ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हेदेखील अटेंशन पोझमध्येच होते. (सॅल्युट न करता) असे दिसते. हमीद अन्सारी यांना जे कोणी सिंगल आऊट करत आहे त्यांचा हेतू काय असावा हे चटकन समजते. (दिल्लीच्या निवडणुका जवळ आल्याच आहेत).
http://www.firstpost.com/living/trolling-hamid-ansari-over-republic-day-salute-is-just-lazy-couch-potato-patriotism-2069575.html
प्रतिसाद तुम्हाला म्हणून उद्देशून दिलेला नाही. जस्ट एक माहिती म्हणून वर एक दुवा दिला आहे.
अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय तो व्हिडीओतली (बहुधा दूरदर्शन टीव्ही) फ्रेम screen shot स्वरुपात आहे असे वाटते. सिलेक्टिव्ह ॲंगल आणि नेमके ठराविक लोकच फ्रेममधे दिसतील अश्या बेतानेच तो घेतलेला दिसतो. जरा झूम्ड आउट सीन घेतला असता तर सॅल्यूट न केलेले इतर अनेक दिसले असते अन हा प्रश्न उभा करता आला नसता. लोकांना काय ? सनसनीखेज वाटते अन पुढे ढकलतात.
राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा.
हा प्रश्न फारच अस्थायी वाटला. अन्सारी मुसलमान असल्याने त्यांनी असे केले असे कोणीही म्हटलेले नाही.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचेच झाले तर मी म्हणेन की हो सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया कदाचित स्वामी सच्चिदानंदांसाठीही तिच असली असती. काही काळापुर्वी लालू प्रसाद यादव राष्ट्रगीत वाजवले असताना बसुन राहिले होए (उभे देखील नव्हते) तेव्हा त्यांच्यावरही बरीच टीका झाली होती. त्यांनीही बहुधा असेच काहितरी स्पष्टीकरन दिले होते. पण टीका झाली होती हे अमान्य करता येणार नाही. लालू प्रसाद यादव देखील हिंदुच आहेत.
अमेरिकन प्रेसिडेंट जगातील सर्वात शक्तिमान माणूस
हेच फार मोठे थोतांड आहे.
लोकशाही ही व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी चालविलेला एक मोठा व्यापार आहे त्यात निवडणुका एक फार्स आहे .
दर निवडणुकीला एक बाहुला तेथे प्रेसिडेंट पदी आणून बसवतात प्रत्यक्षात सर्व धोरणे ही व्यापाऱ्यांची प्रेशर लॉबी घडवून आणते.शेवटच्या दोन वर्षात ह्या बाहुल्याची चिरफाड करण्याचा अमेरिकन जनतेचा , प्रसार माध्यमांचा एककलमी कार्यक्रम असतो.तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ओबामा भारतात सौदी आणि मिळेल तिथे जाईल , त्याला शेवटच्या दोन वर्षी मिळणारे शिव्या शाप त्यांच्या सुरवातीच्या दोन वर्षात मिळाले आहे ,
भारतात निदान राजकारणी उद्योग आणि नाना धंदे करतात पैसे कमावतात . राजकारण हाच वंश परंपरागत उद्योग असतो.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या निवृत्ती वर बंधने
नाहीत. अमेरिकेत दहा वर्षाने नवीन बाहुला येतो तेव्हा जुना मोडीत काढतात ,आता बिल क्लिंटन भारतात आला काय केला काय , हिलरी एवढे महत्व सुद्धा त्यास मिळणार नाही.
सत्ता गेली की संपले रे निनाद्या.
अटलबिहारी उद्या सिंंगापूरला वा मनमोहन कौलालंपूरला गेले तर बातमी होईल का? पण नरेण्द्र शनी शिंगणापूरला आला तर मात्र बातमी होईल.
हि माई सगळ्याच मिपाकरांचा एकेरी ऊल्लेख करते जणूकाही हिने सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळवले आहे. कोणीही मिपाकर याची दखल न घेता माईची खिल्ली उडवतात तो भाग वेगळा.
पण देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी ऊल्लेख नक्कीच खटकणारा आहे. तेव्हा सं.मं. ने माईच्या वरच्या प्रतिसादातले शेवटचे वाक्य ऊडवावे आणि माईला जाहिररित्या योग्य समज द्यावी.
अरे यार... कशाचाही इशू करतात लोक. आता माई हा आयडी आपण ७०-८० ची म्हातारी आहोत असं भासवतो आणि म्हणून जनरल प्रत्येकाला अरे तुरे करतो. प्रत्यक्षात त्या आयडीचा/ची धनी अशी म्हातारी नाही हे कोणीही सांगेल. बर हा आय्डी काही वाह्यात अश्लील, आगलाऊ असलं काही लिहित नाही. मला या आयडीचे प्रतिसाद गंमतशीर वाटतात. वाचून मजा येते कधी कधी. उगाच समज देणं वगैरे म्हणजे फार ओव्हर रिअॅक्षन आहे.
>>> आता माई हा आयडी आपण ७०-८० ची म्हातारी आहोत असं भासवतो आणि म्हणून जनरल प्रत्येकाला अरे तुरे करतो. प्रत्यक्षात त्या आयडीचा/ची धनी अशी म्हातारी नाही हे कोणीही सांगेल.
माईसाहेब फक्त स्वतःच्या "ह्यांचा" आदरार्थी उल्लेख करतो आणि इतरांचा एकेरी उल्लेख. आपण १९ व्या शतकातली थेरडी आहोत असे तो भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ४० च्या आतला तरूण आहे. आपण व ग्रेटथिंकर (आणि पूर्वाश्रमीचे नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, सचीन, टॉपगिअर्ड फिलॉसॉफर इ. आयडी) हे आयडी एकच आहोत हे इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून पूर्णपणे वेगळ्या बेअरिंगमधून माईसाहेबच्या आयडीने तो प्रतिसाद लिहितो.
माईसाहेब फक्त स्वतःच्या "ह्यांचा" आदरार्थी उल्लेख करतो आणि इतरांचा एकेरी उल्लेख. आपण १९ व्या शतकातली थेरडी आहोत असे तो भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ४० च्या आतला तरूण आहे.
तो तरुण आहे हे तुम्हाला कसे माहीत ?? ती तरुणी (स्त्री) पण असू शकते (आहेच असे आमचे व्यक्तिशः मत आहे).. :)
अस नाही माई
भारतात जर येगळ आहे.सत्तेत नसून केजू युवराज कुठेही जाऊ बातमी होते.
दक्षिणेत अम्म्मा व करुणानिधी सत्तेचा खोखो खेळतात म्हणूनच सत्तेत नसतांना सुद्धा त्यांना सरकारी यंत्रणा मान देत .आपली घटना तिरडीवर जाई स्तोवर एखाद्यास राजकारण करू देते , अमेरिकन नियम आपल्याकडे असता तर नेहरू व इंदिरा पर्वच निर्माण झाले नसते.
अमेरिकन प्रेसिडेंट जगातील सर्वात शक्तिमान माणूस हेच फार मोठे थोतांड आहे.
हे तुम्ही गंमती गंमती मध्ये म्ह्णताय असं म्हणून सोडून देतो. कारण ओसामाला ओबामाची पहुंच फार उशीरा कळाली. पाक्यांना घंटा धूप न घालता ओसामाला त्याच्या घरात घुसून मारायची आज्ञा द्यायला तो अमेरिकेचाच प्रेसिडेंट असावा लागतो. आपण अजून दावूदचे आणि कसाबच्या हँडलर्स चे पुरावेच देतोय.
माईने कोणाही मिपाकराला अरेतुरे करावे यावर माझा अजिबात आक्षेप नाही आहे. माझा आक्षेप केवळ शेवटच्या वाक्यावर आहे.
"पण --- शनी शिंगणापूरला 'आला' तर मात्र बातमी होईल."
त्यांच्या वयाचा नाही पण किमान त्या पदाचा मान राखणे तरी अपेक्षित आहे. (माझे वैयक्तिक मत)
माझा प्रतिसाद अयोग्य वाटत असल्यास सं.मं. ने तो अवश्य ऊडवावा.
इथे अनेक माजी पंत प्रधानांवर इतक्या खालच्या भाषेत टीका झालेली आहे कि सांगावीशी पण वाटत
नाही . जे पेरल ते उगवलं . अवांतर - सध्या मोदी यांच्यावर वर पण सोशल नेट्वर्किंग वर अतिशय वैयक्तिक आणि खालच्या पातळीची टीका चालू आहे . अर्थातच ते चुकीचे आहे . पंतप्रधान या पदाची एक गरिमा आहे . तिचा सन्मान व्हायलाच हवा . पण पुन्हा तेच . पेरल ते उगवलं .
आपला टर्न येईपर्यंत शिस्तीत रांगेत उभं राहणं चांगल की बेस्टची बस अथवा लोकलमध्ये चढताना जशी रेटारेटी करतात तसं करण अपेक्षीत आहे?
अब्जाधीश असले म्हणून काय झालं? रांगेचा फायदा सर्वांना.
गुर्जी दुसर्या भागाच उत्तर न देता पहिल्या भागातच चर्चा घोळवणार अस वाटलं होतच. पण मी काय म्हणतो गुर्जी बाकी चर्चा आपण करूच पण हमीद अन्सारी यांच्या देशभक्ती बद्दल तुमच मत काय आहे हे लगेहात सांगून टाकाच
अन्सारींवर शंका घेणाऱ्या तमाम देशभक्तांना एक छोटासा प्रश्न.
अन्सारींना सभागृहाचे कामकाज हाताळताना यातल्या एकाने तरी पाहिले आहे का?
तसे जर असते तर हा माणूस राजनीतिक प्रथा, सांसदीय नियम आणि प्रोटोकॉल चा किती पक्का आहे हे निश्चित माहित असते. सरकारचे व संसदेचे कामकाज कसे चालते ह्याचे अन्सारींना जेवढे ज्ञान आहे त्याच्या ०.०००१ टक्का तरी ह्या तथाकथित देशभक्तांना असेल काय?
तुनळी वर संसदेचे कामकाज मिळत असेल तर पाहून घ्या. मग करा त्यांच्या आणि आपल्या देशभक्तीच्या तुलना.
त्या अन्सारींबद्दल एक किस्सा वाचलेला फेबुवर. मध्ये एकदा तुर्की देशात भारताचे एक प्यानेल गेले होते त्यात हे अन्सारी साहेबही होते. 'अन्सारी' आडनावाचा अर्थ इस्लाम संस्थापक मुहम्मद यांना अडचणीच्या वेळी आश्रय देणारे असा होतो. तुर्कीमध्ये त्या खानदानाचे जुने घर आहे. भारतीय शिष्टमंडळ तुर्कीत पोचल्यावर नमस्कारचमत्कार झाले आणि तुर्कीतले काही लोक आले की तुमच्या खानदानाचे मूळ घर बघायला चला म्हणून. अन्सारी लगेच हो म्हणाले नाहीत, उद्या सांगतो म्हणाले. भारतीय शिष्टमंडळातले लोक म्हणाले अहो इतकी जुनी परंपरा आहे तर जाऊन तरी या, काय फरक पडतो. अन्सारी म्हणाले की मी इथे भारताचा पोलिटिकल प्रतिनिधी म्हणून आलोय, अन्सारी खानदानाचा वंशज म्हणून नाही. परत दुसर्या दिवशी तुर्कीचे लोक आले. त्यांनी व इंड्यन शिष्टमंडळाने अन्सारींना परत गळ घातली तेव्हा कुठे ते जायला तयार झाले.
असा हा कर्तव्यतत्पर माणूस असूनही त्याच्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जातेय हे केवळ दुर्दैव.
जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो तो असाच असतो! हामीद अन्सारीं चा किस्सा सुपर्ब!! आवडला!! ज्ञानेश्वर मुळे जेव्हा मालदीव्स मधे भारतीय उच्चायुक्त होते तेव्हा त्यांचे अधिकारीक निवासस्थान अन मालदीव्स च्या अध्यक्षा चं हापिस/घर २०० मीटर च्या अंतरा वर होते! तरीही जेव्हा कधी वैयक्तिक किंवा सरकारी कामानिमित्त मुळे ह्याना अध्यक्षा ला भेटायचे असले किंवा त्यांचे आवतन आले असले तरीही ते कधीच प्यांटी च्या खिशात हात घालून गेले नाही! बाकायदा प्रोटोकॉल नुसार गेराज मधुन काळी मर्क काढून त्याच्या पुढे फ्लैग मास्ट वर भारताचे निशाण लावुन सोबत मायन्युट्स घ्यायला सेक्रेटरी , दुभाषा इत्यादी सोबत घेऊन जात असत!
आता हयात दोन मते येऊ शकतात
१. त्यांच्या प्रोफेशनलिझम चं कौतिक
२. त्यांच्या प्रोटोकॉल कड़क पाळण्य़ा वर टिका (जनतेच्या कराचा अपव्यय करतात, इतके काही करायची गरज नाही वगैरे)
व्यक्तिशः मला ते पटते! कारण मर्क मधे फ़िरणारे तिथे मुळे हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात! अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले! इतरांच्या मताचा पण आदर!! _/\_
(व्होलटेरीश) बाप्या! :)
हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात!
नेते आणि प्रतिनिधी यांची देशातली आणि परदेशातली दृश्य वागणूक देशाची प्रतिमा नागरिकांच्या मनात बिंबविते आणि परदेशात देशाची लायकी ठरवते.
माझ्यापुरता तरी हा प्रश्न देशभक्तीचा नाही तर देशातल्या दोन क्रमांकाइतक्या उच्च पदावरच्या व्यक्तीने दाखवलेल्या नेतृत्वगुणाचा आहे. देशभक्ती आणि धर्म हे इथे (दोन्ही बाजूंकडून) एनकेनप्रकारेन आपली बाजू पक्की करायला ओढूनताणून मधे आणलेले मुद्दे आहेत.
१. फोटोतील सर्व उद्योगपती हे जंटलमन आहेत. ते स्वतःहूनच रांगेत उभे राहीले असतील. त्यांनी काय एकमेकाला ढकला ढकली करत जायचे होते की काय? आजकाल कुणी कसलाही फोटो काढतो आणि त्याच्याशी कसलाही बादरायण संबंध जोडायची फॅशनच आली आहे. आजच्या मेडीयाला चघळायला असेच काही तरी लागते.
२. उपराष्ट्रपतींबद्दलही निष्कारण धुरळा उडवला जात आहे. झैलसिंग राष्ट्रपती असताना ते एकदा अनवधानाने राष्ट्रगीत चालू झाल्यावर बसून राहीले होते. इंदिरा गांधींनी खुणावल्यानंतर ते उभे राहीले. दुस-या दिवशी पेपरमधे बातमी होती. पण त्यानंतर कुणी एव्ह्ढी राळ उडवली नव्ह्ती.
हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात!नेते आणि प्रतिनिधी यांची देशातली आणि परदेशातली दृश्य वागणूक देशाची प्रतिमा नागरिकांच्या मनात बिंबविते आणि परदेशात देशाची लायकी ठरवते.