Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण यांना का खाल्लंत ?

त
तिमा
Fri, 01/09/2015 - 08:58
🗣 76 प्रतिसाद
पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच. लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला. पुस्तकाच्या आकाराचा तो केक, इतका छान सजवला होता की तो, एखाद्या डिक्शनरी एवढा जाड, केक पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. लवकरांत लवकर तो केक खायला मिळावा म्हणून मी आईमागे सारखी भुणभूण लावली होती. शेवटी संध्याकाळी घरातले सगळे सदस्य हजर झाल्यावर आईने तो केक कापला आणि त्याचा एक भला मोठ्ठा तुकडा माझ्यासमोर ठेवला. पण पहिला घांस खाताच मी तोंड वेडेवाकडे केले. त्यांत संत्र्याची सालं घातल्यामुळे ती कडवट लागत होती. ती चव मला अजिबातच आवडली नाही. माझी झालेली फजिती पाहून माझ्या बहिणींना हंसु आवरत नव्हते. त्यानंतरही अनेक प्रसंगी, 'दिसते तसे नसते' या म्हणीचा मी अनुभव घेतला आहे. एकदा, मुंबई आयआयटी मधे एका नातेवाईकांचा मुलगा रहात होता. मलाही लायब्ररीचे काम असल्याने तिथे जायचे होते. तर दुपारी वेळ ठरवून, मी त्याच्या होस्टेलवर जेवायला गेलो. बेत पावभाजीचा होता. पण बघून तरी ती पावभाजी वाटत नव्हती. त्याची चव घेतली मात्र! अरेरे! त्याला कसलीच चव नव्हती. नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती! नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की संस्था जरी नामांकित असली तरी व्यवस्थापन अगदीच ढिसाळ होते आणि मुलांचे खाण्यापिण्याचे हाल अनेक वर्ष चालूच होते. कदाचित अजूनही तशीच परिस्थिती असेल! पुढे व्यवसायानिमित्त, अनेकदा पंचतारांकित हॉटेलांमधे जेवण्याची वेळ आली. पण तोपर्यंत मी अनुभवाने शहाणा झाला होतो. त्यामुळे बाह्यरुपावर न जाता आधी सर्व पदार्थांची चव घेतल्याशिवाय मी डिश भरतच नसे. कित्येक पदार्थ असे असतात की ते खाल्यावर पोट तर भरते पण चव नसल्यामुळे खाण्याचे समाधान त्यांत मिळत नाही. शिरा, उपमा, पोहे ह्याची रेसिपी जरी माहित असली तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच. बाहेर कुठेही असे 'चवलेस' पदार्थ खाल्ले तर 'आपण यांना का खाल्लंत ?' असं म्हणू तरी शकतो. घरी मात्र, गंभीर प्रसंग टाळण्यासाठी, तो पदार्थ पुन्हा वाढून न घेणे, एवढेच आपल्या हाती असते.imoti

प्रतिक्रिया द्या
23163 वाचन

💬 प्रतिसाद (76)
म
मराठे Wed, 01/14/2015 - 16:28 नवीन
>> कॉफी स्ट्रॉ नी पिता येत नाही अशी घट्ट आणि सविष्ट असते. सविष्ट ... श्शी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 17:51 नवीन
चविष्ट!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
आ
आजानुकर्ण Wed, 01/14/2015 - 18:09 नवीन
संभाजीनगर माहिती आहे. माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सस्नेह Wed, 01/14/2015 - 07:04 नवीन
सी.सी.डी. ला बोगस कॉफी मिळते
..त्रिकालाबाधित ज्वलंत सत्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
H
hitesh Wed, 01/14/2015 - 03:40 नवीन
चेंबुरच्या कामत हॉटेलातही कामत या अपेक्षेने गेलो होतो.भानिराशा झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मी-सौरभ Tue, 01/13/2015 - 16:03 नवीन
हे सगळे आण्भव पाहता. रेल्वे स्टेशन वर मिळणारा चहा नामक पदार्थ बरा वाटू लागलाय.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 01/13/2015 - 19:34 नवीन
मॅगीचे डिसगस्टींग प्रकार कोणी कोणी खाल्लेत? प्रकार १: (स्वीट कोफ्ता मॅगी) मॅगी दुधामधे उकळुन त्यामधे कोफ्ते, वेलची आणि साखर घालुन खाणे. :O :O प्रकार २: मॅगीची खिर सगळं प्रमाणामधे घालुन ते मिश्रण प्रमाणाबाहेर उकळवणे. नुडलच्या दोर्‍याचं पिठलं व्हायच्या बेताला आलं की ते गिळगिळीत मिश्रण खायला घालणे. वरचे प्रकार अनुक्रमे पुण्यामधल्या जंगली महराज रोडवरच्या एका प्रसिद्ध कॉलेजजवळच्या एका प्रसिद्ध घरगुती हाटेल कम मेस कम ब्लाऊज शिवायच्या दुकानात तर दुसरा प्रकार एस.एस.पी.एम.एस. च्या पार्किंग कम कँटीन कम अ‍ॅडमिसन ऑफिस ला मिळतो.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Tue, 01/13/2015 - 21:31 नवीन
असे प्रकार पुण्यनगरीतच मिळू शकतात. बाय द वे, नाय काय म्हणालात त्या प्रसिद्ध घरगुती हाटेल कम मेस कम ब्लाऊज शिवायच्या दुकानाचं. एकदा टेस्ट करावीच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 05:09 नवीन
घरोबा किंवा पोटोबा असं काहीतरी आहे. बाकी पदार्थ छान मिळतात हे एक सोडलं तर. त्यांच्याकडची वरणफळं बरीचं प्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
र
रेवती Wed, 01/14/2015 - 06:30 नवीन
पोटोबा ऐकलय कारण तिथे म्हणे फोडणीचा भातही मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ख
खटपट्या Tue, 01/13/2015 - 19:35 नवीन
राजापूरच्या एसटी कँटीनमधे कोणी सकाळी नाश्टा केलाय का? केला असल्यास माझ्यातर्फे नाश्टा केलेल्याचा जाहीर सत्कार करणेत येईल. (जाण्यायेण्याचे यष्टीचे तिकिट मिळेल)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/14/2015 - 05:31 नवीन
आमचे शेजारी कुठूनतरी बेळगावी लोणी आणत आणि ते काढवून घरी तूप करीत असत. लोणी कढवायला घेतले कि सोसायटी भर वास "दरवळत" असे. त्यांच्या कडे जेवायचा प्रसंग आला तर आम्ही आवर्जून तूप घेणे टाळत असू.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/14/2015 - 05:34 नवीन
काही दिवसांपूर्वी गुजरातेत उपलेटा नामक गावी जाण्याचा प्रसंग आला तेथील एका हाटेलात आम्ही व्हेज क्लियर सूप मागवले तर ते हॉट अण्ड साअर सूप सारखे दिसायला आणि चवीलाही होते. त्यांना आम्ही विचारले कि आम्ही व्हेज क्लियर सूप मागवले आहे त्यावर ते म्हणाले आमचे व्हेज क्लियर सूप असेच असते.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 01/14/2015 - 06:29 नवीन
सॉल्ट नावाच्या एका हॉटेलात मशरुम-ब्रोकोली सुप मागवले तर चक्क कॉर्नफ्लॉअरच्या थिक पाण्यात एका ब्रोकोलीच्या तुर्‍याचे ४ तुकडे करुन आनी ५-७ मशरुमचे तुकडे (हे १५०/-) दिले.. म्ह्णलं कोणत्या जगात ब्रोकोली सुप असं बनवतात? शेवटी खुप बौद्धिक घेउन ते सुप परत दिलं आनी त्याचे पैसे देणार नाही म्हणुन सांगितलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मृत्युन्जय Wed, 01/14/2015 - 06:54 नवीन
आमचे व्हेज क्लियर सूप असेच असते. हमारे यहा ऐसेइच मिलता हय यावरुन खालील प्रसंग आठवला. माझ्याच एका धाग्यातुन घेतलाय - एकापेक्षा एक ************************************************************************************************ स्थळ: पुणे. मध्यवस्तीतले आता बंद पडलेले एक उडुपी उपाहार गृह " १० चीज बर्गर द्या हो" ( मास्तरच्या पैशाने खायला मिळते आहे तर का सोडा या सदसदविवेकबुद्धीने पार्सल घ्यायाला आलेला एक यडचाप तरुण. एरवी गपगुमान हातगाडीवरचा वडापाव खाणार. पण फुकट मिळतय तर "आम्ही ब्वॉ रोज चीज बर्गरच खातो") (मीच तो. मीच तो. ) "थोडा रुको. अभी देता है" १५ मिनिटांनतर "देताय ना. उशीर होतो आहे" " बन ला रहा है. रुकिये ५ मिनिट सिर्फ" (उशिर होतो आहे म्हटल्यावर रुको च रुकिये झाले होते आता. थोड्यावेळाने तो "स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार." असेही म्हणाला) हे बन ला रहा है प्रकरण मला काही झेपले नाही. इथे काय बर्गरची ऑर्डर मिळाल्यावर जवळच्या बेकरीतुन बन आणायला पळतात का? अजुन १० मिनिटांनी " किती वेळ लागेल अजुन?" "क्या स्सर?" (आता याला मराठी कळेनासे पण झाले. बोलता तर आधीपासुनच येत नव्हते) "कितना टाइम लगेगा? अर्धे घंटेसे वाट बघ रहा हू मै. अभी क्या चीज लावोगे क्या?" "स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार." अजुन १० मिनिटानी मरो ते बर्गर म्हणुन उठु पाहणार्‍या माझ्या हातात १० बर्गर शेवटी एकदाचे कोंबले गेले. मी धावत पळत ऑफिसला गेलो. एव्हाना मास्तरचे ४ फोन आले होते (हापिसात गेल्यावर काय रे गाय पकडुन तिचे दूध काढुन त्याचे चीज करुन घेउन आलास काय? असे ऐकायला लागले ते वेगळे) बर्गरचे खोके उघडल्यावर अस्मादिकांच्या लक्षात आले की अरेच्चा यात तर कटलेटच नाही. फक्त चीजच आहे. (बनसुद्धा बनपावाचा बन होता हो). चरफडत अखेर ते तसेच खाल्ले. परत जाउन घेउन येण्याइतकी भूक कोणाला धरवत नव्हती. बर्गर (सॉरी चीज बन) खाता खाता सगळे मला शिव्या घालत होते. हा अपमान असह्य होउन मी एक बाणेदार पुणेकर तडक त्या मद्राश्याच्या हॉटेलात जाउन धडकलो. "तुम्हारे बर्गर मै कटलेट नही था" "ऐसा हो ही नही सकता" "मग मी काय खोटे बोलतोय का?" रागवताना इनोदी हिंदी नको म्हणुन मी सुंबडीत मराठीवर आलो. त्यावर २ मद्रासी एकमेकांशी अगम्य भाषेत यंडु गंडु पांडु नारु सारु असे काहिसे बोलले आणि मग तिसराच बाबा माझ्याकडे आला. "क्या हुआ सर?" एव्हाना रागावर नियंत्रण मिळवलेला मी त्याला सर्व डिटेलात सांगण्याच्या मुडात आलो होतो. सगळे ऐकुन त्याच्या चेहर्‍यावर "देयर यु आर" असे भाव आले: "चीज बर्गर मे कटलेट नही होता है सर? व्हेज बर्गर मे होता है. आपने चीज बर्गर लिया था ना? तभी तो." "चीज बर्गर मध्ये कटलेट नसते? काहितारी काय? सगळीकडे मिळते" "नही सर इटली मे भी ऐसेहीच रहता है" "इटलीत पिझ्झा मिळतो. बर्गर नाही" " हा. पर हमारे यहा बर्गर ऐसेही मिल्ता है" "अर्रे तुम कल बर्गर मे शेपुकी भाजी डाल के दोगे और बोलोगे हमारे यहा ऐसेहीच मिलता है. ऐसा थोडेही ना होता है?" (माझ्या चेहर्‍यावर क्षणभर गड सर केल्याचे भाव होते. क्षणभरच राहिले) "हमारे यहा शेपुकी भाजे नही डालते बर्गर मे" म्यानेजर ने तेवढ्याच मख्खपणे सांगितले. यानंतर त्या **** शी भांडण्याचे त्राण अंगात नसल्याने आणि असाही तो बर्गर फु़कटच असल्याने (माझ्यासाठी. दिडक्या मास्तरने मोजल्या होत्या ना), मी हताशपणे चालता झालो. जाताना "ऐसा करोगे तो हॉटेल बंद हो जायेगा जल्दी ही" असे म्हणायला विसरलो नाही. माझी शापवाणी खरी ठरली. थोड्याच वर्षात हॉटेलचा बाजार उठला. आता तिथे एक कॅफे दिमाखात उभा आहे. पण अजुनही त्या जागेत जायचे धैर्य होत नाही मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 08:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Wed, 01/14/2015 - 13:47 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ज
जेपी Wed, 01/14/2015 - 06:57 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ते श्री. तिमा आणी कप्तान चिमणराव यांचा सत्कार एक एक मिसळ देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 01/14/2015 - 08:16 नवीन
कुठली ते सांगा म्हंजे जोर्दार अणुमोदनाचं ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 08:39 नवीन
धन्यवाद. कुठे कधी? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Wed, 01/14/2015 - 08:43 नवीन
ती फ्लेक्ष वाली मिसळ हाय...फक्त फ्लेक्ष वरच असते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/14/2015 - 08:46 नवीन
फ्लेक्स वरची मिसळ असायला जेपी काय पुणे (३०) मधले आहेत का? आता म्हणले म्हणजे देणार ते =))...तुला पण देतील पटवुन देण्यासाठी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी गुरुवार, 01/15/2015 - 06:07 नवीन
ठाण्यातील मामलेदारची मिसळ देण्यात येईल *blum3* अर्थात आमचा मिरचीच खळ संपवुन येतो. *wink* =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/15/2015 - 06:17 नवीन
चला...आणखी येक ठाणे कट्टा होणार मग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
श
श्रीगुरुजी Wed, 01/14/2015 - 18:14 नवीन
पुण्यात मार्केटयार्ड रस्त्यावरील "वाडेश्वर" अत्यंत बोगस हॉटेल आहे. तिथे ईडली सोडून उरलेले सर्व पदार्थ अत्यंत बेचव आहेत. २-३ वेळा वेगवेगळ्या वेळी जाऊन वेगवेगळे १०-१२ पदार्थ ट्राय केले होते. प्रत्येकवेळी तोच वाईट अनुभव आला.
  • Log in or register to post comments
य
यमन गुरुवार, 01/15/2015 - 18:55 नवीन
२-४ वेळा तोंड फोडून घेतल्यावर आता जात नाही .त्या पेक्षा मार्केट यार्ड मधलं हमाल कॅन्टीन बरंय राव !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा