टोपणनाव
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ?
आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ?
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे".
आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे.
[संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””]
ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की
सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त)
, (३० वर्षे )- (३३-६६%)
, (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी)
त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious.
उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे.
सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही.
Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले.
नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते.
माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर
दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...!काय पण लॉजिक हाय? मान गए!! फ़क्त नावावरुन कुणाच्या xxमध्ये किती दम आहे ते ठरवता येते? .निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाहीयाचा मला समजलेला अर्थ असाकी,वरीजनल नावामुळे लिहिण्यावर बंधने येतात. म्हणजेच एखादी व्यक्ति पुर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. (पोटात१ आणि ओठावर १ ऎसे)। तुम्ही असे नसाल (नाहीच), पण मग अशा खऱ्या नावामुळे फ़ायदा काय? कुणाचा? आणि तुमच्या दृष्टीने टोपण नावाचा तोटा काय? कुणासाठी?