Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेह आणि बरंच काही................

क
किल्लेदार
Fri, 12/19/2014 - 18:56
💬 61
नुकतीच लेह ची ट्रीप मारून आलो. खूप लोकांनी डिसेंबर च्या थंडीची भीती घातली पण मी तिला भीक न घालता ८ दिवस आरामात फिरून आलो. जी काळजी घ्यायला सांगतात त्याच्या बरोब्बर विरुद्ध कृती केली. (आगाऊपणा म्हणून नव्हे तर सवय म्हणून :) ) उदा. गरम पाणी प्यावे !!! मी जवळपास रोज थंड बीअर घ्यायचो. पहिल्या दिवशी बाहेर फिरू नये !!! मी २ तास झोप घेऊन बाजारहाट करून आलो. उणे २ ते उणे १० पर्यंत तापमान होते पण रोजची अंघोळीची सवयही मोडता आली नाही. थोडक्यात काय नशीब बलवत्तर आणि शरीराला गेल्या ४ वर्षात हिमालयाच्या थंडीची झालेली सवय म्हणून काही झाले नाही. पुण्याहून थेट विमानाने लेह ला आलो आणि गाडी ठरवून मनसोक्त भटकलो. थोडीफार पायी पण भटकंती केली. सिया-ला नावाचे छान गेस्ट हाउस मार्केट जवळच आहे तिथे राहिलो. फार थोडी हॉटेल्स डिसेंबर मध्ये चालू ठेवतात त्यापैकीच हे एक (आणि माफक दरात). मार्केट मध्ये छोटी छोटी रेस्टोरंट्स आहेत जिथे चायनीज आणि तिबेटन फूड मिळाले. त्यावर पण जमेल तसा ताव मारला.(या दिवसात फक्त संध्याकाळी ७ पर्यंतच ही सुरु असतात.) खाली फोटो डकवतो आहे म्हणजे कुठे फिरलो हे शब्दात सांगायची गरज नाही. (लिहायचा कंटाळा फारच आहे). बऱ्यांच लोकांनी लेह ला जातो आहेस का लदाख ला पण ? असा सवाल केला. लेह-लडाख हा शब्दप्रयोग बदलण्याची नितांत आवश्यक्ता वाटली. दिल्ली लेह विमानप्रवासात .... From Plane From Plane1 ताशी नामग्याल गोम्पा.... Tashi Namgyal2 ठीकसे गोम्पा .... Thiksey लिकिर गोम्पा.... Likir स्टोक पेलेस.... Stok स्टाक्ना गोम्पा .... Stakna1 Stakna2 शे पेलेस समोरील तळे .... Lake-Shey Palace लामायुरू चा रस्ता .... Lamayuru trail4 Lamayuru trail सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम…. (यातील हिरवट दिसते ती सिंधू आणि गडद निळी आहे ती झांस्कार) Sangam खारदुंग-ला पास ला जाताना …. Khardun-La1 बॉलीवूड चा आवडता पॅंगॉंन्ग लेक …. Pangong1 Pangong7 Pangong3 आणि काही इतरही जागा बघितल्या पण त्यांचे फोटो एडिटिंग अजून चालू आहे. ते नंतर कधितरी ………………….…. :)

प्रतिक्रिया द्या
16045 वाचन

💬 प्रतिसाद (61)
म
मधुरा देशपांडे Fri, 12/19/2014 - 19:10 नवीन
अफाट सुंदर फोटो!! अप्रतिम. लामायुरू चा रस्ता आणि सिंधु आणि झांस्कार नदीचा संगम खास आवडले.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Fri, 12/19/2014 - 19:17 नवीन
मला पण जायचे आहे मे नंतर. पण ट्रेन आनी पुढे बसने. आता तुम्ही मला सांगा काय काळजी घ्यायला हवी?
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Fri, 12/19/2014 - 19:25 नवीन
एकच काळजी घ्या....प्रवासात झोपू नका. :) .कारण प्रत्येक फ्रेम बघण्यासारखी आहे. मी ड्रायव्हरला दर १० मिनिटांनी गाडी थांबवायला सांगायचो (फोटो काढायला). पण बिचारा न कंटाळता थांबवत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
व
विलासराव Fri, 12/19/2014 - 19:31 नवीन
नक्की. माझा मनाली मार्गे जाउन काश्मीरमार्गे परत किंवा उलट असा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
स
सूड Fri, 12/19/2014 - 19:52 नवीन
प्रवास कसा प्लान केला ते थोडक्यात देता का? व्यनिच केला असता, पण इथे बाकीच्या लोकांना हा प्रश्न असू शकतो. इन केस प्लान करायचं झालं तर तुमचा प्रतिसाद/ वेगळा धागा उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
य
यसवायजी Fri, 12/19/2014 - 19:54 नवीन
हेच्च म्हणतो. कंटा़ळा न करता, थोडा वेळ काढाच. फोटो अप्रतिम आलेत. *OK*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/19/2014 - 19:39 नवीन
अफाट आहे हा भाग ! सुंदर फोटो !!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 12/19/2014 - 19:39 नवीन
जबरा फोटो !! तो रस्ता बघून तर मस्तपैकी बुलेट हाणावी असे वाटतेय त्या रस्त्यावर. मधे कोणीतरी विचारत होते की बुलेटवरून लेह,लडाख करायचे का म्हणून. लेह आणि लडाख बद्दल अजुन माहीती मिळाली असती तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/19/2014 - 19:45 नवीन
तुमचे आमचे नक्कीच जमणार...फोटोग्राफी मुळे नाही....तर बियरप्रेमामुळे... बादवे, अज्जुन फोटो असतील तर जरूर टाका...
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 12/19/2014 - 19:59 नवीन
तो पहिलाच फोटो इतका अफाट आहे की शब्द सुचत नहियेत Please, desktop background म्हणून वापरला तर चालेल का?
  • Log in or register to post comments
श
शिद Sat, 12/20/2014 - 01:25 नवीन
एक सो एक जबराट फोटो आले आहेत. *ok*
desktop background
डेस्कटॉप बॅकग्राऊंड किंवा फोनचं वॉलपेपर म्ह्णून सहज खपतील. झक्कासच.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/20/2014 - 03:29 नवीन
आंssssss :-\ का काढले इतके सुंदर फोटूssss :-\ आता मी ते चोरणार! :-D
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 12/20/2014 - 03:40 नवीन
सुंदर फोटो!नद्यांच्या संगमाचा तर अप्रतिम.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 12/20/2014 - 03:40 नवीन
अप्रतिम फोटो :)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 12/20/2014 - 04:13 नवीन
अहाहा, काय ते फोटोज. डोळ्यांचं पारणं फिटलं.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 12/20/2014 - 04:16 नवीन
जळुन खाक झालो. लै भारि
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/20/2014 - 04:27 नवीन
अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 12/20/2014 - 05:20 नवीन
दहा वर्षांपुर्वी केलेली लेहची सहल आठवली.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 12/20/2014 - 05:24 नवीन
किल्लेदार म्हणजे मस्त रेखीव फोटो असणारच या अपेक्षेने धागा उघडला ! आपुनका जजमेण यक्दम बराबर हाय !
  • Log in or register to post comments
R
rain6100 Sat, 12/20/2014 - 05:43 नवीन
सिंधू आणि झांस्कार नदीच संगमा वरील घर आहे कि हॉटेल ? तेथे राहायला काय मजा येईल राव .... मस्त समोर दोन्ही नद्यांचा संगम आणि एक बिअर मग मोक्ष काय दूर नाही ..
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sat, 12/20/2014 - 18:40 नवीन
बिअर मेक्स थंडी बिअरेबल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: rain6100
क
किल्लेदार Sun, 12/21/2014 - 17:18 नवीन
दोन्हीही नाहि.... पण बीअर नक्किच पिता येइल इथे *drinks*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: rain6100
क
किसन शिंदे Sat, 12/20/2014 - 06:56 नवीन
अप्रतिम आलेत सगळे फोटो! :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 12/20/2014 - 07:08 नवीन
दुसरा आणि नद्यांच्या संगमाचा फोटो सर्वात आवडला.
  • Log in or register to post comments
श
शेखर बी. Sat, 12/20/2014 - 07:52 नवीन
मस्त आलेत फोटो..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/20/2014 - 07:54 नवीन
अहाहा... केवळ अप्रतिम ! :) लेह-लढाख चे नुसते फोटो जरी पाहिले तरी रोमांच उभे राहतात... इथल्या आकाशाच्या निळाइचे कमालिचे आकर्षण आहे मला. कधी जाणार मी हिथ ? :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 12/20/2014 - 08:44 नवीन
आहाहा! आमचे शब्द खुंटतात अशा जागी. सुं...द...र फोटो.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sat, 12/20/2014 - 09:10 नवीन
मस्त फोटो............ माझा मुलगा दोनदा त्याच्या ट्रायंफवर पुणे ते लडाखला ते पुणे जाऊन आलाय. कोणाला काही त्या संदर्भात काही माहिती हवी असल्यास मिळू शकेल......
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 12/20/2014 - 14:52 नवीन
ट्रायंफ कितीला घेतली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
स
सूड Sat, 12/20/2014 - 20:19 नवीन
सदस्यनाम सार्थ करणारा प्रश्न !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जयंत कुलकर्णी Sun, 12/21/2014 - 01:58 नवीन
खरेतर त्याच्याकडे ट्रायंफ आहे हे लिहिणार नव्हतो पण त्याचे व तरुणांचे जे गाड्यांचे पॅशन आहे ते पाहिल्यावर ते लिहिले नसते तर अन्यायकारक झाले असते म्हणून लिहिले. मुद्दा अर्थात काही माहिती हवी असल्यास मिळू शकेल हा आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जयंत कुलकर्णी Sun, 12/21/2014 - 02:00 नवीन
आणि एक ...त्याची त्याने घेतली. मग आमच्या विरोधाला कोण जुमानतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ट
टवाळ कार्टा Sun, 12/21/2014 - 10:25 नवीन
स्वस्तात पडली काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ट
टवाळ कार्टा Sun, 12/21/2014 - 10:25 नवीन
चायला "सूड मोड" म्हणजे आत्ता कळले....डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 12/22/2014 - 10:56 नवीन
धन्यवाद टवाळ'जी कार्टा !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Mon, 12/22/2014 - 09:12 नवीन
ट्रायंफचा कोणता मॉडेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
प
पारस Sat, 12/20/2014 - 16:19 नवीन
अप्रतिम फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sat, 12/20/2014 - 18:43 नवीन
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. पण कॅमेरा कुठेही कसाही फिरवला तरी इथले फोटोज चांगलेच येतील याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Sun, 12/21/2014 - 03:53 नवीन
अप्रतिम फोटो आहेत, पेनेरोमिक फोटो असतील तर दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
ए
एस Sat, 12/20/2014 - 20:16 नवीन
मघाशी फोटो दिसत नव्हते. आता दिसले आणि आवडले. (सीपी इफेक्ट एक दोन ठिकाणी कमी करता आला असता का?)
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sun, 12/21/2014 - 17:13 नवीन
ठीकसे गोम्पा सोडल्यास बाकी ठिकाणी सीपी चा वापर केलेला नाहि. किंचित जास्त निळाई स्पॉट मीटरींग मुळे आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मदनबाण Mon, 12/22/2014 - 07:29 नवीन
किंचित जास्त निळाई स्पॉट मीटरींग मुळे आली आहे. मॅट्रीक्स किंवा तत्सम मीटरींगच्या ऐवजी स्पॉट मीटरींग वापरण्याचे कारण ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
क
किल्लेदार Mon, 12/22/2014 - 08:49 नवीन
पांढऱ्या-निळ्याचा अपेक्षित कॉण्ट्रास्ट साधण्यासाठी तसे केले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ज
जयंत कुलकर्णी Mon, 12/22/2014 - 09:59 नवीन
कलर कास्ट अगोदर काढले असते तर मला वाटते असे झाले नसते....करुन बघण्यास हरकत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
क
किल्लेदार Mon, 12/22/2014 - 10:43 नवीन
कलर कास्ट हा कळीचा मुद्दा आहे. मला जमत नाही आणि फोटोशोप चे लेटेस्ट वर्जन पण नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Mon, 12/22/2014 - 11:12 नवीन
फार सोपे आहे. इमेज मेनू मधे जाऊन फोटो डुप्लिकेट करावा. दोन्ही फोटो वोर्किन्ग स्पेसमधे ओढावेत. एकाला फिल्टरमधे जाऊन ब्लर-अ‍ॅव्हरेज करावे. मग दुसर्‍या फोटोत लेव्हल्स उघडावे. मधला आयड्रॉपर घेऊन त्या अ‍ॅव्हरेज ब्लर केलेल्या फोटोवर क्लिक करावे. ज्यासाठी लेव्हल्स उघडले आहे त्यातील कास्ट निघून जाईल. अर्थात या नंतर फोटो थोडाफार अडजस्टही करावा लागेल विशेसतः व्हायब्रन्ससाठी.......मला नीट सांगता आले आहे असे वाटत नाही ...पण हे समजले नसल्यास मी परत प्रयत्न करीन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
क
किल्लेदार Mon, 12/22/2014 - 11:23 नवीन
कॉल केला तर चालेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Mon, 12/22/2014 - 11:56 नवीन
जरुर का नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
क
किल्लेदार Mon, 12/22/2014 - 14:25 नवीन
फोन द्या...... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ग
गुलमोहर Sun, 12/21/2014 - 02:53 नवीन
खुप छान आहेत फोटो...मस्तच....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा