एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता.
त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते.
"मिपा" हे पण एक आभासी जग आहे.
मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो.
स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले.
तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कट्ट्याला आम्ही कधीच नाही म्हणत नाही.
कट्टा कुठेही असला आणि मला वेळ असेल तर, घरदार सोडून मी कट्ट्याला हजेरी लावतो.
एक ठिकाण सुचवतो,
कर्जत जवळ "कशेळी" म्हणून एक गांव आहे.
बर्यापैकी झाडी आहे, छान पैकी ४०-५० माणसे बसू शकतील अशी जागा आहे.जवळच एक छोटे तळे आणि बाजूला लेणी-गुंफा पण आहेत.आधी ऑर्डर दिली तर तिथेच जेवणाची सोय पण होवू शकते.
मी कंजूस ह्यांचा हात धरून गेलो होतो.त्यामुळे कुणी कुठून कसे यायचे ते माझ्या पेक्षा कंजूसच जास्त सांगू शकतील.
एका दिवसात होणारी ट्रिप असल्याने, मुंबईत आणि पुण्यात , राहणार्या सर्व मिपाकरांना एकदम योग्य जागा.माणशी जास्तीत जास्त २०० ते २५० रुपये खर्च होतील आणि ते पण येण्या-जाण्याच्या खर्चासकट.
हा धागा फक्त ठिकाण निश्र्चीती आणि दिनांक ठरवायलाच आहे.
मला २८ फेब्रुवारी किंवा १ मार्च चालेल.
धागा काथ्याकुटातला असल्याने भरपूर काथ्या कुटावा.
इथे माझा सहभाग संपला.
विषय आणि माझा प्रतिसाद मूळ धाग्यातच गुंफला आहे.ह्या चर्चेच्या गुर्हाळातून जे काही ठिकाण आणि दिनांक ठरवल्या जाईल, त्याला माझी मान्यता आहे.
कशेळी बद्दलची जास्तीची माहिती कंजूस सांगतील.
💬 प्रतिसाद
(77)
म
मुक्त विहारि
Fri, 12/26/2014 - 08:48
नवीन
तुम्ही पण टकाला घेवून जावून याल का?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 12/26/2014 - 10:54
नवीन
नक्कीच. या रविवारी नको. छोटा ट्रेक कर्नाळा पक्का आहे. कोणाला यायचे असेल तर सांगा. भटक्या खेडवाला, हु एक्का येत आहेत.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 12/26/2014 - 11:00
नवीन
१४-१५ बिझी असणार आहे, त्यामुळे शक्य नाही. त्यातही फायनल झाली तारीख की कळवा, मग मी काय ते सांगतो.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 12/26/2014 - 14:24
नवीन
पंदराला बी बिजी ? का चौदाला यित्का बिजी की १५ ला येनं शक्य न्हाई ? १४ ला काय धा मईल चालनार हैस का "गड्या" ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 12/26/2014 - 15:04
नवीन
अग्गागा...यावर आणखी एक लिहिले असते पण...च्यायला हा पण मधे येतो :(
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 12/26/2014 - 15:17
नवीन
हायला, लिव की!! पर मंग म्या काय उत्तर दिलं तं त्ये बी चालवून घ्याचं, कसं?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 12/26/2014 - 15:22
नवीन
लिवा की वो...हकूना मटाटा :)
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 12/26/2014 - 15:18
नवीन
काका, तुमास्नी आपल्या कंपूच्या व्यनित सांगतो. ;)
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 12/27/2014 - 06:13
नवीन
कशेळ्यापासुन १३ किमी वर आंबिवली गाव आहे तिथेच पेठचा किल्ला आहे आणी जवळच बौद्ध कालीन स्तुप पण आहेत.
कशेळ्यासाठी नेरळ किंवा मग कर्जतही व्यवस्थित राहिल.
नेरळ-कळंब-सुगवे-कशेळे (२९ किमि)(शक्यतो टाळा)
नेरळ-कोल्हिवली-वाकस-कशेळे (१३ किमि) (विक्रम असतात खुप)
कर्जत-कडाव-कशेळे (१४ किमि)(कडाव ला गणपतीचे प्रशिद्ध मंदिर आहे एस्टी स्टँडच्या मागेच)
कशेळ्या जवळच लालवाडी आहे जिथे वेतापासुन फर्निचर बनवले जाते इच्छुक असाल तर जावु शकता तिथेच नैसर्गिक पदार्थ जसे मध वगैरे आणी तत्सम वस्तुपण मिळतात
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/27/2014 - 06:49
नवीन
ह्या फेब्रुवारीत थोडा व्यस्त आहे.
पुढचा कट्टा बडोद्याला करायचा बेत आहे.
(कट्टेकरी) मुवि
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 12/27/2014 - 07:24
नवीन
कधीही या बडोद्यात तुमचे स्वागतच आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/27/2014 - 07:57
नवीन
बर्याच वेळा आपण ठरवले पण राहूनच जातंय...
पण आता ह्या वर्षी भेटू याच..
- Log in or register to post comments
च
चेतन677
Sat, 12/27/2014 - 18:25
नवीन
हे यासाठी विचारतोय की मला असे वाटतेय की मी तुमच्यात सर्वात लहान असेल.माझे वय 23 आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/27/2014 - 18:30
नवीन
ये बिंधास्त...
भेटू या.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 12/27/2014 - 18:47
नवीन
मिपाकर शारिरीक वयाने जितके मोठे तितका जास्त दंगा करतात :)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/27/2014 - 19:07
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 12/28/2014 - 01:07
नवीन
या इथे प्रत्येकासाठी वेगळी आव्हाने आहेत.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sun, 12/28/2014 - 08:38
नवीन
मी येणार नाही
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 12/28/2014 - 08:54
नवीन
माहित आहे...काहितरी नवीन सांगा की राव...म्हणजे हितेस हा अवतार येणार नाही का सगळेच अवतार येणार नाहीत ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 12/29/2014 - 10:57
नवीन
वे क्नोव थत, तेल्ल उस सोमेथिन्ग नेव दुदे!!
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Sun, 12/28/2014 - 09:33
नवीन
१५ फेब्रुवारीनंतर असेल तर अस्मादिकांची हजेरी लागू शकते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 12/28/2014 - 10:50
नवीन
तुम्ही केंव्हा येत आहात?
त्यावेळी परत एका कट्ट्याचे आयोजन करण्यात येईल.
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sun, 12/28/2014 - 10:06
नवीन
३० जनेवारीनंतर कुठेही केव्हाही असुदेत, यावेळी मात्र मी येणारच आहे..........
- Log in or register to post comments
प
प्रणवजोशी
गुरुवार, 02/11/2016 - 03:13
नवीन
मी पण येणार त्या निमित्ताने आभासी जगातील मिपाकरांची व्यक्तिशः भेट होईल
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
गुरुवार, 02/11/2016 - 08:31
नवीन
ओ जोशी साब.. तारीख बघा की जरा...झाला की हा वनविहार कट्टा आणी वर्णने पण आली होती...
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/11/2016 - 10:06
नवीन
तात्या, दोन वर्षापूर्वीचा धागा आहे हा!!
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 02/11/2016 - 11:44
नवीन
कंफूज झालो ना राव......
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2