ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
खरेसाहेब, मी माझे म्हणणे वरच्या प्रतिसादाच्या शेवटच्या परिच्छेदात दिले आहे. इतर गोष्टी केवळ चर्चेत मुद्दे आला म्हणून लिहिलेल्या आहेत.
जेव्हा असे वागणारी व्यक्ती देशप्रेमाबद्दल बोलते तेव्हा तेव्हा ती प्रेरणा न राहता केवळ गप्पा राहतात.
कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.
धाग्याची एक प्रिंट काढून "शेणसार" बोर्डास देणे म्हणजे उगा राष्ट्रगीत वाजवून वेळ वाया घालवतात पिक्चर आधी तो तरी वाचवतील आणि चार जाहीराती तरी मिळतील.
===
धन्य ते राश्ट्र ज्यांस ऐसे राष्त्र्पती आहेत.
झेंड्याला वंदन करणं किंवा राष्ट्रगीताला विशिष्ट पोझिशनमध्ये उभं रहाणं यावरून त्या व्यक्तिची देशाबद्दलची आपुलकी मोजणं हे पटलं नाही. उगाच खुस्पट.
अगदी पटलं. पण देशभक्तीचे प्रदर्शन हेच देशभक्तीपेक्षाही महत्त्वाचे आहे असे मानणाऱ्यांना ही गोष्ट कोण समजावणार? चित्रपटाच्या आधी/नंतर राष्ट्रगीत लावल्यावर पब्लिक चालू पडतंच. सरकारी आदेशाने हा रोजच अपमान होतो की!
ते एक असो. मुळात ज्या लोकांनी ध्वजसंहिता लिहीली ते या अशा मान-अपमानाबाबत पुरेसे सजग होते. कोणत्या गोष्टीमुळे ध्वजाचा सन्मान होतो आणि कोणत्या गोष्टीमुळे अपमान होतो याचा विचार करुन, त्यावर पुरेशी चर्चा करुन, ध्वजसंहिता व वंदनाचे संकेत आले आहेत. कदाचित - अगदी कदाचित - हमीद अन्सारी यांनी ही ध्वजसंहिता अभ्यासली असावी. आणि न जाणो उद्या आपण वंदन केलेच तर काही लोक ध्वजसंहितेत गणवेशात नसलेल्यांनी वंदन करु नये असा संकेत दिला असतानाही वंदन केल्याने ध्वजाचा अपमान झाल्याची बोंब ठोकतील असा विचार करुन ध्वजसंहितेत दिल्याबरहुकूम संकेत पाळायचे ठरवले असू शकते. 'सावधान' स्थितीत असल्याने ध्वजाचा पुरेसा सन्मान होतो हा संकेत आपल्या जाणकार पूर्वसुरींनी आधीच लिहून ठेवला आहे. हा संकेत उपराष्ट्रपतींनी पुरेपुर पाळला आहे. ध्वजाला वंदन केलेच पाहिजे असा ज्यांचा आग्रह असेल त्यांनी संहितेत बदल करवून घ्यावा. आधी केवळ सरकारी इमारती व कार्यक्रमांमध्ये ध्वज लावता येत असे. नंतर कोर्टाच्या निर्णयानुसार तसा बदल करवून सामान्य नागरिकांनाही तो वापरता येऊ लागला. तसे काही प्रयत्न करता येतील.
बाकी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत शंका यावी ही एक राष्ट्र म्हणून आपली किती अवनती झाली आहे हेच अधोरेखित करते.
'सावधान' स्थितीत असल्याने ध्वजाचा पुरेसा सन्मान होतो हा संकेत आपल्या जाणकार पूर्वसुरींनी आधीच लिहून ठेवला आहे. हा संकेत उपराष्ट्रपतींनी पुरेपुर पाळला आहे.
पुरेपूर सहमत.. अगदी जिल्ह्याच्या ठीकाणीपण मुख्य अतिथी, जे सलामी घेतात आणि गणवेशातील अधिकारी/लोकच राष्ट्रगीताच्या वेळी झेंड्याला 'सॅल्यूट' करतात. बाकी फक्त 'सावधान'च्या पावित्र्यात उभे असतात. झेंड्याला 'सॅल्यूट' करणे हे ऑप्शनल आहे. न केल्याने अपमान होत नाही. बाकी माहीती खरे साहेबांनी वर दिलीच आहे..
बाकी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत शंका यावी ही एक राष्ट्र म्हणून आपली किती अवनती झाली आहे हेच अधोरेखित करते.
आजकाल कुणाच्याही देशभक्ती/चारीत्र्याबद्दल शंका घेणे, हे सोशल मिडीयमुळे अत्यंत सोपं झालं आहे. राजनैतिक मतभिन्नता आणि वैयक्तिक टीका ह्यातल्या सिमारेषापण अत्यंत धुसर झाल्याहेत..
आजकाल कुणाच्याही देशभक्ती/चारीत्र्याबद्दल शंका घेणे, हे सोशल मिडीयमुळे अत्यंत सोपं झालं आहे. राजनैतिक मतभिन्नता आणि वैयक्तिक टीका ह्यातल्या सिमारेषापण अत्यंत धुसर झाल्याहेत..
तरी कुमारकाका सांगत होते फॅसिझ्म बोकाळत चाल्लाय म्हणुन. पण कोण ऐकेल तर ना..
सक्ती नाही मान्य आहे. पण आपले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री वंदन करत असता उप राष्ट्रपतींनी वंदन न करणे खटकले हे निश्चित. ते सहेतूक की सहज, नकळत हा भाग आणखी वेगळा.
इतक्या उच्चपदस्थ आणि राष्ट्राचे बहुमानाचे पद भूषविणार्या व्यक्तिस राष्ट्रध्वजास वंदन करण्यासाठी कायदेशीर बंधनच असावे लागते, अन्यथा त्याला वंदन करावे असे वाटु नये हे दुर्दैव.
एखाद्या थाटामाटाच्या लग्नात शुभमंगल सावधान होऊन पंगत पदरी पडली की स्टेजवर सिंहासने टाकून बसलेल्या अथवा उभे असलेल्या वधुवरांना ग्रीट करण्यासाठी, त्यांच्यातल्या अनोळखी हाफची ओळख करुन घेण्यासाठी, अहेर (घेत असल्यास) देण्यासाठी आणि ग्रुप फोटोसाठी आपण रांग लावून थांबत नाही का? याचा अर्थ आपण त्या दांपत्याचे चाकर अथवा मिंधे झालो असं होतं का?
( बर्याचदा अशा वेळी आपल्या चेहर्यावरही थकवा, मरगळ वगैरे असते.. भरपेट जेवणाची पेंगही चेहर्यावर अशी दिसते ;) )
टीका नक्की कशावर आहे?
रांगेत उभे राहण्यावर?- तसे असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि ते सर्वानीच शिकायला हवं.
अब्जाधीश ओबामांना भेटायला गेले म्हणून? - मुक्त अर्थव्यवस्थेत यात वावगं काहीही नाही. पाश्चात्य देशांचे सरकार व्यापार वाढवणाऱ्या स्वदेशी कंपन्यांचे हित बघत असतात. East India Company, तेलाच्या क्षेत्रातल्या Seven Sisters यांची उदाहरणे आहेतच. आपल्यालाही या गोष्टीचं महत्व काळाबरोबर कळत असेल, तर ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने चांगलंच आहे.
त्या दुव्यातली गोष्ट खरी आहे असे गृहीत धरूनही...
मोठ्या अधिकारावरचा माणूसही फक्त माणूसच असतो. तो पण कधी कधी चूक करतो... आणि तीही चूकच असते. चूक झाकण्याचे प्रयत्न न करता ती प्रामाणिकपणे मान्य करून ती भविष्यात परत होणार नाही अशी काळजी घेण्याची सवय लागली की त्याचे खर्या मोठेपणाकडे मार्गक्रमण होऊ लागते.
अन्सारी आडनाव असल्याने अनेकांना देशभक्तीबाबत शंका आलेली दिसतेय. असो. खालील खुलासा समाधानकारक वाटला.
Breaking his silence on criticism against him in the social media for not saluting the Tricolour during the Republic Day Parade at Rajpath on Monday, Vice President Hamid Ansari has stated that as per protocol only those in uniform salute the national flag while the National Anthem is being played.
Those in plainclothes are just supposed to stand in attention, he added.
According to the Flag Code of India, Section VI, only those in uniform may ‘render the appropriate salute’.
“During the ceremony of hoisting or lowering the flag or when the flag is passing in a parade or in a review, all persons present should face the flag and stand at attention. Those present in uniform should render the appropriate salute… A dignitary may take the salute without a head dress,” the section states.
- See more at: http://indianexpress.com/article/india/india-others/saluting-national-flag-goes-against-protocol-vice-president-hamid-ansari/#sthash.e707SgQs.dpuf
@आजानुकर्ण -Wednesday चित्रपटाच्या शेवटी निवेदक अनुपम खेर च एक वाक्य आहे . मराठीत ढोबळ भाषांतर अस , " मी तुम्हाला त्याच (नसीर च्या पात्राच ) नाव सांगणार नाही कारण नावात धर्म शोधतो ." त्यामुळे माणसाच्या नाव /आडनाव वरून त्याचा धर्म / जात शोधणारे लोक तुम्ही कितीही पोट तीडीकेने स्पष्टीकरण दिले तर ते मान्य करतील असे वाटत नाही .
इथे आडनावाचा प्रश्न आहे हा शोध लावण्याइतका विदा या धाग्यातल्या प्रतिसादांत (ओढूनताणूनही) दिसत नाही !
अर्थात स्वतःची बाजू काहीही करून सिद्ध करण्यासाठी लॉजिक बाजूला ठेऊन असा धर्म्/जात्/आडनावाचा सद्य राजकारणमान्य कांगावा काही नविन नाही ! तेव्हा असो.
बरं जाऊ द्या. आडनावाचा संबंध नसावा. उपराष्ट्रपतींवर विनाकारणच शिंतोडे उडवण्याचा हा एक व्यर्थ प्रयत्न मानून सोडून द्या. बाकी राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा.
आम्ही म्हणतो तीच आणि तशीच देशभक्ती आणि तशी लेबले वाटत सुटणे ही नवी लाट इथे आलेली दिसते. काही दिवसांपूर्वी क्रिकेट ही एक देशभक्ती ही एक व्याख्या झाली. आता झेंड्याला सॅल्युट करणे हीच देशभक्ती ही नवी व्याख्या आली. उद्या छातीला आडवा हात लावून ध्वजप्रणाम एक- दोन- तीन! हीच देशभक्ती अशी ही नवी व्याख्या येईलच. नाहीतरी गीता हा राष्ट्रीय ग्रंथ होऊ घातलाच आहे.
>>> बाकी राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा.
दिग्विजय, मनिष तिवारी, निखिल वागळे, केजरीवाल, कुमार केतकर इ. निधर्मी विचारवंतांकडून नक्कीच हा प्रश्न आला असता.
तुम्हीच विचारलं होतं की त्यांचं नाव स्वामी सच्चिदानंद असतं तर त्यांच्या देशभक्तीविषयी प्रश्न निर्माण झाला असता का. त्याच प्रश्नाचं मी उत्तर दिलंय. त्यांचं नाव काहीही असतं तरी प्रश्न निर्माण झालाच असता. त्यामुळे नावाचा आणि प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही.
वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत माझे म्हणणे पुरेसे स्पष्ट केले आहे. पण तरीही व्यवस्थापनाचा वर लिहीलेला एक नियम परत एकदा इथे लिहीतो...
कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे. आणि आपले सर्व वरिष्ठ नेते/अधिकारी उत्तम असावेत असा आग्रह धरण्याचा हक्क लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे खर्या लोकशाहीत नागरिकांनी नेत्यांवर, अगदी सर्वोच्च नेत्यावरही, केलेली टीका निषिद्ध समजली जात नाही... किंबहुना हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि इतर राज्यव्यवस्थांत. मात्र या गोष्टीचा भारतात सहज विसर पडतो हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे.
लोकशाही तत्वांप्रमाणे, मला इतर मते मान्य नसली तरी त्यांचा आदर आहे... पण असे असले तरी इथे निष्कारण धर्म/जात इत्यादी आणणे निषेधार्ह तर आहेच पण ते ओढूनताणून केल्यामुळे खोडसाळपणाचेही आहे.
उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे.
हो पण सॅल्युट करणे हे सावधान राहण्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे असे कुणी सांगितले आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते काय? ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय? ध्वजसंहितेचा नियम पुरेपूर पाळणे ही दुसरी शक्यता असू शकत नाही काय?
७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय?
अश्या स्थितितील व्यक्तीला इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते माझे नक्कीच नाही... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! :)
हा प्रतिवाद करताना तुम्ही महामहीन उपराष्ट्रपतिंच्या नेमणूकीच्या योग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?
आता प्रतिवाद हास्यास्पद होऊ लागले आहेत... त्यामुळे फुकाच्या ओढूनताणून केलेल्या वितंडवादात रस नसल्याने... बाय बाय !!!
माझ्या मते हे खरं असावं. उपराष्ट्रपती मुद्दाम करतील असं वाटत नाही. त्यांच्याच बाजूला ओबामा उभे होते. त्यांनी सलाम करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळं आणि बाकीचे सलाम करतायत हे न जाणवण्यामुळं असं झालं असू शकेल. बाकी बरेच लोक सलाम करत नाहीत हे मी पाहिलंय कारण ताठ उभं रहाणं हे पुरेसं असतं.
अश्या स्थितितील व्यक्त इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! Smile
माफ करा थोडं कठोर बोलतो. प्रतिसादाचा विपर्यास कसा करावा याचे तुमचा प्रतिवाद हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. मूळ मुद्दा काय आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते का? माझ्या मते नाही. हे दाखवून देण्यासाठी मी आणखी दोन शक्यता बोलून दाखवल्या इतकेच. त्याच शक्यता आहेत असे म्हटलेले नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादातही 'कदाचित' असे होऊ शकते असे म्हटले होते. वृद्ध व्यक्तीला विस्मरण होऊ नये असा नियम आहे काय? आणि अशा स्थितीतील म्हणजे नक्की कशा? भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा पदावर असतानाही त्यांचा वृद्धापकाळाने अनेकदा तोल जात असे. त्यामुळे भारताची नक्की काय वाईट स्थिती झाली बरे? आपल्या लोकशाहीत राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही नामधारी पदे आहेत. तिथल्या पदावरील व्यक्तींना निर्णय घेण्याचे स्वतंत्र हक्क नसल्याइतपत आहेत. तिथल्या व्यक्तींच्या वयाचा भारताच्या परिस्थितीवर काहीही फरक पडणार नाही हा माझा आशावादी दृष्टीकोण आहे. निर्णयक्षम पदांवर पुरेसे सुदृढ लोक आहेत की. उगीच कुठलातरी - नसलेला - तांत्रिक मुद्दा काढून एखाद्याची देशभक्ती चघळत बसल्याने आपले देशप्रेम सिद्ध होते की काय?
हमीद अन्सारी यांची करियरची ओळख विकीवर पाहू शकता. भारतासाठी आयएफएसमार्फत त्यांनी पुरेसे योगदान दिलेले आहे असे दिसते. मग देशप्रेमाबाबतची शंका येण्याची कारण काय असावे बरे?
He started his career as Officer in the Indian Foreign Service in 1961. He was Permanent Representative of India to the United Nations, Indian High Commissioner to Australia and Ambassador to the United Arab Emirates, Afghanistan, Iran and Saudi Arabia.
आधीचा प्रतिसाद संपादित करता येत नसल्याने आणखी थोडी भर.
किंबहुना आयएफएस सर्विसेसमध्ये सगळी करियर गेल्याने उपराष्ट्रपती महोदयांना हे सर्व संकेत, प्रोटोकॉल्स यांची चांगली ओळख असावी. आंतरजालीय जनतेपेक्षा या सर्व संकेतांचे ज्ञान - विशेषतः कोणत्या गोष्टीने राष्ट्राच्या प्रतीकांचा सन्मान होतो व अपमान होतो हे ज्ञान - त्यांना निश्चितच जास्त असावे यात काहीच शंका नाही. अर्थात भारताचे राष्ट्रपती कोण हेही माहीत नसलेली पब्लिक 'हमीद मोहम्मद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्युट केला नाही' अशा आशयाचे संदेश - फोटोसकट- व्हॉट्सॅपवर कोणत्या उद्देशाने पाठवत असणार हे सांगायलाच नको. तरी बरं, मोदींनी फेटा घातला तसा अन्सारीसाहेबांनी अंडा क्याप वगैरे घालून हा सोहळा अटेंड केला नाही ते.
असो.
कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे. आणि आपले सर्व वरिष्ठ नेते/अधिकारी उत्तम असावेत असा आग्रह धरण्याचा हक्क लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे खर्या लोकशाहीत नागरिकांनी नेत्यांवर, अगदी सर्वोच्च नेत्यावरही, केलेली टीका निषिद्ध समजली जात नाही... किंबहुना हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि इतर राज्यव्यवस्थांत. मात्र या गोष्टीचा भारतात सहज विसर पडतो हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. लोकशाही तत्वांप्रमाणे, मला इतर मते मान्य नसली तरी त्यांचा आदर आहे... पण असे असले तरी इथे निष्कारण धर्म/जात इत्यादी आणणे निषेधार्ह तर आहेच पण ते ओढूनताणून केल्यामुळे खोडसाळपणाचेही आहे.७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय?अश्या स्थितितील व्यक्तीला इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते माझे नक्कीच नाही... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! :) हा प्रतिवाद करताना तुम्ही महामहीन उपराष्ट्रपतिंच्या नेमणूकीच्या योग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ? आता प्रतिवाद हास्यास्पद होऊ लागले आहेत... त्यामुळे फुकाच्या ओढूनताणून केलेल्या वितंडवादात रस नसल्याने... बाय बाय !!!