आरती
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे."
मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना."
मी प्रयत्न केला.
-------–------------------
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
तुझा तांब्या मी वाहीन
तुझाच दास मी होईन
गायछापाचा नैवैद्य तुजला
जिलबीचा प्रसाद दे मजला
जरी थांबेन मी दाबून नीट
आतल्या आत पडेल पीठ
येऊ दे माझी तुला करुणा
लल्लल्लल्लल्ललू दयाघना
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच नाही.हेच सांगायला येत होतो. मराठीत ते जलामध्ये असे होईल. बाकी, ही गोष्ट बहुतेक हायस्कूलातल्या संस्कृत अध्यापकांनी सांगितली होती... कालिदासाचे माणूस आणि कवी म्हणून मोठेपण दाखवायला. जांभळाची फळे आणि मासेमारीसाठी वापरलेल्या जाण्यार्या जाळ्यांच्या शिश्याच्या गोळ्या यातील साधर्म्य पकडून आणि त्याचबरोबर "मासे जाळ्याच्या गोळ्या समजून पाण्यात पडलेल्या जांभळांना खात नाहीत" ही अफलातून कवीकल्पना वापरून, काव्याची एकच ओळ बदलल्याने, संपूर्ण चारोळी काव्याच्या वरच्या स्तरावर गेली आहे ! ...मग हे काम स्वतः कालिदासाने केले असो वा नसो.