नमस्कार मित्रांनो एक सल्ला हवा होता..........
नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील? या विचाराने घाबरुन एकदम कापायलाच लागायचो.दुसर्या कंपनीत काहीतरी फरक पडेल म्हणून कंपनी बदलली पण तिथेही तसेच मला एकच काम चार पाच वेळा सांगत असत पण आधीच असणार्या भितीमुळे ते नीट लक्षातच राहात नसे.माझ्या बरोबरचे सगळे माझ्या पुढे गेले.पण माझ्या या प्रॉब्लेममुळे मी अजुनही तिथेच आहे.माझ्या मित्रांना याबद्द्ल सांगितल तर त्यांपैकी काहींनी तात्पुरता माझा आत्मविश्वास जागवला.पण त्याचा कायमसाठी काहीही फरक पडला नाही तर काहीजण मी एक मानसिक रोगी आहे असे समजुन त्यांनी माझ्याशी कायमचा संपर्क तोडला.खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले.थोडक्यात सांगायचे तर मी एक दुसरा मि.बीन आहे .जर मला कोणते महत्वाचे काम सोपवले तर नक्की मोठा अपघात होउ शकतो तसे एकदा कंपनीत झाले पण होते.माझे साहेब दिवसभर मला काय काम सांगावे याच काळजीत असायचे.
मला काय झालेय? हा माझा स्वभाव बद्लायचा मी खुप प्रयत्न केला पण स्वभावाला ओषध नसते असं म्हणतात ते खरेच आहे.मी काय करु ? कंपनी सोडुन देउन मला झेपेल ते काम शोधु की अजुन काही???????सगळे मला हसतात.
💬 प्रतिसाद
(77)
H
hitesh
गुरुवार, 12/25/2014 - 15:32
नवीन
माणसाला ज्या चिंता असतात त्यातील ९० % प्रत्यक्ष कधीच घडत नाहीत...
- Log in or register to post comments
र
राजे साहेब
गुरुवार, 12/25/2014 - 15:34
नवीन
अहो चेतन साहेब तुम्ही अभियन्ता झालेले आहात जे व्हायला हिम्मत लाग्ते , तुम्हाला आरामाची गरज्ज आहे जी इंजिनिअरींग झालावर लाग्ती इगत्पुरि ला जाउन या http://www.vridhamma.org/Courses-Schedule-in-India फरक पडेल
अप्ला जोब भिती दाखव्ना आहे घाबरुन जाने नही
प्रेमात पाडा अनी पडा *kiss3* *KISSING*
सग्ले थिक होइल
लाभ असु द्या
आप्ले राजे साहेब
एक यन्त्रिकी अभियन्ता *smile* :-) :) +) =) :smile:
- Log in or register to post comments
च
चेतन677
गुरुवार, 12/25/2014 - 17:08
नवीन
माझ्यामुळे कंपनीत अपघात होता होता थोडक्यात वाचलाय.क्धी वाटते की ही फिल्ड सोडुन द्यावी.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/25/2014 - 17:41
नवीन
चेतन, अरे खचून जायची गरज नाही.अनेकांना हा अनुभव येतो.तू ज्या नोकरीसाठी अर्ज करतोस, तेव्हा तुला कामाचे स्वरूप वगैरेची माहिती असते का?
करियरच्या सुरुवातीच्या काळात कंपन्या ट्रेनिंग देतात असे ऐकले आहे.त्याबाबत तुला काही माहित आहे का?
- Log in or register to post comments
च
चेतन677
Fri, 12/26/2014 - 04:05
नवीन
मी एक यांत्रिकी अभियंता आहे.रोज कसे काम असते याची कल्पना असते माइसाहेब.काही कामात स्वतःची हुशारी दाखवायची असते मी गोंधळतो.त्यामुळे वरीष्ठ माझ्यावर जबाबदारिचे काम टाकत नाहीत.एकदा त्यांनी एक जबाबदारीचे काम दिले होते.२ दीवसाचे काम ५ दिवस झाले तरीही झाले नाही माझ्याकडुन..
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 12/26/2014 - 11:24
नवीन
"असं 'हे' म्हणतात" हे म्हणायचं राहिलंच की.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/26/2014 - 15:47
नवीन
आगया ऊंट पहाडके निचे ! ;)
- Log in or register to post comments
ज
जे एस सर्वेश्वर
गुरुवार, 12/25/2014 - 17:45
नवीन
काही दिवसांपूर्वी मी थोड्याफार प्रमाणात तुमच्याच समस्येने ग्रासलो होतो.
पण माझ्या एका मित्राचा सल्ला चांगलाच मदतीला आला.
बी युवरसेल्फ!
तेन्सिओन न घेता मनात येईल तसा काही दिवस वागून बघा
पटलं तर कंटिन्यू करा
अट फक्त एकच...
कुठलाही टेन्शन घ्यायचे नाही & कसलीही चिंता करायची नाही
सगळे चांगले होणार असते आपण घाबरून गोंधळ करतो त्यापेक्षा घाबरायचेच नाही
- Log in or register to post comments
स
स्वप्नज
गुरुवार, 12/25/2014 - 18:51
नवीन
+१ सहमत. टेन्शन् किंवा तेन्सिओन घेऊन आपणच परिस्थिती वाईट बनवतो.
ह.घ्या. सर्वेश्वरजी.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 12/26/2014 - 06:06
नवीन
सायकॅट्रिस्ट कडे जाऊन ताबडतोब औषधे चालू करावित. जितके दिवस पुढे ढकलाल तितके नुकसान होइल.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 12/26/2014 - 10:14
नवीन
त्यांच्या लिखाणावरुन ते आधीच करुन झाले आहे असे दिसते
- Log in or register to post comments
स
सविता००१
Fri, 12/26/2014 - 10:33
नवीन
तुम्हाला कोणते मानसोपचार तज्ञ भेटले त्याची कल्पना नाही. पण असं झालं असेल तर हे खरच फार दुर्दैवी आहे.
तरीही मी हेच म्हणेन की अजून जरा चौकशी करून तुम्ही जिथे कुथे रहात असाल तिथे जरूर आणखी एखाद्या मानसोपचार तज्ञाची मदत घ्या. सतत असा अनुभव येइल असे मनात आणू नका.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 12/26/2014 - 10:40
नवीन
स्वतःवर विश्वास ठेवा, गोंधळुन जाउ नका, दुसर्याकुणी तुमच्यावर सहानुभुती किंवा दया दाखवावी, अशी अपेक्षा करु नका. तुम्हालाच तुमच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, हे काम माझ्याकडुन २ नाही ५ नाही तर १० दिवसात झाले तरीही चालेल पण व्यवस्थित करेन अशा विश्वासाने सुरुवात करा. आत्मविश्वास हा स्वतःच कमवायचा असतो आणि तो लगेचच मिळ्तो असेही नाही, एखादे काम मिळाले की ते व्यवस्थीत अभ्यासा, कीती वेळात , आणि कशा प्रकारे पुर्ण करता येईल त्याची नोंद करुन ठेवा, लागल्यास दुसर्याकडुन मदत मागायला लाजु नका, बोलते व्हा. पुस्तके, माहीती वाचत रहा,
आणि पटत असेल तर ध्यान धारणा (मेडीटेशन) करा. बर्याचजणांना फायदा होतो , करुन पहायला हरकत नाही फायदा झाला नाही तरी नुकसान तर नक्कीच होणार नाही. ध्यान धारणेला बसताना एका शांत ठीकाणी डोळे मिटुन बसा आणि कुठलेही जे काही विचार मनात येतील त्यांना येउ द्या. थोड्या दिवसात फरक जाणवायला लागेल.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 12/26/2014 - 10:56
नवीन
काही गोष्टी करून बघता आल्या तर कर. आगोदर करत असशील तर चांगलंच आहे.
१. रोज व्यायाम करणे. शक्यतोवर स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग वाला.
२. आवडती गाणी ऐकणे.
३. जी कला रुचत असेल ती जोपासणे. (उगाच काहीतरी शिकायचंय म्हणून नाही)
४. व्यायाम शक्य नसल्यास खेळणे... बॅडमिंटन क्रिकेट इत्यादी काहीही मैदानी.
५. नियमितपणे चांगली पुस्तके वाचणे. आत्मचरित्र उत्तम.
६. पुरेशी झोप आणि सकस आहार याकडे लक्ष ठेवणे.
या शिवाय; हे बघ भीती गोष्ट न जमण्याची नसते, तर ती नाही जमली तर कुणी काय म्हणेल याची असते. मुळात कुणी काही म्हणताना इतका विचार करत नाही जितका तू कुणी काय म्हणेल याचा करतोस. ही फिकीर सोडून दे. विश्वास असल्यास देवाला हात जोडत जा. आणि तू तेरा देख; जग गेलं उडत. सुयोग्य शब्दातही हे सांगू शकतो पण राहुदे.
जो माणूस इंजिनियरिंग, सीए इत्यादी रिडिक्युलसली कॉम्प्लिकेटेड गोष्टी करू शकतो, तो काहीही करू शकतो. कळलं का? चिल्ल मारायचं.... ड्रीम अबाउट द फ्यूचर, अँड यू विल नायदर रिग्रेट द पास्ट नॉर विल द प्रेजेंट बॉदर यू. इवन इफ इट डज.... जस्ट शो द मिडल फिंगर!
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 12/26/2014 - 11:26
नवीन
बाकी सगळं करण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा दुसर्या एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाची मदत घ्या.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 12/26/2014 - 17:52
नवीन
तुम्हाला याआधी आलेला मानसोपचारतज्ञाचा अनुभव ही वाईट घटना आहे. मात्र त्या एका अनुभवाने सर्वच मानसोपचारतज्ञांबद्दल नकारात्मक मत बनवू नका. दुसरा एखादा चांगला मानसोपचारतज्ञ शोधा. फॅमिली डॉक्टर असल्यास त्यांना विश्वासात घेऊन ही समस्या सांगा. कदाचित ते/त्या एखादा चांगला मानसोपचारतज्ञ सुचवू शकतील.
अगदीच मानसोपचारतज्ञाकडे जावयाचे नसल्यास एखादा अनुभवी समुपदेशक (काउंसेलर) सुद्धा चालेल. त्यांच्याकडे योग्य ते मार्गदर्शन मिळू शकेल.
मिपावरील मितानताई याबाबतीत कदाचित तुम्हाला मदत करु शकतील. त्यांना व्यनि करु शकता.
- Log in or register to post comments
ब
बार्नी
गुरुवार, 01/08/2015 - 19:28
नवीन
बिलकूल हेच म्हणतो. बर्याच वेळा लोक चांगली पुस्तके वाच , गाणी एक असे सल्ले देतात (Its all in your head type ) . पण मेंदुत रासायनिक बदल
झालेला असतो हे त्यांच्या लक्शात येत नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 12/26/2014 - 12:28
नवीन
@ चेतन677 आपण मागे मिपावर रहस्यकथा लेखन केले आहे असे दिसते. सदैव सल्ले देण्या उत्सूक मिपाकरांची फिरकी घेण्यासाठी हा धागा आपण काढला नसणार हे गृहीत धरतो. आपणास खरेच अशी समस्या असेल तर, रहस्यकथा विषयक आवडीचा थेट संबंध नसला तरीही समस्या कमी होई पर्यंत लक्ष प्रवासवर्णने, ललीत निबंध अशा तणाव विरहीत लेखन प्रकारांकडे वळवावे, तुर्तास रहस्यकथा प्रकार सर्व माध्यमातून टाळावा असे सुचवावेसे वाटते (हे माझे व्यक्तीगत मत आहे) .
आपणास अशा प्रकारची भिती इतर काही काम करताना वाटते का ? किती वर्षांपासून वाटते ?, आपला नौकरीचा अनुभव किती वर्षांचा आहे इत्यादी माहितीचा आंतर्भाव आपण या प्रस्तुत धाग्यात केलेला नाही.
सर्वसाधारण स्वरूपाचा मानसिक ताण वाटत असेल तर, तुमच्याच कार्यक्षेत्रातील मातब्बर अनुभवी (पण ऑफीस मधील नव्हे) अशा व्यक्तीशी व्यक्तीगत परिचय प्राप्त करून अगदी छोट्या छोट्या वाटणार्या शंका विचारु शकता. सोबतीस ह्युमन रिसोर्स मधील एखादी व्यक्ती अथवा ह्युमन रिसोर्स विभागाचा अनुभव असलेला प्लेसमेंट कन्सल्टण्टशीही शंकाबद्दल चर्चा करणे श्रेयस्कर. या दोन गोष्टींचा आत्मविश्वास येण्यात बराच फायदा होउ शकेल.
आता भाग राहिला कामावर पोहोचल्यावरच्या भिती वाटण्याचा. अगदीच प्राथमिक स्वरूपाची ॲंक्झायटी असेल तर स्वसंमोहन पद्धतीत सांगतात तसे कामा वर जाण्या पुर्वी आपण कामावर गेल्या नंतर काय काय कामे सांगितली आणि पार पाडली जातात त्यांची मनातल्या मनातच उजळणी/सराव करता येईल. प्राथमिक स्वरूपाची ॲंक्झायटीस हे पुरेसे असावे असे वाटते. एवढ्यावर होत नसेल तर अनुभवी मानसोपचार तज्ञाची मदत घेणे श्रेयस्कर असेल असे वाटते.
- Log in or register to post comments
च
चेतन677
Fri, 12/26/2014 - 14:09
नवीन
मिपाकरांची फिरकी घेण्याचा कोणताही हेतु नाही.हा प्राॅब्लेम तसा मी दहावीत असल्यापासुन आहे.त्यावेळी विज्ञान विषय आणि बारावीतील भौतीक शास्र,बायोलाॅजीचे प्रयोग करताना हात पाय थरथर कापत...पण ते असंच होत असेल म्हणुन लक्ष नाही दिले.आता तसाच प्राॅब्लेम कंपनीत कामे करताना होतो.साहेबांच्या खुर्चीसमोरच माझी पण बसायची खुर्ची आहे तिथे बसताना करतरी वाटते.आणि या सगळ्यांतुन बाहेर पडण्यासाठीच कथा लिहिण्याचा छंद जोपासत आहे....
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 12/26/2014 - 19:08
नवीन
कथा लेखन करणार्यांना सहसा व्यक्ती आणि परिस्थितीकडे अधीक तटस्थपणे पहाता येत असावे असा माझा (गोड) गैरसमज आहे. :) व्यक्ती आणि परिस्थितीकडे अधीक तटस्थपणे पहाण्याचे कौशल्य असल्यास स्वतःच्या प्रस्तुत समस्येवर बर्यापैकी मात करू शकाल असे वाटते आहे. अर्थात माझ्या परिचयात भरमसाठ भय आणि रहस्यकथा पुस्तक टिव्ही ते चित्रपट माध्यमातून वाचणार्या पहाणार्या व्यक्ती आहेत. माझ्या व्यक्तीगत ऑब्झर्वेशननुसार भय आणि रहस्यकथांचा भय रस एंजॉय करणे हि मोठी समस्या नाही. अशा व्यक्तिंना दुसर्या व्यक्तींवर विश्वास ठेवण जड जाण्याची शक्यता असू शकते. अविश्वासाच नात जेवणाच्या मीठाच्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास त्याचा परिणाम निर्णयक्षमतेवर आणि म्हणून निर्णयाच्या अंमल बजावणीवर होऊ शकतो म्हणून आधी वर म्हटल्या प्रमाणे भय आणि रहस्यकथा एवजी तुर्तास प्रवासवर्णनादी तणावरहीत लेखन/ छंदाचा विचार करावा असे वाटते (पुन्हा एकदा हि माझी व्यक्तीगत मते आहेत, कोणत्याही शास्त्रीय आधाराचा दावा नाही).
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 12/26/2014 - 20:44
नवीन
प्रत्येकालाच कोणत्या न कोणत्या गोष्टीची anxity कधी न कधी वाटतच असते. मनुष्य प्राण्याच्या दृष्टीने हे अबसोल्यूटली नॉर्मल आहे. अचानक समोर वाघ, सिंह, साप, कशाला साध झूरळ दिसलं तरी इतर वेळी नॉर्मल मंडळी खरेच घाबरतील आणि तुम्हास उपरोक्त anxity असूनसुद्धा अगदी वाघ सिंह समोर आला तरी तुम्ही त्या प्रसंगातून यशस्वीपणे बाहेर पडाल, कारण प्रसंग परत्वे प्रत्येकव्यक्ती प्रसंगाचा सामना वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. वाघ/साप अचानक समोर आला तर तुम्ही नेमकी स्ट्रॅटेजी वापरणार शत्रूवर सरळ उलटा हल्ला करणार, शत्रूने काही केल्यानंतर सामना करणार, लपणार, पळणार की गर्भगळीत होणार हे प्रत्यक्षात तो प्रसंग समोर आल्या नंतरच होते हे खरेजरी असले तरी तशा प्रकारच्या प्रसंगात मी कसा वागलो होतो किंवा अशा शक्य प्रसंगांबाबत उपलब्ध पर्यायांपैकी कोणता पर्याय केव्हा निवडावा याची माझ्या मनाने किती आणि काय तयारी केली आहे यावर बरेच अवलंबून असते.
anxity वाटणाऱ्या प्रसंगाची मनात पुर्वतयारी / सराव केल्याने या प्रकारच्या समस्येचा ८० ते ९० टक्के निराकरण व्हावयास हवे असे वाटते. मला स्वत:स रेल्वेने प्रवास करण्याबाबत जराशी anxity असे त्या बाबत अजूनही मी नेहमी कम्फर्टेबल नसतो प्रत्यक्षात प्रसंगाची मनात पुर्वतयारी / सराव करून मुंबईच्या लोकलचा प्रवाससुद्धा मी नित्याच्या प्रवाशांपेक्षा लिलया पार पाडतो. म्हणजे स्वत:च्या मनात रेल्वेस्टेशन वर गेल्या नंतर काय काय होणार याची उजळणी करतो. रेल्वेस्टेशन पोहोचणार तिथे भला मोठा क्यू असेल तो क्यू केव्हा संपेलयाची काळजी न करता मी क्यूमध्ये उभा टाकेन ट्रेन फलाटावर येण्या आधी सहसा तिकीट मिळतेच. अनिस्चित फलाट क्रमांक केव्हातरी एकदाचा कळतोच तिथे रिझनेबल मेहनतीने आपण पोहोचतोच, हवा असलेला डब्बा रिझनेबल विचारपूस आणि धावाधावी नंतर मिळतो. तेवढ्या गर्दीतही चढण्याची संधी मिऴतेच इतर सहप्रवासीही मदत करतात ह्या सूचना एकदा डोक्यास दिल्या कि माझे पुढचे काम आपोआप फत्ते होत जाते. रेल्वेस्टेशनवरच्या मला अस्वस्थ करू शकणाऱ्या न रुचणाऱ्या प्रत्येक प्रसंगात माझा सकारात्मक प्रतिसाद काय असावयास हे मी माझ्या मनास सांगणे जरूरी आहे. ती अनिश्चित वेळ घेणारी क्यूची गर्दीची , अनिश्चित फलाट बोगी सीट उपलब्ध होणे या प्रक्रीया सहज पूर्ण होत जातात आणि एकदा का या यशस्वी अनुभवांचा सराव झाला की स्वत:स अशी anxity होती हे विसरावयास होते.
अर्थात एवढ्या एकमेक टेकनीकने १००% anxity जाईल असे नव्हे. मनावरील असंख्य प्रभाव हे लहाणपणापासून कोरले गेले असतात. एखाद्या व्यक्तीची प्रसंगाची लहाणपणीच भिती बसली असते. आणि अशा प्रसंगी सोबत कुणी नसणे, सोबतची मोठी व्यक्तीच घाबरुन प्रतिसाद देत असणे, इतरांच्या ओरड्याची भिती असणे, किंवा अमूक एक गोष्ट अशीच झाली नाहीतर कसे होणार याची अती चिंता. त्या शिवाय आपल्या समाजात कंपॅरिझन म्हणजे अत्यंत निंदनीय पद्धतीने होणारी तुलना, समोरची व्यक्ती चुकत असेल, किंवा micro manage करत असेल तरी वयाने पदाने मोठी आहे म्हणून भिडस्तपणे सहनकरणे आणि या प्रसंगाचा सामना करण्यासाठी आवश्यक संवाद कौशल्य नसणे, आपले स्वत:चे न्यूनगंड असे अनेक पदरांनी आपल्या व्यक्तीमत्वात टाळण्या जोग्या छटा जागा अडवून असतात. अडवला गेलेले एकएक पदर मोकळे करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवा आणि वापरा यश नक्की मिळेल. आपली समस्या कॉग्नेटीव्ह आणि सॉफ्ट स्कील डेव्हेलपमेंट रिलेटेड वाटते. त्यामुळे औषधवाल्या मानसोपचारापेक्षा कॉग्नेटीव्ह आणि सॉफ्ट स्कील डेव्हेलपमेंट क्षेत्रातील मोटीव्हेट करू शकणाऱ्या समुपदेशकाची गरज अधिक असावी असे माझे व्यक्तीगत मत आहे. (चुभूदेघे)
सर्वाधिक महत्वाचे तांत्रिक क्षेत्रात तुमची तंत्रकुशलता आणि तंत्रकुशलताच महत्वाची बाकी गोष्टी करिअरमध्ये महत्वाच्या असल्या आणि कार्य पारपडत असल्याशी मतलब, म्हणुन काम ठिक आहेतर दहा लोक्स काय म्हणतात ते मनास लावून न घेता काम करत रहा. तुमच्या बॉस आणि कंपनीस दिलेले काम होते हे महत्वाचे त्या दृष्टीने कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणतात तसे अनुभवी अभियंत्यांकडून छोट्या छोट्या शंकांचेही निरसन करून घेणे हि पहिली महत्वाची पायरी ठरावी असे वाटते.
- Log in or register to post comments
च
चेतन677
Sat, 12/27/2014 - 09:03
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
च
चेतन677
Sat, 12/27/2014 - 14:45
नवीन
तुमचे अनुभवाचा मला नक्कीच फायदा होईल
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 12/26/2014 - 12:45
नवीन
फोन नंबर व्यनी करा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/26/2014 - 17:37
नवीन
किंवा...
ज्या कार्यक्षेत्राचे तुम्ही शिक्षण घेतले आहे, ते तुम्हाला आवडते का?
अभियांत्रिक क्षेत्र तुम्ही निवडले? की तुमच्या माता-पित्यांची इच्छा म्हणून तुम्ही घेतलेत?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 12/26/2014 - 18:09
नवीन
मी सुद्धा यांत्रिकी अभियंता आहे. कामासंदर्भात काही अडचण असल्यास नक्की व्य.नी. करा. जमेल तेवढी मदत मी करीनचं.
- Log in or register to post comments
च
चेतन677
Fri, 12/26/2014 - 18:52
नवीन
सर्वांनी वेळ काढुन मला मार्गदर्शन केले.हीच गोष्ट काही जवळच्या मित्रमंडळींकडे केली तेव्हा काहींनी साथ सोडली.काहीजणांनी मनापासुन मदत केली.तुम्ही मिपाकरांनीही भरपुर मदत केलीये त्याबद्दल धन्यवाद...पण व्य.नी चा लाॅंग फाॅर्म कुणी सांगेल का??
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 12/26/2014 - 18:54
नवीन
व्यक्तीगत निरोप
- Log in or register to post comments
R
Rajesh K
Fri, 12/26/2014 - 21:58
नवीन
माझ्या मते आत्मविश्वासाचा अभाव हे या सर्व प्रकारामागाचे (एक) कारण असावे. त्यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जिथे आत्मविश्वास कमी पडतो त्या गोष्टीचे सखोल कौशल्य संपादित करणे. उदा. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही जणांची वरीलप्रमाणे अवस्था होते. त्यावर उपाय काय? तर परिपूर्ण अभ्यास व भरपूर सराव परीक्षा देणे. अपयशी झाल्यामुळे आत्मविश्वास गमावलेला खेळाडू ज्याप्रमाणे प्रचंड सराव व मेहनत करून पुन:पदार्पण करतो. त्याचप्रमाणे तुमच्या कामाची इत्यंभूत माहिती घ्या. अडचण असेल तर प्रश्न विचारता येतील. बर्याचदा एखाद्या कामाचे पूर्ण स्वरूप, त्याची पद्धत, त्यातले धोके, माहित नसल्यामुळे अपघातासारखे प्रकार घडू शकत असतील. (अंदाज)
आत्मविश्वास मिळविण्यासाठी वरील उपयासोबतच संमोहनाची खूप मदत होवू शकेल. (मी या विषयातला तद्न्य नाही . केवळ, माझ्या कुवतीप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. शुभेच्छा. :)
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 12/27/2014 - 07:12
नवीन
सल्ला नाही. पण मी काय करतो ते सांगू शकतो- अगदी काय करावे कळेनासे झाले की.
"Start by doing what is necessary, then what is possible, and Suddenly, you are doing the impossible."
हे मी रॉबर्ट शुल्लर (Robert Schuller) च्या एका पुस्तकात वाचले होते. जे काम करणे अत्यावश्यक आहे ते करायला सुरु करा. ते पूर्ण झाले की मग जे जे करणे शक्य आहे ते करा. बघता बघता तुम्ही अशक्य काम करायला सुरुवात केली असेल.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 12/27/2014 - 08:05
नवीन
हा एक उत्तम सल्ला आहे. एकदम मोठा केक (घास) खाणे अवघड असते. तसेच समस्यांचे असते. कामांचे प्रिऑरिटायझेशकरून त्यांच्या महत्वानुसार त्यातील शक्य होत असलेल्या कामांपासून सुरवात करणे उत्तम. जेवणाच्या ताटातला न आवडणारा पदार्थ शक्यतोवर आधी संपवण्यास सुचवल जात. अर्थात त्यामुळे जेवण थांबणार असेल तर त्या पेक्षा तो पदार्थ टाळलेला बरा असे वाटते (चुभूदेघे)
- Log in or register to post comments
म
मोहन
Sat, 12/27/2014 - 08:31
नवीन
"My life is full of disasters which never happened. "
हे माझ आवडत वाक्य आहे .
नको त्या चिंता सगळ्यांनाच सतावत असतात. बहुतेक इतर जण त्या पुढे जायचा मार्ग शोधून काढ्तात तूम्ही बहुदा त्यातच अडकता आहात. एखाद्या चांगल्या समुपदेशकाची / मानसोपचार तज्ञाची मदत घ्या.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 12/27/2014 - 08:39
नवीन
भारीये :)
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Sat, 12/27/2014 - 16:47
नवीन
मानसिक तयारी ही अत्यंत आवश्यक आहे , इथे मी simulation बद्दल बोलतोय.. बरेच वेळेला एखाद खूप कठीण काम करण्या अगोदर मी संपूर्ण काम कस होईल ह्याची मनातील आरखणी करतो , म्हणजे समजा एखाद कठीण presentation असेल तर त्या मीटिंग रूम मध्ये मी कसा शिरेन तिथ पासून presentation संपे पर्यंत काय काय होऊ शकत ह्याचा विचार करतो , कुठल्या कुठल्या बाबी आपल्याला अडथळा आणून शकतात जस projector न चालण , निरूत्तर करणारे प्रश्न कसे टळता येतील ह्याची पूर्व-तयारी , कधी बाकीचे व्यक्ते अश्या वेळी काय करू शकतात ह्याच निरीक्षण करण इत्यादी..
शेवटी एखाद काम दुसरा कोणी करू शकतो तर ते आपण नक्कीच करू शकतो ह्याचा आत्मविश्वास हळु-हळू develop करण हे शक्य आहे..
जर शक्य असेल तर तुम्ही जे काम करता ते बाकीचे कसे यशस्वी पणे करतात त्याच पूर्व-परवानगीने video shooting करून ते पुन्हा पुन्हा पाहून नंतर ते प्रत्यक्षात करण (हे शक्य नसल्यासस youtube वर शोधण) अश्या गोष्टी करा ..
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Sun, 12/28/2014 - 17:26
नवीन
रोज सकाळी उठून मनापासून विचार करा की आज मला सोपवलेली सगळी कामे मी वः नीट
पूर्ण करणार. संगीत आवडत असेल तर ते ऐका.
- Log in or register to post comments
D
dhakkaa
Sun, 12/28/2014 - 17:40
नवीन
भिती , राग , द्वेश यावर नियन्त्रन विपश्यनेद्वरे होउ शकते.
एक चित्रफित :
https://www.youtube.com/watch?v=r5bud1ybBDc
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 12/28/2014 - 18:02
नवीन
चेतन यांना समस्या दहा वेळा सुटण्याइतके सल्ले मिळालेत असे वाटते.
बघतेय, मिपावर सल्ले मागून ट्यार्पी गोळा करणारे नवनवे आयडी अधूनमधून उगवतात कधी सल्ला उपयोगी पडला म्हणून जाहीर आभारही मानतात धागे काढून.
पण नंतर कधी हे आयडी इथली सुखदुःखे विचारताना दिसत नाहीत !
सल्ल्यापुरते मिसळपाव...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 12/28/2014 - 19:19
नवीन
ज्यांची समस्या मानसोपचारतज्ञांच्या सल्ल्याने सुटली नाही ती मिपाकरांच्या सल्ल्यांनी सुटेल असं खरंच तुम्हाला वाटतं?
मानसिक/भावनिक आरोग्याच्या बाबतीत दिलेल्या सल्ल्याबद्दल कुणी आभार मानत असेल तर त्याचा अर्थ सल्ल्याचा उपयोग झाला असे होत नाही. आभार मानणे हे दिलेल्या धीरापोटी व्यक्त केलेली कृतज्ञता असू शकते. शिवाय मानसिक समस्यांबद्दल लोकांमध्ये असलेला स्टीग्मा पाहता कुणी केवळ ट्यार्पी मिळावा म्हणून आपल्याला अशा प्रकारची समस्या आहे म्हणून धागा काढेल असं वाटत नाही.
त्यांचीच समस्या सुटली नसेल तर दुसर्यांच्या सुख-दु:खांची चौकशी कुठून करणार.
या धाग्यात मांडलेली समस्या किंवा याआधी आलेला दुसर्या एका आयडीचा भावनिक आरोग्याच्या समस्येवरचा धागा (जी समस्या बरीचशी सोशल फोबिया या प्रकाराच्या जवळ जाणारी होती) यांच्यावर मिपावर मिळालेल्या सल्ल्याने धीर नक्कीच मिळत असणार. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे ही भावना नक्कीच आधार देत असणार.
मात्र प्रत्यक्ष समस्येच्या निवारणात मिपावरील सल्ल्यांचा कितपत उपयोग होत असेल याबद्दल साशंक आहे.
बर्याचशा वर्तणूक समस्या या मेंदूच्या कार्यप्रणालीशी निगडीत असतात. आणि त्या क्षेत्रातील तज्ञांचे प्रदिर्घ उपचार (बरेच वेळा सायकोथेरपी) उपयोगी ठरु शकतात.
मात्र लोक मिपासारख्या खुल्या मंचावर आपल्या भावनिक आरोग्यासंबंधीच्या समस्या मोकळेपणाने मांडू लागले आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. त्यांची वरील प्रतिसादाप्रमाणे नकारात्मक प्रतिसाद दिल्यास लोक इथून पुढे आपल्या समस्या व्यक्त करणारच नाहीत.
चेतन यांना मिपाकरांच्या सल्ल्याने नक्कीच भावनिक आधार मिळाला असेल. त्या सल्ल्यांच्या बरोबरीने त्यांना इतर एक दोघांनी दिलेला "मनसोपचारतज्ञ बदला" हा सल्ला नक्कीच उपयोगी पडेल.
- Log in or register to post comments
म
मितान
Mon, 12/29/2014 - 04:35
नवीन
+१११ सतिश गावडे
अगदी असंच काहीसं लिहायला आले होते.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 12/29/2014 - 04:36
नवीन
गैरसमज होतो आहे. सल्ला घेण्याबद्दल हरकत नसून त्याचा उपयोग होऊन व आभार मानून पुन्हा इथे न येण्याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे.
- Log in or register to post comments
म
मितान
Mon, 12/29/2014 - 04:45
नवीन
गैरसमज नाही गं...
येतील दोन चार दिवसात. किंवा वाचतही असतील. समोर यायचा ताण येऊ शकतो.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 12/29/2014 - 16:25
नवीन
माऊली, जरा सबुरीनं घ्या. कसलीच घाई करु नका. निष्कर्ष काढायची पण!
आता 'मोठ्ठ्या' झालात ना तुम्ही? मग???? ;)
- Log in or register to post comments
च
चेतन677
Mon, 12/29/2014 - 16:06
नवीन
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 12/29/2014 - 17:03
नवीन
तुमच्या धाग्यावर असला तरी प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही किंवा तुमच्या भावनांचा अनादर नाही.
यापूर्वी बरेचजण अतिशय अंतरंग सल्ले विचारून गेले . आणि परत आले नाही कधी, त्यांची आठवण आली तुमचा धागा पाहून.
भावना समजून घ्याल अशी आशा असलेली
--स्नेहांकिता
- Log in or register to post comments
च
चेतन677
Tue, 12/30/2014 - 14:35
नवीन
मी रोजच इथे असतो..स्नेहांकिताजी काही मदत हवी असल्यास नक्की कळवा!!!!!
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Sun, 12/28/2014 - 18:45
नवीन
तुम्हाला जर कंपनीतील विशिष्ट विभागातील काम करण्यात त्रास होत असेल तर विभाग बदलून बघा . पण कंपनी बदलू नका. मार्केटिंग , सेल्स , क्वालिटी या विभागांमध्येही खुप स्कोप आहे - कामाला , शिकायला आणि करीअरला .
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 12/28/2014 - 18:51
नवीन
आपण मेकॅनिकल ईंजिनिअरिंग मधल्या नेमक्या कुठल्या क्षेत्रात काम करता? कॅड-कॅम किंवा नुसत्या मॅन्युफॅक्चरिंग मधे काम करत असाल आणि त्या संदर्भात मदत लागली तर नक्की सांगा. मदत करायला आनंद होईल. मी नवा होतो तेव्हा मलाही भिती वाटायची. आपल्याला जमेल का नाही असं वाटायचं. नंतर हळु हळु रुळत गेलो. :)...
- Log in or register to post comments
द
दिनेश गोडे
Mon, 12/29/2014 - 08:50
नवीन
batch flower remedy वापरुन पहा मला चांगला उपयोग झाला.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 12/29/2014 - 10:06
नवीन
काही उपाय देत आहे : ह्यातील कोणताही उपाय करुनये.
आयुर्वेदिक उपाय :गाजा/भाग प्या
गाजा पिल्याने "भो$ड्यात गेली दुनिया " असा अॅटीट्युड निर्माण होतो , माणुस ब्रह्मानंदी लागली टाळी ह्या अवस्थेप्रत जाऊन पोहचतो , तिथे मग घाबरण्यासारखे काहीच नसते . एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की मग तुमची भीति कायमची नष्ट होईल
आणि तुम्ही म्ह्नालात की सगळे तुम्हाला हसतात .... त्यांना पाहुन तुम्हीच अनावर हसायला लागाल :D
होमिऑपॅथिक उपाय :कालिफॉसिफोरम १/१६
कालिफॉसिफोरम हे खर्या अर्थाने अमृतच आहे , डोळ्यांना दिसणार नाही इतका डोस रोज सकाळी उठण्याच्या आधी आणि झोपल्यानंतर घेत चला .
अॅलोपॅथिक उपाय : लोबोटोमी ... सिंपल
अध्यात्मिक उपाय : नामस्मरण करा . ह्याविषयी प्यासारामबुवा अधिक मार्गदर्शन करु शकतील
ज्योतिष उपाय : चंद्राची शांत करा. चंद्र मनाचा , चंचलतेचा सार्या भावनांचा कारक आहे त्याची शांत करा , हातात मोत्याचीचांदीची अंगठी घाला .
राजकीय उपाय : साहेबांना शरण जावा , साहेब सर्व भक्तांची भीती दुर करतात असा आजवरचा अनुभव आहे.
अजुन काही उपाय आहेत , सुचतील तसे देत जाईन ...
सूचना: "येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला मिपा व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी."
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 12/29/2014 - 16:26
नवीन
लाल रंग जरा सौम्य करा रे कुणीतरी.
पश्या डोक्यावर पडलंय आमचं. :)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »