Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण यांना का खाल्लंत ?

त
तिमा
Fri, 01/09/2015 - 08:58
🗣 76 प्रतिसाद
पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच. लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला. पुस्तकाच्या आकाराचा तो केक, इतका छान सजवला होता की तो, एखाद्या डिक्शनरी एवढा जाड, केक पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. लवकरांत लवकर तो केक खायला मिळावा म्हणून मी आईमागे सारखी भुणभूण लावली होती. शेवटी संध्याकाळी घरातले सगळे सदस्य हजर झाल्यावर आईने तो केक कापला आणि त्याचा एक भला मोठ्ठा तुकडा माझ्यासमोर ठेवला. पण पहिला घांस खाताच मी तोंड वेडेवाकडे केले. त्यांत संत्र्याची सालं घातल्यामुळे ती कडवट लागत होती. ती चव मला अजिबातच आवडली नाही. माझी झालेली फजिती पाहून माझ्या बहिणींना हंसु आवरत नव्हते. त्यानंतरही अनेक प्रसंगी, 'दिसते तसे नसते' या म्हणीचा मी अनुभव घेतला आहे. एकदा, मुंबई आयआयटी मधे एका नातेवाईकांचा मुलगा रहात होता. मलाही लायब्ररीचे काम असल्याने तिथे जायचे होते. तर दुपारी वेळ ठरवून, मी त्याच्या होस्टेलवर जेवायला गेलो. बेत पावभाजीचा होता. पण बघून तरी ती पावभाजी वाटत नव्हती. त्याची चव घेतली मात्र! अरेरे! त्याला कसलीच चव नव्हती. नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती! नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की संस्था जरी नामांकित असली तरी व्यवस्थापन अगदीच ढिसाळ होते आणि मुलांचे खाण्यापिण्याचे हाल अनेक वर्ष चालूच होते. कदाचित अजूनही तशीच परिस्थिती असेल! पुढे व्यवसायानिमित्त, अनेकदा पंचतारांकित हॉटेलांमधे जेवण्याची वेळ आली. पण तोपर्यंत मी अनुभवाने शहाणा झाला होतो. त्यामुळे बाह्यरुपावर न जाता आधी सर्व पदार्थांची चव घेतल्याशिवाय मी डिश भरतच नसे. कित्येक पदार्थ असे असतात की ते खाल्यावर पोट तर भरते पण चव नसल्यामुळे खाण्याचे समाधान त्यांत मिळत नाही. शिरा, उपमा, पोहे ह्याची रेसिपी जरी माहित असली तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच. बाहेर कुठेही असे 'चवलेस' पदार्थ खाल्ले तर 'आपण यांना का खाल्लंत ?' असं म्हणू तरी शकतो. घरी मात्र, गंभीर प्रसंग टाळण्यासाठी, तो पदार्थ पुन्हा वाढून न घेणे, एवढेच आपल्या हाती असते.imoti

प्रतिक्रिया द्या
23163 वाचन

💬 प्रतिसाद (76)
ग
गवि Fri, 01/09/2015 - 09:21 नवीन
रोचक विषय.. मनातली खदखद काढून मोकळे होण्यास उत्तम विषय नि धागा. ......
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 01/09/2015 - 09:33 नवीन
या मध्ये मिळणारे युनिक खाद्यपदार्थ दुर्मिळ आहेत १. गवारीची भरपूर पाणी घातलेली आमटी २. बटाट्याचा पिठलं ३. फरसाणची सुक्की भाजी ४.अनोळखी रस्सा ( बरेचदा मटकी , मूग किंवा तत्सम कडधान्ये मिक्सर मधून वाटून घ्यायची म्हणजे खूप लोकांना पुरतात आणि त्याचा रस्सा बनवायचा) ६. दुधी भोपळ्याची आमटी / पातळ भाजी . ही तर एवढी जबरदस्त असते की १ वाटी १ माणून या हिशोबाने पुरते. ७. पोह्याची आमटी कोणतीही रेसिपी हवी असल्यास फोटोशिवाय मिळेल
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Fri, 01/09/2015 - 17:06 नवीन
सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 01/13/2015 - 09:01 नवीन
साधा पिठलं करून घ्यावा. बाजारातून सकाळी बटाटेवडे आणावेत ते संध्याकाळपर्यंत गार करावेत किंवा बटाट्याची भाजी करावी संध्याकाळी पिठल्यामध्ये ते वडे वरचं कव्हर काढून घालावेत आणि स्मॅश करावे . इथे पिठल आमटी एवढा पातळ हवे . मग हे मिश्रण उपकार केल्यासारखे पानात वाढावे. ही अतिशयोक्ती नाही . आम्हीच ते दुर्दैवी जीव होतो . मालकाची हॉटेल + मेस होती . तो समोश्याचा भाजीची सुद्धा पावभाजी करायचा. १ महिना भोग भोगले आणि पळालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ह
हरकाम्या Sat, 01/10/2015 - 12:50 नवीन
राव याच्या रेसिपी टाकाकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कंजूस Fri, 01/09/2015 - 09:51 नवीन
भूक लागली म्हणून खाल्लं.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 01/09/2015 - 10:50 नवीन
'चवलेस' पदार्थ खायची़ उत्तम जागा - जगातली कुठलीही मेस (खानावळ)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 01/09/2015 - 10:55 नवीन
पावभाजीवरून आठवलं. मुंबईत रहात असे तेव्हा प्रभादेवीच्या दीपक टॉकीज जवळच्या एका टपरीछाप हॉटेलात जेवायला जवळजवळ रोज जात असे. पोळी-भाजी बरी असायची. त्या हॉटेलाची ख्याती बहुदा "स्वस्तात अमर्याद पावभाजी खा" टैप असावी. (जवळच एक लेडीज बार होता. त्यात पैसे उधळून टैट होऊन स्वस्तात पोट भरायला आलेले चिक्कार लोक्स असायचे.) बरं पावभाजीचा खप एवढा, की दहा प्लेट पावभाजीमागे एक प्लेट इतर डिश, असा. एकदा उत्सुकतेने पावभाजी मागवलीच. आणि... अरारारारारा... त्याचं वर्णन करण्यातही अर्थ नाही. पावभाजी कधीच बिघडू शकत नाही असा माझा समज होता - कारण तेल टाकायचं, मसाला टाकायचा आणी त्यात भाज्या चेचायच्या, इतकी सोप्पी पाकृ. पण त्यादिवशी त्याने हा समज मोडून पाडला!
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/09/2015 - 11:12 नवीन
१) पुरणपोळी म्हणून पानात वाढला जाणारा, पुरण एकीकडे आणि पोळी एकीकडे झालेला पदार्थ २) उकडीचा मोदक म्हणून दिला जाणारा तांदळाच्या उकडीचा मुटका ३) करंजीचा खुळखुळा ४) पुलाव म्हणून वाढलेला मसालेभात आणखी आठवेल तसं लिहीतो.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 01/09/2015 - 11:20 नवीन
चायना मध्ये (अथवा कुठेही खरेतर) मिळणारे "ओरिजिनल" चायनीज .. !! कसे खातात त्यांनाच माहीत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/09/2015 - 11:42 नवीन
http://misalpav.com/node/19503 वरील लिंक वाचून घ्या..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 01/09/2015 - 11:57 नवीन
गवि, फोटू गायबलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संचित Fri, 01/09/2015 - 18:27 नवीन
नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती!
ह. ह. पु. वा. मागे एकदा ओरिसातल्या मित्रांनी काही मीठाया आणल्या होत्या. आम्ही मीठाया पाहून त्यावर तुटून पडलो पण लगेच लक्षात आले त्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नर्मदेतील पाण्यातल्या आहे. मित्र समोर असल्यामुळे ३-४ बेचव मीठाया खाव्या लागल्या.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 01/09/2015 - 18:35 नवीन
हल्ली आमच्या घरात वांग्याची भाजी खाणारा मीच त्यामुळे घरातला साराच राग, रुसवा, गोडवा त्या भाजीत मिसळला जातो. एक दिवस भाजी लाल भडक होती. लंच टेबलवर सर्वानांच आश्चर्य वाटले. मी म्हटले सारा राग काढला वाटतो भाजीवर. तेंव्हापासून भाजीचा रंग पाहूनच आमच्या ऑफिसची मंडळी घरातल्या वातावरणाचा अंदाज बांधतात.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 01/09/2015 - 19:28 नवीन
प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरासमोर कोहिनूर नावाचं हाॅटेल/बँक्वेट हाॅल आहे. गेली अनेक वर्षे बेचव अन्न देण्याचं सतीचं वाण त्यांनी निष्ठेने स्वीकारलेलं आहे! ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/09/2015 - 20:05 नवीन
खमंग भाजलेल्या तिळाची वडी पूर्वी मला थोडीफार का होईना आवडत असे पण एका ओळखीच्या बाईंनी त्यांच्या घरातील उरलासुरला तिळगूळ (वास येणारा) आम्हा आजूबाजूला मुलांना खायला लावला होता. एका घासात पोरकिडा आल्याने माझी तीळवडीची आवड कायमची संपली. तसेच कोणाकडेतरी गेल्यावर त्यांनी फो. पोह्याबरोबर (चांगले झाले होते) रव्याची अतिगोड वडी दिली होती त्याने गोडाची कळ मस्तकात गेली होती. त्या वडीचीही आवड संपली. आईने त्यांना वड्या चांगल्या झाल्याचे सांगून साखरेचे प्रमाण विचारल्यावर त्यांनी रव्याच्या तिप्पट साखर घेतल्याचे सांगितले होते. तसेच क्रीमची बिस्किटे या प्रकाराची शिसारी बसलीये. पुणे नासिक प्रवासात एका मुलीने क्रिमची बिस्किटे बकाबका खाल्ली. त्यातून तिला गाडी लागत होती. माझ्या अगदी दुसरी तिसरी यत्तेच्या आसपास बर्‍याच पदार्थांची नावड निर्माण झालीये ती आजतागायत. बाकी पूर्वी हाटेलात खाण्याची पद्धत फारशी नसल्याने कोणत्या हाटेलातील अमूक एक पदार्थ असे सांगता येणार नाही पण माझ्या धाकट्या जावेनं माझी दडप्या पोह्यांची आवड अतोनात आग्रह करून, खायला लावून बरीच कमी केलीये. नुकत्याच झालेल्या लग्नाच्या आधी घरगुती मेंदी कार्यक्रमात त्यांनी चवदार मिसळ व आणखी पदार्थ ठेवले होते. ते चांगले असले तरी खूप प्रमाणात केलेला पदार्थ बघितल्यावरही खायला नको वाटते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 01/09/2015 - 21:01 नवीन
एक 'राजधानी' नांवाची गुजराती थाळी विकणारी रेस्टॉरंट्सची चेन आहे. आमच्या लॉसेंजेलिसात एकदा तिथे गुजराती थाळी खाल्ली. खूप आवडली, म्हणून मग नंतर बयाचदा खाल्ली... उत्तम चव, उत्तम क्वालिटी, उत्तम व्हरायटी, उत्तम सर्व्हिस. एक सुंदर अनुभव! आता इथे इतकी चांगली थाळी मिळते तर भारतात याहूनही चांगली असेल म्हणून गेल्या खेपेला मुंबईला गेलो असतांना मालाडच्या राजधानीत थाळी मागवली... अतिभिकार, महाभिकार होती!!! चव आणि क्वालिटी दोन्ही!!! झक मारली आणि तिथे गेलो असं झालं!!! त्यातून तिथले शिंदळीचे वाढपी दर मिनिटाला काय ना काय चिमूट्भर वाढण्यासाठी टेबलाशी गर्दी करत होते! धड जेवू देईनात की नीट गप्पा मारू देईनात! हे 'गुजराती आदरातिथ्य' असं मला कोणीतरी सांगितलं... अरे पण शिंच्या जो नावडलेला पदार्थ (बहुतेक तसेच होते)एकदा नकोय म्हणून सांगितलं तरी पुन्हा दोन मिनिटांनी तोच पदार्थ पुन्हा घेऊन कशाला येतोस माझ्या टेबलाशी? आदरातिथ्य करायचं तर जरा कस्टमरला काय आवडलंय काय नाही ते जरा लक्षात ठेव ना!!! डोंबलाचं आदरातिथ्य!!! :( खरं सांगतो, आपल्या विजुभाऊच्या घरचं आदरातिथ्य अगोदर अनुभवलेलं नसतं ना तर ह्या गुजराती आदरातिथ्याविषयी कायमचा गैरसमज मनात निर्माण झाला असता!!!
  • Log in or register to post comments
प
पहाटवारा Sat, 01/10/2015 - 01:45 नवीन
आमच्या लहानपणी वाड्यात रहाताना घर्-मालकीणबाईंचा एक आवडता पदार्थ होता - ताकातले पराठे ! घरचे दूध्-दुभते असल्याने सारखाच ह्या पाक्-क्रुतीचा आविष्कार होत असे. अन नेह्मी त्या आम्हाला आग्रह करुन आणून देत असत. एक तर त्याची चव एकदम बेकार होती पण वास ..तो पूर्ण वाडाभर भरून राही. त्यांना नको म्हणावे, तर विचारत असत, कि आवडले नाहि का ? अन आवडले म्हंटले,कि मग घेत का नाहि ? सौजन्याच्या आडून तो एक तोंड दाबून .. सोरी .. तोंड भरून बुक्यांचा मार होता तो ! -पहाटवारा
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/10/2015 - 08:17 नवीन
अनोखा मिक्स भाजी करण्याचा मान फक्त होस्टेल कँन्टीन आणि कंपनी कँन्टीन कडे जातो. भेंडी-बटाटा. बटाटा-वांगे-फ्लोवर रस्सा ढोबळी-बटाटा वांगे वीथ शेवगा..
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 01/13/2015 - 10:21 नवीन
कँटीनवरुन आठवले. आमच्या कंपनीतले जुने लोक एक किस्सा सांगायचे... एकाला कँटीनमधे एकदा आमटी भुरकताना आमटीत झुरळ दिसले. त्याने आकांडतांडव करुन कँटीनवाल्याला बोलवुन आणले. कँटीनवाल्याने ते आमसुल आहे सांगितले तर हा झुरळच आहे म्हणत होता. शेवटी कँटीनवाल्याने निर्विकारपणे ते उचलुन तोंडात घातले आणि चावुन चावुन आमसुल असल्याचे कन्फर्मेशन दिले आणि निघुन गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सविता००१ Tue, 01/13/2015 - 10:30 नवीन
अग आई ग्गं...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
अ
अर्धवटराव Tue, 01/13/2015 - 15:04 नवीन
एका पंचतारांकीत हॉटेलमधे कुठल्याश्या कॅनेडीयन कस्टमरला सूप पिताना त्यात झुरळ आढळलं. त्याने तक्रार केली तर मॅनेजरने शेफ ला बोलावलं. तो शेफ सरदार होता. ते झुरळ नसुन बडी इलायची आहे असं म्हणत सरदारजींनी सरळ ते खाऊन दाखवलं. त्याच्या बिझनेस कमिटमेण्टला ओळखुन कॅनेडीयन सरळ त्याला कॅनेडाला घेऊन गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
H
hitesh Wed, 01/14/2015 - 03:43 नवीन
मी आईस्क्रीम माशी व बेदाणा अशी ऐकली आहे. या स्टोरीतला चाणाक्ष वेटर ताज हॉटेलातुन अमेरिकेला गेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अन्या दातार Tue, 01/13/2015 - 11:16 नवीन
यच्चयावत कँटीन्सचा नंबर विविध काँबिनेशन्स करण्यात लागावा. मागे एकदा व्हेज बिर्याणी (पक्षी रंगी-'बेरंगी' भात) मध्ये उकडलेला बटाटा!!! अरे काय हे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पैसा Tue, 01/13/2015 - 11:25 नवीन
मी लांजा इथे नव्वीन हाटेलात एकदा पुलाव मागितला तर मस्त हळद घातलेला पिवळाजर्द मसालेभात आणून दिला. म्हटलं हे काय, तर तो हाटेलवाला म्हणे की इथल्या लोकांना असाच आवडतो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
न
नाखु Tue, 01/13/2015 - 11:40 नवीन
गोंधळ असतोच. सुमारे १२-१५ वर्षांपूर्वी बेंगलोरात कंपनी सहकार्याने सांगेपर्यंत "चाव्-चाव भात" म्हणजे गोड शिरा आणि उप्पीट एकाच प्लेटमध्ये (मिक्स करून नाही स्व तंत्र*)दिले जाते हेच माहीत नव्हते.मी बापडा नावावरून हा पदार्थ "चायनीज" *nea* *NO* *NO* असावा असा समज करून दुर्लक्षीला होता. स्व तंत्र*) शब्दश्रेय : अनवट खादाडी सम्राट "बुवा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 01/13/2015 - 16:35 नवीन
चाव्-चाव भात नाही, चाउ चाउ बाथ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Wed, 01/14/2015 - 13:44 नवीन
चाउ चाउ बाथ
अनुभव! याला म्हंत्यात अण्भव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/13/2015 - 21:22 नवीन
पुलाव पांढरा आणि पिवळा अशा दोन्ही प्रकारे करतात. पिवळा पुलाव करताना काळजी घ्यावी लागते. नाहीतर तो फोडणीचा भात दिसतो. पिवळ्या पुलावात भाज्या, मटार आणि पनीर घालताना हळद नीट शिजलेली असावी नाहीतर हळदीचा पिवळा रंग भाज्या, मटार आणि पनीरला लागून त्यांचे 'वेगळेपण' उणावते. किंचित पिवळा भात, शेंदरी रंगाचे गाजराचे तुकडे, हिरव्या रंगाचे मटार आणि फरसबीचे तुकडे, पांढर्‍या रंगाचे पनीर आणि वर भुरभुरलेली कोथिंबीर मोठी आकर्षक दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 01/14/2015 - 05:35 नवीन
नवीन प्रकार कळला! आता लगेच पुढची मागणी. डिट्टेल रेशिपी द्या ना! त्या हाटेलात पुलावात खास पुलाव मसाल्याचा पत्ताच नव्हता हो! आणि हळदीचा कच्चा वास पण येत होता. त्यामुळे जास्त वैताग आला. काहीतरी वेगळंच रसायन झालं होतं. निदान मसालेभात तरी नीट केला असता तरी आवडला असता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/14/2015 - 08:52 नवीन
डिट्टेल रेशिपी द्या ना! लवकरच.... *smile* :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/10/2015 - 08:23 नवीन
>>>>गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती खपलो, मेलो. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 01/10/2015 - 11:14 नवीन
अामच्या एक नातेवाईक आहेत.त्यांच्या घरी भीषण स्वयंपाक असतो.आणि तेच स्वतःच्या जेवणाची इतकी वाहवा करतात ते बघुन आपण अवाक्!त्यांनी एकदा रव्याची खीर नामक लगदा बचकन एवढा मोठ्ठा वाढला होता.माझा भाऊ तेव्हा लहान आणि त्यामुळे स्पष्टवक्ता होता.त्याने हा शिरा मला नको घाण लागतो म्हणून गळा काढुन पंचाईत केली होती.ती चवहिन खीर मग त्यांनी याची ताई खाते गोड म्हणून मला वाढला.त्या दिवसानंतर मी कधीही रव्याची खीर कम शिरा खाऊ शकले नाही.याच खाद्य शत्रुंनी एकदा रावणभात म्हणून भयानक प्रकार खाऊ घातलेला.त्यानंतर मात्र त्यांच्या घरी जावे लागले की मी मला याची अॅलर्जी आहे म्हणून सांगते ^_~
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 01/10/2015 - 13:00 नवीन
तिमांच लेखन पाहूनच फार आनंद झाला. बाकि ताटात पडेल ते खायची सवय असल्याने सांगण्याजोगं काही नाही.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 01/10/2015 - 13:09 नवीन
एकदा लग्न झाल कि 'अन्न हे पूर्णब्रह्म' का म्हणतात याचा अर्थ आपसूक उलगडतो.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/13/2015 - 05:18 नवीन
कुडाळला विट्ठल कामतमधे दगडी इडली आणि थंडगार सांबार अर्धा तास वाट बघून घ्या एकदाचे म्हणून निर्विकारपणे दिले होते. त्यानंतरच्या चहात किमान चार चमचे साखर घालून उकळला होता. पिऊन बघा म्हटलं तर बहुधा तोच चहा परत पाणी घालून आणून दिला होता. विट्ठल कामत यांची खरी हॉतेल्स किती आहेत आणि फ्रँचाईसी किती आहेत देवजाणे. कदाचित हे असले खाणे फ्रँचाईसींमधे मिळत असावे. हल्लीच आलेला आकुर्डी सीसीडीचा अण्भव असाच. एसी बंद, ऊन सगळ्या बाजूंनी भाजत होतं आणि त्याला मॅचिंग कोमट आणि वल्लीच्या भाषेत रूपहीन, रंगहीन, गंधहीन निर्विकार कापी. वल्लीने त्या कॉफीचा उद्धार तिथेच मोठ्याने केला.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 01/13/2015 - 19:26 नवीन
तुम्ही आकुर्डीला आलात आणि चुकीच्या ठिकाणची कॉफी प्यायलात. सी.सी.डी. ला बोगस कॉफी मिळते. पुन्हा आलात की लिक्वीड बिस्त्रो ची कॉफी प्या. सी.सी.डी. बरिस्ता वगैरे वगैरे च्या तोंडात मारेल अशी चव आणि क्वांटीटी असते. दुर्गा नामक फालतु प्रकाराच्या अजिबात नादी लागु नका. त्यांच्या आकुर्डी शाखेतल्या कॉफीपेक्षा पाणी घटट आणि चविष्ट असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आजानुकर्ण Tue, 01/13/2015 - 19:34 नवीन
कुठंय हे लिक्विड बिस्त्रो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 05:19 नवीन
तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी चौक माहिती आहे का? बिजलीनगरचा पुल ते संभाजी चौकादरम्यान डावीकडे आहे. ह्यानिमित्ताने इथे कोल्ड कॉफी कुठे कुठे छान मिळते हे सांगुन ठेवतो. १. कॅफे कुल (चतुश्रुंगी टेकडीच्या पार्किग पासुन सिंबिकडे येताना साधारण १०० मी. वर एक मोठ्ठा आईसक्रीम चा कोन दिसतो तिथे) कॉफी स्ट्रॉ नी पिता येत नाही अशी घट्ट आणि सविष्ट असते. २. लिक्वीड बिस्त्रो (प्राधिकरण सेक्टर २८) वर दिलेल्या पत्त्यावर मस्त चवं आणि सजावट. शिवाय हँगिंग आउट स्पॉट म्हणुन पण मस्त आहे. अजुन इथे व्हेज आणि नॉन व्हेज सॅडविचेस मस्तं मिळतात. ३. चिल आउट कॅफे (हा आता चालु आहे का नाही माहित नाही. भारती विद्यापीठाची मागची बाजु पहिली बिल्डींग) ह्याच्याकडे कोल्ड कॉफी आणि कॉफी मॉकटेल्स मस्त मिळायची. ४. सिटी प्राईडच्या शेजारच्या बोळामधे एक छोटी टपरी आहे. नाव लक्षात नाही. त्याच्या कडे कॉफी मस्त आणि मस्ट असते. ५. वासु वडापाव सेंटर प्राधिकरण से. २६ ठिकठाक कोल्ड कॉफी मिळते. ६. एम.आय.टी. च्या जवळ फ्रुट ज्युस आणि कॉफीची मारामारी मिळते. कोणाला नावं आठवत असेल तर सांगा. एक मित्र खुप कौतुक करत असतो त्याचं. अजुन यादी अपडेट करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
थ
थॉर माणूस Wed, 01/14/2015 - 05:48 नवीन
धागा बंडल खाद्यपदार्थांचा आहे की नाही? मग ही चिटींग आहे. आता सहा भंगार कॉफी मिळणारी ठीकाणे प्रायश्चित्त म्हणून टाका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 08:36 नवीन
फक्त सहा? ठिके १. सी.सी.डी. २. बरिस्ता ३. दुर्गा (पुर्वी छान आता बोगस) ४. स्टारबक्स (एकदाच गेलोय, किंमती आणि त्या तुलनेनी मिळणारी चव आणि प्रमाण माझ्या गणितात बसत नाही.) ५. ऑल टाईम मस्ती (कोथरुड, हे अजुन चालु आहे का?) ६. कॅड (एम) कॅड (बी) (कॉफी साठी बोगस बाकी कॅड (एम आणि बी छान) ७. बर्गर बार्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
ज
जिन्क्स Wed, 01/14/2015 - 08:56 नवीन
"ऑल टाईम मस्ती" मध्ये कॉफी सोडुन बाकी पदार्थ खूप छान मिळतात. पिझ्झा, पास्ता, बर्गर्स खूपच छान असतात. पुण्यात असे indianised bread delicacies देणारे हॉटेल्स कमी आहेत ह्याचे वाइट वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Wed, 01/14/2015 - 05:52 नवीन
वासु वडापाव सेंटर >>>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रभो Wed, 01/14/2015 - 06:11 नवीन
च्यामारी, एवढी सगळी नावं घेतली प्राधिकरणातली....नायडू आठवू नये (गरम) कॉफी साठी...? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 08:37 नवीन
प्यायली नाही हो कधी. हे कुठे आहे? सांगीतलत तर ट्राय करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
क
कपिलमुनी Wed, 01/14/2015 - 12:16 नवीन
ते डोसा + कॉफी का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Wed, 01/14/2015 - 12:32 नवीन
नाही....नाही.... पावभाजी + पुलाव + मसाला पाव + गरम कॉफी. कँप शाळेजवळ. HDFC बँक च्या कोपर्‍याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 18:11 नवीन
ट्राय करीन. लोकमान्यकडे जाणारा रस्ता का संभाजी चौकाकडे जाणारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/15/2015 - 06:27 नवीन
राधिका आहे ना.. त्याच्या समोर बहुदा.. बरोबरे का हो प्रगो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/15/2015 - 09:20 नवीन
अहो ते होय. कँप एजुकेशन माझीचं शाळा आहे. मग माहीती आहे ही जागा. पण कधी खाल्लं प्यायलं नाहीये इथे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा