Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेह आणि बरंच काही................

क
किल्लेदार
Fri, 12/19/2014 - 18:56
💬 61
नुकतीच लेह ची ट्रीप मारून आलो. खूप लोकांनी डिसेंबर च्या थंडीची भीती घातली पण मी तिला भीक न घालता ८ दिवस आरामात फिरून आलो. जी काळजी घ्यायला सांगतात त्याच्या बरोब्बर विरुद्ध कृती केली. (आगाऊपणा म्हणून नव्हे तर सवय म्हणून :) ) उदा. गरम पाणी प्यावे !!! मी जवळपास रोज थंड बीअर घ्यायचो. पहिल्या दिवशी बाहेर फिरू नये !!! मी २ तास झोप घेऊन बाजारहाट करून आलो. उणे २ ते उणे १० पर्यंत तापमान होते पण रोजची अंघोळीची सवयही मोडता आली नाही. थोडक्यात काय नशीब बलवत्तर आणि शरीराला गेल्या ४ वर्षात हिमालयाच्या थंडीची झालेली सवय म्हणून काही झाले नाही. पुण्याहून थेट विमानाने लेह ला आलो आणि गाडी ठरवून मनसोक्त भटकलो. थोडीफार पायी पण भटकंती केली. सिया-ला नावाचे छान गेस्ट हाउस मार्केट जवळच आहे तिथे राहिलो. फार थोडी हॉटेल्स डिसेंबर मध्ये चालू ठेवतात त्यापैकीच हे एक (आणि माफक दरात). मार्केट मध्ये छोटी छोटी रेस्टोरंट्स आहेत जिथे चायनीज आणि तिबेटन फूड मिळाले. त्यावर पण जमेल तसा ताव मारला.(या दिवसात फक्त संध्याकाळी ७ पर्यंतच ही सुरु असतात.) खाली फोटो डकवतो आहे म्हणजे कुठे फिरलो हे शब्दात सांगायची गरज नाही. (लिहायचा कंटाळा फारच आहे). बऱ्यांच लोकांनी लेह ला जातो आहेस का लदाख ला पण ? असा सवाल केला. लेह-लडाख हा शब्दप्रयोग बदलण्याची नितांत आवश्यक्ता वाटली. दिल्ली लेह विमानप्रवासात .... From Plane From Plane1 ताशी नामग्याल गोम्पा.... Tashi Namgyal2 ठीकसे गोम्पा .... Thiksey लिकिर गोम्पा.... Likir स्टोक पेलेस.... Stok स्टाक्ना गोम्पा .... Stakna1 Stakna2 शे पेलेस समोरील तळे .... Lake-Shey Palace लामायुरू चा रस्ता .... Lamayuru trail4 Lamayuru trail सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम…. (यातील हिरवट दिसते ती सिंधू आणि गडद निळी आहे ती झांस्कार) Sangam खारदुंग-ला पास ला जाताना …. Khardun-La1 बॉलीवूड चा आवडता पॅंगॉंन्ग लेक …. Pangong1 Pangong7 Pangong3 आणि काही इतरही जागा बघितल्या पण त्यांचे फोटो एडिटिंग अजून चालू आहे. ते नंतर कधितरी ………………….…. :)

प्रतिक्रिया द्या
16045 वाचन

💬 प्रतिसाद (61)
स
सर्वसाक्षी Sun, 12/21/2014 - 05:26 नवीन
सर्वच चित्रे अतिशय सुंदर! आकाशाची अशी निळाई यापूर्वी इजिप्त प्रवासात अनुभवली होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/21/2014 - 10:19 नवीन
अशक्य सुंदर प्रकाशचित्रे आहेत! भाग्यवान आहात. हा सुंदर प्रदेश बघायला मिळाला तुम्हाला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/21/2014 - 11:24 नवीन
जब्रा फोटो. नदी संगम क्लास. (प्रियकर प्रेयसीला भेटल्यासारखं वाटलं) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sun, 12/21/2014 - 17:16 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह
हुकुमीएक्का Sun, 12/21/2014 - 17:48 नवीन
फोटो अतिशय सुंदर आलेत. स्पॉट Metering मुळे एव्हडी निळाई? अप्रतिमच! मला वाटले आपण CPL वापरला असाल. परंतु CPL न वापरताही खुपच छान निळाई आलीय. मस्तच! *smile* *good*
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 12/22/2014 - 07:08 नवीन
अप्रतिम !!!!!! डिसेंबरच्या थंडीत बर्फ नाही पड्त का तिकडे ?
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 12/22/2014 - 07:33 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Mon, 12/22/2014 - 08:50 नवीन
डिसेंबर एंड ला बर्फ पडतो म्हणतात.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 12/22/2014 - 13:59 नवीन
काय अप्रतीम फटू तेच्यायला. काश्मीरला जाऊन आलोय, पण लेह-लडाखचं सौंदर्य काय वेगळंच!
  • Log in or register to post comments
ग
गिरीश मांधळे Tue, 12/23/2014 - 04:54 नवीन
मस्त फोटोज् !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/16/2015 - 09:33 नवीन
लेह लडाख येकदा करायचेच आहे. फोटो अप्रतिम आहेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा