Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक जोरदार मिपाकट्टा करू या का?

म
मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 20:32
🗣 77 प्रतिसाद
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता. त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते. "मिपा" हे पण एक आभासी जग आहे. मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो. स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले. तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का? कट्ट्याला आम्ही कधीच नाही म्हणत नाही. कट्टा कुठेही असला आणि मला वेळ असेल तर, घरदार सोडून मी कट्ट्याला हजेरी लावतो. एक ठिकाण सुचवतो, कर्जत जवळ "कशेळी" म्हणून एक गांव आहे. बर्‍यापैकी झाडी आहे, छान पैकी ४०-५० माणसे बसू शकतील अशी जागा आहे.जवळच एक छोटे तळे आणि बाजूला लेणी-गुंफा पण आहेत.आधी ऑर्डर दिली तर तिथेच जेवणाची सोय पण होवू शकते. मी कंजूस ह्यांचा हात धरून गेलो होतो.त्यामुळे कुणी कुठून कसे यायचे ते माझ्या पेक्षा कंजूसच जास्त सांगू शकतील. एका दिवसात होणारी ट्रिप असल्याने, मुंबईत आणि पुण्यात , राहणार्‍या सर्व मिपाकरांना एकदम योग्य जागा.माणशी जास्तीत जास्त २०० ते २५० रुपये खर्च होतील आणि ते पण येण्या-जाण्याच्या खर्चासकट. हा धागा फक्त ठिकाण निश्र्चीती आणि दिनांक ठरवायलाच आहे. मला २८ फेब्रुवारी किंवा १ मार्च चालेल. धागा काथ्याकुटातला असल्याने भरपूर काथ्या कुटावा. इथे माझा सहभाग संपला. विषय आणि माझा प्रतिसाद मूळ धाग्यातच गुंफला आहे.ह्या चर्चेच्या गुर्‍हाळातून जे काही ठिकाण आणि दिनांक ठरवल्या जाईल, त्याला माझी मान्यता आहे. कशेळी बद्दलची जास्तीची माहिती कंजूस सांगतील.

प्रतिक्रिया द्या
28765 वाचन

💬 प्रतिसाद (77)
स
सस्नेह गुरुवार, 12/25/2014 - 03:00 नवीन
शब्द दिल्याप्रमाणे धागा आला की ! कशेळी इथे बसने कसे जायचे व पुण्याहून किती वेळ लागतो ? आणि तारीखही ठरवा पटापट .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/25/2014 - 03:00 नवीन
येणार !
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 12/25/2014 - 03:55 नवीन
येणार.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/25/2014 - 03:55 नवीन
शक्यतो येईनच.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/25/2014 - 04:10 नवीन
तारीख थोडी अलिकडे घेता येईल का? बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन. कशेळी वनविहार का? कर्जत मुरबाड रस्ता?कोंडाणे लेण्याजवळ?छान जागा अाहे.पण स्वतःचे वाहन असल्यास सोयीचे होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/25/2014 - 04:14 नवीन
राजमाचीवरुन उतरताना एकदा कोंडाणे लेणी पाहिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 06:26 नवीन
बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन." नक्कीच घेता येईल. कारण मी माझी साधारण तारीख सांगीतली. इतर मिपाकर काय म्हणतात ते बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
च
चौकटराजा गुरुवार, 12/25/2014 - 04:16 नवीन
अशा कट्ट्याची कल्पना मी मा. इस्पिक एक्का यांच्याकडे बोललो होतो. सोयिस्कर प्रवास , जवळचे ठिकाण व मर्यादित खर्च हे एकत्र आले तर अनेक मिपाकर हौशीने येतील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/25/2014 - 06:51 नवीन
असे मिपाकट्टे वारंवार होवो व या विश्वे प्रेमभाव वाढो ही तो श्रींची इच्छा आहे... आम्ही केवळ ती परत सांगणारे आणि सहमत होणारे भारवाही हमाल, बस. :) अवांतर : "मा. इस्पिक एक्का" मधले ते "मा." काय आहे ??? त्या शब्दाने अनेक श्या सुरू होतात, म्हणून आम्हाला शिंपल "इस्पीकचा एक्का" किंवा अतिशिंपल "एक्का"च ज्यास्त आवडते याची माननियांनी दखल घ्यावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 07:04 नवीन
हेच विचारणार होतो =)) ते "मा." पुढारीलोकांसाठीच असूदे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चौकटराजा गुरुवार, 12/25/2014 - 14:27 नवीन
ते टंकायला चुकलेले दिसतेय मागे अशा शब्द लिहिताना मा. असे आली आरे हां स्वारी बरं का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/25/2014 - 17:55 नवीन
आता ही स्वारी कशाला ? तुमी स्वारी घोड्या-उंटावर करा, नायतर हत्तीवर. आमाला नको तुमची स्वारी. ;) पुढच्या कट्ट्याला लवकरच भेटू आणि मस्त गफ्फा मारू, वाटल्यास दोन दोन कालसर्पनिवारक फलरस पिऊ, काय म्हंताव ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कंजूस गुरुवार, 12/25/2014 - 05:13 नवीन
ठिकाण :वनविहार , ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात. काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला). प्रवेश फी :नाही. जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज). पार्किँग :भरपूर. राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु. संपर्क 9226093034 शिवाजी 0214683313 जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल. पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल. मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत. कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता. राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे. कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 07:03 नवीन
मी नक्की येणार...रात्रीचा मुक्कामाचा बेत असेल तर मग धमाल
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 07:09 नवीन
ओके हा पण मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे. पण तिथल्या खोल्या फार सुंदर नाही आहेत. त्यामुळे राहण्याची फार अपेक्षा करू नकोस. पण जेवण मस्त असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 07:18 नवीन
मिपाकर असताना कोण खोल्यांची रंगसंगती बघतोय (वल्लीबुआंबद्दल माहित नाही ब्वॉ) पत्त्यांचे क्यॅट...चिकन...रंगीत पेय (हे असावेच असे काही नाही)...गप्पा...आणखी काय हवे रात्र जागवायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 07:26 नवीन
मस्त झब्बु, चॅलेंज खेळत बसू... एखादी शेकोटी पेटवू... अजुन कुणी येणार असेल तर फारच उत्तम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 07:33 नवीन
आयला मला वाटले तुम्ही मेंढीकोट, रम्मी, पोकर अशी नावे घ्याल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 07:42 नवीन
मला नाही येत... मला शिकव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 08:21 नवीन
शिकवतो की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
कंजूस गुरुवार, 12/25/2014 - 07:42 नवीन
पुण्याचे दोन चारजण अगोदर येऊन पाहून गेलात तर कल्पना (=IDEA) येईल आणि कायमचं एक {गुप्त}कट्टयाला ठिकाण 'भेटेल'. धडपड्यांसाठी पेठचा किल्ला ,भिमाशंकर आहेच. फोटोग्राफीसाठी रानपक्षी(नंदन नाचण ,भृंगराज मोठा शेपटीवाला कोतवाल कांचन, टकाचोर सोनपाठी सुतार )आहेतच.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 12/25/2014 - 07:46 नवीन
लै भारी. तारीख सांगा आपली हजेरी आत्ताच पक्की समजा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 07:49 नवीन
तुम्ही तुमच्या सोयीची एखादी तारीख सांगा की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अजया गुरुवार, 12/25/2014 - 08:24 नवीन
८ किंवा१५ फेब्रुवारी? रविवार आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/25/2014 - 08:34 नवीन
मुलांच्या परीक्षा कधी असतील माहित नाही. पण तसे काही नसेल तर नक्की येणार!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 12/25/2014 - 12:01 नवीन
७ फेब्रुवारी किंवा १४ फेब्रुवारी चालेल. दोन्ही दिवशी शनिवार ला जोडून रविवार आहे आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाते गुरुवार, 12/25/2014 - 15:50 नवीन
शनिवारला जोडुन फक्त रविवारच येतो असे किमान आमच्यातरी शाळेत शिकवले होते. रविवार सोडुन आणखी कुठला वार येऊ शकतो हे माहितच नव्हते! विजुभाऊ, कृ. ह. घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/25/2014 - 18:02 नवीन
शनिवारला जोडून शुक्रवार पण असतो असे आमच्या शाळेत आम्हाला शिकवले होते ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
व
विजुभाऊ Fri, 12/26/2014 - 07:06 नवीन
बरोब्बर. दुसरी एक शक्यता म्हणजे एखादे दिवशी तिथी लय असेल तर,,,,,,,,,,,,WinkSmile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 12:20 नवीन
१४ फेब्रुवारीला आधीच ठरलेले प्लान्स असणार बावा ;)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 12/26/2014 - 07:14 नवीन
मिळाली वाट्टं कंपनी ? कृपया विनोद ह घेणे ! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 12/25/2014 - 12:54 नवीन
येणार म्हणजे येणार!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 17:42 नवीन
मग हीच तारीख नक्की करू या का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 17:51 नवीन
नक्को...मग माझे नक्की नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनुप ढेरे गुरुवार, 12/25/2014 - 18:00 नवीन
हॅहॅहॅ... व्यालेंटाइन डेला मिपाकरांबरोबर टीपी केला तर सासूबाईंना वाईट वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 18:41 नवीन
उलट तुमच्या गर्ल फ्रेंडला पण मिपाकर बनवा...(आम्ही पण आमच्या बायकोला मिपाकर करून घेतले आहे.मिपा ही तिची लाडकी सवत आहे.) आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून तिथेच तुमचा प्रेमदिवस साजरा करा... मिपाकर कट्ट्यात दंग असल्याने तुमच्याकडे कुणाचे लक्ष जाणार नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 04:27 नवीन
आधी बनू तर दे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 04:28 नवीन
म्हणूनच्च मी सासूबाई बनवणारच्च नै कोणाला :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
द
दिपक.कुवेत गुरुवार, 12/25/2014 - 17:47 नवीन
हे असे कट्ट्यांचे धागे काढतात, वर ते यशस्वी करुन दाखवतात आणि मग जळवणारे फोटु/वॄतांत येतात.....जल्ला ईनो चा पन काय ईफेक्ट होत नाहि. मुवि मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 18:43 नवीन
"मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा...." ह्यावेळी तुमच्याबरोबर उरण कट्टा करायचा बेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
अ
अजया Fri, 12/26/2014 - 04:51 नवीन
रविवार ठेवा मग १५ चा.हाकानाका.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 07:14 नवीन
अजून कोणाला काही आक्षेप?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/26/2014 - 07:17 नवीन
रैवार ब्येष्ट ! सुट्टी आस्तीय सगळ्यान्ला :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 12/26/2014 - 07:19 नवीन
रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल. रैवारी दंगा करून दुसर्‍या दिवशी हापिसाला जायाला लै वंगाळ वाटतं
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 07:23 नवीन
खरा दंगा शनिवारी रात्री करू... हाकानाका. तुम्ही बासरी घेवून या... (प्लॅनिंग डॅमेजर) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 07:33 नवीन
हे बेश्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
कंजूस Fri, 12/26/2014 - 08:25 नवीन
माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे पाहून गेलात तर ठरवायला सोपे जाईल. शनिवारी काही जण आलात तर खासकरून पुणेकरांस भरपूर वेळ मिळेल. मुंबईचे रविवारी सकाळी ९ वाजता येऊ शकतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 08:31 नवीन
कारण फक्त माझ्या आणि कंजूस ह्यांच्या अनुभवावर जावू नका. कारण आमच्या कडून पण काही चूक होवू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 08:32 नवीन
जरा त्या टकाला विचारतो... (नाहीतरी उगाच टाइमपास करत बसलाय...लावु या कामाला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 08:37 नवीन
चालेल की...आम्ही एक छोटा कट्टा करु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा