा प्रॉफिट मॅक्झीमायझेशन साठी त्याला तिकडचं पण मार्केट टॅप करायचंय हे उघड आहे. तेव्हा आता आमच्या देवांवर पाकिस्तानी लोक हसणार आहेत. तुम्हाला याबाबत खंत वाटो न वाटो आम्हाला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 12/27/2014 - 05:59 नवीन
हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे याचे सरळ पुरावे देता येणार नाहीत हे तर उघडच आहे. तीच तर हुशारी आहे.
हे वाचून एका गोष्टीची आठवण झाली.नरेंद्र मोदींना एस.आय.टी ने क्लीन चीट दिल्यानंतर मोदीद्वेष्ट्यांनी "मोदी किती हुषार ते पुरावा कसा मागे सोडतील" अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.त्या वक्तव्यात आणि यात मला तरी गुणात्मक काहीच फरक दिसत नाही.म्हणजे हा चित्रपट हिंदू विरोधीच आहे (किंवा मोदींचा दंगलीत हात होताच) अशा स्वरूपाचे अनुमान आपण स्वतः आधीच बांधायचे आणि इतर सर्व गोष्टी त्यात फिट करायचा प्रयत्न करायचा.आणि ते न जमल्यास "तीच तर हुषारी आहे अशा गोष्टींचा पुरावा थोडीच मिळतो" म्हणून पळून जायचे अशा स्वरूपाचे प्रकार दोन्ही ठिकाणी दिसतात. असो.
शंकराला लोकांच्या पायातून वाट काढताना दाखवलंय.
तो खरोखरच शंकर होता असे तुम्हाला वाटत असले तर शिरसाष्टांग प्रणिपात स्विकारा. अहो कुठलाश्या नाटकात शंकराचे काम करणारे पात्र होते ते. त्याने लोकांच्या पायातून वाट काढली म्हणजे खरोखरच्या शंकराने तसे केले का? राम नगरकरांच्या रामनगरी या एकपात्री कार्यक्रमात एक उल्लेख आहे.त्यांच्या ग्रुपमधला नाटकात शिवाजी महाराजांचे काम करणारा माणूस जिरेटोप,तलवार, दाढी वगैरे पेहराव न उतरवता पानवाल्याच्या दुकानावर गेला.म्हणजे खरोखरचे शिवाजी महाराज पानवाल्याच्या दुकानावर जाऊन तिथे टीपी करायचे असा त्याचा अर्थ होतो का? समजा अशा कोणत्यातरी नाटकात शंकराचे काम करणार्‍या पात्रासमोर नाग आला आणि फणा काढून उभा राहिला तर त्याची घाबरगुंडी उडणार नाही का?त्याने स्टेजवरून समजा पळ काढला तर त्याचे काय चुकले?की तुम्ही परत म्हणणार अरे तू तर शंकर आहेस. तुझ्या गळ्यात नाग आहे मग नागाला कसे काय घाबरतोस? बघा कसा शंकराचा अपमान झाला!! या असल्या बोलण्याला काय अर्थ आहे?
तेव्हा आता आमच्या देवांवर पाकिस्तानी लोक हसणार आहेत. तुम्हाला याबाबत खंत वाटो न वाटो आम्हाला वाटते.
वा काय परिक्षक नेमला आहात.अगदी तुम्हाला अभिप्रेत असतील तसे देव दाखवले तर त्यावर पाकिस्तानी लोक हसणार नाहीत का?या असल्या अडाणी लोकांनी जर आमच्या कोणत्याही गोष्टीचे कौतुक केले तर नक्कीच खंत वाटेल कारण ते लोक अ‍ॅप्रिशिएट करत आहेत याचाच अर्थ काहीतरी चुकत आहे.त्याउलट जर अशा लोकांनी आमच्या गोष्टीवर टिका केली तर आपण योग्य मार्गावर आहोत याची त्यापेक्षा मोठी पावती नसेल. उगीच नसलेल्या गोष्टींचा इश्यू का करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ट
टवाळ कार्टा Sat, 12/27/2014 - 06:43 नवीन
हे नाही शिरणार डोक्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
काळा पहाड Sat, 12/27/2014 - 13:57 नवीन
तो खरोखरच शंकर होता असे तुम्हाला वाटत असले तर शिरसाष्टांग प्रणिपात स्विकारा.
महाराज, मी काय सांगतोय ते जरा लक्षात घ्या. इथे जर एखादा हिंदू हे सांगत असता तर मला चाललं असतं. गेलाबाजार एखादा शीख, बौद्ध, जैन, दलित, कम्युनिस्ट, फेमिनिस्ट्, अथेइस्ट, अपाथेइस्ट, अ‍ॅग्नोस्टीक, वैष्णव, ज्यू, पारशी बाकी कोणीही असता तरी चालला असता. पण मुसलमान आणि ख्रिस्चन (आणि त्यातही खास करून मुसलमान) नाही चालणार. मी हे सांगतोय की एक मुसलमान (त्यातही हाजी) हे काँन्टेन्ट त्याच्या फायद्याकरता ट्विस्ट करतोय. तुमच्या बाकी आक्षेपांबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. मी मोदीभक्त पण नाही आणि आर एस एस मध्ये पण नाही. मी एक साधा हिंदू आहे आणि माझे राग, लोभ इत्यादी त्यानुसार आहे. याआधी मी आमीरखानचे चित्रपट (थोडेसे बोर वाटले तरी आणि तो खान असल्याची बाब इग्नोअर करून) पाहिले आहेत पण या एकाच चित्रपटाने माझा दृष्टीकोन असा बदलला आहे. त्याने उगीच माझ्या धर्मावर हल्ला केला आहे असं माझं मत आहे. त्याचे पुढचे चित्रपट मी आता पहाणार नाही. जाता जाता, मी स्वतः बाय ब्रेन अथेइस्ट आणि बाय हार्ट हिंदू आहे. मला हे ही माहिती आहे की विश्व आस्तित्वात आलंय तो बहुधा parallel universe मधल्या असंख्य bubbles पैकी एक bubble आहे आणि weak anthropic principle नुसार आपण यात असणं ही बहुदा एक random event आहे आणि बहुधा त्यात देवाचा काहीच भाग नाहिये. पण ते अलाहिदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 12/27/2014 - 15:50 नवीन
तुमच्या माझ्यामताविरूध्द असलेल्या मताचा आदर आहेच. मी पण मोदीभक्त नाही तर मोदी समर्थक नक्कीच आहे.(तरीही गेल्या काही महिन्यात अनेकांकडून मोदीभक्त हे बिरूद मिळाल्यामुळे मी पण वरील प्रतिसादात मोदी विरोधक ऐवजी मोदीद्वेष्टे म्हणायचे पोएटिक लायसेन्स घेतले :) ) आणि आर.एस.एस मध्येही नाही.मी बाय ब्रेन माणूस आहे आणि बाय हार्ट बिलिव्हर आहे.मला एकच गोष्ट माहित आहे की माझा ज्या गोष्टीवर विश्वास आहे तो विश्वास आणि ती गोष्टही इतकी लेचीपेची किंवा कचकड्याने बनलेली नाही की असल्या लहानसहान चित्रपटांमुळे त्यावर काही परिणाम व्हावा.असो. तेव्हा let's agree to disagree.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
थ
थॉर माणूस Mon, 12/29/2014 - 10:40 नवीन
इथे जर एखादा हिंदू हे सांगत असता तर मला चाललं असतं. गेलाबाजार एखादा शीख, बौद्ध, जैन, दलित, कम्युनिस्ट, फेमिनिस्ट्, अथेइस्ट, अपाथेइस्ट, अ‍ॅग्नोस्टीक, वैष्णव, ज्यू, पारशी बाकी कोणीही असता तरी चालला असता. पण मुसलमान आणि ख्रिस्चन (आणि त्यातही खास करून मुसलमान) नाही चालणार.
Directed by Rajkumar Hirani Screenplay by Abhijat Joshi Rajkumar Hirani Produced by Rajkumar Hirani Vidhu Vinod Chopra Siddharth Roy Kapur Narrated by Anushka Sharma Music by Ajay Atul Shantanu Moitra Ankit Tiwari Cinematography C. K. Muraleedharan Edited by Rajkumar Hirani Production company Vinod Chopra Films Rajkumar Hirani Films UTV Motion Pictures Starring Aamir Khan Anushka Sharma Sushant Singh Rajput Boman Irani Saurabh Shukla Sanjay Dutt Distributed by UTV Motion Pictures :) मला वाटतं या यादीवरून तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. आमिर खान हा एक अभिनेता आहे. त्याला आवडेल ते काम करणं इतकंच तो करू शकतो. त्याचे या चित्रपटातील पात्र हे एका एलिअनचे आहे. पण तरीही चित्रपट पहाताना आपल्याला तिथे पात्र दिसण्याऐवजी आमिर खान (त्यातही मुसलमान वगैरे) दिसत असेल तर ते आमिरचे अपयश तरी आहे किंवा आपले चित्रपट पहातानाचे पुर्वग्रह प्रमाणाबाहेर मधे येतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
क्लिंटन Mon, 12/29/2014 - 11:34 नवीन
इथे जर एखादा हिंदू हे सांगत असता तर मला चाललं असतं. गेलाबाजार एखादा शीख, बौद्ध, जैन, दलित, कम्युनिस्ट, फेमिनिस्ट्, अथेइस्ट, अपाथेइस्ट, अ‍ॅग्नोस्टीक, वैष्णव, ज्यू, पारशी बाकी कोणीही असता तरी चालला असता. पण मुसलमान आणि ख्रिस्चन (आणि त्यातही खास करून मुसलमान) नाही चालणार. मी हे सांगतोय की एक मुसलमान (त्यातही हाजी) हे काँन्टेन्ट त्याच्या फायद्याकरता ट्विस्ट करतोय.
अहो देव दगडात नाही, आपल्यात आणि देवात मध्यस्थ नकोत इत्यादी गोष्टी आपल्याच समाजातील अनेक मोठ्या लोकांनी सांगितल्या आहेत. समजा त्याच गोष्टी या चित्रपटात दाखविल्या म्हणून चित्रपट दिग्दर्शक आणि इतर लोक त्या पातळीला जात नाहीत असे म्हणत असाल तर ते अगदी १००% मान्य. दिग्दर्शक पैसे कमवायला हे उद्योग करत आहेत आणि आपण फार मोठी समाजसेवा करत आहोत असा त्यांचाही दावा असल्याचे ऐकिवात नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आपल्याला आपल्याच समाजातील मोठ्या लोकांनी दिलेल्या शिकवणुकीची परत एकदा आठवण होत असेल तर त्यात इतके वाईट काय आहे? हवे तर चित्रपट दिग्दर्शकाला त्याचे क्रेडिट देऊ नका (ते मी पण देत नाही) पण इतके हिरवेपिवळे व्हायची काय गरज आहे हे खरोखरच समजले नाही. आणि केवळ आमच्यातील दोष का दाखवता त्यांच्यातील का नाही हे एकिकडे म्हणणे आणि दुसरीकडे गेल्या एक-दोन शतकात हिंदू समाजाइतका बदल इतर कोणत्याही समाजात घडून आलेला नाही याचा अभिमान धरणे या दोन गोष्टी विसंगत आहेत हे नम्रपणे नमूद करतो.(तुम्ही यातील दुसरी गोष्ट करत आहात की नाही हे माहित नाही पण चित्रपटाला विरोध करणारे अनेक लोक दोनही गोष्टी करत असतात म्हणून एक जनरल गोष्ट लिहित आहे). कारण असा बदल घडून येण्यासाठी मुळात दोष आहेत हे मान्य करणे गरजेचे असते.असे प्रश्न विचारून त्याच प्रक्रीयेला खीळ बसते. असे प्रश्न सगळ्यांनीच विचारले असते तर आपल्या समाजात स्त्रीशिक्षणाला मान्यता आणि इतर अनेक सुधारणा झाल्या त्या होऊ शकल्याच नसत्या. आमच्यातलेच दोष का दाखवता या प्रश्नामागे "आम्ही आमचे दोष मान्य करतो. आता तसेच दोष इतरांमधलेही दाखवा" या विधायक विरोधापेक्षा "ते त्यांच्यातले दोष दूर करायचा प्रयत्न करत नाहीत ना मग आम्ही पण करणार नाही" हा विघातक विरोध बहुतांश वेळा असतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
क्लिंटन Fri, 12/26/2014 - 12:38 नवीन
या चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये लालकृष्ण अडवाणींचेही नाव आहे. त्यांनी काय केले असावे चित्रपटासाठी?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 12/26/2014 - 14:54 नवीन
चित्रपट प्रदर्शीत करु दिला म्हणुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अवतार Fri, 12/26/2014 - 16:03 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मदनबाण Sat, 12/27/2014 - 06:13 नवीन
@काला पहाड तुमच्याशी पूर्णपणे सहमत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गजानना गजानना :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Sat, 12/27/2014 - 12:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sat, 12/27/2014 - 13:19 नवीन
कुणी तरी हिंदी मध्ये लिहिलंय, पण डकवतोच इथे: 1. अगर गाय को घास खिलाने से धर्म होता हो या नहीं लेकिन उसका पेट जरूर भरता है लेकिन अपने धर्म गुरु के कहने से आप तो बकरे को काटते हैं आपने इसका विरोध क्यों नहीं किया...??? 2. अगर माता रानी के दरबार और अमरनाथ जाने से धर्म नहीं होता है..... तो मक्का मदीना जाने से कैसे हो सकता है ?? आपने मक्का मदीना का विरोध् क्यों नहीं किया..?? 3. अगर मंदिर बनाना धर्म नहीं तो आपने मस्जिद बनाने का विरोध क्यों नहीं किया...?? जबकि सर्वे बताते हैं की देश में मंदिर के अनुपात में मस्जिद बनाने में भंयकर तेजी आई है वो भी सरकारी पैसे से .... 4. अगर शीवजी को दूध चढ़ाने से अच्छा किसी भूके को दान देना अच्छा है..... तो देश में लोग ठण्ड से ज्यादा मर रहे है..... आपने मज़ार की चादर का विरोध क्यों नहीं किया....???? 5. अगर पैदल तीर्थो पर जाना धर्म नहीं ..... तो या हुसैन करके अपना खून बहाने से कैसे धर्म हुआ ??? जब कि उस खून को धोंने के लिए आप लोग अरबो लीटर साफ़ पानी ढोलते है.... जो किसी प्यासे की प्यास बुझा सकता था ...आपने उसका विरोध क्यों नहीं किया ???? 6.अगर क्रिस्चियन लालच देकर धर्म परिवर्तन कर रहे है..... तो आपने इस्लामिक स्टेट का विरोध क्यों नहीं किया...??? जबकि इसमें तो मौत का तांडव हो रहा है..... 7. अमृतसर से कश्मीरीयो को आपदा के समय लाखो लोगो को खाना दिया और आपने उन्ही को खाने के लिए भीख मांगते दिखाया ..... जबकि सबसे ज्यादा गरीब मुस्लिम है.... 8. क्या सारे हिन्दू धर्म गुरु पाखंडी होते है ??? जबकि सबसे ज्यादा पाखंडी और धर्म के नाम पर अन्धविश्वास फेलाने में मुस्लिम धर्म गुरु आगे हैं..... आपने उनका विरोध क्यों नहीं किया..??? 9. आपने बताया मुस्लिम लड़के इतने अच्छे और वफादार होते हैं तो 90% आतंकी मुस्लिम लड़के होते हैं .... आपने ये क्यों नहीं दिखाया ????? 10. अगर आप कहते हैं की धर्म गुरु मंदिर का विरोध करने पर भगवान् की निंदा का डर बताते हैं..... तो आपने इस्लाम में ईश निंदा के जुल्म में मौत की सजा दी जाती है.... इसका विरोध किस डर के कारण नहीं किया...???? 11. खान बंधू स्टारर मूवी में नायिका का पात्र हमेशा हिन्दू और नायक हमेशा मुस्लिम क्यों होता है...??? आमिर खान जी हिन्दू धर्म या अन्य धर्म करने से पुण्य मिलता हो या ना मिलता हो , धर्म होता हो या ना होता हो लेकिन किसी का बुरा तो हरगिज़ नहीं करते लेकिन इस्लाम के नाम पर पूरी दुनिया की क्या हालात है ..... आज सभी जानते है...... अगर आपको वाकई में सिस्टम सुधारना ही था तो आपने शुरुआत वही से क्यों नहीं की..???? क्यों आपने मुस्लिम लड़के को इतना वफादार बताया आपने ये क्यों नहीं बताया की लाखो हिन्दू लडकिया मुस्लिम लड़को से शादी करने के बाद वैश्या वृति में धकेल दी जाती है......????
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Mon, 12/29/2014 - 08:16 नवीन
नीट पाहिल्यास पीके मध्ये सर्व धर्मांच्या वाइट बाबींचा उल्लेख आहे.. मुस्लिमांनी केलेला बाँबस्फोट, स्वतःच्या पाठीवर रक्त येइपर्यंत मारणे.. ख्रिश्चनांची धर्मबदल चळवळ, जैनांचा महामस्तकाभिषेक.. कुठल्याही धर्माची पाठराखण केलेली नाही.. आता जर हिंदू चष्म्यातूनच बघायच म्हटलं तर सगळं हिंदूंच वाईट दाखवलय तेच दिसणार म्हणा !! ११ वा मुद्दा तर फारच हास्यास्पद आहे.. कितीतरी ठिकाणी हिंदू नायक मुस्लिम नायिकाही आहेत.. जाणकारांनी खोदकाम करावे.. एक पाकिस्तानी मुलगा चांगला दाखवलाय म्हणजे सर्व पाकिस्तानी युवकांना चांगुलपणाचे सर्टीफिकेट दिलय असं समजायचं असेल तर काय बोलणार आणखी !! चित्रपट नक्कीच चांगला आहे.. पण ते अमीरच्या तोंडून येणं लोकांना खूपच बोचतय.. हेही विसरतात की चित्रपट हिरानीचा आहे.. पीके एक एलियन दाखवून सर्व बायस बाजूला ठेवायची कल्पना साफ पराभूत झालीये असं वाटतं हे सगळं वाचून.. कारण बहुतांश लोकं धर्माच्या चष्म्याशिवाय एखाद्या व्यक्तिला बघुच शकत नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुधीर Mon, 12/29/2014 - 12:39 नवीन
बहुचर्चित पिके चित्रपट पाहिला एकदाचा. चित्रपट हा दिग्दर्शकाचा असतो हे विसरून या चित्रपटाला अमीर खानमुळे झोडपण्यात काहीच अर्थ नव्हता. तो एक कलावंत आहे आणि त्याने आपलं काम चोख पार पाडलं आहे. चित्रपट राजकुमार हिरानीचा आहे आणि त्याने आपल्या पिंडाला साजेसा चित्रपट दिला आहे. चित्रपटाचा विषय नक्कीच नाजूक, धाडसी आणि लोकांच्या श्रद्धेशी निगडित असल्याने आणि चित्रपटाने नेमके जे सांगायचे आहे त्यावरच थेट भाष्य केल्यामुळे या चित्रपटावर वेगवेगळ्या स्तरातून उलट-सुलट प्रतिक्रिया येणे दिग्दर्शकालाही अपेक्षितच असावे. काही वर्षांपूर्वी अशाच नाजूक आणि धाडसी विषयाशी निगडित असलेला देऊळ हा मराठी चित्रपट पाहिला होता. पण त्यात खुबी ही आहे की दिग्दर्शकाला (उमेश कुलकर्णी) जे सांगायचं आहे, जे दाखवायचं आहे यावर त्याने संवादातून थेट भाष्य करणे चतुराईने टाळले आहे. पण सर्वसाधारण विचार करणार्‍या प्रेक्षक वर्गाने "देवळांचा बाजार असा चालतो?" असा विचारच केला नाही तर ते त्या दिग्दर्शकाचं, चित्रपटाचं अपयश आहे असं मला वाटतं. इथे तर दिग्दर्शकाने विनोदाच्या अंगाने चित्रपटातले विचार उलगडवताना समाजातल्या प्रथा परंपराच नव्हे तर थेट भगवान वा देव या "श्रद्धेवरच" हल्लाबोल केला आहे. त्यामुळेच कदाचित काही जणांना हा चित्रपट बिलकूल रुचला नसावा. या चित्रपटाची तुलना कदाचित ओएमजी या चित्रपटाशी करता येईल. ह्या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना फँटसीवर बेतलेली आहे आणि संपूर्ण चित्रपटाचे सादरीकरण विनोदाच्या अंगाने झाले आहे. "कोर्‍या पाटीच्या" (ही कन्सेप्ट मॅट्रिक्स मध्येही मोठ्या खुबीने वापरली आहे) परग्रहवासीयाला "भगवान" समजवून घेताना जो घोळ उडतो तो घोळ काही व्यक्तींच्या धोतराला नक्कीच हात घालणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट मला जास्त प्रभावी वाटला. एक नवीन विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी तथाकथित आध्यात्मिक गुरु रामपालला हरियाणा मधून अटक करताना दुर्दैवी घटना घडली होती. आजही अगदी शहरातूनसुद्धा स्वामींचे-बाबांचे मठ-आश्रम अगदी तेजीत चालताना दिसतात. मंदिरांमध्ये चेंगरा चेंगरी होईपर्यंत गर्दी असते. अशा परिस्थितीत अशा चित्रपटांची समाजाला गरज आहे असे मला वाटते. विरोध तर होणारच, इतिहासात तो कधी झाला नव्हता? लोकांनी राजा राम मोहन रॉय, फुले दांपत्य, धोंडो कर्वेना इ. नाही सोडलं तर ते आज हिरानीला वा अमीर खानला तरी का सोडतील. हिंदू धर्मच का दिसला? अरे, देशातल्या ८०% लोकांचा धर्म हिंदू आहे. दिग्दर्शकाचं जन्माने मिळालेलं नाव हिंदू आहे. ८०% जनता जेव्हा बुद्धिभेदाने "काही" परंपरांचा "अट्टहास" सोडून देऊन एक पाऊल पुढे टाकेल, तेव्हा उरलेल्या २०% जनतेला पुढे यायला कितीसा वेळ लागेल. मला मान्य आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा व्यक्तीपरत्वे बदलतात. एकाची श्रद्धा दुसर्‍याची अंधश्रद्धा होऊ शकते. तरी आपल्या श्रद्धेतून आपण कुणाकडून (बाबा-बुवा इ.) फसवले तर जात नाही आहोत ना? दोन सेकंदाच्या दर्शनासाठी आपण चेंगरा-चेंगरीचा भाग तर होत नाही आहोत ना? असा सारासार विचार तरी झाला पाहिजे. जे या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसच्या पालीकडलं यश असेल. लोकांच्या श्रद्धेवर बोट ठेवताना दिग्दर्शकालाही शेवटी श्रद्धेवरच यावे लागते. चित्रपटाच्या शेवटाला एका भावुक प्रसंगात अमीर खानच्या तोंडी "या जगात दोन देव आहेत. एकाने आपल्या सर्वांना बनवलं आणि ज्याच्या बद्दल कुणाला काहीच माहीत नाही आणि दुसर्‍याला माणसाने बनवलं जो माणसासारखाच वागतो" असे संवाद घालावेसे वाटतात. (ईश्वर मानणं वा ईश्वर न मानणं या दोन्ही श्रद्धाच आहेत) धर्माचं मूळ तत्त्वज्ञानही फार वेगळं सांगतं अशातला भाग नाही. पण धर्मातलं तत्त्वज्ञान आणि व्यवहारातला धर्म यामध्ये असलेलं अंतर कमी करण्यासाठी सर्वसामांन्यांच्या श्रद्धांवर प्रश्न उठविणार्‍या विचारांची समाजाला अधून मधून गरज असते असे मला वाटते. (मत न पटणार्‍यांच्या मताचा आदर आहेच)
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 12/29/2014 - 12:53 नवीन
इथे तर दिग्दर्शकाने विनोदाच्या अंगाने चित्रपटातले विचार उलगडवताना समाजातल्या प्रथा परंपराच नव्हे तर थेट भगवान वा देव या "श्रद्धेवरच" हल्लाबोल केला आहे.
पीके भगवानाला 'फोन' लावतानाच्या राँग नंबरचा उल्लेख करतो पण भगवानच 'राँग नंबर' आहे असे म्हणत नाही.तसेच तो फोन लावणारा बाबा हा पण राँग नंबर आहे असे म्हणत नाही तर मधले कम्युनिकेशन हा राँग नंबर म्हणतो. तो बाबा हाच एक फ्रॉड आहे हा डायलॉग अनुष्काच्या तोंडात आहे. त्यामुळे चित्रपटात भगवान वा देव या "श्रध्देवरच" हल्लाबोल केला आहे असे मला तरी वाटले नाही. आणि तसे जाणवले असते तर मला तो चित्रपट नक्कीच आवडला नसता. (अवांतरः मुळातल्या श्रध्देवर घाला न घालता वर फुटलेल्या पुटांवर कितीही प्रहार केले तरी मला स्वतःला त्याविषयी काहीच आक्षेप नसतात.नेमक्या याच कारणामुळे स्वतःला फार मोठे विज्ञानवादी आणि अंधश्रध्दा निर्मूलनवाले म्हणविणार्‍यांबरोबर माझे फारसे पटत नाही :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
क
काळा पहाड Mon, 12/29/2014 - 13:20 नवीन
लोकांनी राजा राम मोहन रॉय, फुले दांपत्य, धोंडो कर्वेना इ. नाही सोडलं तर ते आज हिरानीला वा अमीर खानला तरी का सोडतील.
पटलं. आता हेच खालच्यांना पण समजावून सांगा. आणि या फोटोंचं स्पष्टीकरण तुम्ही द्या. https://pbs.twimg.com/media/B5Xu-0oCQAAeC24.jpg https://pbs.twimg.com/media/B5pDgJ5CcAAmpLa.jpg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
क
काळा पहाड Mon, 12/29/2014 - 13:41 नवीन
नमाज पढायला मात्र फक्त मशिदीतच जावं लागतं बरं! http://uwpics.urduwire.com/images_photos/photos/Aamir-Khan-offering-Namaz87754355_2012114224326.jpg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
थ
थॉर माणूस Tue, 12/30/2014 - 04:29 नवीन
अत्यंत हास्यास्पद प्रतिवाद... हे म्हणजे उद्या तुम्ही हेल्मेटसक्तीबद्दलच्या बातमीवर कुठल्यातरी संघटनेच्या सक्तीविरोधी प्रतिक्रीयेची लिंक द्यायला गेलात तर कुणीतरी तुमचा झेब्रा क्रॉसिंगवर चालतानाचा फोटो दाखवून तुम्हाला शिव्या घालण्यासारखं आहे. जाऊ देत, तुमचंच बरोबर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुधीर Mon, 12/29/2014 - 13:52 नवीन
माझं मत बरोबरच आहे असा आग्रह नाही. त्यामुळे वादात मला पडायचं नाही. मी माझं मतं मांडलं. (चूकीचही असेल, अनुभवातून योग्य अयोग्य कळेल). मत न पटणार्‍यांच्या मताचा आदर आहेच. राहीली गोष्ट कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या श्रद्धांशी त्याचं स्पष्टीकरण देण्याची मला गरज काय? एकवेळ हिरानीला आपण तसा प्रश्न विचारू शकतो. पण म्हणतात ना "बोले तैसा चाले..." अगदी राजा राममोहन रॉय यांच्या वहिनीलाही सती जावं लागलं होतं असं ऐकून आहे. हा शेवटचा प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
श
श्रीगुरुजी Mon, 12/29/2014 - 15:12 नवीन
पीके प्रदर्शित झाल्यापासून आणि झाल्यानंतर या चित्रपटावर टीका होतेय. खालील चित्रपट बनणार अशी नुसती घोषणा झाल्यावर लगेचच त्याच्यावर बंदी यावी यासाठी काहीजण न्यायालयात गेलेत. http://indiatoday.intoday.in/story/nathuram-godse-mahatma-gandhi-hindu-mahasabha-anti-hindu/1/409357.html
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Tue, 12/30/2014 - 04:33 नवीन
काय गाढवपणा आहे. आता हे सरळसरळ राजकारण चालू झालंय असंच दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
काळा पहाड Mon, 12/29/2014 - 19:15 नवीन
http://chakrireview.blogspot.in/2014/12/pk-not-ok.html
  • Log in or register to post comments
म
मराठे Wed, 12/31/2014 - 01:16 नवीन
तुमचा नक्की आक्षेप चित्रपटाला किंवा कथेला नसून अमिर खानला आहे हे समजलं. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे त्याच्याजागी "हिंदू" (किंवा अ-मुसलमान म्हणूया) नट तुम्हाला चालला असता असं तुम्ही म्हणत आहात. गूड गोईंग. तुम्हाला राजकारणात फार स्कोप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
कपिलमुनी Sat, 01/03/2015 - 05:45 नवीन
PK 720p is available on torrent.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/06/2015 - 05:35 नवीन
पीके रोज नव्या वादात सापडत आहे ! आमिर खान आणि पीकेची टिम दुबईत झालेल्या एका मार्केटिंग इव्हेंट, ज्याला पाकिस्तानच्या एआरवाय (ARY) डिजीटल या कंपनीने स्पॉन्सर केले होते. Image removed. {फोटो जालावरुन घेण्यात आला आहे.} पाकिस्तान आणि दुबईत या कंपनीचे टीव्ही चॅनलपासून अनेक उद्योगधंदे आहेत. कंपनीचे मालक अब्दुल रज्जाक याकूब यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि तालिबान्यांशी निकटचे संबंध आहेत. तसेच याच एआरवाय (ARY) डिजीटल कंपनीला टेरर फायनान्स केल्यामुळे युके मधे बॅन करण्यात आले होते. दुवा :- https://archive.today/0tHi2#selection-1871.59-1871.120

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 01/06/2015 - 20:07 नवीन
बॉलीवुडला जे पाकप्रेमाचं भरतं येतय त्यामागे हिच आर्थीक कारणं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
पिंपातला उंदीर Wed, 01/07/2015 - 04:37 नवीन
या विशयावर एक समयोचित लेख (प्रतिक्रिया पण वाचनिय) http://ekregh.blogspot.in/2015/01/blog-post.html
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 01/08/2015 - 21:04 नवीन
आता अमीर खान पॅरीस हल्याचा नीषेध करत नाहीये. म्हणजे हे सीद्ध होतेय की तो पक्का दांभीक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/08/2015 - 21:43 नवीन
पिके वरुन एव्हढं वादळ का सुटलय कळत नाहि. त्या बिचार्‍या आमिरखानच्या मागे लागलेत पब्लीक. पिके हा धार्मीक अंधश्रद्धेवर प्रहार करणारा चित्रपट आहे असं उगाच भासवल्या जातय. खरं म्हणजे हा स्त्रिविरोधी चित्रपट आहे. एका अत्यंत निर्बुद्ध मुलीची हि स्टोरी फार सटल् पद्धतीने स्त्रियांवर एकुणच समजुतदारपणाच्या अभावाचा आरोप करते... आणि त्याविरोधात एकही स्त्रि-उत्कर्षवादी आवज उठत नाहि हेच त्या सिनेमाचं यश आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/09/2015 - 00:03 नवीन
एकाच प्रतिसादास +१ आणि =)) असे म्हणणे फारच विरळा असावे. ;) त्या बिचार्‍या आमिरखानच्या मागे लागलेत पब्लीक. यातील एक बिचारा हा शब्द सोडल्यास, सहमत. :) एका अत्यंत निर्बुद्ध मुलीची हि स्टोरी फार सटल् पद्धतीने स्त्रियांवर एकुणच समजुतदारपणाच्या अभावाचा आरोप करते... खरे आहे. बाकी मला वाटते, आमिरखान, पिकेची (हिंदू) टिम) आणि पिकेचे (हिंदू) विरोधक यांच्यात एक अलिखित करार झाला असावा. त्यामुळे पिकेला भरपूर प्रसिद्धी लाभून त्याचे बक्कळ पैशात पण रुपांतर होऊ शकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Fri, 01/09/2015 - 00:41 नवीन
:) आमिरला माहित आहे मेख. धुम ३ मधे हाच फॉर्मुला त्याने अभिषेकवर वापरला... वाकी ते निगेटिव्ह मार्केटिंगचं पण खरं असावं... अन्यथा इतका दबदणीत पैसा बनवण्यालायक चित्रपटात काहि नाहि. अवांतर : पिके आणि प्रकाश आमटे द रिअल हिरो यांचं महाराष्ट्रात तौलनीक कलेक्शन किती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
भ
भृशुंडी Fri, 01/09/2015 - 00:45 नवीन
ह्यॅ ह्यॅ.. चित्रपट "कोणावर" काढलाय ते बघून त्याला चांगला म्हणता येत असतं तर .... असो! प्रकाश आमटे द रिअल हिरो च्या "कलेक्शनचा" ह्यात काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Fri, 01/09/2015 - 02:43 नवीन
सांगा ना कोणावर काढलाय पिच्चर? माझ्यामते एका अत्यंत मूर्ख मुलीची स्टोरी आहे ति. रिअल हिरोच्या कलेक्शनचं म्हणाल तर बुवाबाजीविरुद्ध सो कॉल्ड कोरडे ओढणार्‍या सो कॉल्ड पुरोगामी महाराष्ट्राला अभिरुची कशाशी खातात याचं परिमाण म्हणजे कलेक्शनचा आकडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
भ
भृशुंडी Fri, 01/09/2015 - 19:35 नवीन
मी "प्रकाश आमटे द.." बद्दल बोलत होतो. कसं आहे, चित्रपटाचा विषय कितीही उत्तम असला, तरी कलाकृतीचा दर्जा त्यावरून ठरवणे हे असंबंद्ध आहे. प्रकाश आमटेंच्या कार्याबद्दल किती लोकांना माहीती आहे? हा कदाचित महाराष्ट्राची अभिरूची वगैरे ठरवण्यासाठी योग्य प्रश्न असू शकेल. पण ज्यांनी "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट पाहिला त्यांची अभिरूची श्रेष्ठ- हे अगदीच चुकीचे विधान आहे! तथाकथित उच्च अभिरूचीवाल्यांना आमट्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी जर हा चित्रपट पहाण्यापर्यंत थांबावं लागत असेल तर...कठीण आहे, नाही का? तेव्हा "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट बघणे ह्याचा अभिरूचीशी काहीच संबंध नाही! आणि पीके- एक चित्रपट म्हणून तो लोकांना आवडला, त्यांनी पाहिला! रेडी,किक वगैरे चित्रपटही लोकांना आवडलेच होते की! मोठा वितरक आहे, स्टारपट आहे तेव्हा कलेक्शनही जास्तच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Fri, 01/09/2015 - 21:03 नवीन
मी त्या अनुषंगानेच पिके बद्दल मत मांडलं. असो.
पण ज्यांनी "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट पाहिला त्यांची अभिरूची श्रेष्ठ- हे अगदीच चुकीचे विधान आहे!
अभिरुची कलाकृतीवरुन नाहि तर चित्रपट विषयाबद्दल म्हणतोय मी.
तथाकथित उच्च अभिरूचीवाल्यांना आमट्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी जर हा चित्रपट पहाण्यापर्यंत थांबावं लागत असेल तर...कठीण आहे, नाही का?
तद्वत धार्मीक अंधश्रद्धांवर जनजागृती करायला आमिरखानचा ३०० करोड गल्ला जमवणारा चित्रपट यावा लागतो तर आणखी कठीण नाहि का?
तेव्हा "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट बघणे ह्याचा अभिरूचीशी काहीच संबंध नाही!
अंधश्रद्धा निर्मुलनाकरता पिके ची गरज पडत असेल तर निश्चित संबंध आहे.
आणि पीके- एक चित्रपट म्हणून तो लोकांना आवडला, त्यांनी पाहिला! रेडी,किक वगैरे चित्रपटही लोकांना आवडलेच होते की!
रेडी, किक आदि गल्लाभरु चित्रपट म्हणुन पिके बघितला जात असेल तर काहिच म्हणणं नाहि आपलं. पण त्याकडे अंधश्रद्धा निर्मुलन प्रयोजन म्हणुन विचारवंतांचं बघणं डोक्यात जातय.
मोठा वितरक आहे, स्टारपट आहे तेव्हा कलेक्शनही जास्तच असेल.
म्हणुनच मी केवळ महाराष्ट्राचा विचार केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
भ
भृशुंडी Sat, 01/10/2015 - 00:38 नवीन
एकदम मान्य. चित्रपटांकडून (किंवा सत्यमेव जयते सारख्या मालिकेकडून्) असल्या अपेक्षा अगदीच अवाजवी आहेत. आणि आपल्याकडे तर असल्या घाऊक अपेक्षा बरेचदा ठेवल्या जातात. उ.दा. लगे रहो मुन्नाभाई आला तेव्हा लोकांना गांधीवादाचं पुनरुज्जीवन वगैरे झाल्याची स्वप्नं पडायला लागली होती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
व
विकास Fri, 01/09/2015 - 18:28 नवीन
प्रकाश आमट्यांच्या अगदी चित्रपटाची देखील तुलना मला आमिर अथवा पिकेशी करवत नाही. पण "दि इंटरव्ह्यू"ला आत्ता पर्यंत कसेबसे $२० मिलियन्स मिळालेले असताना, भारतातील+आंतर्राष्ट्रीय गल्ला (केवळ चित्रपट बघणे यावर आधारीत) धरून पिकेला साधारण $६३ मिलियन्स मिळाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मंदार कात्रे Fri, 01/09/2015 - 16:09 नवीन
पीकी पाहुन केलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून "बेबी" http://en.wikipedia.org/wiki/Baby_%282015_film%29 किंवा "लोकमान्य -एक युगपुरुष "हे चित्रपट देशभक्त भारतीयानी पहावेत अशी एक पोस्ट फेसबुक व व्हाट्सॅप वर फिरत आहे ;)
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 01/09/2015 - 18:59 नवीन
नक्की पाहू. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा